|
सही लिहिताय दिनेश, जबरी अनुभव. तुम्ही डायरी लिहीता का? इतक कस लक्षात रहात? बाकी केस कापून घेण्यात आम्हा मुलींना पण भिती वाटतेच. पहिल्यांदा मी इथे US मध्ये केस कापून घेतले होते एका चायनीज बाई कडून तिने चिमणीचे उसकटवलेले घरटे केले होते माझ्या डोक्यावर
|
Bee
| |
| Thursday, June 29, 2006 - 10:06 am: |
|
|
दिनेश, खरच हो.. तुमची रोजनिशी आहे का.. मस्त चाललय...
|
Zakki
| |
| Thursday, June 29, 2006 - 1:13 pm: |
|
|
रॉबिनहूड, जरा जपून, ज्यांना बहासा माहित नाही त्यांना वाटेल हा काय 'तेरी माँ' वगैरे लिहितो आहे? पहिल्या निवडणुका १९५२ मधे झाल्या. आम्ही भारतात असेस्तवर सोपे होते, शेवटी २ किंवा ७ आले की निवडणुका!! आता काय, कंटाळा आला की केंव्हाहि 'चला निवडणुका, निवडणुका खेळू'. अर्थात् तेंव्हाहि काय निवडणुका म्हणजे गंमतच होती, नेहेमी आपले कॉन्ग्रेसवाले निवडून यायचे!
|
बोवाजी हे मात्र बरीक खरे हां! saya tidak tahu Bahasa indonesia!
|
Mita
| |
| Thursday, June 29, 2006 - 5:39 pm: |
|
|
अरे बापरे!!! मला नायजेरिया मधे नोकरी करणार्या एका मुलाचे स्थळ आले होते.. आणि तिकडे कसे आरामात रहाता येते,केवढा भरपुर पैसा मिळतो,कामाला २४ तास बाई असते असे तो आणि त्याच्या घरचे आम्हाला सांगत होते. .. ते सगळे जरा अतिरंजीत वाटल्यामुळे आणि नायजेरियाबद्द्ल काहिच माहिती नसल्यामुळे हे सगळे पहिल्या भेटिमधेच आटोपले. नशीब!!!
|
बापरे.. sad ... .... ....
|
माझ्या इथल्या एका मित्राचा भाऊ नायजेरिया मधे आहे गेली ६-७ वर्ष. त्याच्या कडून थोडफ़ार अशा तर्हेचेच अनुभव ऐकायला मिळतात. तो तर बायको आणि मुलाला भारतातच ठेऊन स्वत: फ़ेर्या मारत असतो. दिनेशदा तुमची ही सफ़र मस्त होती वाचायला. पुढचा देश कुठला त्याचं नाव सांगून टाका.
|
दिनेशदा, केवळ अदभूत हा एकच शब्द मला तुमच्या अनुभवांबद्दल आणि त्याच्या वर्णनाबद्दल लिहावासा वाटतो. आणखी एक, मला वाटते हे अनुभवच इतके जगावेगळे आहेत की तुम्ही विसरू म्हंटलेत तरी विसरणे शक्य नाही, हो ना? मध्यंतरी यू. एन. चा नायजेरियावरील Aid Programme बघण्यात आला, त्यातली दृष्ये पाहता तुम्ही बहुदा नायजेरियाच्या सुवर्णकाळात तिथे होतात.
|
Shreeya
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:34 pm: |
|
|
दिनेशदा, खूपच सुंदर अनुभव्-वर्णन!! चांगले-वाईट तितक्याच अलिप्तपणे लिहिलेत! पण तरीही गुंतवुन ठेवतात अन विचारातही पाडतात! विशेषत्: शेवट! आता पुढच्या देशाची वाट पाहातोय काहीतरी hint द्या ना!
|
Savani
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:39 pm: |
|
|
दिनेशदा, सुरेख वर्णन! असं वाटलं हे काय इतक्यातच संपलं जरा हिरमोडच झाला. हावरटपणाच नाही का हा? पण तुमच्या ओघवत्या शैलीमुळे वाचताना संपूच नये असं वाटत रहातं. मग आता कोणत्या देशाची सफ़र घडवून आणताय?
|
Anaani
| |
| Friday, June 30, 2006 - 12:58 pm: |
|
|
hello! mi attaparyant che sagali pravas varnane vachali. Apratim. dusara words nahi..... gr8! lihita tumhi
|
Zelam
| |
| Friday, June 30, 2006 - 1:17 pm: |
|
|
मस्तच लिहिलय दिनेशदा. आता पुढचा देश कधी?
|
Dineshvs
| |
| Friday, June 30, 2006 - 3:33 pm: |
|
|
खरे तर नायजेरियात सहज म्हणुन जाता येत नाही. पर्यटक व्हिसा दिला जात नाही. ट्रांझिट व्हिसा घेण्यासारखे भौगोलिक स्थान नाही. " लागोसचे दिवस " असे एक पुस्तक बाजारात ऊपलब्ध आहे. पण लेगोस हा शहर भाग होता. तिथल्या परिस्थितीत किंचीत फरक होता. बाकिचे देश ऊभे आडवे फिरुन बघितले, पण नायजेरियात, असे सुखासाठी भटकणे झाले नाही. म्हणुन मला फार खोलात लिहिता आलेले नाही. पण तरिही या आठवणी माझ्यासाठीहि मोलाच्या आहेत. आणि आता थोडा ब्रेक घेऊ या कि. मला पण अमेय काय लिहितो आहे ते वाचायचे आहे.
|
दिनेश!नायजेरिया अस्वस्थ करुन गेला.ईतक्या प्रतिकुल परिस्थीत तुम्ही तिथे राहात होतात. चुकलच!! नुसते रहात होतात असे नाही तर आहे त्यात आनंदही शोधत होतात... पुढचा देश 'मस्कत' असेल असा अंदाज आहे... दिनेशदा तुम्ही कुठलाही अनुभव लिहा तो वाचनिय तर नक्किच असेल.
|
दिनेशदा, खरंच, त्या देशाचं वेगळेपण, तिथल्या समज आणी संस्कृतीचं निरिक्षण, टिपलेले बारकावे वाचायला तर जाम मजा आली. पण सर्वात काय भावलं असेल तर तुमची जिथे जाल तिथे माणसं जाणण्याची आणी जोडण्याची कला! तुम्हि तर केनयातही बाग फ़ुलवलीत! खरं तर आपण आहोत तो देश किती प्रगत ह्यावर तेथील वस्तव्यातील आनंदाचा संबंध फ़ार कमी, आपण तिथे किती लोकसंग्रह केला, किती मोकळ्या मनाने वेगळे अनुभव गाठीस बान्धले ह्याचा जास्त.....
|
Dineshvs
| |
| Sunday, July 02, 2006 - 3:51 pm: |
|
|
खरे तर मी तसा बोलका नाही. माणसं पारखायला जरा वेळ घेतो. पण प्रेम करण्यासारखी माणसे, प्रत्येक ठिकाणी भेटली, हेहि सत्य आहे. आणि हा सिलसिला इथेहि सुरु आहेच कि.
|
Arch
| |
| Sunday, July 02, 2006 - 9:42 pm: |
|
|
काय मस्त आहे न देवळाचा परिसर. कदन्बाची फ़ुलं जन्मात पहिल्यांदा पाहिली. देवाची निर्मिती अचाट आहे. ह्या सगळ्याच दर्शन घडवून दिल्याबद्दल खरच धन्यवाद, दिनेश.
|
Bee
| |
| Monday, July 03, 2006 - 3:37 am: |
|
|
दिनेश, मन प्रसन्न झालं ह्या छायाचित्रांना बघून. कदंबच्या झाडाचे छायाचित्र घ्याल का पुढल्या वेळी..
|
मस्त आहे ते टपोरं yellow फ़ूल .
|
Cool
| |
| Monday, July 03, 2006 - 5:08 am: |
|
|
दिनेश, देउळ आणि त्याचा परिसर फारच आवडला, आपल्याला जाण्याच्या ठिकाणात याचा समावेश नक्की करा
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|