|
मुकुंद क्या बात है!!!!!!! अहो तुम्ही केलेल वर्णन म्हणजे लाईव्ह शर्यत बघण्यापेक्षाही जास्त रोमांचकारक ठरत. सुंदर!!!!इतकी छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद!!!!
|
Zpratibha
| |
| Friday, February 22, 2008 - 9:59 am: |
|
|
क्रिडा ह्या प्रकाराची फारशी आवड नसतानाहि तुम्ही ह्या बी बी वर येण्यास मला भाग पाडताय ह्या पेक्षा जास्त काय लिहु? सध्या मी ऑलंपिक वाचत नाहिये, पाहतेय. पुन्हा एकदा खरच आभारी आहे.
|
Akhi
| |
| Friday, February 22, 2008 - 10:07 am: |
|
|
जबरदस्त!!!! जबरदस्त!!!! जबरदस्त!!!! जबरदस्त!!!!
|
Psg
| |
| Friday, February 22, 2008 - 10:58 am: |
|
|
सहीऽऽऽऽऽ काय सुरेख वर्णन! मी हे काँपवर वाचत आहे असं वाटलंच नाही.. मी तिकडे तलावावरच होते.. सुरेख! मुकुंद, तुला खास बक्षिस द्यायला पाहिजे या बीबीसाठी- सर्वोत्तम बीबी म्हणून
|
Ashwini
| |
| Friday, February 22, 2008 - 11:10 am: |
|
|
मुकुंद, अप्रतिम वर्णन. सुरेख ओघवती, रोमांचकारक भाषाशैली. फार छान वाटतय वाचायला.
|
Lampan
| |
| Friday, February 22, 2008 - 11:16 am: |
|
|
thats the best of all the bb's i've ever read वाचताना जर एवढं थरारक वाटत असेल तर ते ज्यानी अनुभवलं आहे ती तर जवळ-जवळ मोक्शापर्यंत जाउन आलेली लोकं असतील ... मुकुंद तुमच्या एवढ्या सुंदर लिखाणबद्दल मनापासुन धन्यवाद ... नाहीतर एवढंसगळं एका ठिकाणी मिळणं काय शक्य होतं ( आतातर काय शक्य होतं हे लिहायचीही लाज वाटते हे सगळं वाचल्यावर )
|
Itgirl
| |
| Saturday, February 23, 2008 - 2:14 am: |
|
|
काय जबरदस्त लिहायची शैली आहे मुकुंद!! सहीच!! शर्यत प्रत्यक्ष पाहिल्यासारखं वाटल अगदी!!
|
Sheshhnag
| |
| Saturday, February 23, 2008 - 2:31 pm: |
|
|
मुकुंदजी, केवळ अप्रतिम! मायबोलीच्या पहिल्या पानावर पाहिल्यावर सहज काय आहे म्हणून पान उघडले, या बा. फ. च्या प्रेमातच पडलो आहे. तुमचं लिखाण कसं आहे, हे इतर वाचकांनी नमूद केलंच आहे, पण इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणजे या सर्व कहाण्या ध्येयवेडी माणसं काय करू शकतात याची उदाहरणं आहेत. प्रांजळपणे सांगायचं तर मी आजपर्यंत एकही ऑलिंपिक पाहिलं नाही की, त्यात कधी रस दाखवला नाही. मी किती मूर्ख होतो ते हे वाचताना कळतय. ऑलिंपिकच्या मी आता प्रेमात पडलोय. शतश्: धन्यवाद! त्या व्हिसिडी कुठे मिळतील? कुणी सांगेल?
|
Mukund
| |
| Sunday, February 24, 2008 - 2:27 pm: |
|
|
श्रद्धा... खर सांगु? खर म्हणजे तु,पुनम,अश्विनि,दिनेशदा,दाद,दिव्या,प्रशांत,मिल्या,वैभव,हवाहवाई,शैलजा,नंदिनी.... हे तुम्ही सगळे सुंदर व वैविध्यपुर्ण लिखाण करणारेच या आपल्या मायबोलिचे खरे मानाचे मानकरी आहात.. आणी तुमच्यापैकी बरेच जण इथे येउन माझी लेखनशैली तुम्हाला आवडली असे लिहीता यात खर म्हणजे तुमचाच मोठेपणा आहे. पुनम... अग तुमच्यासारखे इथे येउन माझे लिखाण आवडले असे लिहीतात त्यापेक्षा अजुन मोठे बक्षिस काय असु शकते?झालच तर तु,श्रद्धा,प्रतिभा,रमणी,दिपाली,मंजु,चिन्मय,अमेय,आर्च,रुनी,राणी,संघमित्रा,श्रावण,केदार,अमृता,रवी उपाध्ये,शैलजा,उपास,अद्वैत,झकास,शेषनाग व मिराधा यांनी इथे दिलेल्या प्रामाणिक अभिप्रायात जे लिहीले आहे त्यापेक्षा अजुन मोठे बक्षिस असु शकेल काय? मी मनापासुन लिहीलेले या बीबीवरचे लिखाण तुम्हा सगळ्यांना आवडते असे तुम्ही लिहीत असलेल्या अभिप्रायाबद्दल... अमृता म्हणते त्याप्रमाणे... परत परत धन्यवाद लिहीत नाही.... तरी लक्षात असु द्या की तुमच्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. तुम्हाला जर कंटाळा नसेल आला तर माझ्याकडे ऑलिंपिक्सच्या अश्या अनेक आठवणींचा साठा आहे की जो तुम्हाला आम टिव्हीवर कधीच बघायला मिळणार नाही. झकास,चिन्मय,अमेय,मंजु,अद्वैत,शेषनाग... तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडल्या हे वाचुन आनंद झाला. जसा जसा वेळ मिळेल तसा तसा एक एक गोष्टी लिहीत जाइन.आवडल्या तर जरुर कळवा... अश्विनि.. तुझे आभार मानु का? (एकेकाळी मला आवडत असलेल्या व...७ वेळा साय यंग जिंकणार्या... व ज्याची सुरुवात बॉस्टनमधे झाली.... अश्या रॉजर.. द रॉकेट... क्लिमन्सचे सेनेटमधे निघालेले धिंडवडे पाहुन खुप खुप वाइट वाटले.. द गाय हॅज मेड सम बोनहेड डिसीजन्स इन हिज लाइफ़! तुला इ मेल करीनच.. बेसबॉल ट्रेनींग कॅंप सुरु झाले आहेत...) दिनेशदा... नाही हो.. त्या प्रकाराबद्दल मला जास्त माहीती नाही. खुपच सब्जेक्टिव्ह स्पर्धा आहे सिन्क्रोनाइज्ड स्विमींग म्हणजे.... जिमनॅस्टीक्स पण सब्जेक्टिव्हच असते पण निदान ती जमीनीवर पाहायला मिळते.. पण या प्रकारात अर्धा वेळ ते पाण्याच्या खालीच असतात त्यामुळे निटसे कळत नाही. पण त्यातही प्रचंड कौशल्य लागते यात वाद नाही. तसा हा प्रकार गेले ३-४ ऑलिंपिक्समधेच सुरु झाला आहे.त्याच्यातली चुरस काय असते याचा मला अजुनही उलगडा झालेला नाही. र्हिदमीक जिमनॅस्टीक्स हाही तश्यातलाच एक प्रकार..
|
Mukund
| |
| Sunday, February 24, 2008 - 6:02 pm: |
|
|
मित्रांनो ही पुढची गोष्ट आहे १९९२ बार्सीलोना ऑलिंपिक्स मॅरेथॉन शर्यतीची... ही गोष्ट ती शर्यत कोण जिंकला त्याच्याबद्दल नसुन.... ती अश्या एका जगावेगळ्या ऍथलिटबद्दल आहे की... ज्याने ती शर्यत न जिंकुनही... माझे मन जिंकले आहे! ऑलिंपिक्सच्या रिवाजाप्रमाणे मॅरेथॉन शर्यत ही ऑलिंपिक्स स्पर्धांच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सुरु होणार होती.या शर्यतीतील ३४ स्पर्धकांमधे एक नाव होते.... पियांबु टुल.... ऑलिंपिक्सच्या मॅरेथॉन शर्यतीत आज इतिहास घडत होता...पियांबु टुलच्या नावाने आज प्रथमच एक मंगोलियन ऍथलिट मॅरेथॉन शर्यतीत भाग घेत होता. या आधी मंगोलियाने आपले स्पर्धक फक्त कुस्ती या प्रकारात पाठवले होते.त्यामुळे आज साहजीकच पियांबु टुलकडे सर्व मंगोलिया देश आपुलकीने व गर्वाने पाहात होता. तो कसा धावतो याची त्याच्या देशातल्या सगळ्या लोकांना खुप उत्सुकता होती व ते या शर्यतीकडे डोळे लाउन बसले होते. पियांबु टुल व बाकीचे ३३ स्पर्धक मेन बार्सीलोना ऑलिंपिक्स स्टेडिअममधुन ठिक ५ वाजता एक एक असे करत बाहेर पडत होते. सगळ्यांनी हळुहळु आपापला र्हिदम पकडला व ते बार्सीलोनाच्या रस्त्यावर ४२ किलोमिटर्सच्या दिर्घ पल्ल्याला मार्गस्थ जाहले.पण पहिल्या २ किलोमिटरमधेच पियांबुला व सर्व मंगोलिया देशाला कळुन चुकले की बिचारा पियांबु जगातल्या बाकीच्या कसलेल्या मॅरेथॉनपटुंपेक्षा खुपच हळु आहे. एक एक करत सगळ्यांनी पियांबुला मागे टाकले. ३ किलोमिटरनंतर पियांबु एकटाच बार्सीलोनाच्या रस्त्यावरुन हळु हळु धावत होता. त्याच्यामधे व बाकीच्या ऍथलिटमधे मैलागणीक अधिकाधिक अंतर पडु लागले. पण पियांबु नाउमेद न होता त्याला जमेल तश्या वेगात आपली वाटचाल करतच होता. सव्वादोन तासानंतर कोरियाचा हवांग यंग चो मेन ऑलिंपिक्स स्टेडिअममधे १००,००० प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रवेशकर्ता झाला. त्याने विक्रमी वेगात सुवर्णपदक मिळवुन सगळ्यांची वाहवा मिळवली.पण इकडे सुवर्णपदक विजेता हवांग यंग चो जेव्हा अंतिम रेषा पार करत होता त्यावेळेला तिकडे बार्सीलोनाच्या रस्त्यावर.. सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर... मंगोलियाच्या पियांबुने मात्र अजुन अर्धे अंतरसुद्धा काटले नव्हते!... त्याची ती कासवाची गती व त्याची होणारी दमछाक पाहुन पुष्कळ लोकांना त्याची दयाच नाही.... तर त्याची काळजीही वाटु लागली की हा माणुस ही शर्यत पुर्ण करु शकेल की नाही?पण पियांबु मात्र मोठ्या चिकाटीने हळु हळु का होइना.. पण धावतच होता. मधुन मधुन तो आपल्या मनगटातल्या घड्याळाकडेही नजर टाकत होता...म्हणजे त्याला त्याच्या वेगाची निश्चीतच कल्पना येत होती... इकडे मंगोलियातील सर्व लोकांना त्यांचा लाडका पियांबु शर्यत पुर्ण करणार की नाही याची काळजी असताना तिकडे मेन ऑलिंपिक्स स्टेडिअम मधे ऑलिंपिक्स संयोजकांना एक वेगळीच काळजी वाटत होती! ऑलिंपिक्स स्पर्धेचा सांगता समारंभ ठिक ९ ला सुरु करायचा होता. त्याचे लाइव्ह प्रक्षेपण जगभर होणार होते. त्या तिन तासांच्या झगमगत्या समारंभात अनेक नृत्ये असणार होती. अश्या या भव्य दिव्य सांगता समारंभाला स्टेडिअमच्या ट्रॅकवर त्यांना फ़र्नीचरची मांडणी करायची होती. पण पियांबुच्या शर्यतीतल्या वेगाकडे पाहुन त्यांना कळले की त्या वेगात पियांबु काही १० च्या आधी स्टेडिअममधे येउ शकणार नाही. तेवढा वेळ सांगता समारंभ सुरु करायला थांबणे शक्यच नव्हते... एन.बी.सी. चे कॅमेरे थेट प्रक्षेपणाला तयार होते. मग या समस्येला उपाय म्हणुन घाइघाइने.... बार्सीलोना ऑलिंपिक कमीटीने एक नियम लिहुन... तो ताबडतोब पास करायचा निर्णय घेतला... तो नियम असा की मॅरेथॉन शर्यत संपवायला जर कोणी ४ तासापेक्षा जास्त वेळ घेतला तर तो स्पर्धक.... शर्यत मेन ऑलिंपिक्स स्टेडीअम मधे न संपवता... शेजारीच असलेल्या सरावाच्या स्टेडीअममधे संपवेल! झाल! ठिक ९ वाजता झगमगता समारंभ मेन ऑलिंपिक्स स्टेडिअममधे सुरु झाला. १००,००० प्रेक्षक त्या समारंभाचा आनंद लुटत मग्न होते. जगभरचे लोक... त्या भव्य दिव्य समारंभाचे थेट प्रक्षेपण... त्यांच्या घरात बसुन बघत होते. इकडे मात्र दमलेला बिचारा पियांबु... मजल दरमजल करत... साधारणपणे १० वाजता मेन ऑलिंपिक्सच्या आवारात येउन पोहोचला. तो जेव्हा मेन ऑलिंपिक स्टेडिअमच्या प्रवेशद्वाराकडे जाउ लागला तेहा लगेच एका ऑफ़िशियलने एका ट्रान्सलेटरच्या मदतीने त्याला मेन ऑलिंपिक्स स्टेडिअमच्या मागे असलेल्या छोट्याश्या अंधार्या प्रॅक्टीस स्टेडीअमकडे त्या अंधारात वळवले. बिचार्या दमलेल्या पियांबुने त्याला सांगीतले त्याप्रमाणे त्या अंधार्या सरावाच्या स्टेडीअमकडे आपला मोर्चा वळवला... व जवळजवळ पाच तासानंतर त्या अंधारात... बाजुच्या मेन ऑलिंपिक्स स्टेडिअम मधे चाललेल्या गदारोळाच्या व झगमगाटाच्या पार्श्वभुमीवर.. आपली शर्यत पुर्ण केली!सगळे जग तो झगमगता समारंभ बघण्यात मग्न होते. मॅरेथॉन शर्यतीत शेवट आलेल्या या पियांबुकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नव्हता किंवा इंटरेस्टही नव्हता. तरीही एक औपचारीकता म्हणुन एक दोन वार्ताहर तिकडे पियांबुची मुलाखत घ्यायला आले. पियांबु अतिशय दमलेल्या अवस्थेत त्या अंधारात एका खुर्चीवर... पाणी पीत पीत... त्याच्या मानेवरचा व कपाळावरचा घाम टॉवेलने पुसत बसला होता.त्याला प्रश्न केला गेला... पियांबु?काय झाल? तु एवढा हळु हळु का धावलास? आणी तेही तुझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या दिवशी? या प्रश्नावर पियांबुने जे उत्तर दिले ते सर्व जगाला दाखवायला एन.बी.सी. चे कॅमेरे त्या अंधारात नव्हते... ते सगळे मेन ऑलिंपिक्स स्टेडिअममधला झगमगाट दाखवण्यात गुंतले होते... हे पियांबुचे दुर्भाग्य नव्हते... तर सगळ्या जगातल्या माणसांचे दुर्भाग्य होते असेच मी म्हणीन.. पियांबुने शांत सुरात त्या प्रश्न विचारण्याला सांगीतले.... तुझ्या प्रश्नातली दोन्ही ग्रुहीतके चुकीची आहेत... वार्ताहर चक्रावुन म्हणाला... म्हणजे काय? त्यावर पियांबु म्हणाला... तुम्ही असे कसे म्हणता की मी इतका हळु का धावलो? तुम्ही जर माझे आजचे टायमींग नीट अभ्यासलेत तर तुम्हाला कळुन येइल की मी नवीन मंगोलियन विक्रम केला आहे!आजपर्यंत कोणीच मंगोलियन मॅरेथॉनपटु यापेक्षा कमी वेळात धावला नव्हता! आणी तुम्ही जे म्हणता की आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस होता... तेही साफ़ चुकीचे आहे. तुम्हाला माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस कोणता होता हे ऐकायचे असेल तर मी जे काही सांगत आहे ते नीट ऐका... तुमच्यापैकी किती जणांना हे माहीत आहे की सहा महिन्यांपुर्वीपर्यंत मी दोन्ही डोळ्यांनी ठार आंधळा होतो? मी पाच वर्षाचा असताना माझी दृष्टी गेली. त्यानंतर गेली २० वर्षे मी आंधळा होतो. पण मला धावण्याची प्रचंड आवड! मी या ऑलिंपिक्स साठी गेली ४ वर्षे सराव करत होतो. त्या सरावाच्या वेळी माझ्याबरोबर माझे ८ मित्र प्रत्येकी पाच पाच किलोमिटर माझा हात घेउन पळायचे. पण सहा महिन्यापुर्वी आमच्या छोट्या गावात परदेशातुन एक फुकट वैद्यकिय पथक गावाच्या मदतीला आले. त्यातल्या एका डॉक्टरने माझे डोळे तपासले व त्याने मला सांगीतले की एका छोट्याश्या शस्त्रक्रियेने तो माझी दृष्टी मला परत देउ शकतो!... मी साहजीकच हो म्हणालो व खरच त्याने माझी द्रुष्टी मला परत आणुन दिली... शस्त्रक्रियेच्या दुसर्या दिवशी मी आयुष्यात प्रथमच माझ्या सुंदर बायकोला व माझ्या दोन गोजीरवाण्या छकुडींना माझ्या डोळ्यांनी पाहीले व मी कृतार्थ झालो... तो... माझ्या मित्रा... माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस होता!....... त्या वार्ताहराला काय बोलावे हेच सुचत नव्हते........
|
D_ani
| |
| Sunday, February 24, 2008 - 6:13 pm: |
|
|
मुकुन्द, शेवटचा परिच्छेद वाचून टचकन पाणीच आले डोळ्यात. अशी जिद्दीची माणसे तुमच्यामुळे भेटली. शतश धन्यवाद. -अनिता
|
Shravan
| |
| Sunday, February 24, 2008 - 11:55 pm: |
|
|
मुकुंद, शतश: धन्यवाद! माझ्याकडे शब्दच नाहीयेत वाचल्यावर जे वाटतंय ते व्यक्त करायला!! अक्षरश: प्रत्येक गोष्ट वाचताना अंगावर काटा फुललेला आहे..!!! आम्ही सगळेच आजकाल मायबोलीवर आल्यावर पहिले हेच पान उचकत असतो.
|
Ashwini
| |
| Monday, February 25, 2008 - 2:38 am: |
|
|
खरच रे, फार वाईट वाटले रॉकेटचे. त्याने तरी एव्हढे कशाला वाढवले ते देव जाणे. हो, केले म्हणायचे आणि सोडून द्यायचे. Andi Petit ने योग्य मार्ग स्विकारला याबद्दल देवाचे आभारच मानले पाहिजेत. पेटीटला या सगळ्यातून जाताना पाहाणं फार फार कठिण गेलं असतं. पण खरय, baseball spring training is in the air and I can already smell that...
|
Akhi
| |
| Monday, February 25, 2008 - 3:36 am: |
|
|
खरच..... टचकन डोळ्यात पाणीच आले.......
|
Psg
| |
| Monday, February 25, 2008 - 6:27 am: |
|
|
टचिंग! मुकुंद, आम्हाला कंटाळा येणं शक्यच नाही. तुला जमेल तसं तू या बीबीवर अवश्य अवश्य लिही. मी तुला म्हणलं तसं, अनेक लोक हा बीबी वाचत आहेत. इथे नवीन पोस्ट दिसलं, की 'आज कुठली कहाणी' अशी उत्सुकता लगेच वाटते, हातातलं काम संपवून कधी एकदा ती वाचतोय असं होतं. तेव्हा, तू फ़क्त लिहित रहा
|
Bee
| |
| Monday, February 25, 2008 - 7:48 am: |
|
|
पुर्वी जेंव्हा ग्रीकमधे Olympics ला सुरवात झाली त्यावेळी पुरुष नग्न वेषातच स्पर्धेत उतरत. त्यांचे खेळ आणि त्यांना बघायला फ़क्त कुमारी मुलींना परवाणगी असायची. कारण ह्या मुलींनी आपला भावी पुरुष कुठल्यातरी खेळाडू सारखा असावा असे स्वप्न त्यांनी बघायलाच पाहिजे असे त्यावेळेसच्या समाजाला वाटे. पण हे सामने बघायला विवाहीत स्त्रियांना मात्र परवाणगी नसायची. पुढे नग्न वेषात सामना होणे बंद झाले. रोममधे खूप पुर्वीपासून नग्नतेला खूप प्राधान्य मिळालेले आहे. मिकेल ऍंगेजेलोच्या काळातील खूपसे शिल्प नग्नच होते. वस्त्रासहीत जरी असले तरी ते वस्त्र पातळ असायचे व त्यातून शरिर दिसायचे तेही शिल्पकारांनी आपल्या अभिव्यक्तीद्वारे दाखविले आहे. ह्यावर इरावती कर्वेंचे एक दोन परिच्छेद मी गंगाजल मधे वाचले आहे. खूप छान लिहिले आहे त्यांनी. मुकुंद, सर्व कथा मस्त आहेत. शेवटच्या कथेबद्दल असे वाटते की ही माहिती Olympics च्या head ला नव्हती का की हा खेळाडू अंध होता म्हणून.
|
मुकुंद, इथे प्रतिक्रिया द्यायला आले की मी काय लिहायचं होतं तेच विसरते.. कधी कधी खरोखर प्रश्न पडतो, अशी माणसं असतात?? कुठून आणत असतील ते इतका मोठेपणा... इतकी जिद्द?? इतकं धैर्य?? केवळ अशक्य आहेत अशा वाटतात या सत्यकथा.. त्यातून तुमची शैली मस्त आहे... पारावर गप्पा मारणारा माणून जसं असं झालं तसं झालं... या पद्धातीने तुम्ही सांगत जाता.. खूप दिवसानी मायबोलीवर काहीतरी अभ्यासपूर्ण आणि रंजक माहिती वाचायाला मिळतेय.
|
Manjud
| |
| Monday, February 25, 2008 - 8:59 am: |
|
|
मुकुंद, फारच सुंदर. तुमचा सगळा खजिना इथे रीता करा हो, आम्ही खूप आवडीने वाचतोय. आणि तुम्ही कसले आभार मानता, हे सगळं इथे लिहिल्याबद्दल आम्हीच तुमचे आभार मानायला हवेत. बी, पियांबू स्पर्धेत खेळला तेव्हा तो दृष्टीहीन नव्हता.
|
Princess
| |
| Tuesday, February 26, 2008 - 6:57 am: |
|
|
ऑलिंपिक्स नाव वाचुनच हा बीबी मी आजपर्यंत उघडला नाही. आज सहज उघडुन पाहिला आणि... कित्येकदा वाचला तेच सांगता येणार नाही. तुमची शैली खुप सुरेख. सगळा थरार, रोमांच तुम्ही वाचकांपर्यंत पोहचवु शकताय... मानायला हवं तुम्हाला. प्रत्येक कहाणी वाचतांना जणु मी तिथे उभीच आहे असे वाटले. Hats off to you!!!
|
मुकुंद जी, शब्दाच्या पलिकडले शब्दात पकडण्याचे तुमचे अवर्णनीय कसब तुमच्या पियाम्बू या मंगोलियन मेरेथोन पटूच्या जिद्दी कथेतून आमच्या पर्यन्त पोहोचले आणि मनुष्य म्हणून वृथाच का होईना अशा माणसांचे समकालीन म्हणून अभिमान वाटला पुन्हा जियो!!!!
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|