|
Giriraj
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:39 am: |
|
|
बी,सचित्रासोबत? मुलींच्या कन्याशाळेत कधी गेलेलास का?सहज आपलं!
|
Tanya
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:53 am: |
|
|
दिनेशदा... खरच मस्तच हो! इथे बरिचशी फळ मिळतात, फक्त आकाराने जरा मोठी असतात. त्यांची मराठी नावे मला ठाऊक नव्हती. तुमच्यामुळे समजली. अगदी तुम्ही अननस म्हणुन ज्या फळाचे चित्र दिले आहे, ते सुद्धा मी येथे पाहिले. अशीच आणखिन माहिती वाचायला आवडेल.
|
Bee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 10:13 am: |
|
|
तान्या, अशी काय म्हणतेस, अननस म्हणजे pineapple ना.. पण मराठीत आपण अननसच म्हणतो. फ़्रेंच मध्येही pineapple ला अननसच म्हणतात. मला इथे नविन फ़ळ जे आवडल ते tomato सारखे गोल आणि तसेच थोडेफ़ार लाल असते. आपली लाल ताबंडी शिमला मिरची असते त्याप्रमाणे ते फ़ळ दिसते. चिक्कु जसे गोड असते तसेच गोड फ़ळांपैकी हे एक फ़ळ. नाव माहित नाही.
|
दिनेशदा, व्वा! सुंदर आणि रसाळ! -चिंगी
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 16, 2006 - 4:03 pm: |
|
|
लिंबु, या गुलाबी जामचे झाड आणि फ़ुलोरा पण खुप छान असतो. हो बी, प्रदर्शनच भरले होते, पणजीलाच. त्या नंतर वाईन महोत्सवहि झाला, पण त्याला नाही गेलो. अननस हा पोर्तुगीज शब्द आहे, अरेबिक मधे पण तोच शब्द आहे आणि स्वाहिलीतपण. आवळा मलेशियात होतो. आता आपल्याकडे तिकडुनच कलमे आणतात. प्रदर्शनात पांढरा चिकु पण होता. सालहि पांढरी आणि गरहि. रामफळ महाशिवरात्रीलाच जास्तकरुन येतात. पण ईथेहि ते कमीच दिसते. डाळिंब मस्कतमधे होतात. त्या लोकात ते फार प्रिय आहे. मस्कती डाळिंबे प्रसिद्ध असतातच, शिवाय त्याचे सरबत पण तयार मिळते. अनारकली ---- टोमॅटोसारख्या फळाला काका असे नाव आहे. त्याला अमृतफळ पण म्हणतात. भारतात आता मिळते. पण ते पुर्ण पिकल्यावरच खायचे असते. त्याची चव बरिचशी ताडगोळ्यासारखी असते. KP त्रयोदशगुणी विड्यात जायपत्री असते. एकदम विडा आठवला तो ? आणि हो ज्या ताटलीत हि फळे ठेवलीत ती आहेत सुपारीच्या पोवापासुन बनवलेली. सुपारीचा मोहोर यायच्या आधी त्या झाडाला एक होडीसारखा भाग लगडतो, तो म्हणजे पोव. या ताटल्या पत्रावळीपेक्षा खुपच मजबुत असतात. धुवुन परत वापरताहि येतात. द्रोणहि मिळतात. अलिकडे याच्यापासुन केलेले हेल्मेटहि बघितले. हे सगळे ईथे मिळते, पण कर्नाटकातुन येते.
|
रसाळ मेजवानी मिळाली... आणि बरीच नविन माहितीही... सुन्दर.... !!!
|
Prady
| |
| Wednesday, May 17, 2006 - 8:36 pm: |
|
|
ही करवंदाची जाळी पाहून खूप वर्षांपूर्वी केलेल्या शिवथर घळीच्या सहलीची आठवण झाली.टप्पोरी जांभळा एवढ्या आकाराची करवंदं( कुठलिही अतिशयोक्ती नाही). आम्ही असे तुटून पडलो होतो. खूप धमाल आली होती.
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 10:42 am: |
|
|
दिनेश, ह्याला जाळी काहो म्हणतात? ह्यावेळी ईगतपुरीला गाडी थांबली तेंव्हा द्रोणात पिकलेली करवंद घेतली. छान गरयुक्त गोड होती. ऐरवी कच्ची करवंद खूपदा खाल्ली आहेत पण पिकलेली करवंद खाण्याची माझी ही १लीच वेळ होती.
|
Tanya
| |
| Thursday, May 18, 2006 - 10:56 am: |
|
|
दिनेशदा... ग्रेट! मी नेहमी माझ्या मुलाला करवंदाबद्दल सांगते, पण त्याला दाखवायला करवंदांचा फोटो माझ्याकडे नव्हता. त्याला मी सांगितले होते की it looks like blueberry वगैरे. पण ह्या फोटोबद्दल thanks! तोंडाला पाणी सुटल ते वेगळचं. लहानपणी, मावशीच्या गावी रोह्याला जाताना आम्ही कोंबडा की कोंबडी खेळत करवंद खायचो.
|
कोणाच्या लहानपणी? मावशीच्या की तुझ्या? तन्या
|
Dineshvs
| |
| Thursday, May 18, 2006 - 4:48 pm: |
|
|
बी, जाळी म्हणतात कारण भरपुर काटे असतात, आणि ओरखडे ऊठतातच. Tanya काय मजा यायची ना त्या कोंबडा कोंबडी खेळाला. द्रोणात विकायला असतात, त्यापेक्षा अशी खुडुन खाल्लेली करवंदे जास्त गोड लागतात. आणि याच दिवसात, तोरणं, अळु, हशाळे, जगमं, नेरली असे बरेच प्रकार मिळतात जंगलात.
|
Arch
| |
| Thursday, May 18, 2006 - 6:26 pm: |
|
|
तुम्हीसुध्दा खेळायचात का तो खेळ? पांढरी ती कोंबडी आणि लाल तो कोंबडा. मजा यायची. तनया, करवंद बघून अगदी त्याचीच आठवण झाली. आजी नेहेमी म्हणायची करवंदाच्या जाळीत साप वगैरे लपून बसतात म्हणून. पण काटे असल्यामुळे जाळीत जास्त जायचा प्रश्णच नसायचा. दिनेश, आमच्या गावाला अळू नावाच फ़ळपण मिळत. दिसायला चिक्कूसारख असत पण चव एकदम वेगळी. माहित आहे तुम्हाला?
|
तुम्ही कोंबडा कोंबडी म्हण्यायचात? मग काळी मैना कोण?
|
Moodi
| |
| Thursday, May 18, 2006 - 8:57 pm: |
|
|
आम्ही पण करवंदाला काळी मैनाच म्हणतो.
|
रचना, ती काळी मैनाच गं पण ती खाताना खेळायचा तो खेळ होता एक तुकडा तोडून बघायचं आत लाल आहे का पांढरं आणि त्याव्र त्याला कोंबडा किंवा कोंबडी म्हणायचं
|
दीनेश, सर्व काही छानच लिहीलय. तुम्ही गेलेल्या अनुभवातुन बरेचजण गेले असतील, पण त्यांचं येवढं व्यवस्थित संकलन आणि मांडणी करुन त्यांन्ना शब्दांत बांधणं फ़ारच थोड्यांना जमतं. लिहितच रहा. तुमचा भाउ किंवा चुलता शारदाश्रम मध्ये होता का हो ८४ साली? सहज खडा मारुन पहातोय मला वाटतं की तो करवंदांचा खेळ असा होता. आपण ज्या व्यक्ती बरोबर खेळत असु त्या व्यक्तीला आपण खाणार असलेलं करवंद दाखवुन कोंबडा की कोंबडी असं विचारायचं आणि मग त्या व्यक्तीने ते करवंद निरखुन पाहून आपला अंदाज सांगायचा. जर उत्तर बरोबर आलं तर त्या व्यक्तीला आपल्यातलं एक करवंद द्यायचं आणि उत्तर चुकलं तर त्या व्यक्तिकडुन आपण घ्यायचं. असं आळीपाळीने करायचं.
|
Bhagya
| |
| Friday, May 19, 2006 - 12:38 am: |
|
|
इतके चांगले लेख पुस्तक रुपात संकलित झालेत, तर इतर अनेक वाचकांना पण वाचायला मिळतिल दुसरं काय लिहू?
|
Dineshvs
| |
| Friday, May 19, 2006 - 4:25 pm: |
|
|
हो आर्च, मी माझ्या यादीत लिहिलय कि. किंचीत तेलकट पण छानच चव असते याची. कोल्हापुरला अंबाबाईच्या देवळाबाहेर असतात विकायला हि, अजुनहि. विकास लाल भडक करवंद म्हणजे कोंबडा आणि पांढरे किंवा गुलाबी म्हणजे कोंबडी, असेच म्हणत होता ना तुम्ही ? या करवंदात एक पांढरट गुलाबी जात असते. पुर्वी ती डोक्यात माळत असत. गोव्यात अजुनहि माळतात. ती पिकत नाहीत, कच्ची असताना करंदासारखीच लागतात पण जरा कडवट लागतात. डॉ. डहाणुकरानी लिहिले होते. पुर्वी देशावर केसात फुल माळायची पद्धतच नव्हती. क्वचित वेणी वा गजरा. खास डोक्यात माळायला फुलेहि मिळायची नाहीत. पण गोव्यात मात्र पुर्वीपासुन डोक्यात फुल माळायची पद्धत आहे. अगदी जास्वंदपण माळतात. पुर्वी देशावर कुणी फुल माळले कि बाईकडे विचित्र नजरेने बघत. गोव्यात मात्र तसे कधीच नव्हते. अननस, करवंदे, करमळे, बिमल्या अश्या रानमेव्याचे लोणचे खाल्ले आहे का कुणी. बिन तेलाचे असल्याने वर्षभर सहज टिकेल. पण ऊरेल तर ना. रित अगदी सोपी. ह्या सगळ्या फळांच्या फोडी करुन त्याला तिखट मीठ लावुन ठेवायचे. त्याला पाणी सुटले कि त्यात परत साखर बनेल असा पाक करुन, ती साखर मिसळायची, आणि सात आठ दिवस ऊन्हात ठेवायचे. चव आणि रंग दोन्ही छान.
|
दीनेश, पोर्तुगीजांमुळे कि काय ते माहित नाही पण वसई आणि गोव्याच्या मुळच्या संस्क्रुतीमध्ये थोडं साधर्म्य जाणवतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे वसईतही डोक्यात फ़ुले माळायची पद्धत होती आणि अजुनही काही प्रमाणात आहे. तुम्ही म्हणालात तशी डोक्यात माळायच्या करवंदांची झाडे आमच्याही वाडीत होती. ती झाडे प्रामुख्याने विहिरीजवळ पहायला मिळत. गोव्यात फ़ेणी आणि वसईत ताडी वसईत ज्या गावात मी रहातो त्या गावाचं नाव मुळगाव जे गोव्यातही आहे तुम्ही वर सांगितलेली रेसीपी आम्ही उन्हाळ्यात पपईबरोबर करायचो, पण त्याला थोडीशी चिंचही लावायचो. अहाहा त्यातल्या रसाला काय चव लागायची अजुनही तोंडाला पाणी सुटते
|
माळण्याची करवंदे मी पण पाहिली आहेत.. अबोलीचा वळेसार तर गोवेकरांचा खास.. कोकणात सुरंगीचा वेळेसार... पण मला वाटलं सगळ्याच मराठी बायका फुलं माळत असत.. घाटावर असं नाही हे पहिल्यांदा ऐकतोय...
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|