|
Jo_s
| |
| Wednesday, July 05, 2006 - 9:50 am: |
|
|
दिनेश, काय सुंदर फोटो आहेत धुतपापेश्वरचे. तुझी परवानगी गृहीत धरुन मी कॉपी करून घेतले आहेत. देवळाचा लांबून घेतलेला फोटो केवळ अप्रतीम. मला आत्ताच जावस वाटतय. बाकीचे झाडी,पाउल वाट, कोरीव काम इ. फोटोही मस्तच. खरच कस जायच ते सांगून ठेव. असूद्ला केशवराज मंदीराला गेलो असताना तिथल्या झाडी, पाणी, वातावरण इ. मधे असाच हरवून गेलो होतो.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:35 pm: |
|
|
Mumbhai त्या देशात तसले काहि उत्सव नाहीत. राजकिय धुळवडच असते. गिरु, घर नाही रे, महालक्ष्मीचे देऊळ आहे ते. Jo_s माझी कसली परवानगी. पण मी मात्र देवाचा फोटो काढायच्या आधी पुजार्याची परवानगी घेतली होती. पुण्याहुन राजापुरला थेट बस आहे. मला वाटते ती कोल्हापुर, गगनबावडा, खारेपाटण, राजापुर अशी येत असणार. तसे राजापुर मुंबई गोवा मार्गावरच आहे. हातखंबा आणि तळेरेच्या मधे आहे. राजापुर पुर्वी बाजारपेठ म्हणुन प्रसिद्ध होते. राजापुरी पंचे माहित असतीलच. हळद आणि सुक्या खोबर्याची बाजारपेठ होती ती. तिथले जेवण जरा कोकणातल्या जेवणापेक्षा वेगळे असते. ओल्या खोबर्यापेक्षा सुक्या खोबर्याचा वापर जास्त असतो. भाषा पण जरा वेगळी. " माका " च्या ऐवजी " मज " वापरतात. गावात ब्राम्हण आणि मुसलमान अश्या दोन्ही वस्त्या आहेत. हे देऊळ तसे तिथे प्रसिद्धच आहे. चालत जायला रस्ता छान आहे पण जरा चढण आहे. त्यालाच घाटी म्हणतात. वाटेत नवलाई देवीचे देऊळ लागते. तिथपर्यंत रिक्षा जाते. त्यापुढे १०० पावलावर हे देऊळ आहे. राजापुरची गंगा हा थोडा कौतुकाचा आणि थोडा कुचेष्टेचा विषय आहे. ती अधुन मधुन प्रगट होते आणि बर्याचवेळा लुप्त असते. पण साधारणपणे तीन वर्षातुन एकदा, प्रगट होते.
|
Moodi
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:44 pm: |
|
|
सही!! काय सुंदर फोटो आहेत. दिनेश सध्या ती ई टीव्ही वर चार दिवस सासुचे( ते कायमचेच असतात म्हणा) सिरीयल चालू आहे ना, बहुतेक त्याच सिरीयलमध्ये तो आनंद अभ्यंकर ज्या मामाचे काम करतो( कोकणातुन आलेला असतो, टिप्पीकल बोलतो) तेव्हा कायम " मज " हा शब्द वापरतो. " अगों सुनंदे, मज काय म्हणायचे होतें!! " असे बोलतो. तुमच्या आत्ताच्या राजापूर विषयीच्या वर्णनातील " मज " वरुन मज आठवले ते.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 05, 2006 - 5:59 pm: |
|
|
मूडि, रत्नांग्री नंतर राजापुरातलेच लोक खमके असतात. माझी आजी तिथली. १४ / १५ व्या वर्षी लग्न झाले असेल, पण शेवटपर्यंत मालवणात राहुन, राजापुरी भाषाच बोलायची. तसे आडमार्गाने राजापुर घाटाच्या जवळ आहे. माझे आजोबा, कोल्हापुरच्या मलकापुर या गावातुन, अणुस्कुरा घाटातुन चालत राजापुरला जायचे. माझा आईवडिलांचे लग्न, अश्या भेटीतुनच झाले. तो घाट पुर्वी वापरात होता, मग बंद झाला होता, आता परत त्या घाटातुन रस्ता झालाय, पण त्या वाटेवर वस्तीच नसल्याने, एस्टी धावत नाही. खाजगी गाड्या जातात.
|
मस्त आलेत फ़ोटो... मी मिरजेहून पावसाळ्यात कोल्हापूरला जाताना, NH-4 सोडून कोल्हापूरात शिरताना जो भाग आहे त्याच्या आजुबाजुला कायम असा पूर आलेल असायचा. दुसर्या फ़ोटो मधल्या पर्वत रांगा पाहून मला इथले smokey mountains आठवले. हिरव्या गर्द झाडीत तेही असेच लपेटलेले असतात सध्याच्या काळात... आणि nov च्या सुमारास फ़ॉल मधे तर अशक्य सुंदर दिसतात.
|
Dineshvs
| |
| Monday, July 10, 2006 - 4:34 pm: |
|
|
अमेय, हा फोटो तिथलाच आहे. ओळखण्यासाठी १०० पैकी १०० मार्क्स. दुसर्या फोटोचे कोडे कायम आहे बाकिच्यांसाठी.
|
Giriraj
| |
| Tuesday, July 11, 2006 - 8:06 am: |
|
|
आंबोलि किंवा वाळपई परिसरातला आहे वाटते हादुसरा फ़ोटो
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 11, 2006 - 5:25 pm: |
|
|
वाळपईत कोण आहे रे माझं आता ? आणि अंबोली पण नाही ते.
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 5:44 pm: |
|
|
दिनेश तुमचे मुंबईतील नातेवाईक सगळे सुखरुप आहेत ना?
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 11, 2006 - 6:13 pm: |
|
|
मूडि, मला कल्पनाच नव्हती, मी ऑफ़िसमधेच होतो, गिरुनेच सांगितले. घरी फोन लागत नव्हता, पण मग लागला, सगळे खुशाल आहेत. पण जे गेले तेहि माझे मुंबईकरच होते.
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 6:28 pm: |
|
|
हो गेले ते आपल्या नात्या गोत्याचे नसले तरी काय झाले, शेवटी मनाने अन माणुसकीने आपलेच होते ना!
|
पण जे गेले तेहि माझे मुंबईकरच होते. अगदी खर आहे. माझा एक दूरचा मावसभाऊ गेला यात.
|
Chingutai
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:35 am: |
|
|
दिनेशदा पंचगंगेचा पूर पहायला जाण, हा येक कार्यक्रमच असायचा लहानपणी. फोटो छान आले आहेत. मूडी, अगदि खरं बोललीस... मिलिंद, खूप वाइट वाटलं वाचुन... -चिन्गी
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 12, 2006 - 6:32 am: |
|
|
आता या क्षणी केवळ, गेलेल्यांबद्दल दुःख आणि मदतीचा हात पुढे करणार्यांबद्दल अभिमान आहे मनात.
|
Bee
| |
| Monday, July 17, 2006 - 7:08 am: |
|
|
दिनेश, अजयच्या बागेतील ते चिकरकांध्याचे फ़ुल खूपच लोभसवाणे आहे. त्याच्या पानांचा तो हिरवाजर्द रंग खूप आवडला.. अजय बागेत अजून काय काय लावले आहे..
|
Nandita
| |
| Monday, July 17, 2006 - 7:25 am: |
|
|
दिनेश जी ठोसेघरचे फोटो छानच, मी ही गेले होते मागच्या आठवड्यात
|
Jayavi
| |
| Monday, July 17, 2006 - 7:39 am: |
|
|
दिनेश, तुमच्या या चित्रांनी खूप समाधान झालं. आम्ही इथे रखरखीत वाळवंटात आहोत हो. असं हिरवंगार दृष्य बघून आखोंको ठंडक मिल गयी
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 10:32 am: |
|
|
सेम हिअर जया. दिनेश पाण्याचे इतके वेड आहे मला की समाधानच होत नाही कितीवेळा पाहिले तरी. मुंबई पुणे हायवेवरुन एकदा घाटात असताना दूरुन राजमाचीचा धबधबा पाहिला होता, किती वेळ तरी तिथेच थांबलो, पण घाटात अन ते ही वळणावर थांबता येत नाही पाहिल्यावर मग निघालो. बागेतले फूल मस्त आलय.
|
Aj_onnet
| |
| Monday, July 17, 2006 - 10:58 am: |
|
|
दिनेशजी बरोबर निसर्ग पाहण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. तिथला निसर्ग बर्याचदा पाहीला आहे. पण ह्यावेळी तो अजून जवळून उमगला. बी, ते पांढरे फूल ठोसेघरच्या पठारावरचे आहे. ते खूप पावसाच्या प्रदेशात अन उंच प्रदेशात आढळते. अन त्याचा फुलण्याचा कालावधीही खूप कमी असतो. अश्या पठारावर सरत्या पावसाबरोबर विशिष्ट कालावधीसाठी अशी वेगवेगळी फुले उमलून जातात. ही रोपटी आपल्या बागेत नाही जगू शकत.(आमच्या बर्याच अतिउत्साही मित्रांनी ते प्रयोग करून पाहीलेत!)
|
Lalu
| |
| Monday, July 17, 2006 - 5:42 pm: |
|
|
पूर ओसरला का पंचगंगेचा? पाऊस थांबल आहे असं ऐकलं. आणि 'शेतकरी सहकारी संघ' बन्द होणार आहे असंही ऐकलं. खरंच काय?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|