|
Dineshvs
| |
| Thursday, February 09, 2006 - 4:45 pm: |
|
|
मीहि आता मुंबईत नाही म्हणुन ऊर्वशीच्या आठवणी काढायच्या. याचे शास्त्रीय नाव Amherstia nobilis कुळ Caeslpiniaceae काऊंटेस ऍमहर्स्ट ( व त्यांची कन्या लेडी सारा ऍम्हर्स्ट ) या ब्रम्हदेशाच्या माझी गव्हर्नरांच्या पत्नीच्या नावावरुन हे नाव आहे. त्याना अर्थातच भारतीय वृक्षांबद्दल प्रेम होते. नावातले नोबिलिस म्हणजे देखणेपणा. पण पुर्ण राज्यातले वृक्ष मोजायचे तरी दोन हाताची बोटे जास्त होतील बहुदा. फ़ोटो घेतला तेंव्हा ललिता माझ्या बाजुला होत्या, त्यानी लबाडी केलीय. आणि मी त्यादिवशी कॅमेरा नेला नव्हता, नाहितर पकडलेच असते त्याना.
|
Dineshvs
| |
| Thursday, February 09, 2006 - 5:07 pm: |
|
|
http://www.arkive.org/species/GES/plants_and_algae/Amherstia_nobilis/ ईथे भेटा ऊर्वशीला
|
Dineshvs
| |
| Thursday, February 09, 2006 - 5:50 pm: |
|
|
Detroitkar ८६ चा रुट थोडा वेगळा आहे, ती ब्रीच कॅंडी आणि प्रभुकुंज म्हणजेच लताच्या घरावरुन जाते. नात्या, रंभा तुला कुठल्याहि दाक्षिणात्य सिनेमात दिसेल. श्यामली, सुनील शेंडे !!!
|
Good one dinesh...!! Detroitkar 86 chunabhatti la jaate, ani 90 anushakti nagar la...!! me 84 ne travel kelaay 4 warsha....worli(century bazar) te parle..!!
|
>>> Detroitkar 86 chunabhatti la jaate. माझ्या आठवणीत ८६ बान्द्रा ते WTC अशी होती. पण हे मी १० वर्षा पूर्वीचे सांगतो आहे. नक्की आठवत नाही.
|
Dineshvs
| |
| Friday, February 10, 2006 - 1:17 am: |
|
|
८६ माहिमला जाते आणि ८५ आता कुर्ल्याला, माझ्या घरावरुन जाते, माझीच बस ती
|
छानच...ठाणेकर असल्यामुळे बस रुट कमीच माहिती आहेत...पण ठिकाणे ही काहि ओळखीची ,काही पुर्ण अनोळखी. छान चालु आहे मुम्बई दर्शन..
|
Wah dinesh, shaletale ani kumar wayaatle diwas aathavle sagle parat tumchya hya bus madhun jata jata...mazi shala Portuguese church la hoti...ani sagale mitra dadar, shivaji park, hindu colony area madhe...!! tya mule aaj tar agadi sagalyaa junya aathvani jaagya zaaalya..!! tumhi sangitlele ek ek thikan, dukaan aani jaaga aathvat hoto me... thanks hee safar ghadavlya baddal..!!
|
Sahilshah
| |
| Sunday, February 12, 2006 - 12:00 am: |
|
|
दिनेश, खुप छान लिहले आहे. बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. मी D.S. Highschool मध्ये शिकलो. Gurukrupa Restaurant च्या समोर आहे. तिथले समोसे खुप फ़ेमस होते.
|
Pendhya
| |
| Sunday, February 12, 2006 - 3:06 am: |
|
|
>>>> तिथेच तो प्रसिद्ध राजाबाई टॉवर आहे. तिथे समोर विस्तीर्ण आवार आहे. अजुनहि तिथे गंभीर वातावरण असते. त्याच्या कोपर्यावर सायन्स ईंस्टिट्युटची देखणी ईमारत आहे, काहि गुंजांची झाडे आहेत, आणि अगदी मुद्दाम जाऊन बघावे असे ऊर्वशीचे झाड आहे. त्या झाडाला फ़ेब्रुवारीमधे बहर येतो.>>>> प्रणाम दिनेश, मी कित्येक वेळा ह्या भागात फ़िरलो असेन, मुख्यतः कामानिमित्त आणी बरेचवेळा मित्रांबरोबर, पण ह्या बारकाव्यांकडे कधीच लक्ष गेल नाही. अतिशय सुंदर आणी ऊपयुक्त माहिती देत आहात. ऊतारा चालु द्या!
|
Champak
| |
| Sunday, February 12, 2006 - 3:23 pm: |
|
|
ऊतारा चालु द्या!>>>>>>पेन्ढ्या, तेरे को चढ गयी लगती है
|
Pendhya
| |
| Monday, February 13, 2006 - 1:04 am: |
|
|
का रे बाबा? ह्याला सुद्धा ऊताराच म्हणतात, बरं का? तू ये रे गडावर, तुझा पाणऊताराच करतो! दिनेश, विषयाला धरुन पोस्टिंग नसल्याने, क्षमस्व!
|
Soha
| |
| Monday, February 13, 2006 - 11:39 am: |
|
|
म्मुबईचे फारच छान वर्णन आहे. मी म्मुबईत फारशी राहीले नसले तरी आई आणि आजीच्या कडून म्मुबईचे खूप वर्णन आइकले आहे. VT Station चे नाव बदलून कुणाचा काय फायदा झाला असा प्रश्न मला आणि आईला पण पडतो. हे नाव बदलल्यामुळे झालेला तोटा मात्र मला अलीकडेच लक्शात आला. Kolhapur station चे नाव ही Chatrapatee Shahumaharaja Terminus असे आहे.त्यामुळे Pune station वर Kolhapur वरून येणर्या गाडीची anouncement करतान CST Pune अशी करतात आणि लोकानचा चान्गलच गोन्धळ उडतो.
|
Moodi
| |
| Monday, February 13, 2006 - 11:47 am: |
|
|
चंपक अन पेंढ्या तुम्ही दोघेही अगदी चावट्ट मेले आहात.
|
Soha
| |
| Monday, February 13, 2006 - 11:54 am: |
|
|
BTW, बहूतेक सगळ्याना माहीती असेलच Best ची website पण आहे. http://www.bestundertaking.com/transport/index.htm Here you can search any bus route area wise or numberwise. You get detailed map of all routes and also the fare according to your starting point and destination.
|
Dineshvs
| |
| Monday, February 13, 2006 - 4:48 pm: |
|
|
सोहा, छान लिंक आहे, आणि दोस्तानो, हे आपले अंगण आहे, वाट्टेल तो धिंगाणा घाला.
|
Champak
| |
| Monday, February 13, 2006 - 5:24 pm: |
|
|
मुडी, मी कुणालाही चावलेलो नाही. पेंध्याबद्दल माहीती नाही
|
Pendhya
| |
| Tuesday, February 14, 2006 - 1:10 am: |
|
|
आणी मला तर अजुनही वाटतय की मी जीवंत आहे म्हणुन.
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 14, 2006 - 5:42 pm: |
|
|
पेंढ्या, चंपकहि जिवंत आहे रे अजुन. पण साधा कुत्ता आणि पागल कुत्ता यांच्या चावण्यात फ़रक असतो.
|
Pendhya
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:29 am: |
|
|
पण साधा कुत्ता आणि पागल कुत्ता यांच्या चावण्यात फ़रक असतो. >>> पण दोन्ही प्रसंगात, पोटात सुया टोचुन घ्याव्या लागतात, असे ऐकण्यात आहे. फ़रक कदाचित ईतकाच असेल की, साधा कुत्रा चावलेल्याला, नर्सबाई, स्मित हास्य करुन, प्रेमाने, सुया टोचत असाव्या, तर, पागल कुत्रा चावलेल्याला नर्सबाई, जराश्या घाबरत घाबरतच, पण टोमणे मारत, सुई टोचुन घेणार्याच्या दयनीय अवस्थेकडे बघुन एक अघोरी हास्य करत, सुया टोचत असाव्या.
|
Champak
| |
| Wednesday, February 15, 2006 - 8:40 am: |
|
|
मला साधा कुत्ता एकदा चावलेला हे. अन पेन्ध्या इथुन लै लाम्ब हे तवा दुसरी !
|
Manee
| |
| Thursday, February 16, 2006 - 3:06 pm: |
|
|
...या स्टॉपला हट्टाने पोद्दार कॉलेज स्टॉप म्हणत असु. >>>> दिनेश, द्या टाळी. आम्ही सुद्धा रुईया, कपोल निवास कुठेही उतरायचं असलं तरी ' पोद्दरचा स्टॉप' असच म्हणयचो. अगदी ठरवून. बाकी वर्णन छानच!
|
Dineshvs
| |
| Friday, February 17, 2006 - 2:22 pm: |
|
|
तसे नाही पेंढ्या, चावल्यावर कुत्र्यावर नजर ठेवायला सांगतात. जर तो वेड्यासारखा करायला लागला तरच ईंजेक्शन घ्यावी लागतात. कुत्रा शहाण्यासारखाच वागत राहिला तर घेतली नाहीत तरी चालतात. आता सांग कुणावर नजर ठेवु ? आणि मनी, पोद्दार ते पोद्दरच ना.
|
Shyamli
| |
| Sunday, February 26, 2006 - 5:00 pm: |
|
|
वा दीनेशदा.... लगेच खाऊ का ह्याला?
|
Tanya
| |
| Monday, February 27, 2006 - 1:39 pm: |
|
|
दिनेशदा, खरंच मानल तुम्हाला. कोणतेही वर्णन तुम्ही इतके सुंदर, मनापासुन लिहीता की अनेकदा आपल्याला ठाऊक असलेल्या गोष्टींचे अनेक पैलु तुमच्या लिखाणानंतर लक्षात येतात. तुम्ही वर्णन केलेल्या बर्याचशा भागात आमचे नातेवाईक रहातात, त्यामुळे ते, ते भाग अक्षरश डोळयासमोर उभे राहीले. तुम्हांला मुबंईत, पूर्वी फिरणार्या BEST च्या एडका(?) बस बद्दल काही माहिती देता येईल का?(लहानपणी मला त्या बसेस खुप आवडायच्या, विशेषतः त्यांच्या पुढिल भागात बसायला मजा यायची.)
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|