|
कॉमन्वेल्थ चषक जिन्कून आलेल्या चमूतील प्रत्येक खेळाडूला ५८ लाखाचा चेक देण्यात आला. माझ्या मनात खालील प्रश्न भेडसावत आहेत -१) माझ्यातुमच्या सारख्या प्रामाणिक करदात्यांच्या घामातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा अशा प्रकारे उधळ पट्टी करण्याचा अधिकार याना आहे का? २) या चमूतील अधिकांश खेळाडूंना या पैशांची गरज आहे का?हे अस्थानी दान नही का?जाहिराती आणि अन्य तत्सम मार्गाने यातील अनेक खेळाडू यापेक्षा किती तरी पट कमावत आहेत व इतर नवे ख्ळाडू या यशा मुळे मिळालेल्या glamour मुळे कमावतीलच? हे यश vis a vis अन्य खेळात सार्वजनिक क्षेत्रात उतम यश प्राप्त करणार्या शास्त्रज्ञांचे,समाजसेवकांचे,डॉक्टरांचे यश यांची तुलना केल्यास दिली गेलेली रक्कम व इतरांस दिली गेलेली रक्कम यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ३)अशा उधळपट्टीचा इतर क्षेत्रातील स्वत्:स वाहून घेतलेल्या लोकांवर,त्यांच्या मनोबलावर काय परिणाम होईल?(त्यांनी अशा प्रकारच्या प्रलोभनांचा स्वत्:वर परिणाम होवू दिला तर ते निष्ठावान नाहीत असा निष्कर्ष कृपया काढू नका!!) ४)देशाचे नाव याहून ही उज्वल केलेल्या महानुभावांना तत्सम रक्कम दिली जाते का? ५८ लाख प्रति खेळाडू देण्यासाठी कुठल्या मापदन्डाचा वापर केल गेला?इतर कुठल्याही पुरस्काराची(उदा.पद्मश्री,अर्जुन पुरस्कार) रक्कम सुनिश्चित असते.पुढे अशा प्रत्येक खेळातील तत्सम यशासाठी ५८ लाख प्रती खेळाडू देणार देणार का? हे वरील प्रश्न मला तरी भेडसवत आहेत.तुम्हास काय वाटते?
|
टीप मी सत्कार अथवा recognition च्या विरुद्ध नाही.तसेच योग्य बक्षिस ज्याने त्यांचे मनोबळ वाढेल अशा कृती विरुद्ध नाही.
|
Akhi
| |
| Friday, March 07, 2008 - 10:44 am: |
| 
|
हेच पैसे olmypics सोई पुरवण्यासाठी खर्च करा ना........
|
काही अर्थी हे चुकीचे भासते, परंतू बीसीसीआई ही सर्वात श्रीमंत संस्था आहे, आणि तिची श्रीमंती दिवसेन्, दिवस वाढेल कारण चनेल आणि आय.सी.ल. मार्फ़त ही संस्था खुप पैसे कमवत आहे. आणि त्या मुळे खेलाडूना motivate आणि encourage करण्या साठी हा सर्व खर्च असावा असे मला वाटते. या संस्थेने जर का थोडी फार समाज कार्याची जबाबदारी उचलली तर बरे होईल! किंवा गरीब महिला क्रिकेट आणि राज्य, आणि जिल्हा स्तरीय स्पर्धा यांना प्रोत्साहन दिले तरी उत्त्मच या मुळे खेळाचा उद्धार होईल. खेळा चा माध्यमातुन एक नविन आर्थिक शेत्र जे छोट्या खेळाडुना ही प्रसिधी आणि पैसा देइल जो त्यांचा रोजगार असू शकतो.
|
Asami
| |
| Friday, March 07, 2008 - 1:26 pm: |
| 
|
कॉमन्वेल्थ चषक जिन्कून आलेल्या चमूतील प्रत्येक खेळाडूला ५८ लाखाचा चेक देण्यात आला. >>माझ्या माहितीप्रमआणे हे विधान अपूर्ण असल्यामूळे त्या अनुषंगाने आलेले प्रश्नही अपूर्ण अहेत. 58 laakh के BCCI ने दिले आहेत. BCCI हि एक स्वायत्त संस्था आहे , सरकारी नाही. त्यामूळे direct करदात्याच्या कमाईतून BCCI कडे पैसे जात नाहित. कोणाला पैशाची किती गरज आहे हा philosophical प्रश्न होतो. म्हणायला " खाली हात आये है खाली हाथ जाओगे " म्हणणारेही आहेत. एखाद्या खेळाच्या governance साठी असलेल्या संस्थेने त्या खेळामधे मिळवलेल्या प्रावीण्याबद्दल खिरापत वाटली तर त्यात फ़ारसे चूकीचे काही नसावे. इतर खेळांना मदत करायला हवी का ? हो जरूर हवी पण त्या मुद्द्याचा इथे संबंध नाही. जर आपण रोजच्या बातम्या follow करत असाल तर BCCI दिलेले पैसे BCCI च्या खजिन्यामधील एखाद टक्का आहेत हे लक्षात येइल. तेंव्हा cricketers ना पैसे दिल्याने इतर गोष्टिंसाठी निधी राहणार नाही असे मानण्याची गरज नाही. अमक्या field मधल्या व्यक्तींना इतके का नि तमूक field मधील व्यक्तींना का नाही ह्या विधानांना फ़ारसा अर्थ नाही. मुख्य गोष्ट म्हणजे इथे तुलना करण्याजोगे काहीच समान मापदंड नाहीत. "Reliance चा अंबानी धारावीमधल्या एखाद्या leather च्या उद्योग चालवणार्यापेक्षा अधिक पैसे कमावतो हे योग्य आहे का ?" अशा स्वरूपाचे absurd argument आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही कि BCCI कडे येणारा अमाप पैसा हा Cricket च्या popularity नि marketting मूळे आहे. ( ते चूक कि बरोबर हा भाग अलहिदा ) त्यामूळे त्यातून येणारा पैसा cricketers ना जाण्यात काहीच वावगे नाही. भारतीय cricket संघाने Down UndeR मिळवलेल्या यशाची उदाहरणे हाताच्या बोटावर मोजण्याजोगी आहेत. तशात All these achievements have come against one of the suprier team in cricket history त्यामूळे त्या field शी संबंधित व्यक्तींनी त्याचा उदो उदो केला तर त्यात अयोग्य काहीच नाही. आणी हा उदो उदो करण्याचे मार्ग वेगळे असणार हे साहजिक आहे. BCCI सारख्या फ़क्त पैशाची भाषा समजणार्या संस्थेने तो पैसे देऊन दाखवणे हे स्वाभाविक आहे. समारोपाचा मुद्दा म्हणून , जर हेच पैसे cricket बद्दल इतर मार्गाने वापरले जावेत असा मुद्दा मांडत असाल तर तो यथोचित होइल. तळटिप : मी इथे कुठेही इतर खेळांना किंवा इतर क्षेत्रामधे माननिय कामगिरी करणार्या व्यक्तींना अशा स्वरुपाचे मानमरातब मिळू नयेत असे सुचवत नाहीये. तसेच BCCI ने सामाजिक बांधिलकी दाखवू नये असेही सुचवत नाहीये. फ़क्त वरील post मधील " ह्यांना का आणी त्यांना का नाही ? ह्यांना एव्हढेच का ? हा सूर खटकला म्हणून हा प्रपंच.
|
Uday123
| |
| Friday, March 07, 2008 - 4:32 pm: |
| 
|
जर हेच पैसे cricket बद्दल इतर मर्गाने वापरले जावेत असा मुद्दा मांडत असाल तर तो यथोचित होइल. ----होय हा विचार जास्त बरोबर वाटतो, जर हा BCCI चा पैसा असेल तर अपण फ़ार फ़ार तर अपेक्षा बाळगु शकतो की त्यांनी तो क्रिकेट च्या सर्वांगीण विकासाकरता इतरत्र वापरावा. BCCI ही एक संस्था आहे, आणी तिला प्रसिद्धी/ पैसा हा खेळाडुंच्या कष्टातून मिळतो, त्यातील एक छोटा हिस्सा (बोनस) या २० कर्मचार्यांना मिळतो आहे असे समजावे.
|
क्रिकेट प्रेमी (पक्षी वेडा) असुनही मी असे १० करोड खर्च करन्याचा विरोधात आहे. दरवेळी कुठेही जिंकुन आले की घ्या ५० लाख, घ्या एक फ्लट. ह्यावेळी सरकारने जरी काही दिले नसले तरी बरेचदा सरकार पण देते. प्रो. लिग मध्ये तुम्हाला जेवढा पैसा मिळतो तेवढा परफॉरमन्स तुमच्या कडुन अपेक्षीत असतो. BCCI एका match खेळनाल्या ( वा सिलेक्ट झाल्यावर पण) जेवढा पैसा देते तेवढा भरपुर आहे. ( Match fees ) दरवेळी दुसर्या देशातील प्रो. खेळाडुंचे उदा पैशा बाब्तीत दिले जाते. मला नाही वाटत ईथे वल्ड सिरीज जिंकल्यावर प्रत्येक खेळाडुला घर वा काही मिलीयन दिले जातात मग क्रिकेट साठी तसे का नाही? IPL, ICL स्थापण करताना कांउटी व अमेरिकेतील NBA, NFL चे उदा दिले पण एकदा पैसे देउ केले की झाले तुमच्या कडुन खेळ करने अपेक्षीत व जिंकनेही अपेक्षीत. नाहीतर A list, B list का केली? पैसा साठवुन ठेवायचा आणि असे कधी तरी match जिंकुन आले की वाटायचा त्या पेक्षा अटच अशी ठेवायची बाहेर खेळा तुम्हाला रोजंदारी दिली जानार नाही पण जिंकुन आलात की १ करोड दिले जातील. आपल्याकडे किती क्रिकेट ग्राउंडस चांगले आहेत? त्यावर घाला की पैसे. आणि हे सर्व ग्रांउड खरे तर सरकारच्या मालकीचे आहेत. तिथे ICL ला Match खेळू द्यायचे नाही पण चांगले ग्राऊंडस करन्यासाठी जी जमिन लागते ती सरकार कडुन फुकट घ्यायची. हा केवळ विरोधाभास आहे. ईथे तुलना मी ही करत नाही पण ह्या पैसे देन्याला जस्टीफाय करता येत नाही.
|
Asami
| |
| Friday, March 07, 2008 - 9:19 pm: |
| 
|
मला नाही वाटत ईथे वल्ड सिरीज जिंकल्यावर प्रत्येक खेळाडुला घर वा काही मिलीयन दिले जातात मग क्रिकेट साठी तसे का नाही?>> Hmmm, you need to check what players earned after Red Sox victory in 2004 and Pats in 2004 etc. You are in for surprise पैसा साठवुन ठेवायचा आणि असे कधी तरी match जिंकुन आले की वाटायचा त्या पेक्षा अटच अशी ठेवायची बाहेर खेळा तुम्हाला रोजंदारी दिली जानार नाही पण जिंकुन आलात की १ करोड दिले जातील. >> हे थोडेसे इथे शिक्श्कांना GRE च्या score प्रमाणे marks द्या असे सुचवले होते त्यातला प्रकार झाला. काहि गोष्टि एव्हढ्या quantitatively मोजता येत नाहित. Hard fought lost series down under can not be deemed less than 5-0 series victory over BL. End of argument !!! मी वर म्हटले त्याप्रमाणे cricket च्या सोयीसाठी खर्च करावा ह्यापलिकडे इथे arguments होउ शकत नाही. आणी त्यासाठी BCCI कडे बक्कळ पैसा आहे. अगदि जगभरातील सर्व cricket खेळणार्या देशांमधे develope करून बाकी उरेल एव्हढा. नाही का ?
|
Zakki
| |
| Friday, March 07, 2008 - 10:48 pm: |
| 
|
क्रिकेटवर एव्हढा पैसा खर्च केल्याचे दु:ख वाटायची गरज नाही. हे पैसे लोकांनीच दिले आहेत. लोकांना जर क्रिकेट, सिनेनट,नट्या यांना पैसे द्यावेसे वाटत असतील पण गरीबांना मदत, भारतीय खेळांना मदत या साठी पैसे द्यायचे नसतील तर काय करणार?
|
Akhi
| |
| Saturday, March 08, 2008 - 8:38 am: |
| 
|
अगदी बरोबर केदार, आणी olympics ची गोष्ट वाचल्यावरची ती प्रतिक्षीप्त क्रिया होती.
|
Mukund
| |
| Saturday, March 08, 2008 - 9:56 am: |
| 
|
असामी म्हणतोय त्यात तथ्य आहे. BCCIही एक खाजगी संस्था आहे. व अगदी नवकोट नारायणासारखी श्रिमंत आहे. त्यांची श्रिमंती ते कसेही उपभोगु शकतात.... खेळाडुंना ६५ लाख बोनस देणे हा अश्या उपभोगाचाच एक प्रकार आहे. रवि उपाध्ये व केदार... विचार हा केला पाहीजे की या BCCIला एवढे वैभव कोणी प्राप्त करुन दिले?... उत्तर साधे आहे. तुमच्या आमच्यापैकी असंख्य क्रिकेट चाहत्यांनी.... आपल्यासारख्या कोट्यावधी क्रिकेटप्रेमींची संख्या बघुन स्पॉन्सर कंपनीजच्या तोंडाला तोंडाला पाणी सुटते..... आणी एवढा मोठा दर्शक वर्ग आहे म्हटल्यावर प्रसार माध्यमेही क्रिकेटच्याच मागे लागुन त्याला अजुन प्रसिद्धी देतात...व बाकीच्या खेळांना कोणी कुत्र सुद्धा विचारत नाही... भारतात त्यामुळे बाकीचे खेळ हा एक साइड शो आहे व ही एक व्हिशिअस सायकल आहे. आणी दुसरी गोष्ट म्हणजे BCCIया संस्थेने क्रिकेट या खेळाची लोकप्रियता लक्षात घेउन फार हुशारीने त्याचे मार्केटींग केले आहे. ही संस्था अतिशय कुशल व्यापार्यासारखी त्यांच्या संचालकांनी गेली १५ वर्षे चालवली गेली आहे. बाकीच्या खेळाच्या बॉडीजना असे त्यांच्या खेळाचे बाजारीकरण करता आले नाही हे त्या खेळांचे दुर्दैव आहे. ऑल इंग्लंड चॅंपिअन प्रकाश पाडुकोने च्या लोकप्रियतेचा फायदा त्यावेळेला बॅडमिंटन फ़ेडरेशनला उठवता अला नाही... हॉकीमधेही तेच झाले... हॉकी फ़ेडरेशनमधे जे काही चालले आहे ते पाहुन त्यांच्या अनप्रोफ़ेशनलपणाची किव करावीशी वाटते. अगदी ध्यानचंद नाही.... तरी गेल्या ३०-३५ वर्षात अजितपालसिंग,गोविंदा,गणेश,व्हिक्टर फिलिप्स,अशोककुमार(ध्यानचंदचा सुपुत्र!)महमद शाहिद,सुरिंदर सिंग सोढी पासुन प्रगट सिंग व सध्याच्या धनराज पिल्ले पर्यंत अनेक उत्क्रुष्ट व जागतीक दर्जाचे हॉकीपटु भारताकडे होते.. पण केवळ अनप्रोफ़ेशनल हॉकी फ़ेडरेशनमुळे हॉकीत आपण आज सांटीआगो, चिले मधे ऑलिंपिक्स क्वालीफ़ायींग राउंड मधे खेळत आहोत!..१९७० मधे जेव्हा सगळे जग सिंथेटीक ऍस्ट्रोटर्फ़ कडे वळत असताना...... पहीली १० वर्षे....... युरोपिअन देश कसे भारताच्या विरुद्ध कट-कारस्थान करत आहेत....... हे रडगाणे गाण्यातच आपल्या हॉकी फ़ेडरेशनने वाया घालवली. नवीन सरफ़ेसवर पटकन ऍडॅप्ट होउन आपण या खेळात जी गेली ५० वर्षे वर्चस्व गाजवुन आहोत ते वर्चस्व सोडायचे नाही... हा विचार न केल्यामुळे... बरीच मोलाची वर्षे आपल्या हातची निघुन गेली.... व दरम्यान ऑस्ट्रेलिया,हॉलंड व जर्मनी हे देश.... हॉकीमधे आपल्यापेक्षा लिप्स ऍंड बाऊंड्सने पुढे निघुन गेले... व आजही आपण कॅच अप चाच गेम खेळत आहोत!... असे बाकी जगाच्या एवढ्या मागे असल्यामुळे... सामान्य प्रेक्षकही हॉकीकडे आज त्या प्रेमाने बघत नाही ज्या प्रेमाने १९२८ ते १९६८ पर्यंत तो बघत होता.. म्हणुन आज हॉकीला दर्शक कमी... म्हणुन स्पॉन्सर कमी.. म्हणुन हॉकीपटुंना पैसा कमी... जे कारण हॉकीमधे तेच कारण बाकीच्या खेळात... ऍथलेटिक्स,कुस्ती,जलतरण,बास्केटबॉल वगैरे.... (प्रेक्षक नसण्याचे... व म्हणुन त्या खेळात पैसा नसण्याचे!... म्हणुन त्या खेळाकडे कोणी चंगले ऍथलिट आकर्षीत न होण्याचे...) म्हणुन मला तरी अस वाटत की जोपर्यंत आपल्या देशातील लोक... क्रिकेट या एकाच खेळाला एवढे महत्व देत राहतील...... तोपर्यंत शरद पवार,रत्नाकर शेट्टी व ललित मोदी सारखे कुशल व्यापारी... स्वत्:कडे १०० कोटी ठेउन असा १० कोटीचा बोनस वाटतच राहतील... बघा पटतय का.. मि. रवि उपाध्ये...
|
तर्कसन्गत म्हणून मान्य पण तरिही कुठेतरी खटकते आहे-
|
Asami
| |
| Saturday, March 08, 2008 - 1:31 pm: |
| 
|
मुकुंद त्यात अजुनही एक मुद्दा आहे. cricket हा लहानपणापासून आपल्यापैकी बहुतेक जण खेळत आले आहेत. इतर खेळांच्या मानाने , विशेषतः असे जे स्पर्धात्मक पातळीवर जागतिक स्तरावर खेळले जातात , त्यात cricket जास्त जण खेळतात तेंव्हा त्याच्याशी relate करणे सोपे जाते. अर्थात त्यामूळे त्याची popularity वाढते.
|
Uday123
| |
| Saturday, March 08, 2008 - 4:46 pm: |
| 
|
तर्कसन्गत म्हणून मान्य पण तरिही कुठेतरी खटकते आहे ---- तुमचे खटकणं सहाजिक तसेच योग्य आहे... एक आनंदाची गोष्ट अशी की हा मार्च महिना आहे, खेळाडुंचा आयकराचा भार तेवढाच हलका होईल, प्रामाणिक पणे तो ते भरतील, सरकारी तिजोरी भरेल, आणी मग तो पैसा सार्वजनीक कामासाठी वापरात येईल, मग त्यावर आपलाच "हक्क" आहे. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाला हरवल्याचा आनंद घेऊयात.
|
Zakki
| |
| Sunday, March 09, 2008 - 12:12 pm: |
| 
|
प्रामाणिक पणे तो ते भरतील, सरकारी तिजोरी भरेल, आणी मग तो पैसा सार्वजनीक कामासाठी वापरात येईल, हे लिखाण उपरोधात्मक आहे की काय अशी शंका का बरे यावी मला? असा प्रामाणिकपणा जर सर्वांनीच दाखवला तर भारत या एप्रिलमधेच अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रांस, इटाली, जपान या सर्व देशांपेक्षा कमालीच्या बाहेर श्रीमंत होऊन बसेल. नि ऑस्ट्रेलिया, इ. सर्व देशांतील क्रिकेत खेळाडूंना विकत घेऊन, क्रिकेटचे पूर्णपणे outsourcing करून, रोमन लोक जसे पूर्वी ख्रिश्चनांना सिंहापुढे टाकून त्यांची मजा बघत तशी इतरांची गंमत बघेल. मग काय, नुसतेच अपशब्द नाहीत तर ऑस्ट्रेलियन फूटबॉल प्रमाणे सामने होतील! खेळाडूंचे माहित नाही, पण अमेरिकेत जर अशी प्रामाणिक माणसे असती तर आज अमेरिकेला ९ ट्रिलियनचे कर्ज आहे त्या ऐवजी ९ ट्रिलियन जास्त झाले असते. मग काय, चंगळवाद असा वाढला असता, की देवांनाहि हेवा वाटावा.
|
मला जे व्यक्त करता आले नाही ते काही अंशी हे आहे http://timesofindia.indiatimes.com/Dying_a_slow_death/articleshow/2867148.cms
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|