|
दिनेश, या सर्व आठवणि तू लिहून ठेवल्या होत्या की आता आठवुन लिहितोस? कमाल आहे तुझी
|
Gs1
| |
| Tuesday, June 13, 2006 - 6:26 am: |
|
|
मी कॉलेजमध्ये असतांना माझ्या एका मैत्रिणीचे वडील नायजेरियात गाडीच्या दारासकट खाली पडुन जखमी झाले होते. तेंव्हा आश्चर्य वाटले होते, आता तुझ्या लेखातून कारण कळले
|
Milindaa
| |
| Tuesday, June 13, 2006 - 8:14 am: |
|
|
सुरण सुध्दा उपासाला चालतो
|
याम, सुरण, रताळी, टापिओका ही सगळी कंदमुळं आहेत.. मी घानामध्ये बघितलेला याम, हा सुरणापेक्षा रताळ्यासारखा होता, आणि कितीतरी मोठा होता.. सुरण नसावा कारण लांबट आकार....
|
Storvi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 10:44 pm: |
|
|
इथे ही याम मिळते ते सुरणासारखे नसुन रताळ्यासारखेच असते
|
अळिवाचे लाडू... मलापण ....
|
Zakki
| |
| Wednesday, June 14, 2006 - 10:06 pm: |
|
|
त्या यामचे रताळ्याच्या कापासारखे गोडाचे काप करून थँक्सगिव्हिंगला खायचा प्रघात आहे. त्या दिवशी मधुमेहाला सुट्टी असल्याने मी पण आवडीने खातो. ( hint, hint ). अमेय, अरे अळिवाचे लाडू नुकतेच मूल झालेल्या बाईला देतात. आम्ही कॉलेजात असताना, (म्हणजे तुमचे बाबा अगदीच लहान असताना), नागपूरला, प्रॅक्टिकल चुकवून, सिनेमाला गेलो, येताना भूक लागली, वाटेत एका ठिकाणि 'कंबरघट्ट लाडू' अशी पाटी दिसली, म्हणून आम्ही दहा बाराजण एकदम आम्हाला कंबरघट्ट लाडू हवेत असे म्हंटले, त्याबरोबर दुकानातल्या बायका पदराने तोंड झाकून मान फिरवून खुसु खुसु हसल्या. (काय पण त्याकाळच्या शालीन बायका! नाहीतर आताच्या वाह्यात् कार्ट्या!). तेंव्हा तिथल्या बाप्या माणसाने आम्हाला सांगीतले, म्हणून लक्षात आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, June 15, 2006 - 4:24 pm: |
|
|
झक्कि, कंबरघट्ट लाडु, काय समर्पक शब्द आहे हो. अगदी पारश्यांच्या प XXXX ड दव्यासारखा. पण हे सगळे खाणे बाळाच्या आईनेच खायचे असा काहो प्रघात पडलाय ? अगदी पुलंच्या कडवेकर मामी देखील, आमचं ह्ये बाळंतकाडा कि वो प्याले, म्हणत खोखो हसतात. बाकि याम म्हणजे एक कंद असतो, यावर एकमत झाले म्हणायचे तर. भ्रमर, कुठेहि लिहुन ठेवले नव्हते, पण सगळे काल बघितल्यासारखे आठवतेय अजुन, यापुढे आठवेल न आठवेल, म्हणुन ईथे नोंदवुन ठेवतोय.
|
Champak
| |
| Thursday, June 15, 2006 - 4:55 pm: |
|
|
मुझे भुक लगी है! कुच्छ खाने को दे दो! अयेईएई
|
Giriraj
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:16 pm: |
|
|
चम्प्या,तू देशात परत आलास की अन्नतुटवडा पडेल असेच वाटतेय मला तर.. जोडीला तो कूल आहेच तुझ्या... दोन तीन सरकारी गोदामांवर दरोडा घालावा लागेल्च!
|
झक्की, कॉलेज कुमारांनाही आवश्यक असतात 'कंबरघट्ट लाडू'! एखाद्या सुंदर मुलीच्या वडिलांनी कंबरेचा काटा ढिला केल्यावर!!!!
|
मृण्मयी, ह्यावर उपाय म्हणजे आधी मुलीच्या वडिलांना पटवणे मग मुलीला
|
Cool
| |
| Friday, June 16, 2006 - 4:17 am: |
|
|
जोडीला तो कूल आहेच तुझ्या >>> मला फारच वैषम्य वाटलं गिरी , तु भेटच YM वर BTW दिनेश नुसते फोटो कधिपर्यंत दाखवणार
|
Raina
| |
| Friday, June 16, 2006 - 7:32 am: |
|
|
तुम्ही खरंच पुस्तक काढाच. जबरदस्त स्मरण्यात्रा आहे ही !
|
Dineshvs
| |
| Saturday, June 17, 2006 - 12:47 am: |
|
|
सुभाष, रितसर आमंत्रण हवेय का ? ईतका मोठा आणि ईतका परका कधीपासुन झालास रे ? बाकि गिर्याबद्दलच्या तक्रारी वाढतच चालल्यात. ईकडे असताना कसा माझ्या धाकात होता. तिकडे गेल्यापासुन कसला घरबंधच राहिलेला नाही त्याला. रैना, आधी लिहुन तर ठेवतो.
|
Giriraj
| |
| Saturday, June 17, 2006 - 5:39 am: |
|
|
कसलं काय!सगळे मिळून मला त्रास देतात हे! कधी ट्रेकलाच घेऊन जातात तर कधी नाटकालाच नेतात. त्यातच तो या मवाल्यांचा सरदार मला हिमेसची गाणी ऐकू देत नाही आणि 'कजरारे' वर नाचूही देत नाही!
|
Cool
| |
| Saturday, June 17, 2006 - 7:23 am: |
|
|
दिनेश रितसर आमंत्रण नकोय, मी येणारच.. तुम्ही फक्त या गिर्याला आवरा..
|
Champak
| |
| Saturday, June 17, 2006 - 9:54 am: |
|
|
गिरि, अजुन तर मी देशात आलेलो ही नाही....... मग अंजाम ये गुलिस्ता क्या होगा!
|
Dineshvs
| |
| Saturday, June 17, 2006 - 3:36 pm: |
|
|
अरे आपल्या कार्ट्याचे, सॉरी बाळाचे गुण का मला माहित नाहीत ? तुम्ही नका मनावर घेऊ. पाठवुन द्या त्याला ईकडे.
|
दिनेश, तूम्हाला तेलगू पण येते का? की काही गाणी?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|