|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:20 am: |
| 
|
आई गं.. ही वाट बघुन कसेचेच झाले.. केवळ अप्रतीम आहे हे दृष्य. दिनेश, अजय, कुठे आहे हे ठोसभर, महाराष्ट्रात की गोव्यात????? अजय धन्यवाद रे.. मस्त आहे तुझी बाग आणि हा छंद पण छान आहे.. निसर्गाच्या सानिध्यात मन रमविण्याचा.. संधी मिळाली तर मी तुमच्या बागेत अवश्य येईल..
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:45 am: |
| 
|
लालु, शेतात घुसलेलं पाणी अजुन आहे. आणि मी नाही वाचलं कुठे, शेतकरी संघाबद्दल. आता शेतकरी बाजारापेक्षा लकी बाजारात जास्त गर्दी असते. भाव तेवढेच असतात.
|
Giriraj
| |
| Tuesday, July 18, 2006 - 8:57 am: |
| 
|
बी,तुला ठोसे हवेत का? ते ठोसेघर आहे ठोसभर नाही आणि महाराष्ट्रातच आहे.. बाकी जाणकार सांगतिलच...
|
Aj_onnet
| |
| Tuesday, July 18, 2006 - 11:08 am: |
| 
|
--संधी मिळाली तर मी तुमच्या बागेत अवश्य येईल बी, नक्की ये. ठोसेघर सातार्यापासून २५ किलोमीटरवर आहे. सह्याद्रीच्या उंच रांगात! माझे दुर्गभ्रमण मधील दिनेशजींच्या लेखात माझी माहिती add करतो. तिकडे वाच!
|
दिनेश.. फोटो अप्रतीम, आणि वर्णनही.. (मीही तुमच्या सांगण्यावरुन लिहितेय पण टाकेल की नाही कोण जाणे.ते कोणी वाचेल का हा प्रश्नच आहे? )
|
ठोसेघर हे सातारा शहराच्या पश्चिमेस म्हणजे पुण्याहून लालूच्या गावाला जाताना उजव्या हातास आहे. सातारा गावातून हा रस्ता एका खिंडीतून जातो. पुढे सज्जनगडाच्या पायथ्याने दिनेशने फोटो टाकलेल्या वाटेने पुढे सह्याद्रीच्या माथ्यावरच आहे ठोसेघर....
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:01 pm: |
| 
|
लोपा मी वाचेन नक्की, पण टाकु नकोस बाई, ठेव कुठेतरी.
|
Moodi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 8:45 am: |
| 
|
दिनेश पुढचा लेख येऊ द्या आता. खूप उत्सुकता आहे त्याविषयी. अर्थात तुमच्या सवडीनुसारच लिहा.( आम्हाला दम धरवत नाही हेही खरेच) 
|
Dineshvs
| |
| Thursday, July 20, 2006 - 1:13 am: |
| 
|
मुद्दाम उत्सुकता ताणतोय असे नाही, वेळ मिळत नाही, हे कारण आहे. पण करीन सुरवात लवकरच.
|
Moodi
| |
| Friday, July 21, 2006 - 3:29 pm: |
| 
|
दिनेश तुम्ही वाकुन बघितलत का धबधब्यावरुन? मी नक्कीच बघितलं असत( अन त्यात उडी मारायचा विचीत्र विचार पण केला असता. गंमत करतेय.) आज भाग्याचा फोन आला होता. तिची कॉन्फरन्स चांगली झाली पण वेळे अभावी तिची अन माझी भेट होऊ शकली नाही. तिनेच मला ऑस्ट्रेलीयाला येण्याचे आमंत्रण दिलयं. आता पुढचा युरोप दौरा आहे तिचा. नलिनीकडे १ दिवस जाईल बहुतेक ती. बाकी ती अन तिचे मिस्टर मजेत! 
|
Prady
| |
| Friday, July 21, 2006 - 4:09 pm: |
| 
|
दिनेश सगळ्या देशांबद्दल लिहून झालं की तुमच्या पाकशास्त्रातील मुशाफ़िरीची सुरवात कशी झाली, आवड कशी जोपासलीत या बद्दल देखील लिहा. वाचायला नक्की अवडेल.
|
Dineshvs
| |
| Friday, July 21, 2006 - 4:47 pm: |
| 
|
मूडि, माझाहि मनात हाच विचार आला होता. पाणी बघुन मला राहवतच नाही. आमच्या बहिणाबाई म्हणजेच, भाग्यश्रीबाई आल्यावर सविस्तर लिहिणार आहेत, तसे कबुलच करुन घेतलेय ना मी. आता फक्त एकाच देशाबद्दल लिहिन Prady . माझ्या एका लेखात मी माझ्या या क्षेत्रातल्या माझ्या मुशाफिरीबद्दल लिहिले होते. पण या सगळ्या माझ्या मायबोलिकरणी आहेत ना, आणि थोडे मायबोलिकर देखील, त्यानाच सगळे श्रेय द्यावे लागेल. माझ्याकडुन एवढे लेखन एरवी होतेच ना.
|
Nalini
| |
| Saturday, July 22, 2006 - 1:21 pm: |
| 
|
अरे व्वा! गावठी गुलाब. त्याचा सुगंध ईथवर दरवळला. त्याच्या पाकळ्या मात्र खुपच लवकर गळतात. हो ना? त्याचे गुलकंद ही अगदी चवदार होते.
|
Dineshvs
| |
| Saturday, July 22, 2006 - 4:49 pm: |
| 
|
नलिनी, त्या गुलाबाच्या सुगंधापुढे तुमचे अल्पाईन रोझेच अगदी फ़िक्के बरं का ! अजुन तिथल्या कासच्या पठारावरची रानफुले बघायला जायचेय.
|
दिनेश, वविला तुम्ही येणर हे कळल्यावर कोण आनंद झाला होता. पण त्यावर विरजण पडलं . आता भेटिचा योग कधी येतो हे पाहु.
|
Dineshvs
| |
| Monday, July 24, 2006 - 8:03 am: |
| 
|
भ्रमर, माझाहि विरस झाला, पण नाहि जमवु शकलो. आणि भेटायला कधीही येऊ शकतोस. संपर्कात रहा, वेळ जमवुच.
|
Bee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:13 am: |
| 
|
दिनेश, खालील कथिया रंगाच्या झेंडूबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आम्ही ह्याला English झेंडू म्हणायचो. English झेंडूची झाडे उंचीने लहान असतात. खालूनच त्यांना डांगा धरतात. दिवाळीच्या वेळेस झेंडूची फ़ुले अंगोपांगी धरतात. तुम्ही बघितली आहेत का ही फ़ुले? 
|
Nalini
| |
| Wednesday, July 26, 2006 - 8:32 am: |
| 
|
दिनेशदादा, आज सकाळी भाग्याची भेट झाली. ते दोघे आज बुडापेस्टला गेले आहेत. संध्याकाळ पर्यंत परत येतील. आजचा मुक्काम ईथेच. उद्या संध्याकाळी व्हेनिसला निघतील. छान वाटले भाग्याला भेटुन. आता संध्याकाळी भेटल्यावर खुप खुप गप्पा मारु.
|
M_m_gawde
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:45 pm: |
| 
|
सर्वाना माझे अभिवादन. आज मी पण तुमच्यात समिल झाले दिनेशदा तुमचे फोटो खुपच सुन्दर आहेत कोकणात जाउन आल्या सारख वाटले.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 26, 2006 - 4:57 pm: |
| 
|
Bee त्याला फ़्रेंच झेंडु म्हणतात. ऊंच वाढणारा तो आफ़्रिकन झेंडु. म्हणजे बघ, आपली तोरणे सजवणारा झेंडु पण परका. शंकराला वाहतो तो नागचाफा परका, गणपतिची जास्वंद चिनची. आपले ते फक्त जास्मिन कुळ, जाई, जुई, मोगरा, चमेली सगळ्या आपल्या. M_m_gawde आपले स्वागत असो. ईथे सगळे आपलेच आहेत. ईथे अनेकजण माझ्यापेक्षाहि छान लिहितात, सगळीकडे भेट द्या. नलिनी, भाग्यश्रीबाईंचा मोठा दौरा आहे, म्हणायचा. तुला भेटुन तिलाहि खुप आनंद झाला असेल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|