|
Bhagya
| |
| Monday, June 05, 2006 - 12:37 am: |
|
|
बाप रे! हे नायज़ेरिया अजून असच आहे का? बर झालं सांगितलं ते.
|
मैत्रेयी कल्पना छान आहे... आवडलीच
|
मैत्रयीला १००% पाठिंबा... दिनेशदा, डेंजर अनुभव....बकर्याचा विमानप्रवास..... -चिंगी
|
दिनेश, मस्त चाललं आहे.. नायजेरिया बघून होतो आहे.. पुढच्या वेळी मी आलो की तुला तुझे फोटो काढून देईन..
|
बॅज ची कथा भारीच आहे...... तुम्ही दिवसातुन कितीवेळा डोक्याला हात लावत होतात...!!
|
Anilbhai
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:45 pm: |
|
|
डे....ओ डे.. ये.. ये ओ डे लाय कम एन मी वांग गो होम कोम मिस्टर टालीमॅन टाली मी बनाना डे लाय कम एन मी वांग गो होम लिफ़्ट सिक्स फ़ुट, सेवन फ़ुट एट फ़ुट बंच डे लाय कम एन मी वांग गो होम
|
Pooh
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:58 pm: |
|
|
अनिलभाई, :-), रॅफी चे गाने मराठीमधे वाचायला मजा आली. मला वाटते रॅफी जमैकन आहे किंवा करीबिअन मधल्या कोणत्यातरी देशातला आहे.
|
Anilbhai
| |
| Thursday, June 08, 2006 - 6:15 pm: |
|
|
हो रे, दिनेशच्या लेखात बनाना बोटी चा उल्लेख आलाय म्हणुन हे 'बनाना बोट साॅंग' टाकावेसे वाटले. हे खरे जमैकन फ़ोक साॅंग आहे. त्यावरुन Irving Burgie ने लिहिले आणी Harry Belafonte ने गायलेले फ़ेमस साॅंग.
|
Pooh
| |
| Thursday, June 08, 2006 - 6:50 pm: |
|
|
अनिलभाई, मूळ गाणे Harry Belafonte चे आहे हे माहित नव्हते. मला आपले माझ्या मुली ज्या CDs सारख्या वाजवत असतात त्या वरून रॅफी चे आहे एवढेच माहित होते.
|
Gs1
| |
| Saturday, June 10, 2006 - 8:20 am: |
|
|
>>>>आपण नेहमी आपल्या देशात मिशनरी लोकानी केलेल्या सक्तीच्या धर्मंतराबद्दल बोलत असतो, पण आफ़्रिकेतील देशांची परिस्थिति बघता, आपण कैक पटीने सुदैवी आहो असे वाटते. खरे आहे रे, पाचशे वर्षात, आफ्रिका होत्याचा नव्हता केला या लोकांनी. आफ्रिकेचे ( काळे ) आर्चबिशप डेसमंड टूटू यांचे एकच वाक्य त्यांना आणि आफ्रिकेतल्या या भीषण परिस्थितीला जगप्रसिद्ध करून गेले आहे. "When white men came to Africa, they had the Bible and we had the land. They taught us how to pray. When we opened our eyes; we had the Bible and they had the land." आपले डोळे कधी उघडणार हा एक प्रश्नच आहे !
|
Gs1
| |
| Saturday, June 10, 2006 - 8:26 am: |
|
|
मयिबुये आफ्रिका वाचले आहे का ? जरूर वाचा.
|
Shyamli
| |
| Sunday, June 11, 2006 - 6:01 pm: |
|
|
दिनेश दा सीडीज चा खजीनाच पाठवलात की.... thank u
|
अळिवाचे लाडू? काही खास कारण?
|
Bee
| |
| Monday, June 12, 2006 - 5:57 am: |
|
|
वा वा वा शाब्बास दिनेश चिंचेचा मोहर आणि लाडू बघूनच आमचे मन तृप्त झाले पोट मात्र अतृप्त आहे
|
Badbadi
| |
| Monday, June 12, 2006 - 6:22 am: |
|
|
दिनेश, लाडू बघून तोंडाला पाणी सुटले... माझे सगळ्यात आवडते लाडू आहेत... कधी येउ घरी मग?
|
Moodi
| |
| Monday, June 12, 2006 - 10:04 am: |
|
|
लाडु पहाताक्षणी मटकवायची इच्छा झालीय. दिनेश पाऊस सुरु आहे का गोव्यात? अळीव उष्ण असतात म्हणुन विचारले. इकडे उन्हाच्या झळांनी गुदमरल्यासारखे झालेय. चिंचेचा मोहर छानच आलाय. गारसलेल्या चिंचा खायला मजा येत असेल ना? चटणी पण बनवा त्या चिंचेची.
|
Shonoo
| |
| Monday, June 12, 2006 - 1:36 pm: |
|
|
चिंचेचा मोहर आणि कोवळी पालवी घालून कोळम्बी करतात माझ्या सासरी. माझ्या नवर्यासाठी आणी दिरासाठी सासूबाई दरवर्षी कोवळी पाने आणि मोहर सुकवून पाठवतात. पण ताज्या पानांची सर त्याला नाही. :-(
|
Dineshvs
| |
| Monday, June 12, 2006 - 4:55 pm: |
|
|
बी, बडबडी, मूडि, हे लाडु फार टिकत नाहीत, तेंव्हा लवकर या. शोनू, वरणातहि हि पाने घालता येतात. आणि भ्रमरा, घरी अळिव, अंबाबाईचा नारळ, कोल्हापुरी गुळ होतेच, मला वेळहि होता. हौस काय आहेच. कारणे एवढीच बाकि माझ्या घरात, माळ्यावर, वाड्यात, बोळात, गल्लीत, पेठेत, चौकात, रोडवर कुणाकडे का SSSSS हि बातमी नाही.
|
अरेच्या याम म्हणजे सुरण? मग रताळी म्हणजे काय? मी मोडले की उपवास लोकांचे
|
Supriyaj
| |
| Monday, June 12, 2006 - 7:23 pm: |
|
|
rachana.. kalji nako..he bagh http://en.wikipedia.org/wiki/Yam
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|