|
Malavika
| |
| Sunday, June 25, 2006 - 8:43 pm: |
|
|
आतिशय सुंदर, मनोवेधक प्रवासवर्णन. वाचत बसले तर किती वेळ गेला हे कळले नाही. तुमची शैली सुंदर आहेच पण त्यतील तपशीलवार वर्णन तर मोहवून टाकते. दर्जेदार वाचनाचा आनंद मिळला.
|
मन्नु मुग्गा फ़ारच छान आहे, किती गोड हसतोय...!!!
|
गोळेबुवा तुमचा मायबोलीवर बहिष्कार आहे का? तुम्ही,वेलणकर नसल्याने हितगुजला एक प्रकारचा उणेपणा येत आहे. तुमची हितगुजला फार गरज आहे... (दिनेश च्या घरात येऊन जागा अडविल्याबद्दल क्षमस्व...)
|
मी तुमच आधिचं पोस्ट मिस केलं असेल तर सॉरी, पण मन्नू म्हणजे कोण ? हो पण दिनेशदा, मन्नू आहे मात्र अगदीच गोड
|
Dineshvs
| |
| Monday, June 26, 2006 - 4:26 pm: |
|
|
पुण्यनगरीकर, हा मन्नु माझा शेजारी. दीड वर्षाचा आहे. आमची खास दोस्ती आहे. रोज तासभर तरी माझ्याकडे असतो. कच्छी आहे तो. त्याचे लहानपणापासुनचे फोटो मी काढलेत.
|
Raina
| |
| Tuesday, June 27, 2006 - 2:58 am: |
|
|
दिनेश ते बॅग भरुन पैसे वगैरे वाचुन पुर्वी च्या शिणेमातील अमिताभ बच्चन आणि कंपनी आणि त्यांच्या ब्रिफकेस भरुन पैसे आणि ब्रिफकेस वरुन मारामा-यांची आठवण झाली. आपले सदर वाचायचा नेमच झाला आहे आता !
|
Mi_anu
| |
| Tuesday, June 27, 2006 - 3:12 am: |
|
|
दिनेश, मायबोलीवर आल्यापासून ही जालनिशी नियमीत वाचते. मुंबई च्या लोकल्सची वर्णने आवडली. आणि आज नायजेरियाचे अनुभव वाचले. खरेच एका आव्हानात्मक परिस्थितीत तुम्ही तिथे राहिला असाल असे जाणवते. आणखी अनुभव ऐकायला आवडतील. सध्या भूतलावरील कोणत्या जागी आहात?
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 27, 2006 - 6:02 pm: |
|
|
अनु, सौ चुहे खाके बिल्ली हाजको चली, या न्यायाने सध्या भारतात स्थायिक झालोय.
|
Malavika
| |
| Tuesday, June 27, 2006 - 7:58 pm: |
|
|
तुमचे लेटेस्ट लिखण फ़ाॅन्ट प्राॅब्लेम्मुळे वाचता येत नाही. ह फ़ाॅन्ट प्राॅब्लेम कसा सोडवयचा?
|
दिनेश तुमच्या post chii half century झाली अभिनंदन...!!!
|
Jo_s
| |
| Wednesday, June 28, 2006 - 6:45 am: |
|
|
दिनेश, दाद द्यायला शब्दच नाहीत सुंदर लिखाण आहे. अनूभव संपन्न आणि विचार युक्त. भाग्यवान आहेस इतक सारं पहायला मीळालं. जितक सुक्ष्मात शिरू तितक जग मोठ आहे. आणि जितक वरवर पाहू तितक छोट आहे. तु सगळ्याच गोष्टींकडे बारकाईने पाहातोस, त्याच वैचारीक विश्लेशण करतोस त्यामूळे हे लिखाण इतक प्रभावी होतं. तुझ मुंबई आणि दूर दर्शन बद्दलच लिखाणही छानच आहे. लहान पणीची आठवण होते वाचताना. छानच आहे सारं. सुधीर
|
Most interesting site... दिनेश तुच लिहून टाक काहीतरी तिकडे...
|
मजा आली एक एक गोष्ट वाचून. १२ देश पाहिले नाहीत तरी १२ देशांचे अनुभव वाचायला मिळतात इथे!
|
Arch
| |
| Wednesday, June 28, 2006 - 2:38 pm: |
|
|
अमेय, बारा गावच पाणी मात्र प्यायलेल असशील नक्की
|
अमेय, तू या Link वर जा, म्हणजे 12 चे 22 व्हायला वेळ लागणार नाही... /hitguj/messages/58489/109083.html?1140731455
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 28, 2006 - 4:54 pm: |
|
|
लोपा, तु मोजलेस कि काय ? सुधीर, आता ईतक्या वर्षानंतर सगळ्या अनुभवांकडे त्रयस्थपणे बघायला शिकलोय. अमेय, आर्च, मी खरेच बारा देशांचे पाणी प्यायलोय, पण तुम्हाला कसे कळले ? विनय, आता पुढचा भाग कधी रे येणार. मी मागे म्हणालो होतो ना कि एखाद्या आवडत्या देशात, केवळ लेखन करायच्या उद्देशाने जा. आणि तुझ्या खास बोलीतल्या कथाहि लिहित नाहीस हल्ली. !!
|
विनय, मला ह्याचा पत्ताच नव्हता! पुढच्या आठवड्यापर्यंत माझा चेक पोचेल प्लेन्सबोरो ला
|
Zakki
| |
| Wednesday, June 28, 2006 - 8:35 pm: |
|
|
केशकर्तनावरून एक गोष्ट, अनुभव आठवला. मी व माझा मित्र जकार्ता ला असताना एकदा ठरवले की आज फक्त या देशातील भाषाच बोलायची. म्हणून आम्ही बाहेर पडलो. त्याकाळी मला केस कापावे लागत (निदान दोन तीन महिन्यातून एकदा), तर कसा बसा पत्ता विचारत एकदाचे एका दुकानात पोचलो. जकार्तात प्रत्येक गोष्टीत भाव करावा लागतो याचा अनुभव होताच. तेंव्हा आम्ही त्या न्हाव्याला विचारले किती? त्याने जे सांगितले त्याचा अर्थ पंचविस हजार रु. होतो असे आम्हाला वाटले, म्हणून आम्ही म्हंटले नाही नाही, वीस हजारच देऊ. असे दोनदा झाल्यावर त्यानेच इंग्रजीत विचारले 'पावणे तुमी अमेरिकेचे काय?' आम्ही हो म्हंटल्यावर तो म्हणाला, 'मी तुम्हाला पंधरा हजार सांगत असता तुम्ही वीस हजार का देता आहात?' खजिल होऊन आम्ही मुकाट्याने बसून केस कापून घेतले नि वीस हजारच देऊन बाहेर पडलो. (तेंव्हा २५ हजार इन्डोनेशियन रुपयांचा एक डॉलर होत असे. अमेरिकेत एक डॉलरच्या खाली हेअरकट बहुधा १८५७ साली मिळत असे. आम्ही नेहेमी ८ ते १० डॉ. देत असू.)
|
अमेरिकेत आल्यावर केस कापने (कापुन घेने) हा माझ्या समोर देखील मोठा प्रश्न होता. कधी कधी अजुनही असतो. ईकडे great clips, super cuts blah blah आहेत पण तेथील बायकांना भारतीय लोकांचे केस काही नीट कापता येत नाहीत. पहीले ६ महीने मी ६ सलुन ट्राय करुन पाहीले, सर्वांनी केसांची वाट लावली होती. हा माझाच नाहीतर माझ्या सर्व मित्रांचा अनुभव आहे. आता फक्त दरवेळी सांगतो की जसी कट दिसत आहे तशीच ठेवा फक्त कमी करा. पहील्या वेळेस देशातुन ईकडे वापस यायच्या आधी कंटीग ला माझ्या नेहेमीच्या नाव्ह्या कडे गेल्यावर तो म्हनाला काय जोशी साहेब, घरीच कंटीग करता का? दरवेळेस ११-१२ डॉलर देउन ही बोंब.
|
Bovaajee, terima kasih... .. .
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|