Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 09, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » UP/Bihar Versus Maharashtra: punha ek raajkaaraN » Archive through March 09, 2008 « Previous Next »

Raviupadhye
Tuesday, March 04, 2008 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाच्याही मतावर वैयक्तिक बोचक ताशेरे न झाडता आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा संकेत आपण सर्व जण पाळूया का? माझ्या पासून सुरुवात करून्- मी हे पाळायचे वचन देतो व भूत कालात असे काही माझ्या कडून झाले असल्यास त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो -(कारण त्याने ते आपले मत, आपल्या अनुभवाप्रमाणे तसेच विवेचनानंतर चर्चेस सर्वान्गाने फुलवावे या इच्छेने केलेले असते, असा माझा विश्वास आहे)

Mandard
Tuesday, March 04, 2008 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता हा बिहार, महाराष्ट्र प्रश्न मोठ्या प्रमाणावर राजकीय आहे. राजकारणात अभिमान, लाजलज्जा, आई, मातृभाषा इ. 'फालतू!' गोष्टींना जागा नसते. सत्ता नि पैसा हे महत्वाचे. बाकी सर्व मिथ्या. म्हंटलेच आहे सत्ता सत्यं जगन्मिथ्या---------------

झक्की हे मात्र एकदम खरे. एक नागडे सत्य. हे एकदा समजल्यावर येथे लिहिणे म्हणजे उगीच पांढर्यावरचे काळे करणे. त्यामुळेच तुमचे परममित्र robinhood साहेब हिकडे फ़िरकत नसावेत.


Jaymaharashtra
Tuesday, March 04, 2008 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका अहो कसे शक्य आहे माझे वडिल १९६० साली बोळ्याने दुध पिणे?
१९६० साली ते नोकरी करत होते. स्वातंत्र्याची पहाट उगवलेले १९४७ हे वर्ष त्यांनी वयाच्या १० व्या वर्षी बघितले.
ब्राम्हणांच्या शाळेत शिक्षण झाले,बोरकर जोशी,सराफ़,ठोसर,वर्तक,ओक,करंदिकर,भागवत,दातार या आडनावांच्या उच्च प्रतिचे मराठी बोलणार्‍या शिक्षकांच्या तालमीत जर मी शिकले असेन तर आनी पानी बानी " अश्या प्रकारच्या बोली भाषेची सवय कशी होणार? तुम्ही उगिचच वैयक्तिक का होताय?
पेशवा!
तुमचे मुद्दे काही अंशी पटले. पण पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांच्या परिस्थितीत जमिन आस्मानचा फरक आहे. अजुन पुण्याने आपले मराठमोळेपण टिकवुन धरले आहे


Shendenaxatra
Tuesday, March 04, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

==आनि पानी ही बोली भाषा आहे. शाळेत हे सगळे प्रकार शिकवले पाहिजेत.==

हे साफ वेडपटपणाचे आहे. शाळेत शिकवली जाणारी भाषा शुद्ध पाहिजे. शुद्ध म्हणजे काय हे काही प्रमाणात कृत्रीम असले तरी ते स्ट्यांडर्ड (मराठी शब्द सुचत नाही) असले पाहिजे.

इंग्रजीच्या अनेक छटा ऐकायला मिळत असल्यातरी शाळेत शिकवली जाणारी इंग्रजी शुध्दच असते.
आय वॉना गो किंवा दे डोंट नो नथिंग असले इंग्रजीइ रस्त्यवर ऐकू येत असले तरी वर्गात शिकवले जात नाही. मग ते कितीही रुढ का असेना.



Zakki
Tuesday, March 04, 2008 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्च च्च. अहो जयमहाराष्ट्र, हे वैयक्तिक नाही! तुम्ही मला ओळखत नाही (मायबोलीवर), नि मी तुम्हाला.

माझे काही शब्दप्रयोग मायबोलीवर फार पूर्वीपासून येणार्‍यांना, मला भेटलेल्या अनेक व्यक्तींना, माहित आहेत. हे त्यातलेच एक! त्यात वैयक्तिक काही नाही.

मुळात मायबोलीवर वैयक्तिक असे काहीच असू नये, ते सर्व जगजाहीर आहे. म्हणूनच बरेच लोक स्वत:चे खरे नाव न लिहीता, टोपणनाव वापरतात.

शाळेत शिकवताना तरी शुद्ध भाषा कोणती, लिहायची भाषा कोणती नि बोली भाषा कोणती हे स्पष्ट करून सांगितले पाहिजे.

उदा. आम्हाला पुण्याच्या शाळेत शिकवले होते की 'अहो, काय बोलता हे?' असे म्हणायचे नि लिहायचे. पण नागपूरला गेल्यावर दिसले की त्याला, 'अबे काय भकून राहिला तू' असे म्हणतात!


Tanyabedekar
Tuesday, March 04, 2008 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळुहळु महाराष्ट्र, मग मराठी असा जाणारा हा बीबी आता आनी, बानी, पानी मग ब्राह्मणांची शाळा (सर्व ब्राह्मण मास्तरांची नावे) ह्या दिशेने सरकु लागला आहे.

मला अनेक शिक्षक लाभले. समाजातील विविध स्थरातुन पुढे आलेले. बरेच जण रुढार्थाने अशुद्ध बोलायचे (अर्थात हे देखील तौलनिक विधानच आहे.. पुणेकरांच्या दृष्टीने आम्ही लोक अशुद्धच बोलतो की.. ) पण तरीही त्यांनी जे शिकवले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मग भले ते जन्माने ब्राह्मण का नसेनात.

बाकी चालुदे तुमचे


Chinya1985
Tuesday, March 04, 2008 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपला मुलगा वाया जाणार नाही ना अशी भिती वाटते हे वास्तव आहे. मी माझी शाळा सोडुन जेमतेम सात वर्ष झाली आहेत. त्यानंतर मी ११-१२वी मराठी शाळेशी संलग्न असलेल्या कॉलेजमधे केलेले आहे. त्यामुळे मला सध्याची मराठी शाळांमधील परिस्थिती नक्कीच माहीत आहे. पुण्यातल्या रमणबाग,नु.म.वी,भावे,मॉडर्न,टिळक रोड,गरवारे व इतर प्रतिष्ठीत आणि जुन्या मराठी शाळांमधे गुंडगिरी वाढते आहे. हे गुंड शाळा पातळीवरचे असतात. हे फ़ार सिरियस नाही तरी मुलांच्या शिक्षणाचा त्यामुळे बट्याबोळ होतोच. अनेक सुशिक्षीत,चांगल्या घरातल्या मुलांना असे विचित्र नाद लागल्याने करिअरचे वाटोळेही होते. काही गुंड मग त्याच क्षेत्रात पुढेही जातात. हुशार मुलांची तुकडी सोडली तर इतर तुकड्यांमधे एखादा दादा असतो आणि बाकी काही त्याचे हुजरे असतात. मराठी शाळांना संलग्न कॉलेजेसमधील जवळपास सर्व कॉलेजेसच्या कॉमर्स फ़ॅकल्टीतील मुले तर वाया गेलेलीच असतात(मी शहरांमधील शाळांबद्दल बोलतोय).

Jaymaharashtra
Tuesday, March 04, 2008 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रचलित बोलीभाषांचा वापर रोजच्या व्यवहारात करणे हे त्या त्या प्रदेशात रहाणार्‍या लोकांनी करणे हे ठिक आहे,पण म्हणुन काय शाळांमधुन देखिल अशुद्ध मराठी शिकवायला हवे का?
त्या त्या भाषांचा समावेश पुढिल अभ्यासक्रमात करणे हा पर्याय असु शकतो.
इथे येणार्‍या व्यक्ती विविध वयोगटातील असल्याकारणाने त्यांचे अनुभव आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असु शकतो्ए कृपया लक्षात घ्यावे.


Zakki
Tuesday, March 04, 2008 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयमहाराष्ट्र, आता मी इथे वापरलेला ('तुम्ही जन्मला ... ' इ.) शब्दप्रयोग बाद करीन.

पण ते यू पी. बिहारवाल्यांचे काय झाले? गेले का ते सगळे? बरे झाले.

आता(तरी) मायबोलीवर मराठी भाषेबद्दल चर्चा सुरु झाली हे पाहून बरे वाटले.

मराठीत कुठला ग्रंथ मराठी साहित्य परिषद किंवा तत्सम संस्थेने संदर्भग्रंथ म्हणून मान्य केला आहे? त्याच्या अनेक प्रति प्रत्येक शाळेत आहेत का? कदाचित् इंग्रजी शब्दकोषाच्या प्रति असतील. पण मराठीच्या आहेत का? किती लोक तो ग्रंथ उघडून वाचायचे कष्ट घेतात?

महाराष्ट्र सरकारकडून या बाबतीत आर्थिक मदत मिळण्याची वाट न बघता, श्रीमंत मराठी लोक, नि अश्या खाजगी संघटना या बाबतीत काही करू शकतील का?

झाला तेव्हढा राडा पुरे झाला ना? मिळाली नि राजला प्रसिद्धि? द्या त्याला एकदा निवडून. म्हणजे मग एकदा सरकारात गेला कि आपणहि सुटलो, नि तोहि.

आता तुम्ही म्हणाल, राजवर टीका करू नका. पण मी हे चुकून लिहीले नाही. जाणून बुजून, त्याने जे काय केले त्याला उद्देशून मला आलेला राग व्यक्त करत आहे. एका सुशिक्षित, हुषार मराठी माणसाने असले काहीतरी करावे?

मराठीबद्दल त्याला एव्हढे प्रेम आहे तर असल्या अनेक विधायक गोष्टी करता येतील!



Uday123
Tuesday, March 04, 2008 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठीबद्दल त्याला एव्हढे प्रेम आहे तर असल्या अनेक विधायक गोष्टी करता येतील!
---अजुन एक, सोबत शीव-सेनेत सामील हो, किमान बरोबर (माझे मराठी वर प्रेम आहे, आणी मी सर्व प्रकारच्या लोकांची मदत घेईल) तर घे, आणी मराठी आवाज आहे त्यापेक्षा मजबुत कर!


Uday123
Tuesday, March 04, 2008 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाच्याही मतावर वैयक्तिक बोचक ताशेरे न झाडता आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा संकेत आपण सर्व जण पाळूया का?
---रवी महाशय- तुमची अपेक्षा अगदीच योग्य आहे. मला तरी तुमचे विचार अगदी समतोल वाटलेत आणी दिलगीरीची, किमन तुमच्या तरी, मुळीच अवशक्ता नाही आहे.


Raviupadhye
Wednesday, March 05, 2008 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्: पूर्वक आभार उदय जी-कुठलीही चर्चा भावनेच्या आहारी जाते तेंव्हा वैयक्तिक थरावर माणूस जातो व स.म्यक अ.म्यक,सदसद्विवेकाचे भान विसरतो-अरे तुरे वर उतरतो-व य सगळ्यात वाईट म्हणजे मूळ विषय बाजूला राहून जातो-ते घडू नये म्हणून हा प्रयत्न्-अर्थात हे पुन्: पुर्णत्:वैयक्तिक मत्-:-)

Nandini2911
Wednesday, March 05, 2008 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.business-standard.com/common/news_article.php?leftnm=10&bKeyFlag=BO&autono=315844

आता तीन शब्द

Jaymaharashtra
Wednesday, March 05, 2008 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.loksatta.com/daily/20080305/mv01.htm?
मुळ कारणां पैकी एक कारण. आणि ते हि चक्क केतकरांच्या लोकसत्ता मधे आश्चर्यच म्हणायला हवे!

Zakki
Wednesday, March 05, 2008 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातल्या अनेक समस्या, खरे तर आजकालच्या जगातल्या अनेक समस्या एकमेकात गुंतलेल्या असतात.

त्यावर मार्गहि काढतात लोक. प्रामाणिकपणे, राडा न करता, प्रसिद्धीच्या मागे न लागता काम करणारे अनेऽक लोक भारतातच आहेत.

फक्त नेते नि वर्तमानपत्रे फुकट वाईट गोष्टींना प्रसिद्धी देऊन लोकांना भडकवतात.

मुख्य म्हणजे गोरे लोक काय लिहीतात त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना पक्के माहित आहे की भारत एक दिवस त्यांच्या डोक्यावर चढून बसणार आहे. म्हणून आत्तापासूनच द्वेषाने मुद्दाम वाईट बोलतात, लिहीतात. मुस्लिम देशात काय कमी समस्या आहेत का? पण त्यांच्या विरुद्ध, इस्राएलविरुद्ध बोलण्याची हिंमत नाही. भारत बरा. शांत लोक!

मग आपण इथे येऊन उगाच आपापसात भांडत बसतो. जाहीर लिखाण करायचे नि कुणाला पटले नाही की 'तुम्ही फक्त मलाच उद्देशून वैयक्तिक हल्ला केलात' नि 'आ. बु.दो. स.' असले लिहून सात्विक संताप व्यक्त करायचा!

हटकेश्वर, हटकेश्वर! जय चपेटदान मारुती!

sic transit gloria mundi




Chinya1985
Thursday, March 06, 2008 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वाचनिय लेख

http://www.saamana.com/2008/March/05/Index.htm

अग्रलेख आहे 'एक बिहार सौ बिमार'

Jaymaharashtra
Friday, March 07, 2008 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला म्हणतात घरचा आहेर.
http://www.saamana.com/2008/March/07/Link/Main1.htm
http://www.saamana.com/2008/March/07/Link/Main2.htm

Jaymaharashtra
Friday, March 07, 2008 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु यादव यांच्या बद्दल अजिबात आदराची भावना नसल्याचे कारण हेच.
http://www.saamana.com/2008/March/07/Link/Main4.htm
खोटारडे पणाचा कळस म्हणजे लालुप्रसाद यादव असे म्हंट्ल्यास अनुचित ठरु नये.
१५ वर्षे बिहारवर राज्य करुन भ्रष्टाचाराने व जातियवादाने बिहारला पोखरण्यात या माणसाने आपल्या सत्तेचा अनैतिक वापर केला. आणि आता साळसुदपणे नितिश कुमारांवर आरोप करतोय. लालु सारख्या व्यक्ती या १०० कोटीच्या देशाचे नेतृत्व करण्याच्या गमजा मारतात व पंतप्रधान होण्याची स्वप्ने बघतात तेंव्हा खरच त्यांची किव तर येतेच पण आपण स्वत भारतीय आहोत व किती हतबल आहोत याचीच लाज जास्त वाटते.

Chinya1985
Sunday, March 09, 2008 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी इंडीअन एक्स्प्रेसला लिहिलेला लेख्-


Nitish kumar:Whatever is happening in Maharashtra is very dangerous for the country. It’s not only a question of Bihar or Biharis. Things are drifting ahead and if they are not checked urgently, then it could be very detrimental for the country. That’s why I am urging the Union Government and the Prime Minister to intervene without any delay. For, it is the responsibility of the Union Government to protect the interests of the country.

Political leaders are shooting their mouths off in a very irresponsible manner and common citizens are bearing the brunt. This should stop immediately. The Prime Minister should take the lead and convene a meeting of leaders from Bihar and Maharashtra to find a solution. The “hate campaign” against Hindi-speaking people is spreading each day. It has now touched the icons (even some film stars have come out to support the intolerance). The direction this is taking or the one that’s being given to this issue is certainly not in the national interest.

It is sad that the Centre so far hasn’t taken the matter seriously. If the Centre does not intervene, it will send a wrong signal. Several questions will be raised. It may be construed that the Centre has given consent towards vitiating the atmosphere in Maharashtra. This is very dangerous.

So far as migration of people from Bihar and north India to Mumbai and other parts of Maharashtra is concerned, it should be clear that there is nothing illegal about it. India is one country. It is the Constitutional right of its every citizen to work and settle anywhere in this country.

Further, Biharis have contributed immensely to the economic growth of Mumbai and Maharashtra. Without labour from Bihar and other north Indian states, would it have been possible to undertake the huge construction work in Mumbai and other parts of the country? Haven’t masons and labourers from Bihar contributed in building the skyscrapers that Mumbai today boasts of? You welcome migrants when their labour and skill are needed. And once economic growth is achieved, you turn them into hate figures. Is this fair?

I accept that the backwardness of Bihar and the eastern region is a key factor that leads people to migrate to other parts of the country in search of employment. But that’s not the whole truth. There are social factors too. However, economic growth of Bihar in particular and the eastern region in general is the need of the hour to end regional imbalances.

For a long time, Bihar has been asking for a special economic package from the Centre. The state has always suffered from a development deficit due to lopsided economic policies of the Centre.

Bihar and the eastern region need special attention and care to catch up with the rest of the country. It is very essential for the country too. India cannot hope to become developed, peaceful and prosperous if the eastern region lags behind.

Ever since my government came to power in the state, we have been pressing for the economic package. In 2004, both the President and the Union Finance Minister, in their speeches during the Budget session, talked about it. But sadly, even after five years it has not come.

The economic package will spur a host of activity in the state. People will have plenty of job opportunities in their home state. Then the compulsion to migrate to other states will end. Already, my government has undertaken construction work on a huge scale and the results are positive. Migration figures from Bihar have decreased to great extent. Some time back, I was in Punjab and people there confirmed that the number of people coming from Bihar has decreased to a great extent. When my Deputy Chief Minister Sushil Kumar Modi was in Gujarat last year, industrialists urged him to make an appeal to Biharis to come to their state.

The motto of my government is very clear. People should not be compelled to leave the state to earn just two square meals for themselves and their families. If they want to go out for their own betterment, they are welcome to do so and they should be welcomed wherever they go. My government is committed to achieving such a situation. We are working hard to improve the situation, it has improved a lot but a lot remains to be done. Support from all quarters, particularly the Centre is needed. Bihar deserves a special economic package. The public and the private sector, too, should come forward and invest in the state. It will benefit them. Bihar has tremendous potential. It should be harnessed if the country wants to become developed. Moreover, development of Bihar and the eastern region is imperative for peace and prosperity in the country.

The immediate danger for peace and prosperity in India, however, is the situation in Mumbai and Maharashtra. I urge, repeat, urge the Centre to realize the danger it poses for the country and intervene towards an amicable solution.



Shravan
Sunday, March 09, 2008 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक बातमी:

ठाण्यात उत्तर भारतीय रस्त्यावर आले आणी त्यांनी लालू प्रसाद, अमर सिंग, आबू आझमी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 'महाराष्ट्रातील वाद म्हणजे आमच्या घरातील वाद असून आम्ही तो घरातच मिटवू. इकडे नाक खुपसू नका' असा सल्ला त्यांनी या नेत्यांना दिला. लालूच्या पुतळ्याचे दहन ही केले.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators