|
दिल्लीतल्या 'आदि'वाशांच्या मनात पण तिथल्या बिहारी जनतेविरुद्ध आकस आहे. इतरांबाबत इतकी टोकाची भूमिका नसते, पण तुम्ही बनारस आणि दरभंगाच्या मधले असाल, तर तुमच्या पाठीमागे तुमचं हसं होणं, तोंडावर सौम्य टोमणे होतातच. दिल्लीचे गवर्नर आणि शीला दीक्षित पण अनवधानाने आपलं मतप्रदर्शन करून गोत्यात आलेत. मराठी असो, गुजराती असो, किंवा दक्षिण भारतीय- हा प्रत्येक माणूस 'अहिंदी' असल्याने तिकडे पण थोडी 'वेगळेपणाची' वागणूक मिळते. ( It's not necessarily humiliation or personal impingement, पण 'तुम्ही वेगळे आहात' हे कुठेतरी जाणवून दिल्या जातंच.)
|
Uday123
| |
| Wednesday, April 02, 2008 - 2:32 pm: |
| 
|
उदय तुम्ही उगीच विरोधासाठी विरोध करत आहात असे वाटते. राज ठाकरेंच्या कार्य पध्दत चुकीची असु शकते पण मुद्दा नक्किच चुक नाही. --- मी विरोधा साठी विरोध करीत नाही आहे, तुम्ही सर्व पोस्ट वाचल्यात? पण माझी ठाम समजुत आहे की स्वत:चे "राजकीय पुनर्वसन" करण्यासाठीचा हा केविलवाणा खटाटोप आहे, याआधी अनेक वेगवेगळ्या कारणाने हे (किती नाव सांगायची) नेते जनतेच्या अस्मितेशी खेळलेले अहेत, मुद्दे/ जनता आहे तिथेच आहे... एक वेळा ते पुनर्वसन झाले की मग विसरा मराठी... अर्थात काळच ठरवेल कोण बरोबर की चुक. राज साहेबांची ची आणि मंत्र्यांची मुले 'मराठी शाळेत' शिकतात का? वर कुणितरी एक लिन्क टाकली होती, पण दुर्लक्षीत झाली. खुप फ़रक पडतो त्यांच्या मराठी शाळेत जाण्या आणि न जाण्याने... मरायला टेकलेल्या शाळांना सन्जीवनी मिळेल, आणि मला हेच हवे आहे. जर आपला पायाच कच्चा आहे तर इमारत कशी काय उभी रहाणार? शाळेतील रोडावणारी संख्या कमी करण्यासाठी काय उपाय योजना केली आहे या साहेबांनी? किंवा स्वत:चे वजन वापरुन किती नवीन शाळा सुरु केल्यात, सरकारला मजबुर केले ते करण्यासाठी? खासदार जया बच्चन यांनी त्यांना आव्हान (!) दिले होते, आम्हाला मुंबईत जागा द्या, आम्ही शाळा/ महाविद्यालय काढतो. काय झाले? मारुन मुटकुन कुणाही भारतीय नागरीकाला हाकलावे आणि कटुता निर्माण व्हावी ही गोष्टच पचनी पडत नाही आहे, आधीच दुफ़ळी साठी मुद्दे काय कमी आहेत?
|
मराठीचा अभिमान असणार्यांनी आपली मुले मराठी शाळेतच घातली पाहिजेत हा आग्रह मूर्खपणाअचा आहे. मराठी शाळांचा दर्जा खाली जातो आहे ही वस्तुस्थिती आहे. ही परिस्थीती कधी सुधारली तर माहीत नाही. पण तोपर्यंत मुलांच्या करियरचे नुकसान करायची काही गरज नाही. वेगळ्या मार्गाने मराठीचे प्रेम, अभिमान जागा ठेवता येतो. मराठी गाणि, नाच, सणवार, उत्सव, सिनेमे, नाटके, इच्छा असल्यास साहित्यवाचन ह्या गोष्ती मराठी शाळेत न जाता करता येतात. यातील सगळ्याच्या सगळ्Yआ गोष्टी केल्या तरच मराठी अभिमानी असेही नाही. तेव्हा उगाच मूर्खपणाचे आग्रह नकोत. उद्या कुणी म्हणेल की मराठीचे प्रेम करण्याकरता डॉक्टर वा इंजिनियर न बनता केवळ मराठीत एम ए करा. नाहीतर मराठीप्रेमाचे नावही घेऊ नका. हा आग्रह जितका मूढ आहे तितका मराठीत शाळेत घालण्याचा. महाराष्ट्रात इंग्रजी शाळेत मराठी हा विषय असतो, अपवाद सोडा.
|
केवळ कायदा परवानगी देतो म्हणून उद्या बिहारचे ६० टक्के नागरिक मुंबईत स्थलांतरीत झाले तर काय होईल अर्थातच अनर्थ होईल. पाणि, वीज, सांडपाणी, शाळा, क्रीडांगणे, दुकाने, वाहतूक, रस्ते सगळ्यांची पार वाट लागेल. एखादा भूभाग किती लोकांन्च्या गरजा पुरवू शकतो ह्याला मर्यादा आहेत. मुंबईसारख्या समुद्राने बंदिस्त केलेल्या बेटाच्या मर्यादा अधिकच तीव्र आहेत. तेव्हा केवळ प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य आहे म्हणून हे स्थलांतर चालवून घेतलेच पाहिजे हा आग्रह अतिरेकी आहे. हे लोंढे आवरले नाहीत तर आज राज आहे तर उद्या अजून कुणी ह्या धगधगत्या, खदखदणार्या असंतोषावर आपली पोळी भाजून घेतील. राज हे एक निमित्त आहे. पण निव्वळ राजचा निकाल लावून हा प्रश्न सुटणार नाही. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही.
|
Uday123
| |
| Thursday, April 03, 2008 - 12:03 am: |
| 
|
मराठी शाळेत गेल्याने करिअर करता येतच नाही ही तुमची चुकीची समजुत झालेली दिसते. 'मराठी शाळेतच पाठवावे' हा मी कुठेही आग्रह धरलेला नाही आहे; अपेक्षा आणि आग्रह यात फ़रक आहे. एक मोठा वर्ग आहे ज्यांना अजुनही मराठीबद्दल आपुलकी, विश्वास आणि मुख्य म्हणजे काळाची जरुरी (आर्थिक परिस्थिती!) आहे त्यांच्या मुलांसाठी एक पर्याय तर ठेवा. नेत्यांना जर स्वत: च्या मुलांना मराठी शाळेत पाठवणे जमत नसेल तर निदान मराठी असलेल्या शाळा सुरु कशा रहातील या साठी तर प्रयत्न करा. नविन काढल्या, रुजवल्या, वाढवल्या तर दुधात साखर, पण आहे तेव्हढे जरी संभाळले तरी खुप आहे. ही माझी या नेत्यांकडुन अपेक्षा आहे, ते पण नसेल जमत तर हे कसले नेते? जर (मराठीचा) ‘स्त्रोत’च रोडावत गेला तर मग तुमचे साहित्य, चित्रपट, गाणि कोण लिहिणार? काही नविन लिहायला तर मराठी येणारे लोकं पाहिजेत, की असलेल्या शिदोरीवर पुढचे उरलेले दिवस काढायचे? हे सर्व इंग्रजी शाळेत जाऊनही करता येईल हे म्हणणे धाडसाचे ठरेल. फ़ार फ़ार तर वाचक घडतील... पुढील काळात मराठी साहित्य ई. ची मागणी कमी म्हणुन मग पुरवठा कमी असे दृष्टचक्र चालत राहील. मुंबई वरचा लोकांचा बोजा वाढतो आहे हे खरं आहे, आणि माझ्या कडे याच्यावर काहीच उत्तर नाही आहे. पण फ़क्त उप्-बिहारच्याच लोकांना मारायचे आणि जा म्हणायचे हे पटत नाही. मुंबईत काही (पाच?) लाख बांगलादेशीय चालतात, त्यांच्या बद्दल कुणिच काही बोलत नाही, पण आपल्याच देशाचे नागरिक नको हे कोणते तत्व?
|
भाषेची आवड वाचनातून लिहिण्यातून येते.त्यातील सूक्ष्म बारकावे,सौन्दर्य स्थाने व नन्तर त्या भाषेची वृद्धी करण्यास त्या भाषेत कमीत कमी पहिली ७-८ वर्षे शाळेत अभ्यास व्हावा लागतो.मी मराठीत शिकलो आहे.माझी पत्नी कानडी माध्यमत शिकली आहे.दोघानाही मराठी साहित्य,सगीत,नाट्य परंपरेचा परिचय व अभिमान आहे.परन्तु हे कौतुक व सौन्दर्य स्थानांची ओळख माझ्या मुलांमध्ये आम्ही आणू शकलो नाही कारण त्यांचे शिक्षण इन्ग्रजी माध्यमातून दुसर्र्या प्रान्तात असल्याने झाले. माझे आणखी एक निरिक्षण असे की वेगळ्या परन्तु (कानडी)भारतियच भाषेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाल्याने मराठी तील सौन्दर्य स्थाने appreciate करणे,समजणे, पत्नीस अधिक सोपे जाते.मुलांना ते जमत नाही. बोलचालीचे रोजच्या व्यवहारातील मराठी त्यांना येते. म्हणून प्राथमिक शिक्षण मराठीतच होण्याचा हा आग्रह. अन्यथा ती रुची रोजच्या अभ्यासाच्या धबडग्याबरोबर येणे कठीण नाही अशक्य आहे. मी भाषेत उत्क्रान्ती व वृद्धी होण्याच्या दृष्टीने लिहिले आहेरोज च्या व्यवहारातील मराठी नाही.
|
रवीजी! तुमचा मुद्दा अगदी मान्य. बहुतांश मराठी माणसांचा हाच सल आहे. अपरिहार्य कारणांस्तव आपल्या मुलांना मराठी शाळे मधे घालणे शक्य नसल्याकारणाने, मुलांना मराठी उत्तम बोलता आले तरी त्यांचा मराठी साहित्य वाचनाकडे फ़ारसा कल असत नाही. पण म्हणुन आपण प्रयत्न करायचे सोडु नये असे निदान मला तरी वाटते. लहान वयातच गोडी लावण्याचा प्रयत्न केला तर काहिच अशक्य नाही. फक्त या साठी दुर्दम्य इच्छाशक्ती व त्यालाच अथक प्रयत्नांची जोड असणे हे मात्र आत्यंतिक गरजेचे आहे.................!. "प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे"..................... मराठी साहित्य इतक अफाट आणि अचाट आहे की जर ते नवीन पिढीने वाचले नाही तर त्यांच्यासारखे कपाळकरंटे तेच! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
शेंडेजी तुमचे म्हणणे मलातरी पटतय! माझ्या लेकाच्या बाबतीतला माझा एक अनुभव. मागिल वर्षी भारतात गेल्यावर मराठी बाणा बघायचा योग आला.(कधी पासुन बघायचा होता पण तिकिट मिळणे अवघड झाले होते).मी तर मराठी बाणा या कार्यक्रमाच्या प्रेमातच पडले. माझ्या यजमानांना देखिल हा कार्यक्रम बघायचा होतो.ज्या दिवशी प्रयोग होता त्याच्या दुसर्यादिवशी पहाटे परतीच्या प्रवासास निघायचे होते.पुन्हा बघायची संधी मिळेल अथवा न मिळेल म्हणुन मी अट्टाहासाने ह्यांना आणि माझ्या मोठ्या लेकाला मराठी बाणा बघायला पाठवले.लेक थोडा नाराज होवुनच गेला. जाताना काय कटकट आहे? असे देखील म्हणाला.पण रात्री जेंव्हा परत आले साहेब तेच मुळी उत्साहात.स्वारी एकदम रंगात काही माहित असलेली गाणी गुणगुणतच घरात शिरली................ मला म्हणाला आई काय अफलातुन कार्यक्रम होता ग?एकदम झक्कास. मला म्हणतो ते फिल्मफ़ेयर आयफा त्यांच्यापेक्षा दणदणीत होता कार्यक्रम.स्वारी म्हणते thank you मला इतका छान प्रोग्राम दाखवल्याबद्दल. मोठ्या लेकाला कणेकर ऐकुन पाठ आहेत.मी रोज रात्री मराठी गाणी किंवा कथाकथन ऐकतेच त्यामुळे मुलांना देखिल गोडी लागली आहे. मोठ्याला मराठी वाचता येत. आता धाकट्यावर लक्ष केंद्रीत केल आहे. तात्पर्य काय तर "केल्याने होत आहे रे!आधी केलेची पाहिजे!" फ़क्त सुरुवात कुठुन करायची हाच प्रश्न असतो. आणि सुरुवात नेहमी आपल्या हक्काच्या घरापासुनच करावी. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Arun
| |
| Thursday, April 03, 2008 - 9:05 am: |
| 
|
प्रज्ञा : तुम्ही म्हणताय ते १००% पटलं. या सगळ्याची सुरुवात आपण घरापासूनच केली पाहिजे. सुदैवाने, Thanks to Z Marathi , सा रे ग म प किंवा नक्षत्रांचे देणे या सारख्या कार्यक्रमांमुळे आपल्याला आणि आपल्या मुलांना मराठी गाणी, साहित्य याबद्दल थोडीफार ओळख होते आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर माझ्या छोट्या मुलीचं (वय वर्षे ५) देता येइल. सा रे ग म प हा कार्यक्रम बघून तिला बरीच मराठी गाणी यायला लागली आहेत. अर्थात या मुळे तिला व्यवस्थित मराठी भाषा यायला लागली असं मी म्हणणार नाही, पण भाषेची आवड निर्माण होण्याची सुरुवात म्हणून मी या गोष्टीकडे बघतो आहे.
|
Ladtushar
| |
| Thursday, April 03, 2008 - 9:09 am: |
| 
|
आमच्या छोटया शहारात त्या वेळी फ़क्त एकच शाळा होती ती पण मराठी माध्यमाची, तिचा दर्जा ही बर्यापैकी चांगला होता. शिक्षक जिव ओतुन शिकवायाचे. त्यामुळे जी पीढ़ी घडली ती मराठी होती अगदी सगळेच विद्यार्थी मराठी बोलत जात धर्म अन राज्य अश्या सीमा नव्हत्या. माझे गुजराथी, जैन ,मारवाडी, मुस्लिम, कानाडी, पंजाबी मित्र मराठीच बोलत. साहित्य, कला, नाटके यांची रूचि ही मूळ मराठी यांनाच न लागता सर्वाना होती जे जे तिथे राहत होते ते सर्वच मराठी भाषिक होते. अजुनही आहेत. आणि शाळेच्या दर्जा बद्दल सांगायचे तर दर वर्षी एक तर विदार्थी बोर्डात येत असे अन माझे याच शाळेतील कित्तेक वर्गमित्र आज परदेशात असून ते कुठल्याही इतर इंग्रजी मध्यमाच्या शाळेच्या विदार्थी पेक्षा कुठेही कमी नाहीत. पण आता थोड़े चित्र बदलत चालले आहे जेव्हा पासून इंग्रजी मध्यमाच्या शाळा सुरु झ्याल्या. तसे मराठी अन इंग्रजी माध्यामातिल मुलांच्या इंग्रजी मधे काही सुधारणा न होता मराठी ची ओढ़ अन मराठी आवड खूपच कमी झाली.... आमचे एक स्नेही जे गुजराथी असून पण मराठी नाटकाची त्याना इतकी आवड आहे की त्यानी एक मराठी नाट्य संस्था काढली आहे जी शालेय अन महाविद्यालयातिल विद्यार्थ्याना घेउन नाटक अन एकअंकिका स्पर्धा भरवते व वेगवेगळ्या गावातिल व शहरातील एकअंकिका स्पर्धान मधे भाग घ्यायला शहरातील मुलाना प्रवृत अन प्रोस्थाहित करते. झी मराठी अन अनेक शहरी स्पर्धान मधे यांचा उस्फूर्त सहभाग असतो. अश्या अनेक लहान मुलाना ते आज नाट्य कलेचे धडे देत आहेत, त्यांचा ह्या कार्याला माझा सलाम. मला सांगा असे अस्सल मराठी इंग्रजी माध्यमातुन घड़तिल का ? अजुन एक आवर्जुन सांगायाचे ते असे की ही संस्था सुट्टी मधे आमच्या गावात पुस्तक बाग हा कार्यक्रम राबवते, जिथे लहान मुलाना मराठी साहित्य ची ओढ़ लावायचा प्रयत्न केला जातो. आता आपण कुणा पालकाला त्याच्या पाल्या च्या शैक्षणीक माध्यमा बद्दल आग्रह नाही करू शकत, म्हणुन पुस्तक बाग़ कार्यक्रम हा शाळेच्या मदतिनेच राबविला जातो, ज्याला आवड लागेल तो वाचेल हा हेतु! आणि मराठी साहित्य हे इतके प्रभावशाली आहे की एकदा याची ओढ़ लागली की पुढे तो त्याचा एक छंद बनुन जातो...परंतु नव्या इंग्रजी शाळेतील विदार्थी हे मराठी वाचनात अगदीच सुमार असतात असे जाणवते.
|
Zakki
| |
| Thursday, April 03, 2008 - 12:34 pm: |
| 
|
ही माझी या नेत्यांकडुन अपेक्षा आहे, ते पण नसेल जमत तर हे कसले नेते? हा, हा, हा! हे तर पाच वर्षाच्या शेंबड्या पोराला पण माहित आहे. 'हे कसले नेते'! काही विधायक करणारे लोक नेते कशाला होतील, ते त्यांचे विधायक कार्य करण्यात व्यस्त असतात, आपापल्या परीने, जश्या जयमहाराष्ट्र, जसे मराठी चे वर्ग चालवणारे, जसे मायबोलीचे संचालक. दुर्दैवाने मायबोलीवर येणार्या सगळ्यांना हे समजत नाही की इथे तरी मराठी लिहावे. नि नसेल येत, तर तुमचे 'मराठी बद्दलचे प्रगल्भ, उच्च विचार, जे तुम्हाला मराठीत मांडता येत नाहीत,' ते हिंदी, इंग्रजीत लिहायचे असतील तर इतर कित्येक ठिकाणे आहेत, जिथे जाऊन लिहीता येईल. नि कधी मराठी शिकायची उपरति झाली तर मग या इथे.
|
मराठी चित्रपट लेखन, साहित्य निर्मिती, नाट्यलेखन वगैरे करायला शालेय शिक्षण मराठी माध्यमात झाले असले पाहिजे हा दावा कशाच्या आधारावर करत आहेत काही लोक? मुख्य प्रश्न आवडीचा आहे. पूर्वीच्या काळातील नेते जसे टिळक, आगरकर, सावरकर, गोखले इ. ह्यांनी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत उत्तम लेखन केले आहे. हे लोक कुठल्या माध्यमात शिकले होते जर मराठी माध्यमात शिकले असले तर त्यांना इंग्रजीत लिहायला अडचण आली नाही. जर इंग्रजी माध्यम होते तर मराठी लिहायला अडचण आली नाही. (इंग्रजांच्या राज्यात अभ्यासक्रम नक्की कसा होता ते मला माहीत नाही.) सांगायचा मुद्दा हा की प्रतिभा आणि इच्छा असेल तर इंग्रजी माध्यमात शिकलेला (ली) मराठीत लिहू शकतो (ते). अगदी योग्य त्या बारकाव्यांसहित. मराठी भाषा ही मराठी वर्गातच शिकली जाते असे नाही अन्यथा बहिणाबाई चौधरींसारखी अडाणी बाई इतके प्रभावी काव्य कशी करू शकली असती?
|
Zakki
| |
| Thursday, April 03, 2008 - 11:51 pm: |
| 
|
मुळात किती टक्के महाराष्ट्रीय लोक मराठीत बोलतात? मी मागेच लिहीले होते की व्यवहारात मराठीचा आग्रह धरणे कठिण आहे. पण बहुसंख्य मराठी लोक आजूबाजूला असताना देखील, मुद्दाम इंग्रजीत बोलणारे लोक आहेत. माझ्या नात्यात, मराठीतून शिकलेले, पुण्या मुंबईतच आयुष्य घालवलेले लोक अजूनहि आपले सरळ इंग्रजीतच बोलतात. मी अगदी कसोशीने मराठीत बोललो तरी यांचे इंग्रजी चालूच! मराठी मुले आपआपसात हिंदी, इंग्रजी (भयाऽण इंग्रजी) बोलत असतात. मराठी चित्रपटात सुद्धा श्रीमंत लोकांच्या घरातले लोक घारात एकमेकांशी सुद्धा इंग्रजीत बोलतात. मग त्यांचे अनुकरण करणारे लोक पण तेच करणार. जणू काही इंग्रजी बोललो म्हणजेच आपण खूप शिकलेले, श्रीमंत झालो असे वाटते त्यांना. तर एव्हढी जर मराठीबद्दल अनास्था असेल तर जरी काही लोक मराठीत बोलले, त्यांनी मराठीतून लिहीले तरी ते केवळ छंद म्हणून होईल, व्यापारी दृष्टीने त्याला महत्व नाही, म्हणून मराठीचा अजूनच र्हास. संस्कृत, अर्धमागधीचे तसेच झाले, मोडी लिपीचे तसेच झाले. वास्तविक, नाना फडणिस Shorthand dictation घेतात, तसे मोडीतून भराभर लिहून घ्यायचे. पण त्याची पुढे गरजच पडेनाशी झाली. तसेच मराठीचे होणार.
|
Dineshvs
| |
| Friday, April 04, 2008 - 2:56 am: |
| 
|
उत्तम मराठी भाषा कानावर पडणे आता दुर्मिळ झालेय, पुर्वी रेडिओ हे छान माध्यम होते त्यासाठी. आताचे एफ़ एम आणि टिव्ही, दोन्हीकडची मराठी भाषा भीषण असते. शांत, संयत बोलणे या निवेदकाना जमतच नाही. सगळा स्वरच उत्तेजित झाल्यासारखा लागलेला असतो. पण हि रड सर्वच भाषांची आहे. म्हणून मला झक्कींचा मराठीचा आग्रह मनापासून पटतो. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरायला हवा. दिल्लीत कसे हिंदीशिवाय, खास करुन पंजाबी ढंगाच्या हिंदीशिवाय चालतच नाही, तसे व्हायला हवे. नेटाने मराठी शिकणारे परप्रांतीय लोकही मला माहित आहेत.
|
Uday123
| |
| Friday, April 04, 2008 - 3:22 am: |
| 
|
मी अगदी कसोशीने मराठीत बोललो तरी यांचे इंग्रजी चालूच! --- हे तुमच्यावर छाप पाडण्यासाठी असेल.
|
Uday123
| |
| Friday, April 04, 2008 - 3:51 am: |
| 
|
तर एव्हढी जर मराठीबद्दल अनास्था असेल तर जरी काही लोक मराठीत बोलले, त्यांनी मराठीतून लिहीले तरी ते केवळ छंद म्हणून होईल, व्यापारी दृष्टीने त्याला महत्व नाही, म्हणून मराठीचा अजूनच र्हास. --- मान्य आहे, मी वर याच धर्तीवर म्हटले होते की आपला इमारतीचा पायाच कच्चा आहे... आणि तो दिवसंदिवस अजुनच होतो आहे. जर वेळीच काळजी नाही घेतली तर तुम्ही म्हणता तसा र्हास व्हायला वेळ लागणार नाही. मला तरी 'सर्वसामन्यां'साठी शिक्षणाचे शाळे व्यतिरिक्त दुसरे कुठलेही माध्यम दिसत नाहे. उद्या मला जर माझ्या मुलांना मराठी शाळेत टाकावे वाटले तर मराठी शाळा तरी शिल्लक रहातील कां?
|
अनुमोदन झाकी, उदय तुम्हाला. तुमचे मुद्दे पटत आहेत.पण आजच्या सो कॉलड सुधारित समाजाला ते पटेलच असे नाही(कृपया हे व्यक्तिगत घेऊ नए). मी तर मझ्या सख्या मावस भावाला त्याच्या मुली साठी मराठी शाळेचा आग्रह देखील करू शकलो नाही, कारण ते आमच्या वाहिनी साहेबाना पटत नव्हते. त्या स्वतः इंग्रजी माधमाच्या शिक्षिका असल्या मुळे सांगणे वर्थ ठरले. शेवटी जवळ चांगल्या मराठी शाळा असून पण स्टेटस साठी छोटी ची रवानगी इंग्रजी संताच्या शाळेत झाली. तिला शब्द ओळख करून देताना आम्ही मज्जा करत असतो... उदा. भूभू, काऊ, चिऊ, माऊ असे शब्द मी तिला मुद्दाम शिकवून ठेवत असे..त्या बरोबर मराठी बडबड गीते आणि मराठी कारटून्स चा डोस असतोच. तश्या तेवध्या अधिकाराचे ते माझे घर होते म्हणुन, परंतु हे सगळी कडेच अधिकराने करता येत नाही. मराठी शिक्षण मराठी तुन घेणे अन इंग्रजी तुन घेणे यात खुप फरक असतो... एक मराठी विषय सम्पूर्ण इंग्रजी मध्यमात शिकणे आणि सर्व विषय मराठी तुन शिकणे यात खुप फरक पडतो.... कारण इतर विषयांचे वाचन देखील मात्रुभाषेतून झाल्याने तो विषय देखील पक्का होतो आणि इतर विषयांचे मराठी शब्द आणि संद्न्या देखील कळतात ज्या मुळे मराठी भाषा व्हवाहारत वापरली जावू शकते. हे मी स्वतः अनुभवतो आहे. माझी चुलत भावंडे ज्यांची शिक्षणे इंग्रजी मध्यमातुन झाली त्यांचे इंग्रजी आणि मराठी दोन्ही वर चांगलाच उजेड आहे. इंग्रजी मध्यमातिल खुप विद्यार्थी "यू क्नो ना रे बाबा...." असा शब्द प्रयोग करतात म्हणजे एक ना धड़ भाराभर चिध्या... तसा याला अपवाद देखील असतो घरातील अन शेजारी मित्र परिवार यांच्या बोली चालीचा परिणाम होतो लहनांनवर... आणि भाषेवर.... म्हणुन महाराष्ट्रात आपल्या माय भुमित तरी हे सभोवातिचे वातावरण अमराठी होऊ नए (तसे शहरात झालेच आहे...) त्या साठी हा आग्रह...
|
शेंडे नक्षत्र्- शालेय शिक्षण मराठीत झाल्यास आवड निर्मण होण्यास पूरक ठरते.इन्ग्रजी माध्यमात शिकणार्या मुलांना मराठीचे स्थान दुय्यम असल्याची जाणिव वेळोवेळी करून देण्यात येते.जी नावे तुम्ही देत आहा ते द्रष्टे होते. इन्ग्रजी माध्यमातील मुलांना मराठीतील बारकावे समजणे अवघड आहे.या विपरीत मराठी तील मुलांना इन्ग्रजीतील बारकावे शिक्षण पद्धती मुळे लौकर कळतात.शिवाय माध्यमिक शाळेपासून महविद्यालयीन शिक्षणाच्या अखेर पर्यंत इन्ग्रजीची सलगता असते. हे मी स्वानुभवा वरून लिहेत आहे.माझे माध्यमिक्-११वी पर्यन्त चे शिक्षण मराठी व नतर इन्ग्रजी तील आहे.माझी मराठी ची आवड शलेय शिcक्षणाची देणगी आहे.
|
Uday123
| |
| Friday, April 04, 2008 - 5:35 am: |
| 
|
(दोन्ही पोस्ट) अनुभवाचे बोल आहेत तुमचे रवीजी. शेंडे नक्षत्रंनी जी ऊदाहरणे दिली आहेत ती सर्व असामन्य लोकं आहेत, ती पवलो पावली नाही मिळत. समाजातील बहुसंख्य (प्रत्येक!) व्यक्ती कडे जर त्यांच्या एवढी प्रतिभा असती तर तुमचे उदाहरण मला पटले असते, पण तशी परिस्थीती अजिबातच नाही आहे. आपल्याला 'सर्वसामान्य' लोकांसाठी'च' (जी ९९.९९९ अधिक) विचार करायचा आहे.
|
मुलांच्या मनात भाषेची गोडी रुजवणं हे सर्वस्वी पालकांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. 'दोनतीन भाषांचा पोरांना खूप ताण पडतो' ह्या कल्पनेच्या मी साफ विरोधात आहे. आईबाबांनी कुठल्याही भाषेसाठी आडकाठी केली नाही. बाबा स्वत: बनारस-उदयपुर ला लहानाचे मोठे झाले, आईची पंचविशी दिल्लीत उजाडली. बाबांच्या नोकरीत दर तिसर्या-चवथ्या वर्षी बदल्या व्हायच्या, 'प्रमाण' मराठी सगळीकडे ऐकायला मिळेलच याची खात्री नाही. सगळं शिक्षण काॅन्व्हेंट शाळांतनं झालं. एक गाफील शब्द जरी हिंदीमराठीतून निघाला तरी फटका- असल्या वातावरणात. बाहेरच्या पोरांमध्ये खेळून (त्या-त्या पोस्टिंगप्रमाणे) नागपुरी मराठी, मराठवाडी, दक्खनी उर्दू इतक्या भाषांचा गोपाळकाला मेंदूत ठासला गेला. आता नोकरीच्या निमित्ताने हिंदीचा पाट वाहतो, आणि इंग्रजीचा नळ! माझे मुंबईतले सहकारी मराठी, पण इतकं उत्तम कानडी शिकलेत! आज मराठी वाहिन्यांवर "चिरंजीव शुभम ला त्याच्या तिसर्या वाढदिवसानिमित्त आजी-आजोबा, पप्पा-मम्मीकडून खूप्-खूप शुभेच्छा!" वाचून डोक्यात तिडीक जाते!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|