Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 24, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through June 24, 2006 « Previous Next »

Dineshvs
Saturday, June 17, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रे फक्त एक गाणे येते. ( शंकराभरणम चे टायटल सॉंग. ) पण मल्याळी सोडली तर बहुतेक दाक्षिणात्य भाषा मला साधारण समजतात.

Arch
Sunday, June 18, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, thanks . काय सुरेख फ़ुलं आहेत न. तुमच्याकडे सगळ्याचा संग्रह आहे आणि अगदी तुमच्या बोटावर.

Moodi
Monday, June 19, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश ही कढीपत्त्याची फळे प्रथमच पाहिली हो अन भारंगीची फुले सुद्धा. फार मस्त दिसतायत. अजुन काही फोटो असतील तर टाका ना.

Maitreyee
Monday, June 19, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमालच आहे, पुण्याच्या नावावर काहीही खपवतात लोक! मूल नाही म्हणून टोकणार्‍या बायका पण केवळ 'पुणेकर' का? इतर ठिकाणी काय एकजात उदार अन्तकरणाच्या बाया भरल्यात वाटते:-O

Dineshvs
Monday, June 19, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, हा संदीपचा वैयक्तिक अनुभव आहे. बाकिकडच्या बायकांचा ना त्याला ना मला अनुभव आहे.
आता पुण्यात असे घडुच शकत नाही, असा तर दावा नाहि ना ?
Anyhow माझ्या बीबीवर कृपया पुणेकर आणि बिगर पुणेकर असा वाद घालु नका, त्यासाठी वेगळे बीबी आहेतच.


Maitreyee
Monday, June 19, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थातच तसा दावा नाही. 'पुण्यात तसे घडूच शकत नाही' हे म्हणणे जितके एकांगी तसेच 'पुणेकर भोचक बायका' हा तुमचा( हा त्या संदीप चा शब्द नाही:-O)सरसकट शब्दप्रयोग ही मला एकांगीच वाटला! दुसरे म्हणजे भोचकपणा किन्वा मूल नसल्यामुळे टोकणे हा केवळ पुण्याचा किन्वा कुठल्याच विशिष्ट ठिकाणचा स्वभाव धर्म असू शकत नाही हे कळण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या बायकांचा अनुभव असण्याची जरुरी आहे असे म्हणायचय का दिनेश तुम्हाला? I just dont buy this!
तुम्हाला कदाचित वाटेल मी उगाच वाद वाढवतेय पण माफ़ करा इथे लाईटली घेऊन गप्प नाही राहता आलं!

आणि हो, ही तुमच्या लिखाणावर प्रतिक्रिया आहे त्यामुळे इथेच लिहिली.(जसे नेहमी जे आवडले, पटले ते लिहिते तसेच जे नाही पटले तेही!)


Dineshvs
Monday, June 19, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही संदीपला ओळखता ? मग तो त्याचा शब्दप्रयोग नाही असे कसे म्हणु शकता ? त्या भोचक बायका पुण्याच्या होत्या, म्हणुन " पुणेकर भोचक बायका " असा शब्दप्रयोग केला.
त्यावरुन पुण्याच्या सगळ्याच बायका तश्या आणि बाकिकडच्या तश्या नाहीत, हे कुठल्या तर्कात बसते ? ऊलट मीच एका समुहाला सरसकट एक विशेषण लावु नये, असे माझ्या लेखातच लिहिलेय.
असो मला ईथे हा वाद घालण्यापेक्षा पुढे लिहिणे आवडेल. माझ्यापुरता मी वाद थांबवतोय, नाहितरी कुठल्याच वादात मी भाग घेत नाही.
आणि माझे शब्दहि तेच राहतील.


Bee
Tuesday, June 20, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा दिनेश काय हे :-(

दिनेश, छान जमतो आहे लेख.. ती कढीपत्याची फ़ळे मी पाहिली आहेत. माझ्या अकोल्यातील घरच्या कढीपत्त्याला फ़ळे आलेली मी बघितली पण ही अशा किरमिजी रंगाची फ़ळे मी बघितली नव्हती. आज तुमच्या कृपेने ह्या फ़ळांचे सौन्दर्य मला बघता आले. BTW, हा रंग किरमिजीच ना..

हिरव्या चाफ़्याची फ़ुले आणि पाकळ्यांना ह्यांना आकार नसतो हे मान्य आहे पण तुम्ही त्याच्या कळ्या नक्कीच बघितल्या असतील. मला त्या कळ्यांचा आकार खूप आवडला. पूर्ण फ़ुल हातात येत नाही कारण पाकळ्या झडतात ह्यावर एक उपाय म्हणजे.. कळी उमलणार त्या आधी ती कळीच तोडून आणावी. दुसर्‍या दिवशी ती छान फ़ुलते. शिवाय एका वेळेस एक कळी तोडणे जरा कठीण आहे तेंव्हा पानासहीत कळ्यांचा घोस आणाला की काही फ़ुले आज, काही उद्या असे निदान ८ दिवस चालू राहते. घराचे दार उघडले की घमघम वास येतो ह्या चाफ़्याचा. इथे पुष्कळ झाडे आहेत चाफ़्याची. बालीमधे तर चाफ़्याला उधान आलेले असते. अगदी संडासाच्या कानाकोपर्‍यातही हिरवाचाफ़ा छिट्याशा सुपात ठेवलेला असतो. बेसिन मधे, अंगणात कुठेही बघा तोच प्रकार.


Yog
Tuesday, June 20, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
महान लिहीतोस रे बाबा! तुझा एकटाकी लिहीण्याचा उत्साह, अन अनेक बारकावे लिहीण्याची क्षमता पाहून एक dialogue आठवतो :
ये हात मुझे दे दे ठाकूर...!! (माझी निदान एक कथा तरी पूर्ण होईल लिहून) :-)


Prajaktad
Tuesday, June 20, 2006 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश छान लिहता आहात.कढीपत्त्याची फ़ळे पहिल्यांदाच पाहिली.
फ़ळांनापण पानांसारखा गंध असतो का?


Dineshvs
Wednesday, June 21, 2006 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee मित्र म्हणालास यातच सगळे आले.
योग, तुझी कथा पुर्ण व्हायची वाट बघतोय, मगच प्रतिक्रिया द्यायची आहे.
माझे तंत्र म्हणशील तर दिवसभरात मसुदा डोक्यात तयार होतो आणि घरी आलो कि तो टाईपुन काढतो.
प्राजक्ता, फ़ळाना गंध असतो पण पानापेक्षा कमी, असतो. चव तुरट असते.


Lopamudraa
Wednesday, June 21, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश... छान लिहिलेय... कोणाच्या वैयक्तिक आयुश्यात काहीही घडु शकते..!!!
वेगवेगळ्या देशांची घरबसल्या सफ़र होतेय...!!!


Bhramar_vihar
Wednesday, June 21, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशा, साडीतला फोटो नाही काढून घेतला का? ऐतिहासिक ठेवा म्हणून!

Dineshvs
Wednesday, June 21, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, तुमच्या निमित्ताने माझीहि पुनर्भेट होतेय.
भ्रमर, राहिलेच रे. आत्ता काय ऊपयोग म्हणा हळहळुन ?


Nvgole
Friday, June 23, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुमची प्रवासवर्णने नेहमीच प्रत्ययकारी, यथातथ्य आणि चित्तवेधक असतात. मी जवळपास सारीच वाचलेली आहेत. सुंदर!

इथे मात्र मला छोटीशी शुद्धलेखनाची सूचना करायची आहे. तुम्ही इतक्याला ईतका नका लिहीत जाऊ. तुमच्या सर्वांगसुंदर लिखाणाला त्यामुळे गालबोट लागून ते अधिकच देखणे दिसत असले तरी शुद्ध लिहील्यास ते जास्त परिपूर्ण होईल. तुमच्याच घरात येऊन तुम्हाला नसत्या सूचना करतो आहे. राग मानू नका. आज मला रॉममधून बाहेर येऊन तुमच्याशी बोलावेसे वाटले म्हणून हे लिहीत आहे. असो.

तुमचे लिखाण फारच वाचनीय असते. ती मुंबईची वर्णने, ती प्रवासवर्णने वा! रमेश मंत्रीचे लिखाणही असेच चित्तवेधक असे. लिहीत राहा मला वाचायचे व्यसन लागले आहे.

-आपला स्नेहांकित
नरेंद्र गोळे


Dineshvs
Friday, June 23, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार नरेंद्र.
शुद्धलेखनाच्या अनेक चुका माझ्याहातुन होतात याची मला कल्पना आहे. मायबोलीवर यायच्या आधी माझा अनेक वर्षे मराठीशी काहि संबंधच ऊरला नव्हता. जाणीवपुर्वक लेखनच काय वाचनहि झाले नाही. त्यामुळे हाताला ती सवय राहिली नाही. अर्थात हि लंगडी सबब आहे याची मला कल्पना आहे. सुधारणा करण्याचा मनापासुन प्रयत्न करीन.
सगळे प्रेमाने वाचतात म्हणुन मलाहि लिहायला हुरुप येतो. पण माझी पायरी हि नामदेवाच्या पायरीच्याहि खालची आहे. इतकी मोठी नावे वाचल्यावर मनावर फार दडपण येते.
या लेखनाला प्रवासवर्णन म्हणणे तितकेसे बरोबर नाही. त्या देशात मला काहि वर्षे राहता आले. तिथली परिस्थिति पुर्णपणे कळली असे नाही, पण जितकी कळली, ती सगळ्यांपुढे मांडतोय इतकच.
आणि सगळे वाचताहेत, यात थोडा माझ्यावरील वैयक्तिक लोभाचा पण भाग असेल. इतक्या स्तुतिला मी खरेच लायक नाही.


Chinnu
Saturday, June 24, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकांनी सिंदबादच्या गोष्टी आमच्याएवढ्या उत्सुकतेने वाचलीच नसतील! दिनेशदा तुमच्या प्रत्येक भागाच्या लेखनाला वेगळे अंग आहे. If possible, do elaborate more on that currency and its journey, especially what you had seen, when you were around there.
आणि हो, फोटो पण छान आहेत तुम्ही टाकलेले. असच येवु द्या.
तुमचा विंडो अजुन french च आहे का? एक भा. प्र. :-)


Bhramar_vihar
Saturday, June 24, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chinnu ,याला आपण शिंदेबादच्या सफरी म्हणुन वाचायचं :-)

Ameyadeshpande
Saturday, June 24, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिंदेबादच्या सफ़री

मला नोटांसाठी bags न्याव्या लागायच्या वरून आपल्याकडे कसे atm मधे पैसे लोड करायला २ बंदुकधारी रक्षक आणि पिंजर्‍याची गाडी येते ती आठवली. :-)


Dineshvs
Saturday, June 24, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिंदेबाबांच्या सफरी, छान. असाच खर्‍या सिंदबादच्या मस्कतमधे पण फिरवुन आणीन म्हणतो.

चिन्नु, नाही आता माझा विंडोज फ़्रेंच नाही.
त्यावेळी माझ्या वर्डमधला स्पेलचेक पण फ़्रेंच होता. No चे आपोआप Non व्हायचे आणि Transfer चे Transfert


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators