|
Mukund
| |
| Tuesday, February 19, 2008 - 1:22 am: |
|
|
दिप्ती.. अग हा सगळा बातमीफलक पब्लिक डोमेन आहे.. तु केव्हाही ऍक्सेस करु शकतेस... आणी पुस्तकाचा विचार... ह्म्म!.. आजच्या युगात संपादक मंडळी अश्या गोष्टी छापण्यास उत्सुक असतील की नाही हे माहीत नाही... दिप्ती,शैलजा,मनिष,अमृता... परत एकदा तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक्समधील अमेरिकेच्या ४ बाय १०० मिटर्स रिले टीम बद्दल. तिकडे अमेरिकेची महिला रिले टिम जर्मनीविरुद्ध प्रचंड मोठा अपसेट विजय मिळवत असताना इकडे पुरुषांच्या शर्यतीत एक वेगळेच प्रकरण सगळ्या जगाचे लक्ष्य वेधुन घेत होते. आपल्याला आज जेसी ओवेन्स हा एकाच ऑलिंपिक्स मधे ४ सुवर्णपदके मिळवणारा पहिला ट्रॅक ऍंड फ़िल्ड ऍथलिट म्हणुन माहीत आहे.पण आता मी जी गोष्ट सांगत आहे ती गोष्टच जर घडली नसती तर जेसी ओवेन्स फक्त तिनच सुवर्णपदके मिळवुन अमेरिकेत परतला असता! त्याने त्याचे ते चौथे विक्रमी सुवर्णपदक कसे मिळवले याबद्दलही या गोष्टीत आपल्याला माहीती मिळते.खर तर या रिले टीम मधील सगळ्यांबद्दल एक एक पोस्ट होइल इतक्या गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीस अमेरिकेने ज्या चार जणांची नावे या शर्यतीकरता दिली होती ती चार नावे अशी होती... फ़्लॉइड ड्रेपर,मार्टी ग्लिकमन,सॅम स्टोलर व फ़्रॅंक वायकॉफ़. ही अमेरिकेची टीम विश्वविक्रम करुन जिंकणार हे सगळ्या जगाला ठाउक होते. आतापर्यंत झालेल्या शर्यतींमधे जर्मन ऍथलिट्सना अमेरिकेच्या क्रुष्णवर्णिय ऍथलिट्स विरुद्ध बरेच पराजय स्विकारावे लागले होते. आता त्यात भरीस भर म्हणुन या अमेरिकेच्या रिले टीममधे मार्टी ग्लिकमन व सॅम स्टोलर हे चक्क ज्यु होते! म्हणजे आता ज्युंच्या हातुन सुद्धा जर्मन खेळाडुंना पराभव पत्करावा लागणार ही काळ्या दगडावरची रेघ होती... हिटलर.. जो कट्टर ज्युद्वेष्टा होता.. त्याला व त्याच्या नाझी एस एस संघटनेला हे कदापीही सहन झाले नसते... ताबडतोब हिटलरने त्यावेळचा ऑलिंपिक प्रेसिडंट ऍव्हेरी ब्रुंडेज(जो स्वत्: ऑस्ट्रियन.. म्हणजे जवळजवळ जर्मनच!.... होता व जो स्वत्: ज्यु द्वेष्टा होता...)याला अमेरिकेच्या त्या रिले टिममधुन त्या बिचार्या ज्यु ऍथलिट्सना बाहेर काढण्यास प्रचंड दबाव टाकुन प्रवृत्त केले. अमेरिकेचे प्रशिक्षकही त्या हिटलरच्या दबावाला बळी पडले व त्यांनी शर्यतीच्या आदल्या दिवशी सॅम स्टोलर व मार्टी ग्लिकमन या दोघांचे नाव लाइन अपमधुन काढुन टाकले. ग्लिकमन व स्टोलर या एकुण प्रकाराने एकदम सुन्न झाले. त्यांच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरणार होते. त्यांच्या ऐवजी अमेरिका आता जेसी ओवेन्स व राल्फ मेटकॅफ़ या दोन क्रुष्णवर्णिय ऍथलिट्सना उतरवणार होती.जेसी ओवेन्स व राल्फ मेटकॅफ़ हे दोघे १०० मिटर्समधले सुवर्णपदक व रजतपदक विजेते होते हे जरी खरे असले तरी त्यांनी रिले शर्यतीचा काहीच सराव केला नव्हता की ज्यात बटान पास करण्याचे कौशल्यही खेळाडुत असावे लागते... इकडे शर्यतीच्या आदल्या रात्री जेसी ओवेन्स व राल्फ मेटकॅफ़ द्विधा मनस्थीतीत पडले होते. त्यांना त्यांच्या दोन टिममेट्सवर होणारा धडधडीत अन्याय अजिबात पटत नव्हता पण प्रशिक्षकांनी निर्णय घेउन टाकला होता. त्यामुळे त्यांना शर्यतीत धावणे भागच होते. त्यांनी ठरवले... तो राग मैदानावर न भुतो न भविष्यती वेगात धाउन काढायचा. अश्या निश्चयात ते निद्रेच्या स्वाधीन झाले. इकडे दुसर्या खोलीमधे त्या टिमचा ऍन्करमॅन फ़ॅंक वायकॉफ़ मात्र चिंता करत कुशी बदलत रात्रभर जागा होता. त्याच्या मनातही आयत्या वेळेला असे टीम मेंबर बदलले म्हणुन खंत होती व शंकेची पालही चुकचुकत होती... बटान पास होताना जर बटान पडले तर? नाही.. नाही... असे मी कदापीही होउ देणार नाही... असे तो स्वत्:ला वारंवार बजावत होता. फ़्रॅंक वायकॉफ़ला झोप न येण्याचे कारण समजण्यासाठी आपल्याला तो बर्लिनला कश्या परिस्थितीतुन येउन पोहोचला याचा आढावा घ्यावा लागेल.. फ़्रॅंक वायकॉफ़ खर तर १९२८ पासुन अमेरिकेच्या ४ बाय १०० मिटर रिले टिमचा एक अविभाज्य भाग होता. १९२८ च्या ऍमस्टरडॅम व १९३२ च्या लॉस ऍंजलीस ऑलिंपिक्सम्धे तोच टिमचा ऍन्करमॅन होता व त्या दोनही ऑलिंपिक्समधे अमेरिकेच्या टीमने रिले मधे सुवर्णपदक मिळवले होते. पण १९३२ नंतर फ़्रॅन्कने खेळातुन निवृत्ती घेतली व एक शिक्षक म्हणुन शाळेत नोकरी पत्करली. त्याने लग्नही केले व आपला संसार सुरु केला. एक मुलही होउन १९३५ पर्यंत तो एक संसारी पुरुष म्हणुन पुरता रमणाम झाला.पण जसजसे बर्लिन ऑलिंपिक्स जवळ येउ लागले तसतसे फ़्रॅंकच्या मनात परत एकदा ऑलिंपिक्सला जाण्याच्या इच्छेने उचल खालली. पण गेल्या तिन वर्षात त्याने एकदाही मैदानावर शर्यतीचा सराव केला नव्हता. त्याचे शरीरही बेडौल होउन शर्यतीच्या लायकीचे राहीले नव्हते. पण त्याने ठरवले की मी मनात आणले तर परत एकदा सुवर्णपदक मिळवु शकतो. त्याने त्याचा मनसुबा सगळ्या जगासमोर जाहीर केला. त्याच्याकडे पाहुन सगळे वार्ताहर त्याची खिल्ली उडवु लागले.. त्याचे प्रॅक्टिस करत असतानाचे फोटो वर्तमानपत्रात छापुन "ओल्ड फ़्रॅंक हॅज नो चांस" किंवा "फ़ॅट पापा हॅज फ़ॅट चांस टु गो टु बर्लिन!" असे हिणवणारी हेडींग ते टाकायचे.ते वाचुन कोणालाच आशा नव्हती की फ़्रॅंकची निवड अमेरिकेच्या रिले टिमसाठी होइल म्हणुन... ज्या टीममधे जेसी ओवेन्स,राल्फ मेटकॅफ़ व फ़्लॉइड ड्रेपर सारखे खंदे विर असणार होते.ते सगळे बघुन फ़्रॅंकचा स्वाभीमान डिवचला गेला..... त्याच्या इच्छाशक्तीला हे आव्हानच होते. त्याने निश्चय केला... मी सगळ्या जगाला दाखवुन देईन... "आय बिलॉंग विथ द लाइक्स ऑफ़ जेसी ओवेन्स!"पुढचे वर्षभर मग त्याने कसुन व अविरत प्रयत्न केले. त्याच्या त्या कठोर परिश्रमाला यश येउन त्याने अमेरिकेच्या रिले टिममधे चौथ्या स्थानावर येउन जागा मिळवली! बर्लिन ऑलिंपिक्सच्या ओपनींग सेरीमनीमधे तो अमेरिकेचा झेंडा हातात घेउन फ़्लॅग बेअरर म्हणुन मोठ्या गर्वाने चालत होता. लिटील दॅट ही न्यु ऍट दॅट टाइम.... ही अलॉंग विथ किटे सॉन ऍंड एलिझाबेथ रॉबिन्सन... ही इज इन अ युनिक ग्रुप ऑफ़ ऍथलिट्स इन दॅट परेड....... टु हुम द वर्ल्ड हॅड सेड.... "दे डोन्ट हॅव्ह अ चॅन्स!" अश्या परिस्थितीत फ़्रॅंक वायकॉफ़ बर्लिनला येउन पोहोचला असल्यामुळे हिटलरच्या ज्युद्वेषापायी त्याला सुवर्णपदक मुकण्याची शक्यता त्याला झोप येउ देत नव्हती. शर्यतीचा दिवस...सगळे स्पर्धक मैदानावर हजर झाले. अमेरिकेच्या टिमच्या वेगाबद्दल कोणालाच संदेह नव्हता.. सगळ्यांच्या मनात प्रश्न फक्त हाच होता की जेसी ओवेन्स व राल्फ मेटकॅफ़ बटान पास करु शकतील की नाही... इथे मेटकॅफ़ व ओवेन्सही मनाचा निश्चय करुन होते की काहीही झाले तरी त्यांच्या हातुन बटान पडण्याची चुक होउ द्यायची नाही... झाले... सेट... मार्क... व फाट्ट! असा बंदुकीचा आवाज स्टार्टर ऑफ़ीशियलने आपल्या हातातल्या बंदुकीचा चाप ओढुन काढला... जेसी ओवेन्स पहिल्या लेगमधे सुसाट सुटला... अपेक्षेप्रमाणे त्याने पहिल्याच लेगमधे कमांडींग लीड घेतला... त्याने बटान फ़्लॉइड ड्रेपरकडे यशस्वीरित्या सोपवले... ड्रेपरने दुसर्या लेगमदे लिड अजुनच वाढवला व राल्फ मेटकॅफ़कडे बटान सुखरुप हातात दिले... मेटकॅफ़ने त्याच्या मनातल्या ज्यु टीममेट्सना हिटलरने काढायला लावले याचा राग त्याच्या वार्याच्या वेगात परीवर्तीत केला... इकडे ऍन्करमॅन फ़्रॅंक वायकॉफ़च्या मनात अनेक विचारांचे काहुर माजले होते.. शेवटचे बटान ट्रांसफ़र किती प्रकारे चुकु शकते याचे पर्म्युटेशन कॉंबिनेशन त्याच्या मनात चालले होते व त्या प्रत्येक कॉंबिनेशनम्धे ती चुक तो कसा दुरुस्त करु शकेल किंवा तशा चुका न करण्यासाठी तो स्वत्: काय करु शकेल त्या शक्यतांची उजळणी मनातल्या मनात करत राल्फ मेटकॅफ़ची तो अधिरतेने वाट पाहात उभा होता..... त्याला जगाला दाखवुन द्यायचे होते... किंबहुना त्याला स्वत्:ला हे समाधान द्यायचे होते की सगळे जग जरी त्याला जिंकण्याची शक्यता नाही असे म्हणत असतानाही स्वत्:च्या इच्छाशक्तीच्या बळावर एक माणुस काय करु शकतो... तो स्वत्:ला वारंवार बजावत होता... "आय विल.. आय कॅन... आय विल... आय कॅन! शेवटी ९ सेकंदाने राल्फ मेटकॅफ़ बटान घेउन वायकॉफ़जवळ आला... वायकॉफ़ने बटान एक्स्चेंज झोनमधे बटान हातात घेण्यासाठी हात मागे करत पुढे धावण्यास सुरुवात केली... बटान पासींग झोन हा ७ मिटर्सचा असतो... पण त्यातले जवळ जवळ सहा मिटर्स संपेसपर्यंत राल्फ मेटकॅफ़ त्याच्या हातातले बटान जाउच देइना.. त्याला एवढेच माहीत होते... त्याच्या हातुन बटान पडु द्यायचे नाही.. शेवटी फ़्रॅंक वायकॉफ़ने मागे वळुन मेटकॅफ़च्या हाताला जोराचा हिसडा देउन त्याच्या हातातले बटान..... जस्ट ती सात मिटर्सची खिडकी संपायच्या आत.... अक्षरश्: त्याच्या हातातुन खेचुन काढले.... सगळे प्रेक्षक जिव मुठीत घेउन त्यांच्या डोळ्यासमोर घडणारे नाटक पाहात होते... एकदा त्याच्या हातात बटान व्यवस्थीत आल्यावर फ़्रॅंक वायकॉफ़ उरलेले १०० मिटर्स वार्याच्या वेगात धावला व शर्यत संपली तेव्हा स्कोरबोर्डवर... अमेरिकेच्या नावावर एक नवा विश्वविक्रम झळकत होता...व फ़्रॅंक वायकॉफ़ पदकवितरण चालु असताना मनातल्या मनात अमेरिकेचे राष्ट्रगीत म्हणत असताना हेही म्हणत होता...'आय विल.... आय कॅन..... ऍंड बाय गॉली... आय डिड इट!" तर अश्या या बर्लिन ऑलिंपिक्सच्या तिन गोष्टी.... ज्यात प्रत्येकाला जगाने म्हटले होते..."दे डोन्ट हॅव्ह अ चॅन्स!" असे असतानाही या तीन खेळाडुंनी जी जिद्द,जे परिश्रम, जी चिकाटी दाखवली... त्यासाठी त्यांच्या या गोष्टी आठवुन त्यांना सन्मानीत करणे हेच माझे या गोष्टी लिहिण्यामागचे उद्दिष्ट्ट होते....
|
मस्त! पोस्टागणिक तुमची शैलीही अधिकाधिक छान आकार घेतेय! ह्या गोष्टीच्या शेवटी शेवटी तर ह्रदय जोरात धडधडत होतं ही ती शर्यत बहुतेक.
|
Ramani
| |
| Tuesday, February 19, 2008 - 4:27 am: |
|
|
ही लिन्क बघा. http://www.youtube.com/watch?v=QDkaOSGDweU
|
Akhi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 4:27 am: |
|
|
खुप सुंदर. हितगुज मधला सगळ्यात छान BB . शर्यतिच जिंवत वर्णन जणु मीच बघत होते प्रेक्षकांमधे बसुन......... superb
|
Admin
| |
| Tuesday, February 19, 2008 - 5:08 am: |
|
|
तुमच्या मायबोलीवर दिलेल्या इमेलवर एक संदेश पाठवला होता ७-८ दिवसांपुर्वी, तो जरा बघणार का? तुमचं इतकं छान लेखन नीट एकत्र रहाण्यासाठी काही सुचवायचं होतं
|
Meeradha
| |
| Tuesday, February 19, 2008 - 3:41 pm: |
|
|
खरच सर्वात सुंदर बी बी रोज वाचल्याशिवाय रहावतच नाहि.मी तर परत परत वाचुन काढते आहे.खुप छान स्फ़ुर्तीदायक लिखाण.
|
Itgirl
| |
| Tuesday, February 19, 2008 - 3:59 pm: |
|
|
मुकुंद, सुरेखच वर्णन!! अगदी डोळ्यासमोर घडतय अस वाटत वाचताना!!
|
Amruta
| |
| Tuesday, February 19, 2008 - 5:56 pm: |
|
|
मुकुंद, सारख धन्यवाद देउ नका हो. इतक मस्त लिहिताय कि प्रतिक्रिया ह्या येणारच आहेत.
|
Runi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 6:14 pm: |
|
|
मुकुंद केवळ अप्रतिम, प्रत्येक शब्द वाचतांना घटना डोळ्यासमोर घडताहेत असे वाटतं. अंगावर अगदी रोमांच उभे रहातात तुमच लिखाण वाचतांना.
|
Farend
| |
| Tuesday, February 19, 2008 - 9:27 pm: |
|
|
मुकुंद मस्त वर्णन आहे. आजच सुरूवात केली आणि अजून फक्त झाटो पेक पर्यंतच पोहोचलो (वाचण्यात ) आहे. असे क्रिकेट वर्ल्ड कप बद्दल लिहिलेस तर वाचायला काय मजा येईल
|
Upas
| |
| Tuesday, February 19, 2008 - 11:27 pm: |
|
|
मुकुंद केवळ अप्रतिम, समालोचन देणे किंवा ह्या ओलेंपिकच्या वेळी स्तंभलेखन करणे तुला वेळेनुसार शक्य होईल काय.. Simply great! प्रत्येक घटनेच्या मागची पार्श्वभूमी तू इतकी जबरदस्त सांगतोयस की त्यामुळे ह्या खेळाडूंच्या मनःस्थितीचा अचूक अंदाज सुद्धा बांधता येतोय.. सगळं आमच्यापर्यंत पोहोचवतोयस म्हणून खूप सारे आभार!
|
Akhi
| |
| Wednesday, February 20, 2008 - 4:27 am: |
|
|
वा उपास, मस्त कल्पना आहे आणी १००% अनुमोदन सुद्धा
|
मुकुंद केवळ थरार, उत्कंठा आणि चुरस! शिवाय किती वेगवेगळे रंग देशभक्तीचे,जिद्दीचे, पॉलिटिक्सचे, रेसिझम चे. जास्त जास्तच इंटेरेस्टिंग होत चाललीय ही लेखमाला. लौकर लौकर लिहा पुढचे. आम्ही इथं स्टेडीयममधे श्वास रोखून बसलोय. बाय द वे, हे वाचून मी यावेळी कसंही करून ऑलिंपिक्स(टीव्हीवर का होईना) बघायचं असं ठरवलंय. हे मुद्दाम सांगावंसं वाटलं.
|
Mukund
| |
| Thursday, February 21, 2008 - 10:33 pm: |
|
|
नेमस्तक... माझ्या मायबोलिवर दिलेल्या इ मेलवर प्रचंड प्रमाणावर स्पॅम जंक मेल येतात म्हणुन तो इ मेल सहसा बघत नाही कृपया परत एकदा पाठवाल का इ मेल?तसदीबद्दल क्षमा असावी... उपास,दिपाली.... कल्पना चांगली आहे. जरुर विचार करतो.आणी उपास..आहात कुठे तुम्ही? दोनदा फोन केला होता तुला गेल्या महिन्यात... संघमित्रा..ऑलिंपिक्स मी पण बघणार आहे... पण एन. बी. सी. च्या चष्म्यातुन नाही.. ते फक्त अमेरिकेचा अदभुत जलतरणपटु.... (जो कदाचीत ८ सुवर्णपदके जिंकण्याची दाट शक्यता आहे!)...मायकेल फेल्प्स यालाच दाखवणार... तु कुठे आहेस हे मला माहीत नाही पण अमेरिकेत असशील तर एम. एस. एन. बी. सी किंवा सी. एन. बी. सी. वर जगातले इतर ऍथलिट्स तुला बघायला मिळतील... ते सुद्धा बघ... मी मात्र नेहमी बड ग्रिनस्पॅन ज्या पद्धतीने या स्पर्धांकडे बघतो त्याच पद्धतीने सगळी ऑलिंपिक्स पाहात असतो. संभावीत विजेत्यांची जीत बघण्यात मजा असतेच.. हे बघायला की त्यांच्याकडुन असलेल्या अपेक्षेच्या भाराला ते कसे पेलवतात.. पण अनपेक्षितपणे व अतिशय प्रतिकुल परिस्थीतीतुन येउन खेळाडुंनी मिळवलेले विजय किंवा त्यांनी विजयासाठी केलेले प्रयत्नही आपल्याला बरच काही शिकवुन जातात! बड ग्रिनस्पॅनच्याच शब्दात सांगायचे तर.... "Ask not alone for victory, ask for courage, for if you can endure you bring honour to yourself. Even more, you bring honour to us all....Morever... the honour should not go to those who have not fallen, but all honour to those who fall and rise again!.....” मी आजपर्यंत ऑलिंपिक्समधील बर्याच स्पर्धांमधल्या स्फुर्तीदायक व मनोरंजक गोष्टी इथे लिहिल्या पण जलतरण स्पर्धा... ज्या मला स्वत्:ला खुप प्रिय आहेत.. त्याबद्दल एकही कथा मी अजुन लिहीली नाही. आज मात्र मी तुम्हाला ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धेत घडुन गेलेल्या एका अजरामर शर्यतीबद्दल सांगणार आहे. ही शर्यत ऑलिंपिक प्रेमींच्या मनात एक कायमची स्मृती करुन गेली आहे. त्या अजरामर जलतरण शर्यतीच्या स्मृतीला उजाळा देण्याचा माझा हा एक प्रामाणीक प्रयत्न... क्रमंश्:
|
Mukund
| |
| Friday, February 22, 2008 - 2:03 am: |
|
|
तर चला मंडळी.... या 'रेस ऑफ़ द सेंचुरी' साठी जाउयात १९७६ च्या मॉन्ट्रियाल ऑलिंपिक्सच्या जलतरण तलावात. पण या शर्यतीबद्दल सांगण्या आधी शर्यतीची थोडी पुर्वपिठीका.... ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धांचा उल्लेख करताना अमेरिकन जलतरणपटुंचा उल्लेखही त्याच श्वासात करण्याइतके प्रभुत्व आजतागयत अमेरिकेच्या पुरुष व महीला जलतरण पटुंनी या स्पर्धांमधे गाजवले आहे. १९२४ व १९२८ मधील जॉनी व्हॅसमुल्लर पासुन ते सध्याच्या मायकेल फेल्प्स नावाच्या "फ़्रीक!" पर्यंतच्या सर्व ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धा अमेरिकेच्या जलतरणपटुंनी मिळवलेल्या विजयांनी ओतप्रोत भरल्या आहेत. तसे वर्चस्व गाजवण्यात पुरुषांमधे मार्क स्पिट्ज़,ब्रायन गुडेल, जॉन नेबर, मॅट बिऑंडी,टॉम जॅगर, गॅरी हॉल ज्युनिअर,लॅनी केझेलबर्ग एरन पिअरसॉल या अतिरथी महारथींनी मोट्ठा हातभार लावला आहे.महिलांमधे तो भार उचलला आहे डेबी मायरपासुन ते मेरि मेहेर, एमी व्हॅन डायकन,जेनी थॉमसन व जॅनेट एव्हान्स सारख्यांनी. त्यांच्या या अश्या सार्वभौम ऑलिंपिक वर्चस्वाला अधुनमधुन जरुर आव्हान दिले गेले.. त्यात पुरुषांमधे प्रामुख्याने रशियाच्या ऍलेक्झॅंडर पॉपॉव्ह व डेनिस पेत्रेंकोव्ह, ऑस्ट्रेलियाच्या इयान थॉर्प(जो टोर्पिडो नावाने प्रसिद्ध होता!)व ग्रॅंट हॅकेट, वेस्ट जर्मनिच्या मायकेल ग्रॉस(ज्याच्या दोन्ही हातांची व्याप्ती ७ फ़ुटापेक्षा जास्त होती म्हणुन त्याला 'अल्बट्रॉस म्हणायचे!),हॉलंडच्या पिटर व्हान डन हॉगनबांड व हंगेरीच्या टॉमस डार्नी सारख्यांचा मोठा हात होता. त्यांनी बरेच वैयक्तीक विजय मिळवुन जगाची वाहवा मिळवली.पण एक संघ म्हणुन अमेरिकेच्या पुरुषांनी ऑलिंपिक्समधे नेहमीच अव्वल नंबर पटकावला आहे. अमेरिकन महिलांच्या बाबतीत मात्र तेच म्हणता येणार नाही. जरी १९२४ पासुन ते १९७२ पर्यंत व १९९२ पासुन आतापर्यंत अमेरिकन महिलाच ऑलिंपिक्समधे सर्वात जास्त पदके मिळवली असली तरी.... १९७४ ते १९८८ या १४ वर्षांमधे अमेरिकन महिला जलतरणपटुंना एक संघ म्हणुन ऑलिंपिक्समधे कधीच पहिले स्थान मिळु शकले नाही!त्यांच्या वर्चस्वाला ती १४ वर्षे काटशह देणार्या होत्या... इस्ट जर्मनीच्या महिला! त्या दरम्यान कॉर्नेलिया एंडरपासुन(मॉंट्रियाल ऑलिंपिक्समधे चार सुवर्णपदके!) ते क्रिस्टीन ऑटोपर्यंत(सेउल ऑलिंपिक्समधे सहा सुवर्णपदके!)... इस्ट जर्मनीच्या महिलांनी ऑलिंपिक्समधे पदकांची नुसती लयलुट केली.... अलबत! ऍट द एक्स्पेन्स ऑफ़ अमेरिकन गर्ल्स! अमेरिकन महिलांच्या पराभवाचे सत्र सुरु झाले १९७३ च्या विश्वस्पर्धांपासुन. त्यामुळे जोपर्यंत १९७६ साल उजाडले व अमेरिकन महिला जलतरणपटुंचा संघ जेव्हा मॉंट्रियालला येउन डेरेदाखल झाला तेव्हा त्यांचा प्रशिक्षक जॅक नेल्सन याच्या डोक्यात विचारांचे काहुर माजले होते... या इस्ट जर्मनीच्या महिलांना या ऑलिंपिक्समधे कसे थोपवायचे? गेल्या ३ वर्षांच्या हेड टु हेड कामगीरीवरुन अमेरिकन महिलांना चिअर अप करण्यासारखे त्याच्याजवळ काहीच नव्हते.. सर्व शर्यतीत इस्ट जर्मनीच्या महिला अमेरिकेच्या मुलींपेक्षा कमीत कमी एका सेकंदाने तरी वेगवान होत्या... एक सेकंद!....जो जलतरण स्पर्धेत युगासारखा असतो! कोच नेल्सन खुप संभ्रमात पडला होता... काय असेल या इस्ट जर्मन महिलांच्या प्रशिक्षणाचे रहस्य? तो काळ कोल्ड वॉरचा असल्यामुळे कम्युनिस्ट इस्ट जर्मनीच्या पोलादी पडद्यामागे त्या देशात काय चालले असते याचा बाहेरच्या जगाला सुगावा लागणे ही केवळ अशक्य बाब होती... पण एक गोष्ट कोच नेल्सनलाच काय.. पण सगळ्या जगाला दिसुन येत होती... या इस्ट जर्मनीच्या महीला एकसाथ सगळ्या अतिशय पुरुषी दिसत होत्या!.. इतक्या पुरुषी..म्हणजे हातापायावरचे भरमसाट केस... शरीराची ठेवण.. जास्तीचे... जे स्त्री शरीरावर क्रुत्रिम वाटतील असे पिळदार स्नायु..त्यांचा तो लो पिच मधला पुरुषी आवाज... की हे सगळे बघुन कोणाच्याही मनात संशय यायला जागा मिळावी की या महिला टेस्टास्टेरॉन सारखे पुरुषी हार्मोन्स तर घेत नाहीत ना? पण कोच नेल्सनकडे ते सिद्ध करायला काहीच पुरावा नव्हता. तो काळ ड्रग टेस्टींगच्या आधीचा असल्यामुळे ती गोष्ट कोणीच सिद्ध करु शकले नसते. म्हणुन ऑलिंपिक्सच्या स्पिरीटला धक्का लागु नये यासाठी कोच नेल्सनने आपल्या संघातल्या मुलींना अशा उघड उघड संशय येणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगीतले. कोचला असे सांगणे खुप सोप्पे होते पण अमेरिकन मुली व जर्मन मुली सरावाच्या वेळी व ऑलिंपिक व्हिलेजमधुन व्हेन्युपर्यंत जाण्यासाठी बर्याच वेळेला एकत्र असायच्या. त्यांचा तो पुरुषी आवाज ऐकुन एक दिवस महिलांच्या लॉकर रुममधुन अमेरिकेची १५ वर्षाची जिल स्टर्केल पळुन बाहेर आली... तिची ठाम समजुत झाली होती की काही पुरुष मंडळी मुलींच्या लॉकररुममधे धुमाकुळ घालायला पलीकडच्या बाथरुममधे आली आहेत! झाले... स्पर्धांना सुरुवात झाली... आणी कोच नेल्सनला ज्याची भिती होती तेच घडायला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अमेरिकेची सर्वोत्तम जलतरणपटु शर्ली बाबाशॅफ़.. जिच्याकडुन अमेरिकेची ७ सुवर्णपदकांची आशा होती.. ती १०० मिटर्स फ़्रिस्टाइलमधे...तिच्या सगळ्यात स्ट्रॉंग इव्हेंटमधे... पदक न मिळताच रिकाम्या हाताने परत आली! १९ वर्षांची शर्ली बाबाशॅफ़... जी १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक्समधे अवघी १५ वर्षांची असताना २ रजतपदक व १ सुवर्णपदक जिंकुन आली होती व आता तिच्या प्राइम फ़ॉर्म मधे या ऑलंपिक्समधे एकुण ७ शर्यतीत उतरुन एकुण २१ वेळा जलतरण तलावात उतरणार होती.... जी शर्ली बाबाशॅफ़... जी महिलांमधे मार्क स्पिट्झसारखा ७ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम करण्याची स्वप्न बघत होती.. ती शर्ली बाबाशॅफ़ तिच्या पहिल्याच प्रयत्नात सपशेल तोंडावर आपटली होती. १०० मिटर्सची विजेती होती.. अर्थातच.. इस्ट जर्मनीची.. कॉर्नेलिया एंडर.. आणी पुढच्या ५ दिवसात त्याचीच पुनरावृत्ती मॉंट्रियालच्या ऑलिंपिक जलतरण तलावात सगळ्या जगाला दिसुन आली... २०० मिटर फ़्रिस्टाइल.. सुवर्णपदक...कॉर्नेलिया एंडर.. रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़!... ४०० मिटर फ़्रिस्टाइल... सुवर्णपदक.. इस्ट जर्मनीची पेट्रा थुमर.... रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़! ८०० मिटर्स फ़्रिस्टाइल.... सुवर्णपदक.... इस्ट जर्मनीची पेट्रा थुमर... रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़! असे रोज होत असताना शर्लीला ती परत परत दुसर्या स्थानावर येणाचे शल्य खुप जाचत होते. तिलाही कोच नेल्सनप्रमाणे इस्ट जर्मनीच्या महिलांनी ड्रग्स घेउन तसे शरीर कमावले आहे असे ठामपणे वाटत होते व तिने शेवटी न राहवुन त्या संशयाबद्दल उघड उघड बोलुन तोफ़ डागली! सर्व ऑलिंपिकभर शर्ली बाबाशॅफ़च्या त्या आरोपाने खळबळ माजवली. बर्याच लोकांनी तिला पराजय न पचवता आलेली एक "सोअर" लुजर असेही म्हटले..... इस्ट जर्मनीच्या महिलांनी तर तिला "सर्ली" बाबाशॅफ़ असे म्हणायला सुरु केले. तिने जेव्हा इस्ट जर्मनीच्या महिलांच्या पुरुषी आवाजाचा उल्लेख केला तेव्हा इस्ट जर्मनीच्या महिलांनी तिला टोमणा मारला की त्या इथे फक्त स्विमींग करायला आल्या आहेत.... गायला नाही.... तर अश्या या अमेरिकन व इस्ट जर्मन महिलांमधल्या अतिशय कडव्या लढतीला जलतरण स्पर्धेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत प्रचंड उकळी फुटली होती... दोन्ही बाजुच्या एमोशन्स एकदम हाय होत्या... तवा दोन्ही बाजुने प्रचंड तापला होता... व अशा परिस्थीतीमधे मला ज्या शर्यतीबद्दल सांगायचे आहे त्या शर्यतीचा दिवस उजाडला.... क्रमंश्:
|
Dineshvs
| |
| Friday, February 22, 2008 - 3:22 am: |
|
|
मुकुंद, खरे तर मधेच प्रतिक्रिया देऊन या लेखनाचा ओघ, थांबवु नये असेच मला वाटते. पण मला स्वतःला सिंक्रोनाईज्ड स्विमिंग बघायला खुपच आवडते. तसा अलिकडेच हा प्रकार दिसायला लागला ऑलिंपिक्स मधे पण बेदींग ब्युटि नावाच्या एका अगदी जुन्या सिनेमात हा प्रकार होता. याबद्दल काहि रंजक किस्से, किंवा त्याचे तंत्र याबद्दल लिहिणार का ?
|
Mukund
| |
| Friday, February 22, 2008 - 8:03 am: |
|
|
जलतरण स्पर्धेचा शेवटचा दिवस... संध्याकाळची शेवटची एकच शर्यत बाकी होती... महिलांची ४ बाय १०० मिटर्स फ़्रिस्टाइल रिले... ५० मिटर्सच्या तलावाच्या लांबीला प्रत्येक खेळाडु जाउन येउन असे १०० मिटर पोहोणार... इस्ट जर्मनीच्या संघाने पहिल्या नंबरवर अंतिम फेरी गाठली होती... त्यांच्यामागे जवळ जवळ २ सेकंद हळु दुसर्या नंबरवर अमेरिकेच्या महिला अंतिम फेरीत आल्या होत्या. या शर्यतीतला जागतीक विक्रम इस्ट जर्मनीच्या नावावर होता--- ३ मिनीट्स ४८.८ सेकंद्स.. तर अमेरिकन महिलांचे या शर्यतीतले ऑलिंपिक्सला यायच्या आधीचे बेस्ट टाइमींग होते ३ मिनीट्स ५५.५ सेकंद... तब्बल ७ सेकंदांनी हळु.... शर्यतीच्या दिवसाची सकाळ उजाडली.... त्या आधी रात्रभर अमेरिकन महिला संघाच्या टीम मिटींगमधे खलबते चालली होती... सगळ्यांच्या मनात या शेवटच्या शर्यतीत तरी या गताड्या इस्ट जर्मन महिलांना धुळ चारायची असे वाटत होते... पण वाटणे आणी प्रत्यक्षात ते उतरवणे यात कोच नेल्सनला सात सेकंदांची प्रचंड मोठी दरी दिसत होती... पण तरीही त्याने त्या रात्री आपल्या शिष्यांना एकच गोष्ट सांगीतली... तुमच्या मनातल्या रागाला...तुमच्यावर जो अन्याय झाला आहे असे तुम्हाला वाटत आहे.... त्या अन्यायाला तुम्ही तुमच्या प्रचंड इच्छाशक्तीमधे परीवर्तीत करा...व सगळ्या जगाला दाखवुन द्या की माइंड ओव्हर बॉडी हा नुसता क्लिशे नसुन जर मनुष्याने मनात आणले तर आयुष्यात कुठल्याही अडथळ्याची त्याला भिती वाटायला नको.... बळकट मन हे बळकट शरिरापेक्षाही आधिक प्रभावी असते... जा आणी उद्याच्या शर्यतीत सगळ्या जगाला माइंड ओव्हर बॉडी या क्लिशेला प्रत्य्क्षात उतरवुन दाखवा.... माझ्या मनात किंचीतही संदेह नाही की तुमच्या एकत्रीत इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही उद्या एक चमत्कार घडवुन आणणार आहात.... जा आणी स्वत्:ला व आपल्या देशाला गर्व होइल असा परफ़ॉर्मंस उद्या द्या! कोच नेल्सनच्या या स्पीचने अमेरिकेच्या महिला संघातल्या प्रत्येक खेळाडुंच्या रोमारोमात जिद्दीने पेट घेतला... सगळ्यांनी एकत्र येउन सभा बरखास्त होण्याच्या आधी...एकमेकांच्या गळ्यात हात टाकुन एक मोट्ठा एल्गार केला..... GO.....USSSSAAAAAAAAAAAA! कोच नेल्सनने फ़ायनल्स साठी किम पेटन,वेंडी बोग्लीओली,जिल स्टर्केल व ऍंकर लेगसाठी अर्थातच शर्ली बाबाशॅफ़ अशी चौघांची निवड केली. इस्ट जर्मनीतर्फ़े कॉर्नेलिया एंडर लिड ऑफ़ करणार होती मग पेट्रा प्रायमर मग ऍंड्रिया पॉलक व ऍंकर लेग क्लॉडिया हेम्पेल स्विम करणार होती. त्यावरुन त्यांची स्ट्रॅटीजी सरळ दिसत होती... कॉर्नेलिया एंडरला सगळ्यात प्रथम पाठवुन अनसरमाउंटेबल लिड घ्यायचा व उर्वरीत शर्यतीत एंडरने मिळवुन दिलेला लिड बाकीच्यांनी वाढवत न्यायचा.. सोप्पा प्लान! पण इस्ट जर्मनीच्या महिलांना याचा लवकरच साक्षात्कार होणार होता की कधी कधी आयुष्यात सगळ्यात सोप्प्या वाटणार्या गोष्टीच मन गाफ़ील राहीले तर सगळ्यात कठीण होउन बसतात! शर्यत सुरु व्हायला अगदी थोडा अवधी बाकी होता. मॉंट्रियाल ऑलिंपिक जलतरण तलाव अधिर प्रेक्षकांनी खच्च भरला होता. जजेस नी आपापली जागा घेतली.... आठ टाइमकिपर्स हातात स्टॉप वॉचेस घेउन शर्यत सुरु होते त्या काठावर आठी लेनच्या ठोकळ्यांच्या बाजुला येउन उभे राहीले. फ़ायनलला आलेल्या आठी रिले टीम्सच्या पहिल्या स्पर्धकांनी आपापल्या स्टार्टींग ठोकळ्यांवर पुढे ओणवे उभे राहुन स्टार्टर गनची वाट पाहात हात लुज हलवुन स्ट्रेचींग करायला सुरुवात केली. कोच नेल्सनने शर्यतीची स्ट्रॅटीजी सगळ्यांना व्यवस्थीत समजवुन सांगीतली होती... किम पेटनचे लिड ऑफ़ लेगमधे काम असणार होत की सहा फ़ुटी जायंट कॉर्नेलियाला पहिल्या १०० मिटरपर्यंत एका बॉडी लेन्ग्थ पेक्षा जास्त दुर जाउ द्यायचे नाही... म्हणजे जगातल्या सगळ्यात वेगवान स्विमरला १ सेकंदापेक्षा जास्त पुढे जाउ द्यायचे नाही... तसे झाल्यावर पुढच्या २ स्विमरनी आपल्या आतापर्यंत त्यांनी पोहोलेल्या वेगापेक्षा कमीतकमी १ सेकंद जास्त वेगाने पोहायचा प्रयत्न करायचा व शेवटच्या लेगमधे बाकीचे काम शर्ली बाबाशॅफ़च्या खांद्यावर सोपवुन निर्धास्त व्हायचे... प्रेक्षकातही एक चांगली जलतरण शर्यत बघायला मिळणार म्हणुन एक इलेक्ट्रीफ़ायींग वातावरण निर्माण झाले होते.. सगळे आपापल्या सिटच्या एजवर... पुढे सरकुन... अधिरतेने शर्यत सुरु व्हायची वाट पाहात होते. तिकडे शर्ली बाबाशॅफ़ मात्र खुर्चीवर शांतपणे डोळे मिटुन ध्यान करत गंभिरतेने बसली होती.. मनातल्या मनात तिच्या पुढे उलगडत असलेल्या शर्यतीची ती उजळणी करत होती. तिला ठाम विश्वास होता की जर इस्ट जर्मनच्या मुलींनी ड्रग्सचा वापर नसता केला तर तीच जगातली सगळ्यात वेगवान जलतरणपटु होती... पण आज तिला त्या जर तरच्या पलीकडे जाउन जगाला दाखवुन द्यायचे होते की ती 'सोअर' लुजर नव्हती... तिला तिच्यातला चॅंपीअन जगाला दाखवुन द्यायचा होता... तिला आजुबाजुचा गोंधळ, प्रेक्षक या सगळ्यांचा विसर पडला होता.. तिच्या बंद डोळ्याच्या पटलावर तिला तिच्या गळ्यात लटकत असलेले सुवर्णपदकाचे चित्र दिसत होते... फाट्ट! अश्या स्टार्टर बंदुकीच्या आवाजाने शर्लीचे ध्यान भंग पावले व किम पेटन कशी स्विम करत आहे ते बघायला व तिला प्रोत्साहन द्यायला ती खुर्चीवरुन उठुन पुढे सरसावली व किम पेटनला गो किम गो! असे ओरडुन प्रोत्साहन देउ लागली. तिकडे किम झप झप हात मारत मासोळीसारखी पाण्यात सर सर अशी अंतर काटु लागली... स्ट्रोक फ़ॉर स्ट्रोक किम पेटन पहिल्या ५० मिटर्सपर्यंत इस्ट जर्मनीच्या कॉर्नेलिया एंडरबरोबर वेग ठेउन राहीली. पहिल्या ५० मिटर्सच्या वळणावर किम फक्त एक स्ट्रोकच मागे होती... दुसर्या ५० मिटर्समधे पण किम पेटनने कॉर्नेलियाबरोबर स्ट्रोक फ़ॉर स्ट्रोक बरोबर राहुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला...पहिले १०० मिटर संपत आले... कॉर्नेलियाने प्रथम भिंतीला हात टेकवले व किम फक्त अर्ध्या बॉडी लेंग्थने कॉर्नेलियाच्या पाठोपाठ १०० मिटर्स पुर्ण करुन आली.... कोच नेल्सनने त्याच्या हातातल्या स्टॉप वॉचकडे पाहीले.... त्याच्या घड्याळानुसार किम पेटनने तिच्या पर्सनल बेस्ट टाइमपेक्षा चक्क दिड सेकंद कमी वेळ १०० मिटर्स स्प्लिटसाठी घेतला होता.... आता वेंडी बोग्लीओलीने पाण्यात सुर मारला होता व पहिल्या श्वासासाठी तिने जेव्हा डोके बाहेर काढले तेव्हा इस्ट जर्मनिच्या पेट्रा प्रायमरला तिने जवळजवळ गाठले होते! वेंडी २१ वर्षाची.... म्हणजे या चारी अमेरिकन मुलींमधे वयाने सगळ्यात मोठी.... व अनुभवानेही सगळ्यात वरिष्ठ होती. त्याची तिला जाण होती व ही शर्यत वेंडी वयाने बाकींपेक्षा जास्त असल्यामुळे अमेरिका हरली असे तिला कोणी म्हटलेले नको होते... त्यामुळे तिही अतिशय तडफ़ेने फ़्रीस्टाइलचे स्ट्रोक झपाझप मारत अंतर काटत होती. ती आणी इस्ट जर्मनीची पेट्रा प्रायमर जवळजवळ एकाच वेळेला दुसरी लेग संपवुन आत आले व तिसर्या लेगसाठी एकाच वेळेला अमेरिकेच्या जिल स्टर्केलने व इस्ट जर्मनीच्या ऍंड्रिया पोलकने पाण्यात सुर मारला... १५ वर्षाची जिल स्टर्केल.... अमेरिकेची सगळ्यात कमी वयाची व कमी अनुभवाची जलतरणपटु! पण आज ती एवढ्या मोठ्या स्टेजवर अमेरिकेची शान आपल्या स्विमिंगच्या स्ट्रोकवर पेलवत जलतरण तलावात उतरली होती. कोच नेल्सनने मुद्दामच तिची निवड केली होती... जास्त अनुभव नसल्यामुळे आंतराष्ट्रीय शर्यतीमधे मानसीक दबाव काय असतो याची तिला जास्त प्रचिती नव्हती.... त्यामुळे तशा दबावाला बळी पडण्याचा प्रश्नच तिला पडणार नाही असा साधा विचार कोच नेल्सनने केला होता... १५ वर्षाच्या.... व भिती अजुन माहीत नसलेल्या या बेडर मुलीने कोच नेल्सनचा होका बरोबर ठरवला... या मुलीने काय करावे? तिचे सवंगडी त्यांच्या पर्सनल बेस्ट वेळेपेक्षा एक एक सेकंदांनी जास्त वेगात शर्यत पोहोत असताना या पट्ठीने तिच्या लेगमधे चक्क तिच्या पर्सनल बेस्ट वेळेपेक्षा तब्बल सव्वा दोन सेकंद कमी वेळात तिचे १०० मिटर्स पोहुन काढले व शर्ली बाबाशॅफ़ला अर्ध्या बॉडी लेंग्थचा लिड तिने मिळवुन दिला! आता शर्ली पाण्यात झेपावती झाली... आज तिला इस्ट जर्मनीची चौथ्या लेगमधील क्लॉडिया हेम्पलच काय... साक्षात वारासुद्धा लगाम घालु शकला नसता.. इतक्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ती झपाझप पाणी कापत चालली होती.. ती ही शर्यत.... काल रात्रीपासुन हजार वेळातरी.. मनातल्या मनात पोहोली होती... ५० मिटर्स संपले.. आता फक्त ५० मिटर्स बाकी राहीले होते... शर्ली सर्रकन उलटी वळली... ती पहिल्या स्थानावर होती... तिने आजुबाजुला पाहण्यात अजिबात वेळ घालवला नाही.. सप.. सप.. सप.. करत ती पाणी कापत फ़िनिश लाइअनला टच करण्यास पुढे पुढे येउ लागली.. तिच्यात व इस्ट जर्मनीच्या क्लॉडिया हेम्पलमधे एका बॉडी लेंग्थचे अंतर पडले होते... शर्यत बघणार्या सगळ्यांनी तो जलतरण तलाव त्यांच्या ओरडण्याने अक्षरश्: डोक्यावर घेतला होता..कोणीही बसलेले नव्हते... सगळे आपापल्या सिटच्या एजवर येउन उभे राहीले होते...१५ मिटर्स...शर्ली अजुनही पुढेच होती... १० मिटर्स... शर्ली अजुन पहीलीच.... पण आता ती फक्त पाउण बॉडी लेंग्थनेच आता पुढे होती..५ मिटर्स... क्लॉडिआ हेंपलने आपला वेग पुढच्या गीअरमधे टाकलेला सगळ्यांना स्पष्ट दिसत होता व ती आता फक्त अर्ध्या बॉडी लेंग्थने शर्लीपेक्षा मागे होती! १० फ़ुट... ५ फ़ुट... आता शर्लीनेही आपला गिअर बदलला होता व फक्त ३ फ़ुट बाकी असताना ती परत पाउण बॉडी लेंग्थने पुढे गेली होती व.....शेवटचा स्ट्रोक मारताना शर्लीने आपला हात तलावाच्या भिंतीला टेकवला.... इकडे वर काठावर बाकीच्या ३ अमेरिकन मुली.. किम, वेंडी व जिल.. ओरडत ओरडत व नाचत नाचत... शर्ली ई...... शर्ली ई..... गो शर्ली असे एकमेकांचे हात घट्ट पकडुन आनंदाने बेभान होउन उड्या मारत होत्या.... शर्लीने हात भिंतीला टेकवताच डोके बाहेर काढत इस्ट जर्मन टिमच्या लेनकडे पाहीले व तिला तिच्या टिममेट्स किम,वेंडी व जिलच्या हिस्टेरिकल आरड्याओरड्याने लगेच कळले की त्यांनी असंभवाला संभव केले होते.... त्या मायटी इस्ट जर्मन टिमचा स्पर्धेतल्या शेवटच्या शर्यतीत त्यांनी पाडाव केला होता!... शर्लीने डोक्यावरची वॉटरकॅप काढली व तलावातुन बाहेर येत तिच्या तिन टीममेट्सबरोबर.... एकमेकांच्या गळ्यात हात घालुन... रिंगण करत.. तिने नाचायला सुरुवात केली....व एकमुखाने चौघी... USA.....USSSAAAAA....USSSSSAAAAAAAAA...असे म्हणत जल्लोश करु लागल्या... आणी कोच नेल्सन? तो जलतरण तलावाच्या एका बाजुला पाय गुढग्यात दुमडुन जमीनीवर थर थर करत... दोन्ही हात हातात घेउन..ते एकत्र केलेले हात हनुवटीवर ठेवुन व कोपरे गुढग्यांवर ठेवुन.... मान शेक करत.... डोळ्यातुन आनंदाश्रु काढत.... त्या चार मुलींच्या वेड्या सेलीब्रेशनकडे क्रुतार्थ नजरेने बघत बसला होता.... फ़ायनल टायमींग.... यु. एस. ए........ ३ मिनीट्स ४४.८ सेकंड्स.... नवीन ऑलिंपिक व वर्ल्ड रेकॉर्ड! इस्ट जर्मनी... ३ मिनीट्स ४५.५ सेकंड्स...
|
Zakasrao
| |
| Friday, February 22, 2008 - 8:44 am: |
|
|
जब्बरदस्त वर्णन मुकुंद तुम्ही केलेल्या समालोचनात देखिल तोच थरार आहे जो प्रत्यक्ष पाहण्यात आहे. हा बीबी सहीच चाललाय.
|
Manjud
| |
| Friday, February 22, 2008 - 8:50 am: |
|
|
मुकुंद, अतिशय सुंदर......... काय लिहायचं तेच मला सुचत नव्हतं. ही पोस्ट वाचताना मी सुद्धा माझ्या खुर्चीच्या टोकावर येऊन बसले होते. पूर्ण वाचल्यावर मला अमेरीकन टीम गळ्यात सुवर्णपदक मिरवत असलेली दिसली.
|
Shraddhak
| |
| Friday, February 22, 2008 - 9:38 am: |
|
|
मुकुंद, हा बीबी केवळ अप्रतिम. लेखनशैली असावी तर अशी! माझ्या अंगावर ही शेवटची स्विमिंगची शर्यत वाचताना अक्षरशः काटा आला. जबरदस्त!!!! शर्यत आणि तुझं लिखाणही.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|