|
| |
| Tuesday, December 20, 2005 - 2:22 am: |
|
|
मंगलमुर्ती रंगराज या, रंगमंदिरी गणराया भक्तजनांचे, भावभक्तीचे, या दुर्वांकुर सेवाया विषयाची विषबाधा हरुन, हे मधुभावक मोदक घ्या अमरवंदना, गजेंद्रवदना, असुरखंडना, संकटशमना सिंदुरशोभित, गौरिनंदना, सिद्धिविनायक सत्वर या मित्रानो, मायबोलिकरांचे ऊदंड प्रेम लाभलेला मी एक भाग्यवंत. ईथे आपुलिये सेवेसाठी हाजिर झालो आहे. तेंव्हा ईथे हक्काने मागणी करायची, आणि हट्ट पुरवुन घ्यायचे.
|
| |
| Thursday, December 22, 2005 - 4:00 pm: |
|
|
गुजराथी आणि मी. तु कुठला ? असा प्रश्ण जेंव्हा मला विचारला जातो, तेंव्हा मी मुंबईचा, हे उत्तर माझ्या तोंडातुन ऊस्फुर्तपणे बाहेर पडते. गेली अनेक वर्षे मी मुंबईत रहात नाही, तरिहि मुंबईशी नाळ अजुनहि तुटली नाही. रहात नसलो तरी नियमितपणे जाणे असतेच. मुंबई बदलते आहे. बदलणे हा तिचा स्थाईभावच आहे. चैतन्याने सतत सळसळत असते ती. तिच्या बदलण्यावर अनेक पुस्तके लिहिली गेलीत, पण तरिही एक अतिसामान्य मुंबईवासी म्हणुन मला जे जाणवले आणि नोंदवावेसे वाटते, ते ईथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. माझा जन्म मुंबईचाच. माझ्या आईची आजी सुईण असल्याने, माझ्या मोठ्या बहिणीचा आणि भावाचा जन्म तिच्या देखरेखेखाली झाला. मी मात्र हॉस्पिटलमधे जन्मलो. मालाडच्या स. का. पाटिल. हॉस्पिटलमधे. पुढे त्याचे नाव बदलुन पिरामल हॉस्पिटल झाले. हे हॉस्पिटल आणि आमचे घर यामधे फ़क्त एकच भिंत होती. ( धर्मंद्र, वहिदा रेहमान, जया भादुरी च्या फागुन सिनेमाचे शूटिंग या हॉस्पिटलमधे झाले होते. ) त्याचवेळी आमच्या परिसरात राहणार्या प्रफ़ुल शाह या गुजराथी मुलाचा जन्म झाला होता. मी लहनपणापासुन असा कट्टर शाकाहारी असल्याने, पफ़ुलनो भाय छे, दालभात खाय छे, असे मला चिडवत असत. माझे नावहि तसे गुजराथी वळणाचेच. निदान त्याकाळात तरी मराठी लोकात दिनेश नाव नव्हते, फ़ारसे. हल्ली आपण प्रद्युन्म, अमेय असे प्राचीन काळात शिरलो, तर ते कशिश, फ़ोरम, हेमल, पारुल, दक्षा अशी वेगळी वाट चोखाळते झालेत. सांगायचा मुद्दा असा, कि लहानपणापासुन माझी गुजराथी लोकांशी मैत्री होती. आणि मुंबईतल्या माझ्या पिढीतल्या प्रत्येकाचा हाच अनुभव असेल. मुंबई पुर्वी महाराष्ट्रात नव्हती. आताच्या गुजराथसकट ती मुंबई ईलाखा होती, त्यामुळे गुजराथी लोकांची वस्ती, आणि त्यांचा प्रभाव होताच. जेंव्हा मुंबई महाराष्ट्रात आली, तेंव्हा तेहि लोक ईथे मिसळुन गेले. त्यावेळी आशा पारेख, शर्मिला टॅगोर, गीता बालि या अभिनेत्रीनी खास मराठी पेहरावात फ़ोटो काढुन घेतले होते. ( ते मी नंतर बघितले. ) . या लोकांचे आणि मराठी लोकांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले. पुढे शिवसेनेने जसे लुंगी हटाव आंदोलन केले, तसे गुजराथ्यांविरुद्ध कुठलेहि आंदोलन झाले नाही. ते लोक कायम मिळुन मिसळुन असत. शिवाय नोकर्यांमधे त्याना रस नसल्याने मराठी लोकांशी संघर्षाचे काहि कारणच नव्हते. माझे नाशिक, कोल्हापुर, पुणे ईथे राहणारे गुजराथी मित्र हे त्या त्या गावची मराठी भाषाच बोलायचे. पण मुंबईत मात्र ते लोक गुजराथीच बोलत असत. त्यामुळे हि भाषा पण आम्हाला सरावाने येतच असे. त्याकाळी दुकान आणि स्टेशनवरच्या पाट्या पण गुजराथीमधे असत, त्यामुळे अक्षरओळख हि असेच. आम्हि देवनागरी शिकलो ते त्या लिपीबरोबरच. त्यांचा क आपल्या ड सारखा, त्यांचा ज आपल्या भ सारखा, अशी तुलना करतच. हिंदीपेक्षा तिच भाषा जास्त सरावाची होती आम्हाला. शिवाय शाळेत अक्षरांवर रेघ काढली नाही, कि गुजराथी आहेस का ? असे विचारत असत. मराठी आणि गुजराथी यांचे सहजीवन, खरोखरच मैत्रीपुर्ण होते. आज विचार करताना, एकेक छोट्या छोट्या गोष्टी आठवताहेत. गुजराथी जरी खुप असले, तरी गुजराथी पदार्थ मिळणारी हॉटेले फ़ार नव्हती. त्यामुळे गुजराथी पदार्थ खायचे ते त्यांच्याकडुन बश्या आल्यानंतरच. किंवा त्यांच्या घरी गेल्यानंतरच. आणि असे येणेजाणे देवाणघेवाण असायचीच. मला पुर्ण शाकाहारी बनवण्यात, गुजराथी पदार्थांचे मोठे योगदान आहे. त्याकाळी चक्कीवर ढोकळ्याचे मिश्रण वेगळे दळुन मिळायचे. त्याचा खास वेगळा दर आणि वेगळ्या वेळा पण असायच्या. आपल्या भाजणीच्या खटाटोपापेक्षा हा कारभार झटपट असायचा. गुजराथी बायका जितक्या बोलघेवड्या तितक्याच कामसु पण असतात. त्यांच्या घरी जेवणाचे नाना प्रकार तर असतातच पण आठ दहा प्रकारची लोणची देखील असतातच. एवढे करुन त्या बायका दुपारच्या वेळात, पापड लाट, भरतकाम कर, मगज सोलुन दे, बांगड्या रंगव असे ऊद्योग करतच असत. ते लोक भाज्यांच्या बाबतीत फ़ार चोखंदळ असतात. आजहि ग्रॅंट रोड, पार्ले, घाटकोपर, मुलुंड या भागात उत्तम प्रतीच्या भाज्या मिळण्यामागे, त्यांचे तेथील वास्तव्य जास्त कारणीभुत आहे. अनेक छोटी छोटी दुकाने, तेच लोक चालवत असत. तिथेहि त्यांचे संभाषण चातुर्य अनुभवायला मिळेच. आमच्याशी ते आवर्जुन मराठीतच बोलत. त्यांच्या बोलण्यात काहि गुजराथी शब्द डोकावायचेच. अगदी सहजहि त्यांच्या घरी गेलो, तर गेल्याबरोबर पाणी, मग मसाला घातलेला चहा किंवा कॉफ़ी आणि शेवटी बडिशेप समोर येणारच. आपल्या घरी पण आलेल्याला सर्वप्रथम पाणी न मागता दिलेच पाहिजे, असा आग्रह मी धरु लागलो. आज हे विचित्र वाटेल, पण त्याकाळी मुंबईतल्या मराठी लोकांकडे, पाणीहि मागावे लागायचे. त्यांचे आणि आपले सण फ़ार वेगळे नाहित. पण लहानपणच्या नवरात्रीच्या आठवणी अजुन मनात आहेत. डोक्यावर रंगीबेरंगी मडक्यात दिवा घेऊन, त्या मुली घरोघर जात असत. आणि रात्री बहुतेक ईमारतीखाली गरबा रंगत असे. त्यावेळी लाऊडस्पीकर पण नव्हतेच. मध्यभागी अंबामातेची पुजा, एखादा ढोलकीवाला, खड्या सुरात गाणारा एखादा गायक, एवढेच पुरत असे. आम्ही अगदी मनापासुन त्यात सामिल होत असु. त्यावेळी ना कपड्यांचे प्रदर्शन असायचे, ना ऑर्केश्ट्राचे संगीत. लताचे, मै तो भुल चली बाबुलका देस, सोडले तर ईतर फ़िल्मी गाणी पण नसायची. मध्यभागी ऊभ्या असणार्या एकाने ओळ म्हणायची आणि ती बाकिच्यानी रिपीट करयची. लहानमोठे, स्त्रीपुरुष असा भेदभावच नसायचा. मराठी घरातल्या, अश्विन शुद्ध पक्षी अंबा, बैसली सिंहासनी हो, प्रतिपदेपासुन घटस्थापना ती करुन हो, ब्रम्हा विष्णु रुद्र, ब्रम्हा विश्णु रुद्र आईचे पुजन करिती हो, ऊदो बोला, ऊदो अंबाबाई माऊलीचा हो ऊदोकार गर्जती, काय महिमा वर्णु तिचा हो या आरतीनंतर, खंबा म्हारा नंदजीना लाल, असे सुर सहज ऐकू यायचे. त्याकाळी टिपर्यापण नव्हत्या, नुसत्या टाळ्यांचाच ताल होता. पण खुप मजा यायची. सयाजीरावांच्या काळापासुन आमचे बरेचसे नातेवाईक, बडोदा, भावनगर ला स्थाईक झाले आहेत. ( त्यामानाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर बाकि कुठे आमचे नातेवाईक नव्हते. ) गुजराथमधे जायला मला मनापासुन आवडायचे. प्रवास पण रेल्वेचा, घाट वैगरे नाहीत. ( मी लहानपणी घाटांचा फ़ार धसका घेतला होता. ) . पुर्वी ते सगळे मराठी बोलत असत, पण आता मात्र ते फ़क्त गुजराथीच बोलतात. तिथे गेल्यावर माझी चंगळ असायची. त्यांचे जेवण तेलकट असले तरी मसाले फ़ारसे नसत. आणि जेवणात भरपुर पदार्थ असत. दुधदुभत्यांच्या पदार्थांची लयलुट असायची. तुप पण सढळ हाताने वाढत असत. दुरदर्शनवर पहिल्यांदा मराठीबरोबर गुजरथीला पण तेवढाच वेळ दिला जात असे. आज मला हा स्नेहभाव कुठेतरी आटल्यासारखा वाटतोय. कुठली घटना घडलीय असे नाही, किंवा असा थेट प्रयत्न होतोय असेहि नाही, पण हा दुरावा वाढत चाललाय हे नक्की. जसे मराठी लोकाना मुंबईत असुरक्षित वाटते, तसे त्यानाहि आता वाटतेय. त्यांच्या वेगळ्या वस्त्या आता वसु लागल्या आहेत. पुर्वी जैन लोकांचा प्रभाव तितका नव्हता, तोहि आता जाणवु लागला आहे. त्यांचाहि आता नोकर्या करण्याकडे कल वाढु लागला आहे. त्यांची क्षेत्रे वेगळी असली, तरि थोडीफ़ार स्पर्धा आहेच. जसा बेळगावबाबत वाद आहे तसा डांग जिल्ह्याबाबत पण एकेकाळी होता. आता तसा वाद नसला, तरी मुंबईवर त्यांची पकड जरा घट्ट व्हायला लागली आहे. पुर्वी दुकानाच्या पाट्याच नव्हे तर स्टेशनची नावे पण गुजराथीमधे लिहिलेली असायची. आता तसे ठळकपणे कुठे जाणवत नाही. पण मुंबईतले काहि भाग एकदम परके वाटु लागले आहेत आता. चित्रलेखा, हे मुळ गुजराथी साप्ताहिक. त्याची मराठी आवृत्ती निघायला लागली. द्यानेश महाराव संपादक होते, ( एका तत्वनिष्ठेने चालवले जाणारे हे साप्ताहिक आहे, चाटे कोचिंग क्लासेसच्या जाहिराती चित्रलेखाने कधीच छापल्या नाहित. भविष्य सुद्धा छापले जात नाही. ) या साप्ताहिकातहि कधी गुजराथी मराठी भेदभाव दिसला नाही. पण तरिही, आपण हल्ली दुरावत चाललोय असे जाणवायला लागले आहे. मुंबईचा पहिलावहिला सांधा आता असा खिळखिळा झालाय.
|
| |
| Wednesday, December 28, 2005 - 4:12 pm: |
|
|
मुंबई आणि रेल्वे. बाहेरगावाहुन मुंबईला येणारे लोक मुंबईत सगळ्यात जास्त धसका घेत असतील तर तो आमच्या ट्रेन्सचा. जसे माश्यांच्या पिल्लाना पोहणे शिकवावे लागत नाही, ( किंवा पुणेकराला दुचाकि, म्हणजे त्यांच्या भाषेत गाडी, चालवणे शिकवावे लागत नाही. ) तसे आम्हा मुंबईकराना ट्रेन्समधे घुसणे शिकवावे लागत नाही. १८५३ साली भायखळा ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली. नाही, नाही माझा जन्म त्यापुर्वी नाहि झालेला. पण माझ्याच आयुष्यात रेल्वेबाबत अनेक बदल झाले, त्याचा हा आढावा. ( या लेखाला तितकेसे ऐतिहासिक महत्व नाही, कारण दिनांक बारा मर्च एकोणीसशे सत्त्याण्णव साली सकाळी ठिक नऊ वाजुन तेवीस मिनिटानी, असे नेमके संदर्भ मला देता येणार नाहीत. हि आहेत केवळ वैयक्तिक निरिक्षणे. ) ज्याना माहित नाही अश्यांसाठी प्राथमिक माहिती. मुंबईत मुख्य दोन रेल्वे लाईन्स आहेत. एक आहे पश्चिम रेल्वे आणि दुसरी मध्य रेल्वे. मुळ देशांतर्गत विभागातर्फेच या लोकल्स चालवल्या जातात. पश्चिम रेल्वेचे मुख्य ठाणे आहे चर्चगेट. तिथुन विरारपर्यंत हि सरळ लाईन आहे. पुढेहि डहाणुपर्यंत काहि गाड्या जातात. दुसरी आहे मध्य रेल्वे. तिचे मुख्यालय आहे छत्रपति शिवाजी टर्मिनस म्हणजेच पुर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस. ईथुन दोन मुख्य लाईन्स निघतात. मेन लाईन, भायखळा, दादर, कुर्ला, ठाणे मार्गे कल्याणपर्यंत जाते. ठाणे ते डोंबिवली दरम्यान एक फाटा पारसिक बोगद्यातुन जातो तर दुसरा मुंब्राहुन जातो. कल्याणला या लाईनला दोन फाटे फ़ुटतात. एक उल्हासनगर, बदलापुर, अंबरनाथ, नेरळ मार्गे कर्जतला आणि तिथुन पुढे पुण्याला जातो. कर्जतहुन खोपोलीला पण एक फाटा जातो. कल्याणहुनचा दुसरा फाटा, शहाड, टिटवाळा, आसनगाव मार्गे कसारा आणि पुढे नासिक रोडला जातो. सी एस टी पासुन आणखी एक लाईन निघते, ती हार्बर लाईन, ती डॉकयर्ड रोड, रे रोड, शिवडी वडाळा अशी जाते. वडाळ्यालगत रावोली जंक्शनला तिला दोन फाटे फ़ुटुन, एक किंग्ज सर्कल वरुन वांद्र्याला जातो, तर दुसरा चुनाभट्टीमार्गे कुर्ल्याला जातो. कुर्ल्याहुन तो फाटा पुढे चेंबुर, वाशी, नेरुळ असे करत पनवेलपर्यंत जातो. ठाणे हुन हल्लीच थेट वाशीमार्गे पनवेलपर्यंत गाड्या सुरु झाल्या आहेत. डोंबिवली जवळच्या दिवा या स्टेशनजवळुन वसईपर्यंत मार्ग आहे, आणि त्यामुळे पश्चिम आणि मध्य लाईन्स जोडल्या गेल्या आहेत. दादर हे कॉमन स्टेशन असले तरी तिथे हे मार्ग एकमेकाना छेदत नाहीत. पस्चिम आणि मध्य रेल्वे मधे नेहमीच एक स्पर्धा असते. वक्तशीरपाणाची आणि भोंगळ कारभाराची देखील. पण कितीहि भोंगळ कारभार असला तरी, या रेल्वे म्हणजे, मुंबईच्या रक्त्वाहिन्याच आहेत. १९७२ वैगरेला मे महिन्यात दोन्ही गाड्यांचा संप झाला होता, तो साधारण ८ दिवस चालला होता. त्या नंतर मात्र रेल्वे ईतक्या प्रदिर्घ काळासाठी कधीहि बंद पडली नाही. लहानपणी मालाडला वास्तव्य आणि मग पुढे कुर्ल्याला राहणे झाल्यामुळे, दोन्ही रेल्वेंवर भरपुर प्रवास झाला. या दोन्ही लाईन्स दक्षिणोत्तर जात असल्याने, प्रत्येक स्टेशनचे दोन भाग असतात. एक पुर्व आणि दुसरा पश्चिम. त्यामुळे मुंबईकरांच्या पत्त्यात हे पौर्वात्य आणि हे पाश्चिमात्य असे भेद असतातच. मुंबईतले बहुतेक भुभाग असे स्टेशनशी निगडीत असतात. दादर हे जसे कॉमन स्टेशन तसेच माहिमहि. माटुंगा हे मध्य रेल्वेचे तर माटुंगा रोड हे पश्चिम रेल्वेचे. परेल मध्य रेल्वेचे तर लोअर परेल पश्चिम रेल्वेचे. पण ही दोन्ही स्टेशने संलग्न नाहीत. परेल ला एलफिस्टन रोड जवळचे आहे. नायगाव हे परेल जवळच्या एका भागाचे नाव तर वसईजवळच्या स्टेशनचे देखील हेच नाव आहे. पश्चिम रेल्वेचा पुर्वी जरा रुबाब होता. एक तर हि सरळसोट लाईन होती व आहेहि. शिवाय त्याकाळी लोकवस्ती अगदी कमी होती. अंधेरीला तर बहुतेक गाड्या रिकाम्या होत असत. आम्ही मालाडला ऊतरलो कि बोरिवली गाडी जवळ जवळ रिकामीच जात असे. विरार लोकलमधे बसले कि दहिसर, मिरा रोड, वसई वैगरे स्टेशन्स गावासारखी भासत. वसईला आमचे खुप येणेजाणे असायचे. वसईच्या स्टेशनच्या आजुबाजुला भरपुर मोकळी जागा होती. खरे म्हणजे ते स्टेशन वसई रोड असे होते, त्यामुळे गावात जायला एस्टीने जावे लागे. मुंबईत तांदळाचा तुटवडा होता तेंव्हा वसईहुन तांदुळ आणत असु आम्ही. भाजीपाला पण वसईचा असायचा. खांद्यावर कावड घेतलेले वसईचे भाजीवाले, त्याकाळी फ़ार फ़ेमस होते. वसईची केळी पण प्रसिद्ध होती. तिथे लाल सालीची केळी मिळत असत. आता तर ती दिसेनाशीच झाली आहेत. तसेच विरारची सुकेळी, म्हणजे सुकवलेली केळी पण एक खास मेवा होता. स्टेशनच्या दोन्ही बाजुला पुर्वी भाजीवाले बसत असत. अजुनहि हा शिरस्ता आहे, पण आता त्यात रिक्षा आणि बस वैगरेचे तळ पण आलेत. त्यामुळे रोजचा भाजीपाला आणण्यासाठी स्टेशनपर्यंत जाणे ओघाने आलेच. त्यावेळी नोकरी करणार्या बायका कमी असत. पण तरिही स्टेशनहुन येताना भाजीपाला आणणे हा बहुतेकांचा दैनंदिन कार्यक्रम असायचा. बहुतेक स्टेशनवर दोन पुल आहेत. एक असतो रेल्वेचा आणि दुसरा असतो म्युनिसिपालिटीचा. रेल्वेच्या पुलावरुन फ़क्त प्रवाश्यानाच जाता येते. हे पुल दोन्ही बाजुना मुख्य रस्त्याना जोडतात. जर एकापेक्षा जास्त रस्ते असतील आणि गर्दी असेल तर दोन तीन पुल असतात. शक्यतो हे पुल फ़क्त दोन बाजु जोडतात पण काहि खास ठिकाणे, जसे चर्नी रोड, बांद्रा या ठिकाणी त्याना स्टेशनबाहेर काहि फाटे फ़ोडलेले आहेत. रेल्वेच्या पुलावर फ़ेरीवाले तुलनेने कमी असतात आणि म्युनिसिपालिटीचा पुल त्याना आंदणच दिलेला असतो. डोंबिवलीच्या पुलावर गायी म्हशी पण आपला हक्क सांगतात. यापैकी काहि पुलांचे बांधकाम माझ्या डोळ्यांसमोर झाले. त्यापुर्वी अनेक ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग्ज होती. एक मोठे काळेपिवळे फ़ाटक, असायचे. फ़ाटक बंद झाले तरी पादचारी जातच असत. मग मात्र हि फ़ाटके हळु हळु बंद पडली. तरिही जी तुरळक आहेत, ती अजुनहि वाहतुकीचा खोळंबा करतातच. मुंबईतल्या अनेकजणांचे भेटायचे ठिकाण बहुदा इंडिकेटरच्या खाली असे असते. पण पुर्वी हाताने फ़िरवायचे इंडिकेटर होते. एका पांढर्या ऊभट बोर्डावर गाडीची माहिती असायची. वरती पितळी काट्याचे हाताने फ़िरवायचे घड्याळ असायचे. प्रत्येक स्टेशनच्या नावाने एक चौकोनी दांडा आडवा बसवलेला असायचा. ज्या स्टेशनवर गाडी थांबणार नाही, ती नावे दिसतील असा तो दांडा फ़िरवायचा. त्यावेळी फ़ास्टच काय, एकुणच गाड्या कमी असल्याने, तो इंडिकेटर बघुन ईच्छित जागी ऊभे राहणे सहज जमत असे. त्यावेळी तिकिट विंडोजवळ तारेच्या झाकणाच्या कपाटात मोठे टाईमटेबल लावलेले असायचे. ते बघुनच लोक स्टेशनवर जात असत. मग हळु हळु एलेक्ट्रिकल इंडिकेटर सगळीकडे लावण्यात आले. पुर्वी ते ट्युबलाईटवाले असायचे. रात्रीच्या अंधारात ते दुरवरुन नीट दिसत नसत. लाल रंगाची दिसु येण्याची क्षमता बरीच जास्त असल्याने, मग आकडे, आणि काहि कोड नम्बर्स लाल रंगात दिसु लागले. हे कोड असायचे गंतव्यस्थान दाखवणारे. हा गंतव्यस्थान शब्द पण रेल्वेचाच. हे कोड माहित असणे म्हणजे आम्हाला भुषणावह होते. शक्यतो ते स्टेशनच्या नावानुसारच असायचे. पण त्यात काहि तडजोडी कराव्या लागल्या. ऊदा कल्याणसाठी के वापरला म्हणुन कुर्ल्यासाठी सी वापरावा लागला. शिवाय कर्जत आणि कसारा ही पण के वरुनच सुरु होणारी नावे. मग कर्जतसाठी एस आणि कसार्यासाठी एन अक्षर वापरले जाऊ लागले. ते अनुक्रमे साऊथ आणि नॉर्थ या दिशांमुळे. पुर्वी मोजकीच गंतव्यस्थाने होती. पश्चिम रेल्वेवर बांद्रा, अंधेरी, बोरिवली आणि विरार. पण नंतर मात्र जसजशी वस्ती वाढत गेली तसतशी, अनेक नवीन गंतव्यस्थाने निर्माण झाली. माझ्या लहानपणीहि लोक दादरला खरेदीसाठी येत असत, त्यामुळे परत येताना, संध्याकाळच्या वेळी चर्चगेटवरुन आलेली गाडी कुटुंबासकट पकडणे अवघड होवुन जायचे. मग त्यावर ऊपाय आणि मागणी म्हणुन दादर लोकल्स सुरु करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेवर हि सोय खुप आधीपासुन होती. मध्य रेल्वेने मग खास ज्यादा प्लॅटफ़ॉर्म बांधला. मध्य रेल्वेचा पसारा जास्तच वाढल्याने तिथली गंतव्यस्थाने पण भरपुर वाढली आहेत. पुर्वी हार्बर लाईनचा कुर्ल्याहुन सुटणारा फाटा मानखुर्द पर्यंतच होता. कुर्ला मानखुर्द शटल पण असायच्या. त्यासाठी कुर्ल्याला नऊ आणि दहा नंबरचा खास प्लॅटफ़ॉर्म होता. आता हि शटल बंद झाल्याने, हा प्लॅटफ़ॉर्म बेवारशी पडला आहे. हिच लाईन मग पनवेल पर्यंत वाढवली. वाशी, नेरुळ, बेलापुर, जुईनगर, खांडेश्वर अशी स्टेशन्स जसजशी होत गेली तसतशी हि लोकल तिथपर्यंत जाऊ लागली. पण हे फ़क्त लोकलचेच स्टेशन आहे. कोकणरेल्वेच्या गाड्या मात्र, ठाणे, दिवा वरुन पनवेलला येतात. या लाईनवरची स्टेशन्स बांधताना फ़ार सुरेख बांधली आहेत. भरपुर मोठे आवार, पार्किंगची जागा, दुकाने अशी सगळी व्यवस्था आहे. या स्टेशन्समधे शिरणारी लोकलगाडीच बापुडवाणी दिसायला लागते. पण ज्या प्रमाणात या स्टेशन्सवरची लगबग अपेक्षित होती, त्या प्रमाणात ती दिसत नाही, त्यामुळे या जागेचा पुर्ण क्षमतेने वापर होत नाही. या लाईनवरचा वाशी खाडीवरचा पुलहि भराभर बांधण्यात आला. आता ठाण्यावरुनहि काहि मोजक्या गाड्या, कोपर खैराणे, वाशी मार्गे पनवेलला जातात. हि लाईन पुर्ण झाली होती तरी लोकल चालु व्हायला बराच काळ जावा लागला. या लाईनवरची स्टेशन्स पण अत्यंत देखणी आहेत. हे सगळे बांधकाम माझ्या डोळ्यासमोरच झाले. बाकि बहुतेक स्टेशन्स हि एकाच साच्यातुन काढलेली असली तरी, या लाईनवरचे मात्र प्रत्येक स्टेशन वेगळ्या डिझाईनचे आहे. अश्या तर्हेने पनवेल आता वेगेवेगळ्या मार्गानी मुंबईशी जोडले गेलेय. पुर्वी म्हणजे खाडी पुल व्हायच्या आधी पनवेलला ठाणे कळवा मार्गे जावे लागायचे. त्यावेळी ते फ़ारच दुर वाटायचे. प्रवासाला दिडदोन तास लागत असत. पुर्वी ठाण्याहुन पण हार्बर लाईनने व्हीटीला गाडी होती. आता मात्र अशी गाडी नाही. हार्बर लाईनवर फ़ास्ट गाड्या नाहीत. पुर्वी या लाईनवर खरीखुरी बंदरे होती. बोरिबंदर, दाणाबंदर, रेतीबंदर, ब्रिकबंदर, अशी खरीखुरी बंदरे अजुनहि आहेत. फ़क्त तिथली ऊलाढाल आता कमी झाली आहे. माझ्या काकी, या लाईनवर मानखुर्द ते व्हीटी असा नियमित प्रवास करायच्या, त्या म्हणायच्या या लाईनवर, नुसत्या वासाने स्टेशन्स ओळखते मी. ईथल्या बहुतेक स्टेशन्स ना एक खास गंध आहे. मस्जिदला हिंग आणि मसाल्याचा, डॉकयार्ड रोडला ओल्या माश्यांचा, रे रोड ला शेंगदाण्याचा, शिवडी वडाळ्याला सुक्या माश्यांचा, चुनाभट्टीला ( पुर्वी ) हातभट्टीच्या दारुचा, चेंबुरला दुधाचा असे वास आहेत. कुर्ला आणि चेंबुरमधे पुर्वी स्टेशन नव्हते, आता तिथे टिळकनगर स्टेशन झालेय. तसेच हि लाईन बर्याचवेळा वरुन खालुन जाते. म्हणजे कॉटन ग्रीन, किंग्ज सर्कल, अपर डॉकयार्ड रोड सारखी काहि स्टेशन्स वरती आहेत तर काहि खालती. वडाळ्याचा फ़्लायओव्हर पण माझ्याच डोळ्यासमोर बांधला गेला. या दोन्ही लाईनवर प्रवास करणारे प्रवासी पण वेगवेगळे. हारबरवरती जास्त करुन ईंडष्ट्रीज होत्या. पुर्वी कुर्ल्याहुन व्हीटीपर्यंतचा पास दोन्ही लाईनवर चालायचा, आता मात्र घेतानाच तो कुठल्या लाईनवर वापरणार ते सांगावे लागते. या लाईनवर काहि अवघड नावाची स्टेशन्स आहेत, पण त्यांची व्यवहारातली नावे वेगळीच आहेत. गुरु तेग बहद्दुर नगर नावाच्या स्टेशनला सायन कोळीवाडा असेच म्हणतात, आणि सॅंडहर्स्ट रोडला बहुतेक सगळे संडास रोडच म्ह्णतात. किंग्ज सर्कलला खुपजण तीन सर्कल म्हणतात. मेन लाईनवर असा गोंधळ सायन स्टेशनबद्दल आहे. सायनचे मुळ नाव शीव. पुर्वी ती मुंबईची हद्द होती. पण त्याचा ब्रिटिश उच्चार सायन झाला, आणि अजुनहि तोच वापरात आहे. शीव तिकिट मागितले, तर तो बाबु झींट येऊन पडेल. मुंबईच्या तिकिटाच्या रांगा या मी लहानपणापासुन बघत आलेला सोहळा आहे. त्या खिडकीचा तोंडावळा आजहि तोच आहे. त्याच्यासमोर असणारे ते तारिख घालणारे मशीन तर शिवाजीच्या वेळेपासुन असल्यासारखे आहे. एखाद्या स्टेशनपासुन दोन्ही दिशेने जाणार्या ठराविक स्टेशनपर्यंतची तिकिटे, बटन दाबल्याबरोबर प्रिंट होवुन यायची सोय मात्र अलिकडची. तरिही लांबचे टिकिट मात्र जुन्या पद्धतीचेच मिळते. खिडक्या वाढवल्या तरी रांगा अजिबात कमी होत नाहीत. पुर्वी आम्हाला कुठे जायचे असेल तर आधी कुणालातरी पाठवुन तिकिटे काढायला लागत. या रांगावर ऊपाय म्हणुन कुपन पद्धत अवलंबली गेली. पण ती कुपन्स व्हॅलिडिएट करुन घ्यावी लागतात. आणि ती मशिनस म्हणजे एक जोकच झाला होता. तिथली खेळणारी मुले, सदोदित त्या मशिन्सशी खेळत असायची. आता ते गाडं जारा सुरळीत चालु लागलय असे दिसते. तरिही या कुपन्सवर लोकांचा फ़ार विश्वास आहे असे अजुनहि वाटत नाही. कारण फ़ारच कमी लोक ती वापरताना दिसतात. साधारण १९८३ साली तिकिटाचे दर पुर्ण रुपयात झाले, त्यापुर्वी तीस पैसे, चाळीस पैसे अशी तिकिटे असत. पण त्यावेळीदेखील, सहसा तिकिट खिडकिवर सुट्या पैश्यांचा प्रश्न फ़ारसा तीव्र नव्हता. कधी कधीच सुटे घेऊन यायला सांगितले जाते. तिकिटांच्या लाईनमधे ऊभे असल्यावर, पटकन ती खिडकि हिसाबके लिये बंद होने, हे अगदी नित्याचे. खरे म्हणजे प्रत्येक खिडकिची बंद व्हायची वेळ त्यावर लिहिलेली असते, पण रांगेच्या शेवटी ऊभ्या राहणार्याला ती कशी दिसणार ? अश्यावेळी अख्खी रांग दुसर्या रांगेत कशी विलिन होते, किंवा आतापर्यंत बंद असलेली खिडकि एकदम ऊघडल्यावर त्यापुढे निमिषार्धात कशी लाईन निर्माण होते, हे प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडणारे चमत्कार आहेत. लाईनीत ऊभे राहणारे आणि लाईनीत नसलेले असे सरळसरळ दोन तट पडलेले असतात. लाईमधे घुसणार्याला, किंवा त्यातल्या एखाद्याला पैसे देऊन तिकिट काढ म्हणुन सांगणार्याला रांगेतले सगळे कसे टोचुन खातात, तेहि ऐकण्यासारखे आहे. एखाद्याने निगरगठ्ठपणा केलाच तर तिकिटवाला बाबु पण असहकार पुकारतो. जर दोघे तिघे एकत्र प्रवास करत असतील तर दोघानी एकाचा रांगेत ऊभे राहण्यापेक्षा, दोन लाईनीत ऊभे राहुन दोन्ही डगरीवर पाय ठेवतात. अपुर्ण.
|
| |
| Friday, December 30, 2005 - 4:40 pm: |
|
|
रेल्वेच्या डब्यात फ़ार मोठे बदल झाले नाहीत. बाह्यावतार फ़ारसा बदलला नाही. अगदी पुर्वी तीन डब्यांच्या गाड्या होत्या, त्या मी बघितल्या नाहीत. मी पुर्वीपासुन नऊ डब्यांच्याच गाड्या बघत आलोय. २५ वर्षांपुर्वी १२ डब्ब्यांच्या गाड्या रुळावर आल्या. या गाड्याना स्टेशनवर थांबता यावे म्हणुन अनेक ठिकाणी प्लॅटफ़ॉर्मची लांबी वाढवावी लागली. मस्जिद स्टेशनला ते जरा अडचणीचे ठरत होते, म्हणुन तिथे १२ डब्ब्यांची गाडी दोन वेळा थांबवत असत. का ते माहित नाही, नऊ डब्यांच्या गाड्या अजुनहि वापरात आहेत. या दोन रेकमधे डब्यांचा क्रम थोडा वेगळा आहे. त्यामुळी ईंडिकेटरवर ९ आकडा आहे का १२ आकडा आहे, हे बघुन आम्ही पोझिशन्स घेतो. बाहेरुन आलेल्या माणसांच्या लक्षात हे पटकन येत नाही. गाड्यांच्या समोरच्या भागात तशी पाटीहि असते, आणि तशी अनाऊंसमेंट सुद्धा केली जाते. या अनाऊंसमेंट हा पुर्वी एक गमतीचा प्रकार होता. एकतर तो लाईव्ह प्रकार असायचा, म्हणुन जो कोणी या अनाऊंसमेंट करत असायचा तो जाम कावलेला असायचा. त्यावेळी पावसाळ्यात गाड्या हमखास बंद पडायच्या, आणि मग आम्हा सगळ्याना काय झालय ते जाणुन घ्यायचे असायचे. आणि अपुर्या संपर्कसाधनांमुळे त्यानाहि नीटशी माहिती नसायची. मग ते चक्क, आनेवाली गाडीया देरीसे आनेके कारन, जानेवाली गाडीया देरीसे जा रहि है, असे सांगत रहायचे. एखादा कविमनाचा असेल तर, दुरदुरतक कोई गाडी नजर नही दिखायी दे रहि है, असेहि म्हणत रहायचा. त्यावेळी ईंडिकेटरवर पण सर्व्हीस डिसऑर्गनाईझ्ड किंवा गाडीया अस्तव्यस्त है, अशी पाटी असायची. पुढे हा प्रकार थांबला, आता बिघाडाचे नेमके स्थान आणि कारण सांगितले जाते. आम्ही कॉलेजमधे असताना मुलीच्या आवाजात अनाऊंसमेंट सुरु झाल्या. दिसणारी प्रत्येक तिसरी मुलगी, सुंदर वाटायच्या दिवसात, त्या आवाजाची मालकीण कोण, हे आम्ही डोकावुन बघत असु, शिवाय माटुंग्यासारख्या गावंढ्या स्टेशनवर ईतका सुंदर आवाज असलेली मुलगी, आपले टॅलेंट वाया का घालवतेय, असेहि वाटायचे, आणि ईतक्या रात्रीपर्यंत का हिला थांबवुन ठेवतात, असे वाटुन तिची काळजी पण वाटायची. पण ती मुलगी काहि कधी आम्हाला दिसली नाही. मग हळुहळु असे लक्षात यायला लागले कि, प्रत्येक स्टेशनवरच्या मुलीचा आवाज तसाच आहे, आणि मग हेहि लक्षात आले कि, ते सगळे प्री रेकॉर्डेड आहे म्हणुन. गाड्यांच्या टाईमटेबलच्या डेटाबेसवरुन या घोषणा दिल्या जातात. हे सगळे शब्द, आधीच रेकॉर्ड केलेले आहेत. पण या शब्दात जी लय आणि सलगता असायला हवी, ती नाही. नीट लक्ष देऊन ऐकले तर या मुलीचा प्लॅटफ़ॉर्म नंबर एक वर येणारी गाडी, मधला वर या शब्दावर अकारण दिलेला जोर नीटच जाणवेल. काहि स्टेशनवर, स्थानिक कलाकाराना वाव म्हणुन, प्रत्येक घोषणेपुर्वी ढॅन्टढॅ म्युझिक वाजवत असत. आता तो प्रकार बंद झालाय. डब्याच्या दरवाज्यातला आडवा दांडा हा अनेकजणांचा आधार असतो. त्याला एकदा हात लागला, कि पंढरपुरच्या गरुडखांब दिसल्याईतका आनंद होतो आम्हाला. सगळ्यांचे हात लागुन लागुन, त्याला कुठल्याहि केमिकल प्रोसेसने येणार नाही, अशी चमक आणि गुळगुळीतपणा आलेला असतो. दब्याच्या बाजुच्या पार्टिशनला जो आडवा दांडा असतो, तो पुर्वी खाली म्हणजे तीन फ़ुटावर असायचा. तिथे गर्दी झाली कि तिथे ऊभे असलेले त्या दांड्यावर चेपले जाऊन, त्यांची गैरसोय व्हायची. मग तो दांडा तिथला काढुन वर म्हणजे सहा फ़ुटावर बसवला गेला. लोकलच्या दरवाज्यात महाभारत आणि सीटवर रामायण घडत असते. आधी दरवाज्यातले महाभारत बघु. त्या दरवाज्यात एकुण पाचजण माऊ शकतात. जणु पाच पांडवच. गाडी ज्या दिशेने जात असेल, तिथली पहिली जागा हि खास महत्वाची. ती जागा पकडण्यासाठी आम्ही जीव टाकतो. तिथे ऊभे राहणे जरा सुरक्षित असतेच, शिवाय हवा पण छान लागते. शिवाय त्याबाजुला जरी स्टेशन आली, तरी या माणसाला ऊतरायचे नसताना जबरदस्तीने ऊतरावे लागत नाही, आधी ८० टक्के बाहेर असलेले शरिर स्टेशन आले कि आणखी १५ टक्के बाहेर काढले कि झाले. पण हाताची पकड मात्र सोडायची नाही. स्टेशनवर नव्याने चढणारे पण या जागेवर नजर ठेवुन असतात. ऊतरणार्याची देहबोली त्याना बरोबर कळते. हि देहबोलि जर त्याच्या मागच्याला कळली किंवा त्याने विचारुन घेतलेले असले, कि या जागेवर त्याचा क्लेम राहतो. म्हणजी हि जागा युधिष्ठिराची. या जागेवरुन ईतरांशी गप्पा मारणे फ़ार सोयीचे होते. सिग्नल आहे कि नाही, पुढे काहि प्रॉब्लेम आहे का, हे याला पहिल्यांदा दिसते. ( डब्याच्या वर पेंटोग्राफ असेल तर त्याचा फ़ुगवटा ईथे असतो. त्यावेळीच फ़क्त हि जागा गैरसोयीची असते. ) त्यानंतर मह्त्वाची जागा असते ती, मधली. हा मधला खांब कोपरात धरला कि पुर्ण शरिर नाहेर झोकता येते. या जागेचा एक गैरफायदा म्हणजे, आलेल्या स्टेशनवर ऊतरावेच लागते. तसे ऊतरले नाही तर त्याचा गणपति बप्पा होतो. चतुर लोक ऊतरुन परत ती जागा मिळवु शकतात. एकदा त्या खांबाला हात घातला, आणि त्या खांबासमोर पाय रोवला, कि त्याचा हक्क सगळे मान्य करतात. शिवाय मधे खांब असल्याने, गाडीत शिरणारे त्याला बाजुला हो म्हणु शकत नाहीत. हि जागा भीमाची. तिसरी महत्वाची जागा, म्हणजे शेवटची. याला पण ऊलट्या हाताने, पार्टिशनवरच्या दांड्याचा आधार घ्यावा लागतो. या माणसालाहि प्रत्येक स्टेशनवर ऊतरावेच लागते. हातात सामान असेल तर युधिष्ठिराची जागा जास्त योग्य. काहि जण गाडीच्या विरुद्ध दिशेला तोंड करुन, या जागेचा फ़ायदा करुन घेतात. पण ते सगळ्याना जमते असे नाही, हि जागा अर्जुनाची. यांच्या मधल्या ज्या दोन जागा असतात, त्या नकुल आणि सहदेवाच्या. त्यांची पांडवात गणना होते ईतकेच. म्हणजे ते दारात ऊभे आहेत, असे फ़क्त म्हणायचे. पुढचा माणुस ऊंच असेल तर याना वाराहि फ़ारसा लागत नाही. याना आधार असतो तो दाराच्या आत वर असलेल्या आडव्या दांड्याचा. हल्ली बहुतेक गाड्याना तो असतोच. पुर्वी काहि डब्याना तो नसायचा. त्यावेळी दाराच्या खोबणीचाच आधार घ्यावा लागायचा. या जागा तश्या गैरसोयीच्या कारण आतला दबाव वाढला तर सर्व भार या दोघांवर येतो. शिवाय प्रत्येक स्टेशनवर जबरदस्तीने ऊतरावे लागते ते वेगळेच. आणि ऊतरल्यानंतर या जागेवर क्लेम ठेवणेहि अवघड असते. तरिहि याना थोडीफार हवा खाता येतेच. याशिवाय जर सहावा माणुस या पाचात घुसु लागला, अगदी त्याने मान जरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर कर्णासारखे त्याला अपमानित व्हावे लागते. यहा सिर्फ़ पाच लोगोंकि जगा है, हे त्याला सुईच्या अग्रावर मावेल ईतकिहि जमीन देणार नाही, अश्या स्टाईलीत ऐकवले जाते. ( तोंडातला गुटखा वा पान थुकायचे असेल, ऊलटी होत असेल वा ऊडीच मारायची असेल तर आणि तरच हे पाच जण विलग होतात, एरवी नाही. ) जर एखाद्या दारात सहा जण सुखाने ऊभे असलेले दिसले तर तो डब्बा मालडब्बा तरी असायला हवा, किंआ ते सहाजण खरोखरच जिवलग मित्र असावेत. तर हे झाले दारातले महाभारत, आता आतले रामायण बघु. आतली जी सीट असते ना ती, असते तीन जणांसाठी. पुर्वी तिला बकेट सीट टाईप विभागणी असायची, आता तशी नसते. अगदी शरद पवारांसारखे तिघे जण आरामात बसु शकतील अशी तिची लांबी रुंदी असते. यातली खिडकी अगदी सीटला लागुन तरी असते किंवा जराशी दुर तरी. गाडी ज्या दिशेने जाणार आहे, आणि जिथे लागुन खिडकि आहे, त्या खिडकिला सगळ्यात जास्त डिमांड असतो. त्या खिडकीत बसलेला तो साक्षात रामवतार. नमवी पहा भुमि, अशी गुर्मी त्याच्या तोंडावर असते. त्याच्या बाजुला असतो तो सौमित्र लक्ष्मण. रामाला मिळणारे बहुतेक सगळे फ़ायदेतोटे त्यालाहि मिळत असतात. फ़त वार्याचा झोत जरा कमी, दिसणार्या दृष्याचा आवाका जरा कमी. आणि नीट बघायचे असेल तर रामाला वंदन केल्याशिवाय, काहि करता येणार नाही. तसेच लोकांच्या बॅगा वर ठेवायचे आणि काढुन द्यायचे काम त्यालाच करावे लागते. तरिही तो भाग्यवान. तिसरा असतो तो भरत. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्याच्या भावनेने तो बसलेला असतो. केवळ बसलाय एवढे म्हणण्यापुरतेच तो बसलेला असतो. रामाची जागा पटकवायला विशेष कौशल्य लागते. आणि सहसा हा माणुस लंबी रेसका घोडा असतो. तो लवकर ऊतरत नाही. अनेक जण हि जागा पटकवण्यासाठी ऊलटे बसुन आलेले असतात. समजा जर तो ऊठलाच तर लक्ष्मणाला ती जागा मिळणार. दोघीहि ऊठुन जायची शक्यता फ़ारच कमी, आणि फ़क्त अश्यावेळी भरताला जागा मिळणार. हे तिघे स्थानापन्न झाल्यावर हि सीट खरेतर भरते. पण या तिघाना जरा सरुन बसा असे सांगण्यासाठी एक खास हस्तमुद्रा केली जाते, किंवा झोपेचे सोंग आणणार्या लबाड माणसाच्या गुडघ्याला स्पर्ष करुन, योग्य तो संदेश पोहोचवला जातो. आणि चौथी सीट निर्माण केली जाते. हि सीट शत्रुघ्नाची. रामायणात या पात्राचे प्रयोजन काय तेच मला कळलेले नाही. शिवाय तीन राण्या आणि त्याना चार पुत्र हे व्यस्त गुणोत्तरहि मला कळत नाही. हा जो शत्रुघ्न असतो ना, त्याला समोर पाय करुन बसणे जरा अवघडच असते. शिवाय ते तिघे, तो मुळावर आल्यासारख्या भावनेने, गाडीच्या हेलकाव्यांचे निमित्त करुन त्याला हलके हलके धक्के देतच असतात. ऊभी रचुन ठेवलेली पुस्तके कशी मोकळ्या जागेने कलंडतात तसे ते तिघे या चौथ्यावर कलंडत असतात. आणि मग त्या पुस्तकांच्या कडेला कसे एखादे जाडजुड पुस्तक ठेवावे लागते तसेच या शत्रुघ्नाला काटकोनात बसावे लागते. या पोझिशनमधे तो बाकिच्या तिघाना व्यवस्थित टेकु देऊ शकतो. त्याच्या या अश्या पोझिशनमुळे त्याला नीट सीट मिळायची आशा जवळजवळ सोडुनच द्यावी लागते. या दोन समोरासमोरच्या सीट्समधे फ़ारच कमी जागा असते, पण तिथेहि हल्ली लोक घुसु लागले आहेत. हल्ली म्हणजे, गर्दीचा रेटा वाढल्यानंतर आणि तसे घुसता येते असे कळल्यानंतर. पुर्वी असे ऊभे रहात नसत. शिवाय असे ऊभे राहिल्यामुळे, बाजुला बसलेल्या माणसापेक्षा अधिक अचुकतेने, रिकाम्या होवु घातलेल्या सीटची आगाऊ सुचना मिळते. आणि एखाद्या ट्रिकसीन प्रमाणे बसलेल्या आणि ऊभ्या असलेल्या माणसांची अदलाबदल होते. आणि हि अदलाबदल झाल्यानंतरच लक्ष्मण आणि भरताला कळते. लहान मुले मात्र अचुकपणे खिडकिशी पोहोचतात. त्याना तसे प्रशिक्षण आईच्या पोटात असल्यापासुनच मिळालेले असते. माझ्यासारखा एखादा काका खिडकीत बसला असेल तर मांडीवर पण बसता येते. पुर्वी या खिडक्याना फ़क्त आडव्या सळ्या असत. पण चेन वैगरे खेचण्याचे प्रकार व्हायला लागल्यापासुन त्याना जाळ्या बसवण्यात आल्या. या जाळ्यांमुळे बाहेरुन होणारी दगडफ़ेकहि अडवता आली. ( डॉ. श्रीराम लागुंचा मुलगा, असा दगड लागुनच प्राणाला मुकला. ) गाड्यांच्या वरच्या दांड्यांच्या हात धरायच्या कड्या पण युनिक डिझाईनच्या आहेत. हाताची पकड त्यावर व्यवस्थित बसते. पुर्वी त्या लोखंडी असत, आता स्टेनलेस स्टीलच्या असतात. गाडी रिकामी असेल तर त्या सगळ्या छान एका लयीत झुलत असतात. आणि त्यांचा एक छान नाद निर्माण होतो. मी मात्र माझा बहुतेक प्रवास दरवाज्यात लटकुनच केलाय. मी १४ व्या वर्षी दहावी पास झालो, त्यावेळी माझी ऊंची फ़ार नव्हती. पुढे कॉलेजमधे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करु लागल्यावर लटकुन लटकुन माझी ऊंची वाढली. आता तर दरवाज्यापेक्षा केवळ दोन तीन ईंचाने माझी ऊंची कमी आहे. दारातच लटकत असल्यामुळे डब्यातील फ़ेरीवाल्यांशी माझा फ़ार कमी संबंध येतो. तरिपण डब्ब्यात फ़िरणारे फ़ेरीवाले, कंगवे, पास कव्हर, मिंट गोळ्या, आलेपाक, चणे शेंगदाणे, पॉप कॉर्न, रुमाल, जुनी मासिके, संत्री, पेरु, बोरे, बॉलपेन्स, अश्या ठरविक गोष्टी विकत असतात. हो आणखी एक गोष्ट ते विकतात, ते म्हणजे पुण्य. त्याना पैसे देऊन, तुम्हाला हवे तेवढे पुण्य जमा करता येते. शिवाय त्यांची, शिरडीवाले साईबाबा आ आ, केशिवा माधिवा तुज्या नामातरि गोडिवा, परर्र्देसी परर्देसी अशी भक्तीगीते ऐकावी लागतात ते वेगळीच. या मनोजकुमारने त्यांची फ़ार छान सोय केलीय. शिरडीवाले साईबाबाच्या पुर्वी, गरिबोंकि सुनो वो तुम्हारी सुनेगा, हे गाणे त्यांचे हॉट फ़ेव्हरिट होते. सध्याचे कुठले आहे माहित नाही, कदाचित कजरारे कजरारे असावे. शिवाय त्यांची ती दोन आॅस्बेस्टॉसचे तुकडे वाजवुन ताल धरण्याची क्ल्रुप्ती तर खासच आहे. गाडीचा बाह्यरंग बहुतांशी तोच राहिला आहे. एफ़ेम ९३.४ सारख्या काहि जाहिरातदारानी संपुर्ण गाडी त्यांच्या रंगात रंगवायचे प्रयत्न केले. त्या आधीहि तुरळक असे प्रयोग झालेत. रेल्वेने काहि गाड्या निळ्या रंगातहि रंगवुन बघितल्या. पण शेवटी हाच रंग कायम राहिला आहे. डब्याच्या बाहेर दिसणार्या जाहिराती पण आता कमी झाल्यात. आतमधे दिसणार्या जाहिरातीत, कछुआ छाप अगरबत्ती, कोचिंग क्लासेस, सेक्स क्लिनिक्स, व्हिक्स, सिरियल्स हे जास्त लोकप्रिय प्रकार आहेत. अनाऑफ़िशियल पत्रके पण कधीकधी दिसतात, त्यात एखादा महाराज, एखादा बुवा, गुप्तरोगांवर ईलाज, किंवा नुसताच एखादा मोबाईल नंबर असु शकतो. दरवाज्याच्या आतमधे, वरती रेल्वेची स्टेशने दाखवणारा ढोबळ नकाशा रंगवलेला असतो. पण हल्ली तो कमी दिसायला लागलाय. हे नकाशे बघुन तुम्हाला कुठे ऊतरायचे याचा एक वेळ अंदाज येऊ शकेल, पण कुठल्या बाजुने ऊतरायचे हे जाणुन घ्यायला मुंबईकराच्या अनुभवाचाच फायदा घ्यावा लागेल. स्टेशन कुठल्या बाजुला येणार आहे, हे माहित नसेल तर एकदोन स्टेशने आधीच विचारणे योग्य ठरेल. गर्दीच्या वेळी जर तुम्ही विरुद्ध बाजुला ऊभे असाल, तर स्टेशन आल्यावर, आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी, याचा जरुर अनुभव घ्याल. योग्य त्या बाजुला ऊभे असाल, तर मुंबईकर तुम्हाला स्टेशनवर अलगद ऊतरवतील. स्टेशने नेमकी कुठल्या बाजुला असावीत, याचे काय लॉजिक लढवले होते, ते मला नाही सांगता येणार, पण अनुभवाने बाजु नक्कीच सांगु शकेन. ईतक्या वर्षात, दादर, लोअर परेल सारख्या मोजक्या ठिकाणी स्टेशनची बाजु बदलली गेली आहे. शक्यतो हा प्लॅटफ़ॉर्म एकाच बाजुला असतो. पण पुर्वीपासुन काहि स्टेशनवर दोन्ही बाजुला प्लॅटफ़ॉर्म्स आहेत. कुर्ला, जोगेश्वरी, महलक्ष्मी येथे असे प्लॅटफ़ॉर्म्स आहेत, पण ते माणसापेक्षा अनुक्रमे बैल, म्हशी आणि घोडे यांच्या सोयीसाठी बांधले असावेत. दादरला पण असे दोन्ही बाजुला प्लॅटफ़ॉर्म आहेत, पण त्यापैकी एकाच बाजुने ऊतरता येते. चर्चगेटला पुर्वीपासुन अशी सोय होती. सी एस टी ला मात्र पुर्वी अशी सोय नव्हती. नेहमीची वर्दळ न थांबवता तिथे हो सोय करण्यात आली. हे खरोखरच कौतुकाचे आहे. अजुनहि अपुर्ण.
|
| |
| Monday, January 02, 2006 - 5:22 pm: |
|
|
या सगळ्या स्टेशन्सवर मिळणार्या खाद्यपदार्थांचा तोंडावळा तसाच आहे. या स्टॉलवरच्या सुचना, स्पेशल चाय नही बनती, पिनेका पानी मुफ़्त मिलेगा, दहि दुध बिक्रीके लिये नही है, याहि अनेकवर्षे बदललेल्या नाहीत. बाटाटेवडे, सामोसे आणि कचोरी, हे प्रकार अजुन तसेच आहेत. चहा, पेस्ट्रीज पण पुर्वीपासुन मिळतात. चर्चगेटला खुप पुर्वी फ़्रॅंकी मिळायला लागली. तेंव्हा तो प्रकार नवीनच होता. सांताक्रुजला ज्युस मिळायचा स्टॉल हि खासियत. तिथे लिंबु, अननस, रोज, गाजर वैगरे ज्युस मिळतात. अंधेरी, बोरिवली सारख्या ठिकाणी ईडली मिळायला लागली. दादरला पुर्वीपासुन फ़ळांचा एक स्टॉल होता, अजुनहि आहे. पपनसाच्या सोललेल्या पाकळ्या तिथे खुप पुर्वीपासुन मिळतात. ठाण्याला एक फ़्रूटप्लेटचा छोटासा स्टॉल आहे. पेप्सी आणि कोकाकोलाची मशीन्स हि तशी नवीच. पण या मशिनचा जास्त ऊपयोग, मसाला सोडा साठी होतो. यात आणखी एक रुपया जास्त दिला तर जलजीरा मिळतो. ज्याना एअरेटेड नको असतील त्यांच्यासाठी रसना आहेच. बिसलेरी, फ़्रुटी, लेज यानी आता हे स्टॉल्स सजलेले असतात. थंड पाण्याच्या पाणपोया पण अनेक ठिकाणी आहेत. काहिहि फ़ुकट घेणे अनेक मुंबईकराना रुचत नाही, त्यामुळे तिथेहि ते सुट्टे पैसे ठेवतात. खास रेल्वेचे पदार्थ मिळणारे स्टॉल्स व्हीटी आणि चर्चगेटला आहेत. पण त्याना लोकाश्रय कमी आहे. चर्चगेटला चायनीज पदार्थ मिळणारा स्टॉल काहि वर्षांपुर्वी सुरु झाला. तिथले माफक दर, बर्यापैकी चव आणि भरपुर क्वांटिटी यामुळे तिथे नेहमीच गर्दी असते. पुर्वी अनेक स्टेशनवर एक्स्प्रेसो कॉफ़ीची मशीन्स होती. आता ती ईतिहासजमा झालीत. फ़ळांपैकी संत्री आणि केळी फ़ार लोकप्रिय आहेत. स्टेशनच्या गर्दीत ती खाणे हायजिनीक पण वाटते. छोटी सफ़रचंदे पण असतात. मला स्वताला हे कॉंबिनेशन अजिबात आवडत नसले तरी, वडापाव फ़ारच लोकप्रिय झाला आहे. ठाण्याला तर याची खिडकिपोच डिलिव्हरी दिली जाते. सुकी भेळ, चना जोर, पॉप कॉर्न, साबुदाणा चिवडा असे सुके पदार्थ विकणारे वेगळे स्टॉल्सहि असतात. पुर्वी नीरा विकणारे स्टॉल्स प्रत्येक स्टेशनवर असायचे. आता ते अगदीच तुरळक दिसतात. या नीरेची विक्री अगदी थोडावेळ होत असल्याने, हे स्टॉल्स आता खुपदा बंदच दिसतात. स्टेशनवरचे बुक स्टॉल्स हे आणखी अनोखे प्रकरण. ईथे मिळणारी बहुतेक पुस्तके हिंदी. रॅपिडेक्स ईंग्लिश स्पीकिंग, डायमंड पाकैट बुक स्रीरीजमधली पुस्तके, गुलशन नंदाच्या कादंबर्या, राशीवार भविष्य, साली जिजाजीके चुटकुले, जेफ़्री आर्चरच्या पुस्तकांची भाषांतरे, राजस्थानी अनुठे व्यंजन पुस्तिकाए, गृहशोभिका, फ़िल्मी कलिया हि मंडळी तिथे अढळ स्थान पटकावुन असतात. रोजचे बहुतेक पेपर्स तिथे असतातच. आता तर दिवसातुन तीन वेळा प्रसिद्ध होत असल्याने, हे स्टॉल्स त्याने ओसंडुन वहात असतातच. फ़िलमफ़ेअर, जी, चित्रलेखा, स्टारडस्ट, ईंडिया टुडे याचे हिंदी अवतारहि तिथे असतात. एखाद्या स्तेषनची स्थानिक मागणी म्हणुन गुजराथी, तामिळ पुस्तके पण तिथे दिसतात. हल्ली डिजिट मासिक तसेच कॉंपीटीशन सक्सेस रिव्यु, जनरल नॉलेज पण दिसतात. फ़ॅंटसी, चापटसी, कच्ची कली अशी खास प्रौढांसाठीची पुस्तकेहि तिथे असतात. मराठी मात्र फ़ारच क्वचित दिसतात. चंगोच्या मी माझा नंतर मी कुणाचा, मी तुमचा, मी सगळ्यांचा असले काहि अल्पजीवी अवतारहि दिसले तिथे. पण बाकि पुस्तके तिथे दिसत नाहीत. पुर्वी रेल्वेचे वेळापत्रक खुप खपायचे, सध्या त्याचीही मागणी कमी झालीय. पुर्वी स्टेशनवर आणि आजुबाजुलाहि बुट पॉलिशवालेहि भरपुर दिसायचे. चामड्याचे शुज जाऊन आता स्पोर्ट्सचे शुज वापरण्याचे प्रमाण वाढल्याने तेहि आता गायब झालेत. प्रत्यक्ष गाडीत जरी भिकारी असले, तरी स्टेशनवर ते क्वचितच दिसतात. पुर्वी छक्के पण त्रास द्यायचे तेहि आता कमी दिसतात. म्हणजे मुंबईतले यांचे प्रमाण कमी झालेय असे नाही, पण स्टेशनवर ते कमी दिसतात एवढेच. माझ्या आठवणीत रेल्वेचा तिसरा वर्ग अजिबात नाही. पण पहिला वर्ग, दुसरा वर्ग आहेतच. शिवाय फ़ेरीवाल्यांसाठी व्हेंडॉर्सचा डब्बा असतो. या डब्यात, वेळ आणि दिशेनुसार, मासेवाले, डबेवाले, भाजीवाले, फ़ळवाले यांचे आलटुन पालटुन राज्य असते. लेडीज बायकांचा डब्बा पुर्वीपासुन होता. मग त्यात लेडीज फ़र्स्ट क्लासची भर पडली. त्या डब्ब्यात एक पोलिस असणे, हेहि ठेच लागल्यानंतर सुचलेले शहाणपण आहे. यापैकी एक डब्बा, काहि ठराविक वेळेनंतर आणि ठराविक स्टेशननंतर सर्वसाधारण होतो. या वेळांकडे डोळे लावुन बसलेले ऊत्साहि प्राणी कायम दिसतात. तसेच लेडीज जनरल डब्ब्यापैकी, एक डब्बा जनरल डब्ब्याला लागुन असतो. त्यातले पार्टिशन हेतुतः अर्धे ऊघडे ठेवलेले असते. आणि पुरुषांच्या डब्यातले समस्त रसिकजन, या टिव्हीकडे डोळे लावुन बसलेले असतात. स्टेशन नसलेल्या ठिकाणी गाडी थांबवावी लागली, कि तेवढ्या ऊंचीवरुन ऊड्या मारणे वा खाली ऊतरणे, बायकाना जवळ जवळ अशक्यच असते, त्यांच्या सोयीसाठी डब्याखाली छोट्या शिड्या लावल्या गेल्या. पुर्वी स्टेशनवर दोन रुळांच्या मधे पुर्वी लोकंडाच्या भाल्यासारख्या टोकेरी खांबांचे पार्टिशन असायचे. भायखळ्याला झालेल्या एका अपघातात, त्यावर पडुन अनेकजणीना प्राण गमवावे लागले, त्यामुळे मग ते काढुन टाकण्यात आले. किंवा जिथे आहेत, तिथे त्यांची टोके कापुन टाकण्यात आली. संध्याकाळच्या वेळी, बदलापुर, अंबरनाथ वैगरे लोकल व्हीटीला येते, तेंव्हा तिथल्या बायकांचा पवित्रा घेणे हे बघण्यासारखे असते. चपला काढुन हातात घेतलेल्या, साडी असेल तर पदर व्यवस्थित गळ्याभोवती गुंडाळुन खोचलेला. पर्स वा पिशवी काखेत घट्ट धरलेली, पंजाबी ड्रेस असेल तरिही, ओढणी अशीच व्यवस्थित खोचलेली असते. लेडीज डब्याच्या पंचवीसएक फ़ुट त्या आधी ऊभ्या असतात. आणि गाडी स्टेशनवर शिरल्याबरोबर, त्यात क्षणार्धात चालत्या गाडीत घुसुन आपली जागा पटकावतात. ( पुण्यासारखे अतिरेकि स्टाईलने चेहरा झाकुन घेणे, वा ड्रेस मळु नये म्हणुन, त्यावर स्वेटर घालणे, मुंबईत जवळ जवळ नाही. ) दिवसाकाठी दोन, तीन तास या बायका प्रवासात घालवतात. घरी जाऊनहि त्याना चहाचा कप देखील आयता मिळणार नसतो. मग या प्रवासातच त्या आपला जीव रमवतात. वाचन, स्तोत्रपठण, विणकाम, झोप, गप्पा, भाज्या निवडणे आणि भांडणे सगळेच एकसमयावेच्छेदेकरुन चालु असते तिथे. या बायकांच्या सोयीसाठी घरगुति, पोळी भाजी केंद्रे स्टेशनच्या आजुबाजुला ऊभी राहिली आहेत. घरी जाऊन वरण भाताचा कुकर लावला, कि वेळ भागते. माझ्या लहानपणी बायका तुरळकपणे नोकरी करत असत. आता तर त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे, आणि आता काहि गाड्या लेडीज स्पेशल म्हणुन सोडल्या जातात. या गाड्या जेंव्हा पहिल्यांदा धावल्या, तेंव्हा पुरुषांची असुया आणि बायकांचा अभिमान, दोन्हिही दिसायचे चेहर्यावर. आता मात्र अपरिहार्यपणे हे स्वीकारले गेले आहे. बायकांच्या डब्यातले फ़ेरीवाले पण वेगळेच असतात. आणि बायकांच्या डब्यातले वेगळेपण ईथेच काहिसे संपते. गर्दी, दारात लटकणे, चौथ्या सीटची मारामारी, हे सगळे त्यानाहि तसेच सहन करावे लागते. याबाबतीत त्या कुठेहि पुरुषांपेक्षा कमी नाहित. रेल्वेतली गर्दी दिवसेंदिवस वाढतच जातेय. गर्दीच्या वेळी काहि मुले, दोन डब्यांच्या मधल्या जागेत. खिडकिवर अगदी टपावर देखील प्रवास करताना दिसतात. त्यांच्या जिगरबाज वृत्तीला दाद देतानाच त्यातल्या संभाव्य धोक्यांची कल्पना असल्याने, काळजीहि वाटते. नऊ किंवा बारा डबे जरी असले तरी, तीन तीन डब्यांचे एक युनिट असते, त्यांचे नंबर्सहि वेगळेच असतात. या युनिटमधली मुळ मोटरमनची जागा, पुर्वी बंद करुन ठेवलेली असायची. ती वाया जाणारी चिंचोळी जागा, अपंग व्यक्तींसाठी ऊपलब्ध करुन देऊन, रेल्वेने कल्पकताच दाखवली आहे. तशी सोय नेमक्या कितव्या डब्यात आहे, याचेहि नोंद गाडीच्या समोर असते. आता या दोन्ही लाईन्सवरच्या स्टेशन्सबद्दल काहितरी खरडतो. चर्चगेटवर तर आता नावालाहि चर्च नाही. पण कधीकाळी तिथे खरेच चर्च होते. त्यावेळी समुद्र थेट तिथपर्यंत होता. पण पुर्वी गाड्या त्याहिपुढे जात असत. कुलाब्याच्या बधवार पार्काच्या आधी, एक मोठी आडवी ईमारत दिसते, ती पुर्वी टर्मिनस होती. ती लाईन जर अजुनहि असती, तर नरिमान पॉईंटला सोयीची झाली असती. चर्चगेट स्टेशनचे सात मजले आहेत. २६ जानेवारीच्या रोषणाईत ते मजले सात रंगात नाहुन निघालेले असतात. पण तरिहि त्या स्टेशनला तसे रुप नाहीच. अगदी पुर्वी, स्टेशनच्या समोर, एशियाटिकपर्यंत एक पुल होता. लोक त्या पुलाचा अजिबात वापर करत नसत. जाहिरातीसाठी तो योग्य होता, तरी माणसेच वापरत नसत त्यामुळे तो पाडुन, सबवे झाला. फ़्लोरा फ़ाऊंटन च्या दिशेने जाणारा पुल आधीच होता, त्याला आता आणखी सांधे जोडलेत. स्टेशनचा बाहेरच ईंडिकेटर लावुन तिथे छान सोय केलीय. या स्टेशनवरचा मरिन लाईनसच्या बाजुचा सबवे मात्र पुर्वीपासुन होता. ईरॉसकडचा सबवे फ़ेरीवाल्यानी पुरता व्यापुन टाकलेला आहे. तसा हा नाही. ईथे फ़ारतर लॉटरीवाले दिसतात. ईरॉस पुर्वी फ़क्त ईंग्लिशच सिनेमे दाखवत असे, आता हिंदी पण दाखवले जातात. अशियाटिकची मात्र आता कळा गेलीय. पुर्वी तो रस्ता, के रुस्तमपर्यंत मोकळाच असायचा. के रुस्तमचे आईसक्रिम खात. केसन्सच्या एकाच रांगाच्या डिस्प्ले केलेल्या साड्या बघत, मजेत येता येत असे. आता मात्र तिथे बूटवाले, नकाशेवाले, फ़ुलवाले यानी पथार्या पसरल्या आहेत. तिथल्या स्टेडियमवर क्रिकेट नसले तरी नानी पालखीवालाची भाषणे ऐकली आहेत. त्यासमोरचे पुरोहित, गोल फ़िरणारे ऍंबेसेडर, टी बोर्ड सगळे अजुनहि तसेच आहे. ईरॉसच्या गल्लीतले सत्यम कलेक्शन अजुनहि तसेच आहे, पण तिथली हायफ़ाय हॉटेले मात्र अलिकडची. रसना, सुविधाची तर रयाच गेलीय आता. समोरचा मंत्रालयाकडे जाणारा रस्ता, डावीकडचा फ़ाऊंटनकडे जाणारा रस्ता, एसीसी च्या गल्लीतुन व्हीटीकडे जाणारा रस्ता, सगळेच आता ओसंडुन वहात असतात. चर्चगेट ते मरिन लाईन्स हे अंतर फ़ार नाही. आणि चर्चगेटला येणारी गाडी मरिन लाईन्सहुन रखडतच येते. मरिने लाईन्सच्या पश्चिमेला मुंबईतला पहिला फ़्लायओव्हर लागतो. आणि पुर्वेला, मेट्रोकडे जाणारा रस्ता, त्याच्या मधोमध असणारी ती मशिद, कला निकेतनचे साड्यांचे दुकान, आयकर भवन, त्याच्या बाजुची सेंट्रल बिलडिंग, पारसी डेअरी, लिबर्टी सिनेमा, बॉम्बे हॉस्पिटलचा एरिया, यात काहिहि फ़रक पडलेला नाही. चर्नी रोडचे एक टोक सका पाटिल ऊद्यानाकडे बघते तर दुसरे ऑपेरा हाऊसकडे, त्याला आता पंडीत पलुसकर चौक म्हणतात. या स्टेशनलगतच्या रस्त्यावरुन, त्याला समांतर असणार्या ठाकुरद्वार भागाची कल्पना येत नाही. या स्टेशनला समांतर असे मुस्लिमांचे कबरस्थान आहे, पण लोक सर्रास त्यामधुन येत जात असतात. स का पाटिल ऊद्यानाचे काहि वर्षांपुर्वी नुतनीकरण झाले. मुंबई मराठि ग्रंथ संग्रहालयाचे कार्यालय तिथेच आहे. प्रमोद नवलकर ईथेच राहतात. काळा राम मंदीर, झावबा वाडी, पोर्तुगीज चर्च, झावबा वाडी हे सगळे ईथलेच. अमोल पालेकर पण पुर्वी ईथेच रहात होते. याला समांतर जातो तो नाना शंकर शेट मार्ग. ईथल्याच एका बारिकश्या गल्लीतुन डॉ. भालेरावांच्या साहित्य संघ मंदीरात जाता येते. मेट्रो कडे गेले कि रंगभवन जवळच. आता हे दोन्ही अस्तित्वात आहेत कि नाहीत कल्पना नाही. नाहितर धोबीतलावासारखे हे नावापुरतेच ऊरलेले असायचे. थाली रेस्टॉरंटहि ईथलेच. पश्चिमेला सरकारी प्रेस, तारापोरवाला मस्यालय, बाल भवन, विल्सन कॉलेज, बाबुलनाथ ( अनिल कपुर, माधुरी, नाना आणि जॅकीच्या परिंदाचे बरेचसे शुटिंग या देवळात झालेय. ) आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे चौपाटी. ( पश्चिमेला बाहेर पडणारा रस्ता बराचवेळ अगदी रुळाच्या कडेने जातो. ) पुर्वीहि समुद्राकाठी भेळपुरी हे आकर्षण होतेच, त्यावेळी चौपाटीवर भेळपुरीवाल्याला शोधावे लागायचे, आता भेळपुरीवाल्यांमधे चौपाटीला शोधावे लागते. तिथली कुल्फीहि छान असायची. आता फ़क्त कुल्फी विकणारे दुकान आहे तिथे. डॉ. शिरोडकरांचे क्लिनिकहि तिहे आहे. ( यांच्या नावाने गायनिकमधला एक टाका ओळखला जातो. ) . क्रीम सेंटर, न्यु यॉर्कर ही आद्य स्पेशालिटी हॉटेले तिथे खुप पुर्वीपासुन आहेत. पुलंचे एकपात्री प्रयोग बहुतांशी बालभवन ला झाले. मुंबईचा सुप्रसिद्ध गणेशविसर्जनाचा सोहळा ईथे होतो, तसेच नवरात्रात रामलिलाचा मोठा प्रोग्रॅम होतो ईथे. अजुनहि या प्रथा अखंडित सुरु आहेत. चौपाटी पुर्वी खुप निवांत जागा होती, आता तिथे फ़ारच गजबजाट असतो. तिथे फ़ारसा आडोसा नसल्याने, प्रेमी युगुलाना फ़ार चाळे करता येत नाहीत. तसेच रात्री हल्ली तिथे पोलिस बसु देत नाहीत. १९८६ साली फ़्रान्स सरकारने तिथे एक खास कार्यक्रम केला होता. लेसर बीम्स तेंव्हा पहिल्यांदा आम्ही पाहिले. तिथुन नरिमन पॉईंटवरच्या एअर ईंडिया बिल्डिंगवर प्रोजेक्शन केले होते, तसेच समुद्रातले पाणी कारंज्यासारखे ऊडवुन त्याचा वॉटर स्क्रिन केला होता, त्यावर पण प्रोजेक्शन केले होते. आज ईतक्या वर्षानंतरहि त्या तोडीचे काहि मी बघितले नाही. चर्नीरोडनंतर येते ग्रॅंट रोड. या स्टेशनसमोरच जुनी बाल कलाकार डेझी ईराणी च्या नातलगाचे, ईराणी रेस्टॉरंट अजुन तग धरुन आहे. तिथे मिळणारा मावा केक हा एकमेव असतो. अगदी ४० पैसे किम्मत होती तेंव्हापासुन खातोय मी तो. आजहि तो मिळतो, फ़क्त आकार छोटा झालाय आणि किम्मत थोडी वाढलीय. ग्रॅंट रोडला थोडीफ़ार पारसी वस्ती होती. स्व. दुर्गा भागवत पण तिथेच रहायच्या. पुर्वेला बाहेर पडल्यावर ते ईराणी रेस्टॉरंट सोडले कि कपड्यांचा मोठा बाजार लागतो. मग काटकोनात वळले कि लॅमिंटोन रोड लागतो. ईथे तुम्हाला एलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल मधले हरेक स्पेअर पार्ट्स मिळु शकतात. एकदा माझ्या मामाला एक पार्ट हवा होता. त्याचा रेडिओ खुप जुना होता, पण परदेशी बनावटीचा होता. तिथल्या एका छोट्या दुकानात चौकशी केल्यावर, त्या दुकानदाराने तसलाच एक रेडिओ समोर आणुन ठेवला, आणि म्हणाला घे कुठला पार्ट हवाय तो. ग्रॅंट रोड फ़ेमस आहे ते कामाठीपुर्यासाठी देखील. नॉवेल्टी सिनेमाच्या पुढे तो भाग सुरु होतो. त्या भागातुन जाणारी एक खास बस आहे, ज्याना तिथे जायचे हिम्मत नाही, ते त्या बसमधुन नजरसुख मिळवु शकतात. मीरा नायरच्या सलाम बॉम्बे सिनेमात, या भागाचे यथार्थ चित्रण आहे. ग्रॅंट रोड आणि बॉम्बे सेंट्रल स्टेशनमधे फ़ारच कमी अंतर आहे. मला वाटते गाडीचा मोटरमन ग्रॅंट रोडला पोहोचतो, त्यावेळी गार्ड बॉंबे सेंट्रललाच असतो. बॉंबे सेंट्रल ला वर्दळ असते ती बाहेरगावच्या गाड्यांमुळे. अगदी पहिल्यापासुनच, बाहेरगावच्या गाड्या तिथुनच सुटतात. त्यामुळे चर्चगेटला नसलेली भव्यता तिथे आहे. हे स्टेशन रात्रभर जागे असते. राजधानी गाड्यांसाठी तिथे प्लॅटफ़ॉर्मची लांबी वाढवावी लागली होती. या स्टेशनचे आवारहि भरपुर मोठे आहे. ईथुन समोरच एस्टीचे मुख्य आगार आहे. मिनर्व्हा, मराठा मंदीर हि थिअटर्स ईथलीच. पुढचे स्टेशन महालक्ष्मी रोड. देवीचे जरी नाव असले तरी, ईथुन देऊळ बरेच लांब आहे. हे स्टेशन तसे रस्त्याच्या खाली आहे. बाहेर पडल्यावर पश्चिमेला रस्त्याच्या पलिकडे रेसकोर्सचे आवा आहे. मग हाजी अली, महालक्ष्मी देऊळ, गोल्फ क्लब लागतात. स्टेशनलगत एकेकाळी मोठमोठ्या टेक्स्टाईल मिल्स होत्या. त्यांच्या चिमण्या तेवढ्या ऊरल्यात आता. फ़ेमस स्टूडिओ पण ईथुन जवळच आहे. पुर्वेला जेकॉब सर्कल, सात रस्ता वैगरे भाग आहेत. आणि मध्य रेल्वेचे भायकळा स्टेशन ईथुन जवळ आहे. मग लागते लोअर परेल. एकेकाळी हे स्टेशन फ़ारच बापुडवाणे होते. टिपिकल मध्यमवर्गी मराठी समाज ईथे होता. आता तो कोपर्यात ढकलला गेलाय. गौरी गणपती, होळिच्या दिवसात ईथले वातावरण फ़ारच ऊत्साहाचे असायचे. ईथेहि अनेक मिल्स होत्या. आता त्या बहुतेक सगळ्या बंद पडल्या आहेत. आता ईथे नांदतेय ती मॉल संस्कृती. बाहेरचा आकार जरी जुन्या मिलचा असला तरी, आतले जग अगदी पेज थ्री वाल्यांचे आहे. ईथुन जाणारा एक रस्ता सरळ वरळी नाक्याला जातो. बीडीडी उर्फ़ सिमेटाच्या चाळी, पोदार आयुर्वेदिक कॉलेज, एस्टीचे ऑफ़िस हे सगळे ईथेच आहे. मग लागते ते एल्फ़िस्टन रोड. हे स्टेशन अजुनहि बापुडवाणे आहे. याला समांतर आहे ते मध्य रेल्वेचे परेळ. त्याबद्दल नंतर लिहिन. मग येते दादर. हे दादर पश्चिम रेल्वेचे, याला फ़क पश्चिम बाजु आहे, पुर्व बाजु नाही. या स्टेशनला लागुनच बाहेर, फ़ुलबाजार आहे. अगदी पहाटेपासुन ईथे ऊलाढाल सुरु होते. आता ईथल्या फ़्लायओव्हरमुळे बरिच कोंडि झालीय. त्यामुळे बाहेरच्या माणसाला चालणेहि मुष्कील होते ईथे. स्टेशनसमोरच मामा काणे आणि पणशीकर हि दोन मराठमोळी हॉटेले अजुन तग धरुन आहेत. कोहिनुर थिएटर आता जमीनदोस्त झालेय. आयडियल बुक स्टॉल, मॅजेस्टिक बुक डेपो, झारापकर, छबिलदास हे ईथुन जवळच आहेत. पुस्तकांसाठी हि पंढरी आहे. मॅजेस्टिक मधले अगत्य तर आवर्जुन अनुभवण्याजोगे. तिथे गेल्यानंतर पुस्तक न घेता येणे, मला एकदाहि जमलेले नाही. छबिलदासने एकेकाळी मराठी प्रायोगिक नाटकाना चांगलाच हात दिला होता, आता मात्र तिथे नाटके होत नाहीत. आयडियलच्या बाजुलाच श्रीकांत बटाटा वडा, पुर्वी तिथे फ़क्त तेवढेच मिळत होते, आता म्हणाल ते मिळते. काहि मोजके वसईचे भाजीवले तिथे अजुनहि टिकुन आहेत. तिथलेच दादर सार्वजनिक वाचनालय आता नव्या चकाचक रुपात ऊभे आहे. टिळक ब्रिजखाली दिवसाच्या कुठल्याहि प्रहरी, मिरची, कोथिंबीर, आले, लिंबु यांचा बाजार भरलेला असतो. मिर्चीच्या वासाने तुम्हाला तिथुन जाताना ठसका लागलाच पाहिजे. एकेकाळी झारापकरांचा फ़ार दरारा होता. सुलभ हप्त्याने वस्तुंची विक्री त्यानी आधी सुरु केली, पण आता त्यांचे नाव फ़ारसे ऐकु येत नाही. व्ही. पी. बेडेकर पण लोणच्यासाठी फ़ार प्रसिद्ध होते, आता त्यांचेहि नाव ओसरलेय. स्टेशनसमोरच्या सुविधाने आपला आवाका फ़ारच वाढवला आहे, आणि त्याच्या कोपर्यावरच्या सामंत ब्रदर्सचा लोण्याचा गोळा, पुर्वीपासुन तसाच आहे. दसर्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांच्याकडे चक्का घेण्यासाठी होणारी तोबा गर्दी अजुनहि तशीच आहे. त्यांच्या लोण्याच्या गोळ्याचे लहानपणी खुप आकर्षण वाटायचे. खानदेशी, बेळगावी, कोईमतुरी असे लोण्याचे वेगवेगळे प्रकार तिथे असतात. मधेच कधीतरी त्यानी तुप विकायला सुरवात केली. मित्रानो अगदी थोडक्यात, आणि फ़क्त स्टेशनच्या आजुबाजुच्या परिसराबद्दल लिहायचे आहे तरी, हे वाढतच चाललेय. पसंत पडतय ना ? गाडी अजुन दादरलाच आलीय.
|
| |
| Wednesday, January 04, 2006 - 3:53 pm: |
|
|
दादरहुन पश्चिमेला अनेक रस्ते जातात. दक्षिणेचा रस्ता जातो कबुतरखान्याकडे, तो परिसर आपण परिंदा सिनेमात बघितला आहेच. मग लागतो प्रकाश स्टोअर्सकडे जाणारा रस्ता. पुर्वी हे प्रकाश स्टोअर्स, साड्यांसाठी फ़ार प्रसिद्ध होते. पण मग नंतर पानेरी, लाजरी, नवरी अशी अनेक दुकाने निघाली. मग लागतो कोहिनुर सिनेमाचा रोड, ते थिएटर आता नाही, पण त्या समोरचा लस्सीवाला मात्र अजुन आहे. दादरच्या परिसराबाबत नंतर लिहिन. दादरनंतर लागते माटुंगा रोड. पुर्वी फ़्लायओव्हर नव्हता तेंव्हा झेड ब्रिजवरुन ऊतरले कि रेल्वे फ़ाटक लागायचे. तिथे एका खांबाला रुळाचा तुकडा बांधुन ठेवला होता. तो आपटुन छान आवाज यायचा. तिथुन थोड्या अंतरावर आहे संदेश. पुर्वी संदेशचा पसारा जास्त नव्हता. तिथे रबडी पुरी घेतली कि त्यासोबत बटाट्याची भाजी आणि, लोणचेहि मिळायचे. दहि सामोसा हा तिथला खास प्रकार होता. ते दुकान अजुन आहे, पण टेबल सर्व्हीस बंद झालीय. त्या समोर लागते ती निवांत मोगल लेन. तिथुन जरा पुढे कर्नाटक हॉल. छबिलदासने साथ सोडल्यानंतर, या हॉलने काहि काळ मराठी प्रायोगिक नाटकाना, हात दिला. पण त्या स्टेजचा आकार विचित्र असल्याने, तिथे नाटके फ़ारशी रुजली नाहीत. तिथुन पुढे लागतो तो सिटीलाईट सिनेमा, त्याच्या समोरचा बाजार वैगरे. शिरिश कणेकर, वसुमति धुरु आदी लोकांच्या लेखनात, या भागाचा वारंवार ऊल्लेख येतो. सिटीलाईट सिनेमा पुर्वी फ़क्त ईंग्लिश सिनेमे दाखवायचा. मग तिथे हिंदि सिनेमेहि दाखवले गेले. आता तो जमीनदोस्त झालाय. त्या समोरच्या बाजारात मात्र अजुनहि ताजी भाजी व फ़ळे मिळतात. सुलभा देशपांडे ला मी अनेकवेळा या बाजारात बघितले आहे. माहिमची शितलादेवी पण ईथुन जवळच. लहानपणी मुलाना गौर येऊन गेल्यानंतर या देवीला दहिभात वहायची पद्धत होती. याच देवळाच्या आवारात, आपल्या लाडक्या नाट्यकलाकार स्व. मनोरमा वागळे रहात असत. एका मायबोलिकरणीच्या कृपेमुळे, मला त्यांच्या घराला भेट देता आली, पण माझे दुर्दैव असे कि, त्यापुर्वीच त्यांचे निधन झाले होते. याच परिसरात, माझ्या कृत्रिम फ़ुले बनवण्याच्या कलेमधील गुरु, सुनिता नागपाल, यांचे छोटेसे दुकान आहे. जाहिरातीत दिसणारी अनेक फ़ुले, ताजी नसुन, त्यानी बनवलेली असतात. नॅशनल हॉस्पिटल हे हि ईथेच. ( विवेक ओबेरॉयला बघायला ऐश्वर्या ईथेच आली होती. ) माटुंगा रोड नंतर लागते माहिम जंक्शन. या दोन स्टेशनच्या मधे, सेनापती बापट मार्ग अखंड सोबत करत राहतो. दर बुधवारी ईथल्या माहिमच्या चर्चमधे भाविकांची गर्दी असते. आता तर त्याला ऊधाणच आलेले असते. त्याच्यासमोरचा माहिमचा दर्गा पुर्वी आत्महत्येसाठी फ़ेमस होता, बुधवारी चर्चची तर शुक्रवारी त्यांची गर्दी. त्यामागचा माहिमचा किल्ला आता दिसतहि नाही. मधुमेह्यांवर आणि त्याना होवु शकणार्या सर्व विकारांवर हमखास ईलाज करणारे रहेजा ईस्पितळ स्टेशनजवळच आहे. ते आहे मच्छीमार कॉलनीत. अनिल माधुरीच्या तेजाबमधे गाड्या आणि ईमारती दिसतात त्या ईथल्याच. माहिम हे मुंबईच्या मुळ बेटांपैकी एक. माहिम नंतर लागते वांद्रा. या स्टेशनला एक मुस्लीम आणि क्रिस्ती चेहरा आहे. याची बांधणी पण जुनी. कॉरोनार कोर्ट ईथेच आहे. दोन्हीबाजुला मुस्लीम वस्ती आहे. पश्चिमेला बस आगार आहे. लिंकिंग रोड ईथुन जवळ आहे. रेक्लमेशनची ऊभारणी माझ्या डोळ्यासमोर झाली. पुर्वी तो भाग खुप एकाकी होता. तिथेच फ़्लायओव्हरचे जंजाळ आहे. जरीमरी देवीचे जुने देऊळ ईथेच आहे. लकी बिर्याणीचे दुकानहि जवळ. पुर्वेला कुप्रसिद्ध बेहरामपाडा आहे सुप्रसिद्ध मातोश्री निवासस्थान आहे, कलानगर आहे, तिथला साहित्य सहवास आहे. आणखी एका मायबोलिकरणीच्या कृपेने, के ज पुरोहितांच्या घरी जायचा योग आला होता. तेंव्हा गिरीजा किर, ईमारतीखाली दिसल्या होत्या. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स चे एक टोक ईथुन सुरु होते. त्याच्या टोकाला आहे ड्राईव्ह ईन थिएटर. तिथे काहि सिनेमे बघितले होते. बरीच वर्षे ते चालले, पण आता तिथेहि रेनोव्हेशन होतेय. आता सांगुन कुणाला पटणार नाही, पण तिथे एकेकाळी पक्षी अभयारण्य होते. आता एवढ्या गजबजाटात पक्षी कश्याला येतील तिथे. बांद्रा स्टेशनलगत एक तलावहि आहे, त्यात बोटिंग वैगरेचि सोय आहे. पुर्वी तिथे एक ओपन नाट्य थिएटर होते. पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धा तिथे होत. अनेक नाटके लहानपणी तिथे बघितली. आता ती जागा ओस पडलीय. मुंबईकरांची आद्यदेवता मतमाऊली म्हणजेच माऊंटमेरी पण ईथल्याच एका टेकडीवर आहे. तिची जत्रा अजुनहि भरते. बांद्रा स्टेशन सोडले कि पश्चिमेला गेईटी, जेमिनी आणि गॅलेक्सी अशी तीन थिएटर्स लागतात. ते संकुल फ़ार जुने आहे. जंजीर मी तिथे बघितला होता. पण ते आतासारखे मल्टिप्लेक्स नव्हते. त्यावेळी मुंबईत अशी थिएटर्स नव्हती. एकाच ईमारतीत तीन तीन थिएटर्स, मग सिनेमांचे आवाज एकमेकात मिसळत असतील, अशी शंका माझ्या बालमनाला यायची. बांद्रा नंतर येते खार. हा भाग पुर्वीपासुन ऊच्चभ्रु लोकवस्तीचा, त्यामुळे हे स्टेशन फ़ारसे वापरलेच जात नसे. अजुनहि तिथे फ़ारशी वर्दळ नसते. मध्य रेल्वेच्या हारबरच्या गाड्या आता अंधेरीपर्यंत जात असल्याने, ईथे एक फ़्लायओव्हर बांधावा लागला आहे. खार नंतर लागते सांता क्रुज. ईथुन २३१ ची बस, जुहु ला जाते. तिचा थांबा अगदी स्टेशनला लागुन आहे. जुहु पुर्वी सिनेतारकांचे आवडते रहायचे ठिकाण होते. आता तिही चौपाटी भेळपुरीवाल्यानी आणि हॉटेल्सनी गिळुन टाकलीय. लिडो थिएटर, विमानाची बाग वाटेत लागतेच. जुहु बस स्टेशनच्याहि पुढे चंदन थिएटर आहे. ऑडिटच्या निमित्ताने, दर शनिवारी तिथे मी जात असे. स्टेशनवरचा म्युनिसिपालिटीचा पुल तर फ़ेरीवाल्याना आंदणच दिलेला आहे. पश्चिमेला लगेचच बाजार आहे. पुर्वेला मोठे बस स्टेशन. सांता क्रुज जरी विमानतळासाठी प्रसिद्ध असले तरी प्रत्यक्ष विमानतळ विले पार्ले पासुन जवळ आहे. सांता क्रुजकडुन विलेपार्ले कडे जाताना पुर्वेला विमानतळ दिसतो. तिथे मार्बल्सची दुकाने पुर्वापार आहेत, व त्यामागे विमानतळाची धावपट्टी. लहानपणी आम्ही विमानतळावर फ़िरायला जात असु. आता ईंडियन एअरलाईन वगळुन बाकिच्या डोमेष्टिक एअरलाईन्स जी ईमारत वापरतात तो जुना विमानतळ. त्यावरचा हिरवा पांढरा गोल फ़िरणारा दिवा, रात्रीच्या वेळी खुप दुरवरुन दिसत असे. अगदी पुर्वी सर्वच विमाने तिथुन सुटत असत. त्यावेळी म्हणजे दशहतवादाचा बागुलबुवा ऊदयास येण्यापुर्वी, प्रेक्षकाना खुप आतपर्यंत जाता येत असे. एका मामुली कठड्याला रेलुन विमाने पाहता येत असत. त्यावेळी डाकोटा वैगरे जातीची विमाने असायची. मेरा नाम जोकर सिनेमात ईथले शुटिंग आहे. जम्बो जेट वैगरे पण नंतर आली. तिथल्या एका ईमारतीचे नाव, जंबो दर्शन आहे. जंबो जेट जंबो जेट, मुंबई लंडन विमान थेट, असे एक बडबड गीत पण होते. पुलनी लंडनपर्यंत केलेला प्रवास कराची, कैरो, बाहरिन, स्वित्ज़रलंड या ठिकाणी थांबुन केला होता. त्यावेळी हरखुन विमाने बघताना, आयुष्यात ईतका विमान प्रवास घडेल याची कल्पनाहि केली नव्हती. पार्ले स्टेशनच्या परिसराला मराठी गुजराथी असा मिश्र चेहरा आहे. ताज्या भाज्या हि तिथली खासियत. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे बांधकाम पण माझ्या डोळ्यांसमोर झाले. त्यावेळी थिएटरमधेच मच्छीबाजार ( प्रत्यक्षात थिएटरच्या खाली ) हि कल्पना अनेकाना रुचली नव्हती. मग तिथे अनेक नाटके बघितली, पण मराठी नाटकांसाठी तिथले स्टेज फ़ारच रुंद आहे. पार्ल्याचे फ़ॅमिली स्टोअर्स पण मराठमोळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. आणि तिथले रामकृष्ण हॉटेल चविष्ठ पदार्थांसाठी. सांता क्रुज ते पारले अंतर फ़ारसे नाही. मधे तो नेहमी तुंबणारा मिलन सबवे लागतो. पार्ल्याहुन अंधेरीला येताना, गाडी जरा रखडतेच. हार्बर लाईनमुळे अंधेरीचा पसारा आता फ़ारच वाढला आहे. दोन्ही बाजुला गजबजाट असतो. पुर्वेला स्टेशनजवळच एक लोणच्याचे दुकान आहे, तिथे १०१ प्रकारची लोणची कायम तयार असतात. या भागाला आगरकर चौक म्हणतात. पश्चिमेला लगेच एक मोठा बस डेपो, फ़्लायओव्हर वैगरे आहेत. वर्सोवा, चार बंगला, यारी रोड, महाकाली केव्ह्ज, दादरनंतर लागते माटुंगा रोड. पुर्वी फ़्लायओव्हर नव्हता तेंव्हा झेड ब्रिजवरुन ऊतरले कि रेल्वे फ़ाटक लागायचे. तिथे एका खांबाला रुळाचा तुकडा बांधुन ठेवला होता. तो आपटुन छान आवाज यायचा. तिथुन थोड्या अंतरावर आहे संदेश. पुर्वी संदेशचा पसारा जास्त नव्हता. तिथे रबडी पुरी घेतली कि त्यासोबत बटाट्याची भाजी आणि, लोणचेहि मिळायचे. दहि सामोसा हा तिथला खास प्रकार होता. ते दुकान अजुन आहे, पण टेबल सर्व्हीस बंद झालीय. त्या समोर लागते ती निवांत मोगल लेन. तिथुन जरा पुढे कर्नाटक हॉल. छबिलदासने साथ सोडल्यानंतर, या हॉलने काहि काळ मराठी प्रायोगिक नाटकाना, हात दिला. पण त्या स्टेजचा आकार विcइत्र असल्याने, तिथे नाटके फ़ारशी रुजली नाहीत. तिथुन पुढे लागतो तो सिटीलाईट सिनेमा, त्याच्या समोरचा बाजार वैगरे. शिरिश कणेकर, वसुमति धुरु आदी लोकांच्या लेखनात, या भागाचा वारंवार ऊल्लेख येतो. सिटीलाईट सिनेमा पुर्वी फ़क्त ईंग्लिश सिनेमे दाखवायचा. मग तिथे हिंदि सिनेमेहि दाखवले गेले. आता तो जमीनदोस्त झालाय. त्या समोरच्या बाजारात मात्र अजुनहि ताजी भाजी व फ़ळे मिळतात. सुलभा देशपांडे ला मी अनेकवेळा या बाजारात बघितले आहे. माहिमची शितलादेवी पण ईथुन जवळच. लहानपणी मुलाना गौर येऊन गेल्यानंतर या देवीला दहिभात वहायची पद्धत होती. याच देवळाच्या आवारात, आपल्या लाडक्या नाट्यकलाकार स्व. मनोरमा वागळे रहात असत. एका मायबोलिकरणीच्या कृपेमुळे, मला त्यांच्या घराला भेट देता आली, पण माझे दुर्दैव असे कि, त्यापुर्वीच त्यांचे निधन झाले होते. याच परिसरात, माझ्या कृत्रिम फ़ुले बनवण्याच्या कलेमधील गुरु, सुनिता नागपाल, यांचे छोटेसे दुकान आहे. जाहिरातीत दिसणारी अनेक फ़ुले, तजी नसुन, त्यानी बनवलेली असतात. नॅशनल हॉस्पिटल हे हि ईथेच. ( विवेक ओबेरॉयला बघायला ऐश्वर्या ईथेच आली होती. ) माटुंगा रोड नंतर लागते माहिम जंक्शन. या दोन स्टेशनच्या मधे, सेनापती बापट मार्ग अखंड सोबत करत राहतो. दर बुधवारी ईथल्या माहिमच्या चर्चमधे भाविकांची गर्दी असते. आता तर त्याला ऊधाणच आलेले असते. त्याच्यासमोरचा माहिमचा दर्गा पुर्वी आत्महत्येसाठी फ़ेमस होता, बुधवारी चर्चची तर शुक्रवारी त्यांची गर्दी. त्यामचा माहिमचा किल्ला आता दिसतहि नाही. मधुमेह्यांवर आणि त्याना होवु शकणार्या सर्व विकारांवर हमखास ईलज करणारे रहेजा ईस्पितळ स्टेशनजवळच आहे. ते आहे मच्छीमार कॉलनीत. अनिल माधुरीच्या तेजाबमधे गाड्या आणि ईमारती दिसतात त्या ईथल्याच. माहिम हे मुंबईच्या मुळ बेटांपैकी एक. माहिम नंतर लागते वांद्रा. या स्टेशनला एक मुस्लीम आणि क्रिस्ती चेहरा आहे. याची बांधणी पण जुनी. कॉरोनार कोर्ट ईथेच आहे. दोन्हीबाजुला मुस्लीम वस्ती आहे. पश्चिमेला बस आगार आहे. लिंकिंग रोड ईथुन जवळ आहे. रेक्लमेशनची ऊभारणी माझ्या डोळ्यासमोर झाली. पुर्वी तो भाग खुप एकाकी होता. तिथेच फ़्लायओव्हरचे जंजाळ आहे. जरीमरी देवीचे जुने देऊळ ईथेच आहे. लकी बिर्याणीचे दुकानहि जवळ. पुर्वेला कुप्रसिद्ध बेहरामपाडा आहे सुप्रसिद्ध मातोश्री निवासस्थान आहे, कलानगर आहे, तिथला साहित्य सहवास आहे. आणखी एका मायबोलिकरणीच्या कृपेने, के ज पुरोहितांच्या घरी जायचा योग आला होता. तेंव्हा गिरीजा किर, ईमारतीखाली दिसल्या होत्या. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स चे एक टोक ईथुन सुरु होते. त्याच्या टोकाला आहे ड्राईव्ह ईन थिएटर. तिथे काहि सिनेमे बघितले होते. बरीच वर्षे ते चालले, पण आता तिथेहि रेनोव्हेशन होतेय. आता सांगुन कुणाला पटणार नाही, पण तिथे एकेकाळी पक्षी अभयारण्य होते. आता एवढ्या गजबजाटात पक्षी कश्याला येतील तिथे. बांद्रा स्टेशनलगत एक तलावहि आहे, त्यात बोटिंग वैगरेचि सोय आहे. पुर्वी तिथे एक ओपन नाट्य थिएटर होते. पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धा तिथे होत. अनेक नाटके लहानपणी तिथे बघितली. आता ती जागा ओस पडलीय. मुंबईकरांची आद्यदेवता मतमाऊली म्हणजेच माऊंटमेरी पण ईथल्याच एका टेकडीवर आहे. तिची जत्रा अजुनहि भरते. बांद्रा स्टेशन सोडले कि पश्चिमेला गेईटी, जेमिनी आणि गॅलेक्सी अशी तीन थिएटर्स लागतात. ते संकुल फ़ार जुने आहे. जंजीर मी तिथे बघितला होता. पण ते आतासारखे मल्टिप्लेक्स नव्हते. त्यावेळी मुंबईत अशी थिएटर्स नव्हती. एकाच ईमारतीत तीन तीन थिएटर्स, मग सिनेमांचे आवाज एकमेकात मिसळत असतील, अशी शंका माझ्या बालमनाला यायची. बांद्रा नंतर येते खार. हा भाग पुर्वीपासुन ऊच्चभ्रु लोकवस्तीचा, त्यामुळे हे स्टेशन फ़ारसे वापरलेच जात नसे. अजुनहि तिथे फ़ारशी वर्दळ नसते. मध्य रेल्वेच्या हारबरच्या गाड्या आता अंधेरीपर्यंत जात असल्याने, ईथे एक फ़्लायओव्हर बांधावा लागला आहे. खार नंतर लागते सांता क्रुज. ईथुन २३१ ची बस, जुहु ला जाते. तिचा थांबा अगदी स्टेशनला लागुन आहे. जुहु पुर्वी सिनेतारकांचे आवडते रहायचे ठिकाण होते. आता तिही चौपाटी भेळपुरीवाल्यानी आणि हॉटेल्सनी गिळुन टाकलीय. लिदो थिएटर, विमानाची बाग वाटेत लागतेच. जुहु बस स्टेशनच्याहि पुढे चंदन थिएटर आहे. ऑडिटच्या निमित्ताने, दर शनिवारी तिथे मी जात असे. स्टेशनवरचा म्युनिसिपालिटीचा पुल तर फ़ेरीवाल्याना आंदणच दिलेला आहे. पश्चिमेला लगेचच बाजार आहे. पुर्वेला मोठे बस स्टेशन. सांता क्रुज जरी विमानतळासाठी प्रसिद्ध असले तरी प्रत्यक्ष विमानतळ विले पार्ले पासुन जवळ आहे. सांता क्रुजकडुन विलेपार्ले कडे जाताना पुर्वेला विमानतळ दिसतो. तिथे मार्बल्सची दुकाने पुर्वापार आहेत, व त्यामागे विमानतळाची धावपट्टी. लहानपणी आम्ही विमानतळावर फ़िरायला जात असु. आता ईंडियन एअरलाईन वगळुन बाकिच्या डोमेष्टिक एअरलाईन्स जी ईमारत वापरतात तो जुना विमानतळ. त्यावरचा हिरवा पांढरा गोल फ़िरणारा दिवा, रात्रीच्या वेळी खुप दुरवरुन दिसत असे. अगदी पुर्वी सर्वच विमाने तिथुन सुटत असत. त्यावेळी म्हणजे दशहतवादाचा बागुलबुवा ऊदयास येण्यापुर्वी, प्रेक्षकाना खुप आतपर्यंत जाता येत असे. एका मामुली कठड्याला रेलुन विमाने पाहता येत असत. त्यावेळी डाकोटा वैगरे जातीची विमाने असायची. मेरा नाम जोकर सिनेमात ईथले शुटिंग आहे. जम्बो जेट वैगरे पण नंतर आली. तिथल्या एका ईमारतीचे नाव, जंबो दर्शन आहे. जंबो जेट जंबो जेट, मुंबई लंडन विमान थेट, असे एक बडबड गीत पण होते. पुलनी लंडनपर्यंत केलेला प्रवास कराची, कैरो, बाहरिन, स्वित्ज़रलंड या ठिकाणी थांबुन केला होता. त्यावेळी हरखुन विमाने बघताना, आयुष्यात ईतका विमान प्रवास घडेल याची कल्पनाहि केली नव्हती. पार्ले स्टेशनच्या परिसराला मराठी गुजराथी असा मिश्र चेहरा आहे. ताज्या भाज्या हि तिथली खासियत. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे बांधकाम पण माझ्या डोळ्यांसमोर झाले. त्यावेळी थिएटरमधेच मच्छीबाजार ( प्रत्यक्षात थिएटरच्या खाली ) हि कल्पना अनेकाना रुचली नव्हती. मग तिथे अनेक नाटके बघितली, पण मराठी नाटकांसाठी तिथले स्टेज फ़ारच रुंद आहे. पार्ल्याचे फ़ॅमिली स्टोअर्स पण मराठमोळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. आणि तिथले रामकृष्ण हॉटेल चविष्ठ पदार्थांसाठी. सांता क्रुज ते पारले अंतर फ़ारसे नाही. मधे तो नेहमी तुंबणारा मिलन सबवे लागतो. पार्ल्याहुन अंधेरीला येताना, गाडी जरा रखडतेच. हार्बर लाईनमुळे अंधेरीचा पसारा आता फ़ारच वाढला आहे. दोन्ही बाजुला गजबजाट असतो. पुर्वेला स्टेशनजवळच एक लोणच्याचे दुकान आहे, तिथे १०१ प्रकारची लोणची कायम तयार असतात. या भागाला आगरकर चौक म्हणतात. पश्चिमेला लगेच एक मोठा बस डेपो, फ़्लायओव्हर वैगरे आहेत. वर्सोवा, चार बंगला, यारी रोड, महाकाली केव्ह्ज, लोकंडवाला कॉम्प्लेक्स, शॉपर्स स्टॉप, हे सगळे ईथुन जवळ. मग लागते जोगेश्वरी, आणि मग गोरेगाव. अगदी पुर्वीपासुन हा भाग गोठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ईथे पुर्वी रेल्वेलाईनच्या दोन्ही बाजुला, हिरवीगार कुरणे दिसत. तबेलेहि होते. तबेले अजुन आहेत, कुरणे मात्र रोडावलीत. गोरेगाव हे मृणाल गोरेंचे गाव. त्या भागात त्यांचा खुप दरारा होता. त्यांच्या ऐन ऊमेदीचा काळ मी बघितला आहे. त्या निवडुन आल्यानंतर त्यांच्याशी हातमिळवणीहि केली आहे. पक्षापेक्षा व्यक्तीला मते देण्याचा तो काळ होता, आणि राजकारणात ईतक्या ऊघडपणे गुन्हेगारी शिरलेली नव्हती. गोरेगावलाच आहे ती आरे कॉलनी, आणि दुग्धशाळा, ईथे अजुनहि हिरवाई आहे. ईथे एक छान बागहि आहे. पुर्वीच्या अनेक हिंदीमराठी सिनेमातल्या गाण्यांचे शुटिंग ईथे होत असे. मग लागते माझे जन्मगाव मालाड. १९७४ पर्यंत आम्ही तिथेच रहात होतो. त्यावेळी मालाड अतिशय निवांत होते. रेल्वे सोडली तर वाहतुकीसाठी टांगे आणि तुरळक टॅक्सीज होत्या. स्टेशनच्या बाहेरच टांगे ऊभे असत. तिथुन १२ आण्यात घरी पाच जणानी टांग्यातुन गेलेले मला अजुनहि आठवतेय. मालाड पुर्वेला बस सेवा नव्हती, रिक्षाहि नव्हत्या. तळी, बागा, विहिरी यानी समृद्ध परिसर होता हा. पश्चिमेला थोडीफ़ार वर्दळ होती, पण तरिही फ़ार गर्दी नसायची. आता मालाडवर गुजराथ्यांचे आणि मारवाड्यांचे वर्चस्व जाणवते. सती मंदीरे पण एक दोन आहेत. मॉल्स निघालेत. मालाडला असताना मढ, मार्वे, गोराई हि आमची सहलीला जायची ठिकाणे होती. हे भाग पुर्वीपासुनच निवांत होते. गोराईला जायला एक छोटी खाडी ओलांडावी लागते. तिथे बेस्टतर्फे एक जेटी चालवली जाते. पुर्वी तिथे हॉटेले वैगरे अजिबात नव्हती. घरुनच सगळे घेऊन जावे लागायचे. आता तर तो भाग गजबजुन गेला आहे. मालाडनंतर लागते कांदिवली, हेही तसे लहानसेच हिरवेगार गाव होते. सध्या तिथे ठाकुर मंडळींचे राज्य आहे. कांदिवली नंतर लागते बोरिवली. मुंबईचे नॅशनल पार्क ईथुन जवळच आहे. मुंबईच्या अंतर्भागात ईतके मोठे घनदाट जंगल असु शकेल यावर कुणाचा सहसा विश्वासच बसत नाही. अजुनहि हे जंगल समृद्ध आहे. ईथे खास निसर्गदर्शन सहलीहि निघतात. याच्या आतमधे कान्हेरी केव्ह्ज आहेत. बिबळेहि आहेत. पावसात ईथला फ़ेरफ़टका अविस्मरणीय ठरतो. या पार्काला आता ऊंच ईमारतीनी घेरले आहे, पण तरिहि ते टिकुन राहिल असे वाटतेय. बोरिवली पश्चिमेला स्टेशनजवळच एक पोस्टाची गल्ली नावाचा भाग होता, तिथे अस्सल रानभाज्या आणि रानमेवा अजुनहि मिळतो. एस्सेल वर्ल्ड पण याच भागात. त्याबद्दल काहि लिहावेसे वाटत नाही. प्रचंड गोंगाटी संगीत, प्रचंड गर्दी, गुडघाभर पाण्यात राहुन ऊड्या मारणे, हि माझी मौजमजेची कल्पना होवु शकत नाही, ज्यांची होवु शकते, त्याना ती लखलाभ होवो. बोरिवलीनंतरची दहिसर, मिरा रोड, भायंदर, नायगाव, वसई रोड, नाला सोपारा, विरार हि स्टेशने पुर्वी अगदी निवांत होती. मिरा रोडला तर मिठागरे होती. तिथल्या मिठांचे पिरॅमिडसारखे ढिग, रेल्वेतुन दिसत असत. राजेश खन्ना आणि आशा पारेखच्या, बहारोंके सपने चे शुटिंग या भागात झालेय. जुचंद्र नावाचा एक डोंगर ईथुन दुरवर दिसतो. ते कोळी लोकांचे श्रद्धास्थान आहे. जिवधनीचा डोंगर, वसईचा किल्ला, अर्नाळ्याचा समुद्र ईथे जाण्यासाठी विरारला जावे लागते. वज्रेश्वरी हे तीर्थस्थान वसईहुन जवळ आहे. तिथल्या गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यास सर्व त्वचारोग बरे होतात असा समज आहे, पण त्या कुंडांची अवस्था बघता, तिथे ऊडी मारण्याचे धाडस मला तरी झाले नव्हते. तिथुन मागेच नदितहि अशी गरम पाण्याची कुंडे आहेत, असे ऐकले. मिरा रोड वैगरे भागात, आता परदेशी नागरिकांची, खास करुन नायजेरियन लोकांची फ़ार वस्ती झाली आहे. माझ्या कुठल्यातरी एका नायजेरियन मैत्रीणीची ओळख काढुन, एक नायजेरियन मुलगी मला भेटायला घरी पण येऊन गेली. हा भाग लेडीज बार्सनेहि गजबजला होता. आता ते नसावेत. वसईच्या आधी, या खाडीवर दोन पुल लागतात. हे पुल ब्रिटिशांच्या काळापासुन आहेत. या दोन पुलांच्या मधे, पाणजु नावाचे गाव वसले आहे, पाण्यानी घेरलेले असुनहि त्या गाव्यात पिण्यायोग्य पाणी नाही. तिथल्या बायकाना रेल्वे रुळामधुन जाऊनच पाणी आणावे लागते. बोरिवलीपुढे हा मार्ग चौपदरी नाही. त्यामुळे गाड्यांची संख्या अतिषय मर्यादित आहे. बससेवा असली तरी फ़ार वेळखाऊ आहे. त्यामुळे ईथल्या गाड्याना अतोनात गर्दी असते. नवीन नवीन वसाहती या भागात ऊभ्या राहिल्या खर्या पण त्यांचा पाण्याचा आणि वाहतुकिचा प्रश्ण अजुन सुटलेला नाही. मध्य रेल्वेवर जसा पुर्वीपासुन डेक्कन क्वीनचा तोरा होता, तसा ईथे फ़्लाईंग रानीचा. आमच्या लहानपणी हि गाडी दिसली कि आम्ही हरखुन जात असु. अजुनहि ती धावते, पण राजधानी गाड्यांमुळे ती फ़िकी पडलीय. आज मी जरी भूगोलाच्या गप्पा मारत असलो तरी, लहानपणी माझ्या काहि विचित्र समजुती होत्या. बडोद्याला जायची गाडी बॉंबे सेंट्रलला पकडल्यानंतर तिने आणखी पुढे जावे अशी माझी अपेक्षा असायची. ती परत मालाडलाच येते हे मला सहन व्हायचे नाही. या लेखाच्या निमित्ताने मात्र परत या सगळ्या ठिकाणी जाऊन आलो, आणि तुम्हालाहि फ़ेरफ़टका घडवला. आता थोड्या ब्रेकनंतर, मध्य रेल्वेची सफ़र करु. लोखंडवाला कॉम्प्लेक्स, शॉपर्स स्टॉप, हे सगळे ईथुन जवळ. मग लागते जोगेश्वरी, आणि मग गोरेगाव. अगदी पुर्वीपासुन हा भाग गोठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ईथे पुर्वी रेल्वेलाईनच्या दोन्ही बाजुला, हिरवीगार कुरणे दिसत. तबेलेहि होते. तबेले अजुन आहेत, कुरणे मात्र रोडावलीत. गोरेगाव हे मृणाल गोरेंचे गाव. त्या भागात त्यांचा खुप दरारा होता. त्यांच्या ऐन ऊमेदीचा काळ मी बघितला आहे. त्या निवडुन आल्यानंतर त्यांच्याशी हातमिळवणीहि केली आहे. पक्षापेक्षा व्यक्तीला मते देण्याचा तो काळ होता, आणि राजकारणात ईतक्या ऊघडपणे गुन्हेगारी शिरलेली नव्हती. गोरेगावलाच आहे ती आरे कॉलनी, आणि दुग्धशाळा, ईथे अजुनहि हिरवाई आहे. ईथे एक छान बागहि आहे. पुर्वीच्या अनेक हिंदीमराठी सिनेमातल्या गाण्यांचे शुटिंग ईथे होत असे. मग लागते माझे जन्मगाव मालाड. १९७४ पर्यंत आम्ही तिथेह रहात होतो. त्यावेळी मालाड अतिशय निवांत होते. रेल्वे सोडली तर वाहतुकीसाठी टांगे आणि तुरळक टॅक्सीज होत्या. स्टेशनच्या बाहेरच टांगे ऊभे असत. तिथुन १२ आण्यात घरी पाच जणानी तांग्यातुन गेलेले मला अजुनहि आठवतेय. मालाड पुर्वेला बस सेवा नव्हती, रिक्षाहि नव्हत्या. तळी, बागा, विहिरी यानी समृद्ध परिसर होता हा. पश्चिमेला थोडीफ़ार वर्दळ होती, पण तरिही फ़ार गर्दी नसायची. आता मालाडवर गुजराथ्यांचे आणि मारवाड्यांचे वर्चस्व जाणवते. सती मंदीरे पण एक दोन आहेत. मॉल्स निघालेत. मालाडला असताना मढ, मार्वे, गोराई हि आमची सहलीला जायची ठिकाणे होती. हे भाग पुर्वीपासुनच निवांत होते. गोराईला जायला एक छोटी खाडी ओलांडावी लागते. तिथे बेस्टतर्फे एक जेटी चालवली जाते. पुर्वी तिथे हॉटेले वैगरे अजिबात नव्हती. घरुनच सगळे घेऊन जावे लागायचे. आता तर तो भाग गजबजुन गेला आहे. मालडनंतर लागते कांदिवली, हेही तसे लहानसेच हिरवेगार गाव होते. सध्या तिथे ठाकुन मंडळींचे राज्य आहे. कांदिवली नंतर लागते बोरिवली. मुंबईचे नॅशनल पार्क ईथुन जवळच आहे. मुंबईच्या अंतर्भागात ईतके मोठे घनदाट जंगल असु शकेल यावर कुणाचा सहसा विश्वासच बसत नाही. अजुनहि हे जंगल समृद्ध आहे. ईथे खास निसर्गदर्शन सहलीहि निघतात. याच्या आतमधे कान्हेरी केव्ह्ज आहेत. बिबळेहि आहेत. पावसात ईथला फ़ेरफ़टका अविस्मरणीय ठरतो. या पार्काला आता ऊंच ईमारतीनी घेरले आहे, पण तरिहि ते टिकुन राहिल असे वाटतेय. बोरिवली पश्चिमेला स्टेशनजवळच एक पोस्टाची गल्ली नावाचा भाग होता, तिथे अस्सल रानभाज्या आणि रानमेवा अजुनहि मिळतो. एस्सेल वर्ल्ड पण याच भागात. त्याबद्दल काहि लिहावेसे वाटत नाही. प्रचंड गो.गाटी संगीत, प्रचंड गर्दी, गुडघाभर पाण्यात राहुन ऊड्या मारणे, हि माझी मौजमजेची कल्पना होवु शकत नाही, ज्यांची होवु शकते, त्याना ती लखलाभ होवो. बोरिवलीनंतरची दहिसर, मिरा रोड, भायंदर, नायगाव, वसई रोड, नाला सोपारा, विरार हि स्टेशने पुर्वी अगदी निवांत होती. मिरा रोडला तर मिठागरे होती. तिथल्या मिठांचे पिरॅमिडसारखे ढिग, रेल्वेतुन दिसत असत. राजेश खन्ना आणि आशा पारेखच्या, बहारोंके सपने चे शुटिंग या भागात झालेय. जुचंद्र नावाचा एक डोंगर ईथुन दुरवर दिसतो. ते कोळी लोकांचे श्रद्धास्थान आहे. जिवधनीचा डोंगर, वसईचा किल्ला, अर्नाळ्याचा समुद्र ईथे जाण्यासाठी विरारला जावे लागते. वज्रेश्वरी हे तीर्थस्थान वसईहुन जवळ आहे. तिथल्या गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यास सर त्वचारोग बरे होतात असा समज आहे, पण त्या कुंडांची अवस्था बघता, तिथे ऊडी मारण्याचे धाडस मला तरी झाले नव्हते. तिथुन मागेच नदितहि अशी गरम पाण्याची कुंडे आहेत, असे ऐकले. मिरा रोड वैगरे भागात, आता परदेशी नागरिकांची, खास करुन नायजेरियन लोकांची फ़ार वस्ती झाली आहे. माझ्या कुठल्यातरी एका नायजेरियन मैत्रीणीची ओळख काढुन, एक नायजेरियन मुलगी मला भेटायला घरी पण येऊन गेली. हा भाग लेडीज बार्सनेहि गजबजला होता. आता ते नसावेत. वसईच्या आधी, या खाडीवर दोन पुल लागतात. हे पुल ब्रिटिशांच्या काळापासुन आहेत. या दोन पुलांच्या मधे, पाणजु नावाचे गाव वसले आहे, पाण्यानि घेरलेले असुनहि त्या गाव्यात पिण्यायोग्य पाणी नाही. तिथल्या बायकाना रेल्वे रुळामधुन जाऊनच पाणी आणावे लागते. बोरिवलीपुढे हा मार्ग चौपदरी नाही. त्यामुळे गाड्यांची संख्या अतिषय मर्यादित आहे. बससेवा असली तरी फ़ार वेळखाऊ आहे. त्यामुळे ईथल्या गाड्याना अतोनात गर्दी असते. नवीन नवीन वसाहती या भागात ऊभ्या राहिल्या खर्या पण त्यांचा पाण्याचा आणि वाहतुकिचा प्रश्ण अजुन सुटलेला नाही. मध्य रेल्वेवर जसा पुर्वीपासुन डेक्कन क्वीनचा तोरा होता, तसा ईथे फ़्लाईंग रानीचा. आमच्या लहानपणी हि गाडी दिसली कि आम्ही हरखुन जात असु. अजुनहि ती धावते, पण राजधानी गाड्यांमुळे ती फ़िकी पडलीय. आज मी जरी भूगोलाच्या गप्पा मारत असलो तरी, लहानपणी माझ्या काहि विचित्र समजुती होत्या. बडोद्याला जायची गाडी बॉंबे सेंट्रलला पकडल्यानंतर तिने आणखी पुढे जावे अशी माझी अपेक्षा असायची. ती परत मालाडलाच येते हे मला सहन व्हायचे नाही. या लेखाच्या निमित्ताने मात्र परत या सगळ्या ठिकाणी जाऊन आलो, आणि तुम्हालाहि फ़ेरफ़टका घडवला. आता थोड्या ब्रेकनंतर, मध्य रेल्वेची सफ़र करु.
|
| |
| Wednesday, January 11, 2006 - 3:58 pm: |
|
|
मध्य रेल्वे म्हणजेच सेंट्रल रेल्वेचे मुख्यालय आहे व्हीटी, म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस ला. पुर्वी तिथे बर्याच व्हिक्टोरिया ऊभ्या असायच्या, आता त्या गायब झाल्यात. काहि वर्षांपुर्वी याचे नाव बदलुन ते छत्रपति शिवाजी टर्मिनस असे ठेवण्यात आले. यात कुणाची कसली राजकिय गणिते सुटली कुणास ठाऊक ? पण हे अवघड नाव काहि लोकांच्या तोंडात बसले नाही. आता याला सी एस टी असेच म्हणतात. अगदी सर्वप्रथम डोळ्यात भरते ते या स्टेशनचे देखणे रुप. मुळातच हि ईमारत ईतकि भव्य बांधली होती कि ती आजच्या गर्दीचा लोड अगदी सहज पेलु शकते. बाहेरुन तर तिचे सौंदर्य डोळ्यात भरतेच पण आतुनहि, खास करुन तिकिटविंडोच्या आवारात तर ते फ़ारच खुलुन दिसते. तिथली भव्यता, कोरिव काम, खांबावरची व छतावरची नक्षी, अगदी देखणी आहे. अनेक सिनेमात मुंबई दाखवायची असेल तर, याच स्टेशनचा कॅपिटॉल थिएटरच्या दारातुन घेतलेला शॉट असतो. मनिषा कोईरालाच्या बॉंबे सिनेमात ती याच स्टेशनच्या बाहेर बुरखा घेऊन ऊभी राहिलेली दाखवलीय. आणि बंटी और बबली मधे पण अभिषेक आणि राणी, या स्टेशनच्या बाहेर बराच वेळ टॅक्सीजवळ बोलत असताना दाखवलेत. खरे म्हणजे या स्टेशनचे दोन भाग आहेत, एक लोकलसाठी आणि दुसरा थ्रु ट्रेन्ससाठी. सिनेमात नेहमी दिसतो तो लोकलचा भाग. पुर्वी ईथे लोकलच्या एकाच बाजुला प्लॅटफ़ॉर्म यायचा, पण आता मात्र दोन्ही दिशेने प्लॅटफ़ॉर्म्स आहेत. पुर्वी संध्याकाळच्या वेळी तिथे गाडीतुन ऊतरताना, सिग्नलमुळे गाडी कुठल्या प्लॅटफ़ॉर्मवर जाणार हे गाडीतल्या लोकाना आधीच कळत असे. आणि संध्याकाळच्या वेळी, सगळे जण विरुद्ध दिशेला जाऊन ऊभे रहात. आता ते शक्य होत नाही. तरिपण या लोंढा अंगावर यायला नको असेल तर, व्हीटीच्या दिशेने असलेल्या भिंतीला पाठ लावुन ऊभे रहावे लागते. सकाळच्या वेळी गाड्या आल्या कि दोन मिनिटात सगळे स्टेशन रिकामे होते आणि मासे घेऊन ऊपनगरात जाणार्या कोळणी तेवढ्या ऊरतात. संध्याकाळी मात्र प्लॅटफ़ॉर्म्स भरलेले असतात. डावीकडुन सुरु होणारे पहिले दोन प्लॅटफ़ॉर्म्स हार्बर लाईनसाठी, नंतरचे दोन स्लो गाड्यांसाठी आणि नंतरचे चार फ़ास्ट गाड्यांसाठी आहेत. स्टेशनमधे शिरल्या शिरल्याच, गाड्यांची स्थिति मोठ्या ईंडिकेटरमुळे कळत असल्याने, कुठल्या प्लॅटफ़ॉर्मवर जायचे ते ठरवता येते. मस्जिद च्या दिशेचा पुल हल्ली झाला. पुर्वी तो नव्हता तेंव्हा त्या बाजुने क्रॉस करणे अशक्य होते. आता त्या बाजुने येणार्या लोकांची पुलामुळे सोय झालीय. पुर्वी त्या बाजुला फ़ारशी गजबज नसायची. पुल झाल्यापासुन गर्दी झाली तिथे. स्टेशनच्या बाहेरच म्युनिसिपालिटीची देखणी ईमारत आहे. तिच्या मागे टाईम्स ऑफ़ ईंडियाचे ऑफ़िस आहे. या पेपरचा ऊल्लेख ओल्ड लेडी ऑफ़ बोरिबंदर असाच केला जातो. पुर्वी तिथेच पेपर छापला जायचा आणि ती छपाई बाहेरुन बघताहि यायची. आता मात्र छपाई तिथे होत नाही. त्यानी प्लॅनेट एम वैगरे दुकाने घातलीत. एकन्दरीतच टाईम्स ऑफ़ ईंडिया आणि मटाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललाय. पेज थ्री वाल्यानी तो पेपर व्यापुन टाकलाय, आणि त्याचेच प्रतिबिंब दिसते तिथे. तिथुन जरा पुढे गेले कि जे जे स्कुल ऑफ़ आर्ट लागते. स्टेशनच्या समोर दोन मोठे रस्ते पुर्वी ओलांडावे लागायचे. आता तिथे भुयारी मार्ग झालाय. त्याचे फ़ायबर ग्लासचे कव्हर हे कौतुकाचा विषय आहे. जेंव्हा तो झाला तेंव्हा तो खुप प्रशस्त वाटायचा, आता त्यातील अर्धाअधिक भाग, दुकानानी व्यापलाय. शिवाय व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम असल्याने, मोठे मोठे एक्सॉस्ट फ़ॅन तिथे लावावे लागले आहेत. तो ओलांडुन गेले कि पुढे एक पावभाजी मिळण्याचे जुने दुकान लागते. त्याच्या बाजुलाच काला खट्टा, सिकनजबीन वैगरे सरबते ओरिजिनल चवीत मिळतात. तिथुन फ़ाऊंटनच्या दिशेने सुरु होतो, फ़ोर्ट एरिआ. पुर्वी तिथे स्मगल्ड माल मिळायचा आता काहिहि मिळते. पण तो भाग संध्याकाळी सात नंतर सेफ़ ऊरत नाही. दर खांबा आड, वेश्या ऊभ्या असतात. या फ़ोर्टाच्या मागे मोदि लेन, बझारगेट स्ट्रीट सारख्या एक दोन लेन सोडल्या कि लागतो बलार्ड पियर एरिआ. पुर्वी तिथे मोठमोठ्या कंपन्यांची ऑफ़िसेस होती, तरिहि तो भाग प्रशस्त आणि निवांत होता. आता मात्र बहुतेक कंपन्यानी तिथली ऑफ़िसेस हलवुन ऊपनगरात नेली आहेत. व्हीटीच्या ऊजव्या कोपर्यात सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आहे व त्याच्या जरा पुढे जीपीओ म्हणजे मुख्य पोस्ट ऑफ़िसची देखणी ईमारत आहे. आजच्या लोडला देखील ती ईमारत प्रशस्त वाटते. त्याच ईमारतीत मागे एक पब्लिक हॉल आहे, तिथे निवांत बसुन वाचन करता येते व पत्रेहि लिहिता येतात. जुन्या काळातली, लोखंडि लिफ़्टहि, आज तिचे चालु स्थितीत बघायला मिळते. थ्रु ट्रेन्स जिथुन सुटतात, तिथे वरती एक मोठा रिझरवेशन काऊंटर आहे. एकंदर साठाच्या वर काऊंटर्स आहेत तिथे. खाली एकदा आपला प्रीप्रिंटेड टोकन घेतले, कि मोकळ्या जागेत मोठ्या डिस्प्लेवर आपल्या टोकनचा नंबर कधी येतोय आणि आपल्या कुठल्या काऊंटरवर जायचे आहे ते कळते. फ़टाफ़ट तिकिटे दिली जातात तिथे. वीटीच्या थ्रु ट्रेन्स हे जरा वेगळे प्रकरण आहे. मी एकदा लता मंगेशकरलाहि तिथे डेक्कन क्वीन साठी येताना पाहिलेय. तिच ती लाल काठाची पांढरी साडी, दोन्ही खांद्यावर घट्ट लपेटुन घेतलेला पदर, काखेत जुन्या पद्धतीची पर्स आणि हातात चुरगळलेला रुमाल. गानकोकिळेचा गबाळा तरिहि लोभस अवतार. पण लोकलच्या गर्दीला मात्र चेहरा नाही. या संपुर्ण भागात कुठेहि ऊभे खांब नाहित. त्यामुळे गाडी येताना लांबुन दिसते. गर्दीच्या वेळी गाडी स्टेशनात यायच्या आधीच भरते. नेहमीचे शिलेदार, आपापली जागा पकडुन बसतात. मग आमच्यासारखे पाच पस्तीसची कल्याण मिळाली तर ठिक नाहितर पाच बेचाळीसची बदलापुर पण चालेल, अश्या माणसांची लगबग सुरु होते. समोरचा लाल सिग्नल पिवळा होवुन तिरप्या दिव्यांचा सिग्नल मिळाला कि गाडी शिट्टी देऊन सुर होते. पुर्वी स्टेशनमधुन गाडी सुटली तरी तिचा वेग फ़ारसा नसायचा. एकदोन धक्के खाऊनच गाडी वेग पकडायची. त्यावेळी चालती गाडी पकडणे सहज शक्य व्हायचे. आता मात्र काहि तांत्रिक सुधारणानंतर गाडी क्षणातच वेग घेते. त्यामुळे चालती गाडी पकडायचे प्रमाण आता कमी झालेय. व्हीटीहुन गाडी सुटली कि डावीकडे गोदीमधल्या क्रेन्स दिसु लागतात. आता बराचसा माल न्हावा शेवा बंदरात ऊतरतो. पण तरिहि ससुन डॉक वैगरे अजुन ईथेच आहेत. ऊजव्या बाजुला हाज हाऊस हि खिडक्या नसलेली ऊंच ईमारत दिसते आणि मसजिद बंदर स्टेशन येते. हा आहे पुर्णपणे बाजार एरिआ. स्टेशनजवळ टाटा एलेक्ट्रिकची मोठी ईमारत सोडली तर लहानमोठे बाजार आहेत. भात बाजार, दाणा बाजार हे सगळे पुर्वेला. मसाल्याचे पदार्थ, तांदुळ, ताडपत्री यांची मोठी ऊलाढाल ईथे होते. तर पश्चिमेला आहे, महात्मा फ़ुले मंडई, मनिष मार्केट वैगरे भाग. एकेकाळी मनिष मार्केटला ईम्पोर्टेड वस्तु घेण्यासाठी झुंबड ऊडालेली असायची. आता तिथे खास काहि नाही. महात्मा फ़ुले मंडई म्हणजेच जुने क्रॉफ़र्ड मार्केट. तिथे मात्र फ़ळांचा मोठा व्यापार चालतो. अतिषय उत्तम प्रतीची फ़ळे तिथे मिळतात. पुर्वी तिथे पाळीव पक्षी पण मिळायचे, आता त्याचे प्रमाण कमी झालेय. तिथुनच सुप्रसिद्ध मोहम्मद अलि रोड सुरु होता. अत्यंत गजबजलेला असा हा भाग असतो. बोहरी लोकांची ईथे जास्त वस्ती आहे. पुर्वी ईथे कायम ट्राफ़िक जॅम असायचा. आता मात्र हा सगळा भाग एका मोठ्या फ़्लायओव्हरखाली गेलाय. रमझानच्या महिन्यातली ईथली जत्रा बघण्यासारखी असते. हा भाग बाजाराचा असल्याने त्यांच्या गर्दीच्या वेळा वेगळ्या असतात. साधारण सकाळी अकरा वाजता बाजार सुरु होतो आणि रात्री आठनंतर बंद होतो. मस्जिदनंतर लागते सॅंडहर्स्ट रोड. हा भाग म्हणजे जवळ जवळ मस्जिदचाच ऊपविभाग आहे. हे स्टेशन थोडे बाकदार आहे. त्यामुळे गाडी तशीच ऊभी राहते. मग लागते भायखळा. भाया नावाच्या माणसाचे खळे ईथे होते, म्हणुन हे नाव. आता हे कुठे आहे ते शोधावे लागेल. पुर्वी ईथे भाजीपाल्याचा ठोक व्यापार चाले, आता मात्र तो वाशीला हलवलाय. तो बाजार आता ओस पडलाय. तरिही बर्यापैकी भाजीचा व्यापार ईथे चालतो. कुप्रसिद्ध नागपाडा भाग ईथुन जवळ तसेच, जे जे हॉस्पिटलदेखील. माझगाव हा जुन्या मुंबईचा भाग ईथुन जवळ आहे. हे माझगाव म्हणजे अजुनहि जुन्या पद्धतीची घरे असलेले गाव आहे. अनेकदा सिनेमात पाठलाग करण्याच्या सीनमधे अरुंद गल्लीबोळ दाखवतात ते ईथले असतात. तसेच ईथे विक्रीकराचे मध्यवर्ती कार्यालय आहे. मग लागते चिंचपोकळी. या नावापेक्षा लालबाग नावाने हा भाग प्रसिद्ध आहे. पुर्वी ईथे अनेक कापड गिरण्या होत्या. आता त्यातले काहि ऊरले नाही. लालबागचा राजा, नावाचा गणपति ईथलाच. अजुनहि ईथे बर्यापैकी मराठी संस्कृति टिकुन आहे. ईथेच लक्ष्मी नारायण, नाशिक अश्या अनेक प्रकारचा चिवडा होलसेल भावात मिळतो. जिजामाता ऊद्यान म्हणजेच पुर्वीची राणीची बाग, ईथुन जवळ. आजहि तिथे बर्यापैकी वन्यप्राणी व पक्षी आहेत. या आवारातच एक वस्तु संग्रहालय आहे. तसेच रुद्राक्षासारखे काहि दुर्मिळ वृक्षहि ईथे बघायला मिळतात. पुर्वी ईथे बोटिंगची सोय होती, ती आता नाही, तसेच पुर्वी ईथे एक खुले नाट्यगुह होते तेहि आता नाही. पण अजुनहि ईथे काहि तास मजेत घालवता येतात. मुंबईच्या मुख्य भागात असलेली लोकसत्ता वैगरेंची कार्यालये आता या भागात आलेली आहेत. ईथे एक गरम खाडा म्हणुन भाग होता. ते खरोखरच गरम पाण्याचे कुंड होते का गिरण्यातील सांडपाणी होते, ते मला माहित नाही. त्याकाळच्या जुन्या चाळी अजुन तग धरुन आहेत, पण त्यांच्यासमोरुन गेलेल्या फ़्लायओव्हरमुळे, तिथल्या मराठी कुटुंबांचे फ़ाटके संसार आणखीनच ऊघडे पडले आहेत. चिंचपोकळीचा पुलहि पुर्वीपासुन प्रसिद्ध आहे. तिथुन वरळी प्रभादेवी भागात येता येते. या पुलाजवळच गोरा गांधि नावाचे एक आयुर्वेदिक औषधांचे खुप जुने दुकान आहे. मग लागते करि रोड स्टेशन. हाहि पुर्वापार कामगार भाग. ईथे अगदी रेल्वे लाईनला लागुनच घरे आहेत. डिलाईल रोड वैगरे भाग ईथुन जवळ. घाटावरचे अनेक लोक ईथे पुर्वीपासुन स्थायिक झालेले आहेत. पण गिरण्यांच्या संपानंतर मात्र ईथले वैभव कमी झालेय. मग लागते परळ. हे आहे मध्य रेल्वेवरचे परळ. हेहि तसे कामगारानीच वर आणलेले गाव. सुपारीबाग, अपना बाजार या सहकारि ग्राहक चळवळी या भागातच रुजल्या. रेल्वेचे कामगार क्रिडा संकुल ईथे आहे. भोईवाडा भाग ईथलाच. शाहिर दादा कोंडके, शाहिर साबळे हे सगळे ईथुनच ऊदयास आले. के ई एम हॉस्पिटल, वाडीया स्त्रीयांचे हॉस्पिटल, वाडीया मुलांचे हॉस्पिटल, आय हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल ही सगळी हॉस्पिटल्स ईथेच आहेत, आणि ती जवळ जवळच आहेत. अगदी शेवटच्या अवस्थेतल्या केसेस ईथे आणल्या जातात. आणि सर्वोत्तम अशी ट्रिटमेंट ईथे मिळु शकते. या हॉस्पिटलमुळे पांढरे झगे घातलेल्यांची ईथे वर्दळ असते. तसेच रुग्णासोबत येणार्या नातेवाईकाना राहण्यासाठी ईथे काहि धर्मशाळाहि अजुन आहेत. परळला रेल्वेचा वर्कशॉपदेखील आहे. राज्यातल्या ग्रामीण भागातुन आलेले कामगार, पुर्वीपासुन ईथे असल्याने, एस्टीचे एक मोठे स्थानक ईथे आहे. ते अजुनहि कार्यरत आहे. आमहाला लहानपणी गावाला जाताना, या स्थानकावर किंवा बॉंबे सेंट्रल स्थानकावर रात्रीच येऊन रहावे लागे. त्यावेळी रातराण्या नव्हत्या. पण आता मात्र एस्टीने ऊपनगरातुन गाड्या सोडुन छान सोय केली आहे. मग येते दादर. हे दादर म्हणजे सेंट्रल दादर. हे थ्रु गाड्यांचे टर्मिनसदेखील आहे. दादर मद्रास एक्स्प्रेस सारख्या काहि गाड्या अजुनहि ईथुन सुटतात. ईथेच मोठे पार्सल ऑफ़िस आहे. अजुनहि खरेदीसाठी लोकांचे हे आवडते स्थानक आहे. या स्थानकावर अलिकडेच एक पुल नव्याने बांधण्यात आला, तरिहि ईथली गर्दी हटत नाही. ईथे स्टेशनबाहेर पडल्याबरोबर आहे, साईबाबा आणि मारुतिचे मंदीर. समोरच आहे स्वामी नारायण मंदीर. त्याच्या बाजुला मनोहरपंतांचे कोहिनुर. तिथुनच सुरु होतो दादासाहेब फ़ाळके रोड. तिथे आहेत काहि फ़िल्म स्टुडिओज. समोरचा रस्ता सरळ, जाऊन कोहिनुर मिल ला जातो. ती मिल आता बंद पडलीय. पण पुण्याला जाणार्या एशियाड गाड्या अजुनहि तिथुन सुटतात. पनवेल, ऊरण ला जाणार्या एस्टी तिथुन सुटतात. या रस्त्यावर पुर्वी मुर्तींची हलती प्रदर्शने असत. आता ती गायब झालीत. याच रस्त्यावर एक पारसी अग्यारी आहे. डाव्या बाजुला मुंबईतील पहिली हिंदु कॉलनी आहे. शेजार्यांशी संबंध न ठेवणारी ब्लॉक सिस्टीम पहिल्यांदा तिथे सुरु झाली. अजुनहि त्या जुन्या पद्धतीच्या ईमारती तिथे ऊभ्या आहेत. काहि ईमारतींवर बाहेरुन टेकु देऊन, लिफ़्ट बसवुन मजले चढवले आहेत. किंग जॉर्ज हायस्कुल म्हणजेच राजा शिवाजी विद्यालय त्याच भागात. तसेच ताराबाई मोडक अध्यापक विद्यालयहि त्या भागात. एकेकाळी हिरवागार आणि अतिशय रम्य असलेला हा परिसर आता बकाल होत चाललाय. पुर्वी ईथे अगदी सामसुम असायची, आता मात्र खुप वर्दळ असते. हा आमचा एकेकाळी रोजचा रस्ता होता. अत्यंत रेखीव अश्या ऊभ्या आडव्या गल्ल्यातुन रमत गमत फ़िरायला खुप मजा यायची. शाळेतल्या लहान मुलांची लगबग सोडली तर काहिच आवाज नसायचा तिथे. कॉलेजची अनेक फ़्री लेक्चर्स तिथे भटकण्यात घालवली. लेक्चर्स बंक करत नसु कारण ती ऐकणे हाच आमचा अभ्यास होता. शिवाय प्रोफ़ेसरहि छानच शिकवायचे. दादरचा अत्यंत मध्यवर्ती असा खोदादाद सर्कल, हा भाग ईथुन जवळ, पण तिकडे आपण नंतर वळु. आजच्यापुरते ईथेच थांबु. आता दोन चार दिवस रजेवर आहे. तोपर्यंत सर्वाना शुभ संक्रमण. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला.
|
| |
| Monday, January 16, 2006 - 4:36 pm: |
|
|
दादर आणि माटुंगा मधले अंतरहि फ़ार नाही. माझे कॉलेज म्हणजे पोद्दार कॉलेज. ( पुर्ण नाव शिक्षण प्रसारक मंडळी यांचे रामनिरंजन आनंदिलाल पोद्दार कॉलेज ऑफ़ कॉमर्स ऍंड एकनॉमिक्स, कॉलेजबद्दल वेगळे लिहावे लागेल, आमच्यावेळच्या अनेक गोष्टी आता अद्भुत वाटतील. ) पाच वर्षे येजा होती तिथे. अजुनहि जातो तिथे खुप वेळा. आणि त्याच्या शेजारी रुईया कॉलेज. अनेक कलाकारांच्या आठवणीत तुम्ही या कॉलेजचे नाव ऐकले असेल. हिंदु कॉलनी जिथे संपते तिथे रुईया कॉलेज आहे आणि मधे एक पटांगण सोडुन पोद्दार कॉलेज. त्या समोर माटुंगा जिमखान्याचे प्रचंड ग्राऊंड. त्याच्या समोरचा कट्टा हा नेहमी फ़ुलुन गेलेला असायचा. आता तोच खचलाय. पण ते पटांगण मात्र नव्याने हिरवेगार झालेय.या परिसरात पुर्वी खुप झाडे होती. रुईयाच्या आवारात कुंती, सोनचाफा, वाकेरी, शिरिष यांची झाडे मी स्वतः बघितली आहेत. पोद्दारच्या मागेहि दोन पटांगणे होती. पोद्दारचा एक भाग असलेल्या वेलिंगकर संस्थेची आता स्वतंत्र मोठी ईमारत झालीय. पोद्दार कॉलेजच्या मागची पटांगणे ईतिहासजमा झालीत. समोरच्या पटांगणातहि काहि ईमारती ऊभ्या राहिल्यात. रुईयाच्या जवळ मणिस रेस्टॉरंट अजुनहि तश्याचे चवीचे दाक्षिणात्य पदार्थ खिलवते. अजुनहि तिथे एकाच डिशसाठी परत परत सांबार चटणी वाढली जाते. फ़क्त डिशचे दर आमच्या वेळच्या पस्तीस पैश्यापासुन आता दहा रुपयांवर गेलेत. रुईयाच्या समोरचे दुर्गा परमेश्वरी नावाचे बाळबोध हॉटेल, आता डीपीज नावाने, नव्या चकचकित रुपात ऊभे आहे. जयेश मिल्क बार बंद झालाय. पोद्दारच्या बाजुच्या निवांत कॅफ़े गुलशन या ईराणी रेस्टॉरंटचे फ़ास्ट फ़ुड जॉईंट झालेय. बाजुचा पापा पगली चौक तसाच आहे. माटुंगा स्टेशनसमोर एक पाणीपुरीची गाडी लागायची. त्याचेहि भाव एक रुपयांपासुन दहा रुपयांपर्यंत वाढलेत. पण चवीत अजुनहि फ़रक पडलेला नाही. स्टेशनच्या समोर, फ़रसाण, सरबते वैगरे विकणारी स्पेश्यालिटी दुकाने ओळीने ऊभी राहिलीत. स्टेशनच्या ईमारतीत एक गणपतीचे देऊळ आहे. कॉलेजच्या दिवसात आम्हा सगळ्यांचा लाडका गणपति होता तो. सकाळी सात वाजताच तो चंदनाचा लेप लेवुन आमच्यासाठी तयार असायचा. अजुनहि तो तिथे तसाच आहे. स्टेशनसमोरच्या मोकळ्या जागेत वरदराजन या स्मगलरचा मोठा गणपति बसायचा. दादरच्या खांडके बिल्डिंगपासुन त्याची मिरवणुक आणली जायची. त्यासाठी खास मद्रासी नर्तक नर्तिका यायच्या. त्याचे विसर्जनहि एक दिवस ऊशीरा व्हायचे. वीस वर्षांपुर्वी एकदा गणपतिच्या मंडपाला आग लागली. सगळे जळुन खाक झाले होते. ( त्यावेळी संगीतावर नाचणारी मनोहर विद्युत रोषणाई होती. ) एका रात्रीत ते सर्व परत ऊभारले गेले. पण त्या घटनेपासुन त्या गणपतिला दृष्टच लागली जणु. पोलिसानी मुद्दाम तिथे एक चौकि बांधली. त्यामुळे मंडपाची व्याप्ति आपोआप कमी झाली. याच ठिकाणी रामा नायक यांचे उडुपी ऊपहारगृह आहे. तिथे अगदी माफक दरात चविष्ट जेवण अजुनहि मिळते. तोंडल्याची भाजी असली तरी ती नीट कापलेली असतात व त्यात काजुगरहि असतात. याच्या खाली भाजी मंडई आहे. या भागात गुजराथी आणि तामिळ अशी वस्ती आहे, त्यामुळे ओल्या मिरीपासुन टोपिओका पर्यंत विविध प्रकारच्या भाज्या ईथे मिळतात. सकाळच्या वेळी खास बनाना चिप्स साठी लागणार्या केळ्यांचे ट्रक्स ईथे लागलेले असतात. स्टेशनच्या टोकापासुन मात्र ईथे प्युअर तामिळ वस्ती सुरु होते. तिथली लुंग्यांची दुकाने, मद्रासी पद्धतीचे हार विकणारी दुकाने बघुन आपण चेन्नई मधे तर आलो नाही ना असे वाटेल. हा रस्ता सरळ महेश्वरी ऊद्यान म्हणजेच किंग्ज सर्कल कडे जातो. स्टेशनच्या दक्षिण टोकाला आहे तो प्रचंड लांबीचा झेड ब्रिज. हे काहि या ब्रिजचे ऑफ़िशियल नाव नाही, तरिहि तो याच नावाने ओळखला जातो. हा ब्रिज रेल्वे वर्कशॉपला लागुन आहे. त्यामुळे तो दोन्ही बाजुने बंद आहे. निमुळता आहे, तसेच कडेच्या भिंतीहि जरा ऊंच आहेत. पुर्वी ईथे अजिबात वर्दळ नसायची. आधीच अरुंद असल्याने फ़ेरीवालेहि नसतात. त्यावेळी भरदिवसाहि हा ब्रिज क्रॉस करताना भिती वाटायची. शक्यतो ग्रुपनेच जात असु आम्ही, आता वर्दळ वाढल्याने, तो तितकासा भितीदायक ऊरला नाही. माटुंगा नंतर येते सायन स्टेशन. हे अंतर तसे बरेच आहे. मधे आशियातली सर्वात मोठी धारावि झोपडपट्टी लागते. पुर्वी ईथे अगदी सकाळच्या प्रहरीदेखील वेश्या रुळान्च्या कडेने ऊभ्या असायच्या. सकाळी त्यांचे दर्शन होने शुभ मानतात, कारण पुर्वी त्या सकाळच्या वेळी विश्रांति घ्यायच्या. घाशीराम कोतवाल नाटकात सकाळच्या प्रहरी ब्राम्हण स्त्रीया सडा घालताना आणि नाच्या झोपायची तयारी करताना दाखवल्या आहेत. पण ईथे मात्र त्या बायकाना दिवसभर काम करावे लागत असे. त्या नकळत्या वयातदेखील त्यांच्याबद्दल कणव वाटायची. आज त्या तितक्या दिसत नाहीत. स्मिता पाटिलच्या चक्र सिनेमात, ईथले सीन्स आहेत. प्रत्यक्ष सायन स्टेशन मात्र नजरेत भरत नाही. एकतर ते रस्त्याच्या पातळीच्या खाली असल्याबे, रस्त्यावरुन दिसतहि नाही. सायन पुर्वीपासुन बसने मुख्य भागाशी जोडलेले असल्याने, त्या स्टेशनवर फ़ार वर्दळ नसते. स्टेशनच्या जवळच दोन ऐतिहासिक वास्तु आहेत. एका टेकडीवर, गढीसारखे एक बांधकाम काळ्या दगडात आहे. पण तिथे कुणी जात नाही. रस्त्याच्या पलिकडे एका टेकडीवर जुने कौलारु बांधकाम होते. त्यावर पुर्वी एक कृत्रिम धबधबा पण होता. तीस वर्षांपुर्वीहि ते बांधकाम ढासळु लागले होते. तिथुन बराच मोठा परिसर नजरेस पडतो. आता मात्र ते सगळेच बंद पडलेय. पश्चिम ऊपनगरातुन म्हणजेच बोरिवलि, अंधेरी, वांद्रे येथुन येऊन पुण्याच्या दिशेने जाणार्या गाड्या, ईथे वळतात. सायनच्या दक्षिणेला व पश्चिम रेल्वेवरच्या वांद्राच्या दक्षिणेला रिक्शाना परवानगी नाही. सायन स्टेशनच्या बाजुचा जो रस्ता आहे, तो अनेक वर्षे खोदलेला होता. म्युनिसिपालिटीच्या कामगाराना खोदण्याची प्रॅक्टिस व्हावी, म्हणुन तो वापरत होते बहुदा. आता तो ठिक आहे. सायन स्टेशन सोडले कि ऊजव्याबाजुला कुला बांद्रा कॉम्प्लेक्सच्या ईमारती दिसु लागतात. वांद्राच्या ड्राईव्ह ईन थिएटरचा स्क्रीनहि दिसायचा तिथुन पुर्वी. धूम वैगरे सारख्या सिनेमात हा भाग दिसलाय, आपण ईथे माग जाऊ. सायननंतर येते कुर्ला. वाटेत, चुनाभट्टीहुन आलेली, हार्बर लाईनहि येऊन मिळते. मग येते कुर्ला स्टेशन. गेटवे ऑफ़ ईंडिया सारख्या ज्या ईमारती आहेत, त्या बांधायला लागणारा दगड, कुर्ला ईथल्या खाणीतुनच नेला होता. कुर्ला स्टेशनला एक टिपिकल मुस्लीम तोंडावळा आहे. पश्चिमेला स्टेशनलगतच, फ़टाक्यांची होलसेल दुकाने आहेत. तिथे बारा महिने कल्पनेपेक्षाहि कमी किमतीत फ़टाके मिळतात. मेंदीची पण होलसेल दुकाने आहेत तिथे. २७ डाऊन नावाचा एक सिनेमा आला होता. राखी होती त्यात. त्यातले बरेचसे शुटिंग ईथे झालेय. ( हा सिनेमा काय, किंवा आताचा डोंबिवलि फ़ास्ट सिनेमा काय. याची शीर्षकेच चुकीची आहेत. डाऊन अप असले उल्लेख फ़क्त, टाईमटेबल मधे असतात. आमच्या बोलण्यात ९.२३ ची घाटकोपर लोकल, सारखे उल्लेख असतात. असो. ) स्टेशनला जरी मुस्लीम तोंडावळा असला तरी स्टेशनला लागुनच, ब्राम्हणवाडी देखील आहे. स्टेशनजवळुनच, सांताक्रुज, अंधेरी, बांद्रा, अश्या पुर्व नगरात जाणार्या बसेस सुटतात. पुर्वेहुन पण मंत्रालय, माजगाव वैगरे भागात जाणारी थेट बससेवा ऊपलब्ध आहे. पुर्वेला स्टेशनला लागुनच नेहरु नगर नावाची, प्रचंड मोठी टिपिकल सरकारी साच्यातील ईमारतींची कॉलनी आहे. त्यातल्या बर्याचश्या आता पडल्यात. एक तर माझ्या डोळ्यासमोरच, पिसाच्या मनोर्याप्रमाणे झुकत झुकत पडली, पडलेल्या ईमारतींच्या जागी नव्याने ईमारती ऊभ्या रहात आहेत. या कॉलनीला लागुनच आमची शिवसृष्टी आहे. ईथेच एस्टीचा डेपो आहे. बाहेरगावी जाणार्या बहुतेक बसेस ईथुनच जातात. याच परिसरात अर्चना पाटकर, ऊर्मिला मातोंडकर, अश्विनि भावे या अभिनेत्री रहात होत्या. अश्विनिचे माहेर अजुन ईथेच आहे. स्नेहलता दसनुरकर या लेखिका पण ईथेच रहात. या स्टेशनपासुन एक वेगळी लाईन, रिफ़ायनरी आणि राष्ट्रिय केमिकल्स अंॅड फ़र्टिलायझ्र्स कंपनीत जाते. त्यामुळे चौदा लाईन्स आणि दहा प्लॅटफ़ॉर्म्स असा मोठा पसारा आहे ईथे. पुर्व आणि पश्चिम भाग अजुनहि जोडलेले नाहीत. ते जोडले तर फ़ारच सोयीचे होईल, सध्या तिथे भुयारी मार्गाचे काम चालु आहे. कुर्ला टर्मिनस जरी म्हणत असले, तरि ते स्टेशन ईथुन बरेच दुर आहे. तिथे जायला कुर्ल्यापेक्षा टिळकनगर हे स्टेशन सोयीचे आहे. कुर्ल्याच्या पुढे लागते, विद्याविहार असे काव्यमय नाव असलेले स्टेशन. सोमैय्या कॉलेजला हे सोयीचे ठिकाण. प्रिमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड हि पद्मिनी गाड्यांची निर्मिती करणारी कंपनी ईथेच होती. पुर्वी आणि आताहि मुंबईतल्या बहुतेक टॅक्सीज याच कंपनीच्या असत. पण आता ती कंपनी बंद आहे. पण तसे हे स्टेशन फ़ार रहदारीचे नाही. मग लागते घाटकोपर. या स्टेशनला एक गुजराथी चेहरा आहे. सांताक्रुजला ऊतरणारी विमाने ईथुन फ़ार खाली दिसतात. ईथे पश्चिमेला सर्वोदय हॉस्पिटल आहे. तिथे शंकर वैगरे देवतांच्या पंचवीस फ़ुटी ऊंच मुर्ती आहेत. पुर्वेला पंतनगर नावाची मोठी सरकारी वसाहत आहे. गिरणीसंप घडवुन आणणारे, डॉ. दत्ता सामंत याच भागात रहात होते. गारोडिया नगर हि पण एक मोठी वसाहत आहे ईथे. मध्यंतरी झालेल्या बोंबस्फोटात या स्टेशनचे नाव ऐकले असेलच. १९९३ च्या दंगलीत पण ईथे बरिच जाळपोळ झाली. त्यावेळी आम्ही खुषाल त्या भागातुन फिरत असु. अश्या कित्येक जखमा माझ्या मुंबईने रिचवल्या आहेत. स्टेशनजवळच, झुनझुनवाला कॉलेज आहे. त्यासमोर एक छोटा पुल आहे. तो भाग खुप बदनाम आहे. संध्याकाळच्या वेळी त्या पुलावर, समलिंगी संबन्धी लोकांची वर्दळ असते. सामान्य माणसाला जीव मुठीत घेऊनच जावे लागते तिथुन. घाटकोपर नंतर लागते विक्रोळी. हे स्टेशन आणि गोदरेज कंपनीचा अतुट संबंध आहे. ईथे बहुतेक परिसर त्या कंपनीने व त्यांच्या कर्मचार्यांच्या वसाहतीने व्यापलेला आहे. ईथे रेल्वे लाईनला लागुनच बहाव्याची अनेक झाडे आहेत. आणि ती बहरतातहि. ईथे थोडीफ़ार क्रिश्चन वस्ती आहे. स्टेशनला लागुनच एक चर्च आहे. कन्नमवार नगरहि ईथुन जवळच. मग लागते कांजुरमार्ग. छोटेसे असले तरी, पवई ला जायला हे सगळ्यात सोयीचे स्टेशन. पवई म्हंटले कि तुम्हाला आय आय टी आठवणारच. त्याचा रम्य परिसर ईथे आहे. पण तो जरा स्टेशनपासुन दुर आहे. याच परिसरात पवई लेक आहे. फ़ार पुर्वी पिण्याच्या पाण्यासाठी व नंतर औद्योगिक वापरासाठी या तलावातले पाणी पुरवत असत. सध्या मात्र त्याचा वापर थांबलाय. पण तरिहि तो जलाशय अजुन असल्याने, तो परिसर अजुन निसर्गरम्य आहे. रोडास हे हॉटेल ईथेच आहे. ब्लफ़मास्टरमधे ईथले काहि शुटिंग आहे. ( तसे त्या सिनेमात, मुंबईचे अनोखे दर्शन आहे. ) मग लागते भांडुप. या भागात काहि ईंडस्ट्रीज अजुन तग धरुन आहेत. पश्चिमेला काहि टेकड्या दिसतात, पण त्या हळु हळु झोपड्यानी गिळंकृत केल्यात. भांडुप नंतर लागते मुलुंड. या दोन स्टेशनमधले अंतर बरेच आहे. तिथे अजुन एक नाहुर नावाचे नविन स्टेशन होतेय. पण ते काम बरिच वर्षे चाललेय. मुलुंडला मराठी आणि गुजराथी अशी मिश्र वस्ती आहे. आता हेहि स्टेशन गजबजु लागलेय. ईथेहि उत्तम भाजीपाला मिळतो. मुंबई महानगरपालिकेची हद्द ईथे संपते. ( पश्चिम रेल्वेवर ती दहिसरला संपते ) . ईथेच मुंबईचा जकात नाका, ज्याला चेक नाका म्हणतात तो आहे. पण रेल्वेतुन जाताना, त्याचा काहि त्रास होत नाही. ठाण्यातल्या वागळे ईंडस्ट्रियल ईस्टेटला जायला ईथुन बस सुटतात. या स्टेशनच्या पश्चिमेला एक मोठा डोंगर दिसतो. बोरिवलीच्या नॅशनल पार्काची हद्द ईथपर्यंत आहे. ईथल्या चेकनाक्याजवळ एक मोठ्ठा मॉल झालाय. त्यातले सुपरमार्केट एवढे गजबजलेले असते कि ते एक ग्लोरिफ़ाईड वाण्याचे दुकानच वाटते. तरिहि हा परिसर अजुन हिरवागार आहे. मुलुंडनंतर येते ठाणे. ठाण्याचा पुर्व भाग आत्ता आतापर्यंत दुर्लक्षित होता. पश्चिमेला मात्र खुपच गर्दी असते. अगदी स्टेशनच्या बाहेरच एका कोपर्यात टांग्यांचा तळ होता. तिथुनच लोकल बसेस सुटतात. रिक्शांच्या चार चार लाईन्स तिथे असतात. ठाणे पुणे टॅक्सीजहि तिथुन सुटतात. जवळच पोस्ट ऑफ़िस, आणि काहि मिठाईची दुकाने आहेत. गावचा भाजीपालाहि असतोच. ईथेच एका कोपर्यात, एस्टी डेपो आहे. ठाणे खाडी पुल व्हायच्या आधी बाहेरगावी जाणार्या बसगाड्या ईथे थांबत असत. आता मात्र तशी गरज ऊरलेली नाही. त्यामुळे हा स्टॅंड तसा ओस पडलाय. अजुन तिथुन काहि गाड्या सुटतात नाही असे नाही. मध्यंतरी या स्टेशनचा परिसर अतिषय गचाळ झाला होता. एक जादुची कांडि फ़िरल्यागत तो सगळा नीटनेटका झाला होता, आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती आहे. एकेकाळी ठाणे ऊद्योगाने गजबजलेले होते. अनेक कंपन्यांच्या स्टाफ़ बसेस तिथुन सुटायच्या, त्या बसेस तर आता दिसतच नाहीत. ठाण्याला तळ्यांचे ऊपनगर म्हणत असत. त्यातली काहि तळी अजुन तग धरुन आहेत. ठाणे स्टेशनजवळच दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे. नाशिककडे जाणार्या, पुण्याकडे जाणार्या आणि कोकणात जाणार्या सगळ्या रेल्वे गाड्यांचे हे शेवटचे कॉमन स्टेशन आहे. पुढे दिव्यानंतर कोकण रेल्वेच्या गाड्या, आपला मार्ग बदलतात. ठाणे स्टेशनला लागुनच एक छोटा तलाव आहे. आणि त्यापलिकडे दिसतात ते मुंब्र्याचे डोंगर. पुढच्या भागात तिथेहि जाऊ.
|
| |
| Tuesday, January 17, 2006 - 6:54 pm: |
|
|
ठाण्याच्या पुढे कळव्याची खाडी ओलांडावी लागते. मुळ मुंबई जरी सात बेटे जोडुन झाली असली तरी, अजुनहि मुंबई एक बेटच आहे. कुठुनहि मुंबईत येताना खाडी, नदी वा समुद्र ओलांडावाच लागतो. कळव्याला रेल्वेचा आणि रस्त्याचा असे दोन ब्रिज आहेत. दोन्ही अजुन वापरात आहेत. कळव्याला रेल्वेची कारशेडदेखील आहे. कळव्यापासुन जवळच काहि मोठे ऊद्योगधंदे पुर्वापार वसलेले आहेत. मुकुंद, प्रिसीजन फ़ासनर्स वैगरे ईथेच आहेत. कळव्यानंतर लागते मुंब्रा. हे स्टेशन म्हणजे लागतेहि आणि लागत नाहिहि. कारण हे फ़क्त स्लो गाड्यानाच लागते. फ़ास्ट गाड्या हे स्टेशन टाळुन, पारसिकच्या बोगद्यातुन जातात. मुंब्र्याला जायला मात्र रेल्वेला या डोंगराला वळसा घालावा लागतो. हे गाव पुर्वीपासुन बांधकामाला लागणारी रेती आणि कुरमुर्यांसाठी प्रसिद्ध होते. अजुनहि तिथे हे दोन्ही ऊद्योग आहेत, पण तिथे आता मुसलमानांची दाट वस्ती आहे. सगळ्या गावावर याची अवकळा आहे. बुरख्यातल्या बायका हे ईथले कॉमन दृष्य. त्यातल्या कितीजणी मनापासुन घालतात, आणि कितीजणीना तो जबरदस्तीने घालावा लागतो, हे त्या परम दयाळु, अल्लालाच माहित. त्यातल्या अनेक बायका ईथे बुरखा घालुन गाडीत चढतात, आणि ठाणे गेले, कि या बायका बुरखा काढुन टाकतात. आत जीन्सपासुन मायक्रो मिनीपर्यंत काहिही घातलेले असते. धाडस करुन, एकीला विचारले होते तर म्हणाली होती, क्या करे हमारेमे ऐसाहि होता हे. बुरखा ना डालके घरसे निकलु, तो चेहरेपर तेजाब डालेंगे वो. ला ईलाह ईल्लिल्लाह, महम्मद रसुल लिल्लिलाह. पुर्वी हि जागा रम्य होती. अभिनेत्री नुतनचा ईथे बंगला होता. अजुनहि आहे. एका टेकडीवर तो आहे. ती टेकडी व वर जाणारा रस्ता, हे सगळेच तिच्या मालकिचे होते. ती गेल्यावर मात्र तो ओस पडलाय. जातिवंत कुत्र्यांची पारख असणारी, फ़्रेंच भाषेची जाणकार, पट्टीची पोहणारी आणि तरिहि श्रेष्ठ अभिनेत्री असणारी नुतन. अजुन विसरु शकत नाही मी. ईथला जो डोंगर आहे, तिथे अर्ध्या ऊंचीवर एका देवीचे देऊळ आहे. तिथपर्यंय व्यवस्थित वाट आहे. वरती प्रस्तरारोहणाचा सराव करण्यासाठी आदर्श कडा आहे. या डोंगराच्या पोटातुन एक पारसिक नावाचा बोगदा आहे. गाडीला दीड ते दोन मिनिटे लागतात तो पार करायला. आतमधे कायम पाणी झिरपत असते. घरातेल समस्यांवर ऊपाय म्हणुन, एका जोडप्याने ईथे आत्महत्या केली होती. शन्ना नवरेनी त्यावर नाटक लिहिले होते. याच कथेवर सिनेमाहि निघाला होता. रीमा, अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीसने त्यात भुमिका केल्या होत्या. आता अगदी या बोगद्याच्या तोंडापर्यंत ईमारती झाल्या आहेत. उत्तरेकडुन किंवा गुजराथमधुन कोकणात येणारी वहाने, ईथुन वळवावी लागतात. यानंतर लागते दिवा जन्क्शन स्टेशन. ईथुन एक रेल्वेमार्ग पश्चिम रेल्वेवरच्या वसईपर्यंत गेला आहे. हा मार्ग मी लहानपणापासुन बघत आलोय. या मार्गावर बरिच वर्षे नियमित वाहतुक नव्हती. आता ती सुरु झालीय. दिल्लीहुन गोव्याला येणारी राजधानी एक्स्प्रेस पण याच मार्गाने येते. वर लिहिल्याप्रमाणे कोकण रेल्वेहि ईथुनच पनवेलला जातात. दिव्यानंअतर लागते डोंबिवलि. या दोन स्टेशनमधे तब्बल ७ मिनिटांचे अंतर आहे. दोन्ही बाजुला हिरवीगार खाजणे आहेत. दलदलीचा भाग आहे. ईथेहि मधे एक स्टेशन व्हायचे आहे. डोंबिवलीला एक मराठी चेहरा आहे. अगदी पुर्वीपासुन हे गाव मराठमोळे आहे. पुण्यातेल डि एस के च्या होर्डिंग्ज वर जी लहान मुले दाखवलेली असतात, त्यांच्या चेहर्यावर पुणेकर म्हणुन जसा स्टॅंप मारलेला असतो, तसाच डोंबिवलीकरांच्या तोंडावर असतो. आम्ही मुंबईकर त्याना कितिहि गर्दीत ओळखु शकतो. लहान मुलातील भोचकपणा पण पुणेकरांच्या तोडीचा. एक ऊदाहरण देतो, आमच्या नात्यातली एक लहान मुलगी घरी आली होती, हल्ली बहुतेक मुलांचे असतात तसे तिचे दात पडलेले होते. मी तिला विचारले का गं दात कुठेत. तर तिचे उत्तर, आमच्या शाळेत मुळी दात असणारी मुलेच घेत नाहीत, चावतात ना एकेमेकाना, म्हणुन. तर हे असे डोंबिवलिकर. लाय लाय लायेकरणी, वाकड्या शेंड्याच्या गोवेकरनी, ईनीला गोंडा एसावकरनी, मोठा आंबाडा वसईकरनी असे एक लोकगीत होते. गावोगावच्या कोळणी कश्या ओळखायच्या याची यादी होती त्यात. तसे पुर्वी आम्ही शर्टाच्या कॉलरच्या आत रुमाल घातलेला तो डोंबिवलिकर, असे म्हणत असु. थट्टा सोडा, पण हे गाव मराठि संस्कृती जपणारे आहे. तिथे सतत काहितरी घडत असते. बहुतेक सगळे मध्यमवर्गी. त्यामुळे बहुदा नवरा बायको दोघेहे नोकरी करतात. या अश्या परिस्थितीमुळे, पोळीभाजी केंद्रे, पाळणाघरे आणि दिवसभर सेवा देणार्या बॅंका याचा ऊगम या गावात झाला असण्याची शक्यता आहे. डोंबिवलीत मोकाट गुरेहि खुप आहेत. रस्त्यावर, रेल्वेच्या पुलावर सगळीकडे ठाण मांडुन बसलेली असतात. या गावाच्या आसपास काहि आदिवासी पाडे आहेत. काहि औद्योगिक वसाहतिही आहेत. शन्ना नवरे ईथेच राहतात. आता ईथे अगदी बेशिस्त रितीने ईमारती बांधल्या आहेत. पुर्वी ईथे मोर दिसायचे, एवढा हा भाग निवांत होता. मग लागते ठाकुर्ली नावाचे छोटेसे स्टेशन. हा तसा डोंबिवलीचाच भाग म्हणावा लागेल. अगदी छोटेसे गाव आहे हे. ठाकुर्ली नंतर लागते कल्याण जंकशन. ईथुन पुण्याला आणि नाशिकला जायचे मार्ग वेगळे होतात. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या प्रसंगामुळे हे गाव ऐतिहासिक काळात प्रसिद्ध होतेच. पण त्या पुर्वीहि व्यापाराचे एक मोठे केंद्र होते. पश्चिमेला रोम किंवा पर्शियापर्यंत होणार्या व्यापाराचे हे एक ठाणे होते. मुंबईच्या समुद्रातील घारापुरीचे बेट, नालासोपार्याच्या शुर्पारक टेकड्या आणि कल्याण हि या मार्गावरची ठाणी होती. कल्याणहुन अनेक ठिकाणी एस्टीने जाता येते, त्यामुळे गिरिभ्रमणवाल्यांचे आवडते स्थानक आहे हे. कल्याण मुरबाड रोडवर नाणेघाटाची वाट सुरु होते. ईथुन थेट जुन्नरपर्यंत नाणेघाट जातो, हा पुर्वीचा व्यापाराचा मार्ग होता. ईथला माळशेज घाट तर पावसाळ्यात वेड लावतो. हिरव्यागार टेकड्या, नद्या, धबधबे, सरोवर यांची रेलचेल आहे ईथे. पण तरिहे हे स्टेशन मात्र अत्यंत गचाळ आहे. ईथे गाड्या धुतल्या जात असल्या तरी, परिसर कायम घाणीने भरलेला असतो. स्टेशनचा परिसरहि धुळीने घाणीने भरलेला असतो. खरे म्हणजे मला ईथे थांबायचे होते, कारण या पुढच्या अनेक स्टेशनबद्दल मी लिहु शकणार नाही. तरिहि मित्रांच्या आग्रहाखातर काहि स्टेशन्स बद्दल लिहिनच.
|
| |
| Thursday, January 19, 2006 - 4:15 pm: |
|
|
कल्याणहुन उत्तरेकडे जाणारा फाटा कसारा ईगतपुरी करत नासिकला जातो. त्यापैकी कसार्यापर्यंत लोकल्स जातात. या मार्गावर शहाड, टिटवाळा, आसनगाव, आटगाव, खर्डी वैगरे स्टेशन्स लागतात. त्यापैकी काहि स्टेशन्स बघु. शहाडला स्टेशनजवळच एका टेकडीवर बिर्ला मंदिर आहे. रेल्वेतुनच ते दिसु लागते. एक सोपी चढण चढुन आपण तिथे पोहोचतो. अत्यंत रम्य परिसर, उत्तम कोरिवकाम आहे. देऊळ संगमरवरी आहे. पण ते बिर्ला मंदिर असल्याने, तांत्रिक पद्धतीने बांधलय. त्यामुळे मनात अजिबात भकतीभाव निर्माण होत नाही. पिकनिक स्पॉट म्हणुन ती जागा छान आहे. आणि त्यासाठीच लोक तिथे जातात. शहाड नंतर लागते टिटवाळा. ( मधे बहुदा आंबिवलि स्टेशन आहे. ) टिटवाळ्याला गणपतिचे एक प्रसिद्ध देऊळ आहे. स्टेशनपासुन बरेच दुर आहे. तिथे जाण्यासाठी आता रिक्शा आहेत. पुर्वी टांग्याने जावे लागायचे. मुर्ती सुंदर आहे. देवळाच्या मागे एक तलाव आहे व मुर्ती त्यात सापडली अशी कथा आहे. देवळाची बांधणी जुन्या पद्धतीची असली तरी, प्रशस्त आहे. पुर्वी हे एक निवांत गाव होते. काहि राईस मिल्स होत्या तिथे. आता मात्र हॉटेल्स झाली आहेत. देऊळहि पुर्वी साधे होते. संकष्टी, मंगळवार अश्या दिवशीच गर्दी असायची. मग तिथले प्रस्थ एकदम वाढले. देवळाबाहेर रांग लावायची व्यवस्था झाली. पण मग एकदम तिथली गर्दी ओसरली. पुर्वी मराठी लोकात हे स्थान लोकप्रिय होते, आता ईतर भाषिक जास्त दिसतात. यामागची कारणे मला माहित नाहीत, पण असे झाले आहे हे खरे. कल्याणहुन पुढे स्टेशन्समधील अंतर बरेच आहे. आजुबाजुला संह्याद्रीच्या डोंगररांगा सोबत करत असतात. कसार्यापर्यंत हे सह्यकडे सोबत करतात. पुढे ईगतपुरीचा घाट सुरु होतो. कसारा जरी प्रशस्त असले तरी तुलनेने वर्दळ कमी असल्याने, ईतके गलिच्छ नाही. पुर्वी नासिकहुन येताना कसार्यापर्यंत टॅक्सीने येऊन मग लोकलने मुंबईला येणे जास्त सोयीचे होते. नाशकात अंबॅसेडर टॅक्सीज मिळायच्या. मागे चार व पुढे ड्रायव्हरखेरीज तीन माणसे भरुन ते येत असत. कसार्याचा घाट तसा अवघड आहे, आणि तिथे दुध, फ़ळे, भाजीपाला यांची बर्याच प्रमाणात वाहतुक चालु असते. त्या तसल्या वाहतुकितुन, आणि अगदी अडचणीत बसुन ते कुशल सारथी वेळेत पोहोचवत असत. दर नाममात्र होते, पण पुर्ण भरल्याशिवाय गाडी नाशकातुन सोडत नसत. आधी बसलेल्या प्याशिंजरानी कुरबुर केली तर, कसार्याला लोकल दिसली तरच पैसे द्या, अशी पैज लावली जायची. अर्थात हा प्रवास जीव मुठीत घेऊन आणि डोळे मिटुनच करावा लागायचा. आता भिवंडि बायपास वैगरे झाल्यापासुन नाशकाला जाणे तसे सुकर झालेय. कल्याणहुन पुण्याकडे जो फाटा जातो त्यावर पुर्वी कर्जतपर्यंतच लोकल जात असे. काहि वर्षांपुर्वी तिथुन खोपोलि पर्यंत एक मार्ग झाला आणि आता काहि लोकल्स तिथपर्यंत जातात. कल्याणहुन विठ्ठलवाडी, उल्हासनगर, बदलापुर, अंबरनथ, भिवपुरी रोड, नेरळ, शेलु, कर्जत अशी स्टेशन्स लागतात. त्यातली काहि बघु आता. उल्हासनगर हे उल्हास नदीच्या काठावर वसलेले आहे. या नावाबरोबर सिंधी लोकांचीच आठवण येते. सिंधि लोकांची वेदना तशी कळण्यासारखी नाही. ते तर हिंदुच. भारताच्या फ़ाळणीच्या वेळी पंजाब आणि बंगाल प्रांताची फ़ाळणी झाली. त्यामुळे सीमेकडच्या दोन्ही बाजुच्या लोकाना हक्काची जमीन मिळाली. सिंध प्रांत आपल्या राष्ट्रगीतात तेवढा ऊरला. तो पुर्णपणे पाकिस्तानात गेला. आणि तेंव्हापासुन त्यांच्या माथ्यावर निर्वासित, हा जो शिक्का बसला तो कायमचाच. कोल्हापुरला तर त्यांचा ऊल्लेख तसाच केला जातो. माझी एक मावशी एका हॉस्पिटलमधे एक ऑपरेशन बघत होती. मी म्हणालो, का गं भिती नाही वाटत का ? तर ती म्हणाली, आपल्यापैकी नव्हे ती बाई, निर्वासितांपैकी आहे. तिचं काय वाटणार ? मला वाटतं हा प्रसंग पुरेसा बोलका आहे. जगात बहुतेक देशात त्यांची वस्ती आहे. हॉंग कॉंग किंवा दुबईतल्या व्यापारावर त्यांचा प्रभाव सहज जाणवतो. पण ते भारताच्या मुख्य प्रवाहातुन कायमच दुर ठेवले गेले. तर अश्या या लोकांचे हे गाव. पुर्वी ईथे कॅंप्स होते. गाड्या फ़ार नेमक्या होत्या, त्यावेळी कल्याणहुन एस्टीने यावे लागायचे. पांढरीशुभ्र घरे, बंदिस्त अंगण असे स्वरुप असायचे त्यांच्या घराचे. पण ते लोक मुळातच चिवट. व्यापाराचे कौशल्य त्यांच्या रक्तातच असते. पुर्वीहि तिथे त्यांची खाद्यपदार्थ, म्हणजे पापड, भज्या विकणारे विक्रेते होते. आजचे ऊल्हासनगर त्यानी ऊभे केलेय. सगळीकडे मोठमोठ्या ईमारती दिसतात. पण तरिहि बकालपणा तेवढाच. रेल्वेलाईनच्या बाजुनेच एक घाणीने भरलेली नाला वाहतो. हे दृष्य एक चित्रकाराने फ़ार परिणामकरित्या रंगवले आहे. बहुतेक गायतोंडे, CBDG . त्यापुढे बदलापुर. पुर्वी हे खरेच एक गाव होते. सुंदर टेकड्या होत्या. आता तिथेहि ईमारती झाल्या आहेत. या गावची एक खासियत म्हणजे ईथली जांभळे. मोसमात मुंबईत मिळणारी टपोरी गोड जांभळे ईथुनच येतात. ईथे एक रम्य पण धोकादायक धबधबा होता. त्याखालच्या रांजणात अनेक जण बुडुन मरायचे. गेल्या पावसाळ्यातील पुरामुळे हा रांजण वाळुने भरला, व या धबधब्याच्या दरारा कमी झाला. लहानपणी भुगोलाच्या पुस्तकात आपण वाचलेले होतेच कि अंबरनाथ प्रसिद्ध होते ते विमको या काड्यापेटीच्या कारखान्यासाठी. आजहि तो तिथे आहे. ( दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे सिनेमात, जो प्रसंग युरपमधला म्हणुन दाखवला होता, त्यात काजोलच्या हातात विमकोची काडेपेटी आहे. ) याशिवय काहि मोठ्या ईंडष्ट्रीज तिथे आहेत. पण अंबरनाथ हे नाव मिळालय ते तिथल्या प्राचीन शिवालयामुळे. उत्तम कोरिव काम असलेले हे देऊळ आजहि ऊभे आहे तिथे. आणि आपल्या थोर प्रथेप्रमाणे दुर्लक्षितहि झालेय. वांगणीला एक प्रचंड मोठे पठार आहे. गावापासुन दुर अशी हि निवांत जागा आहे. ईथुन अतिशय मनोहारी आकाशदर्शन होते. शहरभागातल्या विद्युत रोषणाईमुळे आपल्याला ईतके अनोखे दर्शन कधी होवुच शकत नाही. तुलनेने अलिकडचे असे एक शेलु, या गोड नावाचे स्टेशन मधे लागते. या स्टेशनपासुन जवळच एक नदी बारमाहि वहात असते. ईथे तिचे रुप अगदी खेळकर आहे. पाण्यात पाय सोडुन ईथे निवांत बसता येते. या नदिकाठी अनेक रात्री मी मित्रमंडळींबरोबर तंबुत काढलेल्या आहेत. अजुनहि हि जागा निवांत आणि रम्य आहे. आता तिथे राहण्या जेवण्याची सोय होवु शकते. मग लागते नेरळ. हे गाव जास्त ओळखले जाते ते माथेरानसाठी. ब्रिटिश अधिकार्याच्या चौकशीला, माथी रानच हाय कि समदं, अश्या मिळालेल्या उत्तराने या गावाला हे नाव पडलेय. नेरळहुन वर जाण्यासाठी छोटी रेल्वेगाडी आहे. तीहि मध्य रेल्वेच चालवते. वाटेत जुम्मापट्टी नावाचे स्टेशन लागते. गाडी अगदी हळुहळु जाते. माथेरानला जायला तो सगळ्यात सोयीचा मार्ग. तसा डांबरी रस्ता आहे, पण तो दस्तुरी नाक्यापर्यंतच. पुढे रस्ता असला तरी ऊपयोग नसता झाला, कारण या गावात अजुनहि गाड्याना परवानगी नाही. तिथे फ़क्त घोडे, घोडागाड्या आणि माणसानी ओढायच्या रिक्शा चालतात. मुंबईकरांचे आवडते हिलस्टेशन आहे ते. वरती पाण्यासाठी शार्लोट लेक असल्याने, पाण्याची सोय आहे. वर प्रचंड सपाटी आहे. ( प्रबळगडावर पाणी असते तर तिथेहि असेच झाले असते. ) हा निळाशार तलाव विमानातुनहि दिसतो. ईथे अजुनहि बर्यापैकी हिरवाई आहे. ऊन्हाळ्या पावसाळ्यात ईथे पर्यटकांची गर्दी असते. तिथले सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळ्यात तिथे जावे. कवेत घ्यायला जिवलग नसेल तर ती ऊणीव निसर्ग भरुन काढतोच. मग लागते कर्जत. कर्जतहुनहि जवळपास जायला अनेक गडकिल्ले आहेत. ईथुन पुढे खंडाळ्याचा घाट सुरु होता. जिवनयान का सिरा, म्हणजेच जनरेटर नसलेल्या लांब पल्ल्यांच्या गाड्याना ईथे दोन ज्यादा ईंजिन्स जोडावी लागतात. पण लोणावळा पुणे धावणार्या लोकल्स मात्र अश्या मदतीशिवाय, पुण्याला गेल्या होत्या. शेवटी लोकलचे चैतन्य ते तिचे स्वतःचे आहे. ईतक्या प्रचंड लोकसंख्येला धावते ठेवण्यात तिचा मोठा हात आहे. रोजची गाडी चुकली तर आम्हाला अगदी चुकल्याचुकल्यासारखे होते. आजहि मी हे सगळे खुप मिस करतोय.
|
| |
| Friday, January 27, 2006 - 5:45 pm: |
|
|
BEST म्हणजे बॉंबे एलेक्ट्रिसिटी सप्लाय ऍंड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग. पुर्वी या बसचे नाव असे रोमन लिपीत असायचे, मग आता ते देवनागरीत आलेय, पण या नावाला मात्र ती जागतेच. नावापेक्षा ते बिरुदच झालेय. काशी देखी, मथुरा देखी त्याप्रमाणे भारतातली अनेक शहरे बघितली, पण या बेस्टला खरेच तुलना नाही. फ़ार पुर्वी मुंबईत ट्राम्स होत्या. मी काहि त्या बघितल्या नाहीत. ( जब्बार पटेलांच्या आंदेडकर, सिनेमात दिसली होती ट्राम ) त्या विजेवर चालायच्या, त्याहि पुर्वी घोड्यानी ओढायच्या ट्राम होत्या. माझे वडील ट्राम्सच्या खुप आठवणी सांगायचे. एका आण्यात त्यावेळी अर्धी मुंबई बघता यायची. मला ट्राम दाखवायची, त्याना खुप ईच्छा होती, पण त्यावेळी ट्राम्स मुंबईतल्या म्युझियममधे पण शिल्लक नवती. एकदा त्याना देवनारच्या BEST स्टाफ़ क्वार्टर्स च्या कुंपणात, ट्रामच्या रुळ दिसले, तेहि त्यानी मला कौतुकाने दाखवले होते. आज त्याच भावनेने तुमच्यासमोर मी हा लेख ठेवतोय. ( मी अगदी कोलकत्त्यामधलिहि ट्राम बघु शकलेलो नाही अजुन, मी बघितली ती स्वित्झरलंड मधे. ) मुंबईतले पब्लिक ट्रान्स्पोर्ट खरोखरच सुखदायी आहे. त्यातली गर्दी आमच्या अंगवळणी पडलीय, तरिहि त्यामुळे होणारी सोय मात्र, आमचे जीवन सुसह्य करते. मुंबईच्या बेस्टच्या बसेसचे रंग अनेक वर्षे बदललेले नाहीत. लिपीतला बदल सोडला तर बाकि बदल नाही. मला आठवतेय, त्यावेळी BEST चे मराठीकरण मुवीपुद असे झाले पाहिजे, अशी पत्रे पेपरमधे आली होती. पण लोकानी ती मागणी ऊचलुन धरली नाही. ( खात्रीने सांगतो, तो पत्रलेखक डोंबिवलीचाच असणार. कडोमपा, म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका, असा शब्द फ़क्त तेच प्रचारात आणु शकतात. ) या बेस्टने सातत्याने जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, आणि आजहि हे प्रयत्न चालुच आहेत. बसचे तिकिटाचे दर आजहि अगदी परवडण्यासारखे आहेत. १९७४ साली चेंबुर ते दादर तिकीट, ३५ पैसे होते, ते आज ५ रुपये झालेय. तरिहि आज ते दर नगण्यच आहेत. १९७१ च्या बांगला निर्वासितांचा प्रश्ण सोडवण्यासाठी तिकिटावर ५ ते १५ पैसे अधिभार लावण्यात आला. तो आजहि चालु आहे. तरिही प्रत्यक्ष प्रवाश्याना त्याचा जाच नाही, कारण १ रुपया ८५ पैश्याच्या तिकिटावर १५ पैसे अधिभार लावुन, तिकिटाची किम्मत, ठरवलेली असते. पुर्वी तिकिटे रंगीत असायची. त्याच्या किमती पण पैश्यात असायच्या. खुपदा लांबच्या भाड्यासाठी कंड्क्टर्सना दोन तीन तिकिटे द्यावी लागायची. अलिकडे ती तिकिटे पुर्ण रुपयात झाल्यापासुन तो प्रश्ण सुटलाय. पुर्वी सुट्या पैश्यांची टंचाई निर्माण झाली होती, तेंव्हा बेस्टने स्वताची कुपन्स विकायला काढली होती. ( या नाण्यांच्या टंचाईच्या कारणांची खुप चर्चा व्हायची त्यावेळी. वसईच्या आणि कळव्याच्या खाडीत रेल्वेतले प्रवासी नाणी टाकतात, त्यामुळे टंचाई होते, असेहि कारण सांगत त्यावेळी ) हि कुपन बसच्या डेपोतच मिळत. त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीत, ती कुपने म्हणजे लोकाना बिनव्याजी गुंतवणुक वाटत असे. मग सुट्या पैष्यांच्या ऐवजी, त्या कुपनांचाच वापर होवु लागला. पुढे हॉलंडहुन स्टीलची नाणी आयात झाली आणि हि टंचाई एकदाची संपली. त्यावेळी कंडक्टरशी हमखास वाद होत असत, आणि ते आपली चामड्याची अर्धगोल झोळी ऊघडी करुन दाखवत असत. अगदीच नड असली तर ते ऊरलेले पैसे वडाळा डेपोतुन मिळायची सोय होती. कंडक्टर तसे तिकिटाच्या मागे लिहिन देत असे. पण मग प्रवासीच त्याला तयार होत नसे. पुढे तिकिटे मराठीत छापायला सुरवात झाली. आजहि कंडक्टरकडे ज्या तर्हेने तिकिटांची बंडले दिली जातात, त्याच्याकडे बघुन त्यांची दयाच येते. ती सगळी तिकिटे संभाळणे व त्याचा हिशेब ठेवणे, अगदी कटकटीचे असते. ओमानमधे अगदी छटेसे हातयंत्र वापरुन, बसची तिकिटे तिथल्या तिथे प्रिंट करुन देतात. आपल्याकडे अशी सोय असती तर खुप बरे झाले असते. कंडक्टरच्या हातात जो पंच असतो तो हि खास, तिकिटे पंच करण्याबरोबर, एक खास आवाज काढण्यासाठी त्याचा ते ऊपयोग करतात. हल्ली तसा आवाज करायची फ़ारशी गरज ऊरलेली नाही. या तिकिटाने ते नेमके काय पंच करतात, याची मला ऊत्सुकता होती. एकाला विचारल्यावर ते, प्रवासी जिथे बसमधे चढला तिथल्या स्टॉपचा स्टेज नंबर पंच करतात. शिवाय सामानाचे तिकिट, लहान मुलाचे तिकिट अश्या काहि नोंदी ते करतात, अशी माहिती दिली होती. हे स्टेज प्रकरण फ़क्त त्यांच्या पुरतेच असते. सामान्य प्रवाश्यांचा त्याच्याशी कधी संबंध येत नाही. बसच्या मॉडेलमधे दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. पुर्वी जरा अरुंद बसेस असायच्या. पाय ठेवायला पण फ़ारशी जागा नसायची. खिडक्या छोट्या होत्या. मग मात्र सध्या वापरात असलेल्या प्रशस्त बस आल्या. त्यात व्यवस्थित मोकळी जागा असते. पुर्वीच्या बसमधे बसल्या जागी पडलेले पैश्याचे पाकिट मला डेपोत गेल्यावर परत मिळाले होते, कारण त्यावेळी ती जागा अडचणीची होती, व पाकिट सहज कुणाच्या नजरेलाहि पडले नसते. आता प्रशस्त जागेमुळे, बाईची पिनसुद्धा लपुन रहात नाही. आता नविन मॉडेलच्या लाल रंगाच्या भारत ३, मानकाच्या बसेस आल्या आहेत. डबल डेकर बसचे पहिल्यापासुन मुलाना आकर्षण होते. त्यातल्या काहि बसेस अजुनहि ठराविक रुट्सवरती चालवल्या जातात. यापैकी काहि बसेसना पुढच्या बाजुने दरवाजा करुन ऊतरायची सोय करण्यात आली होती. अजुनहि मला वरच्या डेकवरुन प्रवास करायची हौस आहे, आणि जेंव्हा जेंव्हा शक्य असेल तेंव्हा ती मी पुरवुन घेत्तो. वरच्या डेकवर जर कसला त्रास होत असेल तर कुरवाळणार्या फ़ांद्यांचा. तो टळावा म्हणुन बेस्टकडे झाडे छाटण्यासाठी छत नसलेली बस असायची. अशी एक वरुन ऊघडी असलेली बस निलांबरी नावाने पर्यटकांसाठी चालवली जात असे. काहि सिनेमात ति आपल्याला दिसली देखील. त्यापुर्वी ट्रेलर पद्धतीच्या बस होत्या. त्या तर प्रचंडच दिसायच्या. त्याहि काहि ठराविक रुट्सवरतीच चालवल्या जायच्या. त्या बसला वळणे जरा त्रासदायक व्हायचे, म्हणुन त्या बसेस आता वापरात नाहीत. त्यामधे पण शेवटी जिना असलेली आणि मधे जिना असलेली अशी दोन मॉडेल्स होती केवळ अपघात होण्याची शक्यता होती म्हणुन या बसेस सेवेतुन मुक्त केल्या गेल्या, पण ईतक्या वर्षात बेस्टच्या बसेसचे मोठे अपघात झालेले कधी माझ्या वाचनात नाही. या बसेसचे स्टॉप्स रस्त्याच्या कडेला आणि त्यानी जाताना मात्र मधुन जायचे अश्या नियमामुळे, या बसेस सारख्या ईकडुन तिकडे करत असतात. मारुति सारख्या लहान गाड्याना तर ते चालक दाबुनच टाकतात, पण तरिहे त्यांचे ड्रायव्हिंग संयमपुर्णच असते. अचानक ब्रेक लावलाय, ऊगाचच वेग वाढवलाय असले प्रकार ते सहसा करत नाहीत. पुर्वी ड्रायव्हरच्या बाजुने ऊतरायची सोय नव्हती. आता बहुतेक सिंगल डेकर बसेस मधे ती असते. बस चालु असताना प्रवाश्यानी दाराजवळ गर्दी करु नये अशी अपेक्षा असते. प्रवाश्याना रोखण्यासाठी ड्रायव्हरच्या हाताशी एक आडवा दांडा असतो, त्याचाहि वापर अगदी क्वचितच ते करतात. साईड मिररच्या आड कुणी येत असेल, तर तिथुन बाजुला व्हायची ते विनंत करतात ईतकच. पुढच्या दरवाज्यातुन फ़क्त अपंग, व्रुद्ध आणि गरोदर स्त्रिया यानाच चढायची परवानगी असते, पण ड्रायव्हरला विचारुन, चढल्यास सहसा ते आक्षेप घेत नाहीत. यासंबंधी बेस्टकडुन काहि खास प्रयत्न झालाचे मला तरी जाणवतेय. त्या दोघांचेहि सौजन्य खरेच तारिफ़ ए काबील असते. विपरित वैयकतिक अनुभव नसतीलच असे नाही, पण ते अपवादच. या बसेसची निगराणी आणि स्वच्छताहि नीटच राखलेली असते. सहसा बसमधे घाण आणि कचरा आढळणार नाही. घाण असली तर ती नुकतीच प्रवाश्यानी केलेली असली पाहिजे. सीट्स हि न फ़ाडलेल्या वैगरे असतात. खिडक्यांच्या काचा व्यवस्थित बंद होतात. शक्यतो ग्रफ़िटी वैगरे नसते. या बसेसचे नंबर्स हे मुंबईबाहेरच्या प्रवाश्याना गुढ वाटते, पण मुंबईकराना ते चांगलेच परिचीत असतात. या नंबराचे एक लॉजिक असते. म्हणजे ९० नंबरच्या बसचा रुट माहित असेल तर ९२, ९३ बसेस जवळपास त्याच मार्गावरुन जातात. पुर्वी तशी सोय नव्हती, पण आता काहि ठिकाणी हे रुट्स नीटपणे लिहिलेले असतात. शिवाय कंडक्टर किंवा ईतर प्रवाश्याना विचारल्यास सहसा दिशाभुल केली जात नाही. या विचारण्यावरुन आठवले. ग्रामीण भागात कसे विचारले जाते, याचा नमुना बघा. समजा तुम्ही कोल्हापुरला एका एस्टीत खिडकित बसला आहात. तर एखादा पागोटेवाला तुमच्याकडे ऊगाचच टक लावुन बघेल. मग विचारेल, गाडी कंची. तुम्ही सांगाल रत्नागिरी. मग तो विचारेल देवरुखमार्गे जाते का, तुम्ही हो म्हणालात, कि विचारेल साखरप्याला थांबते का, आता तुमचा धीर संपतो, तुम्ही विचारता, मामा तुम्हाला कुठे जायचेय, तर तो म्हणेल गारगोटीला. मग आता गारगोटी कुठे, हे विचारायची वेळ तुमच्यावर येते. मुंबईत सहसा असे केले जात नाही. जिथे जायचे असेल तिथे हि बस जाते का असे विचारलेत तर नीट उत्तर मिळतेच. शिवाय तिथे कुठली बस जाते, हेहि आवर्जुन सांगितले जाते. तेहि नीट समजेल अश्या भाषेत. कोल्हापुरसारखे, त्यो पायपाचा डांब दिसत्योय न्हवं का, त्या तितं ती बाई ऊभारलीय न्हवं का, तिथल्या गल्लीत जावा नि ईच्यारा कि. असे सांगितले जात नाही. मुंबईत पत्ता कुणाला विचारायचा, याचे काहि आडाखे आहेत. बसच्या बाबतीत कंडक्टर किंवा स्टॉपवरचे ईतर प्रवासी हे योग्य. ( ईतरवेळी रस्त्यावरचा पोलिस, रिकामा दुकानदार, केमिष्ट या योग्य व्यक्ती आहेत. रस्त्यावरच्या माणसाला विचारलेत तर तो फ़सवण्यापेक्षा, मुझे मालुम नही, मै नया हु, असे सांगण्याची शक्यता जास्त. ) मी आता जरि तारिफ़ करत असलो, तरी एकेकाळी या बेस्टने आम्हाला भरपुर मनस्ताप दिला होता. एकतर त्यावेळी रुट्स अगदी मर्यादित होते. बसेस हि अगदी कमी होत्या. स्टॉपहि नीट नसायचे. अर्धा अर्धा तास बसची वाट बघावी लागायची. बस बहुदा आधीपासुनच भरुन यायची. स्टॉप जवळ आला कि कंडक्टर डबल बेल वाजवुन निघुन जायचा. थांबली तरी बसमधे शिरायलाहि जागा नसायची. दरवाज्यात लोक लटकत असत. बायकाना तर अजिबात बसमधे शिरता यायचे नाही. प्रवासी चढत असतानाच, डबल बेल मारली जायची व बस निघुन जायची. बसमधे सुट्या पैश्यावरुन वाद ठरलेला. बसायला जागा क्वचितच मिळायची. बसमधे पुरेशी खेळती हवा नसायची. ट्युबलाईट्स नसायच्या. ऊतरतानाहि धक्काबुक्की व्हायची. एकच दरवाजा असल्यामुळे चढणारे आणि ऊतरणारे, यांची खेचाखेची व्हायची. अनेकवेळा बस पुढे जाऊनच ऊभी रहायची. ट्राफ़िक जाम ठरलेला. हातातले सामान संभाळता नाकी नऊ यायचे. लहान मुले तर रडायलाच लागायची. पण गेल्या पंधरा वीस वर्षात, परिस्थितीत खुपच सुधारणा झालीय. आज हा प्रवास तितकासा त्रासदायी ऊरलेला नाही. पुढच्या भागापासुन, अश्याच काहि रुट्सवरुन आपण फ़ेरफ़टका मारणार आहोत. सो डोंट मिस द बस.
|
| |
| Saturday, January 28, 2006 - 5:15 pm: |
|
|
आपण सुरुवात करुया ती मुंबईच्या दक्षिण टोकाकडुन. सी एस टी स्टेशनहुन ३ नंबरची बस पकडुन तुम्ही ईथे येऊ शकता. या भागाला म्हणतात नेव्ही नगर. नावाप्रमाणेच हा भाग नेव्हीच्या ताब्यात आहे. ईथे अर्थातच नेव्ही स्टाफ़चे क्वार्टर्स ईथे आहेत. या भागात एक वेगळीच शांतता आहे. नेव्हीच्या सुबक ईमारती ईथे आहेतच, पण अजुनहि गर्द हिरवाई ईथे आहे. नेव्हीनगरच्याहि पुढे टि आय एफ़ आर ( टाटा ईंस्टिट्युट ऑफ़ फ़ंडामेंटल रिसर्च ) चे आवार आहे. काम असल्याशिवाय ईथे प्रवेश नाही, पण एकदा का प्रवेश मिळवलात कि मात्र एका वेगळ्याच दुनियेत आपण शिरतो. TIFR ची मोठी आडवी ईमारत तर आहेच पण या परिसरात समुद्र अशोक, देशी बदाम यांची भरपुर झाडे आहेत. छान टप्पोरे बदाम मिळतात ईथे. या शिवाय एक विस्तीर्ण पण खाजगी समुद्रकिनारा आहे. मुंबईतला हा सर्वात देखणा किनारा आहे. समोर कुलाबा दांडि म्हणुन एक दिपस्तंभ आहे. जयंत नारळिकर ईथे संशोधन करत असत. दिलिप प्रभावळकर पण ईथे काहि काळ होते. याच आवारात एक मोठे नाट्यगृह आहे. सई परांजपेने ईथे खुप पुर्वी हिंदी तमाशा सादर केला होता. त्यात जेंव्हा कृष्ण पेंद्याला गौळणीना अडवायला सांगतो, तेंव्हा पेंद्या त्याला म्हणतो, अडवुन काय करायचे, त्याला कृष्णाने ऊस्फुर्तपणे उत्तर दिले होते, ” फ़ंडामेंटल रिसर्च करेंगे ” . पण वर लिहिल्याप्रमाणे ईथे सामान्य जनाना प्रवेश नाही. तरिहि याच परिसरात एक छोटेसे शिव मंदीर आहे, आणि सभोवताली छोटे ऊद्यान आहे. अत्यंत निवांत असा परिसर आहे हा. ईथुन व्हीटीला येताना बराच भाग समुद्रकिनारा आणि त्या काठची दाट जंगलातुन जातो. मधे एक अफ़गाण चर्च लागते, हे मुंबईतले एक पुरातन चर्च आहे. मग आपण कुलाबा भागात शिरतो. हा भाग म्हणजे कुलाबा कॉजवे. पुर्वी आताचा रायगड जिल्हा कुलाबा जिल्हा म्हणुन ओळखला जात असे. हा भाग म्हणजे मुंबईच्या आद्य बेटापैकी एक. मध्यंत्री बहुतेक सगळ्या हिंदी सिनेमात शेवटच्या मारामारीच्या प्रसंगात एक पुरातन मिल दिसायची, ती मुकेश मिल ईथेच आहे. त्यानंअतर ईलेक्ट्रिक हाऊस हा भाग लागतो. मग अचानक अरब लोकांची गर्दी दिसु लागते. हे अरब लोक त्यांच्या देशात जरी तो पांढरा झगा घालत असले, तरि ईथे ते जीन्स टि शर्ट मधे दिसतात. त्याना लागतील अश्या वस्तुंचे फ़ेरीवाले ईथे आहेतच. भिकारी, गर्दुले पण असतातच. अर्थात या सगळ्यांचा जाच आपल्याला होत नाही. बुटांची काहि मोठी दुकाने ईथे आहेत. हे सगळे संपते ते रिगलच्या चौकात. रिगल सिनेमासमोर एक मोठे सर्कल आहे. हे थिएटर छोटेसे असले तरी ओल्ड वर्ल्ड चार्म राखुन आहे. त्याला लागुनच काहि जुन्यापद्धतीची रेस्टॉरंट्स आहेत. तिथुन एक रोड गेटवे कडे जातो. गेटवेचा परिसर अनेक सिनेमात तुम्ही बघितला असालच. तिथे समोरच ताजची दोन मोठी हॉटेल्स आहेत. गेटवेहुन समुद्रात फ़ेरफ़टका मारता येतो. तिथुनच घारापुरी म्हणजेच एलीफंटा केव्हज ना जाता येते. तिथली त्रिमुर्ती प्रसिद्धच आहे, पण बाकिच्या मुर्तींची तुटफ़ुट झालीय. चिनी नानकिंग नावाचे एक आद्य चिनी हॉटेल ईथे आहे. प्रचंड मोठ्या ग्लासमधे ऊसाचा रस देणारा एक विक्रेता ईथे आहे. गेटवेच्या डाव्या बाजुला गोदीचा परिसर आहे. त्याला कर्नाक बंदर म्हणतात. बाहेरुन कल्पना येणार नाही, पण ईथपर्यंत रेल्वेची मालगाडी येते. अर्थात हा परिसर पुर्णपणे पायीच फ़िरावा लागतो, कारण ईथे कुठलीच बेस्टची बस जात नाही. रिगलच्या समोरच्या फ़ुटपाथवर आहे, पोलिस मुख्यालय. तिथल्या चौकात एक पुरातन कारंजे अजुनहि कार्यरत आहे. या भागाला जे मेहता मार्ग म्हणतात. तिथेच आहे, प्रिन्स ऑफ़ वेल्स म्युझियम. आजहि ईथे अत्यंत सम्रुद्ध संग्रह आहे. हे सगळे नीट बघायला तीनचार तास तरि हवेत. आणि ईथल्या संग्रहाला न्याय द्यायचा तर एवढा वेळ ईथे द्यायलाच हवा. म्युझियमच्या समोरचा रस्ता जातो थेट मंत्रालयाकडे, तिथे आपण मग जाऊ. सध्या म्युझियम कडुन व्हीटी कडे जाऊ. म्युझियमच्या बाजुला आहे जहांगीर आर्ट गॅलरी. चित्रकारांची पंढरी. तिथे आपले प्रदर्शन लागावे, असे प्रत्येक चित्रकाराचे स्वप्न असते. याचे बुकिंग त्याना खुप आधी करावे लागते. तिथेच वरती पण एक छोटी आर्ट गॅलरि आहे. तिथे कधीकधी पुस्तक प्रदर्शने देखील भरतात. पण या प्रदर्शनापेक्षा मला आकर्षण आहे ते तिथल्या सामोव्हर नावाच्या रेस्टॉरंटचे. तिथली कॉफ़ी आणि समोसा, एकदा खाऊन बघाच. शिवाय तो तिथेच खायला हवा, कारण त्या छोट्याश्या जागेतच काहि जादु आहे. तिथुन बाहेरच ऊघड्यावर काहि चित्रे विक्रीसाठी असतात. समोर बसवुन पोर्ट्रेट काढुन देणारे काहि कलाकार तिथे असतात. एखादी चारजणीत ऊठुन दिसेल अशी तरुणी तिथे बसलेली असते, चित्रकार पोर्ट्रेट काढत असतो, आणि तिची मैत्रिण तो ते चित्र बरोबर काढतोय कि नाही यावर नजर ठेवुन असते. या समोरच्या एका आता मोडकळीला आलेल्या बिल्डिंगमधे एक ईतिहास घडला होता. भारतातील पहिली फ़िल्म ईथे दाखवण्यात आली होती. सध्या ती ईमारत जवळ जवळ मोडकळीला आली आहे. जहांगीरच्या समोर आहे र्हिदम हाऊस. संगीत प्रेमींची ती पंढरी आहे. म्युझिक मधले लेटेश्ट तसेच दुर्मिळ ईथे मिळु शकते. सीडीज, कॅसेट्स यांचे भरपुर कलेक्शन आहे तिथे. या भागाला काळा घोडा म्हणतात. आता तिथे काळा किंवा गोरा, कसलाच घोडा वा त्याचा पुतळा नाही. अधुन मधुन ईथे काला घोडा फ़ेस्टिवल भरवला जातो. तिथुन पुढे आपण येतो फ़्लोरा फ़ाऊंटन ऊर्फ़ हुतात्मा चौक कडे. वाटेत काहि फ़ोर्टमधल्या जुन्या देखण्या ईमारती लागतात. डेव्हिड ससुन लायब्ररि, हॉंग कॉंग बॅंक वैगरे, तसेच हायकोर्टाची मागची बाजु दिसते. खास दारुसाठी म्हणुन जिथे जायचे ते कंदील हॉटेल ईथे आहे, पण तुमच्या आमच्यासाठी रसराज आणि वैभव हि अगदी चवदार पदार्थ देणारी हॉटेल्स ईथे आहेत. तिथेच फ़क्त फ़ळांचे रस व मिल्कशेक विकणारे दुकान आहे. पुर्वी तिथे बॅंक ईंडोसुएझ नावाची बॅंक होती. त्या बॅंकीची सेवा ईतक्या ऊच्च दर्ज्याची होती कि तिथे चेक डिपॉझिट करताना पे ईन स्लिप पण भरावी लागत नसे. बॅंक ती टाईप करुन देत असे. पण काहि वर्षापुर्वी ती बॅंक जळाली. वाटेत फ़ाऊंटन ड्राय फ़्रुट स्टोअर्स लागते अनेक चवीढवीचे पदार्थ तिथे मिळतात. तिथुन मागे सेंट्रल बॅंकेचे मुख्यालय आहे. टाटा कंपन्यांचे हेड ऑफ़िसेस असलेले टाटा हाऊस आहे. या परिसरात अनेक जुनी दुर्मिळ पुस्तके रस्त्यावर विकायला असतात. ती माणसे फ़ाटकी दिसत असली तरि तुम्हाला हवे असलेले पुस्तक ते अचुक शोधुन देऊ शकतात. ईथेच वरती नजर गेली तर काहि पुरातन झाडे दिसतील. ती आहेत क्रायसो फ़ॉयलम म्हणजेच स्टार ऍपलची. याची पाने वरुन कंच हिरवी आणि खालुन लाल किरमिजी रंगाची असतात. या ढेमश्याएवढे किरमिजी रंगाचे फ़ळ लागते. त्यात एक अर्धपारदर्षक गोलक असतो. चवीला ताडगोळ्यासारखा लागतो. फ़्लोरा फ़ाऊंटनचे पांढरे शिल्प खरोखरच देखणे आहे. त्याच्याच बाजुला एका चौथर्यावर शेतकरी आणि कामगार यांचे शिल्प आहे शिवाय हिरवळीवर महाराष्ट्राचा नकाशा व १०५ हुतात्म्यांची नावे कोरलेला फ़लक आहे. तिथुन एक रस्ता चर्चगेट स्टेशनकडे जातो. तिथेहि आपण नंतर जाऊ. याच चौकात अमेरिकन ड्राय फ़्रुट स्टोअर आहे. त्यांच्याकडेहि खास खाऊ मिळतो. त्याच्या बाजुला एक जुनी पारसी अग्यारि आहे. मग पुढे फ़ोर्टच्या गल्ल्या सुरु होतात. जेंव्हा स्मगलिंग जोरात होते, तेंव्हा तिथे खरोखरीचा स्मगल्ड माल मिळायचा. आता तिथे बेल्टपासुन पायरेटेड सीडीज पर्यंत काहिहि मिळते. तिथेच आंबेडकर कॉलेजपण आहे. पण या गर्दीत त्याचा दबदबा जाणवत नाही. तिथे काहि बॅंकांची ऑफ़िसेस आहेत. समोर खादी भवन आहे. तिथे खरेच सुंदर वस्तु मिळतात, फ़क्त चिकाटीने तिथल्या अजब सेल्समनना तोंड द्यावे लागते. ईथे एक किस्सा सांगावासा वाटतोय. मी जेमतेम विशीचा असताना, ऑफ़िसमधल्या सिनीयर मुलीबरोबर तिथे गेलो होतो. आम्हाला एक चंदनी मुर्ती घ्यायची होती, ती मुर्ती व किम्मत आम्ही आधी बघुन ठेवली होती. त्या काऊंटरवर गेल्यावर, आम्ही सांगितले ती मुर्ती काढुन द्या, तिथल्या बाईने काय उत्तर द्यावे, तुम्हाला परवडणार नाही म्हणाली चक्क ती. आम्हिहि खट, आम्ही वर्गणी काढुन ती मुर्ती घेणार आहोत, असे सांगुन ती मुर्ती ताब्यात घेतली. त्यासमोर होते हॅंडलुम हाऊस. साधारण वीस वर्षांपुर्वी त्याला आग लागली. मग बरिच वर्षे ती ईमारत तशीच होती. मग एकदाची ती पाडण्यात आली. तरिहि त्याच अवस्थेत ती अनेक वर्षे पडुन होती. आता तिथे नव्याने ईमारत बांधलीय, पण अजुनहि तिथे लोक येत नाहीत. ते हॅंडलुन हाऊस जळाले होते तेंव्हा बाहेर आलेली एक मुलगी, कॅश बॉक्स आत राहिला म्हणुन परत आत गेली आणि जळाली. तिचे सावट तिथे आहे म्हणतात. तिथल्या गल्लीत बोहरी लोकांची एक मोठी मशीद आहे. याच्या समोर आहे सुविधा नावाचे एक जुने हॉटेल. त्याच्या जरा बाजुला को ऑप्टेक्स चे शोरुम आहे. तिथेच केळकर आरोग्य भुवन नावाचे मराठमोळे हॉटेल आहे. मग कोपर्यावर मॅक डोनाल्ड आहे. मग आपण येतो कपिटॉल सिनेमाच्या चौकात. त्याच्या मागेच न्यु एक्सेल्सियर आणि न्यु एम्पायर थिएटर्स आहेत. तिथेच विठ्ठल भेलवाला नावाचे जुने हॉटेल आहे. नाव मराठी असले तरी तोंडावळा गुजराथी आहे. व्हीटी स्टेशनच्यासमोर कॅनन पावभाजीवाला आहे. त्याच्या पावभाजीची चव वेगळीच. समोरच्या म्युनिसिपालिटीकडुन दोन फ़ाटे फ़ुटतात. एक स्टेशनला लागुन जातो, जेजे स्कुल ऑफ़ आर्टकडे, तर दुसरा आझाद मैदानाकडे. हा फ़क्त एक रुट झाला. आता आपण ईथेच थांबु.
|
| |
| Wednesday, February 08, 2006 - 4:44 pm: |
|
|
आज आपण दुसरा रुट घेऊ. हा रुट आहे ९२ नंबरचा. हि बस वर्ल्ड ट्रेड सेंटरहुन सुटते. हे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे कुलाब्याला. त्याला आर्केड असेहि म्हणतात. पुर्वी ती एकाकी ईमारत होती तिथे. अगदी सुंदर डिझाईनची हि ईमारत आतमधुन खुप मोठी आहे. अनेक दुकाने आहेत तिथे. शिवाय सी एम सी या कंपनीचे ऑफ़िस आणि स्टेट बॅंकेची शाखा आहे तिथे. त्यासमोर कुलाबा वुड्स हे गार्डन आहे. पुढे मग त्याच्या मागे दोन ऊंच ईमारतीहि झाल्या. ओमानची वकालतहि तिथेच आहे. त्या भागात काहि रहिवासी ईमारतीहि आहेत. मग आपण येतो हॉटेल प्रेसिडेंटच्या बाजुने अण्वेशक या ईमारतीकडे, आमची ईंस्टिट्युट तिथेच आहे. रिझल्ट बघायला प्रत्येकवेळी तिथे बारा बारा वाजेतो वाट बघितली आहे. त्यावेळी तो भाग खुप एकाकी होता. खाण्यापिण्याची सोय नव्हती. हा भाग कफ़ परेड म्हणुन ओळखला जातो. मग आपण येतो कुलाब्याच्या मच्छीमार वस्तीजवळ. हि वस्ती तिथे अजुनहि टिकुन आहे. नारळीकरांच्या एका कथेत, मुंबईत प्रलय आला तर हे आद्य मुंबईकरच टिकुन राहतील, असे दाखवले होते. तिथेच बधवार पार्क आहे आणि प्राचीन काळातले रेल्वे टर्मिनस आहे. मग आपण येतो सचिवालय जिमखान्याकडे, महाराष्ट्र राज्य लॉटरिचे निकाल ईथेच जाहिररित्या घोषित केले जातात. समोरच जुने मंत्रालय आहे. आत विस्तिर्ण आवार आहे. तिथेहि एक निवांत बाग आहे. एम टि डी सी चे बुकिंग ऑफ़िस आहे, आणि काहि मन्त्र्यांची निवासस्थाने आहेत. हा रस्ता मादाम कामा रोड. तो पुढे एअर ईंडिया ईमारतीकडे जातो. त्याच्याच बाजुला आहे एक्स्प्रेस टोवर्स. हा आहे नरिमन पॉईंट विभाग. आता ईथे रस्त्यावर फ़ारच फ़ेरिवाले बसतात. पुर्वी ते नव्हते. ईथुन जरा पुढे गेले कि लागते टाटा थिएटर. अत्यंत वैषिष्ठपुर्ण बांधणीचे हे थिएटर आहे. जेंव्हा बांधले तेंव्हा त्यात माईकची गरज नाही, असे सांगण्यात आले होते, पण मी बघितलेल्या प्रत्येक नाटकाला तिथे माईक वापरले होते. त्याच परिसरात एक छोटा रंगमंच तसेच रंगोलि नावाचे हॉटेल आहे. ओबेरॉय टॉवर्स हे पंचतारांकित हॉटेल तिथेच आहे. तिथल्या समुद्रकिनारा पुर्णपणे बांधुन काढलाय आणि अनेक सिनेमात आपण तो बघतो. पुर्वी संध्याकाळी तो भाग अगदी निवांत असायचा. तिथे अनेक मासे मी किनार्याजवळ बघितले आहेत. चक्क स्मगलिंगहि बघितले आहे. ( एकंदर त्या दिवसात स्मगलिंग म्हणजे फ़ारच थ्रील वाटायचे. पुढे भारतात अनेक वस्तु मिळु लागल्या आणि सोन्याच्या भावातहि फ़ारशी तफ़ावत न ऊरल्याने, स्मगलिंग फ़ारसे फ़ायदेशीर ऊरले नाही, त्यामानाने ड्रग्ज आणि दशहतवाद फ़ायदेशीर झालाय बहुतेक. ) आता तिथे संध्याकाळिहि वर्दळ असते. नारियलपानी व भुट्टेवाले असतात. ईथुन जवळच नवे मंत्रालय आहे, त्या परिसरात काहि देखणी कदंबाची झाडे आहेत. एरवी कदंबाचे झाड खुप मोठे झाल्यावरच त्याला फ़ुले येतात, ईथे मात्र अगदी लहान झाडाना फ़ुले येतात. तिथेच एल आय सी ची योगक्षेम नावाची अर्धगोलाकार ईमारत आहे. तिच्या समोर जारुल आणि अशोकाची झाडे, या दिवसात भरभरुन फ़ुललेली असतात. मग तिथुन आपण येतो, मुंबईच्या विद्यापिठाकडे. तिथेच तो प्रसिद्ध राजाबाई टॉवर आहे. पण आता त्यात जाता येत नाही. ( हैदराबादचा चारमिनार, दिल्लीचा कुतुबमिनार यांची पण हिच गत आहे सध्या. दुर्घटना झाली कि एखादी वास्तु आम जनतेला बंद करुन टाकायची, हा एकच ऊपाय माहित आहे आपल्याला. ) तिथे समोर विस्तीर्ण आवार आहे. अजुनहि तिथे गंभीर वातावरण असते. त्याच्या कोपर्यावर सायन्स ईंस्टिट्युटची देखणी ईमारत आहे, काहि गुंजांची झाडे आहेत, आणि अगदी मुद्दाम जाऊन बघावे असे ऊर्वशीचे झाड आहे. त्या झाडाला फ़ेब्रुवारीमधे बहर येतो. बहर काय सांगावा महाराजा, गर्द हिरव्या झाडातुन, अगदी नाजुक असे केशरी गुलाबी तुरे खाली झुलत असतात. या तुर्यांचा रंग, आकार त्या नावाला साजेसाच. त्याच्याच बाजुला आहे हाय कोर्ट. आतली व्यवस्था अगदी ब्रिटिश कालीन आहे. त्यासमोर गोड्या पाण्याची छोटी विहिर आहे. आजहि ती वापरात आहे. सकाळच्या वेळी लाकडी बॅरलमधे पाणी भरुन घेताना तिथे अजुनहि लोक दिसतात. मग आपली बस झोकदार वळण घेते. हि जागा खास बसेस साठीच आहे. ईथे समोर पारश्यांची पवित्र विहिर आहे. अनेक वर्षे अबधित राहिलेले ओव्हल मैदान मागे आहे. पारश्यांच्या विहिरीमागे सर्कस ऊतरण्याची जागा आहे. आणि सगळ्यात जास्त नजरेत भरते ते तिथले कपड्यांचे मार्केट. कपडे नुसते ओसंडुन वहात असतात तिथे. मग परत आपली बस ईरॉसच्या चौकात वळुन चर्चगेट स्टेशनला येते. तिथुन या बसचा प्रवास, रेल्वेलाईनला समांतर असा चर्नीरोड पर्यंत होतो. हा भाग आपण बघितला आहेच. ऑपेरा हाऊसमधे बस रेल्वेपासुन फ़ारकत घेते. ऑपेरा हाऊस नावाचे एक देखणे थिएटर आत्ता आता पर्यंत तिथे होते, आता ते पडले. त्याच्या समोरच्या रॉक्सीने तर कधीच मान टाकाली होती. या भागाला आता पंडीत पलुस्कर चौक म्हणतात. पण हे नाव अजिबात वापरात नाही. शिवाय गायनाचार्यांबद्दल फ़ारसे कुणी ऐकले असेल, याचीहि शक्यता कमीच. ईथेच त्रिभुवनदास भिमजी जव्हेरी हि दागिन्यांची पेढी आहे. अनेक हिरे व्याप्यारांची ऑफ़िसेस असलेली पंचरत्न हि ऊंच ईमारत आहे. तिथुन आपण येतो नाना चौकात. तिथे एक मिठाईचे जुने प्रसिद्ध दुकान आहे, शिवाय गंधीजींची पुस्तके विकणारे दुकान आहे. तिथुन जरा पुढे गेले कि लागते चिखलवाडी. ईथली गणपतिची मुर्ती खुप देखणी असते. त्याच्या आधी लागते प्रसिद्ध भाजी गल्ली लागते. मुंबईत ईतरत्र न मिळणार्या भाज्या ईथे मिळु शकतात. ईथेच कामतचे मोठे हॉटेल आहे पण त्यापेक्षा मला आवडते ते छोटेसे स्वाति नावाचे हॉटेल. ईथे फ़क्त खास गुजराथी पदार्थ मिळतात. मग आपण येतो ताडदेवच्या चौकात. ईथे गंगा जमना नावाचे जुळे थिएटर आहे. सध्या तिथे काय चालु आहे माहित नाही, पण मध्यंतरी तिथे तथाकथित सेक्सी सिनेमे लागायचे. तिथेच आहे सुनावाला बिल्डिंग. अभिनेत्री बिंदु पुर्वी ईथे रहायची. मग आपण निघतो हाजी अली कडे. वाटेत आपल्याला ताडदेव एसी मार्केट लागते. पुर्वी त्याचे अप्रुप होते, सध्या तिथे काहि खास नाही. त्यानंतर लागते सरदार हॉटेल. पावभाजी खावी तर तिथेच. मग लागते फ़िल्म सेंटर. ईथे पुर्वी फ़िल्म प्रोसेसिंग व्हायचे. अनेक सिनेमांच्या रशेस मी बघितल्या आहेत ईथे. मग लागते हल्ली सुरु झालेले मॉल, क्रॉस रोड्स. हे आद्य मॉल असले तरी आत अजिबात मोकळी जागा नाही. खुपच कोंदट वाटते तिथे. मग आपण येतो हाजी अलिच्या चौकात. वाटेत आपल्याला श्रीमती पोचखणवालांचे शिल्प बघायला मिळते. ( अजुन असावे ते तिथे ) आता सांगुनहि खरे वाटणार नाही, पण त्या चौकात पुर्वी खुप मोठे ऊद्यान होते. आता मात्र वाहतुकीच्या ताणामुळे ते नामशेष झालेय. ईथुन एक रस्ता महालक्ष्मी मंदीराकडे जातो. नवरात्रात तिथे खुप गर्दी असते, एरवी तितकी नसते. सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा यांच्या चांदीच्या देखण्या मुर्त्या आहेत तिथे. या देवळाच्या मागे खमंग मुग भजी मिळतात. जरा चिकाटि दाखवलीत तर अस्सल भांग मिळु शकते तिथे. तिथेच मागे समुद्रात घुसलेले काहि खडक आहेत. हाजी अली ला ते नाव पडायला कारणीभुत झालाय तो तिथला दर्गा. थेट समुद्रात हि ईमारत आहे. जाण्यासाठी बांधीव वाट आहे. भरतीच्या वेळा टाळल्या तर तिथे जाणे सोपे आहे. अलिकडे तिथे काहि नवे बांधकाम झालेच शिवाय वर्दळहि वाढलीय. पुर्वी त्या जागेला फ़ारसे महत्व नव्हते. खरे म्हणजे तिथे भावा बहिणीची कबर आहे. बहिणीची कबर किनार्यालगत तर भावाची त्या बेटावर आहे. जे बहिण भाऊ दुरावलेत त्यानी तिथे जाऊन मन्नत मागावी असा प्रघात आहे. पण आता पद्धतशीरपणे त्याचा प्रचार चालु आहे. तिथेच रस्त्यावरच हाजी अली ज्युस सेंटर आहे. तिथे ज्युस तर छान मिळतोच, शिवाय पित्झाहि छान मिळतो. तिथुन एक रस्ता परळकडे, एक रस्ता महालक्ष्मी स्टेशनकडे, एक ब्रीच कॅंडीला जातो आणि एक वरळीकडे जातो, आपली बस त्याच रस्त्याने जाणार आहे. पण तिथे जवळच एक गोल्फ क्लब आहे, हे लक्षात असु द्या. रेस कोर्सची पुढची बाजु यापैकी एका रस्त्यावर आहे. कुणाला पटणार नाही, पण हॉलिवुडच्या वेस्टर्नपटात असते तसे एक खास हॉटेल आहे. भाव जरा चढे आहेत, पण ते वातावरण हवे असेल तर तिथे जायलाच हवे. मग आपल्याला एक गोलाकार रस्ता लागतो. एका बाजुला समुद्र आहे. हॉर्नबि वेलार्ड नावाच्या ब्रिटिश अधिकार्याच्या प्रयत्नाने हा तयार झाला. ईथे काहि नारळाची झाडे लावली आहेत, पण गेल्या २५ वर्षात ती अजिबात वाढलेली नाहीत. दुसर्या बाजुला अपंग मुलांसाठी असलेली शाळा, लाला लजपतराय कॉलेज आणि वल्लभभाई पटेल स्टेडियम लागते. पुर्वी मुंबईत कुस्त्या फ़ार लोकप्रिय होत्या. त्या ईथेच होत असत. आता WWF चे नाटकी तमाशे जास्त लोकप्रिय आहेत. त्या भागाला लोटस म्हणतात, कारण पुर्वी तिथे या नावाचे थिएटर होते. ते पाडुन दुसरे पण २० वर्षांपुर्वीच बांधुन झाले, पण ते अजुनहि सुरु झालेले नाही. तिथेच मागे आहे ऊंच गोलाकार डिस्कव्हरि ऑफ़ ईंडिया ची ईमारत. ईथे एक मोठे नाट्यगृह आहे. प्रदर्शन भरवण्याची जागा आहे. ईथल्याच लॉनवर सचिन तेंडुलकरच्या लग्नाचा स्वागत समरंभ झाला होता. त्याच्या मागे नेहरु सायंस सेंटर आहे, पण तिथे जायचा रस्ता वेगळा आहे. त्या तिथेच नेहरु प्लॅनेटोरियम आहे. तिथे आकाशदर्शनाचे छान कार्यक्रम होतात. त्याच्या बाजुला अंध व्यक्तीसाठी कार्यरत असणारी संस्था आहे. पुर्वी त्याच ईमारतीत कॉपर चिमनी हॉटेल होते, आता तिथुन ते हलवलेय. या समोर संगमरवरी डिझाईन असलेल्या सारख्या सुबक ईमारती होत्या. त्याच्या बाजुला पूनम अपार्टमेंट नावाची ईमारत होती. त्यातील ऑफ़िसेसनी केलेल्या अंदाधुंद तोडफ़ोडीमुळे ती संपुर्ण ईमारतच कोसळली होती. मग लागते लव्ह ग्रोव्ह ऊदंचन केंद्र, ( म्हणजे पंपिंग स्टेशन ) ईथुन मुंबईतील सांडपाणी समुद्रात सोडले जाते. पण भरतीच्या वेळी ते परत येऊ नये म्हणुन हे पंपिंग स्टेशन काळजी घेते. आता तिथे दुर्गंधी येते पण पुर्वी ती जागा ईतकी रम्य होती, कि ती प्रेमीजनांचे संकेतस्थळ होते. अश्याच एका असफल कहाणीमुळे या जागेला हे नाव पडलेय. ईथुन एक रस्ता जातो वरळी सीफ़ेसकडे, त्या कोपर्यावर मेला नावाचे हॉटेल आहे. तिथे नेहमी कसले ना कसले तरी खाद्य महोत्सव होत असतात. तिथुन आपण येतो वरळी नाक्यावर. सिटी बेकरी चे छोटेसे तरिही फ़ार फ़ेमस असे दुकान आहे तिथे. तिथेच एस्टीचे ऑफ़िस आहे. अभिनेत्री नयनताराचे घर ईथेच होते. ईथुन एक रस्ता लोअर परेल स्टेशनकडे जातो. आपण मात्र पोद्दार आयुर्वेदिक कॉलेजवरुन प्रभादेवीला जाणार आहोत. ईथे एक तिबेटी मंदीर आहे. तसेच मुंबईतील आद्य चाळी, ज्याला ईंग्लिशमधे बीडीडी चॉल्स आणि शुद्ध मराठीत शिमिटाच्या चाळी म्हणतात, त्या ईथेच आहेत. या खरेच खुप ऐसपैस आहेत आणि अजुनहि व्यवस्थित टिकुन आहेत. मग आपण जातो ग्लॅक्सो कंपनीकडे. आता हि कंपनी बहुतेक बंद पडलीय. त्याला लागुनच आहे, पांडुरंग बुधकर मार्ग आणि तो जातो मुंबई दुरदर्शन केंद्राकडे. पुर्वी जेंव्हा एवढे चॅनेल्स नव्हते, तेंव्हा या ईमारतीला एक शान होती. आता एखाद्या सरकारी दफ़्तरासारखी त्या ईमारतीची कळा गेलीय. त्या समोर आहे वरळी पोलिस स्टेशनची भव्य ईमारत. तिथेच काहि देखण्या ईमारतीहि आहेत आणि समोर आहे पासपोर्ट कार्यालय. त्यासमोर आहे रेश्मावर संशोधन करणार्या सास्मिरा या संस्थेची ईमारत. तिथुन जरा पुढे आहे सेन्चुरि बझार. पण एकंदर गिरण्यांची अवस्था खालावल्यावर त्याचीहि रया गेलीय. तिथेच केवळ देव्हारे विकणारे, आकार नावाचे दुकान आहे. त्यासमोर आहे गॅमन ईंडिया या कंपनीचे ऑफ़िस. वाशी खाडीवरचा पुल बांधुन तो १२ वर्षाच्या आत कोसळवण्याचा पराक्रम याच कंपनीने केलाय. ईथल्याच एका गल्लीत प्रभादेवी आणि भोगादेवी या दोन आद्य देवींची मंदिरे. आणि आपण पोहोचतो थेट सिद्धि विनायकाच्या चौकात. देवाच्या दारी आलोत तर जरा दोन मिनिटे टेकुया.
|
| |
| Friday, February 10, 2006 - 3:21 pm: |
|
|
देवळाची जी आजची ऊंच ईमारत आहे ती अगदी अलिकडची. म्हणजे गेल्या वीसेक वर्षांतली. त्यापुर्वी तिथे छोटेसे देऊळ होते. मुर्ती आता आहे तिथेच होती. पण हळु हळु गर्दी वाढु लागली. मंगळवारच्या रांगाहि वाढु लागल्या, आणि सध्याची प्रशस्त ईमारत ऊभी राहिली. आजहि मंगळवारच्या रांगा लागतात, पण आता व्यवस्था जरा बरी आहे. हल्ली अंगारकि ला वैगरे पार मुलुंड ठाण्यापासुन लोक चालत येतात. या देवळाच्या मागे कामगार मैदान आहे. अनेक साथी लोकांच्या सभा तिथे झाल्या. त्याच्या बाजुला होते रविंद्र नाट्य मंदीर. ते तसे प्रशस्त होते. पण ते पाडुन तिथे सध्याची ईमारत ऊभी राहिलीय. ती फ़ारच गैरसोयीची आहे, असे वाचले. बाहेरचा पुतळा तर पुलंचा आहे हे मुद्दाम सांगावे लागेल ईतका वाईट आहे. हाच रस्ता पुढे परळला जातो. सिद्धिविनकाच्या समोर मनोहर जोशींचे कोहिनुर आहे. मुंबईतल्याच काय सगळ्या राज्यातल्या मोक्याच्या जागा, पंताना कश्या मिळाल्या ते गुढच आहे नाहि का ? समोर बॉंबे डाईंगच्या दोन ऊंच ईमारती आहेत. त्याच परिसरात लेखिका पद्मा लोकुर रहात असत. सिद्धिविनायकाची मुर्ती आहे ऊजव्या सोंडेची. हल्ली ती चमकदार रंगाने रंगवलीय. तिथे भाद्रपदापेक्षा माघातला ऊत्सव मोठ्या प्रमाणात होतो. तिथुन एक फाटा माहिमकडे जातो. आता त्याचे नाव वीर सावरकर मार्ग, आणि पुर्वी त्याला म्हणत असत, कॅडेल रोड. पण आपली बस त्या रस्त्याने न जाता, ती जाईल, आगर बाजारला आणि मग पुढे दादर पोर्तुगीज चर्चकडे. डाव्याबाजुला आत्ता आत्ता पर्यंत एक वाडी होती. जुन्या मुंबईत अश्याच नारळाच्या झाडानी सुशोभित वाड्या होत्या. पोर्तुगीज चर्चची ईमारत छान आहे आणि तिथे कायम चमकदार सुभाषिते लिहिलेली असतात. तिथल्या चौकात प्रबोधनकार ठाकर्यांचा पुतळा आहे. तिथुन गोल देवळाकडुन स्टेशनकडे जाणारा रस्ता हा जुना रहदारीचा रस्ता होता. आता तो अजुनहि वापरात असला तरी, सेनाभवनकडे जाणारा गोखले रोड जास्त प्रशस्त आणि जास्त रहदारीचा आहे. या रस्त्याला रानडे रोड येऊन मिळतो. काहि अस्सल मराठी चवीची होटेल्स ईथेच आहेत. प्रकाश कडे अजुनहि डाळिंबी ऊसळ मिळते. रानडे रोड अनेक दृष्टीनी गजबजलेला आहे. सोनारांच्या पेढ्या, भाजीवाले, साड्यांची दुकाने, आयुर्वेदिक औषधांची दुकाने, पुस्तकांची दुकाने सगळेच आहे तिथे. पण त्या रस्त्यावरुन कुठलीच बस जात नाही. आपण येतो ते सेनाभवनच्या चौकात. शिवसेनेप्रमाणे सेनाभवनाची पण पुनर्बांधणी होतेय. त्याच्या बाजुला जो पेट्रोल पंप आहे तिथे १९९२ साली एक बॉंबस्फोट झाला होता व त्याच्या बाजुच्या ईमारतीला मोठे भगदाड पडले होते. तिथुन एक रस्ता शिवाजी पार्ककडे जातो. तिथेच जिप्सी, नेब्युला अशी हॉटेल आहेत. आपल्या मायबोलिकारांचे हे भेटण्याचे ठिकाण आहे. लताच्या ७५ व्या वाढदिवशी मोहन वाघाना पण ती ईथेच भेटली होती. या चौकाला राम गणेश गडकरी चौक असे नाव दिले होते, तिथे मीनाताई ठाकरे यांचा पण पुतळा आहे. ईथल्या एका गल्लीत बालमोहन विद्यामंदीर आहे आणि समोरच आहे शीवतीर्थ म्हणजेच शिवाजी ऊद्यान. पण आपली काय कुठलीच बस तिथे जात नाही. या सेनाभवन चौकातुन एक रस्ता माहिमला जातो, आणि शिवाजीपारकच्या समोरचा रस्ता जातो प्लाझाकडे. आपली बस तिथुनच जाणार आहे. आपल्याला ईथे लाडु सम्राट हे कडक बुंदीच्या लाडुचे मोठे दुकान लागेल. ईथेच गणेश पेठ लेन आहे, तिथे तुम्हाला घरगुति फ़िनेल, लिक्वीड सोप साठी लागणारा कच्चा माल मिळेल. एका छोट्या दुकानात लोखंडी तवे, शेगड्या पळ्या मिळतील. आणि ऊजव्या हाताला लागेल, शिवाजी मंदिर हे नाट्यग्रुह. बाहेरुन जरी फ़क्त मुख्य दरवाजा दिसत असला तरी हे थिएटर मोठे आहे. पुर्वी तिथे हाताने रंगवलेले नाटकांचे फ़लक असत, जसजसे प्रयोग होत जातील तसतसे ते पुढे सरकवले जात. आता ते प्रीपेंटेड आहेत. तिथेच तपकिरीचे एक छोटे दुकान आहे. बहुतेक मराठी नाट्यकलावंत तंबाखुचे शौकीन असल्याने तिथे त्यांचा राबता असतोच. स्ट्रगलच्या काळात त्यांचे निरोप घेण्यादेण्याचे ठिकाण तेच असते. त्या गेटमधुनच रंगपटात जायची वाट आहे. त्यामुळे प्रयोगाच्या आधी गेलात तर तिथे अनेक कलाकार तुम्हाला दिसतील, एरवीहि अनेक कलाकार दिसतात. अगदी सहज छेडले तरी मनमोकळा प्रतिसाद देतात. दौर्याच्या बस पण तिथेच ऊभ्या असतात. तिथेच वरती तालमीसाठी पण एक हॉल आहे. आतुनहि हे थिएटर छान राखलेय. स्टेजची साईज मध्यम आहे. बहुतांची मराठी नाटकाचे नेपथ्य याच मापाने बनवलेले असते. त्याच्या समोरच आहे, शांतारामबापुंचे प्लाझा. त्याचे अनेकवेळा नुतनीकरण झालेय, पण तरिहि ते व्यवस्थित चालु असते. मराठी सिनेमा, बाल चित्रपट यांच्यासाठी ते हक्काचे ठिकाण आहे. प्लाझाच्या मागे एक घाऊक भाजी बाजार आहे, तिथे सकाळी सकाळी भाज्यांचे ढिग पडलेले असतात. हा रस्ता पुढे गोल देऊळ आणि कबुतरखान्याकडे जातो. वाटेत दोन्ही बाजुला साड्यांची दुकाने आहेत. ओले काजु, रातांबे, सुकेळी असा कोकणचा मेवा विकणारी छोटी दुकाने आहेत ईथे. पण आपली बस वीर कोतवाल ऊद्यानाकडुन टिळक ब्रीजकडे जाईल. हे वीर कोतवाल ऊद्यान घरगुति बैठकांसाठी प्रसिद्ध आहे. मुलगी बघण्याचे कार्यक्रमहि तिथेच पार पडतात. मुलामुलीनी एकमेकाना पसंत केले तर साखरपुडाहि तिथेच पार पडतो. या ब्रीजवरुन एक जिना मॅजेष्टिक बुक डेपो कडे ऊतरतो तर दुसरा धुरु सभाग्रुह, दादर सार्वजनिक वाचनालय, छबिलदास शाळा, आयडियल पुस्तक त्रिवेणि कडे ऊतरतो. तिथेच एक नर्सरी आहे आणि हवी ती झाडे तिथे मिळु शकतात. पण आपली बस अर्थातच ब्रीजवरुन खोदादाद सर्कलकडे जाईल. आपल्याला वरुन पश्चिम आणि मध्य रेल्वेची स्टेशन्स दिसतील. तसेच स्वामी नारायण मंदिर दिसेल. हिंदु कॉलनीकडे जाणारी गल्ली दिसेल. दिलीप वेंगसरकरचे घर ईथेच आहे. तिथे मराठी लोकानी चालवलेले चप्पल बुटांचे दुकान व एक ज्युस सेंटर आहे. मराठी माणसाला न शोभणारी मिठ्ठास वाणी ते बोलतात. मग आपण एका सिग्नलपाशी येतो. समोरच एक कारंजे व आडवा फ़्लायओव्हर दिसेल. त्याखाली एक सर्कल आहे त्याला खोदादाद सर्कल म्हणतात. हा फ़्लायओव्हर अलिकडचा, पुर्वी तिथे मोठे सर्कल होते व त्यात एका ऊंच खांबावर फ़िलिप्स कंपनीने दिवे लावले होते. या सर्कलभोवतीने चंदु हलवावी, डि दामोदर, शिरोडकर चष्म्याचे दुकान, सिल्क म्युझियम अशी अनेक दुकाने आहेत. आपण आलो त्यासमोरचा रस्ता वडाळ्याला जातो. प्रति पंढरपुर असलेले विठ्ठल मंदीर, जी एस बी लोकांचा गणपति, हे सगळे ईथुन जवळच. पण तिथे न जाता आपलीबस डावीकडे वळेल व दादर टिटि ला येईल. टिटि म्हणजे ट्राम टर्मिनस. अजुनहि हेच नाव प्रचारात आहे. ट्राम बंद झाल्यावरहि घाटकोपरला जाणारी ३८५ बस आणि चेंबुरला जाणारी ३५१ बस तिथुन सुटत असत. अजुनहि या बसेस चालु आहेत पण त्यांचा विस्तार झालाय. हा आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता. ईथेच मागे, सहनहि होत नाही आणि सांगताहि येत नाही, अश्या आजारावर ऊपचार करणारे केंद्र आहे. समोर पारसी जिमखाना आहे. वाटेत राजा शिवाजी विद्यालय आणि आंबेडकरांच्या घराकडे जाणारा रस्ता लागतो. मग आपण येतो रुईया कॉलेजच्या सिग्नलपाशी. हे कॉलेज आत असले तरी या स्टॉपला हेच नाव आहे, आणि हा अपमान सहन न झाल्याने आम्ही कॉलेजमधे असताना, या स्टॉपला हट्टाने पोद्दार कॉलेज स्टॉप म्हणत असु. या समोरचा रस्ता जातो पारसी कॉलनीत. त्यालाच फ़ाईव्ह गार्डन असेहि म्हणतात. अजुनहि ईथे पाच ऊद्याने आहेत. गोरखचिंचेची झाडे आहेत. याच्या फ़ुलाला दुर्गंधी येते व अगदी वजनदार तपकिरी रंगाची फ़ळे लागतात. फ़ळांचा गर आंबटसर असतो त्यामुळे हे नाव पडले असावे. याचे खोड फ़ार रुंद असते. ईतरहि अनेक झाडे आहेत ईथे. हा परिसर खुपच निवांत आहे. मग आपण येतो कपोल निवास कडे आणि मग किंग्ज सर्कलकडे. रजनीगंधा फ़ेम विद्या सिन्हाचे घर ईथे होते. किंग्ज सर्कलचे आताचे नाव बी एन महेश्वरी ऊद्यान असले तरी ते वापरात नाही. एक भले मोठे ऊद्यान तिथे आहेहि. या परिसरात जुनी दुर्मिळ पुस्तके रस्त्यावर मिळु शकतात. ईथुन जवळच दाक्षिणात्य गोपुर पद्धतीने बांधलेले एक देऊळ आहे. तो रस्ता माटुंग्याच्या झेड ब्रीजकडे जातो. समोरच्या बाजुला एक रस्ता VJTI म्हणजे पुर्वी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल ईंस्टिट्युट व आता वीर जिजामाता टेक्निकल ईंस्टिट्युट या संस्थेकडे जातो. हि जागा मला प्रिय आहे कारण गेली अनेक वर्षे ईथे फ़्रेंड्स ऑफ़ ट्रीज हि संस्था एक वार्षिक प्रदर्शन भरवते. फ़ुलझाडे, फ़ळझाडे, औषधी वनस्पति, त्यापासुन केलेल्या सजावटी, रचना, निवडुंगाचे प्रकार अशी रेलचेल असते त्या दिवसात. यासाठी खास परदेशातुनहि ट्युलीप्स डॅफ़ोडिल्स सारखी फ़ुले आणली जातात. आवर्जुन भेट द्यावे असे हे प्रदर्शन असते. जवळच एक जैन मंदीरहि आहे. त्यासमोर आहे जुने अरोरा नावाचे थिएटर. पुर्वी ट्राम्स ईथपर्यंतच यायच्या. हे थिएटर पुर्वी ईंग्लिश सिनेमासाठी प्रसिद्ध होते, आता बहुदा दाक्षिणात्य सिनेमे लागतात तिथे. आता जसा मुंबईला नळाने कुकिंग गॅस पुरवला जातो, तसा पुर्वीहि पुरवला जात असे. त्याच्या पाईपलाईनवर मोठे लोखंडी कोरीव खांब असत. तसा एक खांब ईथे जवळच होता. या बाजुचा एक आठ पदरी मोठा रस्ता, वडाळ्याला जातो. सध्या तिथे ट्रक टर्मिनल आहे. दादरची वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी बाहेरगावी जाणार्या खाजगी बसगाड्या आता वडाळ्याहुन आणल्या जातात. मग एका ब्रीजखालुन आपण सायनकडे येतो. ब्रीजवरती किंग्ज सर्कल हे हार्बर लाईनवरचे स्टेशन आहे. समोर गांधी मार्केट आहे. पुर्वी ईम्पोर्टेड साड्यांसाठी हे फ़ेमस होते. आता आहे ईतकेच. तिथुन मागच्या बाजुला षण्मुखानंद हॉल आहे. दोन बाल्कनी असलेला अति प्रचंड हॉल आहे तो. मराठी संगीत नाटकांचे खास जनता शो तिथे होत असत. तोकिटे असत एक दोन आणि तीन रुपये. एका दुर्दैवी अपघातात तिथे मोठी आग लागली होती. अनेक वर्षे तो बंद होता, पण आता सुरु आहे. फ़क्त तिथे मराठी नाटके होत नाहीत. आपले आजचे नाटक ईथेच थांबवु. अजुन बराच पल्ला गाठायचा आहे.
|
| |
| Saturday, February 11, 2006 - 2:46 pm: |
|
|
आमच्या कॉलेजचे कॉलेज डे पण त्या हॉलमधेच साजरे व्हायचे. मग तिथुन आपण येतो सायन हॉस्पिटलच्या सिग्नलकडे. तिथुन एक रस्ता धारावि, माटुंगा लेबर कॅंपकडे जातो. फ़ार पुर्वी तिथे एस्टीचा थंबा होता, आता तो नाहि. प्रचारातले नाव जरी सायन हॉस्पिटल असले तरी, त्याचे खरे नाक लोकमान्य टिळक रुग्णालय असे आहे. हे सरकारी ईस्पितळ आहे, बाहेरुन अवतार कळकट वाटेल, पण तरिही तिथे अद्यावत ऊपचार आणि सेवा मिळते. ईतर ठिकाणाहुन नाकारलेले रुग्ण तिथे आणले जातात आणि त्याना तिथे योग्य ते ऊपचार मिळतात. तिथुन पुढे एका गल्लीत एस आय ई एस कॉलेज आहे व तिथेच गुरुकृपा हॉटेल आहे. ईथे खास सिंधि चवीचे पदार्थ मिळतात. तिथला सामोसा आणि त्याबरोबर मिळणारे छोले खासच. पुर्वी तिथे अगदी मोजके पदार्थ मिळत, आता व्हरायटी वाढलीय. चव मात्र बर्यापैकी टिकुन आहे. मग आपण येतो राणी लक्ष्मीबाई चौकात म्हणजेच सायन सर्कलमधे. तिथे पुर्वी रुपम थिएटर होते, आता मल्टिप्लेक्स आहे. सायनला पुर्वी अभुतपुर्व ट्राफ़िक जॅम व्हायचा. मग तिथे फ़्लायओव्हर झाला, आणि थोडी शिस्त आली. तिथुन एक रस्ता धारावि बांद्रा असा करत पश्चिम ऊपनगराकडे जातो, त्यामुळे तिथुन वा गुजराथमधुन येणार्या वाहनांची तिथे गर्दी असते. बाहेरगावी जाणार्या बसगाड्या तिथेच पकडता येतात. तिथुनच एक रस्ता डंकन कॉजवे वरुन चुनाभट्टीला जातो. पण आपली बस सायन ट्रॉम्बे रस्त्याला लागेल. आपण एका पुलावरुन जाऊ, हा आहे चुनाभट्टीचा पुल. अगदी पुर्वी तिथपर्यंत खाडी होती. खाडीतल्या शिंपल्यापसुन चुना करायच्या भट्ट्या तिथे होत्या. ( अजुनहो कॅल्शियम मिळवायचा तो एक मार्ग आहे. बाजारात त्यापासुन केलेल्या कॅल्शियम सप्लिमेंट्स ऊपलब्ध आहेत. ) मग खाडी आटली आणि तिथे हातभट्ट्या लागु लागल्या. पुलावरुन त्या सर्रास दिसत. पण पोलिस तिथे दुर्लक्ष करत. पण पुढे धडक कारवाई झाली आणि त्या सगळ्या भट्ट्या हटल्या. आता तिथे एक डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. त्या पुलाखालुन पुर्वी अगदी तुरळक गाड्या जायच्या कारण त्यावेळी हार्बर लाईन फ़क्त मानखुर्द पर्यंतच होती. आता तिचा विस्तार पनवेल पर्यंत झाल्यामुळे, तसेच पुढे ती कोकण रेल्वेशी जुळल्यामुळे त्या लाईनवर, आता लोकल आणि मालगाड्या बर्याच जात असतात. फ़ार पुर्वी त्या पुलावरुन एक बसगाडी खाली पडली होती आणि नेमकि त्याचवेळी एक लोकल तिथुन जात होती. पण या मोठ्या अपघातात फ़क्त ६ व्यक्ती मृत झाल्या होत्या. तिथुन पुढे बराच सरळ रस्ता आहे. २५ वर्षांपुर्वी मधे काहिहि वस्ती नव्हती, त्यामुळे बसचा स्टॉपहि नव्हता. मग नंतर एव्हरार्ड नगर वसले, त्यासाठी स्टॉप व सिग्नलहि आला. ईथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोकळी जागा आहे. ती सोमैय्या ट्रस्टच्या मालकिची आहे. तिथे सोमैय्यांचे जनरल हॉस्पिटल आहे, पुढची मोकळी जागा प्रदर्शने, सत्संग साठी वापरली जाते. तिथुन जरा पुढे गेल्यावर, वडाळ्याहुन आलेला एक फ़्लायओव्हर ऊतरताना दिसतो. वडाळा ट्रक टर्मिनल पासुन येणारा हा फ़्लायओव्हर झाल्याने, भर शहरातुन होणारी अवजड ट्रक वाहतुक कमी झालीय. याच रस्त्यावर पुढे भारतातील सर्वात मोठे डोम थिएटर लागते. तिथे एका प्रचंड गोलाकारात खास सिनेमे दाखवले जातात. याची फ़िल्म वेगळ्या प्रकारची असते. तिथे दाखवल्या जाणार्या काहि फ़िल्म बघुन व्हर्टिगो चा त्रास व्हायची शक्यता असते, अवश्य घेण्याजोगा अनुभव आहे हा. एका मल्टिप्लेक्सच्या आवारातच हे आहे. हे थिएटर अनेक सिनेमात आपल्याला दिसले आहे. त्या फ़्लायओव्हरनंतर आपण येतो प्रियसर्शिनी चौकात. ईंदिरा गांधींचे हे नाव, त्यांच्या मृत्युनंतरच लोकाना माहित झाले. या ईमारतीत आर सी एफ़ म्हणजे राष्ट्रिय केमिकल्स आणि फ़र्टिलायझर्स या कंपनीचे ऑफ़िस आहे. त्यामागे त्यांचा कारखाना आहे. आणि त्यामागे आहे रिफ़ायनरीज. ३० वर्षांपुर्वी या दोन्ही कारखान्यांच्या प्रदुषणामुळे आम्ही हैराण झालो होतो, पण पुढे लोकांच्या दबावापुढे नमुन हे प्रदुषण नियंत्रणात आणले गेले. ईथेच एक एन्जीनीयरिंग कॉलेज आहे. तसेच सी एल आय, म्हणजे सेंट्र्ल लेबर ईन्स्टिट्युट आहे. तिथुन एक रस्ता बंतारा भवन कडे जातो. हे बंतारा म्हणजे तुळु लोक. ऐश्वर्या राय, त्यांच्यापैकीच. मग वरुन एक रेल्वेचा पुल जातो. हि आहे खास रिफ़ायनरीज कडुन येणारी रेल्वेलाईन, ती पुढे कुर्ला स्टेशनला जाते. या पुलानंतर लगेचच एक फ़ाटा फ़ुटतो तो आहे पुर्व द्रुतगति मार्ग म्हणजेच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे. तो मुलुंड ठाणे व पुढे नासिकला जातो. आपली बस वळण घेऊन डाव्या बाजुच्या रस्त्याला लागेल. तो आहे सायन ट्रॉम्बे रोड. तिथे सुमननगर नावाची सेल्स टॅक्स कर्मचार्यांची वसाहत आहे. पुर्वी तिथे स्वस्तिक मिल आणि सर्कस मैदान होते. आता दोन्ही नाहीत. मग आपण येतो चेंबुर नाक्याकडे. तिथेच अकबर अलीचे मोठे दुकान आहे. चेंबुर नाका हा माझ्या शाळेचा परिसर. ईथुन एक रस्ता चेंबुर कॉलनी कडे व त्या समोरचा रस्ता घाटकोपरकडे जातो. आपली बस तो नाका ओलांडुन सरळ पुढे जाईल. तिथेच डाव्या बाजुला सांडुंचे कार्यालय आहे, त्यांची औषधेहि तिथेच बनतात. तिथल्या एका गल्लीत, वंदे मातरम नावाची ईमारत आहे आणि ३० वर्षांपुर्वी, रामन राघव या सिरियल किलरने पहिला खुन तिथेच केला होता. त्या काळात त्याची फ़ार दशहत होती, पुढे तो पकडला गेला, पण त्याला फ़ाशीची शिक्षा होवु शकली नाही. अत्यंत विकृत पद्धतीने खुन करत असे तो. तिथुन पुढे लागेल योगी हॉटेल. बाहेरगावी जाणार्या बसगाड्या तिथे थांबतात. त्यामुळे अर्थातच टिकेट एजंट्सची तिथे लगबग असते. पुढे डायमंड गार्डन नावाची बाग लागते. त्यालाच चेंबुर गार्डनहि म्हणतात. या बागेत एक जुने मिग विमान ठेवलेले आहे. आपली बस तिथे डावीकडे वळेल. तिथुन सुरु होतो चेंबुरला शांत परिसर. हिरवागार असलेला हा परिसर अनेक बंगल्यानी सुषोभित आहे. पुढे लगेच लागेल डॉ. आंबेडकर ऊद्यान. ईथे अर्थातच त्यांचा पुतळा आहे. सध्या तिथे काहितरी बांधकाम होताना दिसतेय. आपल्या बसचा हा शेवटचा स्टॉप. पुढच्या वेळी आणखी एक रुट बघु.
|
| |
| Friday, February 17, 2006 - 2:34 pm: |
|
|
आज आपण ३११ आणि ३१३ या रुटने जाऊ. या दोन्ही बसेस कुर्ला ते सांताक्रुज अश्या धावतात. या दोघींचा रुट बराचसा तसाच असला तरी मधला काहि टप्पा वेगळा आहे. ( म्हणुन ते वेगळे रुट. ) कुर्ला हे मध्य रेल्वेचे मह्त्वाचे स्टेशन तिथुन पश्चिम ऊपनगरात जायला हा सोयीचा पर्याय आहे. तो जर नसता तर कुर्ल्याहुन मध्य रेल्वेने दादरला तिथुन पश्चिम रेल्वेने सांताक्रुजला यावे लागले असते. कुर्ला स्टेशनच्या पश्चिमेला एक मोठे बस थांब्यांचे आवार आहे. तिथुन या बसेस सुटतात. कुर्ल्याच्या या भागात मुस्लीमांचे प्राबल्य असले तरी ब्राम्हणवाडीहि तिथुन जवळच आहे. तिथे फ़टाके, मेंदी, तंबाखु यांचा घाऊक व्यापार होतो ते आपण बघितले आहेच. या थांब्यांच्या मागेच एक थिएटर पण आहे, समोर अंजुमन ईस्लाम हायस्कुल आहे, आणि त्याच्या दारात नागचाफ्याचे खुप मोठे झाड आहे. या नागचाफ्याला खुप मोठे झाल्याशिवाय फ़ुलेच येत नाहीत. याची फ़ुले मोतिया रंगाची आणि मादक वासाची असतात. ती खोडालाच लागतात. चांगली आठ दहा सेमी व्यासाची असतात. याला फ़ळे पण चांगली तोफगोळ्या एवढी मोठी लागतात. ( म्हणुन तो कॅनन बॉल ट्री ) तिथे वाहतुकीची कोंडी ठरलेली पण या आणि ईतरहि डबल डेकर बसेस सतत जात येत असतात. सयाजी शिंदे ईथल्याच एका बॅंकेत पुर्वी नोकरीला होते. मग आपण येतो लक्ष्मणराव यादव मंडईकडे. वाचायला मजा वाटेल पण ईथे चड्डी भंडार नावाचे मोठे दुकान आहे, आणि पुर्वी सर्रास वापरात असलेल्या निळ्या, हिरव्या पट्टेरी अर्ध्या हाफ पॅंटी तिथे अजुनहि मिळतात. हे डिझाईन त्याकाळी खुपच कॉमन होते. मग अगदी अरुंद रस्त्यावरुन आपण पुढे येतो. तिथे मुंबईतील मोजक्या असलेल्या बेने ईस्रायली लोकांचे प्रार्थना स्थळ आहे. पण तो परिसर फ़ारच गलिच्छ आहे. मग आपण एका सिग्नलपाशी येतो. हा आहे एल बी एस रोड म्हणजेच लाल बहादुर शास्त्री मार्ग किंवा जुना आग्रा रोड. हा रस्ता सायनहुन येतो व मुलुंडकडे जातो. आपली बस जर ३१३ नंबरची असेल तर हा रस्ता क्रॉस करुन सरळ जाईल. ३११ मात्र ऊजवीकडे वळेल. आपण आधी ३१३ ने जाऊ. या जंक्शनपाशी कायम ट्राफ़िक जॅम होत असल्याने, सध्या ईथे फ़्लायओव्हरचे काम चालु आहे. आपण नॉर्मल रुटने जाऊ. हा सिग्नल ओलांडला को लगेचच काहि भंगाराची दुकाने दिसु लागतात. लोखंड आणि लाकुड यातले हवे ते तिथे मिळु शकते. मग आपल्याला लागते कपाडिया नगर आणि मग लागते मिठी नदी. गेल्या पावसाळ्यात या नदीने काय ऊच्छाद मांडला होता ते आपण बघितलेच. खरे म्हणजे ऊच्छाद तिने नव्हे तर तिच्यातील प्रदुषणामुळे घडला. आजचे तिचे काळेकुट्ट रुप बघुन, कधी काळी ती नावाप्रमाणे गोड्या पाण्याची नदी होती, यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. अजुनहि याबाबतीत काहि झालेय असे दिसत नाहीत. अभिनेता दत्ता भट यानी सांगितलेली एक किस्सा आठवतोय. माकडाना पावसात खुप त्रास होतो. फ़ांद्या निसरड्या होतात, झाडावर नीट चढता येत नाही, भिजुन चिंब व्हायला होतं, थंडी वाजते असे अनेक प्रॉब्लेम्स येतात, दर पावसात ते ठरवतात, कि पाऊस ओसरला कि आपण घर बांधायचे, पिल्लाबाळाना निवारा करायचा. तेवढी अक्कल त्याना असतेच, अगदी पक्क्या योजना आखल्या जातात, एकदा पाऊस ओसरला, कि सगळे विसरले जाते, परत या झाडावरुन त्या झाडावर ऊड्या मारण्यात वेळ घालवला जातो. घर बांधायचे प्लॅन्स विसरले जातात. त्याची आठवण मग फ़क्त पुढच्या पावसाळ्यात निघते. आपणहि तसेच वागतो. नाहि का ? असो मी वाहवलो, हि नदी काहि वाहताना दिसत नाही, माझा भाचा म्हणतो, पोहायला हि नदी उत्तम, बुडायची भिती नाही. तिथुन पुढे आपण येतो कालिना भागात. पुर्वी तिथे मेट्रो प्ले ईंग कार्ड कंपनी होती, खेळायच्या पत्त्यांची छपाई तिथे होत असे. कालांतराने ती बंद पडली आणि तिथे व्हीडिओकॉन, कोडाक वैगरे कंपन्यांची ऑफ़िसेस सुरु झाली. मग आपण येतो विद्यानगरी कडे. विद्यानगरी म्हणजे मुंबई विद्यापिठाची शाखा. आत छान मोकळे आवार आहे. अभ्यासाला पोषक वातावरण आहे. या परिसरात काहि जुनी बैठी घरे आहेत. हौसेने लावलेले एखादे बिमलीचे झाड ईथे दिसु शकते. मग आपण येतो कालिना मार्केट कडे. ३११ बसचा रुट परत ईथे येऊन मिळतो. आता अपण त्या रुटने परत ईथे येऊ. आपण कुर्ला सिग्नलपाशी तो रुट सोडला होता. तिथुन ती बस ऊजवीकडे वळते. तिथेच कल्पना थिएटर आहे. त्या समोरुन आपली बस डावीकडे वळेल. आणि मग लगेच विमानतळाचा परिसर दिसु लागतो. त्या बसमधुन विमान ऊतरताना दिसतेच, तसेच टेक ऑफ़ करताना पण दिसते. मुंबई विमानतळावर पुर्वेकडे आणि पश्चिमेकडे अश्या दोन्ही दिशेने विमाने ऊडतात. ( पण एकावेळी एकाच दिशेने ) जगातल्या बहुतेक धावपट्टीप्रमाणे हि धावपट्टीदेखील पुर्वपश्चिमच आहे. दुरवर आपल्याला सहार विमानतळ आणि तिथे ऊभी असलेली विमाने दिसु शकतात. बराच वेळ हि बस धावपट्टीला समांतर जाते आणि मग परत डावे वळण घेते. ईथे आपण येतो एअर ईंडिया कॉलनीकडे. गेल्या पावसाळ्यात ईथे हाहाकार माजला होता. याच्या समोर कालिनाची मस्जिद आहे. या मशीदीला पैसा परदेशातुन पुरवला गेलाय हे तर ऊघड सत्य आहे. ( हल्लीच दुबईला ताजमहालाची प्रतिकृती बांधल्याचे वाचले, दुबईतल्या शेखांचे काय हो, आपला ताजमहालहि ऊद्या विकत घेतील ते, आणि आपले राजकारणी तो विकतीलहि. ) तिथेच कालिनाचा भाजीबाजार लागतो आणि आपण विद्यानगरी नाक्यावर येतो. ईथुन पुढे ३११ आणि ३१३ परत एकाच मार्गाने धावु लागतात. ईथुन थोड्याच अंतरावर एक घाट सदृष्य वळण येते. आणि ते ओलांडल्यावर आपण वाकोल्याला येतो. ईथे काहि मिलिटरीच्या वसाहती आहेत. ईथुन पुर्वी सांताक्रुज एअरपोर्टला जायला शॉर्टकट होता, आता तो बंद केलाय. मग आपली बस वाकोला पाईपलाईनकडे येते. ईथे वाटेत कदंबाचा एक भला मोठ्ठा वृक्ष लागतो. पावसाळ्यात फ़ुलानी लगडलेला असतो तो, पण तरिही चेंडुसारखी गोल गरगरीत फ़ुले पटकन दिसणार नाहीत, कारण त्याना पानाच्या मागे दडायची वाईट खोड असते. मग आपण येतो सांताक्रुज सिग्नलकडे. ईथे आपण वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ओलांडतो. हा रस्ता वांद्रापासुन सुरु होतो. तुम्ही सहार एअरपोर्टला जाता ते बहुदा याच रस्त्यावरुन. तो सिग्नल ओलांडला कि आपण सांताक्रुजलाच येतो. पुलाखालुन एक झोकदार वळण घेऊन बस थेट स्टेशनच्या दाराशी येते. फ़ारशी वाहतुक कोंडी नसेल, आणि ती बहुदा नसतेच या रस्त्यावर तर अर्ध्या तासाच्या आत आपण कुर्ल्याहुन सांताक्रुजला पोहोचतो. पुढच्या वेळी आपण ३१० चा रुट बघु.
|
| |
| Friday, February 17, 2006 - 2:49 pm: |
|
|
आज आपण ३१० चा रुट बघु. हि बस कुर्ला स्टेशब ते वांद्रा टर्मिनस अशी धावते. कुर्ल्याला जरी रेल्वेचे टर्मिनस असले तरी कुर्ला स्टेशनपासुन ते लांब आहे, ( कुर्ल्याच्या पुढचे स्टेशन टिळकनगर, ईथुन ते जवळ आहे. ) म्हणुन नाहितर हि बस दोन टर्मिनसना जोडणारी ठरली असते. कुर्ला पश्चिमेला जर तुम्ही सकाळच्या वेळी गेलात, तर ३१० ची लांबलचक क्यु, तुम्हाला दिसेल, पण या क्यु ला घाबरायचे काहिच कारण नाही. बसच्या पहिल्या स्टॉपवर तरी, शिस्तबद्ध क्यु लावणे हे मुंबईकरांच्या चांगलेच अंगवळणी पडलेय. या स्टॉपवर सकाळच्या वेळी आणखी एक मजेदार दृष्य दिसेल, ते म्हणजे, बस यायच्या पुर्वीच, एक कंडक्टर रांगेतील प्रवाश्याना, तिकिटे देत असतो. हि एक छान पद्धत आहे. कंडक्टरसुद्धा मोकळेपणी तिकिटे देऊ शकतो. हि बस डबलडेकर असते. ईथे आल्याआल्या ती सोडण्यात येते. रांगेत कुणी घुसु नये म्हणुन बेस्टने काहि निव्रुत्त कर्माचार्यांवर ती जबाबदारी टाकली आहे. क्यु मधे थांबलात तर सकाळच्या वेळी साधारण दहा मिनिटाच्या आत तुम्हाला बस मिळतेच. क्यु मधल्या लोकाना निवांतपणे बसुन जायचे असते. पण जर तुम्हाला घाई असेल तर तुम्हाला आलेली बस पकडता येते. क्यु वाल्यानी बसमधे चढणे थांबवले कि जे बाहेर ऊभे असतात त्याना, बस पकडण्याची संधी दिली जाते. हि बस ३१३ प्रमाणेच कुर्ला सिग्नलपर्यंत जाते, तिथुन ती डावीकडे वळते. ईथेहि काहि लोखंड व लाकुड विकणारी दुकाने आहेत. या सामानाची ज्याना गरज असते, त्याना या दुकानाचा नेमका पत्ता माहित असतो. त्या सिग्नलच्या डाव्या वळणावरुन आपली बस सायनच्या दिशेने गेल्यावर पहिल्या सिन्गलपशी परत ऊजवीकडे वळेल. मग आपल्याला मिठी नदी ओलांडावी लागेल. तिथुन भरत नगर नावाची एक जुनी वसाहत लागेल. पण त्याचबरोबर आपण एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होईल. कारण ईथे रस्ता एकदम रुंद होईल आणि आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधे प्रवेश करु. ICICI बॅंक, बॅंक ऑफ़ ईंडिया, नाबार्ड, युटीआय अश्या अनेक बॅंकांच्या मोठ्या मोठ्या ईमारती या भागात आहेत. या निळ्या करड्या कांचांच्या ईमारती तुम्ही अनेक सिनेमात जाहिरातीत बघितल्या आहेत. ऊदा धूम मधे आदित्य चोप्रा विदुषकाचा वेष घेऊन जॉनवर पाळत ठेवतो तो सीन ईथे चित्रीत झालाय. ईथेच मागे धिरुभाई अंबानी पब्लिक स्कुल आहे. सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खान यांची मुले ईथे शिकतात. या शाळेच्या नियमांप्रमाणे ते दोघे कधी कधी स्वत : त्याना सोडायला येतात. अमेरिकन एंबसीची शाळा पण ईथेच आहे. त्या भागात आपल्याला एक नियोजित डायमंड मार्केट लागते. हे खुप मोठे संकुल आहे. यातले आर सी सी बांधकाम बहुतेक पुर्ण झालेय, पण पुढे काहि प्रगति झालेली नाहि. भरत शहाच्या अटकेपासुन तर ते पारच थंडावले आहे. चित्रलेखामधे खुप वर्षांपुर्वी या संकुलाविषयी एक लेख आला होता. त्यातील माहितीनुसार हे एक परिपुर्ण संकुल असणार होते. अद्यावत कॉम्प्युटराईझ्ड सुरक्षा यंत्रणा तिथे बसवण्यात येणार होती. सध्या तरी या संकुलाचे भवितव्य अंधारात दिसतेय. ईथेच आहे एशियन हार्ट ईंस्टिट्युटची देखणी ईमारत. हृदयविकारावर अत्यंत नेमकी आणि महागडी देखील सेवा ईथे दिली जाते. ईथे रुग्णाना भेटायला येणार्या मंडळीना कसलेहि सामान आत नेता येत नाही. खालची लॉबी एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखी आहे. एकावेळी रुग्णाला भेटायला फ़क्त दोनच व्यक्तीना जाता येते, तेसुद्धा रुग्णाची भेटायची तयारी असली तरच. ईथेच एक गिफ़्ट शॉप आहे तसेच चवदार आणि आरोग्यपुर्ण पदार्थ विकणारे ऊपहारगृहदेखील आहे. मुद्दाम हे पदार्थ चाखण्यासाठी तिथे जायला हरकत नाही. ऑपरेशन चालताना, रुग्णाच्या नातेवाईकाना बसायची खास व्यवस्था आहे, शिवाय ऑपरेशनची प्रगति सांगण्यासाठी एका खास व्यक्तीचीहि योजना आहे. विशाल भारद्वाजच्या मकबुल सिनेमाचे काहि शुटिंग ईथे झालेय. तसा हा परिसार तुमच्या रोजच्या बघण्यातलाच म्हणायला हवा, तुम्ही मुंबईत कधीहि आलेला नसलात तरिही. कारण ईथेच आहे एम एम आर डी ग्राऊंड. ( काहि क्लिक झाले कि नाही. ) तुम्ही टिव्हीवर जे सिनेकलाकारांचे पुरस्कार सोहळे बघता, त्यापैकी बरेचसे ईथेच होतात. त्या वैशिष्ठपुर्ण स्टेजची ऊभारणी चालु असलेली ईथे अनेकदा दिसते. या पुरस्कार सोहळ्याशिवाय ईथे कसली ना कसली प्रदर्शनेहि भरलेली दिसतात. हा संपुर्ण विभाग, नरिमन पॉईंटला पर्याय म्हणुन विकसित करण्यात आला आहे. ईथुन पुढे अनेक सरकारी कर्यालये म्हणजे सेल्स टॅक्स, ईनकम टॅक्स, औषध प्रशासन यांच्या ईमारती लागतात, रिझर्व बॅंकेचेहि एक कार्यालय ईथे आहे. ईथला रस्ता बर्यापैकी विस्तीर्ण आहे. हिरवाई हि आहे. काहि फ़ुड स्टॉल्स आणि त्या अनुषंगाने येणारा बकालपणाहि आहे. ईथेच जरा मागे, एक विस्तिर्ण फ़ुड कोर्ट आहे. तिथली सजावट व बैठकव्यवस्था छान असली तरी जेवणाला अजिबातच चव नसते. तिथेच आहे फ़ॅमिलि कोर्ट, कौटुंबिक वाद सोडवण्याचा फ़ार्स ईथे केला जातो. त्याच ईमारतीत खाली सब रजिस्ट्रार यांचे ऑफ़िस आहे. नवीन घर घेतल्यावर त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी ईथे यावे लागते. मागे काहि निवासी संकुले आहेत शिवाय सी एम सी ची वैशिष्ठपुर्ण ईमारत आहे. या ईमारतीत नैसर्गिक प्रकाशाचा छान ऊपयोग करुन घेतला आहे. या नंतर लागते ड्राईव्ह ईन थिएटर. आता ते जमीदोस्त झालेय व नवीन बांधकाम सध्या सुरु आहे. ईथुन आपण येतो कलानगर सिग्नलकडे. पुर्वी ईथे एक ऊद्यान होते आणि त्यात एका नंदादीपाचे शिल्प होते. सध्या ते दिसत नाही तिथे. ईथुन एक रस्ता कला नगरला जातो. तिथे पत्रकारांची वसाहत, साहित्य सहवास वैगरे आहेत, आणि मातोश्री बंगला पण तिथेच आहे. पण आपली बस तिथुन आत न जाता, एका गलिच्छ विभागात शिरेल. हा आहे बेहरामपाडा. तो पार केला कि आपण लगेचच बांद्रा स्टेशनचा पुर्वेला येतो. ईथुन आणखी एक स्टॉप पुढे गेल्यावर बांद्रा टर्मिनस स्टेशन लागते. पश्चिम रेल्वेच्या बाहेरगावी जाणार्या काहि गाड्या तिथुन सुटतात.
|
| |
| Wednesday, March 08, 2006 - 3:47 pm: |
|
|
रुट नंबर ३५२ हि पण एक खुप पुर्वीपासुन कार्यरत असलेली बस. सायनहुन ट्रॉम्बे ला जाणारी हि बस. हा रस्तापण सायन ट्रॉम्बे म्हणुनच ओळखला जातो. जसे सायन हा शीव चा अपभ्रंश, तसाच ट्रॉम्बे हा तुर्भे चा अपभ्रंश. पण सध्या दोन्ही अपभ्रंशच जास्त प्रचलित आहेत. सायन स्टेशनपासुन मेन रोडच्या दिशेने जरा चालत गेले कि ३५२ चा स्टॉप आहे. या बसची फ़्रिक्वेन्सी पण बर्यापैकी आहे. पुर्वी तुर्भेला जायला हि एकच बस होती, त्यामुळे तिला कायम गर्दी असायची, पण आता तिथे बाकि काहि बसेस जायला लागल्यामुळे, या रुटवरचा ताण थोडा कमी झालाय. सायनहुन निघालेली हि बस एक डावे वळण घेऊन लगेच मेन रोडला लागते. आता तिथे फ़्लायओव्हर झालाय. पण त्याने तिथली कोंडी फ़ारशी सुटलेली नाही. एका बाजुलाला काळा किल्ला आणि दुसर्या बाजुला सायनचा किल्ला अश्या मार्गाने, हा प्रशस्त रस्ता सुरु होतो. ईथेच डाव्या बाजुला एक रस्ता चुनाभट्टीकडे जातो. त्याला डंकन कॉजवे म्हणतात. पुरातन काळी, तिथपर्यंत खाडी होती, व समुद्रातील शिंपले घेऊन येणारी गलबते तिथे लागत. त्यापासुन चुना करायच्या भट्ट्या तिथे होत्या. आता तिथपासुन समुद्र फ़ारच दुर हटवला गेलाय. मग डाव्या बाजुलाच एक बांधीव तळे लागते. या तळ्यात गणेशविसर्जन होते. पण आता मात्र या तळ्याची अवस्था दयनीय आहे. कधी कधी हे तळे जलपर्णीने भरुन जाते. गणपतिच्या दिवसात थोडीफ़ार साफ़सफ़ाई होते ईतकेच. मग लागतो चुनाभट्टीचा पुल. ईथुन दुरवर शिवडीचा समुद्रकिनारा दिसतो. तिथे अजुनहि फ़्लेमिंगो पक्षी येतात. मग मात्र ऊजव्या बाजुला बरिच मोकळी जागा आहे. त्यामागे हल्ली बर्याच नवीन ईमारती झाल्या आहेत. हि जी मोकळी जागा आहे, तिथे सत्संगा पासुन हातमाग प्रदर्शना पर्यंत काहि ना काहि चाललेले असते. मग लागते एव्हरार्ड नगर. तिथे पुर्वापार कॅथलिकांची वस्ती आहे. मग लागतो वडाळ्याहुन येणारा फ़्लायओव्हर. पुर्वी ईथे एक वनस्पति ऊद्यान करायचे घाटत होते, पण सध्या काहि ते दिसत नाही. मग आपण येतो प्रियदर्शिनी सर्कलकडे. हे ईथल्या राष्ट्रिय केमिकल्स & फ़र्टिलायझर्स या ऑफ़िसच्या ईमारतीचे नाव. याच ठिकाणी चुनाभट्टीहुन येणारा रस्ता मिळतो. एक डावा फ़ाटा आमच्या शिवसृष्टीत जातो. ईथुनच ईष्टर्न एक्स्प्रेस हायवे वेगळा होतो. हा रस्ता पुढे ठाणे व नासिकला जातो. आपली बस मात्र ऊजवे वळण घेऊन तुर्भेच्या रस्त्याला लागेल. या दोन रस्त्यांमधला त्रिकोण पुर्वी ओसाड होता, आता तिथे एक छोटेसे ऊद्यान आहे. ईथे पुर्वी ऊजव्या बाजुला स्वस्तिक मिल होती, ती कधीच बंद पडली व आता तिथे एक ऑफ़िस कॉम्प्लेक्स आहे. रिलायन्स, थॉमस कुक वैगरे ऑफ़िसेस आहेत तिथे. त्याच्या समोर एक लाल डोंगर होता. होताच म्हणायला हवा, पण आता मात्र तो झोपड्यानी गिळुन टाकलाय. गेली तीस वर्षे, आमच्या घरात काम करणार्या बायका तिथुनच येत आहेत. यापुढे पुर्वी एक मोकळे मैदान होते. त्याला सर्कस मैदान म्हणत असत. अनेक सर्कस मी तिथे बघितल्या आहेत. पण आता त्या जागीहि काहि ईमारती ऊभ्या आहेत. तिथेच ऊजव्या बाजुला एक मोठी नर्सरी आहे, आमच्या बागेतली गुलाबाची कलमे तिथुन आणली होती. मग आपण एका चौकात येतो. तिथुन एक रस्ता कुर्ला स्टेशनकडे व दुसरा रस्ता, चेंबुर कॉलनीकडे जातो. आपली बस मात्र सरळ जाईल. हि बस आणि हा रस्ता देखील माझ्या शाळेचा. त्यावेळी निवांत असणारा हा रस्ता, आता खुपच गजबजलेला असतो. ईथेच एक विजय नावाचे थिएटर आहे. त्याच्या बाहेर संतोषी मातेचे देऊळ आहे. या देवळाचाच जन्म माझ्या डोळ्यासमोरच झाला. त्याच्या बाजुला एक पित्झा जॉईंट आहे. त्याच्या बाजुला पण एका हॉटेलची जागा आहे. पण काय असेल ते असो, अनेक हाय फ़ाय हॉटेल्स तिथे ऊघडली गेली व बंद पडली. त्यात रोटी आणि डोसा अश्या नावाची स्पेशिआलिटी हॉटेल्स पण होती, पण चालली नाहीत हे खरं. मग आपण येतो चेंबुर नाक्याकडे. ईथुन एक रस्ता चेंबुर स्टेशनकडे व त्या समोरचा रस्ता चेंबुर कॉलनीकडे जातो. आपली बस मात्र सरळ जाईल. ईथे चेंबुर मार्केट आहे, सांडुंचा औषधाचा कारखाना आहे. आणि मग येते योगी हॉटेल. हे हॉटेल जास्त करुन प्रसिद्ध आहे, ते बाहेरगावी जाणार्या बसच्या पिक अप पॉईंटसाठी. २४ तास हा भाग गजबजलेला असतो. तिथे पुढे आहे बी. एन. आचार्य ऊद्यान. पण ते ऊद्यान डायमंड गार्डन म्हणुनच ओळखले जाते. तिथे एक जुने मिग विमान ठेवलेले आहे. त्याच्या समोरचा रस्ता चेंबुरच्या गोल्फ मैदानाकडे जातो. पण आपली बस सरळच जाईल. तिथुन पुढे आपल्याला लागेल मैत्री पार्क नावाची एक कॉलनी. बाहेरगावी जाणार्या एस्टी येता जाता तिथे थांबतात. वाटेत आपल्याला आर के स्टुडिओ लागेल. राज कपुर असताना ईथे बरिच वर्दळ असायची. तो गेल्यावर तिथे फ़ारशी सिनेनिर्मिती झालीच नाही. तिथे होळि आणि गणपति पण मोठ्या ऊत्साहात साजरे केले जात. आता तिथे फ़ारशी हालचालच दिसत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे तिथे आशा नावाचा आणखी एक स्टुडिओ होता, आता तो हि नाही. मग आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा असलेले एक सर्कल लागेल. हा पुतळा अश्वारुढ असुन खुप सुंदर आहे. आणि मोकळ्या जागी असल्याबे लक्षहि वेधुन घेतो. आपल्याला वाटेत लागेल देवनार. ईथे बेस्टचा जुना डेपो आहे. देवनार हे नाव तुम्ही पशुवधगृहाच्या संदर्भात पण ऐकले असेल. तिथे नेण्यात येणारी गुरे मी अनेकवेळा बघितली आहेत, पण ती जागा नेमकि कुठे आहे, हे मला माहित नाही. ईथे एक टेलिकॉम फ़ॅक्टरी आहे. शिवाय पुर्वी ड्युक्स कंपनी होती. आजकाल हे नाव अपरिचित वाटेल. पण पुर्वी ड्युक्स मॅंगोला फ़ार फ़ेमस होता. ईथुन एक रस्ता गोवंडी स्टेशनकडे जातो. ईथेच रुणवाल बिल्डर्सनी काहि मोठ्या ईमारती बांधल्या आहेत. आपल्याला ऊजव्या हाताला एक प्रचंड मोठा डोंगर दिसेल. पावसाळ्यात तो हिरवागार होतोच, त्याशिवाय खुप वेळा त्याचा माथा ढगात असतो. पण सहसा असते, तसे या ऊंच डोंगरावर देऊळ वैगरे दिसत नाही. तिथे कुणी गिर्यारोहणासाठी पण जाताना दिसत नाही. बहुतेक ते संरक्षित क्षेत्र असावे. तिथे गर्द हिरवाईत टाटा सामाजिक विद्यान संस्थेचे आवार आहे. टाटानी अनेक संस्था केवळ सामाजिक जाणीवेतुन ऊभ्या केल्या. आस्थेने चालवल्या, त्यापैकि हि एक. एक नावाजलेली संस्था. ईथेच टाटांच्या कर्मचार्यांसाठी असलेले एक अद्यावत हॉस्पिटल आहे. मग आपल्याला लागेल अणुशक्ती नगर. भाभा अटोमिक रिसर्च सेंटरच्या कर्मचार्यांची वसाहत. अत्यंत रेखीव अशी हि वसाहत आहे. या वसाहतीत जायला मिळाले तर अवश्य फ़ेरफ़टका मारुन यावा. ईथुनच एक फ़्लायओव्हर वाशीच्या खाडीपुलाकडे जातो. म्हणजेच तुम्ही कोकणातुन वा पुण्याहुन मुंबईत येता, तेंव्हा ईथुनच मुंबईत प्रवेश करता. आपली बस मात्र तो फ़्लायओव्हर टाळुन सरळ जाईल. ईथुन पुढे अगदी निवांत भाग आहे. आत्ता आत्ता पर्यन्त तर तिथे फ़ारशी वस्तीहि नव्हती. मिलिट्रीच्या बराकि आहेत. चिंचेची बरीच झाडे आहेत. वाटेत आपल्याला नर्मदेश्वराचे (CBDG) जुने देऊळ लागते. अगदी निवान्त रमणीय भाग आहे तो. मग लागतो चिता कॅंप. माझ्या आजीने बांधलेले एक देऊळ तिथे आहे. तिथल्या एका डोंगरावर मोडकळीस आलेले चर्च आहे, व त्या डोंगराच्या पायथ्याशी हे गाव वसलेय. मध्यंतरी मुंबईतील झोपडपट्ट्या हलवुन, तिथे जनता कॉलनी वसवली होती. त्या लोकांमुळे आता तिथे गर्दी जाणवते. तिथुन पुढे रस्त्याच्या एका ऊंचवट्यावरुन दुरवर समुद्रात एक अणुभट्टी दिसते. आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात याचे नेहमी चित्र असायचे. तिथे अर्थातच आपल्याला जात नाही. मग समुद्राच्या जवळ आपल्या बसचा शेवटचा स्टॉप आहे. हेच तुर्भे गाव. पुर्वापार ईथे कोळी लोकांची वस्ती आहे. दहा दहा तोळे सोन्याची गाथणं घातलेल्या कोळणी, तिथे अजुनहि दिसतात. तिथे म्हणावा असा किनारा नाही. दलदलच आहे. अगदी बस स्टॉपजवळ एसेल स्टुडिओ आहे. तिथे काहि कायम स्वरुपाची बांधकामे आहेत. खास करुन पुर्वीच्या हिंदी सिनेमात सेंट्रल जेलचे गेट दाखवत असत, तो भाग ईथलाच. पण आता तो वापरात नाही बहुदा. मुंबईत तांदळाचा तुटवडा होता, तेंव्हा आम्ही तांदुळ आणायला तिथे जात असु. हे माझ्या आजीचे गाव. आमचे खुप वेळा जाणे व्हायचे, ती असताना. माझ्या ” झालं ते एका अर्थी ” या कथेची ती नायिका. आता ती नाही. तिचे घरहि आता पडुन गेले असेल.
|
| |
| Sunday, March 26, 2006 - 3:05 am: |
|
|
त्याच परिसरातले हे गुलाबाचे फुल
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|