Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 05, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through July 05, 2006 « Previous Next »

Giriraj
Monday, July 03, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केव्ह गेलेलात तिकडे?
आपण गेलेलो तेव्हा तर किति घाई केलेली आणि आता गुपचूप काय काय पाहून आलात!


Sharmilaphadke
Monday, July 03, 2006 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश. तुमची इथली प्रवासवर्णनं मी गेले काही दिवस वाचत होते. मनापासून आवडली. निसर्ग आणि माणसे ह्यांच जे निरिक्षण तुम्ही करता त्यामुळे सगळ्याच वर्णनांना एक वेगळीच खुमारी येते.

झाडं हा माझ्याही अत्यन्त आवडीचा विषय. बरीच जंगल त्यासाठी पालथी घातली आहेत. युनिव्हर्सिटीच्या tree appreciation च्या कोर्स च्या निमित्ताने मुंबईमधलही झाडांच दुर्मिळ वैभव बघता आलं. कदंबाची झाडं ही त्यापैकीच एक. केशरी गेंदांनी लगडलेल हे झाड काय कमालीच सुंदर दिसत. अक्षरश्: केशरी पिवळे दिवे लटकवून ठेवले आहेत असं वाटत. दुर्गाबाईंनी फार सुंदर वर्णन केल आहे कदंब वृक्षाच. मुंबई युनिव्हर्सिती च्या आवारात फार सुरेख कदंबाच मोठ झाडं आहे. त्याची canopy देखणी दिसते. आमचे मराठी पत्रकारीतेचे काही वर्ग त्या झाडाजवळच्याच वर्गात भरायचे. तेव्हा हे झाड त्याच्या सगळ्या रुपात मनसोक्त न्याहाळता आलं. तिथला असाच एक देखणा वृक्ष म्हनजे कैलासपतीचा. cannon ball tree अर्थात त्याच्या फळांचा उग्र वास जरा लांबच ठेवतो आपल्याला. पण फुले खूप सुंदर.

बरीच जागा अडवली त्याबद्दल क्षमस्व. पण तुमचे सुंदर लेखन बघून रहावले नाही. नायजेरीया मधे माझी मैत्रिण जिने लागोसचे दिवस पुस्तक लिहिले ती शोभा बोंद्रे बरीच वर्ष नवर्‍याच्या जॉबच्या निमित्ताने रहायला होती. तिच्याकडून नेहमी तिथल्या परिस्थितीबद्दल कळायचे. आता तुमचे लिखाण वाचल्याने एक नवी दृष्टी मिळाली.

लिहित रहा. तुम्हाला reportage टाईपच्या ( म्हणजे ज्या पद्धतीने अनिल अवचट लिहितात ) लिखाणाची चांगली शैली आहे. professionaly लिहिलत तर यशस्वी व्हाल ह्यात शंका नाही. त्या संदर्भात कुठली मदत किंवा माहिती हवी असल्यास जरुर कळवा. शुभेच्छा.


Moodi
Monday, July 03, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश देशोदेशीच्या रम्य सुरस वर्णनाबरोबरच आपल्या महाराष्ट्रातील हे अभिजात सौंदर्य नजरेस आणुन दिल्याबद्दल लाखो धन्यवाद. ह्या धुतपापेश्वरला कसे जायचे, सोयी काय आहेत याची माहिती आवर्जुन द्या हो. फार छान वाटतं हा निसर्ग पाहिल्यावर.

शर्मिला तू पण लिही ना एक नवीन सदर काढुन, त्यात तुझे अनुभव वाचायला आम्हाला जरुर आवडतील. MY Experience या बीबी मध्ये सुरु कर तो, म्हणजे आम्हाला पण बरीच माहिती मिळेल. दिनेश सुद्धा भर घालतीलच वेळ झाला की.

फार सुंदर दिसतय हो हे कदंबाचे फूल. गोल सोनेरी केशरी चेंडू. ते गाणे आठवले. " कदंब तरुला बांधुनी दोले, उंच खालती झोले, एकमेका दिले घेतले गेले ते दिन गेले. "


Dineshvs
Monday, July 03, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, शंकरासारखा भणंग जोगी, अश्या दुर्गम ठिकाणीच राहणार ना
भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतील गर्द झुला

असे तर असायचेच, आणि शिवाय असा पाण्याचा प्रवाह हवाच, या शिवालयाच्या आसपास.
आणि कदंबाचे वर्णन काय करावे मी. मुंबईत बरिच झाडे अजुन टिकुन आहेत. Bee या झाडाला एका फोटोच्या कक्षेत नाहे रे आणता येत. अत्याचार न झालेले झाड अगदी ऐसपैस पसरलेले असते.
DJ या दिवसात सगळीकडे हिरव्या रंगाच्या छटा आहेत, आणि त्यात हा पिवळा रंग तर फारच खुलुन दिसतो.

शर्मिला, ईतका सुंदर आणि सविस्तर अभिप्राय. फार छान वाटले. झाडांचे फुलांचे मला वेडच आहे. मुंबईत कैलाशपतिची पण बरिच झाडे आहेत. या कदंबाच्या पानाना, सालीला आयोडेक्स सारखा वास येतो.
शोभा बोंद्रेंचे पुस्तक वाचायचे राहिले. मधे मी चौकशी केली तर नाहि मिळाले. त्या फारच धीराच्या होत्या. सहसा भारतीय बाई जाणार नाही, अश्या बाजारात वैगरे त्या एकट्या जायच्या. त्यातुनच हे पुस्तक निर्माण झालेय. त्यांच्या मेडचे नाव चीची होते. त्या काय किंवा अनिल अवचट काय, एका लेखासाठी ईतके परिश्रम घेतात ना, कि त्यांच्या लिखाणापुढे माझे खुजेपण मला फारच जाणवते.
तूम्ही झाडांबद्दल अवश्य लिहा. मुंबईत अजुनहि खुप दुर्मिळ झाडे आहेत. त्यांच्याबद्दल लिहा.

मूडि, राजापुर गावातुन फक्त पाच किलोमीटरवर हे आहे. उत्साह असेल तर गावकर्‍यांप्रमाणे चालत जाता येते नाहितर थेट रिक्षा जाते. भक्त निवास वैगरे आहे, गावात लॉज आहेत. यावेळी उन्हाळे पाण्यात बुडले होते, पण तिथेहि छान सोय आहे. गंगा मात्र लुप्त असते, कधीमधीच प्रकट होते.




Dineshvs
Monday, July 03, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कूल आणि गिर्‍या, तुमचा स्वतंत्र समाचार घ्यायला हवा. गेल्याच आठवड्यात, पुढच्या वीकेंडला आपण सगळे बरोबर जाऊ, असे तोंडभरुन आश्वासन मला कुणी दिले होते ?
मित्राना जेवढा आग्रह करायचा असतो आणि जेवढ्या अगत्याने बोलवायचे असते, तेवढे मी केलेय. आणखी आग्रह करायला काय माझे जावई लागुन गेलात कि काय ?
असो, गिरुची खरडपट्टी फोनवर काढलीच आहे.


Storvi
Monday, July 03, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश ह्या कदंबाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात माहीत आहे का हो?

Dineshvs
Monday, July 03, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Storvi कदंबाला काय म्हणतात ते माहित नाही, पण याच कुळातला कळम नावाचा वृक्ष असतो त्याला Rubiaceae म्हणतात, त्याचे कुळ Mitragyna Parvifolia
शर्मिला, कदाचित सांगु शकतील.


Nalini
Monday, July 03, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा, ह्या कळम वृक्ष्याचा फोटो पहायला मिळेल का? सर्वच फोटो खुपच छान आहेत शिवाय माहितीसह म्हटल्यावर दुधात शर्करा.
कुंदा काकुंचा फोटो ईकडे टाकलास होय. मला वाटले त्यांच्या लेखाच्या धाग्यावर टाकशील.
खरच त्यांना भेटुन मनोधैर्य वाढते. त्यांच्या घरुन तर निघावेसेच वाटत नव्हते.. त्यांच्याशी खुप बोलत, ऐकत रहावेसे वाटत होते.


Robeenhood
Monday, July 03, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश rubiaceae ही फॅमिली आहे. एखाद्या विशिष्ट झाडाचे नाव नाही. कदम्ब या कुलात मोडतो. वनस्पतींच्या शास्त्रशुद्ध nomenclature ची वनस्पतीशास्त्रात स्वतन्त्र शाखा आहे.या वर्गिकरनाला binomial nomanclature म्हनतात. हे लिनिअस याने तयार केले.
कदम्बाचे botanical name आहे Anthocephalus cadamba and Nauclea cadamba of the Rubiaceae family


Robeenhood
Monday, July 03, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदम्ब

Lopamudraa
Monday, July 03, 2006 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा लेखाप्रमाणेच छान वाटल्या वाचायला... फोटो तर सुरेख... मंदिराचा परीसर great ...!!!

Dineshvs
Tuesday, July 04, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार रॉबीन, मी पण काल शोधाशोध केली. Anthocephalus Sinensis, Family Clusiacesae अशी माहिती मिळाली. मराठी प्रमाणे हिंदी, बंगाली आणि तेलगु मधेहि कदम्ब हेच नाव आहे. असामी मधे रोघु आणि बरमीज मधे माउ, म्हणतात.

Bee
Tuesday, July 04, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला,

दिनेश इतकेच तुही छान लिहीतेस आणि आणखी लिहू शकतीस. वेळ आहे ती फ़क्त लेखनी उचलायची. तेंव्हा भाव न खाता इथे लिही बघू..


आमचे मराठी पत्रकारीतेचे काही वर्ग त्या झाडाजवळच्याच वर्गात भरायचे.

शर्मिला, ही जागा कुठे आहे? मलाही वृक्षांचे अपार वेड आहे. असे वाटते कधी मला माझे हक्काचे घर आणि अंगण लाभते आणि कधी माझ्या अंगणात जाई जुई बुच डोलायला लागतील. की हे माझे स्वप्न फ़क्त स्वप्नच म्हणून राहील.

शर्मे.. मलाही कदंब वाचायचं आहे.. मी हेच पुस्तक इथे सुचित करणार होतो तत्पुर्वीच तुच सांगितलेच.

कैलासपतीचे झाड मला खूप आवडते.. त्याचा अस्तित्त्वाने सगळा परिसर कसा गंधाळ होऊन जातो.. पण का कुणास ठावूक ह्या झाडाजवळ गेलो की मला एक अनामिक भिती वाटते.. ह्या झाडाची फ़ुले, पाने, आकार, उंची सगळेच कसे निराळे वाटते.. खास करुन ह्या फ़ुलांचा गंध.. तो हुंगला की हूरहुर दाटून येते.


वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळवती..

जय तुकाराम!!!!!!


Mi_anu
Tuesday, July 04, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
नायजेरीयातले सर्व अनुभव वाचनीय आहेत. खरोखर या सर्व अनुभवांचं थोड्याफार फेरफरांसह पुस्तक बनवायला हरकत नाही.
माझ्या माहितीतला एकजण शिक्षण झाल्या पटकन 'फॉरीन' ची संधी मिळाली म्हणून काही काळ नायजेरीया ला होता. पण एकदा काहीतरी राजकीय घटनेमुळे तिथली परिस्थिती बिघडली आणि तो आपलं राहिलेलं सामान आणि उरलेला पगार सोडून भारतातच राहिला.
शोभा बोंद्रेंचे लेगॉसबद्दल अनुभव पण वाचनीय आहेत.


Seema_
Tuesday, July 04, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश ते मंदिर , सभोवतालचा परिसर आणि तो साकव ! काय सुंदर आहे सार ! आणि त्याहुनही सुंदर तुमची ते सार टिपण्याची व्रुत्ती . तुम्ही इतके जवळचे मित्र झालात म्हणजे , गिरिराज खरच लकी असणार आहे .

Giriraj
Tuesday, July 04, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचा जावई व्ह्यायचे तर अजून बारा पंधरा वर्षं वाट पहावी लागेल मला...
पुन्हा तुम्हि हुंडा देणार नाही ते नाहीच!


Dineshvs
Tuesday, July 04, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे, पण प्रॉब्लेम असा आहे, दहा बारा वर्षात माझी लेक लग्नाची होईल. तु तेवढाच राहशील ना रे.

सीमा, गिर्‍या माझा मित्र नाही, तो फक्त माझा आहे.


Dineshvs
Tuesday, July 04, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, कळम म्हणजे कदम्बाची लहान आवृत्ती. याची फळे सुकल्यावर बरिचशी रुद्राक्षासारखी दिसतात. कोल्हापुरला रंकाळा तलावावर आहे हा.
कदंबाचा फोटो नेहमी ऊलटा छापला जातो. भारताच्या पोस्टल स्टॅंपवर पण तो तसाच आहे. ऊलटा म्हणजे खाली पाने आणि वर फुल. असे कदंबाच्या बाबतीत संभवतच नाही. कारन तो गेंद चांगलाच वजनदार असल्याने खाली लोंबत असतो.
शिवाय या फुलाना पानाच्या मागे दडायची वाईट खोड असते. असतात त्यापेक्षा फारच कमी दिसुन येतात.


Mumbhai
Wednesday, July 05, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kharokharach vegale anubhav ... tumhi changale lihale pan aahe.

tya desha madhil raajakiy ani samajik utsava baddal vachayala aavadel

Giriraj
Wednesday, July 05, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा!काय मस्त दिसतय ते घर आताही...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators