|
Shravan
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:43 am: |
|
|
मुकुंद, जबरदस्त चालले आहे. मॅरेथॉनच्या गोष्टीतला तो तरुण सैनीक केवळ विजयाचीच नाही पण त्याआधी शेजारच्या राज्याला मदत करण्यासाठीचा पण निरोप घेऊन गेला होता. आणी विजयाची बातमी वेशीवर संगीतल्यानंतर तो दमछाक होऊन तिथेच मरण पावला असे वाचनात आले होते. शिवाय ती स्पर्धा ४१ किमी. ची असायची मात्र नंतर इंग्लडमध्ये जेव्हा ही स्पर्धा झाली तेव्हा स्पर्धा पुर्ण केल्यावर पुढे काही यार्ड अंतरावर बसलेल्या राणीला अभिवादन करण्यासाठी स्पर्धक धावत जायचे तेव्हापासून हि स्पर्धा काही यार्डानी वाढून पुढे ती ४२ किमी पर्यंत केली गेली. मुकुंद, बरोबर आहे का हे?
|
Mukund
| |
| Wednesday, January 30, 2008 - 10:54 am: |
|
|
अरे हे काय? तुम्ही सुद्धा तुम्हाला माहीत असलेल्या आठवणी इथे लिहा की.. श्रावण तु म्हणतोस ते खरेही असेल पण ते मला माहीत नव्हते.. आज सांगणार असलेल्या गोष्टीमधे आपल्याला माणुस हा प्राणी इच्छाशक्तीच्या बळावर काय करु शकतो याची प्रचिती येते. अशा गोष्टींमुळेच मला या स्पर्धांचे खुप आकर्षण आहे. ही गोष्ट आहे हंगेरीच्या कॅप्टन कॅरोली टकाक्सची. कॅप्टन टकाक्स हा हंगेरीच्या रॅपीड फ़ायर पिस्तुल शुटींगच्या टीममधे होता.१९३७ च्या जागतीक शुटींग स्पर्धेत तो पहीला आला होता. पण १९३८ मधे एका फ़्रीक अपघातामधे त्याच्या उजव्या हातात हॅंडग्रेनेड फुटुन त्याचा उजवा हात त्याला गमवावा लागला.... ज्या हाताने तो शुटींग करायचा. त्याला अत्यंत वाइट वाटले की आता आपल्याला आपल्या लाडक्या खेळात कधीच भाग घेता येणार नाही. पण अपघातानंतर एका महिन्याच्या आतच त्याच्या मनात शुटींग स्पर्धेचे वेध लागले. पण तसे होण्यासाठी एकच मार्ग त्याच्याकडे उपलब्ध होता.. ते म्हणजे डाव्या हाताने शुटींगची प्रॅक्टीस करायची.... आणी खरोखरच त्याने काय हरकत आहे म्हणुन खरच त्याच्या डाव्या हाताने प्रॅक्टीस करायला सुरु केली. पण त्याने या गोष्टीचा कुठेच गवगवा केला नाही. १९४० व १९४४ चे ऑलिंपिक्स दुसर्या महायुद्धाने रद्द झाले. १९४८ चे लंडन ऑलिंपिक्स जेव्हा सुरु झाले तेव्हापर्यंत कॅप्टन टकाक्सने हंगेरीच्या शुटींग टिममधे स्थान मिळवण्याइतकी डाव्या हाताने प्रगती केली होती! त्याची प्रगती हंगेरीच्या त्याच्या टीममेटना ठाउक होती पण जगातल्या बाकीच्यांना कॅप्टन टकाक्स परत टिममधे येईल हे सोडाच पण परत शुटींग करु शकेल की नाही याची पण खात्री नव्हती. त्यामुळे त्याचे जगातले बाकी ओळखणारे त्याला लंडनला पाहुन चाटच झाले. त्यात कॅप्टन टकाक्सचा अर्जेंटेनियन मित्र कार्लोस व्हॅलीआंटे..जो सध्याचा पिस्तोल शुटींगचा विश्वविजेता होता.... हाही होता. त्याने टकाक्सला विचारले... अरे तु काय करत आहेस लंडन ऑलिंपिक्समधे? तर टकाक्स हसत उत्तरला.. काही थोड्या गोष्टी शिकायला आलो आहे तुमच्या सारख्यांकडुन.... आणी स्पर्धा सुरु झाल्यावर कॅप्टन टकाक्सने आपल्या डाव्या हाताच्या करामतीने सर्व जगाला आश्चर्यचकीत करुन टाकले... व्हॅलीआंटेला हरवुन डाव्या हाताने त्याने सुवर्णपदक मिळवले.. तेही नवा जागतीक विक्रम करुन! एवढेच नाही तर चार वर्षांनंतर १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक्समधे सुद्धा कॅप्टन टकाक्सने व्हॅलीआंटेला परत एकदा हरवुन सुवर्णपदक मिळवले.... तेव्हा कार्लोस व्हॅलीआंटे टकाक्सला म्हणाला.... Now you have learned enough!
|
संगीतात दाद देताना म्हणतात "जीयो" तीच दाद दोन्ही कानशीलांना अंगठा आणि तर्जनी लावून मुकुन्दंना म्हणतो "जीयो",अत्यन्त श्रद्धेने त्या olympions ना आणि ती जयगाथा लिहिणार्या या भाटाना
|
खरय रवि तुमचे. मुकुंद तुमच्यामुळे आम्हा सर्वाना ते ऑलंपिक्स परत एकदा जगात येत आहेत. धन्यवाद.
|
Uchapatee
| |
| Thursday, January 31, 2008 - 10:45 am: |
|
|
मुकुंदा, खरच फारच सुंदर खिळवुन ठेवणारे ओघवते लिखाण. या गोष्टी देखिल फारच मस्त व स्फूर्तीदायक आहेत. असेच पुढचे भाग येउद्या. आतुरतेने वाट पहातोय.
|
मुकुंद, सुंदर लिखाण, खुप वाचनीय आणि प्रेरणादायक. लिहित रहा.
|
Bee
| |
| Friday, February 01, 2008 - 9:26 am: |
|
|
मुकुंद, प्रेरणा मिळते आहे वाचून. इतक्या रोमांचक गोष्टी तुमच्या शैलीतून वाचताना आनंद होतो आहे. फ़क्त एकच की ह्या खेळाडूंची नावे उच्चारणे आणि लक्षात ठेवणे कठिण जात आहे.
|
Mukund
| |
| Saturday, February 02, 2008 - 5:48 am: |
|
|
रवि उपाध्ये.. अहो ते स्पर्धक... ज्यांच्याबद्दल मी लिहीत आहे..... तेच खरे तुमच्यासारख्यांची दाद मिळवण्यास पात्र आहेत.मी फक्त त्यांचे पराक्रम तुमच्यासमोर उद्ध्रुत करत आहे.तरीपण तुमच्या अभिप्रायाबद्दल मनापासुन धन्यवाद. अभिजित,केदार(दोन्ही),बी,श्रावण आणी इतर.... तुमचेही अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आणी उचापती... तुझ्यासारख्या ओघवती लिखाणशैली असलेल्या माणसाने माझे लिखाण आवडले असे लिहीणे यात तुझा मोठेपणाच दिसुन येतो.धन्यवाद. मित्रांनो.... आजची गोष्ट आहे केवळ चार फ़ुट अकरा इंच उंचीच्या नईम सुलेमनेलुबद्दल. १९७२ ते १९८० पर्यंत वेटलिफ़्टींगच्या जगात रशियाच्या अगडबंब व्हॅसीली अलेक्सिव्हने आपली प्रतिमा जगातला सगळ्यात शक्तीमान वेटलिफ़्टर म्हणुन लोकांच्या मनात कोरुन ठेवली होती. १९८० मधे त्याचा अस्त होत असतानाच जगाचे लक्ष कोणी वेधुन घेतले असेल तर या चार फ़ुट अकरा इंच व फक्त १३५ पौंडाच्या नईम सुलेमनेलुने! व्हॅसीली अलेक्सिव्हच्या.... जो ६ फ़ुट व ३५० पौंडाच्या अगडबंब शरिरयष्टीचा होता... मानाने नईम हा अगदीच इवलासा होता पण आपल्या वजनाच्या तिपटीने जास्त वजन उचलुन त्याने सर्व जगाला १९८२ पासुन तोंडात बोटे घालायला लावली होती व १९८४ चे लॉस एंजलीस ऑलिंपिक्स येईसपर्यंत तो पॉकेट हर्क्युलीस म्हणुन जगभर ओळखला जाउ लागला! तर हा असा नईम जन्माला आला बल्गेरियामधल्या एका एथनीक टर्कीश आइ-वडिलांच्या घरात. त्याचे आई-वडिल बल्गेरिया व टर्की यांच्या सिमेवरच्या भागात इतर एथनिक टर्क्स लोकांच्या वसाहतीत घर करुन होते. म्हणजे नईमची नॅशनॅलीटी जरी बल्गेरीअन असली तरी त्याचे एथनीक ओरीजीन टर्कीश होते. १९८० च्या सुमारास... जो काळ सोव्हिएट युनिअनची शंभर छकले होण्यापुर्वीचा होता.... संपुर्ण इस्टर्न युरोपवर सोव्हिएट युनिअनचे वर्चस्व होते. बल्गेरियामधे सुद्धा त्यावेळी कम्युनीस्ट राजवट होती व त्या देशात टर्कीश लोकांना दुय्यम दर्जा होता. बल्गेरियामधील टर्क लोक जवळजवळ निर्वासितांसारखीच बल्गेरिया- टर्की बॉर्डरवर छावणींमधे राहायची. तर अशा छावणीमधे या नईमचा जन्म झाला. पण लहाणपणापासुन त्याने वेटलिफ़्टींगमधे प्रगती केल्यामुळे बल्गेरियन स्पोर्ट्स फ़ेडरेशनने त्याला आपल्या अखत्यारीमधे घेतले व त्याचे प्रशिक्षण जोमात सुरु केले व १९८२ पर्यंत नईमने फ़ेदरवेट गटात जागतीक विक्रम करण्यापर्यंत मजल मारली. पण १९८४ च्या लॉस एंजेलीस ऑलिंपिक्सवर रशियाप्रमाणे बल्गेरियानेसुद्धा बहिष्कार घातल्यामुळे नईमला ते ऑलिंपिक मुकावे लागले. पण १९८६ च्या मेलबोर्नमधील वर्ल्ड वेटलिफ़्टींग चॅंपिअनशिपमधे एक खळबळजनक घटना घडली. बल्गेरियाचा असलेला पण एथनीसीटीने टर्क असलेल्या नईमने बल्गेरियामधुन डिफ़ेक्ट होउन टर्कीकडे राजकीय आसरा मागीतला. त्याला सर्व जगाचे लक्ष बल्गेरियामधे टर्कीश लोकांवर होत असलेल्या अन्यायाकडे वेधायचे होते व त्याने आपल्या स्टॅटसचा फायदा करुन घ्यायचे ठरवले. टर्कीने त्वरीत त्याला टर्कीचे राष्ट्रियत्व बहाल केले पण बल्गेरियाने एक अट घातली... त्यांना नईमच्या मोबदल्यात १० लाख डॉलर्स हवे होते. टर्कीने ताबडतोब ती अट मान्य केली व नईम १९८८ च्या सेउल ऑलिंपिक्समधे टर्कीचे प्रतिनिधित्व करुन उतरला.. अलबत! त्याच्या आइ-वडिलांना व त्याच्या सर्व फ़ॅमीलीला त्याला मुकावे लागले होते. म्हणजे नईमने फार मोठी किंमत त्याच्या डिफ़ेक्शनसाठी मोजली होती. त्याच्या आइवडिलांचे बल्गेरियाच्या कर्मठ कम्युनीस्ट राजवटीने काय हाल केले असतील हेही त्याला कळायला मार्ग नव्हता.पण टर्कीमधल्या सगळ्या लोकांना व टर्कीचा अध्यक्ष टर्गट ओझालला नईमने हमी दिली होती की मी टर्कीचे व टर्कीश लोकांचे नाव सेउल ऑलिंपिक्समधे सुवर्णपदक मिळवुन नक्कीच उज्वल करीन. सेउल ऑलिंपिक्स... १९८८. फ़ेदरवेट वेटलिफ़्टींगचा फ़ायनल्सचा दिवस.. सगळे जग नईमच्या या आधीच गवगवा झालेल्या कहाणीमुळे नईमच्या ऑलिंपिक्स पदार्पणाकडे डोळे लावुन बसले होते... खासकरुन टर्कीमधील सगळे ५५ मिलिअन लोक! सर्व टर्की त्यादिवशी बंद होते... व सगळ्यांचे लक्ष टिव्हीवर नईमकडे खिळले होते.. नईमने त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना आधी जायला सांगीतले. सगळे स्पर्धक आपापले प्रयास संपवुन नईमची वाट पाहत बसले. नईमने टाळ्यांच्या कडकडाटात एरीनामधे प्रवेश केला. त्याने आतापर्यंत जो पहिल्या स्थानावर होता त्याच्यापेक्षा ५ पौंडाने अधीक वजन मागीतले. सगळ्या जगाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या असताना नईमने ते वजन सहज उचलुन ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर सगळ्या जगाला तोंडात बोटे घालायला लावली... कारण सगळे जग त्याच्या एवढ्याश्या शरीरयष्टीकडे बघुन त्याला ते वजन पेलवेल यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हते.. एवढ्याश्या शरीरातुन तो एवढी शक्ती कुठुन आणतो याचे सर्वांना आश्चर्य वजा कौतुक वाटले! त्यादिवशी नईम तेवढ्यावरच न थांबता अजुन ३ वेळा अधिक अधिक वजने उचलुन नवीन जागतीक विक्रम करुन सुवर्णपदक विजेता झाला... इकडे टर्कीमधे सगळ्यांनी जल्लोश केला व ऑलिंपिक्स स्पर्धा पुर्ण झाल्यावर खुद्द अध्यक्ष टर्गट ओझालच्या जेटमधुन नईमला टर्कीत परत आणले गेले. परत आल्यावर अंकारात त्याचे जे न भुतो न भविष्यती स्वागत झाले ते पाहुन नईमचे डोळे पाणावले. त्याला आपल्या आईवडिलांची व इतर नातेवाइकांची फार आठवण आली.पण त्याने केलेले सॅक्रीफ़ाइस वाया गेले नाही. सेउल ऑलिंपिक्सनंतर ताबडतोब सगळ्या जगाने नईमने ज्या कारणासाठी बल्गेरिया देश सोडला होता त्या कारणाची दखल घेतली. बल्गेरियावर सर्व जगाचे दडपण लादले गेले व बल्गेरियातील टर्क लोकांना बल्गेरिया सोडुन टर्कीमधे जाण्याची मुभा दिली गेली.त्याचा फायदा घेत जवळ जवळ ३ लाख एथनिक टर्क्स बल्गेरिया सोडुन टर्कीमधे आले. त्यामधे अर्थातच नईमचे आइवडिलसुद्धा होते व जवळजवळ ३ वर्षांनी नईम व त्याच्या आइवडिलांची पुनर्भेट झाली. अशा रितीने एका इवल्याश्या शरीरयष्टीच्या खेळाडुने आपल्या क्रिडानैपुण्याच्या बळावर ऑलिंपिक्सचा रंगमंच वापरुन एक राजकिय परिवर्तन घडवुन आणले.त्याकरताही नईम सुलेमनेलु सगळ्या जगाच्या लक्षात राहील. पण नईम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपला पराक्रम १९९२ च्या बार्सिलोना ऑलिंपिक्समधे पुढे चालु ठेवला व सुवर्णपदक मिळवले. १९९६ मधे त्याने ऍटलांटाला जेव्हा लागोपाठ तिसर्यांदा ऑलिंपिक्समधे सुवर्णपदक मिळवले त्यावेळेला वेटलिफ़्टींग एरीनामधे जे भाग्यवंत या पॉकेट हर्क्युलीसचा पराक्रम टाळ्यांचा कडकडाट करुन बघत होते त्यात मीही एक होतो! हे सांगताना आजही नईमची वामनमुर्ती व त्याचा वजन उचलण्याचा हातखंडा व त्याने वाकुन केलेल वंदन... हे सगळे अगदी काल बघीतल्यासारखे माझ्या डोळ्यापुढे येते...
|
Mukund
| |
| Saturday, February 02, 2008 - 10:48 am: |
|
|
नईम सुलेमनेलुच्या सुवर्णपदकाला साक्षी असणे हा निश्चितच माझ्या ऍटलांटा ऑलिंपिक्स अनुभवांपैकी एक अविस्मरणिय अनुभव होता. भारताला जे एकमेव पदक(ताम्र) या ऑलिंपिक्समधे टेनीसमधे लिऍन्डर पेसने मिळवुन दिले होते त्याच्या उपांत्य फेरीतल्या ऍगेसीबरोबरच्या सामन्याला उपस्थित असणे हाही एक अविस्मरणिय अनुभव होता. त्या दिवशी पहिला सेट जेव्हा टायब्रेकरमधे गेला तोपर्यंत माझा घसा ओरडुन ओरडुन(पेसला दिलेल्या प्रोत्साहनाने!)बसला होता पण शेवटी ऍगॅसीने तो सामना जिंकुन आमची तोंडे बंद केली. झालच तर भारत पाकीस्तान हॉकी सामना बघणे हाही एक आगळा अनुभव आला पण तो सामना अतिशय रटाळ झाला हे सांगण्यास अतिशय खेद होतो. दोन्ही संघ त्यादिवशी जिंकण्यापेक्षा हरायचे नाहीच या एकाच उद्देशाने खेळत होते! ०-० असा अनिर्णीत सामना आमच्या नशिबी त्यादिवशी आला. पण ऍटलांटा ऑलिंपिक्स दोन वाइट गोष्टींसाठीही सगळ्यांच्या लक्षात राहीले.. एक म्हणजे या ऑलिंपिक्सवर आलेले ओव्हर कमर्शलायझेशनचे सावट व दुसरे म्हणजे या ऑलिंपिक्सच्या आठव्या दिवशी झालेला सेंटेनियल ऑलिंपिक्स पार्कमधला बॉम्बस्फोट! पण या वाइट गोष्टींबद्दल लिहायच्या आधी मला माझे ऍटलांटामधले एक दोन अजुन अविस्मरणिय अनुभव सांगावेसे वाटतात.... १९९६ ला माझ्या नशिबाने माझा भाउ ऍटलांटालाच सिटा या फ़्रेंच टेलीकम्युनीकेशन कंपनीत कामाला होता. तो त्यावेळी मेरिआटाला राहायचा. मेरीआटापासुन डाउनटाउन ऍटलांटा डनवुडीपासुन येणारी ट्रेन घेतली तर ३० मिनिटावर होते.जुलै २७ १९९६ च्या सेंटेनिअल ऑलिंपिक पार्कमधील बॉंबस्फोटानंतरच्या दुसर्याच दिवशी आम्हाला पुरुषांच्या १०० मिटर्स फ़ायनल्स असलेल्या ऍथेलेटिक्स इव्हेंटला जायचे होते. त्या संध्याकाळच्या सेशनमधे १०० मिटर्स फ़ायनलबरोबरच पुरुषांची २०० मिटर्स सेमिफ़ायनल, पुरुषांची लॉंग़ जंप फ़ायनल व १०,००० मिटर्स लेडिज फ़ायनल व महिलांच्या हेप्टेथलॉनच्या पहिल्या ४ राउंड्स..... अश्या बर्याच स्पर्धा होत्या. मी, माझा भाउ, माझी आई व माझी वहिनी(यात वहिनी व आईला आम्हा दोघा भावांनी बळेच ओढुन आणले होते हे आधीच नमुद करतो!)डनवुडी पासुन निघालेली मार्टा(ऍटलांटा अंडरग्राउंड रेल्वे) ट्रेन घेउन डाउनटाउन ऍटलांटाला मेन ऑलिंपिक्स स्टेडिअम(टर्नर फ़िल्ड)ला जायला दुपारी २ लाच निघालो. सेशन संध्याकाळी ७ ला सुरु होणार होते पण आदल्या दिवशीच्या बॉंबींगमुळे टिव्हीवर सांगीतले होते की सुरक्षा खुप कडक असणार आहे व प्रेक्षकांची कडक तपासणी केली जाणार आहे त्यामुळे रांगा मोठ्या असतील तेव्हा ३ ते ४ तास आधीच स्टेडिअमवर या.त्या सुचनेला मान देउन आम्ही घरुन २ वाजताच कुच केले. आणी मेन ऑलिंपिक स्टेडिअमवर गेलो तर खरच तिथे मारुतीच्या शेपटीसारखी रांग होती. त्या रांगेत ३ तास उभे राहुन आम्ही ६.३० ला स्टेडीअममधे प्रवेश केला व आत पाहीलेल्या द्रुष्याने अंगावर काटा आला... इतकी वर्षे या ऑलिंपिक्सबद्दल फक्त ऐकत किंवा वाचत किंवा टिव्ही वर बघत आलो होतो.. आज प्रत्यक्ष..याची देहा याची डोळा..... मी मेन ऑलिंपिक्स स्टेडिअम अनुभवत होतो. ८० हजार लोकांचा जनसमुदाय डोळ्यासमोर उभा होता. पाठीमागेच वरच्या सेक्शनमागे ऑलिंपिक्सची मशाल तेवत होती..(पण ती मशाल मला मॅकडॉनल्डच्या फ़्रेंच फ़्राइजच्या पुड्यासारखीच भासत होती... ओव्हरकमर्शलायझेशनचा परिणाम!..मॅकडॉनल्डने त्यासाठी किती पैसे दिले कोणास ठाउक!) ठिक सात वाजता जॉन विलिअम्सच्या मनोवेधक ऑलिंपिक्स म्युझिकने सेशनला सुरुवात झाली. मी भारावुन जाउन ते सर्व जबरदस्त ऍथलिट जवळुन पाहात होतो. सगळ्यात आधी महिलांच्या हेप्टेथलॉनच्या चार स्पर्धा झाल्या.यातली एकही स्पर्धक माझ्या माहीतीची नव्हती पण त्यांची तुकतुकीत वेल टोन्ड कांती ते जागतीक दर्जाचे ऍथलिट आहेत याची साक्ष देत होते. मग आले मेन्स २०० मिटर्स सेमीफ़यनलमधले स्पर्धक व सगळ्या स्टेडिअममधे फ़्लॅश लाइट्समुळे काजवे चमकत आहेत असा भास झाला. ते फोटो दुसर्या तिसर्या कोणासाठी नसुन अमेरिकेचा गोल्डन रनर मायकेल जॉन्सन यासाठी होते. विश्वविक्रम करुन ती रेसच नाही पण ४०० मिटर्सची रेसपण तोच जिंकणार हे सगळ्यांना ठाउक होते.. फक्त किती मिलिसेकंदाने तो आपलाच विश्वविक्रम तोडतो हे सगळ्यांना पाहायचे होते. नायके शुज कंपनीने त्याला सोन्याचा वर्ख असलेले शुज घालायला दिले होते. ते सोनेरी शुज त्याच्या पायात चम चम असे चमकत होते. बंदुकीच्या गोळीचा फाट... असा आवाज झाला व मायकेल जॉन्सन जो सुसाट सुटला म्हणुन सांगु! १९ सेकंदांनी जेव्हा सेमीफ़ायनलची पहीली हिट संपली तेव्हा सगळे स्टेडिअम लोकांच्या ओरडण्याने दणदणुन गेले होते... मायकेल जॉन्सनने त्याच्या चाहत्यांची निराशा केली नव्हती... स्कोरबोर्डवर त्याच्या नावावर विश्वविक्रम दाखवला जात होता.. स्टेडिअम शांत व्हायला तब्बल १० मिनिटे लागली... त्याचा तो सुसाट वेग खरच एकदम इंप्रेसिव्ह होता... मग आले मेन्स लॉंग जंपमधले खेळाडु व पुन्हा एकदा सगळे स्टेडीअम टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमुन गेले... साक्षात कार्ल लुइसने स्टेडिअममधे पदार्पण केले होते... आतापर्यंत ऑलिंपिक्स स्पर्धेत आठ सुवर्ण पदके मिळवुन कार्ल लुइसने आपले नाव ऑलिंपिक्सच्या इतिहासात अजरामर केलेच होते पण आज तो लांब उडीमधे लागोपाठ चौथे सुवर्णपदक मिळवायचा प्रयत्न करणार होता. जवळजवळ दिड तासाच्या लढ्यानंतर कार्ल लुइसने सुवर्णपदक जिंकुन फ़िनलंडच्या पावलो नुर्मीच्या ९ सुवर्णपदकाच्या ऑलिंपिक्स विक्रमाची बरोबरी केली.या महान ऍथलिटला धावण्याच्या शर्यतीत नाही तरी लांब उडीच्या शर्यतीत तरी बघण्याचे सौभाग्य मला लाभले. लांब उडीच्या आधी स्टार्ट घेताना तो १०० मिटर्स स्प्रिंट करत आहे असाच तो धावत होता... त्याचा तो स्पिड पाहुन तो १०० मिटर्सच्या फ़ायनलमधे नाही हे बघुन मला खरच नवल वाटले. एव्हाना रात्रीचे साडेनऊ वाजले होते. मी व माझा भाउ एका सेक्शनमधे तर वहिनी व आई एका सेक्शनमधे अशी तिकिटे आम्हाला मिळाली होती. थोड्याच वेळात ऑलिंपिक्समधली सगळ्यात प्रिमिअम स्पर्धा.. ज्याने फ़ास्टेस्ट मॅन ऑन अर्थ हा किताब कोणाला तरी मिळणार होता... ती स्पर्धा सुरु होणार होती..१०० मिटर्स फ़ायनल्स! आठ अव्वल दर्जाचे खेळाडु शर्यतीला उभे राहीले.... एवढ्यात आमच्या मातोश्री व वहिनी आमच्याकडे आल्या.... व जोरात माझी वहिनी(जी मराठी नाही) तिने इंग्लिशमधे प्रश्न केला.... when do we go home? we are sleepy and tired!त्या प्रश्नाने मला एकदम लाज वाटली... इथे जगातले सगळ्यात फ़ास्टेस्ट ऍथलिट्स फ़ायनल धावायला तयारीत उभे आहेत व माझी वहिनी व आई झोपायच्या गोष्टी करत होत्या... मी त्यांना कसेबसे आवरले व सांगीतले की अजुन थोडा वेळ कळ काढा... आजुबाजुचे सगळे दर्दी प्रेक्षक आमच्याकडे पाहात होते... व त्यांच्या नजरेत मला पुर्ण दिसत होते की ते म्हणत आहेत.... अरे या लोकांना १०० मिटर्स फ़ायनलला झोप येउ शकते?... कमाल आहे या लोकांची!... असो. पण याही शर्यतीत आम्हाला दिवसातला दुसरा विश्वविक्रम बघायला मिळाला. १९९२ चा ऑलिंपिक विजेता ब्रिटनचा लिनफ़ोर्ड ख्रिस्टी दोनदा फ़ॉल्स स्टार्ट केल्यामुळे बाद झाल्यावर कॅनडाच्या डॉनाव्हन बेलीने ९. ८६ सेकंदाच्या वर्ल्ड रेकॉर्ड टाइममधे १०० मिटर्सची स्पर्धा डोळ्याचे पाते लवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात जिंकली... क्रमंश:
|
Rani_2007
| |
| Saturday, February 02, 2008 - 9:10 pm: |
|
|
मुकुंद, खूपच सुंदर लिहिण्याची शैली...सगळे काही डोळ्यासमोरच घडत असल्यासरखे भासते. तुमच्या अटलांटाच्या ऑलिंपिकचा अनुभव वाचून असे वाटले कि खरोखर ऑलिंपिकचा प्रत्यक्षिदर्शी अनुभव घ्यावा. (अवांतर: २०१६ ला शक्यता आहे.. जर Chicago ला nomination मिळाले तर..जाउ द्या सगळ्या जर-तरच्या गोष्टी...माझीतरी काय शाश्वती तोपर्यंत (इथे राहण्याची)?
|
खूप छान वाटतंय मुकुंद एक एक प्रसंग वाचून. मस्त लिहिताय.
|
Runi
| |
| Sunday, February 03, 2008 - 12:04 am: |
|
|
मुकुंद, एकदम ओघवते वर्णन. तुमच्या छान लिहीण्याच्या पद्धतीमुळे या घटना अगदी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असच वाटत रहाते वाचताना. एवढ छान वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. लिहीत रहा.
|
Mukund
| |
| Sunday, February 03, 2008 - 6:15 pm: |
|
|
राणी... मीही त्याचीच वाट पाहत आहे..शिकागोला होस्ट सिटी म्हणुन घोषीत करायला. कोणी बैजींगला जाणार आहे का? आपल्या मायबोलीमधील चायना मधे कोणी आहे का? म्हणजे तिकिटांबद्दल व राहण्याबद्दल खात्रीची बातमी मिळु शकली असती. माझी खुप इच्छा आहे जाण्याची. एकदा ऍटलांटाला १५ दिवस जवळुन ऑलिंपिक्स अनुभवल्यावर परत तसा अनुभव अनुभवायाला जरुर आवडेल पण चायना मधे भाषेचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. पण २०१०चे विंटर ऑलिंपिक्स व्हॅन्कुव्हर ला आहे. त्याला जरुर जाणार आहे झालच तर २०१० मधे भारतात एशियाड आहे त्यावेळेलाही भारतवारी नियोजीत केली आहे. रुनी,अमेय धन्यवाद. तुम्ही या गोष्टी वाचुन एक प्रकारे त्या ऑलिंपिक्स हिरोंनाच सन्मानीत करत आहात. असो. तर परत एकदा माझ्या ऍटलांटा ऑलिंपिक्स अनुभवांकडे वळुयात.. तर अशी १०० मिटर्स फ़ायनल्सची शर्यत डॉनाव्हन बेलीने जागतीक विक्रम करुन जिंकल्यावर मी माझ्या भावाला सांगीतले की तु आई व वहिनीबरोबर घरी जा मी मात्र संपुर्ण सेशन संपेसपर्यंत इथे राहाणार आहे. एव्हाना जोराचा पाउसही सुरु झाला होता व अर्धे स्टेडिअम रिकामे झाले होते. महत्वाच्या शर्यती ज्यात अमेरिकन ऍथलिट्स भाग घेणार होते त्याही संपल्या होत्या व आता फक्त महिलांची १०,००० मिटर्सची शर्यत बाकी होती. १०,००० मिटर्स म्हणजे स्टेडिअमला २५ फेर्या मारायच्या. म्हणजे अजुन ४५ ते ५० मिनिटेतरी अजुन ती शर्यत संपायला लागणार असा विचार करुन बरेच जण पावसापासुन व शेवटी होणार्या गर्दीपासुन सुटका व्हावी म्हणुन स्टेडिअम सोडुन चालले होते. पण माझ्यासारखे क्रिडाप्रेमी पावसात थांबुनच राहीले होते. पण अर्धी माणसे निघुन गेल्यामुळे एक फायदा झाला... संयोजकांनी बाकीच्यांना पुढे येउन बसण्याची मुभा दिली व मला ट्रॅकपासुन अगदी ४ फ़ुटांवर पहिल्या रांगेत जागा मिळाली जिथुन मला सगळे स्पर्धक हाकेच्या व हात शेक करायच्या अंतरावरुन बघायला मिळणार होते. शर्यत सुरु झाली. मी माझा या शर्यतीबद्दलचा थोडा अभ्यास आधीच घरुन करुन आलो होतो. त्यावरुन मला माहीत होते की १९९२ मधे बार्सिलोना मधे ही शर्यत इथिओपियाची डिरार्टु टुलु हिने जिंकली होती व याही वेळी तिच संभावीत विजेती होती. पहिल्या दहा फेर्यांनन्तर टुलुच पहिली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा टुलु माझ्या समोरुन पास होत होती तेव्हा मी जोरात ओरडुन 'गो टुलु गो' असे ओरडुन तिला प्रोत्साहन देत होतो. मी पहिल्या रांगेत असल्यामुळे तिला माझा आवाज ऐकु येत होता. तिला वाटले असेल की हा कोण आहे माझ्या नावाने मला प्रोत्साहन देणारा? माझ्या मनात मात्र टुलु ही मला आतापर्यंत माहीत असलेल्या ऑलिंपिक्स हिरोंचे प्रतिनिधीत्व करत होती... माझ्या मनात तीच झाटोपेक होती,तिच अलाय मिमु होती,तिच फ़ॅनी ब्लॅन्कर्स कुन होती व तीच स्टिव्हन अखवारी होती... त्या महान ऍथलिट्सनी जेव्हा ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर आपापले मास्टरपीस(स्लार्टीच्या भाषेत.... मालकतुकडे!)सादर केले होते तेव्हा मी त्याला मुकलो होतो... आज टुलुला प्रोत्साहन देताना माझ्या मनात मी अप्रत्यक्षरित्या त्या व त्यांच्यासारख्या महान ऍथलिट्सना पोस्थ्युमसली एनकरेज करत होतो... माझे अंग पावसात पुर्ण भिजले होते पण त्याहीपेक्षा माझे मन माझ्या ऑलिंपिक्सच्या आठवणींनी त्याक्षणी जास्त भिजले होते. असा अनुभव आपल्याला आयुष्यात परत कधी अनुभवयाला मिळेल की नाही हे मला माहीत नव्हते म्हणुन मनापासुन टुलुला नावाने व बाकीच्यांनासुद्धा प्रोत्साहन देत मी संपुर्ण शर्यत संपेसपर्यंत उभा होतो. शर्यत संपली... टुलु पहीली आली नाही... तिला यावेळेला पदकही मिळाले नाही. पण मला त्याची पर्वा नव्हती. ती आणी हे सगळे वर्ल्ड क्लास ऍथलिट्स शर्यतीत भाग घेउन..... माणसाचे जे स्वाभावीक नेचर असते की आपण आपले सर्वस्व पणाला लावुन ट्राय टु बी द बेस्ट..त्याचे उत्तम उदाहरण होते. माझ्या मनात ते सगळे विजयी होते. मला शेवटचा नंबर आलेल्या ऍथलिटची तिने या ऑलिंपिक्समधे भाग घेण्यासाठी केलेली आयुष्यभरची मेहनत दिसत होती व म्हणुन तिचेही टाळ्या वाजवुन मी कौतुक करत होतो. शर्यत संपली. लोक स्टेडिअम रिकामे करुन जात होते. मी मात्र झिम झिम पावसात माझ्या सिटवर बराच वेळ बसुन होतो. त्या ऑलिंपिक्सच्या विशाल स्टेडिअमकडे बघत माझ्या मन्:पटलावर मला माहीत असलेले ऑलिंपिक्सचे जुने क्षण आणत होतो व ते क्षण या स्टेडीअममधे परत एकदा जगत होतो. स्टेडिअम रिकामे असुनसुद्धा मला १९५२ मधल्या हेलसिंकी ऑलिंपिक्स स्टेडिअममधला झाटो...पेक....झाटो....पेक.. चा गजर ऐकु येत होता... मला जेसी ओवेन्स माझ्यासमोरुन वार्याच्या वेगात धावताना दिसत होता... भारताचा महान हॉकीपटु ध्यान चंद व त्याचा भाउ रुप चंद बर्लिन ऑलिंपिक्समधे त्यांच्या हॉकीच्या तळपत्या बॅटीची जादु दाखवत बॉल ड्रिबल करत सफ़ाइने गोल करताना दिसत होते...झालच तर आपल्या भारताची पलावलकुंडी ठाकरमपिल उषा फक्त एक शतांश सेकंदाने ४०० मिटर्स हर्डल्समधे पदक हुकल्याने कंबरेवर हात ठेवुन वाकुन निराशेने लॉस ऍन्जेलीस ऑलिंपिक्स स्टेडिअममधे उभी असलेली दिसत होती... स्टेडिअममधले दिवे मालवले गेले व शेवटी मला उठायलाच लागले. परत एकदा त्या भव्य पण रिकाम्या ऑलिंपिक्स स्टेडिअमकडे पहात व माझ्या पाठीच तेवत असलेल्या ऑलिंपिक्स मशालीला मनातल्या मनात वंदन करुन मी भिजल्या अंगाने व ऑलिंपिक्सच्या आठवणींनी तितक्याच भिजल्या मनाने स्टेडिअममधुन जड अंत्:करणाने काढता पाय घेतला व डनवुडी ट्रेन पकडुन मध्यरात्री घरी पोहोचलो..... क्रमंश्:
|
Shravan
| |
| Monday, February 04, 2008 - 10:50 am: |
|
|
जियो मुकुंद..!!!!!! असं एखादं वेड घेऊन जगाव माणसाने..
|
Hkumar
| |
| Tuesday, February 05, 2008 - 4:42 am: |
|
|
मुकुंद, सुंदर! पी.टी.उषाचे पूर्ण नाव कळले, धन्यवाद.
|
Amruta
| |
| Tuesday, February 05, 2008 - 5:36 pm: |
|
|
मुकुंद, मस्तच!!!...और कुच नही
|
क्लास. नाही क्लास अपार्ट. क्या बात है.
|
Arch
| |
| Tuesday, February 05, 2008 - 8:00 pm: |
|
|
मुकुंद, छानच लिहितो आहेस. काही गोष्टी नव्या समजतायत. काहींना उजाळा मिळतो आहे. मुख्य म्हणजे ह्या bb ची कल्पनाच इतकी छान आहे न तुझी.
|
Ashwini_k
| |
| Wednesday, February 06, 2008 - 4:32 am: |
|
|
मुकुन्द, ऑलिम्पिक्स प्रत्यक्ष बघायला मिळणार्या भाग्यवंतांपैकी तुम्ही एक! त्यातून तुमचे अनुभव आमच्यासारख्यांना "अनुभवायला" देऊ शकणारी तुमची लेखनशैली. सगळंच मस्त!!!
|
Akhi
| |
| Wednesday, February 06, 2008 - 4:45 am: |
|
|
मुकुंद, मस्तच!!!... आणी तुमच्या शैली ला लाख लाख प्रणाम..... अंगावर रोमांच आले सगळ वाचुन
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|