|
Bhagya
| |
| Thursday, January 05, 2006 - 6:12 am: |
|
|
दिनेशदा, तुझ्या नीटनेटक्या स्वभावानुसार तुझे लेख आणि पाककृती वर्गीकरण करून files मध्ये ठेवले असशीलच न? सध्या तेवढेच कर. बाकिचे मी आल्यावर बघू. बाकी मी वेळ आणून द्यायचा, म्हणजे रित्या विहीरीत पाणी शोधण्यासारखेच आहे......
|
Gs1
| |
| Thursday, January 05, 2006 - 10:08 am: |
|
|
वा वा आमच्या मुंबईबद्दल मस्त लिहिले आहेस...
|
Charu_ag
| |
| Thursday, January 05, 2006 - 2:43 pm: |
|
|
दिनेश, काय हो अस सुंदर वर्णन करताय एकेका गोष्टीच! मुम्बईत सलग चार तासही न कढलेल्या माणसाला अनोळखी वाटणारी हीच ती मुम्बई आता किती ओळखीची वाटु लागलीय. भाग्या, तुला अनुमोदन. दिनेश, आता पुस्तकाचा विचार कराच.
|
Bee
| |
| Thursday, January 05, 2006 - 4:04 pm: |
|
|
दिनेश, खरच तुमच्या लेखनीच्या प्रेमात पडायला काहीच वेळ लागत नाही. अगदी निरनिराळे प्रकार पहिल्यांदा लिहितानाच तुम्हाला सहज जमून जातात. आता हे वर्णन खरच इतर कुठल्या मराठी, हिंदी वा इतर कुठल्या भारतीय पुस्तकांमधे सापडेल का? नाहीच.. ती करामत तुम्ही इतक्या सहजतेने करून दाखवली. खरच शब्द नाहीत तुमची स्तुती करायला. धन्या ती माउली जिच्या पोटी तुम्ही आलात! माझेही मुंबईचे खूप सुखद अनुभव आहेत दिनेश. ह्याच शहरानी मला संघर्ष करण्याची ताकद दिली, जिद्द दिली, जीवनाचे खरे रंग दाखविलेत. मी राहायला चकाल्याला असायचो पण जेवन मात्र डोंबीवलीच्य पोळीभाजी केंद्रातून घ्यायचो. डोंबीवलीचे पोळीभाजी केंद्र मी कधीच विसरू शकणार नाही. सात ते दहा पर्यंत माझा क्लास असायचा आणि दहा वाजले की केन्द्र बंद व्हायचेत. मग माझी ओळखी एका मावशीशी झाली. ती माझे जेवन तिच्या उशाशी ठेवायची नि मी तिला न उठवताच ते घेऊन घरी यायचो. मुलुंड पासून १२८ की ३२८ ची बस थेट चकाल्याला जायची. मग घरी रात्रे अगदी एक दोन तर कधी तीन वाजायचेत पोचायला. तितक्याच रात्री ग्Cलरीच्या कट्ट्यावर ताट ठेवून जेवन कारण घरभर माणसे झोपलेली, दिवा लावायची सोय नाही की घास चावताना तोंडाचा आवाज करायची सोय नाही. एकदम कुचंबना.. पण स्ट्रगल सर्वांनाच करावा लागतो पुढे येण्यासाठी. कोहीनूर मधे मी सिनेमा पाहिला आहे. त्याच्याच समोर माहेर म्हणून एक लाॅज आहे तिथे तुम्ही एकदा तरी नक्की जा. अश्शा सुंदर पापूद्रे असलेल्या भाकरी मिळतात सोबत खरडा, ताक नि पिठले की तुम्ही तिथले जेवन विसरणार नाही. मी दर वेळी तिथे जातो आणि तिथून पुढे दादारच्य पुलाखाली जे झुणका भाकरी केन्द्र आहे तिथेही खाहीतरी खातो. कारण ते मला त्यावेळी स्वस्तात पडायचे. मग आता विसरून बेवफ़ाई होईल माझ्याकडून. असो.. तुमच्या समर्थ लेखन शैलीला माझा प्रणाम आणि उदंड लिहा.. तुमच्या बीबीवर आलो नी काहीही न लिहिता तसेच गेलो असे नको वाटायला म्हणून खरडले आपले
|
Dineshvs
| |
| Thursday, January 05, 2006 - 4:28 pm: |
|
|
खरय बी, मुंबई सगळ्याना लढायला शिकवते. अनेक कलाकारानी केलाय संघर्ष ईथे. डोंबिवलीला घेऊन जाणारच आहे मी सगळ्याना, पुढच्या भागात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|