|
Moodi
| |
| Thursday, August 03, 2006 - 2:27 pm: |
|
|
कराडकर मस्त माहिती दिलीस गं, धन्यवाद. आता फरक कळेल तिखट करतांना. दिनेश येऊ द्या अजून. चिंगे ही गोडुली कोण आहे? तूच तर नाही ना? चिंगी नाव टाकलस म्हणून विचारले. ~DDD
|
आभारी आहे कराडकर आता हि मिर्चि मला इथे ऑस्त्रालिया ल मिळ्नार नाहि मग ढबू मिर्चिच वापरलि मि असो पून्हा एकदा आभार रुपाली
|
Dineshvs
| |
| Friday, August 04, 2006 - 1:24 am: |
|
|
चिंगुताई, आमच्या मन्नुला ईथे झळकवल्याबद्दल आभार. मिनोति छान माहिती ? मी काय भर घालणार आणखी. आमच्या घरीहि बेडगी आणि संकेश्वरी यांचे मिश्रण वापरतात. माश्याच्या वाटपात पण आवर्जुन बेडगी घेतात, त्याने छान केशरी रंग येतो. पुर्वी काश्मिरी मिरचि मिळत नसे. रंगासाठी बेडगीच वापरत.
|
Chingutai
| |
| Saturday, August 05, 2006 - 7:29 am: |
|
|
मूडी हो ग हो........मी ही अगदी अश्शिच होते लहान असताना........ शू हादा दिनेशदा? आभार कसचे! -चिन्गी
|
Bhagya
| |
| Sunday, August 06, 2006 - 4:14 am: |
|
|
दिनेशदा, माझी ट्रीप झाली...मस्तच झाली. आता सगळे सविस्तर लिहिनच.. खूप देश फ़िरवले संदीप ने.
|
Dineshvs
| |
| Sunday, August 06, 2006 - 4:01 pm: |
|
|
छान छान, आम्ही सगळ्यानी तुला खुप मिस केले. आता सवडीने सगळे लिहि. फोटो पण दाखव आम्हाला.
|
Bhagya
| |
| Monday, August 07, 2006 - 9:43 am: |
|
|
रुपालि, तू सिडनी ला असशील तर लिव्हरपूल ला "तारा" मध्ये सुंदर लाल रंगाची आणि कमी तिखट असणारी तिखटपूड मिळते. त्यानी रश्श्याला फ़ार छान लाल रंग येतो. दिनेशदा, मेल केली आहे.
|
Moodi
| |
| Monday, August 07, 2006 - 7:30 pm: |
|
|
ओह! तर हा गोडुला मनू आहे होय, ओळखलाच नाही त्याला. चिंगी तुला पाठवलेले फोटो मग दाखव की आम्हाला पण. दिनेश मागच्या दिवाळीत जाताना बहारीन अन येतांना मस्कत असा प्रवास होता. बहारीनचा एअरपोर्ट मोठाच आहे की मस्कतच्या एअरपोर्टपेक्षा. दोन्ही एअरपोर्ट स्वच्छ अन छानच. बहारीनला मात्र चांगल्या सोयी आहेत मस्कतपेक्षा. रमजानचा महिना चालू होता त्यामुळे मी पोचले तेव्हा संध्याकाळचे ७ वाजले होते. तिथे उतरताना अन विमान मुंबईकडे रात्री १० वाजता निघताना जी काही दिव्यांची रोषणाई बघीतली ती अजून आठवतेय. लाखो पाचू, हिरे अन माणकांनी ते शहर झळाळुन निघालय असे वाटले. पण माझ्याजवळ नेमका कॅमेराच नव्हता.
|
भाग्या आभार, मि जेव्हा सिडनी ल जाइन तेव्हा आणेन बाकी दिनेश दादा चि ओमान यात्रे बद्दल वाचताना मजा येतेय.... खरच खूप सुन्दर लिखान करता तुम्हि दादा.... आभार रूपाली
|
Raina
| |
| Friday, August 11, 2006 - 4:57 am: |
|
|
दिनेश- बापरे- तुम्हाला येवढ सगळं असं डिटेलवार कसं आठवत अजून एका विषयावर लिहा न please . तेथील "स्त्रीजीवनावर". माझी एक मैत्रिण तिथे काही महीने नोकरी करत होती आणि बायकांसाठीच्या नियमांनी जरा वैतागली होती. तुमचे निरीक्षण जाणून घ्यायला आवडेल.
|
Dineshvs
| |
| Friday, August 11, 2006 - 6:29 am: |
|
|
अवश्य लिहिन, ओमानमधे बायकांवर काहिहि बंधने नाहीत. त्या सगळीकडे नोकरी करु शकतात. फिरु शकतात.
|
Devsparsh
| |
| Friday, August 11, 2006 - 11:33 am: |
|
|
Dinesh, Tumcha likhan mala khoop avadla. Aagdich manala, tya tumchaya divsat ghevun janara! Me pan September mahinyat Sharjah la janar aahe kadachit kahi varshanni me he tumchaya sarkha maze anubhav leehin.
|
Chingutai
| |
| Saturday, August 12, 2006 - 6:07 am: |
|
|
दिनेशदा, हे घ्या...................साॅरी उशीरा अपलोड करतेय, आठवडा बाहेर होते -चिन्गी
|
Surabhi
| |
| Saturday, August 12, 2006 - 10:16 am: |
|
|
गेला महीना दिड महीना मी cuisines & recipes ची नियमीत वाचक होते पण सहज browse करता करता तुमचा BB दिसला आणि तुमचे इथले केनया, नायजिरीया, ओमान वैगेरे देशांबद्दल लिखाण पाहून तुम्ही किती versatile आहात असे वाटून राहिले. तुम्ही केनया बद्दल जे लिहीले ते मी खूप आसुसून वाचले कारण आम्ही दहा वर्षे केनयात होतो.काही वर्षे नायरोबी व काही वर्षे मोम्बासा मध्ये.तुम्ही ओमान बद्दल म्हटलय ना की जितका भारत देश पाहीला नसेल इतका ओमान पाहिलाय अगदी तसच मी केनया बद्दल म्हणू शकते त्यामुळे तुम्ही लिहीलेले वाचण्यात खूप मजा आली. फ़क्त अस सांगावेसे वाटते की केनया आता खूपच सुधारलय. पंधरा वीस वर्षापूर्वी कदाचीत असे असावे केनया पण आता मात्र खूप developments and progress झालाय. केनयात मी घालवलेले दिवस नेहमीच तिथल्या सुखद आठवणी जाग्या करतात. अगदी माहेरपण अनुभवलय केनयात अस वाटत राहाते. तुम्ही खूप छान लिहीलेय हे सांगायलाअच मी मायबोलीवर register केले. आणि तुमच्या रेसिपी व टीप्स पण खूप छान असतात!
|
Dineshvs
| |
| Saturday, August 12, 2006 - 11:13 am: |
|
|
सुरभी, प्रतिक्रियेने मी भरुन पावलो. माझ्याहि मनाचे काहि धागेदोरे अजुनहि या देशात गुंतलेले आहेत. चिंगु, फोटो एवढा बारिक का केलास ?
|
सुरभी, व्हर्साटाईल? दिनेश हा मायबोलीवरचा हिरा आहे हिरा!! ह्या हिर्याला किती पैलू आहेत हे अजून कुणालाही आकलन झालेले नाही.....
|
दिनेश जीवनात जेव्हा जेव्हा frustration येते तेव्हा तुझ्यासारखी आसूसुन जगणारी माणसे पाहून धीर येतो. जगण्यात अर्थ आहे असे वाटते.... कुणितरी म्हटलय तुम्हाला निराश वाटेल तेव्हा तुमच्या मित्रांचे सद्गुण आठवा.... तसंच!
|
Surabhi
| |
| Saturday, August 12, 2006 - 5:00 pm: |
|
|
रोबीनहूड, दिनेशना हीरा म्हणून गौरवलेत हे योग्यच केलेत. अशी माणसे दूर्मीळच असतात. आपल्या सर्वांच्या मैत्रीच्या कोंदणात हा हीरा असाच चमकत राहो ही सदिच्छा!
|
Arch
| |
| Saturday, August 12, 2006 - 11:21 pm: |
|
|
अरे वा! दिनेश तुम्ही मायबोलिचे हिरो झालात की
|
दिनेशदा फोटोत मी काहीही बदल केले नाहीत, तुम्ही पाठविला तसाच अपलोड केलाय. -चिन्गी
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|