|
Zakki
| |
| Monday, March 17, 2008 - 12:54 pm: |
| 
|
उदय १२३, बरोबर बोललात. तसेहि काय? एव्हढी कुठे आवड आहे कुणाला मराठीची की जरा प्रयत्न करून शिकतील? जे दणाद्दण, जे दणाद्दण हिंदी, इंग्रजि, पंजाबी लिहीत सुटायचे, बोलत सुटयचे. सोपे वाटते हो तसे. मराठी बद्दल लिहीले की पुरे मराठीचे प्रेम. त्यासाठी मराठीतच लिहायला पाहिजे असे नाही! अहो, महाराष्ट्र नि मराठी हे १८१८ मधेच मेले! आपआपसात भांडणे, संकुचित वृत्ति, स्वार्थ यापायी १८१८ पूर्वी अनेऽकदा स्वकीयांविरुद्ध लढायला, महाराष्ट्राचा मुलुख काबिज करायला मदत केली. त्यांनी अत्याचार केले, त्याचा ज्यांनी प्रतिकार केला, त्यांना मारणे, पकडणे, परकीयांच्या तुरूंगात टाकून छळ करणे हेहि स्वार्थ, पैसा यासाठीच केले. तेंव्हा भारतातल्या महाराष्ट्रीयांशी पांगा मत लेना, हां, राडा करेंगे! कारण, भारतातले मराठी श्रीमंत नि राजकारणी पुढारी आता एकदम विशाऽऽऽल मनाचे, हे विश्वचि माझे घर मानणारे झाले आहेत! उद्या कुणि हजारो मराठी लोकांनी मराठी गाणी लावा अश्या पत्रकावर सह्या करून ते रेडियोवाल्यांच्या कार्यक्रम अधिकार्याला दिले, तर हे मराठी श्रीमंत नि राजकारणीच आरडा ओरडा करतील छे: छे: हे संकुचितपणाचे लक्षण आहे. भारतात कुणालाही कुठलीहि भाषा बोलायचा अधिकार आहे! अहो तो कार्यक्रम अधिकारी स्वत: मराठी असला, अगदी पेशव्यांच्या काळच्या सरदाराचा वारस, तरी तोहि असेच म्हणेल. नि हिंदी सोबत बिहारी गाणी लावेल! उदाऽऽऽर विशाऽऽल मतवादि लोक आहेत आता महाराष्ट्रात! राहू द्या त्यांना तिथेच. ज्यांना जमेल त्यांनी यावे अमेरिकेत, मराठी मंडळ, एकता, मायबोली करत जपावी भाषा जमेल तेव्हढी!
|
Trish
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:44 am: |
| 
|
नमस्कार सुप्रभात उदय आणि झाकी माझी चुक उमगली, वेळेच्या अभावी घाई मधे मी सकाळ वृतपत्र च्या आंतरीय माहितीजाल( इंटरनेट ) आवृति वरुन, लेख तसाच इथे छापला! आता वेळ लागला तरी चालेल पण मराठी मधे लिहायचा प्रयन्त करीन. मदतिस आपण आहातच. धन्यवाद, त्रिश.
|
Uday123
| |
| Tuesday, March 18, 2008 - 6:09 pm: |
| 
|
त्रिश तुम्ही थोडक्यात बचावले, नाहीतर जयमहाराष्ट्र यांची काठी (फ़ुकटची) खावी लागली असती. तुम्ही प्रयत्न करण्याचा निश्चय केला, आनंद झाला. भावी लेखनासाठी शुभेच्छा!
|
हा घ्या मुजोरी आणि माजोरीपणाचा अजुन एक नमुना! >> यात मुजोरी आणि माजोरीपणा कुठे आहे? या बातमीवरून तरी तसे काही वाटत नाही
|
Uday123
| |
| Tuesday, March 18, 2008 - 7:26 pm: |
| 
|
मनिश- तुमची पण तिच गत झाली तर, मला वाटलं मलाच शोधता आलं नसेल,गप्प बसलो म्हटले उगीच बोलुन चार्-चौघात हसे कुठे करुन घेता?
|
दोन दिवसांत १४ बळी ................ व्यावसायिक आक्रमणाचा रोष? इंफाळ परप्रांतियांच्या व्यावसायिक आक्रमणाविरोधात मणिपूरमध्ये रक्तरंजित संघर्ष उफाळून आला असून दोन दिवसांत दहशतवाद्यांनी १४ उत्तर भारतीयांची हत्या केली आहे. 'रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट' संघटनेने मणिपूरमध्ये जर्दा व खैनीच्या व्यवसायावर बंदी घातली आहे. या व्यवसायातील बहुसंख्य उद्योजक व कामगार बिहारी-उत्तर प्रदेशी आहेत. या संघटनेने अनेकदा परप्रांतियांना मणिपूर सोडून जाण्याची धमकी दिली होती. सोमवारी रात्री इंफाळच्या पश्चिम भागातील कामगार वस्तीवर हल्ला चढवून दहशतवाद्यांनी सात जणांना गोळ्या घातल्या. मंगळवारी सकाळीही आणखी सात जणांची हत्या करण्यात आली. इंफाळ जिल्ह्यातील ताखेळमध्ये तीन उत्तर भारतीयांना अगदी जवळून गोळ्या घातल्या गेल्या तर कांगला, किबी, सिकमिजीन, कोनुमा भागात प्रत्येकी एका कामगाराची हत्या झाली. हे सर्व जण तंबाखू व्यवसायातील कामगार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दोन दिवसांतील या घटनांमुळे मणिपूरमधील परप्रांतियांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनी या घटनेची निंदा करत पोलिसांना परप्रांतियांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. नक्षलवादी व दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी संपूर्ण इंफाळमध्ये ४२ चेकपोस्ट उभारण्यात येतील, असे सांगत कुणी मंत्री, आमदार दहशतवाद्यांना सहकार्य करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. (वृत्तसंस्था) ................... चौकट मृतदेहांवर 'परत जा'चा संदेश मृतदेहांच्या पाठीवर दहशतवाद्यांनी 'तुमच्या प्रांतात परत जा' असा संदेश लिहिलेली पत्रके चिकटवली होती. त्यामुळे परप्रांतियांविरोधातील एखाद्या संघटनेनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे.
|
आता इथे जावुन लढायची भाषा करुन दाखवा म्हणाव. पण इथे बोलती बंद होते सगळ्या उत्तरभारतीय नेत्यांची.
|
त्रिश! माझा तुमच्या इंग्रजीत लिहिण्याला आक्षेप वगैरे मुळीच नाही. नवीन मायबोलीकराला वेळ लागतो. इथे उगिचच माझ्या नावाने शिमगा करायची सवय जडली आहे.तसे देखिल आता शिमगा येऊ घातलाच आहे.तेंव्हा वाईट वाटुन घेण्यात काही अर्थ नाही. पण तुम्ही जो मुद्दा मांडलात तो अत्यंत कळकळीने आणि त्यावर खरच विचार आणि कृती दोन्ही होणे अत्यंत गरजेचे आहे.पण योग्य ती कृती करणार कोण हाच कळीचा मुद्दा आहे. राज्यसरकार किंवा आपले झुबकेदार विलासराव काही करतील अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कालच सोनियादेवींच्या उपस्थितित झालेल्या उस्मानाबाद येथिल सभेत विलासरावांनी हिंदीतुन भाषण केले. आता सभा होती शेतकर्यांच्या कर्जमाफ़ीचे श्रेय लाटण्यासाठीची,सभेला समस्त त्रासलेला आणि कर्जाने ग्रासलेला शेतकरीवर्ग उपस्थित होता.तिथे विलासरावांचे राष्ट्रभाषेतील भाषण उपस्थितांना समजले असेल वा नसेल पण सोनियागांधीचे गुणगान मात्र देवीनी स्वकर्णाने ऐकले आता ते कितपत उमगले असेल ती बाब अलाहिदा. जिथे राज्यकर्त्यांनाच मराठीबद्दल प्रेम नाही तिथे इतर कुणाला कुठले असायला? ज्यांना किरायेदार आणि हिस्सेदार यातला फ़रक देखिल कळ्त नाही अश्यांना काय म्हणावे? बुरा ना मानो होली है! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Uday123
| |
| Tuesday, March 18, 2008 - 8:28 pm: |
| 
|
त्यांना हिस्सेदारी महाराष्ट्राच्या जडन घडन मधे हवी आहे, म्हटलं तर खुप उदात्त हेतु आहे. आता तुम्हाला लगेच ते राज्याचा 'हिस्सा' मागत आहेत असे वाटले कां? येथे येणार्या प्रत्येक व्यक्तीला थोडे फ़ार मराठी विषयी प्रेम आहेच, फ़क्त ते व्यक्त कसे करावे या बद्दल संभ्रम आहे.
|
Zakki
| |
| Tuesday, March 18, 2008 - 8:54 pm: |
| 
|
तेच तर म्हणतो आहे मी. राज्यकर्तेच काय, सामान्य माणसाला पण मराठी, महाराष्ट्र या बद्दल स्वाभिमान नाही. आता मला वाटते, या मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी वगैरे भाषा मिळून एक स्वतंत्र 'व्यवहारातली' अशी एक भाषा असावी. खाजगीत काही पण बोला. कसेहि वागा. पण निदान ही मायबोली, ज्याचा मुख्य उद्देश मराठी भाषा जपणे, जगभर पसरलेल्या मराठी बांधवांशी सुखसंवाद साधणे, तिथे तरी मुद्दाम हिंदी, इंग्रजी घुसडू नका. भांडणे उकरून काढली की भावना भडकतात. म्हणून असले विषय टाळा. आपण इथे लिहून कुठलाहि प्रश्न सुटणार नाहीये.
|
जयमहाराष्ट्र तुमचा काहीतरी गोंधळ होतोय बहुतेक... ते जर राज्याच्या जडण-घडणीमधे हिस्सेदार आहोत म्हणत आहेत तर चांगलेच आहे की... महाराष्ट्राला माझा म्हणत असतील तर त्यात माजोरीपणा कुठे दिसतो? शिवाय, गरज पडली तर महाराष्ट्रासाठी रक्त पण सांडू म्हणत आहेत ( at least म्हणत तर आहेत ) ... असे "मराठी" लोक नको आहेत काय तुम्हाला?
|
माझा अजिबात गोंधळ इत्यादी उडालेला नाही.त्यांना महाराष्ट्राच्या जडणघडणीत हिस्सा हावाय कि राज़्यामधे ते लवकर कळेलच तुम्हाला रक्त सांडण्याची भाषा करणे वेगळे आणि प्रत्यक्ष वेळ पडल्यास सांडता येणे यात बराच फरक आहे.(जेंव्हा वेळ येईल तेंव्हा शेपुट घालून बिहारला पळतील) तुम्ही फक्त बातमी वाचली असावी मी भाषण ऐकले.एखादे विधान वाचण्यात आणि ऐकण्यात तर फरक असतो हे तर मान्य कराल ना? एकदा दुधाने तोंड पोळल कि ताक पण फुंकुन प्यावे माणसाने. आणि हे शहाणपण अनुभवानेच आले आहे. असो चु भु द्या घ्या! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|

|
होळीच्या शुभेच्छा- बुरा ना मानो होळी है
|
महाराष्ट्र हाच गुरू! ""आमच्या भाषेवर, संस्कृतीवर वरवंटा फिरवणाऱ्यांना क्षमा करणे म्हणजे "पॅन-इंडियन' असे कोणी मानत असेल, तर त्यांना कळेल अशाच भाषेत महाराष्ट्र यापुढे उत्तर देईल. मग ती भाषा सेन्सेक्सची असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो किंवा अजून कशाची असो...'' गेल्या शुक्रवारी (ता. २१) याच स्तंभात गुरुचरण दास यांनी लिहिलेल्या लेखाला राज ठाकरे यांनी दिलेले उत्तर... ........ गुरुचरण दास यांचा माझ्यावर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर लिहिलेला लेख वाचला. वाचताना पहिल्यांदा वाटले, की ते होळीनिमित्त गंमत म्हणून काही लिहीत आहेत की काय! त्यांनी मोठा गंभीर आव आणून लेख लिहिला आहे; पण त्याला आधार ना शास्त्रीय आहे, ना अभ्यासाचा! वास्तविक त्यांच्यासारखे प्रातिनिधिक बाबू हे कोणत्याही राज्याचे वा देशाचे नसतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते "ग्लोबलही' होत नाहीत. स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वराज्य वगैरेंशी यांचा दुरान्वयेही संबंध येत नाही. निव्वळ नफा कमावणे हीच ज्यांची "संस्कृती' आहे, अशांना माझा मुद्दा न कळणे स्वाभाविकच आहे. माझी भूमिका ही राजकीय, सांस्कृतिक, तत्त्वचिंतन, इतिहास, सामाजिक आणि व्यापक अर्थाने विकासाशीही संबंधित आहे; पण त्याचा उथळ अर्थाने मार्केटिंग, नफा, सेन्सेक्सशी संबंध नाही. दास यांनी त्यांच्या लेखात मजबूत थापेबाजी केलेली आहे. ती अधिकृत वाटावी, यासाठी त्यांनी कार्ल मार्क्स, पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्था वगैरे शब्द मध्ये वापरले आहेत. दास यांच्या थापेबाजीचे पहिले उदाहरण हे अमेरिकेचे आहे. अमेरिकेला स्थलांतरितांचा देश म्हणून प्रगती करता आली, हे सांगताना ते जपान आणि युरोप स्थलांतरितांविषयी कडक असल्याने मागे पडले, असे म्हणतात. हे विधान तद्दन भंपकपणाचे आहे. मुळात अमेरिकेत जगभरातून स्थलांतरित जातात, ते अमेरिकेच्या आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या गरजेप्रमाणे. अमेरिकेच्या इच्छेशिवाय आणि गरजेशिवाय तिथे स्थलांतरित मुंगीसुद्धा जाऊ आणि राहू शकत नाही! त्यामुळे तिथल्या स्थलांतरितांची इथल्या उत्तर प्रदेश- बिहारमधल्या स्थलांतरितांशी तुलना केवळ मुंबई- महाराष्ट्रद्वेषातूनच होऊ शकते! राहता राहिली जपान आणि युरोपची उदाहरणे. जपान ही ९९ टक्के स्वभाषा, स्वसंस्कृतीवर उभी राहिलेली अर्थसत्ता आहे. पुढच्या काळात जपान चीनपेक्षा मागे पडेल; पण त्याचे कारण चीनचा आकार आणि लोकसंख्या, हेच आहे. जपान त्या अर्थाने चिमुकला देश आहे. शिवाय चीनसुद्धा स्वभाषा, स्वसंस्कृतीवरच उभा आहे. तिथे स्थलांतरितांना काहीच स्थान नाही. युरोपची संस्कृती जेवढी भव्य आणि आग्रही आहे, आज तेवढंच "युरो'चं स्थान जागतिक बाजारात बळकट आहे. या साऱ्याचा माझ्या महाराष्ट्रवादाशी थेट संबंध आहेही आणि नाहीही. स्वभाषा आणि स्वसंस्कृती दास यांनी मराठी माणसाला सगळे जग समजावून सांगण्याचा आव आणलेला आहे. मराठी माणूस जणू अठराव्या शतकात आहे आणि ते स्वतः एकविसाव्या शतकात आहेत, अशी भाषा केलेली आहे. मी आणि माझे अनेक मित्र, सहकारी पर्यटक म्हणून आणि व्यावसायिक म्हणून संपूर्ण जग अनेकदा फिरलेलो आहोत. अनेक मराठी परदेशस्थ उद्योजकांशी आमचा संबंध आहे. जगात सर्व बलाढ्य अर्थसत्ता त्या स्वभाषेत आणि स्वतःच्या संस्कृतीला धक्का न लावल्यामुळेच बलाढ्य बनलेल्या आहेत. जपान, चीन ही आशियातील उदाहरणे. जर्मनी आणि फ्रान्स ही युरोपामधली, तर खुद्द अमेरिका हेसुद्धा त्यातलंच एक उदाहरण आहे. साधे बेल्जिअमध्येही डच बोलणारे फ्रेंचला नकार देतात; फ्रेंच बोलणारे डचला. जगाच्या पाठीवर प्रत्येक प्रांत आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्याकरता लढतो. स्थलांतरितांनी ती आत्मसात केली तरच स्वतःच्या अटींवर (व गरजेप्रमाणे) तो प्रांत त्यांना सामावून घेतो. भारतातही सत्यजित राय यांना "लाइफटाइम ऍचिव्हमेंट ऍकॅडमी ऍवॉर्ड' (ऑस्कर) मिळाले, तर साहित्याचे नोबेल रवींद्रनाथ टागोर यांना मिळाले. ते बंगालीत आपली कला सादर करत. जगाला कळावे म्हणून त्यांनी आपला सांस्कृतिक अभिमान सोडला नाही. तरीही ते "ग्लोबल' बनलेच. प्रगत संस्कृती असणाऱ्या मानवी समूहांनी अर्धे वैश्विक व अर्धे स्थानिक बनणे म्हणजे "ग्लोबल' बनणे, असा अर्थ दास काढत असतील तर ते अयोग्य आहे. महाराष्ट्राने दास बनायला नेहमीच नकार दिलेला आहे- मग तो मोगलांसमोर असो वा इंग्रजांसमोर. स्थलांतरितांचे बेकायदा आक्रमण महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. आणि हेच अंततः देशाच्या भल्याचे आहे. विविधतेतली एकता आम्हालाही मान्य आहे; परंतु विविधता बळजबरीने नाहीशी करण्याने एकता होत नाही! दास यांनी आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरातच्या विकासाची उदाहरणे दिली आहेत. ही तिन्ही उदाहरणे स्वभाषा, स्वसंस्कृतीला घट्ट चिकटून असणाऱ्या राज्यांची आणि म्हणूनच विकासाकडे झेपावणाऱ्या अर्थव्यवस्थांची उदाहरणे आहेत. महाराष्ट्र या राज्यांच्या तुलनेत गेली काही वर्षं मागे पडतो आहे, हे दास यांचे म्हणणे खरेच आहे; पण त्यांचे निष्कर्ष नेमके उलटे आहेत. महाराष्ट्राच्या अर्थकारणाच्या चाव्या स्वभाषा, स्वसंस्कृतीच्या हातात न राहता महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या हातात गेल्यामुळे महाराष्ट्राचा विकास कमी होऊन महाराष्ट्रात ही बकालता आली आहे. आज आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू येथील राजकीय नेतृत्वाप्रमाणेच मी व माझा पक्ष महाराष्ट्रातही त्याच प्रकारे स्वभाषा, स्वसंस्कृतीबद्दलची मरगळ झटकून टाकत आहोत. मुंबईचा जो काही पायाभूत विकास झाला आहे आणि मुंबई जी काही श्रीमंत झाली आहे, ती मुंबईतल्या मराठी माणसाच्या श्रमाने आणि शहाणपणामुळेच. ती तशी झाल्यावर उत्तर प्रदेश, बिहारमधले लोंढे तिच्या समृद्धीचे शोषण करायला बेकायदा येथे आले. आपल्यामुळे मुंबई अशी समृद्ध झाली, असे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी लखनौ, पाटणा ही शहरेदेखील समृद्ध का नाही केली? केवळ भीतीपोटीच महाराष्ट्रातील जनतेत जागृती होऊन आपले न्याय्य हक्क ती परत मिळवेल, ही भीती येथील "उपऱ्यां'ना वाटत आहे व ती खरीच ठरणार आहे. म्हणूनच याच्या विरोधात थापेबाजी केली जात आहे. आर्थिकदृष्ट्या प्रगत मराठी माणूस, अमित गोडबोले, दत्ता सामंत, शिवसेना वगैरे उदाहरणे दास यांनी म्हणूनच कोणत्याही आधाराशिवाय आपल्या लेखात टाकलेली आहेत. त्यांनी राजकीय इतिहासाचा नीट अभ्यास करायला हवा. माझ्या आंदोलनाला अपयशच येणार आहे, असे ज्योतिष्याच्या भूमिकेतून त्यांनी लिहिले आहे. यावर त्यांचा स्वतःचा जर विश्वास असता, तर ते हा लेख लिहिण्याच्या खटाटोपाला का लागते? माझ्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या जाग्या होणाऱ्या सांस्कृतिक व राजकीय जाणिवांमुळे अनेकांच्या पायाखालची माती सरकली आहे. या जाणिवांचे मराठी माणसाचे यश या साऱ्यांना खुपणारे आहे. दास यांच्या लेखासारखे लेख, युक्तिवाद यापुढेही येतील; परंतु विकासाची, भरभराटीची आणि समृद्धीची वाट ही स्वभाषा व स्वसंस्कृतीतूनच जाते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिकतेचा लढा महाराष्ट्राला मुंबईला समृद्धीकडेच नेईल. पर्यायाने देशालाही. आजवर महाराष्ट्राने निर्माण केलेली संपत्ती देशभर गेलेली आहे. त्यालाच मी "पॅन-इंडियन' असणे मानतो. आमच्या भाषेवर, संस्कृतीवर वरवंटा फिरवणाऱ्यांना क्षमा करणे म्हणजे "पॅन-इंडियन' असे कोणी मानत असेल, तर महाराष्ट्र अशांना त्यांना कळते अशाच भाषेत उत्तर यापुढे देईल. मग ती भाषा सेन्सेक्सची असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो किंवा अजून कशाची असो... आणि माझी संघटना प्रतिनिधित्व करते ते जाग्या झालेल्या महाराष्ट्राचे. असा महाराष्ट्र, की जो झोपेचे सोंग घेतलेल्यांचा मुलाहिजा ठेवत नाही. त्या बाबतीत महाराष्ट्र "गुरू' आहे. बाकी सगळे नुसतेच "चरणदास'! - राज ठाकरे (लेखक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत.)
|
Zakki
| |
| Tuesday, March 25, 2008 - 7:25 pm: |
| 
|
इच्छेशिवाय आणि गरजेशिवाय तिथे स्थलांतरित मुंगीसुद्धा जाऊ आणि राहू शकत नाही! माफ करा, पण अनेऽक अनेऽक लोक अमेरिकेत बेकायदा रहातात, नि मेक्सिको मधून अनेऽक लोक, जे मेक्सिकनच नाही तर आणखी इतर देशातून आलेले राजरोसपणे बेकायदा अमेरिकेत येत आहेत, दररोज. महाराष्ट्राने दास बनायला नेहमीच नकार दिलेला आहे- मग तो मोगलांसमोर असो वा इंग्रजांसमोर. स्थलांतरितांचे बेकायदा आक्रमण महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. असे काही नाही. राघोबाने इंग्रजांशी नि मुसलमानांशी हातमिळवणि करून महाराष्ट्रावर संकटे आणली. आक्रमण सहन करणार नाही, काय? स्वत:च आक्रमकांना बोलावले महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या कुटुंबाने!! मुसलमान व इंग्रज यांच्यापुढे देशातल्या इतर राज्यांपुढे त्यांनी पण संपूर्ण शरणागति पत्करली होती. माझ्या स्वत:च्या माहितीत अनेक लोक होते (मेले बिचारे सगळे) की जे म्हणत की 'इंग्रज गेले हे वाईट झाले, आता देशाचे वाटोळे होणार! असे सगळे असताना तुम्हाला प्रश्न पडतोच कसा की महाराष्ट्राच्या अर्थकारणाच्या चाव्या स्वभाषा, स्वसंस्कृतीच्या हातात न राहता महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या हातात गेल्यामुळे महाराष्ट्राचा विकास कमी होऊन महाराष्ट्रात ही बकालता आली आहे. का बरे असे झाले? त्या चाव्या काय बाकीच्यांनी मारामारी करून काढून घेतल्या? कित्येक महाराष्ट्रियांनीच तर त्यांना मदत केली ना? मग आता का ओरडता?
|
Zakki
| |
| Tuesday, March 25, 2008 - 7:36 pm: |
| 
|
केवळ भीतीपोटीच महाराष्ट्रातील जनतेत जागृती होऊन आपले न्याय्य हक्क ती परत मिळवेल, ही भीती येथील "उपऱ्यां'ना वाटत आहे. बरोबर आहे!! खरे काहि तसे होणार नाही, केवळ राडा केल्याने ते जरा घाबरले आहेत एव्हढेच. मराठीत चित्रपट काढणार्या मराठी निर्मात्यांना स्वत:ला दोनहून अधिक वाक्ये मराठीत बोलता येत नाही. इंग्रजी बोलतात. मुंबई पुण्यात सगळीकडे सगळे मराठी लोक, मराठी सोडून हिंदी, इंग्रजी, गुजराति बोलतात. खुद्द माझा मामे भाऊ, ज्याचा पुण्यात गेले वीस वर्षे धंदा आहे, तो पण गुजरातीत बोलतो, म्हणजे गुजराती लोकांशी धंदा करता येईल. मी म्हंटले, गुजरात्यांना महाराष्ट्रात धंदा करायचा तर ते का नाही मराठी शिकत? त्याला उत्तर नाही! पैशाची गरज कुणाला जास्त? बॉलिवूड मुंबईत. तिथे किती मराठी आहेत, नि ते किती महाराष्ट्राची 'अस्मिता' जागी ठेवतात? महाराष्ट्राची कसली अस्मिता कुणास ठाउक? कुणि परका आला की हे लगेच त्याची भाषा बोलणार, करवा चौथ करणार इ. इंग्रजांचे क्रिकेट खेळणार. आपल्या हुतुतू ला कबड्डी म्हणणार. खो खो, आट्यापाट्या कुठे गेले कुणास ठाउक? आज जर कुणि महाराष्ट्रात गेला, मुंबई, पुण्यात तर त्याला काय दिसेल? कुठली भाषा बोलतात लोक? कुणाची नोकरी करतात?
|
MEN & IDEAS Thackeray scores a self-goal 23 Mar 2008, 0139 hrs IST,Gurcharan Das SMS NEWS to 58888 for latest updates The damage is done. Hit by an exodus of North Indian labour in the past two months following Raj Thackeray's Marathi rage, industrialists in Pune, Nashik, and Thane have slowed their expansion plans in Maharashtra and are looking towards other states. They fear a return of the old nightmare when Datta Samant's labour militancy combined with Bal Thackeray's xenophobia drove white-collar jobs from Mumbai to Bangalore and blue-collar jobs to Gujarat. In a free market, investment flows to the most attractive destination. What makes a destination attractive is, in part, the availability of industrious workers. Immigrants everywhere tend to be hungrier and harder working than locals. Economists like Harvard's Richard Freeman have shown that societies that encourage immigration outperform those that do not. This is why experts predict that America will remain competitive in the 21st century, while Europe and Japan will decline. As a land of immigrants, America is more capable of accepting immigrants, unlike Europe and Japan which have historically failed to absorb outsiders. Under pressure of ageing populations and shrinking workforces, Europe and Japan will, thus, lose out to China and India. The Indian Railways sells 6.4 billion tickets annually. Assuming a third are commuters, this means roughly four journeys per person per year in a nation of 1.1 billion people. We are a nation on the move, especially the poor in search of jobs and a better life. Our cities are becoming more cosmopolitan and an Indian identity is being forged, which will increasingly trump regional identities. This imposes real costs on Raj Thackeray's bigotry. Maharashtrian workers do have a legitimate problem, however. How do they respond to the challenge of more nimble and productive immigrants? The answer is to make Maharashtra even more attractive for investment. Raj Thackeray should push for better infrastructure, better colleges, and better vocational schools. This will make Maharashtrians more skilled and more competitive. Eventually, many will move up into the middle class and leave the menial jobs to migrants. There is a more troubling question, however. What makes ordinary, decent Maharashtrian boys turn into a violent and cruel mob? It is the same question that Germans have asked for 75 years — “how did we become evil Nazis in the 1930s?” David Livingstone Smith tries to answer this in his book, The Most Dangerous Animal. He argues that all human beings are disposed to evil — it only needs a trigger like Hitler or Thackeray. The men of the German Reserve Police Battalion 101, who shot 38,000 Jewish unarmed civilians one afternoon, were “middle-aged family men without military training or ideology”. The same could be said of all mass killings. The murderer could be you or me. Scientists explain our violent tendencies through our genes. Like all social animals, from ants to chimpanzees, we are highly xenophobic. The more closely knit we are, the more aggressive we are to outsiders. Our Constitution makers realised the dangers of giving power to the human animal — hence, they set up a system of checks and balances. Raj Thackeray is not the only one to score a self-goal. Malaysia's 'bumiputra' movement continues to drive investment from Malaysia to other South-East Asian countries. Germany failed to attract Indian software engineers a few years ago, despite an attractive 'green card' scheme, because its people are inhospitable to immigrants. In a competitive world, it takes maturity and luck to realise that immigrants make a society successful.
|
माझ्या मते वरील लेख बराच सन्तुलित विचार करून लिहिलेला आहे.
|
Uday123
| |
| Sunday, March 30, 2008 - 7:25 am: |
| 
|
Raj Thackeray should push for better infrastructure, better colleges, and better vocational schools. --- मला हे वाक्य आवडलं. केवळ राजच नाही तर सर्वांनीच यासाठी प्रयत्न करायला हवा. पण "स्वार्थ" फ़ार मोठा आहे...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|