Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 01, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through April 01, 2006 « Previous Next »

Chinnu
Wednesday, March 29, 2006 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, फ़ार उत्सुकतेने वाचत आहे मी! येवु द्या असच..

Mbhure
Wednesday, March 29, 2006 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच. बरेच आठवले. ' प्रतिमा आणि प्रतिभा'मध्ये विजय तेंडुलकरांनी सुप्रसिद्ध हृदरोगतज्ञ डॉ तुळतुळे यांची मुलाखत घेतलेली. अत्यंत माहितीपुर्ण होती. नंतर एकदा प्रआप्र कार्यक्रमात डॉ. गोयलही आले होते. बहुतेक सर्व पाहुणे हे त्यांच्या क्षेत्रातील प्रथितयश व्यक्ती असायच्या. I always miss that prograam

छायागीत मधु राजा सादर करायची.

हल्लीचे विनोद बघितल्यवर ' हास परिहास' बराच बरा वाटतो.

ज्ञानदिपच्या आकाशानंद ह्यांचा चाहता मला अजुन भेटायचा आहे.

TV ने जी त्यांची स्वतःचे नाटक सादर केली त्यात आशालता आणि दिलीप कुलकर्णीचे ' वाघनख'एक छान Suspense नाटक होते. तसेच फार पुर्वी ' चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' हे नवनाट्याही गाजले होते. त्यात ' बस आली, बस आली..... कुठे आहे ती बस?.... आपली नाही ती बस' हे वाक्य रिपीट ह्यावचे. ते बरेच गाजले होते. तसेच भक्ती बर्वे असलेले एक नाटक होते. त्यात ती नुकत्याच दिवंगत झालेल्या पुढार्‍याची बाय्को असते. मुलांपासुन सर्व तिला नाव ठेवतात. तिचे आणि दिराचे संबंध आहेत आणि त्यामुळे ह्या नेताला आयुष्यात किती त्रास सहन कराव लागला आणि तो नेता मोठ्या मनाचा म्हणुन बायकोला कसे समजुन घेतले वगैरे लोक म्हणतात. पण प्रत्यक्षात उलटेच असते. ते ती सांगू पहाते तर तिलाच परत दोष देतात. छान नाटक होते.

किशोर आणि शोभा प्रधान यांच्या नाटकाचे नाव ' मनाचे खेळ' असे कहीतरी होते. नावात श्लेष साधला होता. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आम्ही लटिके ना बोलु अशी बरिच दर्जेदार नाटके सादर केली दुरदर्शनने.

दिनेश, वृत्तनिवेदिका स्मिता पाटील राहिली.

असो. बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.









Supriyaj
Wednesday, March 29, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bhure .. tya naatkaache nav hote 'kalpanecha khel'

Maitreyee
Wednesday, March 29, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त विषय, दिनेश!! खूप नॉस्टॅल्जिक वाटलं!
व्यत्यय ची पाटी
त्यावर किती जोक्स व्हायचे! एक असं व्यंगचित्र होतं, ' ययय ' अशी पाटी आणि नन्तर ' व्यत्यय ' ची पाटी नीट दाखवू शकलो नाही त्याबद्दल खेद आहे:-)


Svsameer
Thursday, March 30, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश
छानच लिहिलय हे सर्व. मलाही बर्‍याच गोष्टी आठवल्या. In fact माझे दूरदर्शन बघायला सुरु केलं तेव्हाचे अनुभव तुमच्याशी तंतोतंत जुळतात. फक्त काळ थोडा १० वर्श fast forward करावा लागेल. गोव्यात TV तसा उशिराच आला. आणि रंगीत अजुन उशीरा. खास रंगीत cricket बघण्यासाठी ( लाल चेंडु, हिरवं मैदान ) :-) १ किलोमिटर लांब सायकल हाणीत जायचो. शनिवार रविवार सिनेमा पहायला सर्व भाडेकरू घरमालकांच्या माडीवर खिडक्या पडदे बंद करुन Theater सारखा काळोख करून बसायचो


Tanya
Thursday, March 30, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा....परत त्याकाळात नेऊन सोडलत. चिमणराव,बोलक्या बाहुल्या आणि किलबिल हेच जास्त fav. असायचे.बिल्डिंगमध्ये प्रत्येकाकडे टि.व्ही. होता पण तरिही त्याकाळी आम्हांला t.v. च एवढ वेड नव्हत, सगळेजण खेळण्यातच मशगुल असायचे.

१९८२सालचे अप्पु एशियाड पहिल्यांदा आम्ही,आमच्याकडे कलर टि.व्ही. वर पाहिले, आणि मग हळुहळु t.v. pgm. आवडायला लागले.
५वी.त असताना 'श्वेतांबरा' सारखी त्याकाळी आम्हांला थोडी भयावह असणारी पहिली मालिका बघितली. पण नंतरचे भाग बघणच सोडुन दिल. दिवाळी, ३१डिसेंबरचे pgm. मात्र अजुन आठवतात. तेव्हा चांगले असायचे.
मैत्रेयी....व्यतयची पाटी!


Atullonkar
Thursday, March 30, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, ख़रच इतक मस्त वाटल हे सगळ वाचताना
खर सागायच तर मन एकदम आठवणीनी आणि भावनानी भरुन गेल.

तुम्हाला हे सर्व सविस्तर लक्शात आहे याच पण आश्चर्य वाटल.

मी मुम्बईचा नाही. तुमचे इतर लेख मुम्बईच्या ट्रेन्स वर आहेत.
काही लेख एकदम छान आहेत.

तुमचे असेच अनेक गोड गोड लेख येऊ देत. आम्हा वाचकासाठी ती पर्वणीच आहे.

-अतुल.
बगलोर.

टिप: काही ठिकाणी अनुस्वार नाहीत, माहीत नाही कसे द्यायचे ते :-)


Moodi
Thursday, March 30, 2006 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे द्या ते. बंगलोर ba.ngalor .

Moodi
Thursday, March 30, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मला आश्चर्य वाटते की तुमचे एवढे हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे की त्यातुन काय काय वेचावे अन काय नाही.
कुठल्याही खजिन्याची चावी जनरली तुमच्याकडे असतेच. प्रत्येक गोष्टीचा अचुक अन सखोल अभ्यास तुम्हीच करु जाणे.
आपल्याव्यतीरीक्त पण या जगात काहीतरी आहे असे भान असणारे अगदी दुर्मीळ आहेत अन त्यात तुम्ही आहात याचाच मला आनंद आहे.

दूरचे दर्शन तर तुम्ही अगदीच जवळुन घडवलेत की.

लाखो सलाम तुमच्या अभ्यासू वृत्तीला अन सामाजीक जाणिवेला.


Asami
Thursday, March 30, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छायागीत दोनदा नसून एकदाच असे. दुसर्या कार्यक्रमाला चित्रहार नाव होते CBDG

रविवारच्या आणी metro च्या प्रक्षेपणामधे लहान मुलांसाठी बरेच कार्यक्रम असत. विक्रम वेताळ, अशोक कुमारचा दादा दादी कि कहानिया, एक दोन तीन चार, गोट्या, faster fene
metro वर english मालिका असत fireball, froggle rocks, he-man, johney shao and flying robot, spider man

star treks बघताना एकदम thrilling वाटत असे, विशेषतः kissing shot आला की

बाकी ह्या आठवणींना उजाळा करून दिल्याबद्दल धन्यवाद


Madhura
Thursday, March 30, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,मस्त लिहिलेत. कथासागर नावाची ही एक मालिका असायची. आणि पुलीस फाईल से , एक शून्य शून्य , चाळ नावाची वाचाळ वस्ती या ही होत्या काही serials . मजा आली हे सगळे आठवायला.

Ek_mulagi
Friday, March 31, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविवार सकाळची " रंगोली " विसरलात का, दिनेशदा?

अजुन रविवारी म्हणीवर आधारित कथेचा काहीतरी प्रोग्राम होता, नाव आठवत नाही आता.

होस्टेलला " फ़ौजी " चा काय माहोल असायचा.......


Upas
Friday, March 31, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश.. आधी खूप खूप धन्यवाद तुम्हाला.. अस्सं गोड वाटलं सांगू सगळं वाचून.. माझ्या लाडक्या मुंबईच इतक ओघवतं वर्णन नक्कीच आता बर्‍याच जणांची मुंबईच्या लोकल ची भीती कमी होईल हे वाचून.. अगदी सहीच वाटतय सगळं आठवून.. दाराला लोंबकाळणं.. हमरी तुमरी.. दर स्टेशनला उतरून परत चढणं.. घरी कळल्लं दरवाजाल लटकतो तर बोंब म्हणुन दबून राहाणं... गर्दीत मारलं गेलेलं पाकीट.. कितिदा तर नुसत्या चार बोटांच्या आणी अर्ध्या पावलाच्या आधारावर प्रवास केलाय.. आता आठवून सुद्धा भिती वाटते.. तुमचे सगळे लेख एका दमात वाचले आणि आठवणीत बुडूनच गेलो.. आणि हो निव्वळ एकावेळी एका गाडीतून प्रवास करण्यामुळे झालेले आमचे group आठवले.. खरच thanks :-)

Dineshvs
Friday, March 31, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रानो. सगळ्याबद्दल लिहितोच.
गेल्या आठवड्यात GS1 भेटला होता, तो पण विचारत होता, कि तुझ्या लक्षात एवढे सगळे कसे राहते.
मलाहि नवल वाटले, कारण मला अगदी दुसरी तिसरीत असल्यापासुनच्या घटना आठवतात. काहि तर त्याहि पुर्वीच्या आठवतात. ( नाही गेल्या जन्मीचां नाहि काहि आठवत. ) पण फोन नंबर, गाड्यांचे नंबर माझ्या लक्षात रहात नाहीत.
रेसिपी मात्र बहुतेक एकदा वाचुन लक्षात असतात. हे जरा विषयांतर, पण आपल्यापैकी कुणाला असा अनुभव आहे का ?


Champak
Friday, March 31, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही गेल्या जन्मीचां नाहि काहि आठवत.>>>>>>>>

मला फ़कस्त मागल्या अन पुढल्या जन्माचे आठवते!

Mbhure
Friday, March 31, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची माती आमची माणस मध्ये एक छान सिरीयल सादर व्हायची. त्यात माया जाधव, प्रदिप कबरे, राजा मयेकर, रवी पटवर्धन काम करायचे. एका नाटिकेतुन साक्षरता प्रसार, शेतीविषयक माहिती वगैरे असायचे. मानसिंग पवार ती मालिका सादर करायचे. नाव आठवते का?

माझा एक मित्र आईला चिडवायचाः आमची मा ती आमची ना नस. :-) त्याला आम्ही सांगितले होते की हे तू दादा कोंडकेना ऐकव.


Zelam
Friday, March 31, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MBhure मला वाटतं त्या कर्यक्रमाचं नाव गप्पागोष्टी. आणि त्या बाईचे नाव माया जाधव नाही, माया गुर्जर.
कर्यक्रमात शेवटी तिने घेतलेला मस्त उखाणा असायचा नाही?


Champak
Friday, March 31, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसिंग पवार तो कार्यक्रम सादर करित!

Manish2703
Friday, March 31, 2006 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण आपल्यापैकी कुणाला असा अनुभव आहे का ? >>

दिनेश... यावर एक बीबी उघडून टाका...
jokes apart... खूप मस्त लिहिले आहे सगळे...

Karadkar
Friday, March 31, 2006 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, राज से स्वराज, साधना ह्या मालिकांबद्दल लिहा हं.

सरोजनी बाबर आणि शांता शेळके एक मराठि कार्यक्रम सादर करत असत. मिलिं गुणाजीची एक मालिका होती.


Hawa_hawai
Friday, March 31, 2006 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिले आहे दिनेश. आठवणींना उजाळा मिळाला.

Dineshvs
Saturday, April 01, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम, बरोबर त्या माया गुर्जरच.
रत्नाकर मतकरींच्या वट वट सावित्री नाटकातहि त्या भुमिका करायच्या. त्यात दिलीप प्रभावळकर आणि अर्चना पाटकर होते. एक धम्माल नाटक होते ते.
पण माया गुर्जर अकाली गेल्या.
मिनोति. डॉ. सरोजिनी बाबर आणि शांता शेळके नी लोकगीतांवर कार्यक्रम केला होता. सरोजिनी बाई बहुतेक गाणी चालीवर म्हणत असत. ईंदिरा संतानी लोकगीतांवर मालनगाथा, असा ग्रंथ लिहिला आहे.
मिलिंद गुणाजी भटकंती मालिका सादर करायचा. त्याने या नावाने पुस्तकेहि लिहिली. त्याने स्वता काढलेले फोटो त्या पुस्तकात आहेत. देवरुखजवळच्या मार्लेश्वरच्या धबधब्याचा त्याने काढलेला फोटो खुप छान आहे. या धबधब्याला पाच टप्पे आहेत.
ईन फ़ॅक्ट तो आधी लिहित असे आणि मग त्याने सिरियल केली. तेच जुने भाग अजुनहि दाखवत असतात.
पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तुम्ही सगळ्यानी उल्लेख केलेल्या सगळ्याच मालिका मी बघु शकलो नाही. तरिपण पुढे लिहितोच आहे.
बाळ चंपका तु मागच्या जन्मी पण चंपकच होतास का रे.


Supriyaj
Saturday, April 01, 2006 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोति, दिनेश.. सरोजिनीताई आणि शांताबाईंच्या कार्यक्रमाचे नाव पण अतिशय सुंदर होते 'रानजाई'.
कुणाला दूरदर्शनवरील एका अभिनव नाटकाबद्दल आठवते आहे का?? त्याचे नाव होते 'शेवट नसलेली गोष्ट' .. सुरेश भागवत चा मुख्य रोल होता त्यात. There was a contest for ending that story. and then they selected 2 winners with different ends and the actors performed those on the next 2 parts of the drama.. मला वाटतं असा हा फारच दुर्मिळ प्रयोग असाअवा atleast in the history of doordarshan.


Ameyadeshpande
Saturday, April 01, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, हे वाचून लहानपणी टी.व्ही. चं केवढं वेगळं अस्तित्व होत असं वाटतं... english बातम्यांमधली मीनू आणि the world this week मधला प्रणव रॉय हे ही आठवतात. आणि तेव्हा भरमसाट channel नसल्यामुळे रोज काय काय असतं हे पाठ असायचं...
मेट्रो channel आला पण त्यात तो फ़क्त शहरात ठेवल्यामुळे एखादी छान क्रिकेट मच चालू असताना रात्री 8.30 ला cricket match telecast will continue on metro channels असं आलं की त्या metro channels चा रागच यायचा :-) आम्ही काय घोडं मारलयं असं वाटायचं :-)
आणि बालचित्रवाणी असायची सकाळी रोज त्याचं शिर्षक गीत तर अजून ही म्हणतो... आणि हो त्या discovery of india चं शिर्षक गीत ही वेगळं लक्षात राहण्यासारखं होतं...
मस्त लिहिलयं तुम्ही...


Seema_
Saturday, April 01, 2006 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश खुपच मस्त लिहिलय . आणखी एक मालिका होती दिलिप प्रभावळकरांची , झोपी गेलेला जागा झाला . इतकी काही खास नव्हती . हो , आणि दिनेश समारोप करताना सुरभी चा उल्लेख जमल तर नक्की करा हं

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators