Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 01, 2008

Hitguj » Views and Comments » General » बिजींग ऑलिंपिक्स २००८ » Archive through March 01, 2008 « Previous Next »

Raviupadhye
Tuesday, February 26, 2008 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द जी एक आवर्जून आग्रह,याच शैलीत "कहाण्या आलिम्पिकच्या "अथवा तत्सम नावाने पुस्तक का नाही लिहीत? "हे स्फ़ुरण सर्वाना सतत दिशादायी------" ठरेल यात वाद नाही

Raviupadhye
Tuesday, February 26, 2008 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

What a fantastic countdown this-thro a tribute to all those dedicated souls?
By the way how many days to go ,Mukund ji? Pardon my ignorance-:-)

Meghdhara
Tuesday, February 26, 2008 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hats off मुकुंद! तुमच्या ऑलंपिकवरच्या प्रेमाला, वेडाला आणि अभ्यासाला सलाम!
आता कुठे झेटो पेक पर्यंत पोचले. अगदी रडलेच आनंदाने. सगळ्या गोष्टी माझ्या आणि जमेल तितक्या मुलांना सांगणार. तुमच्यामुळे काही ठीणग्या मलाही पुढे नेता येतिल.

मनापासुन आभार.
पुस्तकाबद्दल रवि उपाध्येंशी सहमत.
आणि खरच पुस्तक लिहायचा विचार पक्का करुन आधी नाव आणि विषय रजिस्टर करा.(अशी प्रोसेस असेल म्हणुन सुचवत नाहीये पण एक चांगला विषय आणि आशय दुसर्‍या कोणी फुकट घालवायला नको म्हणून..)

मेघा


Divya
Tuesday, February 26, 2008 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, अहो मानकर्यांच्या लिस्टमधे माझ नाव कुठे लिहीता. माझे लिखाण बोटावर मोजण्याइतके तरी वाचतात का शंका आहे.

त्या निमीत्ताने तुमचे सगळे लिखाण वाचले. कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. मला स्वताला खेळांची आवड अजिबात नाही, कधीही आजपर्यन्त एकदाही ऑलंपीक्स बघीतले नाही. क्रिकेटची मॅच सुद्धा अगदी भारत पाकिस्तान असेल तर ती पण शेवटची दहा मिनिटे वैगरे बघीतली असेल.

वाचनाची मनापासुन आवड आणि छंद सुद्धा बैठेच painting, drawing . त्यामुळे खेळ आणि खेळणारे यांचे आणि माझे गणित कधीच जमले नाही. त्या पार्श्वभुमीवर तुमच्या लिखाणाने मलातरी एका वेगळ्याच विश्वाचे दर्शन घडवुन आणले.

स्पर्धकांचा खेळासाठी असलेला ध्यास, कष्ट, ऑलंपिक्स च त्यांच्या साठी असलेल महत्व... सगळ सगळ अद्भुत आणि चकित करणार. अस वेगळ आगळ काहीतरी वाचायला मिळतय यातच खुप काही आल. तुमच्या लिखाणाला मनापासुन सलाम.


Meghdhara
Tuesday, February 26, 2008 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन वाचतेच आहे.
आणि हो मुकुंद तुम्ही वर्तमानपत्रात या विषयी नियमीत लिखाण करण्याबद्दल विचार करा. की आधीच प्रसिद्ध झालेत तुमचे लेख?

मेघा


Meghdhara
Wednesday, February 27, 2008 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच सर्वोत्क्रुश्ठ बिबिचं बक्षीस तुम्हाला मिळालं पाहिजे.

मेघा


Arun
Wednesday, February 27, 2008 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंदा : आत्तापर्यंत बर्‍याच जणांनी लिहिलं आहे, त्या सगळ्यांना माझे अनुमोदन.

खूप छान माहिती देतो आहेस. वाचताना ते क्षण जसेच्या तसे नजरेसमोर उभे राहतात. सरळ आणि सोप्प्या भाषेत ती माहिती वाचताना खुप मजा येत आहे. ज्ञानात रोज नवी भर पडत आहे. तेंव्हा असाच लिहीत रहा. आम्ही वाचतो आहोत .......... :-)


Mukund
Friday, February 29, 2008 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवि उपाध्ये... बैजींग ऑलिंपिक्स सुरु होत आहे ८-८-८ ला! सोपा आहे हा दिवस लक्षात ठेवायला....:-)

मेघा,रवि.. पुस्तकाचा विचार कधीच केला नाही. आतापर्यंत आवडीने पुस्तके फक्त वाचली होती..:-) कोणाला या बाबत अधिक माहीती असेल तर जरुन इ मेल करुन कळवा..

दिव्या.. तुझा मनाचे गुंती गुंफ़ला शेला व तुझे अध्यात्मिक बीबीवरच्या बर्‍याच पोस्टींग वाचुनच मी तसे म्हटले होते... सगळ्यांनी वाचावे असेच तु लिहीतेस.

नंदिनी... अग आपल्या सभोवती.. रोजच्या जिवनात पण अशी धैर्‍याची व जिद्दीची माणसे असतात.. फक्त त्यांच्या कहाण्यांना ऑलिंपिक्स सारखा रंगमंच न मिळाल्यामुळे त्या सगळ्या जगाला समजत नाहीत एवढेच!

तर मंडळी... आतापर्यंत तुम्हाला मी धावण्याच्या व जलतरणामधल्या रेस ऑफ़ द सेंचुरी बद्दल सांगीतले आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे" गेम ऑफ़ द सेंचुरी" बद्दल!

क्रमंश्:


Mukund
Friday, February 29, 2008 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर चला जाउयात हा गेम बघायला १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक्सला...

मी आधी सांगीतल्याप्रमाणे म्युनिक ऑलिंपिक्स बर्‍याच गोष्टींसाठी गाजले.. त्यात ६ सप्टेंबरला ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्टीनी दहशतवाद्यांकडुन झालेले १३ ज्यु ऍथलिट्सचे अपहरण व त्यांचे त्यानंतर केले गेलेले हत्याकंड हे सगळ्या जगाच्या कायमचे लक्षात राहील... पण त्या ऑलिंपिक्सच्या खेळांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी लोकांच्या लक्षात राहील्या त्यात या १० सप्टेंबरच्या अमेरिका व रशिया यामधे सुवर्णपदकासाठी झालेल्या बास्केट्बॉल सामन्याचा समावेश करायलाच लागेल.. काय नव्हते या सामन्यात? नेहमीच्या खेळात असलेली चुरस होती, सामन्याच्या दरम्यान सी सॉ सारखे पारडे वर खाली होणे होते,शेवटच्या बझर पर्यंत निकाल न लागण्याचा सस्पेंस होता, देशप्रेम व जिद्द होती,झालच तर अमेरिका व रशिया यामधील त्या काळात सुरु असलेल्या "कोल्ड वॉर" चे सावटही या सामन्यावर होते. आणी अशा गोष्टींनी युक्त असुनही अजुन तोंडी लावायला म्हणुन या सामन्याच्या शेवटी झालेली प्रचंड मोठी कोंट्रोव्हर्सीही होती! तर अश्या गुणांनी पुरेपुर युक्त असलेला हा सामना अविस्मरणिय ठरला नसता तरच नवल!

खेळाच्या बाबतीत अमेरिका सगळ्या जगाच्या पुढे का आहे याबद्दल मला माझ्या लहानपणापासुन खुप कुतुहल होते. माझा सगळ्यात मोठा भाउ १९७२ मधे अमेरिकेत त्याच्या उच्च वैद्यकिय शिक्षणासाठी आला. मला जशी १९७५-७६ पासुन थोडी समज यायला लागली तेव्हापासुन मी त्याला पत्रातुन व फोनवर भांडावुन टाकायचो... तु जिमी कॉनर्स व बोर्गची मॅच पाहीलीस का?तु मार्क स्पिट्झ्ज़ व जॉन नेबरला स्विमींग करताना पाहीलेस का? तु करीम अब्दुल जब्बारला बास्केटबॉल खेळताना पाहीलेस का? माझ्या भावानेही मी सगळ्यात लहान असल्यामुळे मला कधीच "कसले फाल्तु प्रश्न विचारतोस?" किंवा "मला काय तेवढाच उद्योग आहे का?" अशी उत्तरे दिली नाहीत. उलट तो म्हणायचा की मी त्यांच्या मॅचेस किंवा हे ऑलिंपिक्स मी टेप करु ठेवले आहे.मी तुला नंतर पोस्ट करीन... पण मी स्वत्: जेव्हा १९८८ मधे माझ्या शिक्षणासाठी अमेरिकेत आलो तेव्हा मला कळले की अमेरिका अशी खेळात पुढे का आहे.

या देशात प्रत्येक खेळामधे एक सिस्टीम आहे. ऍथलेटिक्स,अमेरिकन फ़ुटबॉल, बास्केटबॉल,जलतरण पासुन ते गॉल्फ़ पर्यंत इकडे हायस्कुलपासुन स्पर्धा असतात. हायस्कुलमधले चमक दाखवलेल्यांना मग कॉलेजमधे खेळाची शिष्यवृत्ति देउन प्रवेश दिला जातो. कॉलेजमधे मग एन. सी. ए. ए. स्पर्धांमधे मग हे खेळाडु विविध खेळांमधे अतिशय चुरशीचे सामने खेळतात व त्यामधे तावुन सुलाखुन निघालेले व चमकलेले खेळाडु मग एन. बी. ए.(बास्केटबॉल साठी) एन.एफ़.एल.(अमेरिकन फ़ुटबॉलसाठी) व एम.एल.बी.(बेसबॉलसाठी) अश्या प्रोफ़ेशनल लिगमधे जातात.त्यांना अगदी हाय स्कुल लेव्हलपासुन सरावाच्या अद्ययावत सुविधा असतात. सायंटीफ़ीक ऍप्रोच ठेवुन सगळ्यांना कसुन ट्रेनिंग दिले जाते. साहजीकच अश्या सिस्टीमॅटीक ट्रेनिंग व स्पर्धांचे फळ मग त्यांना ऑलिंपिक्स सारख्या स्पर्धांमधे अनेक पदकांच्या रुपात दिसुन येते. म्हणुनच मग अमेरिका बास्केटबॉल किंवा जलतरण स्पर्धांमधे जगात वर्चस्व गाजवु शकते.

तर अशा पार्श्वभुमीमधुन अमेरिकेची ही १९७२ ची बास्केटबॉल टिमही म्युनिकला येउन थडकली होती. त्यांना नुसते सुवर्णपदकच जिंकायचे नव्हते तर आतापर्यंत १९३६ पासुन ऑलिंपिक्स बास्केटबॉल स्पर्धेत अमेरिका एकही सामना हरलेले नाहीत हे रेप्युटेशन सुद्धा अबाधीत राखायचे होते! अमेरिकेने सलग ७ ऑलिंपिक्समधे सुवर्णपदक मिळवले होते. आताही सुवर्णपदकाशिवाय दुसरे कुठलेही पदक आपल्याला मिळेल ही कल्पनाही या टिमला नामंजुर होती.... या अमेरिकन बास्केटबॉल संघाचा प्रशिक्षक होता त्यावेळचा अमेरिकेतील लेजेंडरी कॉलेज कोच... हेन्री आयबा! अमेरिका त्या काळी नेहमी कॉलेज बास्केटबॉल खेळाडुंनाच ऑलिंपिक्स स्पर्धांसाठी पाठवायची. पण ती कॉलेजमधली कोवळी(वयाने... दिसायला नाही.. हे लक्षात असु द्या:-))पोरे सुद्धा जगातल्या इतर देशांच्या प्रोफ़ेशनल खेळाडुंना नेहमी पुरुन उरायची. तर अश्या कॉलेजच्या खेळाडुंनी भरलेल्या अमेरिकेन टिमनेही १० सप्टेंबर १९७२ च्या अंतिम सामन्यापर्‍यंत परत एकही सामना गमवला नव्हता. आणी आज त्यांची गाठ होती रशियाच्या बलाढ्य व खुपच अनुभवी संघाबरोबर...

रशियाचा हा संघ मुळीच लेचापेचा नव्हता. हे सगळे खेळाडु जवळ जवळ १० वर्षे एकत्र खेळत होते. या संघाने अनेक युरोपियन स्पर्धांमधे विजेतेपद पटकावले होते. या संघात सर्जे बेलॉव्ह व ऍलेक्झॅंडर बेलॉव्ह सारखे महान खेळाडु होते.... यातला सर्जे बेलॉव्ह हा तर जगातला एक ग्रेटेस्ट बास्केटबॉल खेळाडु म्हणुन नंतर अजरामर झाला.. रशियाचा हा संघ या अमेरिकन संघाची रग या ऑलिंपिक्समधे जिरवायचीच या उद्देशाने या ऑलिंपिक्सला पुर्ण तयारीनीशी आला होता. त्यांचा कोच व्लादीमीर कोंड्राश्किन याने कोच आयबा व अमेरिकन टिम कशी बास्केटबॉल खेळते याचा पुर्ण अभ्यास केला होता. त्याला माहीत होते की कोच आयबाला डिफ़ेंसिव्ह खेळायला आवडते तर अमेरिकन कॉलेज खेळाडुंना मात्र फ़ास्ट टेंपो गेम खेळायला आवडतो.. त्याने मुद्दामच आपल्या खेळाडुंना स्लो टेंपो गेम खेळायची सुचना दिली होती जेणेकरुन अमेरिकन खेळाडु फ़्रस्ट्रेट होउन खेळतील...

तर असे हे दोन परस्पर विरोधाभास असलेले.. पण एकाच उद्देशाने पेटलेले... संघ आज एकमेकांसमोर म्युनिक ऑलिंपिक्सच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात एकमेकांसमोर शड्डु ठोकुन उभे ठाकले होते. संपुर्ण बास्केटबॉल एरिना खचाखच भरला होता. दोन्ही संघांचे पाठीराखे स्टॅंडमधे आपापल्या देशाचा जयजयकार करत त्यांचे झेंडे फडकवत होते. हे इंडोअर स्टेडीअम त्यांच्या आवाजाने दुमदुमुन गेले होते.ब्राझीलिअन रेफ़्रीने शिटी वाजवुन सामन्याला सुरुवात केली. दोन्ही संघातल्या खेळाडुंना या सामन्याचे महत्व पुर्णपणे माहीत होते... या सामन्याला रशिया विरुद्ध अमेरिका यांच्यातील बास्केटबॉल कोर्टवर लढले जाणारे युद्ध असे स्वरुप आले होते. दोन्ही संघातले खेळाडु आपापल्या देशाच्या प्राइडसाठी खेळत होते. जे हरतील त्यांना आपल्या देशाच्या कट्टर वैर्‍याकडुन हरलो असा अपमान नको होता.. त्यामुळे प्रत्येक जण त्वेशाने खेळत होता.

सामना जसजसा पुढे सरकत होता तसतसा रशियाचा कोच त्याच्या गेम स्लो करण्याच्या उद्देशात सफ़ल होत होता.. कोच आयबाही डिफ़ेंसिव्ह खेळुन व्लादिमीर कोंड्राश्किनला त्याच्या गेम प्लानमधे मदतच करत होता. अमेरिकन खेळाडु मात्र त्यांच्या स्वत्:च्याच कोचच्या स्लो टेंपो स्ट्रॅटीजीवर नाराज होते... त्या नाराजीचा परिणाम त्यांच्या खेळावर होत गेला व त्यामुळे सामना मध्यांतरासाठी जेव्हा थांबला तेव्हा अमेरिकन संघ चक्क ५ ने मागे पडला होता! सगळ्यांना कळुन चुकले होते की हा रशियाचा संघ अमेरिकेच्या रेप्युटेशनपुढे नांगी टाकुन सहजासहजी हार पत्करणार नव्हता... अमेरिकेच्या नुसत्या रेप्युटेशनला हा रशियन संघ मुळीच भिक घालु इच्छित नव्हता... गेम वॉज डेफ़िनेटली ऑन!

क्रमंश्:


Mukund
Friday, February 29, 2008 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मध्यंतरानंतरही तोच सिलसिला पुढे जारी राहीला... अमेरिकन खेळाडु खुपच चुका करु लागले व अमेरिकेची ही टिम अतिशय टॅलन्टेड व गिफ़्टेड खेळाडुंनी भरली होती तरी ते एकमेकांबरोबर जास्त दिवस खेळले नव्हते हे ते करत असलेया पासींग चुकांवरुन सगळ्यांना उघड उघड दिसु लागले. गेम संपायला फक्त १० मिनिटे बाकी असताना अमेरिकन संघ आता १० ने मागे पडला.. आता मात्र कोणीतरी चमक दाखवल्याशिवाय अमेरिकेला १० पॉइंट्सचा डेफ़िसीट भरुन काढणे अतिशय मुष्किलीचे होते. सर्व अमेरिकन खेळाडुंनी मग एक निर्धार करुन आपला खेळ उंचवायचे ठरवले व त्यांनी कोच आयबाच्या सुचना धाब्यावर बसवुन... एकदम अप टेंपो खेळ करत... व गार्ड केव्हीन जॉइसच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर... सामना संपायला फक्त ३६ सेकंद असताना... सामना ४९-५० असा आणुन ठेवला... अमेरिकेच्या त्या कम बॅक खेळाने अमेरिकेच्या पाठीराख्यांनी सगळे स्टेडिअम अक्षरश्: डोक्यावर घेतले... अमेरिका फक्त एका पॉइंटने मागे होती... पण आता बॉल होता रशियाच्या पझेशनमधे व ते साहजीकच वेळखाउ खेळ करत बॉल नुसता इकडुन तिकडे पास करत होते. पण असे करत असताना अमेरिकेच्या डग कॉलिन्स या गार्डने फक्त १२ सेकंद बाकी असताना... अतिशय चपळता दाखवुन... ऍलेकझॅंडर बेलॉव्हचा क्रॉस कोर्ट पास मधेच इंटरसेप्ट केला... व परत एकदा अमेरिकेच्या समर्थकांनी स्टेडिअम डोक्यावर घेतले... फारच वेगात सगळ्या घटना घडत होत्या... सगळे प्रेक्षक उठुन उभे राहीले होते... या १२ सेकंदात अमेरिका बास्केट करु शकेल का या सस्पेंसने सगळे प्रेक्षक जिव मुठीत घेउन उभे होते... अमेरिकन पाठिराख्यांच्या त्या बंद मुठींना घाम फुटला होता.. तिकडे डग कॉलिन्स मात्र आपले चित्त एकाग्र ठेवत बास्केटबॉल ड्रिबल करत रशियाच्या बास्केटकडे जाण्याचा प्रयत्न करत होता.. त्याचा एक डोळा घड्याळाकडे होता.. १० सेकंद... ९ सेकंद.. ८ सेकंद... ७ सेकंद.. ६ सेकंद.. असा घड्याळावरचा वेळ कमी कमी होत होता.. पण प्रेक्षकांच्या ह्रुदयातील ठोके मात्र त्या प्रत्येक कमी कमी होणार्‍या सेकंदागणीक अधिक अधिक वाढत होते... ५ सेकंद.. ४ सेकंद... आता डग कॉलिन्सने बास्केटबॉल एका हातात घेउन.. रशियाच्या डिफ़ेंडर्सना चकवा देत... रशियन बास्केटच्या दिशेने झेप घेतली... तो आता त्या बास्केट मधे बॉल टाकणार..... इतक्यात एका रशियन डिफ़ेंडरने हार्ड फ़ाउल करुन डग कॉलिन्सला जोरात खाली पाडले..... स्टेडिअममधे एकमुखाने बु.... असा एकमुखी निशेध अमेरिकन पाठीराख्यांच्या मुखातुन निघाला... रेफ़्रीने फक्त ३ सेकंद बाकी असताना डग कॉलीन्सला २ फ़्री थ्रोज त्या फ़ाउलबद्दल दिले.. आता फक्त डग ला ते दोन्ही फ़्री थ्रोज यशस्वी करायचे होते.. तेवढे त्याने केले की सुवर्णपदक अमेरिकेचेच होणार होते...

पण त्या फ़ाउलनंतर पडल्यामुळे डग कॉलीन्स बर्‍यापैकी जखमी झाला होता. कोच हेन्री आयबाला त्याचे असिस्टंट कोच सांगु लागले की आपण जखमी डग च्या ऐवजी दुसर्‍या कोणाला तरी फ़्री थ्रोज घ्यायला पाठवु... पण कोच आयबा म्हणाला... मी असा रडीचा डाव खेळणार नाही.. फ़ाउल डगला केले आहे आणी डग जर उभा राहु शकत असेल तर डग कॉलिन्सनेच फ़्री थ्रोज घेतले पाहीजेत! झाल... डग कॉलिन्स लंगडत लंगडत उभा राहीला. तसाच लंगडत लंगडत तो फ़्री थ्रो घ्यायला फ़्री थ्रो लाइनवर उभा राहीला... त्याला माहीत होते की नुसते या स्टेडिअममधलेच नाही.... तर सगळ्या जगातले.. खासकरुन अमेरिकेतली सगळी लोक... खुद्द प्रेसिडंट निक्सनसुद्धा..... या त्याच्या फ़्री थ्रो कडे डोळे लावुन बसले आहेत... केवढे ते प्रचंड दडपण! त्याच्या त्या २ फ़्री थ्रो वर आता सगळ्या अमेरिका देशाची शान होती.. गेल्या ३६ वर्षांची अपराजीत परंपरा त्याच्या त्या २ फ़्री थ्रोज वर होती... पण हे सगळे विचार डग कॉलिन्सने आपल्या मनातुन काढुन टाकले व तो फ़्री थ्रो लाइनवर जाउन उभा राहीला... १० सेकंदापुर्वी ज्या स्टेडीअममधे प्रेक्षकांचा गदारोळ दुमदुमत होता... त्याच स्टेडिअममधे आता मात्र एकदम पिन ड्रॉप सायलंस होता... डगने पहिला फ़्री थ्रो बास्केटच्या दिशेने टाकला...आणी.... स्विश.......! स्कोर.. टाय.... ! ४९-४९.....! डग कॉलिन्स दुसरा फ़्री थ्रो घ्यायचा पवित्रा घेउन उभा राहीला... बॅक्ग्राउंडमधे रशियाच्या बेंचवर प्रचंड मोठा सावळागोंधळ चालला होता... पण त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते.. सगळ्या जगाच्या... इव्हन रेफ़्रिजच्या नजरा सुद्धा.... डग कॉलिन्सच्या त्या दुसर्‍या फ़्री थ्रो अटेंप्ट कडे खिळल्या होत्या... डग च्या हातुन बॉल सुटला... गिरक्या घेत.. स्पिन होत होत.. तो बास्केटबॉल रशियन बास्केटकडे जाउ लागला... सगळे अमेरिकन खेळाडु व अमेरिकन पाठीराखे श्वास रोखुन... मुठी बंद करुन.... त्या हवेत गिरक्या घेणार्‍या बास्केटबॉलची ट्रॅजेक्टरी फ़ॉलो करत होते... व त्या पिन ड्रॉप सायलंसमधे स्टेडिअममधे परत एकदा... स्विश!....... असा आवाज झाला... व सगळ्यांना कळले की डगने दोन्ही फ़्री थ्रोज यशस्वीरित्या बास्केटमधे टाकुन अमेरिकेला ५०-४९ असा लिड दिला आहे! अमेरिकन खेळाडु, कोच, पाठीराखे जल्लोशाने नाचु लागले व उरलेल्या १ सेकंदात रशियाने इन बाउंड पास केला त्याकडे कोणी लक्षच दिले नाही... गेम संपल्याचा बझर वाजला... व सर्व अमेरिकन खेळाडु,कोचेस व अमेरिकन पाठीराख्यांनी कोर्टवर एकच तोबा गर्दी केली... एकमेकांना मिठ्या मारत, उचलत सगळे अमेरिकन पथक वेड्यासारखे जल्लोश करु लागले... अमेरिकन खेळाडुंनी पराभवाच्या जबड्यातुन या विजयाला खेचुन आणले होते.. डग कॉलिन्सला सगळे डोक्यावर घेउन नाचत होते....

या गदारोळात तिकडे रशियाचे संपुर्ण कोच पथक त्या ब्राझीलियन रेफ़्रीशी तावातावाने हुज्जत घालत होते हे त्या जल्लोशात कोणालाच दिसले नाही. व जवळ जवळ ५ मिनिटांनी लाउडस्पिकरवर सांगीतले गेले की... थांबा!... हा सामना अजुन संपला नाही... तर क्रुपया सगळ्या खेळाडुंनी आपला जल्लोश थांबवा... अमेरिकन कोचेसनी आपापली जागा साइड लाइनवर घ्या... अरेच्या! ही काय भानगड आहे.... हे रेफ़्रीज व रशियन प्रशिक्षक सोडुन कोणालाच कळत नव्हते... शेवटी लाउडस्पिकरवर सांगीतले गेले की डग कॉलिन्स जेव्हा त्याचा दुसरा फ़्री थ्रो घेत होता.... त्याच्या आधी रशियाच्या प्रशिक्षकांनी टाइम आउट मागीतला होता..... पण त्यावेळी सगळ्यांच्या नजरा डगकडे असल्यामुळे रेफ़्रीजना ते दिसले नाही व कळले नाही....! झाल....! सगळे खेळाडु परत सामना सुरु करायला तयार झाले... अमेरिकन खेळाडु मात्र इमोशनली एकदम ड्रेन झाले होते... त्यांनी विजयाचा अनुभव गेली ५ मिनिटे घेतला होता... आता मात्र त्यांना सांगण्यात येत होते की... अजुन त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले नाही..... सामन्याच्या घड्याळ्यात ३ सेकंदे परत टाकली जाणार होती... म्हणजे त्यांना अजुन कमीतकमी ३ सेकंद तरी वाट पाहायला लागणार होती...! सगळ्यांनी आपापल्या जागा घतल्या..

रशियाच्या खेळाडुने बास्केटबॉल इनबाउंड केला... व रशियाचे खेळाडु दुसरा पास करणार एवढ्यात... गेम संपल्याचा बझर झाला...! स्कोरबोर्ड अजुनही दाखवत होता... अमेरिका ५०... रशिया ४९! सगळे एवढ्या वेगात घडत होते की कोणालाच ते ३ सेकंद कसे गेले ते कळले नाही... झाल! परत एकदा अमेरिकन खेळाडु, प्रशिक्षक व पाठिराखे यांचा कोर्टवर जल्लोश सुरु झाला.. परत तोच सीन.. त्याच मिठ्या.. तेच डग कॉलिन्सला डोक्यावर घेउन नाचणे... जणु काही डेजा वु! आता मात्र अमेरिकन खेळाडुंनी जल्लोशामधे कसलीच कमी ठेवली नाही. सगळ्या खेळाडुंनी मनमुराद जल्लोशात भाग घेतला... नाचुन नाचुन व हसत खदळत
USA....USAAAAAA...... USAAAAAAAAAAAA.... असे करत ते सगळे अमेरिकन पथक व त्यांचे पाठीराखे कोर्टवर परत एकदा विजयाचा आनंद लुटु लागले....

आणी खर सांगु? आता तुमचा विश्वासच बसणार नाही अशी घटना कोर्टवर घडत होती.... परत एकदा त्या गदारोळाच्या बॅक्ग्राउंडमधे रशियन कोचेस व रेफ़्रीजचे तावातावाने संभाषण चालले होते... ते बघुनही काही लोकांना डे जाउ चा अनुभव आला! आता काय झाले? लाउड स्पिकरवर परत एकदा अनाउंसमेंट झाली.... थांबा!.... सामना अजुन संपला नाही.... सगळ्यांच्या मनात....
I cant belive this is happening!असाच विचार आला व अमेरिकन खेळाडु,प्रशिक्षक व पाठीराखे.... सुन्न होउन रेफ़्रीज आता काय कारण सांगत आहेत याकडे डिसबिलीफ़ नजरेने पाहु लागले.. या वेळेला रशियन प्रशिक्षकांनी रेफ़्रीजच्या लक्षात आणुन दिले की गेम क्लॉकवर ३ सेकंद परत टाकलेच गेले नाहीत! गेम क्लॉकवर १च सेकंद ठेवला गेला होता... आता परत रशियाला ३ सेकंद दिले जाणार होते! अमेरिकन खेळाडुंचा या होत असलेल्या बिझार घडामोडींवर विश्वासच बसत नव्हता! दोन वेळा त्यांनी विजयाचा जल्लोश करुन विजयी होण्याच्या सुखद भावना अनुभवल्या होत्या.. दोन्ही वेळेला या बिझार घडामोडींनी त्यावर पाणी फिरवले होते... अमेरिकेचा खेळाडु माइक बेंटन तर असेही म्हणाला... बहुतेक रेफ़्रीजना रशिया जो पर्यंत जिंकत नाही तो पर्यंत त्यांना अश्या परत परत संध्या ध्यायच्या असतील... म्हणुनच रेफ़्रीज असे करत आहेत!

३ सेकंदानंतर माइक बेंटनचा तो विचार खरोखरीच खरा ठरला... या झालेल्या अविश्वसनिय घडमोडीनंतर अमेरिकन खेळाडु ऑफ़ गार्ड नसले असते तरच नवल होते! सर्जे बेलॉव्ह ने त्यांच्या साइडलाइन वरुन एक मोठा अचुक पास.... पार अमेरिकेच्या बास्केटपर्यंत टाकला... तिकडे उभ्या असलेल्या ऍलेकझॅंडर बेलॉव्हने त्याला पटकन डिफ़्लेक्ट करुन तो पास अमेरिकच्या बास्केटमधे टाकला!लगेचच सामना संपल्याचा बझर झाला... आता मात्र स्कोर सांगत होता... रशिया ५१.... अमेरिका.... ५०! रशियाने प्रथमच चक्क अमेरिकेला ऑलिंपिक्स बास्केटबॉलमधे धुळ चारली होती!

आता जल्लोश करत होते रशियन खेळाडु,रशियन प्रशिक्षक व रशियन पाठीराखे... अमेरिकन खेळाडु मात्र शुन्यात नजर करुन... अंगावर विज पडुन प्राण गेल्यासारखे... सुन्नपणे... त्या रशियन जल्लोशाकडे पाहात होते... आत्ता जे द्रुश्य ते पाहात आहेत ते खरे आहे?.... की.. गेल्या १० मिनिटात त्यांनी दोनदा केलेला विजयाचा जल्लोश खरा होता.... हे समजायच्या पलीकडे.... त्यांच्या संवेदनांना मुंग्या आल्या होत्या! केनी डेव्हिस व डग कॉलीन्स सारखे काही अमेरिकन खेळाडु तर अक्षरश्: डोके हातात घेउन ओक्साबोक्शी रडत होते... डग कॉलिन्सने त्याची मुलाखत घेणार्‍याला सांगीतले की त्याला कोणीतरी शिकागोच्या सिअर्स टॉवर या जगातल्या सगळ्यात उंच बिल्डिंगच्या गच्चिवरुन टाकुन दिले आहे असेच वाटत आहे!१० मिनिटात भावनांचे एका टोकापासुन दुसर्‍या टोकापर्यंतचे एवढे मोठे हेलकावे... त्यांच्या आतापर्यंतच्या लहान आयुष्यात.... त्यांनी कधीच अनुभवले नव्हते... त्या भावनांच्या प्रचंड हेलकाव्यात ते पार डुबुन गेले होते...

अमेरिकन कोचेसनी या सामन्याच्या निर्णयाबद्दल ऑलिंपिक कमीटीकडे रितसर फिर्याद नोंदवली. पण दुसर्‍या दिवशी त्यांची ती फिर्याद ३-२ अशी फेटाळण्यात आली. ज्या ३ देशांनी रशियाच्या बाजुने निकाल दिला ते तिनही देश कम्युनीस्ट असल्यामुळे अमेरिकेने तो निर्णय शिरसावंद्य मानला नाही व बास्केटबॉल पदक वितरण समारोहावर त्यांनी बहिष्कार घातला. सगळ्या खेळाडुंनी त्यांना मिळालेले रजत पदक स्विकारण्यास नकार दिला.... केनी डेव्हीस सारख्या खेळाडुला हा पराभव इतका मनाला लागला की त्याने त्याच्या मृत्युपत्रात स्पष्ट लिहुन ठेवले आहे की त्याच्या पुढच्या १०० पिढ्यांनी सुद्धा... त्याचे रजत पदक कधीच स्विकारायचे नाही....

आजही ती अमेरिकेने नाकारलेली रजत पदके..... स्विझर्लंडमधील ल्युसान शहरात एका सेफ़ व्हॉल्टमधे सुरक्षित... पण धुळ खात पडली आहेत!




Nandini2911
Friday, February 29, 2008 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपर्ब!!!!!
काय नाट्यमय आहे... अंगावर काटा आला वाचताना. सिंपली ग्रेट. :-)


Raviupadhye
Friday, February 29, 2008 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द जी, काय थरार आहे? वाचण्यात जर एव्हढे रोमहर्षक आहे तर प्रत्यक्षात काय असेल्-विचार करवत नाही!! तुम्हारी लिखनेकी style में तो चार चांद लग गये आज!!! जियो------:-)

Manjud
Friday, February 29, 2008 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसलं सॉलिड आहे हे..... मुकुंद, ग्रेट!!!

माझ्या मते ह्यत रशियाने रडेगिरी केली आणि त्यांचं सुदैव असं की रेफ्रीजचा असा वेंधळेपणा केला. पण ऑलिंपिक लेव्हलला रेफ्रीजचा असा वेंधळेपणा होऊ शकतो?

फक्त मला रशियाचे ४९ वरून ५१ कसे झाले ते कळले नाही. की शेवटच्या ३ सेकंदात रशियाने २ थ्रोज बास्केटमध्ये टाकले???


Ek_mulagi
Friday, February 29, 2008 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द Simply Superb!!!!!!!
कधीही थोडही down वाटल,कि इथे येवुन स्फ़ुर्ती मिळते.


Kedarjoshi
Friday, February 29, 2008 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्त मला रशियाचे ४९ वरून ५१ कसे झाले ते कळले नाही. की शेवटच्या ३ सेकंदात रशियाने २ थ्रोज बास्केटमध्ये टाकले>>>>
मंजु अग बास्केटबॉल मध्ये टु व थ्री पॉइंटर्स पण असतात. किती लाबुंन बास्केट झाला त्यावर ते पॉइंटस मिळतात.
रशीयाने फक्त समय सुचकता दाखविली.

अशाच्या एका लिजंडरी बास्केट बॉल खेळाडुला मी पण भेटलो आहे. त्याचे नाव रेजी मिलर.

मुकुंद परत एकदा सही. प्रत्येक गोष्ट क्लास.


Swaatee_ambole
Friday, February 29, 2008 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर लिहीताय मुकुंद. धन्यवाद.

Meghdhara
Saturday, March 01, 2008 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! जबरदस्त नाट्य!
पण खरच अमेरिकन खेळांडूवर अन्याय झाला असे वाटले.

मुकुंद मेल केली आहे.

मेघा



Abhi_
Saturday, March 01, 2008 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम लिहिलंय मुकुंद!! असेच लिहित रहा :-)

Manjud
Saturday, March 01, 2008 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु अग बास्केटबॉल मध्ये टु व थ्री पॉइंटर्स पण असतात.

ओह!! केदार समजावल्याबद्दल धन्य्वाद

Mukund
Saturday, March 01, 2008 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


(नेमस्तक.. वरच्या पोस्टमधे
believeचे स्पेलिंग चुकले आहे ते दुरुस्त कराल काय?( बाय द वे..१२ तासाची मर्यादा का एडिटींग ला?:-())

पायोली एक्स्प्रेस!

आपण आजपर्यंत जगातल्या इतर देशातील खेळाडुंच्या ऑलिंपिक्समधील सुरस कथा माझ्याकडुन ऐकल्यात... पण आपल्या भारतिय ऍथलिट्सबद्दल एकही कथा अजुन वाचायला मिळाली नाही म्हणुन तुमच्यापैकी बरेच जण नाराज असतील... पण आज मात्र मी तुम्हाला अश्या एका भारतिय महिला ऍथलिटबद्दल सांगणार आहे की जिने ऑलिंपिक्समधे जरी पदक मिळवले नसले.... तरी... भारतिय महिलांसाठी ऍथलेटिक्समधे तिने एक नवे दार उघडुन देउन... एका ट्रेलब्लेझरसारखे काम केले आहे... ती भारतिय महिला दुसरी कोणी नसुन पलावलकुंडी ठाकरमपिल उषा... उर्फ़.... पायोली एक्स्प्रेस... ही होय!

आपल्या देशामधे एकुणच ऍथलेटिक्स या प्रकाराबद्दल प्रचंड मरगळ! क्रिकेट व हॉकी सोडुन दुर्दैवाने आपल्या देशात लोकांना बाकीच्या खेळांचे एवढे आकर्षण नाही यातच आपल्या आतापर्यंतच्या ११० वर्षांच्या ऑलिंपिक्स इतिहासात मिळालेल्या.... फक्त..! केवळ..! मोजुन....! ३.... वैयक्तीक ताम्र पदकांच्या संख्येचे कारण दडलेले आहे. सगळे पैसे व एनर्जी.. क्रिकेट व हॉकी यावरच खर्च केले जातात. त्यामुळे ऍथलिट्सना अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध नसतात. नविन नविन सायंटीफ़ीक टेक्नॉलॉजी उपलब्ध नसते... ज्यामुळे ऍथलिट्सच्या टाइमिंग मधे सेकंदांची इंप्रुव्हमेंट होउ शकते... ऑलिंपिक्समधे... जिथे केवळ एक शतांश सेकंदानेही पदक हुकु शकते... तिथे अश्या लेटेस्ट प्रशिक्षण केंद्रे व टेक्नॉलॉजीमुळे खरच फरक पडु शकतो.... याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पी. टी. उषा..

१९८० च्या आधीचा काळ तसाही एकुणच भारतिय ऍथेलेटिक्सच्या द्रुष्टीने.. एक दोन उदाहरणे सोडता.. काही उल्लेखनिय नव्हता... आणी भारतिय महिला ऍथलिट्सच्या बाबतीत म्हणाल... तर अगदी शंखच होता! अश्या पार्श्वभुमीवर पी. टी. उषाची त्या ८० च्या दशकातील कामगीरी हा एक सोन्याचा किरणच होता.

केरळमधल्या पायोली या अतिशय छोट्या खेडेगावात.. एका गरीब कापड दुकानदाराच्या घरी उषाचा जन्म झाला. पण जन्मजात मिळालेल्या देणगीने उषाने अगदी कमी वयातच सगळ्यांचे लक्ष तिच्या धावण्याच्या कौशल्याकडे वेधुन घेतले. तिच्या सुदैवाने उषा पौगंडावस्थेत असतानाच ओ.एम. नांबीयार या प्रशिक्षकाच्या द्रुष्टीला पडली. तिच्यातले कौशल्य ताबडतोब ओळखुन कोच नांबियारने तिला आपल्या छत्राखाली घेतले व १९७९ मधे पहिल्याच प्रयत्नात तिने अखिल भारतिय महिला स्पर्धांमधे १००,२०० व ४०० मिटर्सचे सगळे जुने विक्रम मोडले. १९८० चे मॉस्को ऑलिंपिक्स फार दुर नव्हते त्यामुळे उषाला जास्त प्रशिक्षणाला वेळ मिळाला नाही तरी कोच नांबियारने तिला मॉस्को ऑलिंपिक्सला एक अनुभव मिळावा म्हणुन पाठवले. त्या ऑलिंपिक्समधील तिची कामगीरी बिलकुल उल्लेखनिय नव्हती पण तिला आंतरराष्ट्रिय स्तरावर ती कुठे आहे याची कल्पना आली व आपल्याला अजुन बराच पल्ला गाठायचा आहे याची तिला जाणीव झाली. त्या जाणीवेने तिने मॉस्कोवरुन परत आल्यावर कसुन सरावाला व प्रशिक्षणाला सुरुवात केली व १९८२ च्या दिल्ली एशियाडपर्यंत तिने बरीच प्रगती केली. संपुर्ण भारताच्या तिच्याकडुन दिल्ली एशियाडमधे मोठ्या आशा होत्या पण १०० मिटरमधे तिला फिलिपिन्सच्या लिडिया द वेगा कडुन हार पत्करावी लागली. २०० मिटरमधेही तिला रजत पदकावरच समाधान मानावे लागले.

पण एकंदरीत भारतिय महिलांची कामगीरी त्या एशियाड मधे खुप चांगली झाली. आणी त्या एशियाड पासुनच शायनी अब्राहम-विल्सन,वंदना राव,वंदना शानभाग व पी. टी. उषा या चौघींना फ़ॅब्युलस फ़ोर म्हणुन संबोधु जाउ लागले. सबंध ८० च्या दशकात या चौघींनी व एम. डी. वलसम्मा व काही प्रमाणात अश्विनि नाचप्पानेसुद्धा भारताचे नाव.. जगाच्या नाही तरी आशियायी स्पर्धांमधे... खुप उंच नेण्यात सिंहाचा वाटा उचलला आणी या सहा भारतिय महिलांचा प्रत्येक भारतियाला त्यासाठी अभिमान वाटला पाहीजे.

१९८२ एशियाड मधे एकही सुवर्णपदक न मिळुनसुद्धा पी. टी. उषाच पुढे ऑलिंपिक्समधे पदकविजेती ठरु शकेल असा तिच्या कोचचा ठाम विश्वास होता व त्यानुसार कोच नांबियारने १९८४ च्या लॉस ऍंजलीस ऑलिंपिक्सकडे उषाला पदक विजेती करण्याकडे द्रुष्टी केंद्रीत केली. १९८४ च्या ऑलिंपिक्समधे बहुतेक सगळे कम्युनीस्ट देश बहीष्कार घालणार हे आधीपासुनच सगळ्यांना माहीत होते. त्यामुळे उषाला पदक मिळण्यासाठी कोच नांबियारने एक गोष्ट केली... १०० व २०० मिटर्स स्प्रिंटमधे अमेरिकन व जमैकन महिलांच्या पुढे उषाला पदक मिळणे त्याला फारच अवघड वाटत होते म्हणुन त्याने उषाला ४०० मिटर्स हर्डल्स मधे लक्ष केंद्रीत करायला सांगीतले. वास्तवीक पाहता १९८२ च्या एशियाडमधे भारताच्या एम. डी. वलसम्माला ४०० मिटर्स हर्डल्समधे सुवर्णपदक मिळाले होते. वलसम्माच्या कोचला उषाचे असे ४०० मिटर्स हर्डल्स मधे लुडबुडणे अजिबात आवडले नाही पण कोच नांबीयारला त्याची पर्वा नव्हती. त्याला माहीत होते की ४०० मिटर्स हर्डल्समधे जर उषाने लक्ष केंद्रीत केले तर तिला ८४ च्या ऑलिंपिक्समधे पदक मिळण्याची खुप शक्यता आहे. त्याप्रमाणे उषाने आपले प्रशिक्षण सुरु केले. पुढची २ वर्षे तिने तन... मन... धन.. अर्पुन अविरत परिश्रम केले. १९८४ चे ऑलिंपिक्स जवळ येउन ठेपले.... उषाने मोठ्या उमेदीने व आशेने भारतिय पथकाबरोबर लॉस ऍंजेलीसला प्रयाण केले....

क्रमंश्:



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators