|
Upas
| |
| Wednesday, January 09, 2008 - 4:01 pm: |
| 
|
मुकुंद absolutely agree! तू म्हणतोस ते खरच आहे ह्यात वाद नाही, आपण त्यांच्या असल्या tacts ना बळी पडता कामा नये आणि तेवढा मनाचा कणखरपणा हवाच. पण ह्याक्षणी टीमला आपला support हवाय हे ही खरच. तेव्हाच्या जगज्जेत्त्या वेस्टईंडीज टीमसारख केवळ मैदानावर ठासून खेळण्याव्यतिरीक्त pointing & co. बाहेर सुद्धा वाईट क्लृप्त्या करते, that hurts, but team has to get over it! If adaptibility fails हॉकी टीमसारखी आपली टीम रसातळाला जाईल असं तू म्हणतोयस त्यात सुद्धा तथ्य आहेच. सुदैवाने 20-20 ह्या नव्या form मधे तरी टीम ने बर्यापैकी लढाऊ वृत्ती दाखवलेय.. सर्वे गुणाः कांचनामाश्रयन्ते, त्यामुळे जोपर्यंत भारतातून चिक्कार पैसा मिळतोय क्रीकेटला, भारतीय टीमचं रसातळाला जाणं परवडेल असं वाटत नाही.. :-p पुढची मॅच बघायला खरच मजा येणार! perth is not easy track to play आणि मॅच चा निकाल लागण्याची शक्यता खूप आहे..
|
I liked asami's suggestions. >yet, check with Ponting's finger. perfect. it will make an impact for sure. just do not look at umpire. always and immediately look at ponting first. 4. When fielding, do not bother to appeal for catch/LBW etc. no no. to appeal, look at where ponting is. whether its pavillion or on field. >If batsman walks away, thats fine, else go back to whatever you were doing. right. I feel this will make an impact.
|
Nandya
| |
| Wednesday, January 09, 2008 - 7:15 pm: |
| 
|
मेलबोर्नमधेही तेच घडले व त्याच्या आधीही जेव्हा पंचांच्या चुका झाल्या नव्हत्या तेव्हाही आपला ऑस्ट्रेलिया बरोबरचा रेकॉर्ड फारच दिनवाणा आहे. >>> गेली दहा वर्ष आॅस्ट्रेलियाचा संघ जेव्हापसून "invincible" समजला जातोय, फ़क्त भारत हा एकमेव देश आहे ज्यानी ह्या दरम्यान आॅट्रेलियाशी punch for punch खेळ केलेला आहे. ही सिरीज सुरु व्हायच्या आधी, गेल्या १०-११ वर्षात India v/s Australia matchup मधे 8 wins to Australia, 7 wins to India and 3 draws हे status होते, which is an enviable record, something the other teams would only dream of having. Even though India may appear to have lost rather tamely to Australia on many occasions, fact is that it has also given it back to Australia, and has done it better than any other nation. The nature of the India-Australia rivalry is as fierce as any in sports, and in such cases when one team benefits the involuntary advantage of umpires and officials to such a large degree, it leaves a bitter taste in the mouth. What we saw at Sydney was not dominance but arrogance, and worse, aided by some pathetic umpiring that seemed to go consistently against one team and favourably for the other. As for Clive Loyd and his wonder team of the 70's and 80's, they were no dignified Noblemen either, as you seem to express. This is the same team which set about injuring the Indian batsmen and taking them out of the game at any cost in the 4th and final test at Kingston Jamaica, when India had neutralized the series 1-1 in the 3rd. " http://content-usa.cricinfo.com/ci/engine/match/63162.html ". They were extremely aggressive, charismatic cricketers without doubt, but an inkling of a threat to their supremacy turned them into street thugs, and there is ample evidence of it right through Clive Lloyd's career as a captain. असो. आता पर्थ मधे ली, टेट, क्लार्क अन जाॅनसनपुढे आपले फ़लंदाज़ हलंदाज़ होणार का नाही ते बघुयात. इशांत अन आर पी बरोबर श्रीशांत चालला असता पर्थला.
|
Asami
| |
| Wednesday, January 09, 2008 - 8:46 pm: |
| 
|
What we saw at Sydney was not dominance but arrogance, and worse, aided by some pathetic umpiring that seemed to go consistently against one team and favourably for the other. >> couldn't have said it better मुकुंद तुमची link मी आधीच पाहिली होती. त्या गोष्टी मी नाकारत नाही पण म्हणून Sydney मधे जे झाले ते समर्थनिय होते का ? 2 wrongs never make 1 right (Though ICC tends to believe so) ह्याच न्यायाने Aussies are no saint either and hence it's perfectly justified to use any tactics against them असा निश्कर्ष काढला तर योग्य ठरेल का ? मी माझ्या मागच्या post मधे म्हटले तसे I do not believe assies style gamesmanship needs to be part of the game. If you do, you are not true champion IMHO. I agree that players have right to appeal and, certainly need not have to walk on their own. But, then of course by not doing so, you surrender any morale position to preach about, and preaching is precisely what Aussies have been doing since series started. म्ह्णून मला तरी त्यांचे अभिनंदन करावेसे वाटत नाही. आत्त तुमच्या मानसिक क्षमतेच्या मुद्द्याकडे बघू. Overall हे जरी खरे असले तरी Sydney was an pleasant exception to it IMHO. In spite of, handful wrong decisions we managed to take first innings lead (Not to forget balling attack way far from your best possible attack). In second innings, before in-form sachin and VVS got out to good deliveries, they were playing positivitely. Hence it certainly hurts when rest of the core is given wrongfully out. (And so called champion team assists the process) I'm not counting on dhoni or yuvraj or jaffer to save the test. In fact kumbale hanging out ~50 balls shows, we did not go down easily. If you can recall similar situations in SA or against Eng in bombay, we had surrendered meekly. I think that's positive to take for. Hopefully we will be able to stand and deliver or at least stand and fight in perth. Hockey चे उदाहरण थोडेसे ह्याच कारणामूळे गैरलागू आहे. Change of turf affected conditions of game. It changed nature of game from being skillful dribbles to paced passes and running. On the other hand, sledging was never integral part of game. It's just lame excuse pushed under name of "playing game hard". If I recall correctly Bradman's opinion about so-called "playing game hard" was to chuck away those players when he was selector. I think that says it all. There is delicate line between being arrogant and being aggressive and I think there are lot of champions sitting on other side of fence PS : तुमचि कळकळ मला पटते तेंव्हा हे मुद्दे तुम्हाला persoanally उद्देशून नाहीत हे क्रुपया लक्षात घ्या
|
Zakki
| |
| Wednesday, January 09, 2008 - 9:58 pm: |
| 
|
परत तेच. काहो, नोकरीत, व्यवसायात जेंव्हा लोकांवर अनेक अन्याय होतात तरी ते सहन करून कित्येक जण, या क्रिकेटपटूंना मिळतात त्यापेक्षा शंभरपट कमी पैसे मिळत असताना देखील, संसाराचा गाडा ओढतात, कुटुंबाचे शिक्षण, संगोपन करतात. मग हे क्रिकेटपटूच कोण लागून गेले आहेत टिक्कोजीराव की ह्यांना नीट वाग़वावे? नि हे खेळ नि खेळाचे नियम याबद्दल नसून पैशाबद्दल आहे हे सत्य विसरू नका! तुमचा अपमान झाला तर हुतुतू, खो खो खेळायचे थांबवा! पण क्रिकेटमधे मात्र, क्रिकेट थांबवा असे का म्हणत नाही तुम्ही? अहो पैसा सत्यं, राजकारण, खेळ, धंदा झूठा! हे आजचे सत्य आहे. ते लवकरात लवकर Adapt केलेत तर जरा इतर महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला बरे पडेल तुम्हाला. तुम्ही काय माझ्यासारखे करून सवरून भागला नि आता फक्त वर जाण्याची वाट बघत बसला आहात का? काहीतरी विधायक करा, लिहा.
|
Upas
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:26 am: |
| 
|
ये हुई ना बात, Very well said नंद्या, असामी! भज्जीवर आरोप करून त्याला बाहेर ठेवणं आणि येन केन प्रकारेण भारतीय टीमचं मनोबल खच्चीकरणं करण्याचं काम ponting & co. चोख करतेय हे नक्कि! अंपायर्स वर ते प्रचंड दबाव आणतात आणि इथे तर बहुतेक match refree वर सुद्धा! स्वत फलंदाजी करताना बॅटला बॉल लागूनही मैदान न सोडणार्या, जमिनीवर बॉल घासला गेलाय ऍच घेताना तरीही धोनीचे अपील करणार्या पॉंटींगने नैतिकच्या गप्पा मुळीच मारू नयेत..!
|
Akhi
| |
| Thursday, January 10, 2008 - 6:48 am: |
| 
|
Please vote as 'No' so that we can give the support to Harbhajan Singh and Indian team. This Poll is from Australians news website. Let's show our power. And don't forget to FORWARD. Here's the link. Please vote NO to support India. news.com.au/ poll/1,,5007133- 5032443,00. html Please Vote " NO"
|
Mukund
| |
| Thursday, January 10, 2008 - 9:17 am: |
| 
|
असामी.. तुला ती तळटीपेची आवश्यकता वाटली हे बघुन वाइट वाटले हॉकीचे उदाहरण फक्त ऍडॅप्टीबिलीटीच्या मुद्यासाठीच दिले होते. असो. नंद्या... तु म्हणतो ते बरोबर आहे. तु दिलेले उदाहरण त्यांना पॉंटींगच्याच पंगतीत बसवते. पण त्यांची सगळी १५ वर्षे तशाच खेळाने भरलेली आहेत असे म्हणणे जरा अतिशयोक्तीचे होईल. त्या सामन्याची पार्श्वभुमी अशी होती की(ही पार्श्वभुमी देण्यामागे त्या टेस्ट मधल्या वेस्ट इंडीजच्या वागणुकीचे समर्थन करणे हा हेतु नसुन केवळ एक इतिहास लिहावासा वाटले म्हणुन!) १९७५ चा पहिला वर्ल्ड कप जिंकल्यावर अनपेक्षितपणे १९७६ च्या बॉक्सिंग डे च्या सिरीजमधे त्यांना इयान चॅपेल,ग्रेग चॅपेल,वॉल्टर्स,रेडपाथ च्या ऑस्ट्रेलियन टिमकडुन ५-१ असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर लगेचच आपण वेस्ट इंडीजमधे गेलो होतो. लॉइडचे कर्णधारपद धोक्यात आले होते. त्या सिरीजमधला पहिला कसोटी सामना त्यांनी जिंकला होता. दुसयात ते हरता हरता वाचले होते व तिसर्यात तर चक्क चौथ्या डावात ४०६ धावा करुन भारताने विजय मिळवुन विश्वविक्रम केला होता. त्या पार्श्वभुमीवर लॉइडने मग होल्डींग व वेन डॅनीयलला सबीना पार्कच्या लाइव्हली पिचवर पुर्ण मुभा दिली व एकेका ओव्हरमधे चार चार बीमर्स व बाउंसर्स टाकण्यास सांगीतले. होल्डींग त्यावेळी त्याच्या प्राइममधे होता व त्याचा वेग सातत्याने ९० मैलाच्या पुढे होता. अशा वेगात साधे बॉलपण खेळणे मुश्कील.. बीमर्सची तर बातच सोडा! तरीही पहिल्या डावात गावस्कर, अंशुमन गायकवाड व मोहींदर अमरनाथ जबरदस्त गट्स दाखवुन खेळले पण विश्वनाथ व ब्रिजेश पटेलचे जे हाल झाले ते पाहुन बेदीने ठरवले की झाले तेवढे बस झाले व फक्त ६ बाद असतानाच पहिला डाव घोषीत करुन टाकला.दुसर्या डावात तर ५ आउट झाल्यावर त्याने डाव घोषीत केला व वेस्ट इंडीजच्या दुसया डावात प्रोटेस्ट म्हणुन तो मैदानावर फ़िल्डींगला पण आला नाही. त्यावेळेला सबिना पार्कवरची माणसे पण जंगली माणसासारखी वागली होती. जमैकन एक्स्प्रेस होल्डींग लोकल बॉय असल्यामुळे तिथली लोकही त्याला प्रोत्साहन देत होती. पण अशा घटना प्रत्येक टेस्टमधे घडल्या असे मला तरी नाही आठवत. असो. त्या मालीकेनंतर सगळ्यात वाइट वाटणारी गोष्ट म्हणजे त्या जमैकाच्या दारुण पराभवामुळे भारतातली लोक टिमवर नाखुष झाले होते. पोर्ट ऑफ़ स्पेनवरचा गावस्कर,विश्वनाथ,मोहिंदर यांच्या बॅटींगमुळे मिळवलेला विश्वविक्रमी विजय सगळे विसरुन गेले व सांताक्रुझ विमानतळावर टीमचे स्वागत करायला कोणीच हजर नव्हते.. त्या वेन डॅनीयल व होल्डींगच्या बीमरवरुन आठवले... गावस्करने त्याच्या संपुर्ण कारकिर्द्रीत सध्या घालतात तसे हेल्मेट कधीच घातले नाही. खर म्हणजे १९८३ ते १९८७ अशी ४ वर्षेच त्याने(मॉडीफ़ाइड) शिरस्त्राण घातले. त्याच्या संपुर्ण कारकिर्द्रीत तो होल्डींग,ऍंडी रॉबर्ट्स,माल्कम मार्शल,इम्रान खान,लेन पॅस्को,लिली,थॉम्सन,रॉडनी हॉग अशा अनेक जलदगती गोलंदाजांनाविरुद्ध खेळला पण विशेष म्हणजे एकदाही त्याच्या डोक्याला बॉल लागला नाही. इतके त्याचे तंत्र निर्दोष होते व त्याची हिम्मत इतकी अचाट होती. गावस्करच्या त्या फ़नी लिटील शिरस्त्राणाबद्दल... ते सध्या लंडनमधे म्युझियम मधे आहे. तिथे गेलेल्या एका हेल्मेट तज्ञाने विचारले हे काय आहे व त्याला जेव्हा सांगीतले की हे एका क्रिकेटीअरचे हेल्मेट आहे तेव्हा तो हसायलाच लागला व म्हणाला ज्या महाभागाने हे हेल्मेट घातले त्याच्या डोक्याला जर एक तरी वेगवान बाउंसर लागला तर तो माणुस तात्काळ मरुन पडला असता. कोणत्या महाभागाचे हे हेल्मेट आहे? त्याला जेव्हा सांगीतले की जो हे हेल्मेट घालायचा त्याच्या नावावर १०००० पेक्षा जास्त टेस्ट धावा आहेत ते ऐकुन तो गृहस्थ गारच झाला...
|
>>> खर म्हणजे १९८३ ते १९८७ अशी ४ वर्षेच त्याने(मॉडीफ़ाइड) शिरस्त्राण घातले. त्या शिरस्त्राणाला त्या काळी 'Skull Cap' असे संबोधले जात असे. सध्याचे बांधकामावरचे कामगार ज्या प्रकारची संरक्षक लोखंडी टोपी घालतात त्यासारखे ते शिरस्त्राण होते. ते सुद्धा त्याने फारच थोडा काळ वापरले. कारकीर्दीच्या शेवटी तो पुन्हा एकदा उघड्या डोक्याने किंवा साधी टोपी घालून फलंदाजी करायचा. त्याचे तंत्र इतके अचूक होते की अशा साधनांची त्याला गरजच पडली नाही.
|
Mandard
| |
| Thursday, January 10, 2008 - 10:59 am: |
| 
|
मुकुंद तुमची पोस्ट्स नेहमीच छान आणि मुद्देसुद असतात. असेच लिहीत रहा क्रिकेटवर.
|
Zakki
| |
| Thursday, January 10, 2008 - 4:59 pm: |
| 
|
मला वाटते आपण ऑस्ट्रेलिया च्या खेळाडूंवर खूप टीका केली तर तेच रागावून खेळणे बंद करतील भारताशी!! म्हणजे मग आपल्याला नैतिक विजय तरी मिळेल. (शिवाय पैसेही!)
|
रिकी पॉंटिंगचा लेख . . . http://www.theaustralian.news.com.au/story/0,25197,23047619-5013997,00.html
|
Zakki
| |
| Monday, January 14, 2008 - 3:00 pm: |
| 
|
हे कुणि लिहून दिले त्याला? बहुधा त्याने भारतात Outsource केले असेल, स्वस्त पडते म्हणून.
|
Mukund
| |
| Saturday, January 19, 2008 - 5:31 am: |
| 
|
हे पोस्ट चौथ्या दिवशी लंचनंतर लिहीले आहे. सिडनी कसोटीतील फ़ार्सनंतर ही कसोटी खरच चांगली खेळली जात आहे(तेंडुलकर व रॉजर्स यांचे पायचीतचे निर्णय व बर्याच ५ चेंडुंच्या षटकांव्यतीरिक्त!).जो कोणी ही कसोटी जिंकेल ती टीम अभिनंदनास पात्र आहे. या क्षणी तरी आपले पारडे जड आहे. इशांत शर्मा जर अजुन २ ते ३ स्पेल आज सकाळसारखे टाकु शकला तर भारत नक्कीच जिंकेल. आणी ऑस्ट्रेलियाची सारी दारोमदार पॉंटींग गेल्यामुळे आता हुसे,क्लार्क,सिमंड्स व गिलख्रिस्ट वर अवलंबुन आहे. आजुन २७१ धावा म्हणजे या चौघांपैकी दोघांनी तरी शतके मारली पाहीजेत. इतिहास भारताच्या बाजुने आहे. पण या हुसेला आउट केलेच पाहीजे. द गाय इज अमेझींग! याची सरासरी ८० च्या वर आहे! इतिहासावरुन आठवले... मला भारताचा १९७६ सालचा वेस्ट इंडीजविरुद्धचा ४०६ धावांचा विश्वविक्रमी विजय अजुनही आठवतो.. त्याबद्दल बहुतेकांना माहीत आहे पण फ़ार कोणाला १९७९ मधला ओव्हलवरचा कसोटी सामना आठवत नसेल... ज्यात आपण ४३८ धावांचे लक्ष्य गाठायचा प्रयत्न करत होतो. सुनिल गावस्करने परत एकदा आपल्याला जवळ जवळ विजयाच्या फ़िनिश लाइनवर आणुन ठेवले होते... २२१ धावांची अविस्मरणिय मॅरेथॉन खेळी करुन... त्याने चेतन चौहानबरोबर पहिल्या विकेटसाठी २०० च्या वर भागीदारी केली होती. ४३८ धावा विजयाला हव्या होत्या व एक वेळ धावफलक दाखवत होता.. भारत १ गडी बाद व ३६६ धावा! आम्ही सगळे बी बी सी वर ब्रायन जॉन्स्टन,हेन्री ब्लोफ़िल्ड व जॉन अर्लॉट या लिजेंडरी क्रिकेट समालोचकांचे धावते वर्णन कान लावुन ऐकत होतो... वाटले की गावस्कर विजयश्री खेचुन आणणारच! पण ३८९ स्कोर असताना गावस्कर शेवटी आठ तासांची व २२१ धावांची अविस्मरणिय खेळी करुन बाद झाला. तरीही जो पर्यंत यशपाल शर्मा खेळत होता तोपर्यंत भारत जिंकु शकत होता पण तो काळ तटस्थ पंचांच्या आधीचा असल्यामुळे पंचांनी यशपालला पायचीत(खोटे!) ठरवले व वेंकटराघवनला मला वाटते खोटे धावबाद दिले गेले व शेवटी भारत ८ गडी बाद ४२९ वर पोहोचला व हा सामना अनिर्णीत राहीला... गावस्करच्या भगीरथ प्रयत्नावर असे पाणी फिरले. हा ओव्हलवरचा कसोटी सामना व १९८६ चा आपला ऑस्ट्रेलियाबरोबरचा टाय झालेला कसोटी सामना... मी कधीही विसरणार नाही! भारताने अजुन एकदा असाच १९७७ ला ऑस्ट्र्लियाविरुद्धही विजयासाठी ४९० धावांचे लक्ष्य गाठायचा प्रयत्न केला होता पण ४४५ धावांवर त्यांचे आव्हान संपले पण ४४५ धावा चौथ्या डावात विजयाचा पाठलाग करताना करणे हाही एक भारताने केलेला विश्वविक्रमच असावा असे मला वाटते... या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर ते खरच प्रचंड स्तुतीला पात्र आहेत पण त्याच न्यायाने जर ऑस्ट्रेलियाने भारताचाच १९७६ मधला विश्वविक्रम मोडुन विजय प्राप्त कला व १७ सलग कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला तर त्यांचेही खिलाडु व्रुत्तीने आपण अभिनंदन केले पाहीजे. निकाल काहीही लागो.. ही कसोटी क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच होती... आहे!
|
Upas
| |
| Saturday, January 19, 2008 - 9:08 am: |
| 
|
भारतीय टीमचे जोरदार अभिनंदन.. जितलो रे जितलो.. 
|
Mukund
| |
| Saturday, January 19, 2008 - 9:09 am: |
| 
|
आपल्या भारतिय संघाचे मनापासुन कौतुक व अभिनंदन! गेल्या दिड वर्षात बोलींग फ़्रेंडली मैदानावर मिळवलेला आपला हा चौथा विजय आहे..(साउथ आफ़्रिका,वेस्ट इंडीज व इंग्लंडमधील विजयानंतर) तेही ३ नव्या उमेदीच्या नवशिके गोलंदाज या सामन्यात खेळत असुनसुद्धा त्यांनी या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच बॅकयार्डमधे.... तेही पर्थला.. धुळ चारली हे खरच अभिनंदनास पात्र आहे. आपल्या संघाने जर मानसीक कणखरपणा दाखवला तर आपला संघ काय करु शकतो हे आपण आज पाहीलेच. आता फक्त हुरळुन न जाता एडलेडला हीच विजयी मनोवृत्ती पुढे चालु ठेवावी ही अपेक्षा.
|
Farend
| |
| Saturday, January 19, 2008 - 9:19 am: |
| 
|
माझ्या आठवणीतील म्हणजे साधारण गेल्या १५ ते २० वर्षांतील 'बाहेरचा' हा सर्वात दणदणीत विजय असेल. सिडने ला बेस्ट चान्स आहे असे सगळ्यांना वाटत होते आणि पर्थ ला पहिल्या दिवशी चे भाकीत होते की दिवस अखेर भारत ऑल आउट होणार आणि तीन दिवसात ऑस्ट्रेलिया जिंकणार! आता फक्त कोणी फिक्स बिक्स काढू नका
|
Farend
| |
| Saturday, January 19, 2008 - 9:21 am: |
| 
|
मुकुंद बाकी नंतर बोलू पण ते सामने मी 'ऐकलेले' आता आठवत नाहीत पण नंतर बरेच वाचलेले आहे. आणि तो तू म्हणतोस तो विक्रम मधल्या काळात वेस्ट इंडीज कडे गेला होता, एका ' dead rubber ' मधे त्यांनी ४१८ केले होते ऑस्ट्रेलियाविरुद्धच.
|
Mahaguru
| |
| Saturday, January 19, 2008 - 9:29 am: |
| 
|
झकास झाली मॅच! जितेगा भाई जितेगा, हिंदुस्थान जितेगा!!! (तिकडे फ़ेडरर ची मॅच पण मस्त चालु आहे. थोड्याच वेळात सनिया मिर्झा व्हिनस विल्यम्स शी झुंजेल)
|
Mukund
| |
| Saturday, January 19, 2008 - 10:50 am: |
| 
|
महागुरु... हुश्श!... जिंकला फ़ेडरर..(कसाबसा!) पण मला नेहमी कौतुक वाटत आले आहे की जगातले असे फ़ेडररसारखे अव्वल खेळाडु.. मग ते विव्ह रिचर्ड्स सारखे क्रिकेटीअर असोत का टायगर वुडसारखे गॉल्फ़र्स असोत का बोर्ग,मॅकेन्रो व कॉनर्स सारखे टेनीसपटु असोत.. व्हेन चिप्स आर डाउन.. ते आपला खेळ नेमक्या क्षणी उंचावुन विजयश्री खेचुन आणतात... दॅट सेपरेट्स देम फ़्रॉम मीअर मॉर्टल्स! . असो विषयांतराबद्दल क्षमस्व! अमोल.. चुक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. अमोल अरे ते त्यांचे धावते समालोचन ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असायची. माझ्याकडे कित्येक वर्षे त्यांच्या समालोचनाच्या ऑडिओ कॅसेट्स टेप करुन ठेवलेल्या होत्या... भारतातुन इथे आलो त्यानंतर मुव्हींगमधे त्या माझ्याकडुन हरवल्या गेल्या.. इतके दु:ख झाले मला त्या हरवल्यामुळे.. पण त्या स्मृती अजुनही माझ्या मनात घर करुन आहेत. अजुनही मी बी बी सी वर टेस्ट मॅच स्पेशल ऐकतो.. आता जॉनाथन ऍग्न्यु आहे हेन्री ब्लोफ़ील्ड व ख्रिस्तोफर मार्टिन्-जेनकिन्स बरोबर.. पण ब्रायन जॉन्स्टनची सर कोणालाच नाही लहान असताना ७० च्या दशकात मी बी बी सी, रेडिओ ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीज बरोबरचे कसोटी सामने शॉर्ट वेव्हवर आमच्या फिलिप्स च्या रेडिओवर ऐकायचो. कोणीतरी सांगीतले की होते की त्या वेळच्या रेडिओला जर मागे मोठे मॅग्नेट लावले तर फ़्रीक्वेन्सी क्लीअर लागते म्हणुन माझ्या काकांकडुन एक मोटर सायकलमधले मोठे मॅग्नेटही मी मिळवले होते त्या समालोचनांसाठी. त्या शॉर्ट वेव्हवरच्या समालोचनाचा आवाज असा वरखाली व्हायचा.. कधी कधी नेमक्या क्षणी समालोचकाचा आवाज "ऍन्ड हिअर कम्स बोथम.... राउंड द विकेट..... टु गवास्कर.... ऍन्ड गवास्कर..." असे जोरात म्हणत असताना लोप पावायचा व १-२ सेकंदांनंतर परत यायचा... व तो नेमका का ओरडला ते कळायला.. म्हणजे गावस्कर आउट झाला की त्याने चौकार मारला हे समजायला २ सेकंद वाट बघायला लागायची... पण त्या दोन सेकंदात छातीची धड धड प्रचंड वाढुन उत्सुकता शिगेला पोचायची.. ते २ सेकंद २ युगांसारखे वाटायचे...( बाय द वे.. बहुतेक वेस्टर्न समालोचक गावस्करला गवास्कर असे संबोधायचे....) वेस्ट इंडीजच्या टोनी कोझीअरचा आवाज व समालोचनही मला खुप आवडायचे. सकाळचा इशांत शर्माचा १ तासाचा स्पेल कोणी बघीतला का पॉंटींगला टाकलेला? भारतातल्या पाटा विकेट्सवर इशांतसारख्या जलतगती गोलंदाजांना निराशाच पदरी पडणार याचा विचार करुन खुप वाइट वाटते.. त्याने जर सातत्य टिकवले तर त्याचे भविष्य उज्वल आहे..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|