दिनेश्क़्दा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा... >>>चाळीशी ऊलटुन पण बरिच वर्षे झाली त्यामुळे गोड खाणे कमी केलेय. आहो कुण्या असामी नी म्हणलयं ना "चाळीशी नंतरच तर माणसाचं खरं आयुष्य सुरू होतं"
|
Moodi
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:17 pm: |
|
|
आपला मायबोलीकर असामी तर नव्हे? पण तो अजुन लहान आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, June 01, 2006 - 1:33 am: |
|
|
मधुरा, तसे करता आले तर छान होईल. सध्या तरी सुचतय तसे लेखन चालु आहे.
|
'राइट बंधूनी जातीने बांधले असावे अशी त्या विमानाची अवस्था होती' दिनेशदा -चिंगी
|
Bee
| |
| Thursday, June 01, 2006 - 4:50 am: |
|
|
दिनेश, बेट म्हणजे चारी बाजूनी पाण्यानी वेढलेले शहर. पण मुंबई कुठे चारी बाजूनी पाण्यानी वेढलेली आहे? बर ते अपूर्ण पूर्ण करणार आहात का? क्रमश नाही लिहिलं म्हणून विचारतो आहे..
|
Sherpa
| |
| Thursday, June 01, 2006 - 5:55 am: |
|
|
दीनेश फ़ारच छान लिहिता एकदा वाचायला सुरवात केली की पुर्ण केल्याशिवाय सोडवत नाही मस्त
|
दिनेश, खरच मजा येतेय वाचायला. पुन्हा एकदा तुला गळ घालतो... पुस्तकाच मनावर घे!
|
दिनेश, नायजेरियाबद्दल मीही हेच ऐकलं होतं.. जिथे बाहेर जाताना बंदूकधारी गार्ड बाळगावा लागतो. नशीब मला अजून जावं लागलं नाही... लागोसला गेलोय पण बाहेर पडलो नाही
|
Dineshvs
| |
| Thursday, June 01, 2006 - 4:07 pm: |
|
|
बी, मुंबई तशीच आहे रे.
|
बी मुम्ब इ हे मूळ बेटच आहे. मुळात तो ६ की ७ बेटांचा समूह आहे. कालाच्या ओघात मधल्या खाड्या बुजविण्यात आल्या आणि अतिक्रमणेही झाली आणि भूमी सलग झाली त्यामुळे नवीन मंडळीना ते सांगूनही खरे वाटत नाही की मुम्ब इ बेट आहे. ते सध्या तरी द्वीपकल्प झाले आहे हे खरे..........
|
Arch
| |
| Thursday, June 01, 2006 - 5:17 pm: |
|
|
दिनेश, तुमच्या नेहेमीच्या लिखाणावरून जाणवत की तुम्हाला प्रत्येक माणसाचे फ़क्त चांगले गुण दिसतात. आणि तुम्ही नेहेमी त्याचाच reference देता. हा तुमचा केवढा मोठ्ठा गुण आहे.
|
Ninavi
| |
| Thursday, June 01, 2006 - 6:11 pm: |
|
|
अलीबाबा म्हणजे चोरी???? ऐतेन!!
|
Dineshvs
| |
| Friday, June 02, 2006 - 4:30 pm: |
|
|
Arch वाईट अनुभव आले नाहीत असे नाही, पण वाढत्या वयाने ते नजरेआड करायला शिकवले. अर्थात चांगल्या अनुभवांची संख्या जास्त होती. शेवटी असे नको ना व्हायला. उम्र कटने को कटी पर क्या ख्वारी में कटी दिन कटा फ़रियाद में और रात जारी में कटी निनावि, ते लोक चोरीला वाईट मानत नाहीत. माझ्याकडे नव्हते आणि तुझ्याकडे ( जरा जास्तच ) होते, म्हणुन मी घेतले. अशी त्यांची मनोवृत्ती आहे. कित्ती उच्च विचार नं
|
Lalu
| |
| Friday, June 02, 2006 - 4:52 pm: |
|
|
छानच आहे नेहमीप्रमाणे. 'केनिया' तर मी print करुन घेऊन एका दमात वाचला. आताही तसंच करणार आहे, आज जरा वेळ मिळाला म्हणून थोडं वाचून काढलं.
|
दिनेश तुम्हि अगदी उच्च, सुंदर वर्णन लिहिता आहात... आता एक पुस्तक काढा...!!!मला तर चांगली प्रतीक्रिया सुध्दा सुचत नाही...
|
नायजेरिया विमानतळाचे किस्से अदभुतच आहे...
|
दिनेशदा तुम्हाला आठवतं ही चांगलंच १० वर्षांपुर्वीचं आणि लिहिता तर तितकच छान... वाचत बसलं की खरच दर्शन घडतयं असं वाटतं एकेका देशाचं... अगदीच "पुर्वरंग" ची आठवण येते पुलंच्या... पुलंचा एक लेख आहे त्यांच्या काश्मीर दौर्याचा... त्यांच्या पश्चात सुनीताबाईंनी पुलंच्या लेखांचा एक संग्रह काढला "एक शून्य मी" ह्या नावानी त्यात आहे तो. तुमचा अनुभव लिहिण्याचा flow खूपसा त्याची आठवण करून देणारा आहे...
|
Moodi
| |
| Sunday, June 04, 2006 - 7:41 pm: |
|
|
दिनेश हे अफ्रिकन देशाचे अनुभव खरच किती सुरस अन गंमतशीर आहेत नाही! फार मजा येते वाचतांना. प्रवास अन रुटीन कसे सुसह्य करावे हे तुमच्याकडुनच शिकावे.
|
Shreeya
| |
| Sunday, June 04, 2006 - 10:38 pm: |
|
|
दिनेशदा खूपच सुंदर लिहिले आहे. अगदि बोट धरुन नायजेरिया हिंडवुन आणला. त्यांच्या सणांबद्दल लिहा न जरा! तिथल्या सुट्ट्यांबद्दल वगैरे!
|
अगदीच सुरस आणि चमत्कारिक!!दिनेश तुम्ही आता सिन्दबाद असा आयडी घ्या आणि लिहा पुढचे
|