Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 03, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through January 03, 2006 « Previous Next »

Gajanandesai
Saturday, December 31, 2005 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


दिनेश, छान लिहिताय लोकलबद्दल. येऊ द्या अजून.
बसप्रमाणे मुंबईतल्या रेल्वे तिकिट काऊंटर वर शक्यतो सुट्या पैशांसाठी(चिल्लर्) तुमचा छळ केला जात नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, फलाटांवर ज्या weighing machines असतात, त्यात जमलेल्या नाण्यांची स्टेशनवर अदलाबदल केली जाते. म्हणजे हे मशीन वाले ती नाणी रेल्वेला देतात व नोटा घेऊन जातात.

आता दादरला पुलांचा सुळसुळाट झालाय म्हणायला हरकत नाही. नव्या माणसालाच काय पण फार दिवसांनी आलेल्यांनाही गोंधळात टाकील असा.

आणि भरतीच्या वेळी मानखुर्द वाशीची खाडी दरवाजात उभे राहून किंवा खिडकीत बसूनही ओलांडणे हा एक आनंददायी अनुभव असतो. गाडी अगदी तिच्या कमाल वेगाने धावत असते. आणि हवेचा थंडगार झोत वेगाने तुम्हाला लपेटीत असतो. सभोवती उसळणारा दर्या.

मध्यरेल्वेविषयी अधिक प्रेम आहे अशातला भाग नाही. पण पश्चिम रेल्वेचे प्रवासी उर्मट असतात. चढतानाही दादागिरी आणि उतरतानाही दादागिरी. स्टेशन आल्यावर शक्य असल्यावरही दरवाजाचा अर्धाच भाग चढण्या उतरण्यासाठी मोकळा करतील. उरलेला अडवून धरतील. हे असे करणारे बहुतांश गुजराती असतात.
पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरील इंडिकेटरवर अगदी गाडी यायला अजून किती मिनिटे बाकी आहेत हे दाखवतील पण ती नऊ डब्यांची आहे की बारा डब्यांची आहे हे दाखवणार नाहीत आणि गाडी फलाटात पूर्ण शिरेपर्यंत ही घोषणाही करणार नाहीत. परिणाम काय वर्णावा! :-)
बाकी पीक-टाईमाला उग्र तेल चोपडून येणार्‍या भैयांचा खुलेआम उद्धार सगळीकडे सारखाच!
कुपनचा दुसरा एक फायदा म्हणजे ती रूट सापेक्ष नाहीत. अन्यथा तुम्ही वडाळामार्गे तिकिट घेऊन दादर मार्गे गेलात की काला कौआ हमखास टोचणार
:-))
आपल्याकडे तिकिट किंवा पास असूनही केवळ अभिनयाद्वारे TC ला आपले तिकिट चेक करण्यास भाग पाडायचे आणि त्याचा पोपट करायचा हा शाळा कॉलेजच्या up-down मध्ये आमचा एक करमणूकीचा भाग असायचा.

Moodi
Monday, January 02, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मी अजुन पुर्ण वाचलेले नाहीये पण आताच्या लेखातील शेवटचे वाक्य वाचुन धास्ती पडलीय, अजीबात थांबु नका. अजुन बराच पल्ला गाठायचाय, वाटल्यास थोडा आल्याचा चहा प्या, कर्जतचा बटाटे वडा अन इगतपुरीचे मुंग पकोडे खा पण थांबु नका.

गाडी बुला रही है सिटी बजा रही है
चलना ही जिंदगी है चलती ही जा रही है...


Sandeep_bodke
Monday, January 02, 2006 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wah...dinesh, shaletale diwas, college madhale diwas dolyasamor ubhe rahile...!!
Maza Janma ani college purna karun engg. la jaee paryant sagle Worli che... Dadar saglyat jawalche station...Shala Dadar la...College la parlya la jaaycho tevha pahilyanda railway shi sambandh aala...baaki sagli kade bus ...South bombay madhe baalpan ani kumarpan gelya mule, churchgate te vasai-viraar, ani boribandar te agadi new bombay che vashi, kopar-khairane, jui-nagar....dadar pachim che shrikant bataatawada, lamington rd pasun churni rd che sa ka patil udyan....sagla bhag aksharsha pinjun kaadhlela aahe...!!
ani ata gele 6 warsha akkhi US pinjun kadhleli ahe... 6 warshant 9 states madhe rahiloy ithe ani total 35 states firloy US madhe...akkha east coast- west cost, south, north... !!
Pan mumbai ani railway chya aathvani kadhi hi manatun jaanaar naheet... ekda Paakit ghari visarlelo ani nemka tyach diwashi ticket checkar ne pakadlela...tya diwasa vyatirikta mala kadhi hi ticket-checker ne thambavlela nahi...!!
Asa mhantaat, he ticket-checkers station madhun baher padnarya lokanchya chehryawarchya expersions warun olakhtaat, kon without ticket ahe te...karan, evdhya jan-sagara madhe pratekala thambun ticket vicharne tar shakya naste...!!
pan wah....agadi khup chan lihile ahe...keep it up !! :-)

Adityaranade
Tuesday, January 03, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dinesh,
mumbai var chee articles jordar.
"mumbai madhale gujarati" ekdam avadala..
chalu dya..looking fwd to it

Chandya
Tuesday, January 03, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, दादरचा श्रीकृष्ण' बटाटावडा ना? खूपच मस्त लिहिताय.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators