Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 07, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » UP/Bihar Versus Maharashtra: punha ek raajkaaraN » Archive through February 07, 2008 « Previous Next »

Jhuluuk
Wednesday, February 06, 2008 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीकर मित्रहो,
कोणत्याही राजकिय पक्षाशी मी बांधिल नाही किंवा कोणाचेही मी समर्थन करत नाही. सध्या मुंबापुरीत घडत असलेल्या (सोमवारी पुण्यापर्यंत पोचलेल्या) या ज्वलंत विषयावर निकोप चर्चा व्हावी, काही विधायक मार्ग निघावेत ही सदिच्छा!

रविवार आणि सोमवारी घड्लेल्या गोष्टींचा थोडक्यात आढावा हा असा:
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये परप्रांतियांना मारहाण केली. यामध्ये प्रामुख्याने टॅक्सी चालक आणि ठेलेवाले-विक्रेते यांचा समावेश. ठाणे येथील चित्रपटगृहात भोजपुरी चित्रपट चालु असताना जाळपोळ.
समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंग, जया बच्चन यांची याबद्दलची व्यक्तव्ये. लालु प्रसाद यांचे मत. या सगळ्यांवर राज ठाकरे यांची प्रत्युतरे.
बच्चनच्या बंगल्यावर कथित बाटली हमला.
स. पा. च्या कार्यकर्त्यांनी कलकत्ता, अलाहबाद, लखनौ येथे केलेला निषेध.

अधिक तपशिल कुठल्याही पेपर किंवा न्युज चॅनेल वर मिळतीलच. महत्त्वाचे वाटणारे संदर्भ जरुर मांडावेत.

प्रश्ण असा राहतो कि, मुंबई कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा? जरी कोणाचे मत मुंबई फक्त मुंबईकरांची असे असले तर हे दर्शवण्याची पद्धत कशी असावी?
या गोष्टींचा राजकिय पार्ट्या कसा फायदा करुन घेतील?
मुंबईमधील जनसामान्यांचे काही कल्याण हे साधु शकतात का?
आणि तुम्हाला असे वाटते का की हे सर्व १९७२ १९७३ सालात घडलेल्या मराठी विरुद्ध साउथ इंडियन सारखेच घडत आहे?

-झुळूक


Satishbv
Wednesday, February 06, 2008 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकच फोडलेली टक्सी ३ दिवस दाखवत आहेत. असो....
काहितरी नवीन हाती लागे पर्यंत तेच बघावे लागणार.


Satishbv
Wednesday, February 06, 2008 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक इ-मेल


Raviupadhye
Wednesday, February 06, 2008 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अत्यन्त नि:स्प.पृहपणे एक जबाबदार महाराष्ट्रीय नागरीक म्हणून एवढेच विचारतो की याला जबाबदार कोण? आणि इतके दिवस केलेल्या चुकांचे परिमार्जन असे त्या निरपराध लोकांना वेठीस धरून गुरांसारखे मारून होणार आहे का?

Meggi
Wednesday, February 06, 2008 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी, अनुमोदन. महाराष्ट्रा बाहेर रहाणार्‍या मराठी नागरिकांना पण अशीच वागणुक मिळावी का त्यांच्या रहात्या ठिकाणी? हे असे करून देशाचे अजुन तुकडेच पाडतोय आपण.

Vinya
Wednesday, February 06, 2008 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतर प्रान्तान्मधुन आलेले लोक कोणी परके नाहियेत. ते आपलेच लोक आहेत. तेही भारतीयच आहेत. (बान्गलादेशी घुसखोरान्ची बात वेगळी. त्यान्च्या विरुद्ध आवाज उठवा हवातर.) भारतीय राज्यघटने नुसार कुणालाही कुठेही जायचा, रहायचा अधीकार आहे. कोणताही व्यवसाय करायचा अधीकार आहे. मराठी माणसाच्या नावाखाली कुणी गुन्डगीरी करत असेल, हैदोस घालत असेल तर ते या मराठी माणसाला (मला :-)) काही पटत नाही.

भाषेच्या, राज्याच्या नावाखाली भान्डण करुन या देशाचे तुकडे का करयचे आहेत? परकियान्चे problems काय कमी आहेत आपल्या देशापुढे म्हणुन आपण आपपसातच भान्डावे?


Mandard
Wednesday, February 06, 2008 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेगी अनुमोदन मी noida, UP मधे रहातो पण मला कधीही वाइट वागणुक मिळाली नाही उलट मराठी म्हणजे educated & decent people असेच सर्व लोक म्हणतात पण अशा घटनांनी थोडा ओरखडा उठतोच

Trish
Wednesday, February 06, 2008 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालील मुद्यांवर विचार करावा !
मुद्दा १) महानगर पालिकेत खुपवर्षा पासून सेनेचेच राज्य आहे तरी पण हया भैयांचे अतिक्रमण रोखु शकले नाहीत अणि आत्ता ओरडा करत आहेत का ?.
मुद्दा २)अतिक्रमण अणि परप्रन्तियांचे अनधिकृत धंदे उद्योग मराठी उद्योगाना खरच झोपवत आहेत का ?
मुद्दा ३) प्रसिधी सठिचा प्रयत्न तर नव्हे ?
मुद्दा ४) मराठी लोकांची चिंता सोडून त्यांच्या मताची चिंता जास्त आहे, भावना भड़कवाणे हा या काका- पुतान्याचा नेहमीचा उदयोग !
मुद्दा ५) मराठी विरुद्ध हिन्दी हे युद्ध कशासाठी ? हिन्दी ही राष्ट भाषा आपल्याच राष्टाची च आहे ना ? अणि मराठी च्या प्रसरासाठी आपण स्वतः ती किती वापरतो? आपली मुले कुठल्या शाळेत जातात ? कुठल्या ही शाळेत जात असली तरी आपण त्याना मराठी पुस्तके वाचनाला देतो का? त्याना मराठी अणि संस्कृत शोल्क शिकवतो का?
जर आपण स्वतः ला बदले तर हे जग लवकरच बदलेल !


Zakki
Wednesday, February 06, 2008 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते तो कोण राज का कुणी ठाकरे उ. भा. लोकांच्या विरुद्ध आंदोलन करतो आहे, त्याने पार्ल्याच्या हनुमान रोडवरील एका न्हाव्याला भेटावे.

मला सांगितलेली त्याची गोष्ट:

मी त्याच्या दुकानात गेलो, खुर्चीवर बसलो, नि मराठीत सांगायला लागलो, कानावर येणारे केस काप, मागे नीट आकार दे वगैरे. थोडा वेळ झाला तरी त्याचे काहीच उत्तर नाही. मी चिडून जोरात म्हंटले, मराठीतच. 'काय हो, तुम्हीहि भैय्या का? दहा वर्षे इथे राहूनसुद्धा मराठी न शिकणारे?'

त्याने हाताने थंबा अशी खूण केली. बाहेर जाऊन तोंडातली गुळणि फेकली नि म्हणाला मी मराठीच आहे हो, पण माझे नोकर हिंदीच! मी विचारले का?

तर त्याने सांगितले: मी दुकान काढले, चांगले चालले, म्हणून एकदा गावी जाऊन एका बेकार बसलेल्या तरुणाला माझ्या खर्चाने इथे आणले, जागा बघून दिली, काम शिकवले. काही दिवस तो बरा होता, पण मग पैसे मिळाल्यावर, दारू, मटका यांच्यामागे लागला. त्याच्या घरचे मला म्हणतात, त्यानी अजून पैसे पाठवले नाहीत. एक दिवस बहाद्दर सकाळी सकाळीच दारू पिऊन कामावर! गिर्‍हाईकाने तक्रार केली. तिथल्या तिथे त्याला हाकलला!

मग पुन: गावात गेलो. एक माळ घातलेला, लग्न झालेला, जबाबदार वाटणारा माणूस पाहिला, काम पाहिजे होते त्याला. त्यालाहि स्वत:च्या खर्चाने आणले, काम शिकवले. पण पैसे मिळाल्यावर घरी पैसे पाठवायच्या ऐवजी हा पण मटका, दारू करायला लागला! मग काय हाकलून दिले त्याला पण!

मग एकामागून एक दोन हिंदी आले, अर्ध्या पैशात काम करतात, अत्यंत जबाबदार. पगाराच्या अर्ध्याहून अधिक पैसे घरी पाठवतात. इथे एका खोलीत दहा बारा रहातात. काम सोडून उरलेल्या वेळात भजन म्हणतात!

मग आता सांगा, का नाही या हिंदी लोकांची संख्या वाढणार?

इतरांनी मलाच विचारले, तुमच्या अमेरिकेत एव्हढे लोक welfare वर आहेत, तर ते का नाही कामे करत? मग मेक्सिकन आले की तुम्हाला चालतात! मग महाराष्ट्रियांना का बोलता?



Santu
Wednesday, February 06, 2008 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा दुसया बिबि वरचा पोस्ट चुकुन इकडे आला मॉडस तिकडे टाकला तर बरे होईल
मुस्लिम बखर कार कश्या थापा मारतात याचे जर उदाहरण पाहायचे असेल
तर अबुल फ़जल ची ऐने अकबरि वाचावि. त्यात अकबराला अगदी मदनाचा पुतळा वर्णले आहे खरि परिस्थिति सांगितलि आहे स्मिथ ने हा अकबर द ग्रेट चा लेखाक कारण तो काहि अबुल सारखा काहि दरबारि भाट नव्हाता.
स्मिथ म्हणतो"अकबराची उन्चि ५.७ असावि.त्याचे हे मांड्या पाशी आत वळलेले होते त्या मुळे तो फ़ेन्गडा चालत असेॅहालतान तो डावा पाय ओढत असे. त्या मुळे लंगड्या माणसारखी त्याची चाल होति.त्याचे नाक आखुड असुन नाक्पुड्या फ़ेन्दर्‍या होत्या.उजवी नाकपुडि
व वरचा ओठ यांना सांधणारी एक वाटाण्याच्या आकाराची एक काळी मस ही त्याचा चेहरा अजुन ओंगळ करित असे. त्याचा रंग हा काळा होता.

अश्या सौदर्यसंपन्न(?) पुराशावर कोण बाइ भाळेल.
पण हा गोवारिकर म्हणजे पक्का फ़िल्लम बाज आहे.

मुख्य म्हणजे अकबर हा एक नंबर चा रन्डिबाज इसम होता. ज्या बेहराम खानाने त्याला हेमु च्या विरुध्द लढाईत मदत करुन गादिवर बसवला.शेवटि त्या बेहराम चा खुन करुन त्याने त्याच्या बायकोला जानान खान्यात ओढलि.
तो दर वर्शी मिना बाजार भरवत असे त्यात फ़क्त तो एकटा पुरुष असे हजारो बायकात.
खुद्द अबुल फ़जल च म्हणतो की अकबाराच्या जनान्खान्यात ५००० बायका होत्या मग हा कशाला एकट्या जोधा च्या प्रेमात पडेल


Shyamli
Wednesday, February 06, 2008 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म.न.से नी घेतलेल्या भुमिकेमधे खर तर काहिच तथ्य आहे असं वाटत नाही. पोट भरायसाठी येणारा एखादा अण्णा किंवा भैय्या या लोकांची जास्ती वेळ काम करायची तयारी,आणि या लोकांची कमि पैशात उपलब्धता, बरं या लोकांच्या दांड्या कमि असतात उठसुट यांच्या घरच कोणी गचकत नाही, किंवा सण साजरे करत बसत नाहीत सो कोणत्याही लहान-मोठ्या उद्योजकाला सहज स्वस्तात माणुसबळ मिळत असेल तर कोणीही हसत हसत कामाला ठेवेल यांना.

विन्या यांच्या पोस्टला अनुमोदन, आंदोलन करण्यासारखे बरेच प्रश्न आहेत ते हाताळून त्यात यश मिळाल तर खरच समाजाची चिंता करणारे म्हणता येइल यांना. नुसतच राज कारण

जग बदलतय, आता किम्मत फक्त स्किल ला








Ashusachin
Wednesday, February 06, 2008 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाट्लेली कारणे
१. हा सगळा पैशाचा खेळ आहे.
२. राज आनि उन्मेश जोशी ने मिळुन ४०० कोटीची जमीन घेतली आहे
३.बाळासहेबान्चा अशिर्वाद! असणराच या मागे, नन्तर राज वेगळा झाला
४. अमिताभ आणी अमर सिन्ग दादर मधे एक Mall बान्धत आहेत, तिथे बहुतेक काहीतरी जमले नसावे या दोघन्चे
५. राज जे शिवसेना एके काळी करायची तेच करतो आहे
६.शिवसेना आता अचानक secular होणार आणि ऊद्धव
mall च्या ओपेनिन्ग ला हसरा चेहरा करुन उभा रहाणार

Ashusachin
Wednesday, February 06, 2008 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

October 19 2003 -Amitabh appointed Uttar Pradesh's brand ambassador - almost 4.5 years so far

Maharashtra Navnirman Sena was founded on the 9th of March 2006 - almost 2 years so far

येवढे दिवस कसे असे प्रश्न पड्ले नाहीत?

Chetnaa
Wednesday, February 06, 2008 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी माणसाला जागे करण्या पेक्षा झोपलेल्या सैन्याला जागे करण्याची गरज,... शक्ती प्रदर्शना साठी,... कारण त्याशिवाय डरकाळ्यांना कुणी किंमत देणार नाही...
( मग वाटाघाटी कशा यशस्वी होणार?)
काकाच्या पावला वर पाऊल ठेऊन चालतोय पुतण्या... पन त्याच त्या ट्रिक्स ना कितीदा भुलायचे मराठी माणसाने?
आणि यातुन खरोखर काही निष्पन्न झालय का मराठी माणसासाठी?

आणि निवडणुका आल्या की मराठी हिंदी भाई भाई...
एक गठ्ठा मतांसाठी तर इतक्या झोपड पट्ट्या वाढताहेत
युपी तुन मुंबईत लोंढे घेऊन येणार्‍या ट्रेन्स ची संख्या सारखी वाढतेय...
हे सर्व होत असताना कुठे गेली होती आमची मराठी अस्मिता...

आणि खरोखर इतर लोक ज्या प्रकारे कामे करतात तशी आमची मराठी लोक करु शकले असते तर आमची कामे युपी वाल्यां कडे गेली असती का?
नुसते भाजी बाजारात तुलना केली तरी याचे कारण कळते..




Ashusachin
Wednesday, February 06, 2008 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भविश्यतील एक मजेदार द्रुश्य
१. राज - मला अमिताभ बद्दल एक कलाकार म्हणुन आदर आहे, पण त्याने आता जे स्पश्तिकरन दिले आहे ते मला पट्ले आहे
२. अमिताभ - राज स्वतहा एक कलाकर आहे, कले ला कोणतही प्रांत नसतो, आम्ही आम्च्यतले मतभेद दूर केले आहेत
३.शरद पवार - राज/अमिताभ अरे त्या कोहिनूर व्यवहारा मधला आणी त्या mall व्यवहारा मधला माझा share कुठे आहे? तुम्हाला महिती आहे ना, महाराश्ट्रामधे जर 50-१०० कोटि (उदाहरण आहे!) च्या वरती च्या सगळ्या व्यवहारा मधे
माझे percentage असते :-)
४. R. R Patil - राज वरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत
५. बाळासाहेब - राज शेवटी एक ठाकरे आहे. कलाकार आहे.
६. विलु ( handsome smile आनि केसान्चा कोम्बडा) -सर कार परधर्मियान वर अन्याय होवून देणार नाही.

शेवटी सगळे मिळुन एकत्र स्नेह भोजनाला जातील

Ashusachin
Wednesday, February 06, 2008 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

P.S - वरील स्नेह भोजन प्रायोजित केले असेल अनिल अम्बानी ने, किन्वा मुकेश अम्बानी ने किन्वा विजय मल्ल्या ने

Arc
Thursday, February 07, 2008 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी असेच काहीसे घडेल अशुसचिन

Satishbv
Thursday, February 07, 2008 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय घटनेने कुणालाही कुठेही जाउन राहन्याचा अधिकार दिला आहे. पण कसेही राहण्याचा अधिकार दिला नाही. जेव्हा जेव्हा स्थानिकाना त्रास झाला. तेव्हा सर्वत्र उद्रेक झाला. आज एका भैयाला मारल्याचे ३ दिवस मिडीया दाखवते, तेव्हा सर्वच जण गळे काढु लागलेत. पण जेव्हा याच प्रश्नावर आसामी आणी बिहारी लोकान्नी एकमेकान्ना जिवन्त जाळले तेव्हा कुठे गेले तुमचे भारतीयत्व. दिल्ली राज्यावर याच लोकान्मुळे ताण पडतो असे पाहुन राज्यपालानी तिथे परमिट सिस्टीम सुरु करावी असे निर्देश दिले होते. आज मुम्बैचा crime rate वाढला आहे.
एखाद्या गुन्ह्यानंतर पोलिस पथके तातडीने युपि, बिहारला रवाना होतात हे कसले लक्षण आहे


Santu
Thursday, February 07, 2008 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज ठाकरे ने योग्यच केले
उलट शिवसेनेचे हल्लिचे नेत्रुत्व नेभळट आहे.


Satishbv
Thursday, February 07, 2008 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक ई-मेल


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators