|
Dineshvs
| |
| Monday, February 27, 2006 - 4:37 pm: |
|
|
Tanya तुम्ही एडका म्हणायचा का, आम्ही त्याला मुंडकं वाल्या बसेस म्हणायचो. त्याना वळणे जरा अवघड जायचे, म्हणुन आता त्या सेवेत नाहीतच. वळताना तर मुंडकं एकिकडे आणि बस दुसरीकडे असे व्हायचे. पण त्याहि बसचा कधी मोठा अपघात झाल्याचे वाचले नाही. अजुनहि काहि रुट्सबद्दल लिहिणार आहे. मुंबईकर कुठेहि गेला, तरी तो मुंबईकरच, हो ना
|
Tanya
| |
| Tuesday, February 28, 2006 - 6:35 am: |
|
|
दिनेशदा.. अगदी खर! मुंबईकर कुठेही गेला, आणि मुंबईच नाव जरी कुठे आले, तरी मुंबईच्याच आठवणींमध्ये रमणार. मी स्वतः त्या एडका' बसमध्ये खूप लहान असताना बसले, पण मला वाटत, आपल्या डोळ्यासमोर एक अख्खी बस वळते याचच कौतुक मला जास्त असायच. traffic मध्ये येणार्या अडचणींमुळे त्या बसेस मी लहान असतानाच बंद झाल्या होत्या. मला वाटते, माहिम depot हुन सुटणार्या १ no. बस साठी, त्या बसेस वापरायचे. तुमचे लेख, नक्किच जुन्या काळात घेऊन जाणारे, मन रमवणारे आहेत.
|
Sashal
| |
| Tuesday, February 28, 2006 - 3:23 pm: |
|
|
अगदी tempting आहे फ़ोटो .. तुम्ही recipe टाकली असेलच .. आता करून बघते ..
|
Pendhya
| |
| Saturday, March 04, 2006 - 2:14 am: |
|
|
प्रणाम दिनेश, मला ती कॉर्न आणी ब्रॉकोलीची रेसिपी कुठे दिसली नाही. तुम्ही कुठे पोस्ट केली आहे, त्याची ईथे लिंक द्या. धन्यवाद!
|
Champak
| |
| Saturday, March 04, 2006 - 2:51 pm: |
|
|
Pendhy, Dinesh is out of station for 3 days. He will write you later. Till then, mai hu naa Bol tere ko kisaki procedure chahiye
|
Moodi
| |
| Saturday, March 04, 2006 - 6:05 pm: |
|
|
ए पेंढ्या हिड हाय ही रेशेपी, करुन खा लवकर. /hitguj/messages/103383/103930.html?1140952724 .
|
Megha16
| |
| Tuesday, March 21, 2006 - 1:46 pm: |
|
|
दिनेश दा, फोटो खुप छान आले आहेत. पण चारा म्हणजे तुम्हाला घास म्हणायच का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 21, 2006 - 2:13 pm: |
|
|
त्याला घास म्हणतात का ? सुभाष चाराच म्हणाला होता. त्याची भाजी पण करतात. रानपाल्याची भाजी करण्यात, आपल्या गावोगावच्या अन्नपुर्णा, पटाईत असतात. मस्कतमधे पण हे पिक घेत असत.
|
Nalini
| |
| Tuesday, March 21, 2006 - 2:35 pm: |
|
|
दिनेशदादा, हो त्याला गावी ' घास' म्हणतात. त्याच्या साधारण ४ ते ५ कापण्या झाल्यानंतर जो कोवळा पाला असतो तो खुडुन आणला जातो व त्याचि मेथिची जशी सुकी भाजी करतो त्याप्रमाणे करतात. पण ही भाजी खुप उष्ण असते. मला खुप आवडते. त्याबद्दल अधिक सविस्तर पुढच्या पत्रात लिहिन. तसेच कांद्या बद्दल पण लिहिन. फोटो खुपच छान आलेत.
|
Champak
| |
| Tuesday, March 21, 2006 - 3:12 pm: |
|
|
टिंब टिंब की अकल घास खाणे गयी है..... ह्यातला घास तो तो च!
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 21, 2006 - 4:51 pm: |
|
|
मजा बघ, आपण ज्याला घास भरवणे म्हणतो, त्याला कोल्हापुरला चारणे असा शब्द वापरतात.
|
Shonoo
| |
| Wednesday, March 22, 2006 - 1:04 pm: |
|
|
एस्प्लनेड मॅन्शन दाखवले आणि डेव्हिड ससून लायब्ररी दाखवली मग 'माझी' आर्मी नेव्ही का गाळली :-( आर्मी नेव्ही बिल्डिंग मधे मी ६ वर्षे नोकरी केली आहे. डेव्हिड ससून लायब्ररी मधून जुनी मराठी पुस्तके वाचली आहेत. एस्प्लनेड मधला इराणी हा अख्ख्या मुम्बै मधला बेष्ट इराणी आहे दोन्ही डोहाळयांच्या वेळी एस्प्लनेड च्या मागच्या कोपर्यावरून बटाटेवडे मागवून( एकटीने) खाल्ले आहेत. डेव्हिड ससून च्या मागे छोटे अंगण आहे त्यात बसून ( आॅफ़िसच्या वेळात) पुस्तके वाचणे म्हणजे काय चंगळ होती. फोटो बघून अनेक जुन्या आठवणी दाटून आल्या.
|
Moodi
| |
| Saturday, March 25, 2006 - 11:27 pm: |
|
|
दिनेश सध्या याच आनंदाला आम्ही मुकलो आहोत, पण तुम्ही अन आपले भारतीय मायबोलीकर मात्र अजुनही या अत्तरात नाहत आहेत. बरोबर? http://www.esakal.com/static/vishesh_saptarang9.html .
|
Bhagya
| |
| Sunday, March 26, 2006 - 1:35 am: |
|
|
मला वाटतं इथे येणार्या सगळ्यांना हे आवडेल... http://www.loksatta.com/lokprabha/20060331/paryatan.htm
|
Dineshvs
| |
| Sunday, March 26, 2006 - 3:11 am: |
|
|
आणखी थोडं माझ्या मातीचं गाणं
|
फोटो छान आहेत, तुम्ही ज्याला चारा म्हटलेय ना.. त्याला आम्ही घास म्हणायचो.. आणि ते मेथीसारखे दीसते त्याच्या कोवळ्या पानांची भाजी सुद्धा व्हायची आजोळी! हे फोटो बघुन मला परत आजोळाची आठवण झाली. thank you!
|
Champak
| |
| Sunday, March 26, 2006 - 1:58 pm: |
|
|
एक काॅन्ग्रेस गवताचा फ़ोटु टाकल्या शिवाय तुम्ही नगर ला गेले होते हे मला मान्य च होणार नाही!!
|
Dineshvs
| |
| Monday, March 27, 2006 - 1:40 am: |
|
|
आता दिवाळी नंतर रे, कारण ईथे ते औषधालाहि नाही.
|
Pavi
| |
| Wednesday, March 29, 2006 - 3:16 am: |
|
|
दिनेश, छान लिहीले आहे. मला जुने दिवस आठवले.
|
Megha16
| |
| Wednesday, March 29, 2006 - 4:59 am: |
|
|
दिनेश दा, खुप खुप छान लिहले आहे. तुम्ही वर्णन केलेला काळ हा खुप जुना असेल atleast माझ्या जन्मा आधीचा तरी नक्कीच. पण तुमचा लेख वाचुन मला माझा काळ आठवला. आमच्या ही वेळी जास्त टिव्ही नव्हते. आणी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे शेजारी पाजारी जावे लागायचे. पण आमच्या कडे टीव्ही मात्र लवकर आला होता. तुमचा हा लेख वाचला आणी त्या दिवसांची आठ्वण झाली. पुढच लवकर येऊ दे.
|
Anilbhai
| |
| Wednesday, March 29, 2006 - 3:59 pm: |
|
|
आ हा हा अगदी आमच्या काळात गेलास की रे. १९७३ साली आमच्या कडेही पहीला T.V. आला. आमच्या कडे अशी गर्दी जमायची. खरच सुंदर लेख तुझ ते अपुर्ण.. तुझ्या प्रत्येक लेखाच्या शेवटी तसच असाव अस वाटत रे..
|
दिनेशदा... रामायण आणि महाभारत दाखवलेलं तेव्हा तर रविवारची प्रत्येक सकाळ booked असायची सगळ्यांच्या घरात... रस्ते सामसूम असायचे तासभर आणि ते episode पण अगदी मोक्याच्या क्षणी संपवायचे(अर्जुन द्रौपदीच्या स्वयंवरात बाण रोखून आहे आणि तेवढ्यात episode संपतो) मजा आली वाचून... मी लहान असताना सगळे black & white T.V. होते... एकांकडे रंगीत होता फ़क्त मग काही चांगला कार्यक्रम असला की सगळे त्यांच्याकडे आणि हो ती समुहगीतं ही लागायची खूप सारी... त्यात तो पांढर्या शुभ्र केसांचा माणूस keyboard वर असायचा बहुतेक अजूनही असतो तो चांगलाच लक्षात राहिलाय. अजून एक चांगलीच लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे दूरदर्शन चा logo आणि music आणि बातम्यांचं title music.
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 29, 2006 - 4:54 pm: |
|
|
भाई, अजुन ते कार्यक्रम माझ्या लक्षात आहेत. तो दर्जा आता खरच नाही. अमेय, तो माणुस आमच्या कॉलनीत आला होता. तो स्वता गात पण असे. जंबो जेट, जंबो जेट मुंबई लंडन विमान थेट असे बडबडगीत त्याने रचले होते.
|
Zelam
| |
| Wednesday, March 29, 2006 - 5:13 pm: |
|
|
त्या माणसाचे नाव अप्पा वढावकर बहुतेक. दिनेश मस्त लिहिताय. आता विचार केल्यावर वाटते किती फरक पडलाय ना सगळ्या कार्यक्रमात.
|
Supriyaj
| |
| Wednesday, March 29, 2006 - 6:32 pm: |
|
|
दिनेश, फारच छान वाटतय वाचताना.. सगळे कार्यक्रम एकदम डोळ्यासमोर उभे राहिलेत. डॅनीने आशाबरोबर त्या program मध्ये सुनो सुनो कसमसे हे गाणं पण म्हटल होतं. याकुब सयीद आणि प्रभु यांच्या कार्यक्रमाचं नाव होतं हास परिहास. तो नेहेमी छायागीत नंतर किंवा रविवारी दुपारी लागायचा. अजुन एक गुजराथी program आठवला तो म्हणजे 'आवो मारी साथे' .. त्यात एक 'करसन काका आणि गंगुकाकी' अशी comedy pair होती. it was a nice program. Well even i remember a nice parsi drama called 'bicharo barjor'.. नाटकावरून आठवण झाली तेव्हा बरीच नाटकं पुनर्प्रक्षेपीत केली जायची. मला लक्षात राहिलेलं नाटक म्हणजे किशोर, शोभा प्रधान आणि त्यांची मुलगी मिनु ह्यांच एक horror नाटक होतं. तसच ह्याच जोडीने अजुन एक 'मुडदा' नावाचं नाटक केलं होतं.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|