|
हे राजने कशाला करायला पाहिजे? नोकर्या बघायला मराठी लोक आपले आपण जाऊ शकत नाहीत का? आता आंदोलन करण्यापुर्वी राजनी मराठी बेरोजगारांना विचारल अथवा सांगितल होत का???आंदोलन केल्यावर कुठे कुठे vacancy आहे हे राजला शोधण सोप आहे आणि तिथे कामगार पुरवण ही त्याला सोप आहे.
|
Santu
| |
| Tuesday, February 19, 2008 - 2:04 pm: |
| 
|
सुयोग जरा मराठि माणसासाठी त्याग कराकी. लगेच कशाला तक्रार करता राव.
|
जय महाराश्ट्र,, तुमच्या किश्शावरून मला पण एक किस्सा आठवला... पार्ल्यामधे एका रिक्शेवाल्याने आम्हाला पत्ता माहीत आहेअसं सांगून बराच वेळ फ़िरवलं आणि नंतर "मला माहीत नाही, आता इथे उतरा दुसरी रिक्शा शोधा" वगैरे नाटके सुरू झाली. वेळ रात्री साडे अकराची.. मी सांगितलं की मला जिथे जायचय तिथे सोड नाहीतर मी पैसे देणार नाही. अर्वाच्य भाषेत त्याने शिवीगाळ सुरू केली.. मी पण भडकले. देत नाही पैसे काय करशील?? तर मला म्हणे मी सैनेचा माणूस आहे, काय करायचं ते बघून घेईन.. मी शांतपणे मनोहर कुंभेजकराना फोन लावला.. (सेनेच्या माणसाला हो कोण ते बरोबर माहीत आहे) मी पैसे दिले तर नाहीतच,, वर सर्वच शिवसैनिक गुंड आहेत असा निष्कर्ष पण नाही काढला. राज ठाकरेचे ज्या काही नाट्यमय घटना चालू आहेत त्याला स्पिन म्हणतात. वेळ मिळाला की जरा विस्ताराने टाकेल.
|
आजच्या लोकमत मधील बातमी तामिळनाडुमध्ये शाळांमधुन तमिळ भाषा सक्तिची करण्याला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा. आता बोला तमाम भैय्यांचा कैवार घेणार्यांनो ( मराठी विरोधकांनो ) ... जो जंगलीप्रसाद (लालु ) ज्याला १५ वर्षात विकास करणे सोडा पण विकास म्हनजे काय हे कळले नाहि तो मराठी माणसांना देशप्रेम शिकवायला निघालाय तरीही तमाम भैय्याप्रेमी अतिमंदासारखे टिवल्याबावल्या करताहेत. इथे येऊन हे लोक काय नाही करत? कालचीच नगरमध्ये घडलेली घटना एक भैयाने दिवसढवळ्या सर्वांसमोर एक मुलिची छेड काढली आनि वरुन शिरजोरि मग अशा लोकांची काय पुजा करायची ? इथे मारहाण झाली बिहारीबाबुंना तर लगेच त्यविरोधात सगळे प्रसिध्दीमाध्यमे एकवटली इथे भैय्यांवर कसा अन्याय करत आहेत ते जगाला दाखवत सुटली ... काही वर्षांपुर्वी आसाम तसेच आजुबाजुला बिहारिबाबुंची अक्षरश: कत्तल झाली होति तेव्हा हे सगळे (लालुसह) काय तोंडात अंगठा घालुन चोखत बसले होते का? त्यांना शिकवा म्हणा देशप्रेम. इथे मराठी सहनशील आहेत म्हणुन शहाणे होताय काय? तिकडे जर गेलात शहानपणा करायला तर काय होईल याची कल्पना आहे तर म्हणायची... सांगणे एकच आहे की या तर गुमान रहा नाहितर चालते व्हा. आमची भाषा आणि चालीरीतींची खिल्ली उडवली तर मग मात्र विचार करायलाच लागेल.. टिप: मी कुठल्या पक्ष अथवा संघटनेचा कार्यकर्ता अथवा समर्थक नाही.
|
Trish
| |
| Wednesday, February 20, 2008 - 6:23 am: |
| 
|
Soyichaa Marathi Baana...ase hi kahi AMarathi Marathi lok.... 
|
मुंबई महापालिकेचा कारभार हिंदीत? - विनय कोरे अपारंपरिक ऊर्जामंत्री, महाराष्ट्र मुंबई महापालिकेच्या कारभारासाठी हिंदी हीसुध्दा एक भाषा असावी, अशा आशयाचा ठराव आणला जात आहे... पण तसे झाल्यास या महापालिकेच्या कारभाराची हिंदी हीसुद्धा एक भाषा आहे, याकडे नव्याने स्थापन होऊ पाहणाऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाकडे बिगरमराठी लोक लक्ष वेधतील आणि त्या आधारावर वेगळ्या राज्याची मागणी करतील. त्यावरून रणकंदन माजेल. असे घडण्याची संधी उपलब्ध होऊ न देणे शहाणपणाचे ठरेल. ...... मुंबई महापालिकेच्या कारभारासाठी हिंदी हीसुध्दा एक भाषा असावी, अशा आशयाचा ठराव आणला जात आहे. या बाबीवर येथील प्रमुख पक्षांत किमान आवश्यक ते विचारमंथन झालेले नाही. ठराव चचेर्ला येईल त्यावेळी सर्व बाजू मांडल्या जाऊन त्याच्यावर यथायोग्य निर्णय होईल, असा संभव दिसत नाही. या ठरावात अनेक धोके दडलेले आहेत, तथापि केवळ एक जादा चष्मा खरेदी करावा एवढ्या सहजपणे हा विषय हाताळला जात आहे, ही गोष्ट मोठ्या चिंतेची आहे. या महापालिकेच्या कारभाराची भाषा सध्या मराठी आहे. महाराष्ट्र सरकारने १९६४ साली एक खास कायदा करून फक्त मराठी ही या राज्याची अधिकृत भाषा म्हणून निश्चित केली. पुढे १९८६ साली या सरकारने सर्व महापालिकांना मराठीचा वापर अनिवार्य केला. त्यानुसार या महापालिकेच्या नियमावलीमध्ये कारभाराची भाषा मराठी राहील, असे म्हटले आहे. त्यामध्ये बदल करून मराठीच्या जोडीला हिंदी बसविण्याचा हा प्रयत्न आहे. वरकरणी दिसते तेवढी ही बाब सरळ व साधी नाही. या ठरावाचा गांभीर्याने विचार का झाला पाहिजे याला काही महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. काँग्रेसने १९२१ साली भाषावार प्रांतरचनेचा ठराव केला आणि पुढे भाषावार प्रांतिक काँग्रेस कमिट्या स्थापन करण्याचे ठरविले. त्याकरिता दक्षिण भारतातील अशा कमिट्यांसाठी त्यांची क्षेत्रे काय असावीत याबाबत शिफारस करण्याचे काम साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्याकडे सोपविले होते. तेव्हा ते काँग्रेसचे नेते होते. त्यावेळी मुंबई व मदास इलाखे आणि हैदराबाद व म्हैसूर संस्थाने यांमध्ये सर्व कन्नड मुलुख पसरलेला होता. त्यापैकी नेमका मुलुख केळकरानी निश्चित करायचा होता. तसे करताना त्यानी संपूर्ण बेळगाव जिल्हा कर्नाटक प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या कक्षेत असावा, अशी शिफारस केली. पुढे बेळगावावर आपला हक्क सांगताना १९४८ साली दार आयोगापुढे, १९५४ साली राज्यपुनर्रचना आयोगाकडे आणि १९६६ साली महाजन आयोगापुढे कन्नड पुढाऱ्यांनी केळकर निवाड्याचा पुरेपूर वापर करून घेतला. बेळगावच्या प्रश्नाचा अजून निकाल लागलेला नाही. त्या बाबीवरून मुळीच धडा न घेता आता मुंबईबाबत नवी समस्या निर्माण करत आहोत. बेळगावसारखा प्रकार आता मुंबईबाबत घडण्याचा धोका संभवतो; कारण केंद सरकार दुसरा राज्यपुनर्रचना आयोग नेमण्याच्या विचारात आहे. वेगळ्या तेलंगणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अशा पहिल्या आयोगाने तेलंगणाचे वेगळे राज्य व्हावे अशी शिफारस केली होती. तथापि, तेलुगु भाषिकांचे एकच राज्य असावे, असे त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांना वाटले आणि त्यांनी तेलंगण व आंध्र एकत्र करून आंध्रप्रदेश हे राज्य बनविले. ते राज्य मोडण्याचे पाप आपल्या माथी घ्यायचे का, असा प्रश्न काँग्रेसश्रेष्ठींना पडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी दुसरा राज्यपुनर्रचना आयोग नेमण्याचा हा विचार आहे. त्याच्यापुढे केवळ तेलंगणाचाच प्रश्न असणार नाही. विदर्भ, बुंदेलखंड, पूर्वांचल, हरित प्रदेश अशा किती तरी नव्या राज्यांच्या मागण्या त्या आयोगापुढे येतील. तसेच, भारतातील पोर्तुगीज व फ्रेंच वसाहती मुक्त झाल्यानंतर त्यांचा राज्यपुनर्रचनेच्या दृष्टीने विचारच झालेला नाही. आता नव्या आयोगाला ते काम करावे लागणार आहे. देशात ५१ वर्षांपूवीर् राज्यपुनर्रचना होताना एका राज्याची काही खेडी शेजारच्या दुसऱ्या राज्याच्या पोटात असे अनेक प्रकार घडले. त्यांचाही प्रश्न नव्या आयोगाला निकालात काढावा लागेल. मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट न करता तेे वेगळे राज्य करावे अशी मागणी या महानगरातील बिगरमराठी मंडळींनी पहिल्या राज्यपुनर्रचना आयोगाकडे केली होती. दुसऱ्या आयोगाकडे अशी मागणी करताना, या महापालिकेच्या कारभाराची हिंदी हीसुद्धा एक भाषा आहे याकडे बिगरमराठी लोक या आयोगाचे लक्ष वेधतील आणि त्या आधारावर वेगळ्या राज्याची मागणी करतील. त्यावरून रणकंदन माजेल. असे घडण्याची संधी उपलब्ध होऊ न देणे शहाणपणाचे ठरेल. यास्तव महापालिकेच्या कारभारात हिंदी भाषा असावी हा ठराव तात्काळ हाणून पाडण्याची गरज आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारात हिंदी आली की आणखी काही महापालिकांमध्ये तसे ठराव होतील. मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मीरा-भायंदर, भिवंडी, उल्हासनगर आदी महापालिका आहेत. त्यांच्या जोडीला नागपूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद व नांदेड या महापालिका येतील. एवढे झाल्यावर हिंदी ही दुय्यम राज्यभाषा असावी अशी मागणी होईल. गोव्यात मराठी; तर उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये उर्दू ही दुय्यम राज्यभाषा आहे. महाराष्टनवर हिंदीचे असे अतिक्रमण होणे टाळण्यासाठी पालिकेसमोरील तो ठराव फेटाळला गेला पाहिजे. अन्य सर्व राज्यांत तेथील अधिकृत भाषेचा वापर वाढावा यासाठी विशेष प्रयत्न होतात. महाराष्ट्रात असे घडत नाही. केंद व राज्य सरकारांच्या काही कायद्यांमध्ये स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषा असे शब्द आहेत. हे कायदे राज्यपुनर्रचनेपूवीर्चे आहेत. नवीन एकभाषिक राज्ये अस्तित्वात आल्यानंतर तेथे स्थानिक किंवा प्रादेशिक भाषा म्हणजे त्या त्या राज्याची अधिकृत भाषा अशी अंमलबजावणी झाली. अपवाद फक्त महाराष्ट्राचा आहे. सिनेमा थिएटरांसंबंधीच्या राज्य सरकारच्या कायद्यात सर्व पाट्या व तिकिटे यांवर प्रादेशिक भाषा एक असली पाहिजे, असे म्हटले आहे. मुंबईत फार थोड्या थिएटरांमध्ये अशी अंमलबजावणी झाली आहे. थिएटरांच्या परवान्यांचे वाषिर्क नूतनीकरण करताना मराठीचा वापर झालेला नाही, ही गोष्ट पोलिस खाते लक्षातच घेत नाही. मराठी लिहिता, वाचता व बोलता आले, तरच टॅक्सी व रिक्शा चालविण्याचा परवाना मिळेल, अशी सक्ती करणे कायद्याने शक्य आहे. पण त्यासाठी इच्छाशक्ती असणे, ही यासंबंधात पहिली गरज आहे. आयएएस, आयपीएस आदी अखिल भारतीय सेवांमधील महाराष्ट्र केडरच्या अधिकाऱ्यांना मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे सक्तीचे आहे. त्यासाठी त्यांना संबंधित परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. त्यानंतर यापैकी बरेच जण मराठीऐवजी हिंदीचा वापर करतात, असे टीव्ही वाहिन्यांवरील मराठी कार्यक्रमात वारंवार दिसते. तथापि, त्याबद्दल कधी कोणी आक्षेप घेतला असे घडले नाही. महाराष्ट्राच्या अधिकृत भाषेची ही अशी ऐशीतैशी चाललेली आहे. शासनयंत्रणेला मराठीचे देणेघेणे नाही, अशी अवस्था निर्माण होत आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद आणि नगर परिषद ते महापालिका या सर्वांचे पूर्ण नियंत्रण राज्य सरकारच्या कायद्यांनुसार होते. या स्थानिक संस्थांत निवडणुकीसाठी उभे राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला मराठी लिहिता, वाचता व बोलता आली पाहिजे अशी सक्ती कायद्यांत दुरुस्ती करून लागू करणे शक्य आहे. अशी सक्ती मुळीच घटनाबाह्य ठरणार नाही. मुंबई महापालिकेत निवडून येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा अवगत असली की मग तेथे हिंदी ही एक जादा भाषा असावी, असा आग्रह कोणी धरू शकणार नाही. खरे म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकीला उभे राहू इच्छिणाऱ्यालाही त्या राज्याची अधिकृत भाषा ज्ञात असली पाहिजे, अशी दुरुस्ती केंद सरकारच्या लोकप्रतिनिधी कायद्यात होणे गरजेचे आहे. आमदाराला त्याच्या राज्याची भाषा अवगत नसली तर तो किमान आवश्यक एवढ्या कार्यक्षमतेने काम करू शकणार नाही, हे वेगळे सांगायला नको. हिंदीच्या वापराचा मुंबई महापालिकेने ठराव केला तरी राज्य सरकार तो रद्द करू शकते. हे लक्षात घेऊन संबंधितांनी याबाबत पुढे पाऊल टाकू नये हे बरे.
|
जय महाराष्ट्र श्री उपाध्ये! शीतावरुन भाताची परीक्षा करता येण्याइतपत अक्कल मला देखिल आहे.त्यासाठी उत्तरप्रदेशात जाण्याची अथवा वास्तव्य करण्याची गरज आहे असे निदान मला तरी वाटत नाही. सध्याच्या भारताच्या राजकारणात ज्या प्रकारची गोरीगोमटी फळे नेत्यांच्या रुपात उत्तरभारताने दिली आहेत त्यावरुन प्रत्यय येतोच की? सरसकट सगळेच अवगुणी नसतिल कदाचित पण सुक्याबरोबर ओले देखिल जळतेच.उत्तरभारतीयांच्या स्थलांतराचा प्रश्न हा फ़क्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही. भारतातील इतर प्रांताची देखिल हे उत्तरभारतीय डोकेदुखी बनले आहेत. तुमचा या आंदोलनावरील राग मी समजु शकते कारण तुमचे कामगार काम सोडुन गेल्यामुळे तुमचे वैयक्तिक नुकसान झाले आहे.पण म्हणुन त्याची आगपाखड तुम्ही अवघ्या महाराष्ट्रावर आणि मराठीजनां वर करणार आहात का? तुमच्या वरील लिखाणावरून मला वाट्ते की शितावरून मी भाताची परिक्षा करतोय हा माझा तरी निश्कर्ष नाही.पण आज ही वस्तू स्थिती हीच आहे की कोणीही मराठी कामगार काम करण्यास तयार नाही.मनसे ची मदत घेवून ही.
|
Zakki
| |
| Wednesday, February 20, 2008 - 12:24 pm: |
| 
|
आता आंदोलन करण्यापुर्वी राजनी मराठी बेरोजगारांना विचारल अथवा सांगितल होत का???आंदोलन केल्यावर कुठे कुठे vacancy आहे हे राजला शोधण सोप आहे आणि तिथे कामगार पुरवण ही त्याला सोप आहे. बरोबर आहे. आता सगळे जण घरी स्वस्थ बसा. ही राजची जबाबदारी आहे. त्याने आमच्या घरी स्वत: येऊन अक्षत देऊन आम्हाला नोकरी वर बोलावले पाहिजे. त्याने ती जबाबदारी पार पाडली नाही तर त्याचा जाहीर निषेध करू आम्ही! कुणि पैसे दिले तर त्याच्या बंगल्यावर हल्ला करू, जाळपोळ करू. म्हणजे चांगली अद्दल घडेल त्याला!!
|
Chinya1985
| |
| Wednesday, February 20, 2008 - 3:43 pm: |
| 
|
आता सगळे जण घरी स्वस्थ बसा. ही राजची जबाबदारी आहे. त्याने आमच्या घरी स्वत: येऊन अक्षत देऊन आम्हाला नोकरी वर बोलावले पाहिजे. त्याने ती जबाबदारी पार पाडली नाही तर त्याचा जाहीर निषेध करू आम्ही! कुणि पैसे दिले तर त्याच्या बंगल्यावर हल्ला करू, जाळपोळ करू. म्हणजे चांगली अद्दल घडेल त्याला!! ज्याला गरज आहे त्यानी स्वत्: जाउन नोकरी शोधायला काहीच हरकत नाही पण एकट्या नाशकात ५००० भैय्ये काम सोडुन गेलेत. आता तिथे एकदम इतके मराठी कामगार उपल्ब्ध नसतीलही. मग महाराष्ट्रातील दुसर्या गावांमधुन खेड्यांमधुन राजनी कामगार आणल्यास त्यालाच भविष्यात राजकिय फ़ायदा होईल.
|
आणखी एक गोष्ट जय महाराष्ट्र माझ्या कम्पनीतून म्हणजे माझ्या मालकीच्या कम्पनीतून नव्हे- मी ही कर्मचारीच आहे पण कम्पनीस होणारा त्रास वा मानहानी ही वैयक्तिक समजतो-पसन्द अपनी अपनी. आणि एक शुद्ध वैयक्तिक मत्-असे मानणारे महाराष्ट्रिय बान्धव फारसे पाहण्यात्-माझ्या अल्प श्या अडतीस वर्षाच्या अनुभवात नाहीत.
|
Satishbv
| |
| Thursday, February 21, 2008 - 6:57 am: |
| 
|
The real battle 1> So far 8 PMs (Nehru, LB Shastri, Indira Gandhi, Charan Singh, Rajiv Gandhi, VP Singh, Chandra Shekhar, AB Vajpeyee) have all come from UP. WHY they could not develop it since independance ? 2> HOW come so called 'communal' CM of Gujrat has been able to achieve highest rate of growth in the country within a span of 5/6 years but not the 'secular' CMs of UP/Bihar who ruled for more than 15/16 years ? 3> UP/Bihar are amongst richest states in terms of natural resources. WHY then TATAs, BIRLAs or any other industrialists not keen on setting up large industries there, even though labour is also cheaply availble ? 4> Amar Singh of Samajwadi Party always accompanies top celebrities / industrialists, prominents being Anil Ambani. WHY he could not convince them to invest in his state ? Only Anil Ambani is investing something... but that's because he's promissed free land. 5> Its a fact that maximum number of Babus (IAS/IPS etc officers) come from UP/Bihar. WHY then these states still remain backward ? Because they and thier Netas dont want to uplift their backward state so as to rule indiscriminately. 6> Bihar CM Nitish Kumar claims that North Indians contributed to the development of Mumbai. WHY they do not contribute for their own state's development ? Why are Patna / Dhanbad the shabbiest cities in the world ? (Mumbai may join them soon) 7> 36 north Indians were burnt alive in Assam. WHERE were Sanjay Nirupam, Abu Azmi, Mulayam, Amarsingh, Laloo, Nitish Kumar at that time ? 8> Bihar had maximum number of railway ministers. (Most IMP point) WHY then their recruitment is done from Mumbai ? 9> Its a fact that where there's money/oppourtunity, people from different geo/demography rush-in to make fortunes. Mumbai is one such city. Gujratis, Marwaris, South Indians, Bengalis, Punjabis, Sindhis flocked to Mumbai for obvious reasons. Majority of these communities got into skilled, professional, business areas and propspered, contributing to Mumbai's success. However, most of the North Indians resort to and take pride in doing unskilled/unlawfull cheap labour such as illegal hawking by occupying every nook & corner of every footpath, station areas as vegetable/fruit/ sing-chana/ bhel-pani puri vendors, or auto/taxi wallas without licenses. They bribe local authorities and make life of common people miserable due to congesions and rubbish. They are ruining the tax payer's money. Ofcourse not to mention about illegal slums. It is absurd to say that they contributed to Mumbai's development. If anything, they are retarding/deteriora ting Mumbai. CAN our great leaders dare say that Middle-east countries especially Dubai got developed due to labourers from India ? 10> Its not sons-of-soil v/s north-indians. Its good-sons-of- any-soil v/s bhaiyaas. _____________________________________________
|
Ladtushar
| |
| Thursday, February 21, 2008 - 7:13 am: |
| 
|

|
शिवसेना म्हणते...खबरदार मराठीला हात लावाल तर ! 21 Feb 2008, 1115 hrs IST प्रिंट करा सेव करा ई-मेल करा प्रतिक्रिया नोंदवा मुंबई मटा ऑनलाइन प्रतिनिधी मुंबई महापालिकेची परिपत्रके हिंदीतून काढण्याच्या हिंदी भाषी नगरसेवकांच्या मागणीनंतर राज ठाकरे यांच्या मनसेने उत्तर भारतीयांच्या विरोधात राज्यव्यापी ‘ हल्लाबोल ’ केला. त्यानंतर उशिरा का होईना पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आज मैदानात उतरली आहे. मुंबई महापालिकेची परिपत्रके कदापी हिंदीतून निघणार नाही...महापालिकेची भाषा मराठीच राहणार अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मांडली. ठाकरे म्हणतात की मुंबईवर काही वटवाघळे नेहमी फडफडत असतात. मुंबई महापालिकेची अधिकृत भाषा मराठी असताना काही लोक उगीचच हिंदीच्या फुसकुल्या सोडत आहेत. निदान पालिकेची परिपत्रके तरी हिंदीत यावीत असा त्यांचा आग्रह आहे. मात्र हे होणार नाही म्हणजे नाही. मराठीला हात लावाल तर खबरदार. शिवसेनेच्या नगरसेवकांनीही मराठीच्या बाबतीच लेचेपेचे राहू नये असा दम बाळासाहेबांनी भरला आहे. बाहेरून सतत येणा-या लोंढ्यामुळे मुंबईसारखी शहरे मरत आहेत. बिल्डर्सही बाहेरचेच आणि टॉवरमध्ये घरे घेणारेही बाहेरचेच. त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी संबंधच नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व मराठी माणसाने मुंबईसाठी १०५ हुतात्मे दिले हे त्यांच्या खिजगणतीतही नाही. ज्या मुंबईसाठी मराठी माणसाने रक्त सांडले त्या मुंबईची भाषा हिंदी व्हावी हे कदापी शक्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी व मातीशी इमान राखून उत्तर भारतीयांनी मराठी भाषा स्वीकारायला हवी आणि महाराष्ट्र धर्माचे पालन करायला हवे,असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या म-हाटी बाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बाळासाहेब ठाकरे म्हणतात की उत्तर भारतीयांनी आधी दक्षिणेकडच्या राज्यात जाऊन तेथील महापालिकांत हिंदी भाषेचा आग्रह धरावा व मगच मुंबईत यावे.
|
संजय निरूपम, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, मुकेश पटेल, राम जेठमलानी इ. अमराठ्यांना राज्यसभेत खासदार करताना आणि उत्तर भारतीयांचे मेळावे आयोजित करताना, ठाकर्यांचा हा मराठी बाणा कुठे गेला होता? करूणानिधी कायम तामिळ भाषेत बोलतात. आजवर कधीही त्यांना तामिळव्यतिरिक्त इतर भाषेत बोलताना पाहिले नाही. ठाकर्यांनी मात्र अनेक वेळा हिंदी व इंग्लिशमध्ये मुलाखती दिलेल्या आहेत. तेव्हा कुठे जातो मराठी बाणा? "दोपहर का सामना" हे हिंदी सायंवृत्तपत्र काढून ठाकर्यांनी संजय निरूपमला त्याचे संपादक केले होते. हा सुद्धा मराठी बाणा आहे का?
|
मराठीसाठी लढ्णारे मराठे मराठीत का लिहीत नाहीत?
|
की कष्ट प्रद काम न करणार्या मराठी कामगारं सारखे हे ही आहेत?
|
Mandard
| |
| Thursday, February 21, 2008 - 11:24 am: |
| 
|
रवी साहेब सतिश बी व्ही यांनी ते रेडिफ़ वरुन copy+paste केले आहे. सेनेचा मराठी बाणा कसा विकत घ्यायचा हे परप्रांतीयांना चांगले माहीती आहे. त्यामुळे यातुन काहीही निष्पन्न होणार नाही.
|
Aavli
| |
| Thursday, February 21, 2008 - 12:51 pm: |
| 
|
आपण सर्वच जण ज्या पदधतीने विचार मांडता आहात यावरून आसे दिसते कि यापैकी बरेच जण मुंबईतीलच काय पण महाराष्ट्रातील ही नसावे. स्थलांतरीत नोकरी करणारे असावे. कारण आज मुंबईत ६० टक्के लोक असे आहेत कि ते त्यांच्या मुलभूत गरजा पण बळेच पूर्ण करतात. एक सामान्य जागेचं घर घेण्यासाठी सुद्धा १० लाखाच्यावर रक्कम द्यावी लागते. कर्ज काढु घरे होतात पण ४० ते ४५ टक्के असे लोक आहेत की त्यांना कर्ज पण मिळत नाही. प्रश्न आहे तो मध्यम्वर्गीय नागरीकाचा त्याच्या भावी पिढीच्या अस्तित्वाचा राजकिय पक्ष त्यांचा खेळ खेळत राहातील पण नोकरदार वर्गानी काय करायचे दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या सुद्धा इतर भागातील लोक मुंबई कडे पळतात. मुंबईत तर किडामुंग्याप्रमाणे लोक राहातात पण हळूहळू इतर शहरात पण ती अवस्था नक्कीच येइल. पण शेवटी काय ज़ग़ा व जगु द्या येवढेच
|
Zakki
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:08 pm: |
| 
|
सतीश माढेकर, काय पण टोला हाणला आहे तुम्ही. प्रश्न असा आहे की नेत्यांनी काय केले? कारण आम्हाला सगळे नेत्यांनी करायला हवे असते. आम्ही आपणहून उठून ना नेत्यांना सांगणार, ना वेगळे नेते निर्माण करणार! याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. असा आमचा बाणा आहे. याबाबतीत आम्ही मोडू पण वाकणार नाही! जोपर्यंत आमच्या मधे एक तरी दोष आहे, (खरा असो, खरा वाटणारा असो) तो पर्यंत इतरांनी काऽहीहि केले तरी ते क्षम्य आहे. आम्ही बारबाला बघू, नट नट्या बघायला मिळतात म्हणून काय वाट्टेल ते दाखवले तरी मिटक्या मारत बघू, पण या बाबतीत आमची नैतिकता, स्वाभिमान एकदम जागा होतो. जरी परके लोक येऊन त्यांनी महाराष्ट्राचा बिहाराष्ट्र केला, नि मराठी भाषा संपूर्णपणे लयाला गेली तरी आम्ही काहीहि करणार नाही!
|
अहो माढेकर तो करुणानिधी हिंदी,इंग्रजी बोलत नाही कारण त्याला दोन्हिही भाषा येत नाहित. तो अडाणी आहे हो. त्याची मुलगी मात्र इंग्रजी बोलते. त्याने मागे सरळ सरळ LTTE च्या एका महत्वाच्या अतिरेक्याला श्रीलंकन सरकारने मारल्यावर हळहळ व्यक्त करत तु किति ग्रेट होतास अशी अतिरेक्याबद्दल कविता लिहिली होती. आता अशा माणसाला इतर नेत्यांनी का फ़ॉलो कराव???माढेकरांना बहुतेक करुणानिधी फ़ार आवडतो,सतत त्याचेच उदाहरण देतात. आता हेही वाचा-मटातील बातमीचा काही भाग मुंबईतल्या टॅक्सींची संख्या- सुमारे ५२ हजार * मुंबईत टॅक्सी परमीट असलेल्या मराठी माणसांची संख्या-सुमारे २० ते २२ हजार. त्यातील दहा हजार मराठी माणसे स्वत: टॅक्सी चालवतात. * ' अजिंक्यतारा' ग्रुपमध्ये सहाशे मराठी टॅक्सी चालक. जुन्नर, कोल्हापूर, चाकणची मंडळी टॅक्सीच्या व्यवसायात * मराठी तरुणांना टॅक्सी व्यवसायात आणण्यासाठी शिवसेनाप्रणीत ' मुंबई टॅक्सी चालक मालक सेना' संघटना कार्यरत * शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत व सरचिटणीस दिलीप तम्मल मराठी टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नशील
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|