|
Mahaguru
| |
| Saturday, January 19, 2008 - 11:33 am: |
| 
|
फेडरर जिंकला. सानियाने व्हिनसचा एक पॉईंट घेतला. ५-३
|
Mahaguru
| |
| Saturday, January 19, 2008 - 11:55 am: |
| 
|
श्श्या, पहिला सेट घेतला व्हिनस ने.
|
Zakki
| |
| Saturday, January 19, 2008 - 1:02 pm: |
| 
|
वा, वा. भारत विजयी. आनंद झाला. आता सिडनी विसरा, बकनूर विसरा नि असेच खेळत रहा. आता सर्व खेळाडूंना भारतात पेट्रोल फुकट! शिवाय ते जाळायला एकेक मोठ्ठी गाडी पण. शिवाय एक बंगला. पुन: ऑस्ट्र्लेया गमतीत जरी म्हणाले की आम्ही तुम्हाला मुद्दाम जिंकू दिले, तरी भडकू नका. शेवटी वर लिहीलेले सगळे मिळाले की त्या अपमानाचे काय मोठेसे! मला सुद्धा कुणि एव्हढे सगळे दिले तर मी पण माझे अपमान विसरून जाईन. नाहीतरी मायबोलीवर माझे कुणि अपमान करतच नाही, कारण ते मला लागत नाहीत. पण इतरत्र काय कमी झाले नि होतात का!
|
पर्थ. या नावातच खुप आदरयुक्त भिती आहे असे मला वाटत. ह्या ग्रांउड वर जान्या आधी सिडने मधील महाभारतामुळे भारतीय अजगर डिवचला गेला होता. आपल्या क्रिकेट टिमला कोणीतरी डिवचल्या शिवाय वा अतिशय मानहाणीपुर्ण हारी शिवाय बहुतेक निट "परफॉर्म" करता येत नाही मग तो वल्डकप असो वा साध्या बांग्लादेशाबरोबरची मॅच. पर्थ ला जायचा आधी जगातल्या महान खेळाडुनी निकाल ऑस्ट्रेलियाच्या पारड्यत टाकला होता. सर्व (फक्त भारतीय सोडुन) पर्थ ला घसरगुंडी उडनार ह्या बद्दल खात्री बाळगुन होते. काही महाशय तर निकाल ३ दिवसात लागेल हे भाकीत वर्तवु लागले. ह्या पार्श्वभुमीवर अनिल ने टॉस जिंकला तिथेच अर्धी मॅच जिंकलो असे मला वाटले. कारण रिकी नेहमी टॉस जिंकतो. टॉस हारल्यावर एक क्षणासाठी त्याचा चेहर्यावर मी काळजी पाहीली होती. आपली सुरुवात तशी बरी झाली. १० रन वर एकही आऊट नाही म्हणजे बरीच म्हनायची असे आम्हा मित्रांना वाटले. रोज रात्री आम्ही तिघे जन निदान ३ सिऐस्टी पर्यंत मॅच पाहायचो. शेवटचा एक तास मात्र पाहायचो नाही. काल मात्र पुर्ण पाहीली. या मॅच मध्ये मला काही क्षण अतिशय महत्वाचे वाटले. बेरीज वजाबाकी करायची तरी या मॅच मुळे ईशांत सारखा चांगला बॉलर मिळाला. रिकी ला दोनदा घेने म्हणजे जोक नाही तेही दुसर्या ईंनीग मधील त्याचा सुंदर स्पेल पाहताना डोळ्याचे पारणे फिटले. एकदा तर त्याने सलग दोन वेळा चकवले. बहुतेक दोन वेळा पायचित होता होता तो राहीला. रिची बेनॉ म्हणत होता की जर हा स्पेल रिकी ने खेळुन काढला तर तो वाचनार पण बहुतेक लक भारताचा बाजुने होते. ऐका अतिशय सुंदर फेकीमुळे रिकी बावचाळला व काही कळायचा आत स्लिप मध्ये कॅच गेला. माझ्यामते दोन्ही वेळेस त्याला बॉल कळाला नाही. क्लासीक. अतिसुंदर. विरु ने पहील्या खेळीत फक्त २९ रन काढले पण ते २९ रन ज्या पध्दतीने काढले ती पध्दत फार महत्वाची होती. रुथलेस. पहील्या तिन ओव्हर मध्ये तो ७ वेळा आउट होता होता राहीला पण दॅट ईज ओके. न खेळनार्या युवी पेक्षा फटकवनारा विरु असने पर्थ ला जरुरी होते. काल जेव्हा गिलख्रीस्ट आणि क्लार्क मॅच काढनार वाटत होते तेव्हा विरु चा तो जबरी बॉल पडला. गिलख्रीस्टला वाटले तो लेग स्टम्प सोडुन जाणार, खरतर त्याला तो बॉलही कळला नाही त्याची बॅट फिरल्या तो बॉल आत आला नी त्याचा लेग स्टम्प घेउन गेला. ईथे मात्र मॅच हातात आल्यासारखी वाटली. पण तो क्षण अजुन दुर होता. विरुने लगेच दुसरी विकेट पण घेतली. फारुक इंजीनिअर च्या मते त्याला पार्ट टाईम स्पिनार म्हणने चुकीचे आहे. हि ईज अ गुड बॉलर, दे शुड यूटीलाईज हिम ईन सच सिच्युऐशन्स. स्टुअर्ट क्लार्क व जॉन्सन ची जोडी चांगलीच जमली. त्यांचा प्रत्येच्क धावेला चॅपेल गुरुजी खुश होऊन अजुन किती धावा राहील्या. ओ मध्ये एका वेळी तर त्याने आपल्या त्यांचा विरुध्द च्या टाय टेस्टची आठवन करुन दिली व तसेच होईल का असा अंदाजही वर्तवला. दॅटस द वे,दॅटस द वे करुन सारखा आरडा ओरडा करत असताना मार्क टेलर मात्र म्हणाला लेटस नॉट गेट कॅरीड अवे, दे आर गेटींग अ न्यु बॉल. ते ७५ रण आपण बर्याच अंशी थांबवु शकलो असतो. कुंबळे थकलेला दिसत असताना देखील उगीच बॉलींग् करत होता. त्या शेवटच्या त्याचा ४ ओव्हर्स भयंकर महाग पडल्या. ईरफान पठाण जे कंट्रोल स्विंग वर दाखवत होता ते खरच जबरी होते. ऑस्ट्रेलिया दोनदा पर्थ वर आउट करने फार कठीन काम. त्यात त्याने दोन्ही खेळींमध्ये भाग घेतला. दरवेळी ओपनर्स ला आउट करुन धक्के दिले. काल जेव्हा तो आला तेव्हाच कळले की जॉन्सन व क्लार्क आता काही करु शकनार नाही. त्याने दोनतिनदा जॉनस्नला चकविले पण एका बॉलमध्ये क्लार्कला घेउन विजयाचा मार्ग सुकर केला. मॅन ऑफ द मॅच. ऑस्टेलियाचा विजयरथ आपण परत एकदा आडवला. ही हार पचवायला त्यांनाही अवघड जानार. आयुश्यभर आठवणीत राहानार्या टेस्ट मध्ये या मॅच चा नंबर वरचा असेन.
|
हटकेश्वर हटकेश्वर!!! (चार शब्दांची मर्यादा)
|
Nandya
| |
| Thursday, January 24, 2008 - 4:14 am: |
| 
|
Which is more criminal in your opinion...giving a batsman out when he was not, or, not giving a batsman out when he was.
|
तेंडुलकरचे आणखी ऐक शतक. ही शतकी खेळी त्याचा गेल्या शतका पेक्षा पुर्ण वेगळी. महत्वाचे म्हणजे हा ५, सात वर्ष जुना सचिन वाटतो. १०० जवळ आले की लवकर पुर्ण करनारा. खासकरुन ८० नंतरच्या त्याचा धावा फारच वेग्ळ्या होत्या. पुढे येउन ऐटकींग खेळनार्या. दोन सिक्स ते पण ८० नंतर. जबरी.
|
ज्याप्रमाणे काही आदरणीय निधर्मी विचारवंत "देवाला रिटायर करा" अशी मोहीम चालवतात, तद्वत्, जेमतेम ३-४ महिन्यांपूर्वी या बा.फ.वरील काही क्रिकेटविशारद "सचिनला कायमचे रिटायर करा" अशी मोहीम चालवत होते!
|
Nandya
| |
| Thursday, January 24, 2008 - 2:27 pm: |
| 
|
हे जुना-सचिन-नवा-सचिनच वाचून मजा वाटते. जुना सचिन जुन्यासारखाच राहिला असता तर त्याचा सेहवाग नसता का झाला? Evolution, re-calibration, self assessment, focus, resolve वैगेरे वैगेरे वैगेरे जाडजूड गोष्टींमुळे सचिन जुना असो किंवा नवा, fact is he is still the best batsman in the nation, and a player who has remained above selection right through his career . १९ वर्ष खेळतोय....१९९७ मधे काय अन २००७ मधे काय, अजुनही तो गेला की एकदम ५ विकेट गेल्यासारख्या वाटतात ना? जुन्या-नव्यामधे अजुनतरी हे common हायेच ना... जावुनद्या... चंची सोडा
|
Upas
| |
| Thursday, January 24, 2008 - 3:37 pm: |
| 
|
खरय नंद्या Sachin is all time great! म्हणाच त्याला सर.. अगदी काल सुद्धा सचिन आहे ना मग होतील रन असा मनात विश्वास होताच.. ही विश्वासार्हता निर्माण करण्यातच त्याला खरं credit आहे! आणि तुझ्या वरच्या प्रश्नावर माझं मत असं की दोन्ही तितकच घातक आहे, बाद नसताना बाद देणं आणि बाद असून बाद न देणं.. तरीही ह्या दोन्ही बाजूंची तीव्रता खेळाचे स्वरुप म्हणजे २० - २०. एकदिवसीय की कसोटी ह्यानुसार बदलेल इतकं नक्की.. शिवाय कोणत्या फलंदाजाला जीवदान मिळतय किंवा बाद ठरवलं जाताय त्याच्यावरही तीव्रता अवलंबून आहेच.. म्हणून काय जास्त वाईट विचारशील तर दोन्ही तितकच वाईट असं वाटतं..
|
नंद्या जुना ह्या साठी लिहीले की गेल्या ऐक वर्षापासुन तो शतकाच्या जवळ आला की हळु हळु खेळून आऊट होतो. पण या वेळेस एकदम २ छक्के, पुढे येउन एक फोर ते ही ८० नंतर म्हणून तसे लिहीले. ऐनीवे.
|
Zakki
| |
| Thursday, January 24, 2008 - 4:35 pm: |
| 
|
Evolution, re-calibration, self assessment, focus, resolve कदाचित् आपल्या देवांनी पण तसे केले असते तर मानले असते त्यांनी! तर आता देव रिटायर करा. ('आई रिटायर होते' नाटकातल्या सारखे.) मग आपण सचिनची भक्ती करू. त्याचे दर्शनहि होते, त्याला हात लावून पहाता येते, त्याच्या अंगाला वासहि येत असेल, शिवाय त्याला चावले तर चवहि कळेल. शिवाय त्याला हाक मारली, फोन केला तर तो ओ देईल, बोलेल. म्हणजे तो नक्कीच आहे हे सिद्ध होईल. गेला बाजार त्याला 'भारतरत्न' तरी देतील का? की ते आजकाल एम एफ हुसेन, अफझल यांच्या साठी असते?
|
अरे वा! मायबोली वरील जुगलबंदी इथे http://blogs.smh.com.au/sport/archives/2008/01/welcome_to_the_era_of_the_indi.html?page=5#comments देखिल.मायबोलीच लोण कुठे कुठे पोहोचलय?
|
IPL बद्दल कुणीतरी लिहा बघू...
|
Aus-Ind matches online baghnyasathi kahi packages available aahet ka? Thanks.
|
Mahaguru
| |
| Friday, February 01, 2008 - 2:30 am: |
| 
|
खालिल संकेत स्थळांवर क्रिकेट सामन्याचे प्रक्षेपण दाखवतात. क्रिकेटकेबल भेजाफ्राय इरानी चाय
|
Zakki
| |
| Sunday, February 03, 2008 - 12:10 pm: |
| 
|
खालील संकेतस्थळावर आय पी एल बद्दल काही माहीति मिळावी. मी स्वत: वाचली नाही, पण तुम्हाला हवे असल्यास व मी संदर्भ बरोबर दिला असेल तर, वाचा. <http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/2429054.cms>
|
Suyog_11
| |
| Monday, February 18, 2008 - 5:55 pm: |
| 
|
मित्रांनो, मि आणि माझ्या काही मित्रांनी मिळुन सचिन तेंडुलकरवर एक वेबसाइट सुरु केली आहे. सचिनची बायोग्राफी, ब्लॉग, त्याचे रेकॉर्डस वगैरे भरपुर माहीती आहे. शिवाय आपल्याला सचिन बद्दल ताज्या बातम्याही तिथे वाचायला मिळतील. माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा जरुर भेट द्यावी. आणि हो आपले मत जरुर कळवा. http://www.littlemastersachin.com
|
उद्या २० फ़ेब्रुवारीला एका भव्य सोहळ्यामधे IPL च्या आठ टीमचे मालक खेळाडूसाठी बोली लावतील. उद्या बहुतेक चॅनलवर याचे प्रक्षेपण होईल.. माझा अंदाज हरभजन आणि सायमंडस एकाच टीममधे, जाण्यासाठी जबरदस्त बोली लागेल. शोएब, धोनी, ब्रेट ली यावर सर्वात जास्त बोली लागेल. इशांत शर्मा पण अध्या फ़ॉर्मात आहे..
|
Zakki
| |
| Tuesday, February 19, 2008 - 11:37 am: |
| 
|
भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजय. श्रीलंका ६ बाद २३८, भारत ८ बाद २३९. युवराज सिंग ७६, धोणी नाबाद ५०, पठाण ३१. जय भारत!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|