|
Ldhule
| |
| Sunday, April 02, 2006 - 3:31 am: |
|
|
दिनेश, तो कृष्णधवल जमाना काही औरच होता. खुप छान वाटल वाचुन. मद्रासी 'आमा आमा' म्हणजे 'आमची माती आमची माणस' म्हणायचो आम्ही. लतादिदी दिसायला छान नाहीत म्हणुन सिनेमाच्या पडद्या मागुन गातात असं कुणितरी सांगितल होत तो समझ टीवी ने दुर केला..... बाकीच्या प्रतिक्रिया समाप्त नंतर.... तुमच्या बीबीवर लेखापेक्षा प्रतिक्रीयाच जास्त असतात. मानल बुवा तुम्हाला.
|
Dineshvs
| |
| Sunday, April 02, 2006 - 11:47 am: |
|
|
आशालता चे वाघनखं हे नाटक छान होते. त्यात ती घर विकायला काढते आणि सारखी त्याची किम्मत वाढवत राहते. कारण तिला माहित असते कि तिच्या दिवंगत मुलीचा खुनी, कुठल्याहि किमतीला ते घेईल. भारती आचरेकर आणि अरुण जोगळेकर यांचे साठा उत्तराची कहाणी पण छान होते. त्यात मच्छिंद्र कांबळीने दुधवाल्या भैयाची छोटी भुमिका केली होती. बाकि सगळे नाटक या दोघानी तोलले होते. स्मिता पाटिल आजचे कार्यक्रम सांगायला होती, तिच्याप्रमाणे वंदना पंडीत, ज्योस्ना किरपेकर, पुर्णिमा पाटिल याहि सिनेमात गेल्या. वासंति वर्तक मला खुप आवडायची. कॉलेजच्या वेळात ती रेल्वेत पण दिसायची. शोभा तुंगारे म्हणजे आसावरी जोशीची आई. ती पण आपण याना पाहिलत का, हा कार्यक्रम सादर करायची. त्यात हरवलेल्या व्यक्तीविषयी निवेदन असायचे. पुढे या नावाची मालिका आली. सई परांजपेने अडोस पडोस नावाची छान मालिका सादर केली होती, अमोल पालेकर, राजेश्वरी, हरिन्द्रनाथ चटोपाध्याय, असे बरेच कलाकार होते. सुधा चोप्रा आणि टि पी जैन हे निवेदकहि पुढे अनेक सिनेमात दिसले. १९८२ च्या एशियाड च्या निमित्तने रंगीत प्रक्षेपण सुरु झाले. तो सोहळा खरेच छान झाला होता. त्यावेळच्या बसेस मग पुणे मुंबई अश्या धाऊ लागल्या, अजुन त्याना एशियाड बसेस म्हणतात. सुधीर गाडगीळ पण टिव्हीमुळेच पुढे आला. त्याने अनेक कलाकाराना बोलते केले पण अभिनेत्री चित्रा दम्यामुळे एवढी खोकत होती, कि त्याच्या कुठल्याच प्रश्णाना उत्तरे देऊ शकली नाही. ज्योस्त्ना भोळे आणि गजानन वाटवे यांचा उल्लेख त्यानी भाव गीताचे आदिपुरुष आणि आदिमाया असा केल्यावर, तिथे असलेले हृदयनाथ, मग मी आदिमानव का, असे बोलले होते. कठपुतळीवाली मीना नाईक पण टिव्हीमुळेच पुढे आली. मित्रानो सगळ्यांच्या प्रतिक्रियेने हरखलोय. पुढे लिहितोयच.
|
Upas
| |
| Sunday, April 02, 2006 - 10:29 pm: |
|
|
दिनेश फारच छान.. तेव्हा घरी टीव्ही नसल्याने आठवणी रेडीओशी अधिक जुळलेल्या पण चाळीत रहात असल्याने कोणाच्याही घरात डोकवाव किंवा हक्काने एखादी मालिका किंवा छायागीत बघायला जावं ह्यासार्खी मजा नसे.. आपण यांना पाहिलंत का बघताना एक अनामिक भीती वाटायची.. दिनेश, जर वेळ मिळाला तर रेडीओच्या आठवणींचा वेध घ्याल काय.. ( इथे हक्काने मागणी करायची आणि हट्ट पुरवून घ्याचे असं म्हटलय म्हणून हे धाडस करतोय विचारायचं.. ) तुम्ही खूपच ओघवतं लिहिता.. मनापासून धन्यवाद..
|
Dineshvs
| |
| Monday, April 03, 2006 - 1:53 am: |
|
|
वा उपास, जरुर. असे विषय पुरवले तर, माझे लेखन कधीच थांबणार नाही.
|
Zakki
| |
| Monday, April 03, 2006 - 1:25 pm: |
|
|
आमच्या घरी ३२ इन्ची टी. व्ही. च्या आकाराचा एक रेडीयो होता. १९५० साली त्यात एक उंदीर मागच्या बाजूला शिरला, नि नको त्या वायर खाऊन मेला. मग आमच्याकडे रेडियो आलाच नाही. म्हणून ऑस्ट्रेलियालाला जेंव्हा हझारे, मन्कड, मर्चंट, मुश्ताक अली, असे लोक हॅसेट, बेनो, ओनिल, नि लिन्डवॉल, मिलर यांच्याशी खेळायला गेले तेंव्हा पहाटे पाच वाजता उठून मी पण आमच्या मालकांच्या घरी जाऊन कॉमेंटरी ऐकत असे. नंतर पुण्याला गेलो तरी घरी रेडियो नाही. मग काटेरी कुंपणाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन शेजार्यांच्या घरातील रेडियो वर कॉमेन्टरी, बिनाका गीतमाला ऐकत असे. नंतर १९६१ साली नागपूरला घरी रेडियो आला, तेंव्हा रविवारी सकाळी ९ वाजता रेडियो सिलोनवर, इंग्रजी गाण्यांची बिनाका हिट परेड असे. चबी चेकर, नॅट किंग कोल! 'These shoes are made for walkin,' 'no. 54, house with the bamboo door, bamboo roof and bamboo walls', 'I'm all shook up!' (The real king, Elvis) आणि ६५ साली 'I wanna hold your hands' (beatles) लगेच, 'देखो, अब तो हमको नही है खबर, हमको है तुमसे प्याऽऽर' अशी त्या गाण्याची हिंदी सिनेमात कॉपी! ६२ मधे नागपूरला सायन्स प्रदर्शनात T.V. दाखवला! अहो अर्धा तास एव्हढा एकाग्र मनाने पहात बसलो होतो आम्ही चार पाच जण तेंव्हा, तसे देवाचे नाव घेतले असते तर तेंव्हाच स्वर्गात इंद्राच्या दरबारात बसून सोमरस पीत उर्वशी रंभा चे नाच बघत बसलो असतो! मग ६५ साली माझ्या भाऊ जपानला गेला होता, तिथून त्याने ट्रान्सिस्टर्स आणले, नि सगळी मज्जाच गेली. अर्थात अमेरिकेत ७० साली येईस्तवर भारतात T.V. बघितलाच नाही. पण आता काय, सीडी काय, आयपॉड काय. सगळे गेले खड्ड्यात! नुसते हटकेश्वर, हटकेश्वर म्हणायचे!
|
Zakki
| |
| Monday, April 03, 2006 - 1:29 pm: |
|
|
दिनेश, क्षमस्व. वहावत जाऊन तुमच्या जागी माझ्या शिळ्या जुनाट आठवणि टाकल्या. वाटल्यास उडवून टाकायची विनंति करा नेमस्तकांना, उगाच त्यावर लोकांचे शेरे ताशेरे नकोत. आजकाल तसे बरेच लोक अतिशय सिरियस आहेत, तरी AVK दिसतात अधून मधून!
|
Dineshvs
| |
| Monday, April 03, 2006 - 3:32 pm: |
|
|
झक्कीसाहेब, वो आये है हमारे घर, खुदाकि कुदरत है कभी हम ऊनको, कभी अपने घरको देखते है. उपासने मागणी केलीय त्याप्रमाणे रेडिओ वर पण लिहिणार आहे, त्यावेळी तुम्ही असायलाच पाहिजे सोबतीला.
|
Arch
| |
| Monday, April 03, 2006 - 5:56 pm: |
|
|
दिनेश, अहो त्या शायरीची मजाच घालवलीत की.
|
Zakki
| |
| Monday, April 03, 2006 - 7:38 pm: |
|
|
Think of the devil!
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 04, 2006 - 1:36 am: |
|
|
आता हे सगळ्याना ऊद्देशुन शुक्रिया है हुजुर आनेका वक्त जागा है गरिबखानेका मुद्दतोमे हमे ये दिद हुई ईदसे पहले हमारी ईद हुई.
|
Gs1
| |
| Tuesday, April 04, 2006 - 1:41 pm: |
|
|
छान वाटल वाचून, तुझ्या स्म्रणशक्तीला आणि निरिक्षणाला दाद द्यायला पाहिजे
|
दिनेश, तुमच्या लिखाणाला आम्ही काही मोजक्या शब्दात अभिप्राय देणे, म्हणजे फ़ारच कर्मकठीण. तुम्ही नलिनीला लिहिलेल्या पत्रांवरून मला सकाळ पेपरमधील श्री. द. ता. भोसलेंच्या'संस्कृतीच्या पाऊलखुणा' ह्या लेखांची आठवण झाली. इथे युरोपात आल्यावर, इथल्या प्रत्येक देशाची वेगळी संस्कृती आणि ती जपण्यासाठी त्यांची असलेली इच्छाशक्ती बघताना आम्हांला अंतर्मुख व्हायला होते मग मनात येणार्या हजारो प्रश्नांची आणि इथल्या लोकांच्या शंकांची उत्तरे देताना तुमचे लेख मार्गदर्शक वाटतात. स्टारट्रेक सुरु झाले तेव्हा आमच्याकडे टीव्ही नव्हता. म्हणून मग आमच्या हिंदी भाषिक शेजार्यांकडे जाऊन मी दर रविवारी तो बघत असे. त्यांची छोटी मुलगी कार्यक्रम चालू असताना मधे मधे 'मम्मे दूध' असे ओरडत असे.... ते सगळे आठवून जाम हसायला आले. १९८५ मध्ये टीव्ही आणि १९८७ मध्ये व्ही.सी. आर आल्यानंतर तर इतके सिनेमे पाहिलेत ज्याला गणना नाही. मी लहान असताना आम्ही कोल्हापुरात राहायला होतो, त्यामुळे तिथे अनेक मराठी सिनेमांचे शूटिंग आणि अनेक कलावंत प्रत्यक्ष पाहिलेत. ह्या सगळ्याची आठवण झाली, म्हणून एव्हढे मोठ्ठे पोस्ट लिहिले.
|
Maanus
| |
| Tuesday, April 04, 2006 - 3:56 pm: |
|
|
सुंदर वर्णन केलेय हो दिनेश राव. शेजार्यांकडे टि.व्ही. पहाने म्हणजे त्यांची छोटी छोटी कामे पण कारावी लागायची, साखर आन, हे आन ते आन. शेवटी आमच्या father ने ८५ का ८७ मधे bush चा color t.v. आणला, अजुनही तो t.v. चालु आहे. श्रीरामपुरच्या त्या चाळीतला हा दुसरा t.v. त्यामुळे रविवारी आमच्या घरी पन जनता जमायला लागली. रोज संध्याकाळी बातम्यामंधे बायंकाचा interest आसायचा आज ती कोणती साडी घालनार आहे, आणि एखाद्या दिवशी पुरूष वार्ताहार असला की त्या नाराज व्हायच्या.
|
Madhura
| |
| Tuesday, April 04, 2006 - 5:26 pm: |
|
|
शेवटी आमच्या father ने ८५ का ८७ मधे bush चा color t.v. आणला, अजुनही तो t.v. चालु आहे. >>>> father शब्द वाचुन अगदी शंकर्याची आठवण झाली. :-)))
|
दिनेश दुर्दैवाने मला तुमच्या होमपेजची अक्षरे दिसत नाहीत सर्व चौकोन चौकोन दिसताहेत. पण या पानावरचे लेखन पाहून खात्री पटली की दिनेश म्हणजे हितगुजला पडलेले इन्द्रधनुषी स्वप्न आहे.......
|
Vj1
| |
| Wednesday, April 05, 2006 - 9:28 pm: |
|
|
well DD ne maharashtrikarna mule amche anya bhasha shikanyache prayog baand karun takle. Gurati people used to do very good problems 'aao mari sathe' ha tyatla ek. Tyatle karsan chacha anik kuthlya tari kaki he parte aaj pun lakshat ahet. Hindi madhe mhanal tar 'phul khile hai gulshan gulshan' ek aflatoon hota. Tabasstum chya nakhachi sar sudhha (chimte ghenyat) karan kinwa simi la yet nahi. Tyat she was one of the seniormost mhanun tichya samor yayche mhanje lok tarkun asat. She was the only lady who had made Nazia Hasan to sing 2 lines without ANY accompaniment!! kay awaj ghasarla hota mhanun sangu. It would have sent her fans spiralling down. 'shwetambara' ' chimnrao anik gundyabhau', 'waryaearchi warat(pu la)' hya serials aaj chya sagalya serailwalyanna akadun dakhavyashya watat. Especially shwetambara was a REALLY good thriller. Tyatli Gaikwad mhanun ek character hoti. He did not have many dialogues but, such a powerful villian character ki kititari lok mhnaayche ki tyache dole phodle pahijet. K series madhe camera 50 wela ikde tikade phirvun jo effect navata to ha manus phakt close up madhe det ase. To top it all, Yakub Saiid ne DD chya saglya programme che khechnara program banavla hoa 'phool khile hai be mausam', 'vichitrahaar', etc. He had done it on programes produced by him also. Aplyach karyaramache vidamban karayala kharokharach AKKAL lagate. BBC chi Computers in early age warti ek chhan serial hoti. They had shown BIG music machines reading music out of a punch paper tape and playing instruments accordingly. 80 saali tyanni deskjet che principle dakhavle hote. Aso, gele te din gele, tyabarobar remote cha TV ala naik remote aplya hatatun poranchya hatat gela. asech mhanyache.
|
Vj1
| |
| Wednesday, April 05, 2006 - 9:34 pm: |
|
|
Sadhya bhartat jaal tar Alpha marathi warti ratri 11 la samvaad mhanun Mulakhhat lagate. awarjoon baghavi. tya mansache mala kautuk karavese watate ki kuthlya vishyatla tadnya manuns asel tari ha poorna tayarinishi prshna vicharto. mug vishay tatvadnyaan aso ki geology. punyatlya Eka tatvadnyanamadhlya vidushinchi mulakhat ghetana amhala tya bai kay bolat hotya he kilometer warun bouncer jaat astana ha manus tyanna tyat sudhha pratiprashna karto!! maja yete.
|
एशियाड बसेस चे स्पष्टीकरण आज कळले , बाकी सगळच छान!!!
|
Dineshvs
| |
| Thursday, April 06, 2006 - 12:56 pm: |
|
|
रॉबीन, ऊपमा चुकली. मायबोली आणि माझे मायबोलीकर, हे माझे प्रत्यक्षात साकार झालेले स्वप्न आहे.
|
Wakdya
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:23 pm: |
|
|
Dineshvs पुण्यात साधारणपणे ७३ च्या सुमारास प्रक्षेपण सुरु झाले, आमच्याकडे वडिलांनी ७४ मध्ये टीव्ही घेतला. आपले लेख वाचुन त्या सर्व वर्षातले दुरदर्शनचे स्वरुप पुन्हा डोळ्यांसमोर उभे केलेत, येवढा तपशील आणि अचुकता पाहुन आश्चर्य वाटते श्री. देसाईंप्रमाणे तुम्हीही पुस्तकाचा विचार करावात असे वाटते
|
Champak
| |
| Thursday, April 06, 2006 - 3:24 pm: |
|
|
हे आकाशवाणी चे मायबोली स्टेशन आहे, नंदकुमार कारखानीस आपल्याला बातम्या देत आहेत
|
मस्तच लिहिलय दिनेश तुम्ही. स्टार ट्रेक फ़ारस कळत नसूनही मी बघत बसायचे. फ़ास्टर फ़ेणे, गोट्या small wonder , wonder years न चुकवता बघितलेले कार्यक्रम्स.. thanks दिनेश. जुने दिवस आठवले वाट बघत आहे पुढच्या भागाची.
|
आकाशवाणी पुणे सुधा नरवणे आपल्याला बातम्या देत आहे... सदाशिव दिक्षीत, गोपाळ मिरिकर इन्दुमती काळे (या बाई धमक्या दिल्यासारख्या बातम्या द्यायच्या), तसेच अब आप देवकीनन्दन पान्डेसे समाचार सुनिये.... हे पाण्डे लेखकही होते आणि सध्या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेल्या विनोद पान्डेचे ते वडील.... द न्यूज रेड बाय पामेला सिन्ग, बरून हलदार, ......
|
Shyamli
| |
| Thursday, April 06, 2006 - 5:43 pm: |
|
|
दिनेशदा..... सगळे black&white चे दिवस आठवले... सुरवातिला तेच TV होते सगळ्यांकडे.... आणि माहेरपण ओघानिच
|
Polis
| |
| Friday, April 07, 2006 - 5:24 pm: |
|
|
आर वा एकदम बेश! पन आम्च्या बानं कधी tv घेतला न्हाई, परवडला न्हाई अन आमच आयुष्य गेल जोर बैठकात.. पन tv वर कधी पोलिसातील चान्गल्या गोष्टि न्हाई दाखवीत, ते एकच सुनील मोर्याच घेवून बसतात..
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|