|
Tonaga
| |
| Monday, March 17, 2008 - 4:23 pm: |
| 
|
च्यायला झक्कीसाहेब तुम्ही अमेरिकेत राहता की बंगलोरमध्ये? बाय द वे, हे राहुल द्रविड कोण? त्यांच्या बाय्कोला तुम्हाला कशाला भेटायचे आहे? , canara bank. चे एक दायरेक्टर होते द्रविड म्हणून. पण राहुल की काय माहीत नाही...
|
Farend
| |
| Monday, March 17, 2008 - 8:02 pm: |
| 
|
श्रीलंकेने १७ मार्च ला जिंकला होता १९९६ साली. मागच्या वर्षी भारत बांगला देश कडून हरला होता १७ मार्च ला. जयमहाराष्ट्र, इंग्लंड मधे क्रिकेट साधारण मे च्या शेवटी चालू होते, त्यामुळे तेथील जवळ जवळ सर्व महत्त्वाचे सामने तुम्हाला जून ते सप्टेंबर मधे झालेले दिसतील.
|
Uday123
| |
| Monday, March 17, 2008 - 9:10 pm: |
| 
|
फ़रेंद बरोबर आहे तुमचे, २५ जुन १९८३ ला भारताने प्रुडेंशीयल विश्वचषक जिंकला होता, २५ वर्ष होण्यासाठी अजुन अवकाश आहे.
|
Zakki
| |
| Monday, March 17, 2008 - 11:11 pm: |
| 
|
राहुल द्रविड कोण माहित नाही. भारताचा कर्णधार कोण? तो व त्याची बायको माझ्या भावाच्या चांगले ओळखीचे आहेत असे म्हंटले मी. त्यांच्या बायकोला भेटायचे असे म्हंटले नाही! तुम्ही काय दारू पिऊन वाचता, की स्वत:च्या मनातले घुसडता आपले? असो. मी अमेरिकेतच रहातो. पण क्रिकेट पहायला नि भावाचा पाहुणचार घ्यायला भारतात जावे म्हणतो!
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 1:24 am: |
| 
|
माहित नाही. भारताचा कर्णधार कोण?>>>>> भारताचा कर्णधार तर तो कोण चुम्बळे की पुंगळे होता ना? अमेरिकेतून क्रिकेट पहायला भारतात? टू मच हं. मी तर भारतात असूनही क्रिकेट नावाचा फडतूस खेळ पहात नाही त्याबद्दल मला माहीतीही नाही फारशी.
|
Zakki
| |
| Tuesday, March 18, 2008 - 11:55 am: |
| 
|
टोणगा, कंच्या गावचं पावणं व तुमी? आँ? म्हणजे प्रश्नाचे सरळ उत्तर देणे दूरच. फालतूच काही तरी लिहायचे! शंका आहे, पण बोलून दाखवली तर भडकतात त्या गावचे लोक!!
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 1:32 pm: |
| 
|
झक्की साहेब, रागावू नका बुवा प्लीज.... मी पुन्याचा नव्हं का? भडाकणारे त्या ततं नागपूर बी बी वर असत्यात.. लईच नागपुरी बेनी अगावू, तुमाला म्हनून सांगटो... पन तुमी न्यू जर्शीवाली मंडयी लई चांगली... गोड...
|
Zakki
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:18 pm: |
| 
|
मी कधीच रागावत नाही. इथे येऊन रागवायचे काय? आता मी लई ग्वाड अश्या न्यू जर्सीवाल्यांना विचारतो. पण तिथेहि त्या विशिष्ठ गावचे लोक आहेत! बहुधा न्यू जर्सीत येऊन सज्जन झाले असतील, तर धड उत्तरे देतील! हटकेश्वर, हटकेश्वर!!
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:55 pm: |
| 
|
धन्यवाद पन तुमच्या सन्तु नावाने लिहिलेल्या पोस्ट लई झ्याक असत्यात बरं का झक्की साहेब... आता तुम्ही राजस्तानी आख्यान लावलय त्ये बी लय झकास....
|
Uday123
| |
| Tuesday, March 18, 2008 - 5:22 pm: |
| 
|
मी तर भारतात असूनही क्रिकेट नावाचा फडतूस खेळ पहात नाही त्याबद्दल मला माहीतीही नाही फारशी. ---अहो टोणगा (आदराने टोणगे म्हणायचे आहे, पण मग तुम्ही तुमचे नाव बदलले म्हणुन माझ्या नावाने खडे फ़ोडले असते, आपण ४११ ला घाबरतो), तुम्हाला क्रिकेट बद्दल फ़ारशी माहिती नाही असे तुमचेच म्हणणे आहे, तर मग फ़डतुस कसे ठरवता आपण? आपले आदरणीय कृषीमंत्री साहेब ह्या खेळासाठी वेळातवेळ काढुन कारभार चालवतात, एक वेळ शेतकरी दुर्लक्षीला तरी चालेल पण लंडन, दुबई मधील बैठक महत्वाची आहे. एकीकडे हा पराकोटीचा त्याग आणि दुसरीकडे तुमच्या सारखे, या खेळा बद्दल काहीही माहिती नसतांना, त्याला सरळ फ़डतुस संबोधता? खुप वाईट वाटले.
|
अहो टोणगा, तुम्ही पेडगाव चे का????
|
Zakki
| |
| Tuesday, March 18, 2008 - 8:05 pm: |
| 
|
आयला तुम्ही सगळे पुण्याचे की काय? मी विचारतो आहे की ऑक्टोबर नंतर भारतात कुठला संघ येणार आहे का? २० - २०, एक दिवसीय, कसोटी असे कुठले सामने बंगलोरला होणार आहेत का? तर त्या प्रश्नांचे उत्तर राहिले बाजूला. उगीच भलतीच चर्चा. हा काही समानता बतमी फलक नाहीये की वाटेल तसे विषयांतर करायला! आता मी धन्यवाद मागे घेतो. उत्तर मिळाल्यावर बघू.
|
Uday123
| |
| Tuesday, March 18, 2008 - 9:54 pm: |
| 
|
ऑस्ट्रेलिया ४ समने, ऑक्टोबर्-२००८ मधे इंग्लन्ड ३ समने, ७ एकदिवसीय, नोवेंबर्-डिसेंबर मधे सामने कुठे असवेत हे अजुन ठरलेलं दिसत नाही, २०-२० बद्दल माहीत नाही.
|
Arch
| |
| Tuesday, March 18, 2008 - 10:10 pm: |
| 
|
झक्की, ही घ्या माहिती. google search केला की मिळते. ह्या site वर सगळी माहिती आहे. http://www.itsonlycricket.com/entry/479
|
Zakki
| |
| Wednesday, March 19, 2008 - 1:26 am: |
| 
|
धन्यवाद, धन्यवाद. आता कसे बोललात!
|
सेहवागचे दुसरे त्रिशतक.. तेही केवळ २७८ चेंडुंमध्ये
|
Mahaguru
| |
| Friday, March 28, 2008 - 1:54 pm: |
| 
|
वीरु ला अचानक काय झाले? प्रशिक्षकाने सामन्यापुर्वी काही खडे बोल सुनावले असे ऐकले होते, त्यामुळे ह्या नवाबाचे डोके सरकले असेल अथवा बराच दिवस टिका सहन केल्यानंतर, साहेबांचा संयम सुटला आणि विक्रमवीर तेंडुलकरला न जमलेली त्रिशतकी सलामी दुसर्यांदा देवुन लोकांची तोंडे बंद केली. अथवा मलाईदार जेवणाची सवय असलेल्या ह्या सुलतानाचे मस्तक चेन्नईच्या डोसा-उत्तपा-कर्ड राईस ने फिरले असेल.
|
त्याचं काSSSSSS ही खरं नाही आता.उद्या चारशे मारून बसेल हवा टाईट पण खरोखर अभिमानास्पद अहे. वीरूचे मन्:पूर्वक अभिनन्दन
|
Asami
| |
| Friday, March 28, 2008 - 3:47 pm: |
| 
|
वीरु ला अचानक काय झाले? >>सांगितले न अत्याने कि संघातून वगळले ते खटकलेले त्याला , त्याचे उट्टे काढतोय
|
अरे , चक्क अजुन इथे IPL वर चर्चा नाही का सुरु झाली ? कुठल्या teams चे काय strong points आहेत लिहा कि तज्ञांनी मला मोहाली ची Kings XI Punjab चांगली वाटतीय team कागदा वर तरी . शाह रुख ची टीम सगळ्या गरम रक्ताच्या लोकांनी भरलीये ! रिकी पोंटिंग , शोएब , सौरभ आणि त्या promotion songs मधेही जोरदार स्पर्धा दिसते . अत्ता पर्यंत SRK, Hrithik, Preitty ची गाणी पाहिली त्यात SRK चा video ग्लॅमरस आहे पण मला Punjab team चं दलेर चं गाणं आणि picturisation जास्त आवडलं . ह्रितिक चं मुंबई टीम चं गाणं जरा आपेक्षाभंग करणारं आहे .
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|