|
| |
| Sunday, July 02, 2006 - 4:45 pm: |
|
|
आता या पाकळ्या गळुन नुसता गेंद उरेल. कन्हैयाने याच फुलांचे गेंद पाण्यातील गोपीना मारले असतील. आणि त्यानीही, " फुल गेंदवा ना मारो " अशी लटकी तक्रार केली असेल. सध्या मात्र कोकणात हि निवं कधी पिकतात याची वाट बघत असतील. यातला गर आंबटगोड लागतो. याचे लोणचे घालतात. जनावरे पण आवडीने खातात हि फळे.
|
| |
| Monday, July 03, 2006 - 4:05 pm: |
|
|
देवळातल्या कोरीव कामाबद्दल लिहिले आहेच. हा खांब. यात कुठेहि जोडकाम दिसत नाही. सध्या मात्र तो भडक ऑईलपेंटने रंगवलाय, त्यामुळे ते रंग वजा केलेत.
|
| |
| Monday, July 03, 2006 - 4:25 pm: |
|
|
आणि हि महिरप, सागवानी लाकुड आहे. खरे तर मला त्या देवळात खुप अगत्याची वागणुक मिळाली. जेवायचा आग्रह होत होता, पण तेवढा वेळ नव्हता.
|
| |
| Tuesday, July 04, 2006 - 4:07 pm: |
|
|
त्या देवळामागुन हि वाट जात होती. मला वाटले वरती आणखी एखादे देऊळ वैगरे असेल, तर तसे काहि नव्हते, वर एक वाडी आहे. पण वाटच ईतकी सुंदर होती, कि ......
|
| |
| Tuesday, July 04, 2006 - 4:17 pm: |
|
|
त्या साकवावरुन खाली असे दृष्य दिसत होते
|
| |
| Tuesday, July 04, 2006 - 4:21 pm: |
|
|
राजापुरला उन्हाळे म्हणुन एक जागा आहे. तिथे गरम पाण्याचा झरा आहे. पण परवा ते सगळेच पाण्याखाली गेले होते. तिथले हे देऊळ. याच देवळाचा मागच्या वेळचा फोटो आठवतोय का, त्यावेळी चाफा फुलला होता. आता कसे सगळे हिरवेगार आहे.
|
| |
| Monday, July 17, 2006 - 1:48 am: |
|
|
काल अजय Al_omnet बरोबर ठोसेघर ला गेलो होतो, तिथले हे धबधबे, हा मुख्य
|
| |
| Monday, July 17, 2006 - 1:49 am: |
|
|
हे दोन कोपर्यातले.
|
| |
| Monday, July 17, 2006 - 1:50 am: |
|
|
वाटेत दिसलेले हे प्रातःकालीन ईंद्रधनुष्य.
|
| |
| Monday, July 17, 2006 - 1:53 am: |
|
|
निसर्गाच्या रंगमंचावर प्रत्येक लहानमोठ्या कलाकाराला संधी दिली जाते. हे दिवस आहेत आशाढ हबे आमरीचे किंवा चिकरकांद्याचे.
|
| |
| Monday, July 17, 2006 - 1:54 am: |
|
|
हे आहे अजयच्या बागेतले फुल.
|
| |
| Monday, July 17, 2006 - 6:17 pm: |
|
|
हे पण त्याच्याच बागेतले.
|
| |
| Monday, July 17, 2006 - 6:19 pm: |
|
|
हि ठोसेघरला जाणारी वाट, फार पुढे कोसळलेली दरड दिसते आहे.
|
| |
| Thursday, July 20, 2006 - 3:42 pm: |
|
|
ठोसेघरच्या धबधब्यावरुनहि खाली बघता येते. तिथले हे दृष्य.
|
| |
| Thursday, July 20, 2006 - 3:49 pm: |
|
|
हा आहे गावठी गुलाब, कुठला ते सांगायलाच हवे का ?
|
| |
| Friday, July 28, 2006 - 5:20 pm: |
|
|
सल्तनत ए ओमान हो अगदी हेच नाव आहे. माझा अत्यंत आवडता देश. जितका भारत बघितला नसेल मी, तितका ओमान बघितलाय मी. देशाबाहेर पहिले पाऊल टाकले ते ईथे. तिथल्या एका मासिकात उल्लेख वाचला होता, की जग पहिल्यांदा निर्माण झाले, तेंव्हा जितके सुंदर होते, तितकाच हा देश सुंदर आहे. तिथल्या अनेक भटकंतींच्या ठिकाणी हे जाणवत असे. या जगात फक्त आपणच उरलो आहोत आणि चहुबाजुला पसरलाय तो भव्यदिव्य निसर्ग. ईथे निसर्ग म्हणजे बर्फाचे डोंगर, निळीशार सरोवरे एवढेच अपेक्षित नाही मला, तर काळेकभिन्न डोंगर, त्यातुन वाहणार्या नद्या. नितळ समुद्रकिनारे, मैलो न मैल पसरलेले वाळवंट हे पण निसर्गाचे तितकेच लोभस रुप आहे. या देशाबद्दल लिहिताना, तिथे मिळालेली आपुलकि, तिथल्या माणसांचा प्रेमळपणा, समजुतदारपणा यांचे उल्लेख अपरिहार्य आहेत. मला कुणी वीसेक वर्षांपुर्वी भेटले असते, तर एक शिष्ट माणुस असेच मत झाले असते माझ्याबद्दल. मला चारचौघात मिसळायला शिकवले ते या देशाने. बोलके केले तेहि याच देशाने. जेंव्हा पहिल्यांदा देशाबाहेर पडलो, तेंव्हा तर गद्धे पंचवीशीत होतो. फारशी अक्कल नव्हती. ( आता आलीय असा दावा नाही. ) फारसा विचारहि केला नव्हता. देशाबाहेर जावे असाहि विचार नव्हता केला. पासपोर्ट आधीच काढुन ठेवला होता, पण त्यामागेहि काहि खास विचार नव्हता. त्यावेळी पासपोर्ट सहज मिळत असे म्हणुन काढला होता ईतकेच. त्यावेळी मुलाखतीला वैगरे जावे लागत नसे. मी तर माझा तयार झालेला पासपोर्ट आणायलाहि गेलो नव्हतो. तो माझ्या एजंटने घरी आणुन दिला होता. सी. ए. होवुन बरिच वर्षे झाली होती. त्या पायात आवडते सगळे विषय मागे पडले होते. सी. ए. झालो तरी प्रॅक्टिस करायची नाही, या निर्णयावर ठाम होतो. बर्यापैकी नोकरी होती, निव्वळ आवड म्हणुन शिकवायचे काम निष्ठापुर्वक करत होतो. त्यामुळे तसा आनंदीच होतो. त्या दिवसात एक पोस्टकार्ड माझ्या नावे आले आणि तुला ओमानमधे यायचे असेल, तर मुलाखतीला ये, असे त्यात लिहिले होते. मी कुठेहि अर्ज केला नव्हता, कुणातरी मित्राने ते पत्र पाठवले होते. मुलाखत दिली आणि त्याबद्दल विसरुनहि गेलो. काहि दिवसातच, पासपोर्ट आणुन दे, असा फ़ॅक्स आला. मी जेन्व्हा होकार दिला, त्यावेळी माझे आईवडील बाहेरगावी होते. ईतका मोठा निर्णय मी एकट्याने घेतला होता. त्या देशाचे नाव मस्कत कि ओमान हे पण धड माहित नव्हते. पण त्या काळातल्या धाडसी वृत्तीने निर्णय घेतला खरा. आईला तर खुपच आश्चर्य वाटले. आपला दिनु आपल्याला सोडुन कुठे राहु शकेल, अशी कल्पनाहि तिने कधी केली नव्हती. माझ्यापेक्षा माझ्या घरचेच जास्त तणावात होते. आमच्या नात्यात वा शेजारी पाजारी कुणी परदेशी नव्हते. मग तिथे कुणी आहेत का याचा शोध सुरु झाला. अशी काहि माणसे भेटलिहि. वडीलांचे काहि जुने सहकारी, तिथे असल्याचे कळले. आईवडील काश्मिरला गेले होते, तिथे त्याना एक मस्कतचा माणुस भेटला होता. त्यावेळी त्याने पत्ता वैगरे दिला, होता तो शोधण्यात आला. तो देश कसा आहे, हवामान कसे आहे, लोक कसे आहेत, याची चौकशी सुरु झाली. अरे मस्कत म्हणजे, आपल्या पुण्या मुंबईसारखाच आहे. काहि निर्बंध नाहीत तिथे. अरे मुस्लीम देश तो, सक्तीने नमाज पढायला लावतात, लोक महाडॅंबीस, हातोहात फसवतात, लुटुन नेतात, हवा खुप गरम आहे, तुझे कसे होणार, तु शाकाहारी ना, तिथे भाज्याबिज्या काहि मिळत नाहीत, असे अनेक सल्ले कानावर पडत होते. शेवटी तिकिट हातात आले. परत परत माझ्या निर्णयाची खातरजमा करुन घेतली जात होती. आईने काय काय बांधुन देऊ, असे विचारायला सुरवात केली, मी काहि नको असे म्हणत राहिलो. विमान प्रवास मला नवा नव्हता, अनेक वार्या झाल्या होत्या, पण त्या देशातल्या देशात. आता मात्र पहिल्यांदाच देशाची सीमा ओलांडणार होतो. अपुर्ण.
|
| |
| Saturday, July 29, 2006 - 1:34 am: |
|
|
सामान काय न्यायचे याबाबत बर्याच शंका होत्या. पण निदान कपडे तरी भरपुर न्यावेत म्हणुन ते घेतले. ( पुढे त्याचा काहि फायदा झाला नाही, तो भाग वेगळा ) पुस्तके न्यावीशी वाटत होते, पण ती फार नाही घेतली. त्यावेळी तिकिटावर २३ किलो वजन लिहिले होते, तितकेच घेतले पाहिजे, असे मला आणि ईतरानाहि पटवुन घेतले. शेवटी जायचा दिवस उजाडला. हो दिवसच. आखाती प्रदेशाची विमाने, दिवसा उजेडीच सुटतात. तिकिट गल्फ एअरचे होते. त्यावेळी बहारिन, अरब अमराती, ओमान आणि कातार या चारहि देशांची मिळुन एकच एअरलाईन होती. तसेच त्यावेळी विमानतळावर सुरक्षिततेचा फारसा बाऊ नव्हता. सहार विमानतळ कार्यरत होता तरी आता ईतका मोठा नव्हता. घरचे सगळे, मित्रपरिवार विमानतळावर आला होता. सगळ्यांच्या तोंडावर काळजी स्पष्ट दिसत होती. कुणी प्रत्यक्ष बोलले नाही तरी, नाही जमले तर ताबडतोब परत ये, असाच भाव सगळ्यांच्या चेहर्यावर होता. मी मात्र उसने अवसान आणले होते. मित्रांचा उत्साह तर उतु जात होता. तुझे विमान अजुन धक्क्याला लागलेच नाही, पासुन या बघ तुझ्या विमानातल्या हवाई सुंदर्या अश्या अनेक खबरा ते मला देत होते. माझ्याकडे एकच बॅग होती. ती वजनात वैगरे बसत होती. त्यापुर्वी बहुतेक विमानप्रवासातच नव्हे तर एरवीहि मी खिडकि मागुन घेत असे, तसेच या वेळी पण मागता येते का, अशी शंका होती. भित भित विचारले, त्यात काय एवढं असा भाव चेहर्यावर आणुन, त्या बाईने मला बोर्डिंग पास हातात दिला. परत सगळ्याना भेटायला गेलो. यापुर्वी मी कधीहि एकटा राहिलेलो नव्हतो. आता मात्र सगळ्यांचे चेहरे रडवेले झाले होते. मित्र पण हिरमुसले होते. त्याना सगळ्याना परत पाठवुन, मी फ़ॉर्म्स वैगरे भरायला घेतले. खुप जणाना कुठलाहि फ़ॉर्म भरायचा म्हंटला कि धडकीच भरते, आम्हा लोकाना म्हणजे सी ए करताना, आर्टिकलशिप केलेल्या लोकाना फ़ॉर्म्स चे काहि वाटत नाही. तसा तो भरला. मग पैश्याच्या काऊंटरवर गेलो. त्या काळी फक्त २० डॉळर्स तेहि वाटखर्चासाठी मिळत असत. आणि त्याची चक्क पासपोर्टवर नोंद वैगरे होत असे. २० डॉलर्सचे वट्ट ७ रियाल ८०० बैसे हातात आले. आता पुढे सगळे व्यवहार, याच ओमानी रियालमधे करायचे होते. मग बोर्डिंग पास घेऊन, विमानात शिरलो. फ़िक्कट अबोली रंगाच्या ड्रेसमधल्या, डोक्यावर टोपी, तुरा वैगरे घातलेल्या हवाई सुंदरीने स्वागत केले. यापुर्वीचा प्रवास ईंडियन एअरलाईन्सने झाला होता, त्या विमानांची अवस्था एस्टीपेक्षा जरा बरी अशी असल्याने, तिरान अल खलीज म्हणजेच गल्फ़ एअरचे विमान राजेशाहिच वाटले. तसेच त्या विमानात नसणारा टिव्ही वैगरे या विमानात होता. नेहमीचे ड्रिल वैगरे झाल्यावर विमान उडाले. यापुर्वी पण अनेकवेळा जुहुचा किनारा ओलांडुन विमान गेले होते, पण आता मात्र वळुन वळुन मातृभुमीची सीमा न्याहाळत होतो. व्हेज ऑर नॉन व्हेज असे एअरहोस्टेसने विचारल्यावर भानावर आलो. खरे सांगायचे तर हा प्रश्ण मी अपेक्षित केला नव्हता. शाकाहार सोडायची मानसिक तयारी केली होती. व्हेज मागितल्यावर बर्यापैकी जेवण समोर आले. खरे तर भुक नव्हती. जेवण वैगरे आटपुन परत खिडकि बाहेर बघत बसलो. थोड्याच वेळात जमीन दिसु लागली. काळे काळे डोंगर आणि मधुनच वाळवंट असे दिसु लागले. ओमानचे पहिले दर्शन झाले होते. उड्डाण केल्यापासुन दोन तासातच विमान खाली उतरु लागले. मस्कतचा अल सीब विमानतळ दिसु लागला. अगदी छोटासाच असा तो विमानतळ होता, आणि तिथे एअर ईंडियाचे विमान उभे होते. निव्वळ त्या विमानाला बघुन मला धीर आला. अपुर्ण
|
| |
| Monday, July 31, 2006 - 4:55 pm: |
|
|
१० फ़ेब्रुवारीचा दिवस होता तो, प्रत्यक्ष उड्डाणाला सव्वा दोन तासच लागले असले तरी वेळेत चार तासाचा फरक पडला होता. त्यामुळे अंधारहि पडु लागला होता. विमानतळ तसा सामसुमच होता. उतरलेले एकच फ़्लाईट होते, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. माझ्याकडे फक्त एन. ओ. सी. ची कॉपी होती, त्यामुळे जरा धाकधुक वाटत होती, पण तिथे अनेक जण तसेच होते. तिथे एन. ओ. सी. ची ओरिजीनल कॉपी विमानतळावर ठेवायची पद्धत असते. आपल्याकडची कॉपी बघुन तिथल्या तिथे ओरिजिनल आपली एन. ओ.सी. आपल्याकडे दिली जाते आणि ती ईमिग्रेशन काऊंटरवर दाखवली कि, पासपोर्टवर स्टॅंप मारुन, आपण बाहेर पडतो. या प्रक्रियेला अक्षरशः दोन मिनिटे लागतात. बाहेर आलो तर सगळ्यांचे सामान पट्ट्यावरुन खाली काढुनहि ठेवले होते. हे सगळे ईतक्या सहजतेने होईल अशी अपेक्षाहि ठेवली नव्हती मी. मी ज्या कंपनीत काम करणार होतो ती एक ऑडिट फ़र्म होती. त्या कंपनीतर्फे एक माणुस आलाहि होता. गाडीत बसल्यावर त्याने मला सेफ़्टी बेल्ट लावायची आठवण करुन दिली, तिथे त्या बाबतचे नियम कडक होते. सेफ़्टी बेल्ट लावलेला नसल्यास, पोलिस तुम्हाला तो लावायची आठवण करुन देतो ईतकेच. जबर दंड असला तरी तो केला जात नाही. मग आम्ही सुलतान काबुस रोड ला लागलो. पुढे या रस्त्यावरुन अनेक फ़ेर्या मारळ्या. विमानतळ आहे तो सीब या गावात. मस्कतपासुन ३५ किलोमीटर्स वर हा विमानतळ आहे. पण मुळ मस्कत गाव देखील आता तसे एका बाजुला पडलेय, व रुवी हे कमर्शियल सेंटर म्हणुन विकसित झाले आहे. तर रुवी ते सीब हे साधारण ३० किलोमीटर्सचे अंतर म्हणजे हा सुलतान काबुस रोड. अगदी लांबरुंद आणि सतत वाहता असणारा हा रस्ता. आजुबाजुला हिरवळ, दुभाजकावर रंगीबेरंगी फ़ुलझाडे, देखणी कारंजी, आजुबाजुला वेगवेगळ्या बॅंका, वझारा ( मिनिष्ट्रीज ) यांच्या ईमारती, यानी हा संपुर्ण रस्ता सजलेला आहे. जिथे मोकळी जागा आहे तिथे हारीने, तमार म्हणजे खजुराची झाडे आहेत. जेंव्हा उतरलो होतो, तेंव्हा रस्ता काहि काळ सुगंधीहि होता, कारण बुचाची झाडे ( ईंडियन कॉर्क ट्री ) बहराला आली होती. या रस्त्यात अनेक गावे लागतात. पण त्या गावात वळणारी वाहने आपसुक बाजुला होतात आणि थेट जाणार्यांसाठी फ़्लायओव्हर्स आहेत. तिथल्या राजा म्हणजे सुलतानाच्या नियमांप्रमाणे, अवजड वाहने फ़्लायओव्हर्स वरुन जाऊ शकत नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे सुरक्षितता. ( असा सुरक्षिततेचा दृष्टिकोन, तिथे पदोपदी जाणवतो. ) प्रथमदर्शीच तो रस्ता मला खुप आवडला. मग आम्ही रुवीमधे शिरलो. तिथे मात्र भरपुर गर्दी दिसली. अनेक दुकाने, रेस्टॉरंट्स वैगरे दिसली तिथे. ती गर्दी टाळुन, आम्ही मत्राह नावाच्या गावात शिरलो. वाटेत स्टार नावाचे सिनेमाचे थिएटर दिसले, चक्क दाक्षिणात्य भाषेतला सिनेमा लागला होता तिथे. मत्राह गावात मात्र रस्ता अगदी अरुंद होता. जेमतेम एक लेनचा रस्ता. त्यात दोन्ही बाजुला गाड्या पार्का केलेल्या. त्यातल्या काहि गाड्या परत रस्त्यावर यायच्या प्रयत्नात. तो गाडीचं बुड जरा बाहेर काढणार. मग मागचा गाडीवाला, त्याला पहले आप, अशी खुण करणार. मग पुढचा गाडीवाला गाडी रस्त्यावर घेणार, मग परत मागचा गाडीवाल्याकडे बघुन, शुक्रन ( शुक्रिया ) ची खुण करणार, असा सगळा शिस्तीत कारभार चालला. तिथेच रोलेक्सच्या शोरुमसमोर आमची गाडी थांबली. तेच आमचे ऑफ़िस होते. सरळ माझ्या अरबाब ( स्पॉन्सर ) ला भेटायला गेलो. माणुस तोंडावरुनच प्रेमळ वाटत होता. तसा तो होताहि. सगळ्यात आधी प्रवास कसा झाला, घरी सगळे कसे आहेत याची चौकशी करुन, मग घरी सुखरुप पोहोचल्याचा फोन कर असे सांगुन टाकले. ( अश्या वेळी तिकडे किती वाजलेत, असा प्रश्ण नेहमीच विचारला जातो. अजुनहि हेच चालु आहे. ) तिथे अगदी पहिल्यांदा नजरेत भरली ती बैठकव्यवस्था. टेबलखुर्ची असली तरी, तिथे मुख्य खुर्ची समोरच्या खुर्च्या, त्या खुर्ची कडे तोंड करुन न ठेवता, काटकोनात ठेवला होत्या. या अश्या व्यवस्थेमुळे आपसुकच मोकळेपणा वाटत असे. जुजबी बोलणे झाल्यावर, ऑफ़िसशेजारच्याच बिल्डिंगमधे असलेल्या, आमच्या फ़्लॅटवर मला नेण्यात आले. चौथ्या मजल्यावरचा, चांगला ऐसपैस असा तो फ़्लॅट होता. तीन भल्यामोठ्या बेडरुम्स होत्या. एकेका रुममधे दोन जणांची सोय केली होती. त्यापुर्वी मा कधीच हॉस्टेलमधे वैगरे राहिलो नसल्याने, माझे सोबती कसे असतील, असा विचार करत होतो. आराम कर असे सांगुन माझा सहकारी निघुन गेला. आणि मला प्रचंड होमसिक वाटायला लागले. फोन झालाच होता, तरी, गेल्या गेल्या पत्र लिही, असे आईने बजावल्याप्रमाणे पत्र लिहायला घेतले. अपुर्ण.
|
| |
| Tuesday, August 01, 2006 - 5:38 pm: |
|
|
थोड्याच वेळात माझे सहकारी आले, एक दिल्लीचा, तीन तामिळ, एक सुदानी असे माझे सवंगडी होते. त्यांच्याबरोबर जेवायला एका तामिळ हॉटेलमधे गेलो. घराच्या बाजुलाच एक सुपरमार्केट होते आणि लगेच ते हॉटेल होते. अगडी टिपिकल तामिळ जेवण होते. मग घरी आल्यावर जरा गप्पा वैगरे मारल्या आणि झोपलो. सकाळी आठ ते एक आणि दुपारी चार ते सात, अश्या आमच्या कामाच्या वेळा होत्या. अगदी पहिल्याच दिवशी, मी एकटा अलाजरा ( टॅक्सी ) ने गेलो. पांढर्या आणि केशरी रंगाची हि टॅक्सी असे, त्यावर केशरी दिवाहि असे. हि टॅक्सी कुठेहि हात करुन थांबवता येत असे, आणि आपल्याला हवे तिथे उतरता येत असे. हि शेअर टॅक्सी असायची. पहिल्याच दिवशी, हे सगळे प्राथमिक धडे घेऊन झाले. टॅक्सीला हात करुन थांबवले. मोठ्या झोकात बॅंक अल मर्कझी. ( मर्कझ म्हणजे सेंटर, सेंट्रल काहिही ) ला जायचे असे सांगितले, पण ती बॅंक आली ते कुठे कळले. अरे रफ़िकी, ये देखो तुम्हारा ठिकाना, आ गया. असे टॅक्सीवाल्यानेच सांगितले. मला दिवसातुन चारसहा टॅक्सीजमधुन जावे लागे. या सगळ्या टॅक्सीवाल्यांचे अनुभव खुपच छान आहेत. एकतर त्या सगळ्याना हिंदी येत असे. भारतीयांबद्दल त्याना खुप आपुलकी वाटे. काहि काहि रुट्सवर, म्हणजे मी रहात होतो त्या मत्राह भागात टॅक्सीजना पर्याय नव्हता. ईतर ठिकाणी बसेस, पिकप्स, व्हॅन वैगरे पर्याय होते. ( मस्कतमधे गार्डनमधली छोटी आगगाडी सोडली, तर ट्रेन नव्हती. मला वाटते सौदी, सोडल्यास कुठल्याच आखाती देशात ती नाही. ) या टॅक्सीज अद्यावत असत, शिवाय वेगवेगळ्या ठिकाणची भाडी ठरलेली असत. त्यात फसगत व्हायची अजिबात शक्यता नसे. मी शक्यतो पुढेच बसत असे, आणि गप्पा मारत असे. या गप्पाना कुठलाहि विषय चालत असे. मी तिकडे असताना, अभिनेत्री रेखाच्या नवर्याने गळफास लावुन आत्महत्या केली होती. त्यावेळी एका टॅक्सीवाल्याने मला विचारले होते, ईतनी अच्छी बीबी मिली तो क्यु, खुदखुशी किया उसने. अभी रेखाका क्या होगा, तुम ईंडिया जायेगा ना तो उसको बोलना, तेरा एक रफ़िक है, बहोत अच्छा है, उसको पुछ लेना, शादी करेगी क्या ? ( तशी भेटली नाही मला कधी, नाहेतर नक्कीच विचारले असे. ) याना हिंदी गाण्यांचा खुप षौक असे आणि गाडीत तीच गाणी वाजत असत. लता आणि आशाबद्दल त्याना खुपच आपुलकि वाटे. अरेबी भाषेतली गाणी पण लावत असत ते. त्याचा अर्थ विचारला तर, हे शंकर भगवान, तुने ऐसा क्यु किया, मेरी लडकी को मेरेसे क्यु जुदा किया, असे काहितरी बरळत असत. दुबईप्रमाणे ईतर देशातील लोकाना टॅक्सी चालवायला परवानगी नव्हती, हे क्षेत्र त्यांच्यासाठी राखीव होते. मीटर्स नव्हते तरी भाव वैगरे करायचा कधी प्रश्णच आला नाही, कारण दर तसे माफकच असायचे. साधारणपणे कुठे जायला कुठे टॅक्सी मिळतात, हे आम्हाला माहित असायचे. त्या रस्त्याने जाणारे चार प्रवासी मिळाले कि झाले. यासाठी सुद्धा क्वचितच फार वेळ वाट पहावी लागे. प्रवासी पकडुन आणायचे काम तेच लोक करत असत. जो पहिला आला असेल त्याला पुढे बसायचा हक्क असे. पण एकट्यानेच जायचे असेल तर मात्र टॅक्सी एंगेज करावी लागे. त्याचे दर मात्र जरा घासाघीस करुन ठरवावे लागत. ते लोकहि फार ताणत नसत. या वेळी एकट्या भारतीय बायकाहि हुज्जत घालताना मी बघितल्यात. क्या रे तुमको क्या है, एक रियाल बोलता है. तुमको मालुम है एक रियालका कितना पैसा होता है, असे डायलॉग्ज सहज कानावर पडायचे. हे टॅक्सीवाले तसे विचारी पण असत. मी आणि माझा तामिळ मित्र एकदा ईंग्लिशमधे बोलत असताना आम्हाला एकाने हटकले होते, तुम दोनो ईंडिया का है. आपसमे हिंदीमे बोलो, हम तुम्हारे साथ हिंदी बोलताय, तुमको क्यु नही आताय, वैगरे वैगरे त्याने सुनावले होते. मी तिथे असतानाच भारतात जातीय दंगली झाल्या होत्या. त्यावेळेस एका टॅक्सीवाल्याने मला विचारले होते, ये क्या हो रहा है. क्या अल्ला क्या भगवान. सब दाखलमे ( हृदयात ) होता है. दाखल साफ है तो भगवान है, दाखल खर्बान ( कलुषित, बिघडलेले ) तो भगवान नही. अल्ला नही बोलताय काम छोडो और नमाज पढो, उसको भुलो मत, हर्राम मत बनो, तुम्हारा भगवानभी यहि बोलता है. मी काय उत्तर देणार ? अपुर्ण
|
| |
| Friday, August 04, 2006 - 1:30 am: |
|
|
दुसर्यावेळी गेलो तेव्हा पिकप्स गायबच झाले होते. त्याच्या जागी प्रशस्त व्हॅन्स आल्या होत्या. टॅक्सीज होत्याच. या व्हॅन्समधेहि भरपुर माणसे बसत असत. आणि दरहि टॅक्सीच्या निम्मे असत. टॅक्सी स्टॅंडवर जो पहिला प्रवासी येईल तो प्रवासाची दिशा ठरवत असे. पण व्हॅनची कपॅसिटी जास्त असल्याने, थोडा वेळ थांबावे लागत असे. त्यावेळी त्या व्हॅनवाल्यांचा आरडाओरडा चालत असे. या व्हॅन्स मुख्य रस्त्यापासुन आतहि जात असत. थांबायचे नसेल तर टॅक्सी एंगेज करत असत. म्हणजे स्वतःसाठी फक्त न्यावी लागे, त्यावेळी दर जरा जास्त असे. त्यामुळे तसेच काहि कारण असल्याशिवाय, कुणी टॅक्सी एंगेज करत नसे. ओ. एन. टी. सी. च्या बसेस पण मग अत्याधुन्क होत गेल्या. आणि त्यांचे दरहि स्वस्त झाले. डेवु कंपनीच्या बस तर खासच होत्या. त्यात दोन सीटच्या मधे ईन्फ़्रा रेड किरणांची व्यवस्था होती. त्यामुळे कुणी ऊभे राहिले कि ड्रायव्हरला आपोआप कळत असे. त्या दिव्यावर हात ठेवला तरी ड्रायव्हरला योग्य ती सुचना मिळत असे. पण तरिही या बसेसमधुन प्रवास करणारे प्रवासी अत्यल्प असत. माझाहि प्रवास मग फारच कमी वेळा सार्वजनिक वाहनाने होत असे. एकंदर ओमानमधे प्रवास हा माझ्यासाठी तरी एक आनंदाची बाब होती. ५०० / ६०० किलोमीटर्सचा प्रवास करुनहि अजिबात थकायला होत नसे. त्यापेक्षाहि जास्त प्रवास दिवसभारात मी केले. डोंगर भरपुर असले तरी घाट फारसे नव्हते. शक्यतो डोंगर फोडुन वा, टाळुन रस्ते केले होते. त्यामुळे जिथे असे थोडेफार घाटसदृष्य रस्ते होते, तिथे जायला फार छान वाटत असे. कुठेहि गेलो तरी रस्त्याची अवस्था मात्र अत्त्युत्तम असायची. मुळातच काम करतान अगदी कडक निकष लावल्याने, या रस्त्याना, दुरुस्तीची गरज अगदी क्वचितच लागत असे. दुभाजक तर व्यवस्थित होतेच पण जिथे शक्य असेल तिथे फुलझाडे, खजुराची झाडे लावलेली असत. रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा व त्या बाहेरहि एक गाडी ऊभी करण्यापुरती जागा असल्याने, पार्किंग करताना काहि प्रॉब्लेम येत नसे. जिथे रता जरा ऊंचावरुन जात असेल तिथे, सुरक्षिततेसाठी मजबुत कुंपण असे. स्पीडब्रेकर्स अजिबात नव्हते. ( यात आपली मोनोपॉली असावी. ) दवारा म्हणजे राऊंड अबाऊट जिथे असेल तिथे अगदी बारिक ऊंचवटे असत, त्यामुळे कळत नकळत सौम्य धक्के बसुन वेग कमी होत असे. हे राऊंड अबाऊट मात्र खासच देखणे असत. त्यात उत्तम बाग वा हिरवळ असे आणि खुपदा एखादे छानसे शिल्पहि असे. हि शिल्पं कुठल्याही मानवाचे नसुन, खास स्थापत्यकलेची असत. रस्त्याच्या कडेला ज्या टेकड्या होत्या, त्यावरुन जवळच्या समुद्रातील पाणी वापरुन, कृत्रिम धबधबे केलेले असत. त्यांच्या जवळ जाणे, पाण्याच्या खारटपणामुळे तितकेसे सुखाचे नसले तरी, नजरसुखात मात्र काही उणीव नसायची. ओमानमधे पाणी वाहुन नेण्यासाठी काहि सुंदर घाटांची मडकी वापरली जातात. त्या मडक्यांचा वापर करुन, काहि कारंजी केलेली असत. तसेच काहवा म्हणजे कॉफी ओतण्यासाठी एक खास आकाराची सुरई आणि एक नाजुक कप वापरला जात असे, त्याचीहि शिल्पं असत. रात्रीच्या वेळी तर रोषणाईने ही शिल्पे झळाळुन उठत. ओमानी लोक पारंपरेने दर्यावर्दी होते. त्यामुळे त्याना बोटींचे हि फार कौतुक. अश्या काहि मोठमोठ्या बोटी पण अश्या दवारा मधे असत. ओमानला सुंदर समुद्रकिनार्यांची देणगी लाभलीय. सुलतान काबुस रोडच्या एका बाजुने पण काहि काळ समुद्र दिसत राहतो. एरवी भारतात मी घर कोंबडा होतो. ( कारण त्या वेळी प्रवासाची साधने फारशी सुखाची नव्हती. ) पण मस्कतमाधे मात्र पायाला भिंगरी लागली होती. कामानिमित्त भरपुर प्रवास होतच होता तरी गुरुवार शुक्रवारी, मी स्वांतसुखाय भटकायचो. आत्ता सुरवात केली आहेच, आपण फिरुच. अपुर्ण
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|