|
Chinya1985
| |
| Saturday, February 23, 2008 - 10:14 am: |
| 
|
अहो माढेकर पैसाच जर स्टॅन्डर्ड असते तर त्यांनी मनपाच्या निवडणुकिलाही भैय्यांकडुन पैसे घेउन उमेदवारी दिली असती ना!!! असो जर सर्वच पार्ट्यांमधे फ़क्त पैसाच तिकिट मिळवण्यासाठी पुरेसा असेल तर मग फ़क्त सेनेलाच दोष देउ नका. तुझ्या बाकीच्या post ला अनुमोदन पण खालील वाक्य म्हणजे naive पणा वाटतो मला इतकच म्हणायच होत की प्रॉब्लेम काय आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे पण त्याच नक्की सोल्युशन काय आहे हे कुणालाच माहीत नाही
|
>>> अहो माढेकर पैसाच जर स्टॅन्डर्ड असते तर त्यांनी मनपाच्या निवडणुकिलाही भैय्यांकडुन पैसे घेउन उमेदवारी दिली असती ना!!! भैय्यांकडून पैसे घेऊन उमेदवारी दिली तर, तथाकथित मराठी बाण्याबद्दल कशी बडबड करता येईल? त्यापेक्षा मराठी उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी दिली तर एका दगडात दोन पक्षी! >>> असो जर सर्वच पार्ट्यांमधे फ़क्त पैसाच तिकिट मिळवण्यासाठी पुरेसा असेल तर मग फ़क्त सेनेलाच दोष देउ नका. माझी याआधीची पोस्ट्स् नीट वाचा. सेना, भाजप, कॉंग्रेस इ. सर्व पक्ष सारखेच आहेत असे मी म्हटले आहे. त्यांच्यात कोणताही गुणात्मक फरक नाही. फरक एवढाच आहे की त्यांची प्रत्येकाची जनतेला फसविण्याची वेगवेगळी theme आहे. शिवसेना मराठी बाणा या कारणासाठी मराठी उमेदवारांना तिकिट देते हा तुमचा भोळसटपणा म्हणायचा की अज्ञान!
|
>>> महाराष्ट्रा आत अन्ग मेहनतीची कामे करायची नाहीत,दुसयाला करू द्यायची नाहीत व राज्या बाहेर जायचे नाही हा कसला वेडेपणा??? तुम्ही महाराष्ट्रात काम करता की बाहेरच्या राज्यात?
|
बिहारी कणा .. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून) पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन. गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली. गाडी फ़ुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले. तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे. उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत पण थोडा एकटेपणा वाटला. मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा म्हटलं, "मग सोडा युपी दिन, "जय महाराष्ट्र" म्हणा..!" -- अभिजीत दाते
|
राज ठाकरे यांनी indian express ला लिहिलेले पत्र! Do political movements need to obey the law? What about Advani rath yatra, Modi’s Godhra outrage?’ Respected Sudheendra Kulkarniji, I have read your open letter addressed to me in Loksatta. I am happy to read it. Leaders from Uttar Pradesh and Bihar (not all north Indians, only those from Uttar Pradesh and Bihar) and all north Indian journalists have decided to label whatever I and my colleagues, my party Maharashtra Navnirman Sena do, as "goondagiri". It is natural. They are furious because their inter-connected economic, cultural and political interests have been jeopardized. For the first time, their uncontrolled political and cultural dadagiri has been confronted! With this backdrop, I was happy to read your letter because, for the first time, someone has shown a willingness to discuss and debate the issues raised by me. And it is not someone ordinary but one who has handled the country's politics and culture from the Prime Minister's Office. Sudheendraji, you have made many points in your letter. I will start with the one on violence. But before that, I would like to inform readers that I have been in active politics for about 18-19 years. I hope you don't doubt my political knowledge and experience! But to state the fact, I and my party have not undertaken any illegal, unconstitutional agitation if you consider the backdrop of the political history of our country. Forget the country, even in Maharashtra every political party has indulged in political violence and murder at some time or the other. The levels and layers may be different. Some parties have supported such incidents on moral grounds. Such allegations have been made against many people in the present cabinet. I have neither supported political violence nor have my workers killed their opponents. I will give you just one example. Not even a single worker has offended –– physically or verbally –– any mediaperson, despite the fact that the entire media (especially Hindi and English media) was spewing venom of contempt for Maharashtrians, on me and my party. I can give you many examples of the media being attacked by enraged workers of all four major political parties in Maharashtra in similar situations. Isn't our patience and conscience indicative of a principled stance? I have already apologised for the death in Nashik during this agitation. But it should also be kept in mind that it was an accident, not a political murder! Maharashtra Navnirman Sena does not believe in political murders! Leaders involved in political murders across the country come to Maharashtra to teach me ahimsa and journalists follow them and address them as "sir" and brand me and my followers as goondas. This is such an irony. I am surprised that nobody is objecting to the dirty politics being played over the death of a person. Now, the violence. Isn't the outbreak of spontaneous outrage in a people's movement understood? Can anyone avoid the violence or damage to property even if it does not bring happiness? Wasn't Gandhiji forced to withdraw his agitation when a chowkie was burnt at Chauri Chaura? Besides, even after all this, was the violence and damage to public property avoided in the 1942 agitation? When people become furious, their response is the same, whether it is the Congress or the African National Congress. Sudheendraji, as you are a former communist, you must be aware of crores of deaths and political murders during communist movements the world over. People's movements are a repetition of history to some extent. Besides, do political movements need to obey the law? Political history learnt by me tells me that breaking the law, getting arrested, braving lathis and getting jailed are symbols of a principled agitation. In recent times, the rulers and opposition parties indulged in movements of political compromise, in which morchas are taken out, the share of benefits of the government and opposition parties are decided. Then the protesters and their companions go home and sleep peacefully! This is called todbazi (compromise). The word political movement is an equivalent word for breaking the law! Tell me, Sudheendraji, was Bihari MP Rajiv Pratap Rudy not aware of Advaniji's Rath Yatra when he chose to criticise me on the grounds that my agitation was unconstitutional, destabilising for the nation, sectarian? How many people died then? How much was the violence? But didn't Advani pursue his campaign to make his point? The Bihari babu in Rudy seems to have woken up. I don't remember Rudy mustering courage to register his protest during the Rath Yatra or with Narendrabhai Modiji when our Gujarati brethren were outraged after the Godhra incident. It means that everyone wants MPs and MLAs from Uttar Pradesh and Bihar to dance on the chest of Maharashtra. Because they know that Maharashtra's MPs and ministers in Delhi will not utter a word! The only thing remaining is Maharashtra government issuing an ordinance to compel every Maharastrian household to accommodate at least one bhaiyya from UP, Bihar and if not done, to brand such Maharashtrians as against the constitution! Raj Thackeray and his party have become a hurdle in all this which is why they are ready to crush us. Sudheendraji, I have never opposed, do not oppose ordinary workers from U.P. and Bihari. Would I have spoken if chhatpooja was an ordinary religious pooja? Gujaratis celebrate Garba in Maharashtra with a bang. We also enjoy it. Bengalis celebrate Navratri. We too participate in it. South Indians perform Ayyappa's rituals and Marathis pray there. But chhatpooja is not just a religious festival. At least it is not celebrated as one in Mumbai. It is an akhada (wrestling ring) erected on Mumbai's chest by Bihari leaders to show their strength. There lies the root of our opposition. Sudheendraji, are you aware of any widespread chhatpooja being celebrated by Biharis living in Mauritius, Dubai or any country close to the sea? How can you compare chhatpooja with Ganeshotsav? Ganesh is acknowledged nationally and internationally as Vighnaharta (the remover of obstacles). When Maharashtians living in other states celebrate Ganeshotsav, do they invite Pawarsaheb (Sharad Pawar), Munde (BJP leader Gopinath Munde), Balasaheb (Bal Thackeray), Vilasrao (Vilasrao Deshmukh) or Sushilkumar (Sushilkumar Shinde) to deliver fiery speeches? Do Maharashtrians use Ganeshotsav to establish cultural and political supremacy in that state and make it a cultural vassal state? If any Maharashtrian is doing it, I object to that. But Maharashtrians never do it. Except people from U.P. and Bihar, migrants from other states do not indulge in such feudal activity. States like Rajasthan, Punjab, Madhya Pradesh and Haryana are also in the north. Maharashtra has no objection to them because migrants from these states behave responsibly. I agree with you that India is a country of bouquets with flowers of different states. But if a flower of one colour is rubbed violently on the petal of another of a different colour, it will damage both. There will be no manomilan (amalgamation). Nobody should do it. I and my party were not against the common man from U.P. and Bihar, but when this common man comes to Maharashtra to prove the dadagiri of leaders from U.P. and Bihar! Well, what is the history of such leaders? We would have followed their model if they had made U.P. and Bihar progressive states and created paradise. But these leaders have exploited the poor man there and impoverished these states by bringing in a mafia culture. What are these leaders saying here? "Take action against Raj Thackeray because he is a goonda!" Sudheendraji, how could you fall prey to the disinformation campaign of leaders and journalists from U.P. and Bihar? I will give you just one example, after reading which you and the whole world will realise how these leaders and bhaiyya journalists indulge in false and poisonous propaganda. You have said that I have blamed Amitabh Bachchan for singing the "Chhora Ganga Kinarewala" song from the film "Don". It is totally false. Bhaiyya journalists from U.P. and Bihar, who address Amar Singh as "sir, sir" have spread this venomous story all over the country. Am I mad to blame Amitabh for singing this line in "Don"? If that were the case, I would have demanded his arrest for acting in "Don"! If I had to indulge in something foolish, I would have stooped to Lalu Prasad Yadav's level. Do you know the truth, Sudheendraji? Amitabh Bachchan delivered a speech and I have the clipping. I can show it to you. He said, "Mai Dilli raha, Calcutta raha, Mai Bambai (not Mumbai!) raha. Phir bhi meri pehchan, chhora Ganga kinarewala hi hai". My only observation was that if such a great hero feels love for Uttar Pradesh despite what Mumbai gave him, then what is wrong if a small man like Raj Thackeray feels love for Maharashtra? I have the clipping of my speech with me. Isn't this enough to prove that such venomous propaganda has misguided a media stalwart like you? Which Maharashtrian does not love India? This love is not limited to just bursting crackers after India wins a cricket match, but is as vast as the Sahyadri rushing to help the Himalayas whenever there is a shadow of foreign invasion. Have Maharastrians failed to think about the country? In fact, Maharashtrians have always thought of the country first, before they think of their own region. My chest swells with pride whenever I say Jai Hind. But nobody should forget that my Maharashtra is a part of India. It has its own culture, its own identity. Nobody should forget it. A guest is welcomed if he adjusts himself to the host's house. But if he tries to change the host's house through dadagiri, we won't tolerate it. And no means no! I am proud of my workers for their struggle! Please don't call it 'Rada' (hooliganism) by giving old and historic references. They hit the streets to protect their own language and culture. Police are visiting their houses again and again and beating them up like cattle to punish them for protecting their language and culture. They are tolerating it quietly. For whom? For Maharashtra! For India! It is fashionable for intellectuals here to blame my party for the unsolved problem of Marathi identity. But am I or my party responsible for it? And if it has not been solved, is it wrong to struggle for it? For several decades, the mind of Maharashtrians is struggling to solve the Belgaum border issue. There have been several struggles on several levels. But the problem is where it was. Now, are you going to suggest that Maharashtrians should keep quite by presuming that the problem has been solved? Whether it is the question of Palestine or Tamils, European countries and dada countries like America and the U.N. have not been able to solve them for several decades. Have they given up their efforts to solve these problems? Or have they withdrawn by presuming that the problem does not exist? And your last point, Sudheendraji. You have said that I was tempted to launch this agitation in order to get instant and wide publicity for my party. Some arrogant journalists and intellectuals have called it a political stunt. Sudheendraji, frankly speaking, I am not interested in publicity, impact, political benefits and votes. Such success is easily got by political compromise. I don't speak to journalists for months together. I organise meetings and study developmental issues. Journalists then ask 'has Raj Thackeray formed a political party or an NGO?' When I concentrate on organisational matters and ignore other immediate things, journalists ask 'is Raj Thackeray building a party or a house?' (which is my means of livelihood). Then, when I respond to my inner voice and hit the street, journalists say 'this is Raj Thackeray's stunt for publicity'. Sudheendraji, I have learnt to digest all this. I only respond to my inner voice. You may call it anything. Sudheendraji, I hope you are satisfied. I have selected Maharashtra as my area of work. Some inherent deficiencies have to be removed to make Maharashtra magnificent and progressive. For constructing a new building, some soil has to be dug for laying the foundation. From this very Maharashtra, a great man had challenged the Mughal empire with the help of 15-50 colleagues. (I don't intend to compare myself with Chhatrapati Shivraya, lest Maharashtra's intellectuals come down on me). The grave of the powerful Mughal emperor -- Aurangzeb -- exists in Daulatabad in Maharashtra. Riding on the storm created by his 15-50 companions, the great man laid the foundation of an empire. That was the Maratha empire. I pray to Shivaji to lend me and my colleagues at the Maharashtra Navnirman Sena a fraction of himself. I am ending this informal letter with the hope that you will wish us well. Jai Maharashtra Raj Thackeray (Translated by Rakshit Sonawane)
|
सतिशजी, मी तीस वर्षे उत्तरेत काढून आता महाराष्ट्रात दोन वर्षापूर्वी परत आलो आहे.त्यामुळे तुलना करणे स्वाभाविक आहे.मला ही परिस्थिती कित्येकदा निरुत्तर करते कारण सत्तरीच्या दशकात योग्य नोकरी न मिळाल्याने बाहेर पडलेल्या तरुणांपैकी मी एक होतो व तत्सम अंग मेहनतीची कामे-भट्टी लोड करणे,अवजड माल हलवणे इ मी स्वत्: करून उच्च शिक्षण ही प्राप्त करून घेतले.त्यामुळे मला चीड येते.
|
Ajjuka
| |
| Monday, February 25, 2008 - 3:48 am: |
| 
|
कालच्या लोकसत्ता मधे आहे हे पत्र. आणि मला वाटतं हे पत्र अत्यंत योग्य आहे.
|
रवि उपाध्ये, तुमच्या भावना समजल्या. तुमची चीड समजण्यासारखी आहे.
|
http://www.rediff.com/news/2008/feb/26rspoll.htm बघू आता भूमिपुत्रांचे स्वयंभू, स्वयंघोषित आणि तथाकथित रक्षणकर्ते याचे कसे समर्थन करतील ते! जय हिंद! जय महाराष्ट्र!!
|
Satishbv
| |
| Wednesday, February 27, 2008 - 5:47 am: |
| 
|
आज मराठी भाषेचे एक तपस्वी साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणजेच मराठी राजभाषा दिन. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरीच हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी कवी सुरेश भट http://www.saamana.com/2008/Feb/27/agralekh.htm
|
मराठी असे आमुची मायबोली जरी आज हि राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे, जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी, मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या तीस केवी त्यजी जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी, मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी, असूं दूर पेशावरीं उत्तरीं वा असू दक्षिणी दूर तंजावरी, मराठी असे आमुची मायबोली अहो ज्ञानदेवीच देखा खरी. मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं, पुरी बांणली बंधुता अंतरंगी,हिच्या एक ताटांत आम्ही बसूं, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र ह्रन्मंदिरी, जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरीं. हिच्या लत्करांची असे लाज आम्हां,नका फकत पाहू हिच्या लत्करां, प्रभावी हिचे रुप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा, न घालूं जरी वाड्ग्मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने, "मराठी असे आमुची मायबोली "वृथा ही बढाई सुकार्याविणे. मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली, हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं, तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्ने नियोजूं तयांना हिच्या मंडणीं, नको रीण देवोय देतील तेंव्हा जगांतील भाषा हिला खंडणी. समस्त मायबोलीकरांस मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
मराठी ही माझी मातृभाषा आहे. मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे. माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन. इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन. त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत. जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत. महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे. मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन. महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन. मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन. मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे. जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!
|
Ladtushar
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:54 am: |
| 
|
वक्ती स्वतन्त्रावर महा. शाशनाची गदा !!
http://www.loksatta.com/
|
आधी महाराष्ट्रात मराठी बंधुभाव जागवा!- प्रताप आसबे जे मराठी बांधव राज्याच्या हिताची पर्वा न करता परस्परांच्या उरावर बसायला मागेपुढे पाहत नाहीत अशांना परप्रांतीयांविरुद्ध बोलण्याचा हक्क कसा पोहोचतो, असा प्रश्न कृष्णा खोऱ्यातील पाणी अडवण्याच्या प्रश्नावर राज्यातच असलेल्या मतभेदांवरून पडतो. ... सध्या मराठीचा इतका बोलबाला सुरू झाला आहे की, मराठी माणसाचा ऊर भरून आला आहे. महाराष्ट्र आणि मराठी या दोन शब्दांचा उत्तरेत आता धसकाच घेतला जात आहे. पूवीर् भांबड आले भांबड आले, अशी भीती दाखवत मुलांना झोपी घातले जाई, तसा या दोन शब्दांचा वापर उत्तरेतील आया करायला लागतील. मराठी या शब्दाची जरब निर्माण झाल्यानेच बिहार विधानसभेत राज्यपाल रा. सू. गवई यांच्या अभिभाषणाच्या वेळी त्यांच्या विरोधाच्या घोषणा झाल्या. सोमवारी सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनातही अशाच प्रतिक्रिया उमटल्या तर आश्चर्य वाटायला नको. मनसे नामक पक्षाने गदारोळ उठविल्याने माय मराठीला बरे दिवस आले, यात शंकाच नाही. पण मराठीला बरे दिवस आल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आपण बासनात बांधून अगदी तळघरात ठेवलेला हा हक्काचा ऐवज कोणी हिरावून घेऊ नये, यासाठी आता सेनेनेही मराठी दिनाचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे. एरवी मराठी दिन कधी साजरा झाला, हेही कोणाला कळत नव्हते. पण मुंबई, नाशिकमधल्या प्रकाराने मराठीला एकदम बरे दिवस आले असावेत, असे दिसते. मराठीला बरे दिवस आले तर मराठी माणसांत आता प्रेमाची, बंधुभावाची भावना निर्माण व्हायला हरकत नाही. तशी ती निर्माण झाली तर महाराष्ट्राचे ऐक्य अबाधित राहील. गेली आठ-दहा वषेर् महाराष्ट्रात जे तंटे चालू आहेत ते पाहता हे राज्य आणखी किती दिवस टिकेल, असाच प्रश्ान् पडत होता. राज्यातील सगळे प्रादेशिक विभाग परस्परांच्या विरोधात भांडत होते. कृष्णा खोऱ्याचे पाणी मुदतीत अडवायचे असल्याने १९९५ साली युती सरकारने धरणे बांधण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतला होता. पाणी २००० सालाच्या मुदतीत अडविले नसते, तर राज्याचा त्या पाण्यावरचा हक्क गेला असता. राज्याच्या वाट्याला आलेल्या ५८५ टीएमसीमधील फारच कमी पाणी अडविले गेले होते. त्यामुळे युद्धपातळीवर पाणी अडविले नसते तर न अडविता राहिलेले पाणी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या वाट्याला जाण्याची शक्यता होती. प्रश्ान् राज्याच्या हिताचा असल्याने चढ्या व्याजदराने कर्जरोखे काढून पाणी अडविण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला होता. पण सिंचनाचा सगळा निधी पश्चिम महाराष्ट्राकडेच चालला आहे, अशी ओरड सुरू झाली. राज्यात प्रगत आणि मागास, असे विभाग होते. खरे म्हणजे कोल्हापूर जिल्हा वगळला तर उर्वरित सबंध पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळग्रस्तच होता. पण सहकार आणि सिंचनाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राने प्रगती केली. त्यातून प्रगत आणि मागास भागांतील दरी आणखी वाढली. मागासभागाचा अनुशेष दूर करण्याचे प्रयत्न चालू होते. पण आधी मागासभागाचा अनुशेष दूर करा, असा आग्रह मराठवाडा आणि विदर्भाच्या सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी धरला. त्यातून अलेक्झांडर हे राज्यपाल असताना त्यांनी अनुशेष दूर करण्यासाठी निधीची वाटणीच करून दिली. खरे पाहता सिंचनाच्या बाबतीत समानता कधीच येणार नाही; कारण पाणी अडविण्यासाठी योग्य ती ठिकाणे अस्तित्वात असतील तरच धरणे बांधता येतात. शिवाय पाण्याच्या संबंधात नैसगिर्करीत्याच असमानता आहे. त्यामुळे शेती आणि पिण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्यावर केला जाणारा खर्च समान असावा, अशी मागणी एकवेळ समजू शकते. आता विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांत तीन लाख शेततळी निर्माण करण्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पण हे पाण्याचे व्यवस्थापन असल्याने हा निधी अनुशेषातून वजा करता नये, असा युक्तिवाद करण्यात येतो. अशी दुराग्रही भूमिका घेतल्यावर तो अनुशेष कधीच दूर होणार नाही आणि राज्याच्या हितासाठी कृष्णेच्या पाण्याचा वाढीव वाटाही मागता येणार नाही. सिंचनातील समानतेचा आग्रह एकवेळ मान्य जरी केला तरी राज्याच्या वाट्याला आलेले पाणी राखणे, हा राज्याच्या व्यापक हिताचा प्रश्ान् होता. पण कृष्णेचे पाणी अन्य राज्याला गेले तरी चालेल, पण आमचे सिंचनाचे प्रकल्प आधी पूर्ण करा, अशी दुराग्रही भूमिका घेतली गेली. यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप या सगळ्याच पक्षाच्या पुढाऱ्यांचा समावेश होता. विधिमंडळाच्या सभागृहांत तर इतकी द्वेषपूर्ण भाषणे होत होती की नळावरची भांडणेही फिकी पडावीत. त्यामुळे कशाला संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला आणि १०५ हुतात्म्यांनी हकनाक प्राण दिले, असा प्रश्ान् पडत होता. राजकीय पक्षातच प्रादेशिक दुफळ्या निर्माण झाल्या होत्या. खुशाल विदर्भ वेगळा करा, मराठवाडा वेगळा करा, अशा मागण्या होत होत्या. एकाच राज्यातील मराठी भाषा बोलणारे लोकप्रतिनिधी परस्परांना शत्रूप्रमाणे पाण्यात पाहत होते. राज्यपालांनी घातलेल्या निर्बंधांमुळे आणि आघाडी सरकारच्या नाकतेर्पणाने अजूनही ५८५ टीएमसीमधील ५८ टीएमसी पाणी अडवायचे बाकी आहे. आता कृष्णेच्या पाण्याबाबतचा दुसरा लवाद बसला असून अतिरिक्त पाण्याच्या हिश्श्यासाठी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात जबरदस्त स्पर्धा सुरू झाली आहे. अशावेळी या राज्यांनी महाराष्ट्राला आधी दिलेले सगळे पाणी वापरले नाहीच उलट अडविलेही नाही, असा आक्षेप त्या दोन राज्यांनी घेतला आहे. त्यामुळे त्या अतिरिक्त पाण्यातील वाटा महाराष्ट्राला किती मिळेल, याची शंकाच आहे. आंध्र व कर्नाटकाच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाराष्ट्राने बचावात्मक भूमिका घेतली असून राज्याच्या वाट्याला आलेले आधीचे पाणी आम्ही अडविणार आहोत व त्यासाठी आम्ही दोन वर्षांत १७०० कोटी रुपयांची तरतूद करू, असे प्रतिज्ञापत्र केले आहे. पण आता हे पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्ान् निर्माण झाला आहे; कारण सिंचनासाठी कोणतीही तरतूद करताना राज्यपालांचे निकष पाळणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन झाले तर लगेच प्रादेशिक वाद शिगेला पोहोचतात. अशा विखारी वातावरणात न्यायाने महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे पाणीही येऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. उद्या ते गेले तर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील लोक कायमचे पाण्याला मुकणार आहेत. पण याचा विचार करण्याऐवजी पाणी गेले तर जाऊ द्या, अशीच सगळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांची मते आहेत. प्रादेशिक वाद अत्यंत खालच्या पातळीवर गेलेला असताना राज्यकतेर्ही उघड्या डोळ्याने तमाशा पाहात होते. हे चुकीचे चालले आहे, असे एकाही पक्षाचा नेता सांगायला तयार नव्हता. मराठीबद्दल जे तावातावाने बोलत असतात, तेही मूग गिळून होते. मुख्यमंत्री हे कुठल्यातरी परराज्यात चालले आहे, अशा तिऱ्हाईतपणे पाहत होते. उत्तर भारतीय तसेच परप्रांतीय यांच्या विरोधात आक्रमक भाषा वापरली आणि हिंसक आंदोलने केली म्हणजे मराठी भाषिकांत प्रेम आणि बंधुभाव निर्माण होईल, असे नाही. उलट जे मराठी बांधव राज्याच्या हिताची पर्वा न करता परस्परांच्या उरावर बसायला मागेपुढे पाहत नाहीत अशांना परप्रांतीयांविरुद्ध बोलण्याचा हक्क कसा पोहोचतो, असा प्रश्ान् आहे. परप्रांतीयांच्या विरोधात चाललेला हा गदारोळ एकदा निवळला की पुन्हा विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि कोकण हे वाद उफाळून येणार आहेत. तेव्हा मराठी माणसे महाराष्ट्राची नव्हे तर त्या त्या प्रदेशाची होणार आहेत. मराठीचा कळवळा असलेल्या नेत्यांनी परप्रांतीयांविरुद्ध भांडण्याआधी महाराष्ट्रातील प्रादेशिक आणि सामाजिक अंतविर्रोध संपवावेत. राज्याचे ऐक्य अभेद्य राहील, मराठी बांधवांत किमान प्रेम निर्माण होईल, याची काळजी घेतली तर राज्यावर उपकार होतील; कारण तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठी माणसाला दुसऱ्या मराठी माणसाची दु:खे जाणवतील.
|
एका वेगळ्या दृष्टिकोनातुन लिहिलेला आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा प्रामाणिक लेख, ज्यावर प्रत्येक मराठी माणसाने व नेत्याने विचार करुन आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Sameer_dk
| |
| Thursday, February 28, 2008 - 1:44 pm: |
| 
|
मराठी /केरळि माणसे बाकि सगळ्या प्रान्तियापेक्शा जास्ति शिकलेले असल्यामुळे अन्ग मेहनतिचे काम करत नाहित,त्यामानाने उत्तरप्रान्तिय कमि शिकलेले आणि जिवनावश्यक वस्तुचा अभाव असल्यामुळे त्याचासमोर दुसरा उपाय नाहि म्हणुन तो अन्ग मेहनतिचे काम करतो,ह्यात तेथिल राजकारण आणि ते करणारे नेत्यान्चि चुक आहे पण उत्तरप्रान्तिय मेहनतिचे काम करण्याकरिता बाकि सगळ्या प्रान्तात स्वप्रान्तिया इतकेच जरुरि झाले आहेत. आणि मराठि माणसाला जास्ति शिकलेले असल्यामुळे स्वता:हाच्या अपेक्षेप्रमाणे काम मिळण्यासाठि दुसर्र्य (हे कसे लिहायचे) प्रान्तात जावे लागते आहे जर कोणत्याहि मराठि राजकारण्याला परप्रान्तिय नको असतिल तर त्याने आपल्या प्रान्तात मराठि माणसान करिता तितक्याच सन्खेने जोब आहेत का हे पहावे. आणि शारिरिक मेहनतिचे काम जितके आहे त्या हिशोबानि आपल्या कडे हि कामे करण्याकरिता तेवढि लेबर (हि कामे फ़क्त कमि किवा न शिकलेलेच करतात) आहेत का? हे पाहुन मगच राजकारण करावे. मार्ठोक जर मराठि माणसा बरोबर परप्रान्तिय करु लगले तर त्यान्चि रक्शनाचि जबाबदारि कोणाचि
|
दुसर्या dusaRyaa समीर तुमचे म्हणणे पूर्णत्: योग्य आहे परंतु शिक्षित माणसाने अंग मेहेनतीचे काम करू नये अथवा त्याने न करणे योग्य आहे हे मात्र बरोबर नाही.
|
Sameer_dk
| |
| Friday, February 29, 2008 - 3:01 am: |
| 
|
धन्यवाद Raviupadhye मलापण असे बिलकुल म्हणायचे नाहिये कि शिकलेल्यानि मेहनतिचे काम करु नयेत. पण मराठि आणि अर्धवट शिकलेल्या किति जणाना तुम्हि अशि काम करिताना पाहिले आहे, तुमच्या पोस्ट वरुन तुम्हि पण कोणत्यातरि उत्पादन कार्यातच असाल असे वाटते आणि ज्या कामाला आपण लेबरस वर्क म्हणतो अश्या जागेवर किति जण अशे अर्धवट शिकलेले मिळतात,अगदिच कमि पण तितकेच शिकलेले (पण IQ मराठि माणसा कमि असल्याने असेल)उत्तरप्रदेश्बिहारि हिच कामे आनन्दाने करतात मराठि कमि शिकलेला हा ITI करुन मग इन्डस्ट्रि मधे येतो पण प्रत्येक ठिकाणि ITI चि गरज नसल्याने त्याना प्राधान्य द्यावे लागते कारण एकच कमि पैशात कमि त्रासात तेच काम
|
Shravan
| |
| Friday, February 29, 2008 - 11:04 am: |
| 
|
काही तरी चांगले होते आहे असे म्हणायला वाव आहे. (?) लोकसत्तातील बातमी: http://loksatta.com/daily/20080229/mum11.htm राज ठाकरे यांची आंदोलनामागची भुमिका: राजू परुळेकरांनी हि मुलाखत घेतली आहे (लोकप्रभा)आणी त्यांनतर त्यांना जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. http://loksatta.com/lokprabha/20080222/cover.htm ता.क.: मी कोणत्याही राजकिय पक्षाशी निगडीत अथवा संबधीत नाही.
|
जयमहाराष्ट्र तू टाकलेले दोन्ही लेख मस्त आहेत. राजने चांगला पटणारा स्टॅंड घेतलाय. परवा मराठी दिनानिमित्त त्यांना मुंबई विद्यापीठात बोलावले होते (पण त्यांना भाषण करायला बंदी आहे. त्यामुळे फक्त पत्रकं वाटली.) त्यावरही (अमराठींच्या आणि तथाकथित सेक्युलरांच्या) प्रतिक्रिया म्हणे एखाद्या लेखकाला का नाही बोलावले? राजकारण्याला का बोलावले? आता या लोकांनी राजलाच बोलवायला हवे होते असे नाही(किती तो आगाऊपणा! ) पण हे दुसरे लोक कोण सांगणारे? शरद पवारांना बोलावले असते तर आक्षेप घेतला असता का? आम्ही विचारतो का की छटपूजेला राजकारण्यांचे काय काम? पुजार्यांना आणि भटजींना बोलवा. अरेवारेवा!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|