Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 08, 2008

Hitguj » Views and Comments » General » बिजींग ऑलिंपिक्स २००८ » Archive through June 08, 2008 « Previous Next »

Manjud
Saturday, April 05, 2008 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A reverse two and half somersault in the pike position

स्प्रिंगबोर्डवरून रीव्हर्स स्विंगमध्ये हा समरसॉल्ट मारणं खुप कठिण असतं. अजूनही ऑलिंपिक्सच्या जाहिरातीत ल्युगॅनिसची ही चुकलेली डाईव्ह दाखवतात.

जिम्नॅस्टिक्समध्ये ह्या एलिमेंटची डिफिकल्टी सगळ्यात जास्त आहे म्हणूनच ह्या एलिमेंटचे गुणही जास्त आहेत.


Mukund
Saturday, April 05, 2008 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजपर्यंत ऑलिंपिक्समधल्या न स्विकारलेल्या,जोडलेल्या,हरवलेल्या अश्या बर्‍याच अनोख्या पदकांबद्दल माझ्या गोष्टींमधुन मी तुम्हाला सांगीतले आहे. आज मी तुम्हाला सांगत असलेली गोष्टही अश्याच एका अनोख्या पदकाबद्दल आहे. मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हालाही तितकीच आवडेल जितकी मला आवडली आहे.

साल १९५६... स्थळ मेलबोर्न ऑलिंपिक्स... ऑलिंपिक्सच्या ओपनींग सेरीमनीमधला सगळ्यात उत्कंठावर्धक प्रसंग... स्टेडीअमधील ऑलिंपिक्सची मशाल कोण पेटवणार? सगळ्यांचे लक्ष मेन ऑलिंपिक्स स्टेडिअमच्या प्रवेशद्वाराकडे लागुन राहीले होते.. आणी एक १८ वर्षाचा कोवळा तरुण हातामधे ऑलिंपिक्सची छोटी मशाल घेउन प्रवेशकर्ता झाला... सगळे ऑस्ट्रेलिअन प्रेक्षक जल्लोश करत टाळ्या वाजवत उभे राहीले... तो तरुण होता.. ऑस्ट्रेलियाचा होतकरु धावपटु... रॉन क्लार्क!... ज्याने आजपर्यंत कुठल्याच जागतीक स्पर्धेत भाग घेउन आपली छाप पाडली नव्हती की कुठले पदकही मिळवले नव्हते... तरीही या १८ वर्षाच्या तरुणाला ऑस्ट्रेलियाने हा बहुमान आज दिला होता. कारण संपुर्ण ऑस्ट्रेलिया देशाला ठाउक होते की हा रॉन क्लार्क एक दिवशी ऑस्ट्रेलियाचे नाव.. आपल्या धावण्याच्या कौशल्याने उज्वल करणार आहे. त्या होतकरु मुलाच्या रुपाने प्रतिकात्मक रित्या ऑस्ट्रेलियाने... भुतकाळाचे कौतुक न करता भविष्याकडे.. नव्या पिढीकडे... देशाची शान सोपवली होती. पण हा तरुण मुलगा मशाल हातात घेउन स्टेडिअमधे जेव्हा आला तेव्हा त्याच्या मशालीतुन ताड ताड अस करत ठिणग्या पडत होत्या.... त्यातल्या काही ठिणग्या रॉन क्लार्कच्या हातावर पडुन त्याचे हात भाजत होते... पण प्रसंगाचे गांभिर्य लक्षात ठेउन व सगळे जग त्याच्याकडे बघत आहे हे माहीत असल्यामुळे रॉन क्लार्क ती तडतड्णारी मशाल घेउन धावतच राहीला व स्टेडिअमला संपुर्ण फेरी मारुन त्याने स्टेडीअमधील मशाल पेटवली... बिचार्‍या रॉन क्लार्कला त्या वेळेला याची काहीच कल्पना नव्हती की ऑलिंपिक्समधला तो त्याचा असे हात पोळुन घ्यायचा पहिलाच प्रसंग नसणार होता(फ़िगरेटिव्हली स्पीकींग!) आणी त्याला हेही माहीत नव्हते की ऑलिंपिक्समधे असा मान त्याच्या आयुष्यात त्याला परत कधीच मिळणार नव्हता... तर ही गोष्ट आहे मित्रांनो या रॉन क्लार्कची की जो (हेलि गेब्रसेलासी च्या आधी) आतापर्यंतचा ग्रेटेस्ट दिर्घ पल्ल्याचा धावपटु होता पण असे असुनही त्याच्या वाट्याला ऑलिंपिक्समधले सुवर्णपदक कधीच आले नाही...

१९५६ च्या मेलबोर्न ऑलिंपिक्समधे ऑस्ट्रेलियाने मुद्दामुनच रॉन क्लार्कला स्पर्धांपासुन लांब ठेवले... ते रॉनकडे दिर्घ पल्ल्याच्या शर्यतीतल्या अश्वासारखे पाहात होते. त्यांना इतक्या लवकर त्याला स्पर्धांमधे भाग घ्यायला लावुन बर्न आउट करायचे नव्हते. एवढेच नाही तर पुढच्या १९६० च्या रोम ऑलिंपिक्समधेही २२ वर्षाचा रॉन क्लार्कने... आपले शिक्षण पुर्ण करण्यात व्यत्यय नको म्हणुन... भाग न घेण्याचे ठरवले. पण एकदा त्याचे शिक्षण पुर्ण झाल्यावर मात्र रॉनने आपले सगळे लक्ष धावण्याकडे केंद्रीत केले व १९६१ ते १९६४ पर्यंत त्याने जगभरच्या जवळ जवळ सर्व दिर्घ पल्ल्याच्या शर्यती जिंकुन त्याच्या देशाने त्याच्याकडुन ठेवलेल्या अपेक्षा फोल नव्हत्या हे सर्व जगाला त्याने दाखवुन दिले. तो ३००० पासुन ते १०००० मिटर्सपर्यंतच्या सर्व शर्यती नुसता जिंकतच नव्हता तर विश्व विक्रम करुन जगातल्या बाकीच्या धावपटुंना नाउमेद करत होता. त्याचे इतके वर्चस्व होते की तो ज्या स्पर्धेत भाग घ्यायचा त्यात असे फ़ोरगॉन कन्क्ल्युजन असायचे की तो ती स्पर्धा जिंकणारच व लोक दुसरा कोण येणार याचीच चर्चा करायचे.

अश्या परीस्थीतीत हा रॉन क्लार्क जेव्हा १९६४ च्या टोकियो ऑलिंपिक्सला येउन पोहोचला तेव्हा सगळ्यांना ठाउक होते की या ऑलिंपिक्समधे ५००० व १०००० मिटर्स शर्यत रॉन क्लार्कच जिंकणार... पण टोकियो ऑलिंपिक्सच्या आधी हे जरी लोकांचे फ़ोरगॉन कन्क्ल्युजन असले तरी आयुष्यात शाश्वत असे काहीच नसते या जळजळीत सत्याची प्रचीती रॉन क्लार्कला लवकरच येणार होती. ज्या क्षणाची.... मेलबोर्न ऑलिंपिक्समधल्या हात पोळण्याच्या वेळेपासुन... तब्बल ८ वर्षे आतुरतेने तो आस लाउन बसला होता.... तो क्षण आज टोकियो ऑलिंपिक्सच्या १०००० मिटर्सच्या शर्यतीच्या रुपाने त्याच्यासमोर आला होता. रॉन क्लार्क हा या शर्यतीमधला नुसता जागतीक विक्रम त्याच्या नावावर असणाराच नव्हता तर १०००० मिटर्स २९ मिनिटांच्या आत पुर्ण करु शकणारा असा तो एकमेव धावपटु होता... त्याला लढत होती १९६० च्या रोम ऑलिंपिक्समधला ५००० मिटर्सचा विजेता न्युझीलंडचा मरे हेलबर्गची. शर्यत सुरु झाली... अपेक्षेप्रमाणे रॉन क्लार्कने सुरुवातीपासुनच आघाडी घेतली. पण अर्धी शर्यत... म्हणजे ५००० मिटर्सपर्यंत रॉन क्लार्कला लढत द्यायला फक्त ४ जणच उरले.... ट्युनीशियाचा महान धावपटु मोहमद घमाडी,अमेरिकेचा कोणालाच माहीत नसलेला विलीअम मिल्स,इथियोपियाचा मामो वाल्डे व लोकल क्राउड फ़ेव्हरेट जपानचा कोकीची सुबुराया.... या पाच जणांचा वेग बाकी स्पर्धकांपेक्षा इतका जास्त होता की या सगळ्यांनी बाकीच्या स्पर्धकांना जवळ जवळ एका फेरीने मागे टाकले होते. त्यामुळे झाले काय की या ५ जणांच्या पुढे बाकीच्या स्लो रनर्समुळे एकदम ट्राफ़ीक जॅम सारखी परीस्थीती निर्माण झाली.... तरीही ६००० मिटर्सपर्यंत रॉन क्लार्कच पुढे होता. तोच ही शर्यत जिंकणार याची सगळ्यांना खात्री होती.

आता शेवटचे ८०० मिटर्स राहीले... रॉन क्लार्क व अमेरिकेचा विलिअम मिल्स खांद्याला खांदा लावुन धावत होते. मोहमद घमाडीही फार मागे नव्हता. जपानचा सुबुराया व इथोयोपियाचे मामो वाल्डे हे दोघे मात्र आता बरेच मागे पडले होते.पण हे पहिले तिघे जण त्यांच्या पुढे असलेल्या हळु धावणार्‍या स्पर्धकांच्या मागे.. मुंबई पुण्याच्या ट्राफ़ीकमधे गाडी कशी पुढच्या वाहनांमुळे अडकुन पडते.. तसे ते अडकुन पडत होते. त्या तिघांना त्या त्यांच्या पुढच्या गर्दीतुन अक्षरश्: धक्काबुक्की करुन... मार्ग काढायला लागत होता... रॉन क्लार्कला पुढचा एक हळु धावणारा उजवीकडे होउन.. रस्ताही देत नव्हता. म्हणुन मग रॉन क्लार्कने त्याच्या उजव्या बगलेत असलेल्या अमेरिकेच्या विलिअम मिल्सला थोडे हाताने धक्के देउन जागा द्यायला सांगीतले पण तोही पट्ठ्या याला उजवीकडुन जागा देईना. शेवटी क्लार्कने मिल्सला उजव्या हाताने ढकलुन देउन एकदम बाहेरच्या लेनमधे पाठवुन दिले. पण या धक्काबुक्कीत.... तिसरा असलेल्या घमाडीने या दोघांच्या खांद्यांना पुश करुन मधुन पुढे जाउन जवळ जवळ १० मिटर्सची आघाडी घेतली. अमेरिकेचा मिल्स तिसर्‍या स्थानावर फेकला गेला. या सगळ्या वेगवान व नाट्यमय घडामोडीने ऑलिंपिक्स स्टेडिअमधल्या प्रेक्षकांच्या आवाजाचा क्रिशेंडो झाला होता... पण १०० मिटर्स असताना क्लार्कने घमाडीला परत एकदा गाठले व मागेही टाकले. पण घमाडीलाही विजय द्रुष्टीक्षेपात येत असल्यामुळे स्फुरण चढले होते... त्यानेही आपला जिव पणाला लावुन आपला वेग वाढवला व २० मिटर्स बाकी असताना.. नुसत्या जिद्दीवर.. जागतीक विक्रमधार्‍या रॉन क्लार्कला मागे टाकले.... पण ही उत्कंठावर्धक शर्यत अजुन संपली नव्हती.... अचानक त्या हळु धावणार्‍या लॅगर्‍ड्सच्या गर्दीतुन अमेरिकेचा विलिअम मिल्सही... मुसंडी मारुन जोरात पुढे धावत येत होता... १२ मिटर्स बाकी असताना त्याने चक्क क्लार्कला मागे टाकले व ७ मिटर्स बाकी असताना दमलेल्या घमाडीलाही मागे टाकले.... व शर्यतीची फ़िनिश लाइनची टेप तोडुन सगळ्या जगाला त्याने आश्चर्याचा धक्का दिला... एक अनभिज्ञ धावपटु... विलिअम मिल्स... अपराजीत समजल्या जाणार्‍या रॉन क्लार्कला हरवुन.... ऑलिंपिक विजेता झाला होता... तिकडे रॉन तिसरा येउन.. कंबरेवर हात ठेउन हताश होउन... शुन्यात नजर लाउन.... .. जमीनीकडे बघत... धापा टाकत होता... त्याला वाटलेही नव्हते की त्याला ताम्र पदकावरच समाधान मानावे लागणार म्हणुन...

आणी टोकियो ऑलिंपिक्सच्या ५००० मिटर्समधेही पराजयाने रॉन क्लार्कची पाठ सोडली नाही.. त्या शर्यतीत ४००० मिटर्स पर्यंत पहिला असुनही पायात गोळे आले म्हणुन त्याला शर्यत सोडावी लागली... अश्या रितीने रॉन क्लार्कचे पहिले ऑलिंपिक... अपेक्षाभंग होउन.. सुवर्णपदकाशिवाय संपले.

पण त्याने नाउमेद न होता... १९६५ ते १९६८ च्या दरम्यान रॉन क्लार्कने जगातल्या इतर सगळ्या स्पर्धा जिंकण्याचा आपला सपाटा चालुच ठेवला. जगातल्या सगळ्या लोकात एकमत होते की रॉन क्लार्क हा पावलो नुर्मी व एमील झाटोपेक यांच्यापेक्षाही वरच्या पातळीचा.. तेव्हापर्यंतचा सर्वोत्कृष्ट दिर्घ पल्ल्याचा धावपटु आहे म्हणुन.पण १९६४ मधे जेव्हा सगळ्यांना कळले की १९६८ चे ऑलिंपिक्स मेक्सिको सिटीला बहाल करण्यात आले आहे तेव्हा रॉन क्लार्कला समजुन चुकले की पुढच्याही ऑलिंपिक्समधे त्याला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मेक्सिको सीटीची समुद्रसपाटीपासुन उंची ७००० फ़ुट आहे व अश्या उंचीवर हवा विरळ असल्यामुळे जे धावपटु अश्या उंच प्रदेशातुन(उदा. केनिया,इथियोपिया वगैरे) आले असतील त्यांना फायदा होणार होता. कारण त्यांचे शरीर कमी प्राणवायुची सवय झालेली असते. रॉन क्लार्क तर ऑस्ट्रेलियासारख्या सपाट प्रदेशातला होता. त्याला त्यामुळे डिस्टीन्क्ट डिस-ऍडव्हॅंटेज होते. त्याचा विचार खरच खरा ठरला व मेक्सीको सिटी ऑलिंपिक्सच्या १०००० मिटर्सच्या शर्यतीत ९५०० मिटर्सपर्यंत पहिल्या पाचात राहुन कडवी लढत दिल्यावर.. रॉन क्लार्क मागे पडला.. त्याच्या पुढे निघुन गेलेले सगळे केनिया(नफ़्ताली टेमु... विजेता),इथियोपिया(मामो वोल्डे.... रजत पदक) ट्युनिशिया(मोहमद घमाडी.. ताम्र पदक) असे आफ़्रिकेतल्या उंच प्रदेशातल्या देशाचे धावपटु होते. समुद्रसपाटी वरचा रॉन क्लार्क हा एकटाच त्या मेक्सीको सीटीच्या विरळ प्राणवायुत...शर्यत पुर्ण करु शकला. पण त्याची फार मोठी किंमत क्लार्कला चुकवावी लागली.. शर्यत संपल्यावर रॉन क्लार्क बेशुद्ध पडला... १० मिनिटे तो शुद्धीवरच येईना.. रुंग्णवाहीकेतुन त्याला ताबडतोब इस्पितळात नेण्यात आले. तिथे उपचार झाल्यावर रॉन क्लार्क मेक्सीको सीटी ऑलिंपिक्समधुन ऑस्ट्रेलियाला परत एकदा रिकाम्या हाताने.. अतिशय निराश होउन परतला.... जगातला तोपर्यंतचा सर्वोत्कृष्ट धावपटु म्हणुन मानला जाणारा रॉन क्लार्क.. ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर मात्र कफ़ल्लकच राहीला होता...

१९६८ नंतर रॉन काही एक्झिबीशन स्पर्धांमधे वगैरे धावला पण त्याचे धावण्याचे दिवस खर्‍या अर्थाने मेक्सीको सीटीमधेच संपुष्टात आले होते. पण तो जिथे जिथे प्रदर्शनासाठी धावायला जाइ तिथे तिथे जगभरचे ऍथलेटिक्स व धावण्याचे ज्ञान असलेले दर्दी प्रेक्षक त्याच्या शर्यतीला गर्दी करत व शर्यतीनंतर त्याची स्वाक्षरी घ्यायला झुंबड करत.. असाच एका झेकोस्लोव्हाकियामधल्या प्रदर्शनीय स्पर्धेत धावुन झाल्यावर त्याला बरेच जण भेटायला आले. त्यात झेकोस्लोव्हाकियाचा एमिल झाटोपेकही त्याला भेट देण्यास आला होता. झाटोपेकने त्याचे मनापासुन कौतुक केले व क्लार्कच्या ऑलिंपिक्स अपयशाविषयी खंत व्यक्त केली. तो त्याला म्हणाला की तु ऑलिंपिक्समधे सुवर्णपदक जरी मिळवले नसले तरी तु आजपर्यंतचा जगातला सर्वश्रेष्ठ दिर्घ पल्ल्याचा धावपटु आहेस यात वादच नाही.. झाटोपेकच्या त्या वाक्याने रॉन क्लार्कला गहीवरुन आले.. प्रत्यक्ष... खुद्द झाटोपेक असे बोलत होता... हे खचीतच कुठल्याही पदकापेक्षा सन्माननिय होते. झाटोपेक तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रॉन क्लार्कला एक पुडके भेट म्हणुन दिले. रॉन क्लार्कने ते पुडके त्याला अजुन बर्‍याच जणांनी दिलेल्या भेटीबरोबर... त्याच्या हॅंडबॅगमधे ठेउन दिले.

प्रागपासुन मेलबोर्नच्या प्रवासात मग रॉन क्लार्क... आपल्या आयुष्याचा आढावा घेत.. विमानाच्या खिडकीतुन बाहेर ढगांमधे बघत... आपले गेल्या १०-१२ वर्षाचे.. धावण्याचे करीअर.. आपल्या मन्:पटलावर परत एकदा आणुन.. जगत होता... त्यात त्याला मिळालेले अमाप यश त्याला दिसत होते पण त्या यशाला असलेली.. ऑलिंपिक सुवर्णपदक न मिळण्याची... निराशेची झालरही त्याला दिसत होती... त्याला १२ तासापुर्वी भेटलेल्या एमिल झाटोपेकच्या शब्दांची आठवण झाली व त्याला खुप बरे वाटले. झाटोपेकने त्याला दिलेल्या पुडक्यात काय आहे हे बघायला म्हणुन त्याने त्याच्या हॅंडबॅगमधे हात घातला व ते पुडके बाहेर काढले. त्या पुडक्यात एक पत्र होते.. त्या पत्रात झाटोपेकने लिहिले होते....

प्रिय रॉन क्लार्क... मला माहीत आहे की तु जगातला आतापर्यंतचा सगळ्यात सर्वोत्कृष्ट धावपटु आहेस.. मला हेही माहीत आहे की तुला ऑलिंपिक्समधे अपयश आले म्हणुन किती दु:ख झाले आहे. पण मित्रा... या जगात जर कोणी ऑलिंपिक्स सुवर्णपदकाला लायक असेल.. तर तो तुच आहेस!.... म्हणुन.... १९५२ च्या हेलसींकी ऑलिंपिक्समधे मला मिळालेले.. १०००० मिटर्समधले सुवर्णपदक... तुला मी प्रेमाने बहाल करत आहे... तु त्याचा मानकरी म्हणुन खरच शोभतोस.... एका मित्राकडुन प्रेमाने मिळालेली... एक छोटीसी भेट म्हणुन याचा तु स्विकार करशील अशी मी आशा करतो.....

तुझा चाहता व ऍडमायरर..... एमिल झाटोपेक...


ते पत्र वाचुन रॉन क्लार्कने त्या पत्राबरोबर असलेली डबी उघडली... त्यात होते... लख लख करणारे.. झाटोपेकला हेलसिंकी ऑलिंपिक्समधे मिळालेले सुवर्णपदक..... झाटोपेकच्या त्या अतिशय उदार कृत्याचा विचार करुन व त्या सुवर्णपदकाकडे बघुन... इतका वेळ डोळ्यात आवरुन ठेवलेले अश्रु आता रॉनच्या गालावरुन घळा घळा ओघळु लागले होते...... ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर.. इतिहासकारांच्या द्रुष्टीने रॉन क्लार्क कफ़ल्लक म्हणुनच ओळखला जाइल... पण आज मात्र रॉनला आपण जगातला सगळ्यात श्रिमंत माणुस आहोत असेच वाटत होते......


Chyayla
Saturday, April 05, 2008 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, रॉन क्लार्क व झाटोपेकची गोष्ट खरच हृदयस्पर्षी आहे, मला खुप आवडली.. एखाद्याच्या आयुष्यात असही होत सगळी योग्यता असुनही ते नाममात्र पदक मात्र मिळालेल नसत व उगीच शल्य मात्र जन्मभरासाठी लागलेल असत. हे दुख्: ही जाणीव त्या झाटोपेक झाली व स्वता:च्या खिलाडु व दिलदारपणाने त्याने रॉन चे हे शल्य बर्याच प्रमाणात दूर केले असावे... महान झाटोपेकला सलाम.

Mukund
Sunday, April 06, 2008 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिकेत,भाग्यश्री,पूनम..... तुम्हा व्हीडीओ प्रेमींसाठी... मोहामद अलीची लिंक.....

http://www.youtube.com/watch?v=5TaITzi64Sw&feature=related

आणी हा रॉन क्लार्क, घमाडी व विलिअम उर्फ़ बिली मिल्स.... टोकियो ऑलिंपिक्समधे.... १०००० मिटर्स फ़ायनलमधे....

http://www.youtube.com/watch?v=OnFla7g84PU&NR=1

समिर... अगदी बरोबर बोललास!

दिनेश.. मंजुने बरोबर सांगीतले आहे..... जजेस... डायव्हरची आर्टीस्टीक ऍबीलीटी व त्या डाइव्हची डिग्री ऑफ़ डिफ़ीकल्टी... या दोन गोष्टीवरुन स्पर्धकांना गुण देतात. डायव्हींग सारख्या स्पर्धा ल्युगॅनीस व डिबीआसीसारख्या डायव्हर्समुळे ऑलिंपिक्समधे खुप प्रसिद्ध झाल्या. या वर्षी बैजींगमधे चायनाच यामधे वर्चस्व गाजवणार यात वादच नाही.


Akhi
Monday, April 07, 2008 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hats off to झाटोपेक

Runi
Wednesday, April 16, 2008 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला


बर्‍याच दिवसात काही पोस्ट नाही केल इथे मुकुंदनी, एकदम चुकल्या चुकल्या सारख वाटतय इथे वाचायला न मिळाल्यामुळे.

Ramani
Wednesday, April 16, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनीला अनुमोदक.
मुकुन्द, लिहा की पुढे!! आम्ही वाट बघत आहोत.


Mukund
Friday, April 18, 2008 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी,रमणी... एकंदरीत प्रतिसादावरुन वाटले की वाचक कंटाळले आहेत म्हणुन लिखाण थांबवले...

आणी दुसरे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या सोमवारी कॉलेज बास्केटबॉलच्या नॅशनल चॅंपिअनशिप गेममधे माझ्या युनिव्हरसीटी ऑफ़ कॅन्ससने युनिव्हरसीटी ऑफ़ मेंफीसला ओव्हरटाइममधे.. अतिशय अटितटीच्या लढतीत हरवुन विजेतेपद पटकावले... गेल्या आठवड्यात लॉरेन्सला दोन जबरदस्त सेलीब्रेशन्स झाली... आम्ही सामना संपायला १ मिनिट ५१ सेकंद बाकी असताना ९ ने मागे होतो... पण त्या ११० सेकंदात आम्ही ती पिछाडी भरुन काढली... आमच्या मारियो चामर्सने सामना संपायला केवळ २ सेकंद बाकी असताना ३ पॉइंटर टाकुन सामना ओव्हरटाइममधे नेला. ओव्हरटाइमच्या ५ मिनीटात आम्ही आघाडी मिळवली व शेवटी सामना ७ पॉइंट्सने जिंकलो...
Simply amazing game!We are the national champions......:-)

Shakun
Friday, April 18, 2008 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचक कंटाळले ??? मुकुन्द, कृपया असा गैरसमज करुन घेउ नका. आम्ही सगळे खूप आतूरतेने वाट पहातोय पुढच्या पोस्ट ची. इतर कारणांमुळे जमत नसेल तर हरकत नाही. आम्ही वाट पहाणं सोडणार नाही :-)

Akhi
Friday, April 18, 2008 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय्य्य्य्य्य्य तुम्हाला अस वाटत कि आम्ही कंटाळलो???? बाप रे देवा..... वाचव....... म्हणजे नवीन वाचायला मिळो लवकर.... हा १च तर BB आहे त्याच्या नवीन नवीन गोष्टी ची मी चातका सारखी वाट बघते.....
पण तुमच्या कामातुन सवड मिळाली की नक्की पोस्ट करा...


Jadoo
Friday, April 18, 2008 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द मी सुद्धा पहिला तो game. Kansas Vs Memphis. Infact आमच्या office मधे प्रत्येकाला team choose करायचि होति. मी काहि kansas मधे नाहिये पण midwest मधे असल्यामुळे Kansas ची team select केली होती n finally I got my fabulous prize :-) offcourse final च्या आधी च्या games चे prediction करण्यासाठी नवर्‍याने मदत केलि होति

Kedarjoshi
Friday, April 18, 2008 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकंदरीत प्रतिसादावरुन वाटले की वाचक कंटाळले आहेत म्हणुन लिखाण थांबवले >>>>
कायतरिकाय्मीतुमच्यापोस्टचीरोजवाटपाहातसतोलिहापटपट.

Psg
Saturday, April 19, 2008 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायतरिकाय्मीतुमच्यापोस्टचीरोजवाटपाहातसतोलिहापटपट.

तेच की. मुकुन्द, तू लिहीत रहा रे.. वाचतोय आम्ही..

btw त्या मॅरॅथॉनची क्लिप पाहिली.. चक्क ढकलतात रे ते एकमेकांना! मजा वाटली पाहून :-)


Adm
Saturday, April 19, 2008 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकूंद... आत्तापर्यंत मी प्रतिसाद दिला नाई कधी.. पण मी तुमचे सगळे लेख अनेकदा वाचलेले आहेत... खूप सुंदर मिहित आहात.. मला वाटत नाही कोणी कंटाळले असेल... लिहित रहा.. अजिबात थांबू नका.. :-)

Itgirl
Sunday, April 20, 2008 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..की वाचक कंटाळले आहेत म्हणुन ....

हो, हो, खूप कंटाळलोय वाट बघून आता!! पुढे कधी लिहितो आहेस बाबा?? लिही की पटापटा... किती भाव खाशील?? :-)


Lampan
Monday, April 21, 2008 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या खेळाडुंनीसुधा एवढा भाव खाल्ला नसेल

Ramani
Wednesday, April 23, 2008 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद!! लिवा की आता बीगीनं!! कीत्ती येळ लावतायसा!! हीकडं वाट पाहु पाहु डोळे येकदम वट्टं तारवाटलया बगा!!
चला, आता जास्त भाव नगा खाउ!! लिव काय ती समक्षा!!


Shravan
Saturday, May 03, 2008 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद आम्हाला हा ऑलंपिकचा सगळा अनुभव दिल्याबद्दल तुमचे अनेक अनेक आभार!
पुढच्या भागाची वाट पाहतोय.


Itgirl
Saturday, May 03, 2008 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटल की इथे मुकुंदाने पुढचा भाग पोस्ट केला, म्हणून पाहिलं तर, अजून एक पोस्ट पुढच्या भागाची वाट पाहणारी...

मुकुंद ssssssss कधी लिहिणार पुढे???


Mukund
Monday, June 09, 2008 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले दोन महीने जरा बिझी असल्यामुळे इथे काही लिहीता आले नाही त्याबद्दल हा बीबी आतुरतेने वाचणार्‍या सर्व वाचकांची क्षमा मागतो. पण आता परत इथे लिहिण्यासाठी या आठवड्यात सुरु करणार आहे.

लम्पन तुझा काही गैरसमज झाला आहे. भाव खाणार्‍यांच्या पंगतीत मला बसवल्याचा खेद वाटला...

ऍडमिन... तुमचे इ मेल मिळाले पण रंगीबेरंगीत मला दिलेल्या पानावर लिहायला अजुन पटापट जमत नाही.. पण तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ऑलिंपिक्स सुरु व्हायच्या आधी जरुर रंगीबेरंगीवर लिहायचा प्रयत्न करणार आहे.

जादु... तो कॅन्सास मेंफीसचा गेम जबरीच झाला.. तु लॉरेन्समधले सेलीब्रेशन बघायला हवे होते.. जबरदस्त...:-)

शकुन... तुम्ही वाट पाहत असलेल्या ऑलिंपिक्सबद्दलच्या गोष्टींना लवकरच परत सुरुवात करणार आहे.. दिपाली... पुढची गोष्ट खास तुझ्यासाठी...

शैलजा,रमणी... वाट पाहायला लागल्याबद्दल दिलगीर आहे.. पण दरम्यान चायनामधे झालेल्या भुकंपामुळे झालेल्या जिवीतहानीमुळे या वर्षीच्या बैजींग ऑलिंपिक्सला निराशेची झालर असणार हे नक्कीच... माझ्या लिखाणाची २ महिन्याची गॅप ही त्या चायनामधल्या भुकंपासाठी आदरांजली म्हणुनच समजुन घ्या...


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators