|
दिनेश, आठवणी मस्त लिहिल्या आहेत तुम्ही... पुढची वाट बघतोय.
|
Mita
| |
| Monday, April 24, 2006 - 9:56 pm: |
|
|
लुई आवडला तुमचा, अगदि डोळ्यासमोर उभा केलात.
|
Savani
| |
| Tuesday, April 25, 2006 - 3:53 pm: |
|
|
दिनेश, फ़ारच छान. केनया बद्दल खरच अजिबात महिती नव्हती. खूप छान सविस्तर लिहित आहात. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
|
Prajaktad
| |
| Wednesday, April 26, 2006 - 12:48 pm: |
|
|
दिनेश!मस्त रंगलाय केनिया पुढच्या भागाची वाट पाहतेय!
|
Prajaktad
| |
| Wednesday, April 26, 2006 - 12:49 pm: |
|
|
दिनेश!मस्त रंगलाय केनिया, पुढच्या भागाची वाट पाहतेय!
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 26, 2006 - 4:24 pm: |
|
|
खरे तर मी हे आधीच लिहायला हवे होते, केनयावर लिहिण्याची प्रेरणा मला आपल्या विनय देसाईंच्या परदेसाई मुळे मिळाली.
|
Ninavi
| |
| Wednesday, April 26, 2006 - 4:40 pm: |
|
|
छान लिहीलंयस दिनेशदा. अगदी प्रत्यक्ष सगळं अनुभवल्यासारखं वाटतंय वाचताना. पण बायकांना ' मामा' म्हणतात? काय हा स्पष्टवक्तेपणा!!
|
Yog
| |
| Wednesday, April 26, 2006 - 4:49 pm: |
|
|
बाकी काही म्हण तुझा लिहीण्याचा उत्साह फ़ारच दान्डगा आहे...!
|
Megha16
| |
| Wednesday, April 26, 2006 - 5:14 pm: |
|
|
दिनेश दा, तुमची कथा मस्त आहे. आणे केनिया पुढची माहीती वाचली. लुई खरच मस्त वाटला. गंडेरी चा अर्थ मात्र कळला नाही मला.तेवढा सांगाल का? आणी केनिया मधली दुधात गायीच रक्त ते मात्र जरा अवघड वाटल. पण तुम्ही बाकी सर्व वर्णन मस्त केल आहे.
|
Anilbhai
| |
| Wednesday, April 26, 2006 - 5:54 pm: |
|
|
गंडेरी म्हणजे उसाचे साल काडुन केलेले छोटे तुकडे.
|
Moodi
| |
| Wednesday, April 26, 2006 - 8:52 pm: |
|
|
दिनेश आता कळले की केनयाचे खेळाडु कायम पहिले का येतात ते. काल इथे एक मॅरेथॉन होती. अगदी पावसात सुद्धा ते आघाडीवर होते. आता पुढे विक्टोरीया धबधब्यावर पण लिहा ना, झांबेझी नदीवरुन ( चु.भु.दे.घे) रोंरावत पडणारे ते पाणी पाहिल्यावरच अंगावर रोमांच उठतात. इथे एक सिरीयल होती मॅड माईक अन मार्क या मुसाफिरांची, ते तिथे अफ्रिकेत असेच सर्वत्र फिरले होते. तेव्हा पाहिला तो धबधबा त्या डॉक्युमेंटरीज मध्ये. किलेमांजरो!!!! अद्भुत आहे ना? शब्दात नाही वर्णन करता येत.
|
Hems
| |
| Wednesday, April 26, 2006 - 9:46 pm: |
|
|
दिनेश , मस्तच लिहिताय !! आणि काय काय भरलय हो तुमच्या पोतडीत ! आता सगळ्या विषयांवरचा एक ग्रंथच करा प्रकाशित !
|
Dineshvs
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:28 am: |
|
|
किलिमांजारो वर अद्भुत वातावरण आहे. तिथे गेल्यावर शहाणी माणसे वेड्यासारखी वागु लागतात. डॉ श्रीराम लागु, यांच्या आत्मचरित्रात त्याचे वर्णन आहे. मी वर नाही गेलो. कारण आधीच ती प्रक्रिया पुर्ण झाली होती.
|
Ek_mulagi
| |
| Thursday, April 27, 2006 - 2:16 am: |
|
|
मी "कसावा" खाल्ल ( कि खाल्ली?) एकदा, एका ओळखीच्या उगांडाच्या कुटुंबाच्या क्रुपेने. त्यानी प्रेमाने offer केली,आग्रहही मोडवेना. पण त्यात ना मीठ होत ना तिखट, काही चवच लागली नाही. बोस्टन मराथाॅन या वर्षी पण केनियन खेळाडू नेच जिंकली.
|
दिनेशदा, डॉ. लागुंच्या आत्मचरित्रातला तो भाग मी वाचलाय पण खूप वर्षांपुर्वी शाळेत असताना वगैरे... बहुतेक तो नुसता एक लेख होता कशात तरी आलेला आत्मचरित्र तेव्हा नसावं... त्यांची professional अभिनयाची कारकिर्द सुरू व्हायच्या आधीची गोष्ट आहे ही...किलिमांजारोच्या शिखरावर चढून जाईपर्यंत त्यांची द्विधा मनस्थिती असते डॉक्टरी पेशा घ्यायचा की त्यांचं करियर अभिनयावर ओवाळून टाकण्याची रिस्क घ्यायची... आणि किलिमांजारोच्या शिखरावर गेल्यावर त्यांच्या निर्णय होतो त्यांच्याच अंगातल्या कुठल्या तरी प्रेरणेनी... मस्तय ते वाचायला. बाकी अनिलभाई ते उसांच्या तुकड्यांना "करवे" म्हणतात ना उसाचे?
|
Karadkar
| |
| Thursday, April 27, 2006 - 2:35 am: |
|
|
तो कसावा फिजी मधे पण खातात. चांगले लागते. त्यापासुनच साबुदाणा करतात का?
|
Dineshvs
| |
| Thursday, April 27, 2006 - 3:23 pm: |
|
|
कसावा लॅटिन अमेरिकेत पण खातात. त्याबद्दल आणखी लिहिनच. साबुदाणाचे झाड सॅगो पाम, ते जरा वेगळे असते, त्याचे कंद रुंद असतात, पण झाड असेच असते.
|
Chinnu
| |
| Thursday, April 27, 2006 - 5:03 pm: |
|
|
वा वा वा, शेतीबद्दल वाचुन कस हिरवेगार वाटले!!
|
Moodi
| |
| Tuesday, May 02, 2006 - 4:41 pm: |
|
|
तुम्ही एवढे भरभरून दिले त्यातच आम्हाला पावले ते.
|
Savani
| |
| Wednesday, May 03, 2006 - 1:03 pm: |
|
|
दिनेश, फ़ार सुरेख वर्णन करत आहात. छान केनियाची सफ़र घडवून आणताय. ह्याच्या जोडीला फोटो टाकता आले तर बघा.फ़ार उत्सुकता वाटते फोटो बघण्याची. तिथे मोठ्या शहरांमध्ये देखील साधारण असेच राहणीमान आहे का? कि मोठी शहरे इतर metro cities प्रमाणे आहेत?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|