|
Karadkar
| |
| Thursday, January 10, 2008 - 10:14 pm: |
| 
|
http://driving.timesonline.co.uk/tol/life_and_style/driving/article3164205.ece हे वाचले का कोणी?
|
हा खुप गाजलेला लॉंच होता तसा अजुन लॉंच झालेला नाही फक्त जानेवारीत टाटा ऐम्पायरला १०० वर्ष पुर्ण होतयत म्हणुन त्यांनी गाडी लोकांना दाखविली. तशी १००००० त गाडी देनार ही बातमी गेल्या दिड वर्षापासुन होती. म्हण्जे इन्फ्लेशन ऐडज्स्ट केले तर ती खरी ९०००० लाच मिळतेय. nano च्या लॉंच मुळे दोन गोष्टी घडनार. १. रतन टाटा निवृत होनार ( येत्या ६ महीन्यात). २. टेल्कोचा शेअर वाढनार. ( थोडा वाढला पण म्हणावी तशी वाढ झाली नाही अजुन). ह्या गाडी मुळे भारतात auto क्रांती मात्र घडनार नाही कारण पैसा बराच आल्यामुळे लोक आता तुलनेने लक्झरीयस गाड्या घेत आहेत. २००४ च्या आसपास हे झाले असते तर मात्र खुप फरक पडला असता. मात्र लोअर मिडल क्लास साठी ही गाडी क्रांती करु शकते. मारुती ८०० चे बरेच पब्लीक पैशामुळे ह्या गाडीचा विचार करु शकते. अन सगळ्यात फेवरेबल म्हणजे पेट्रोल ची किंमत. बजाज अजुनही ह्या बाबतीत मागे आहे मात्र १००००० गाडी ही त्यांची घोषना होती.
|
केदार जी,मी auto क्षेत्रातील असल्याने तुमच्या मताशी असहमत आहे. आमच्या survey प्रमाणे भारतात अजून खूप मोठी लोक सन्ख्या scooter वरून वा mobike वरून कार वर जाऊ इच्छिते.त्यान्ची ऐपत अजून maruti 800 आणि बाईक च्या मधल्या पट्ट्याची आहे.विशेषत्: दिल्ली आणि उत्तरे तील अनेक शहरात कार ही गरज बनत आहे-अत्यन्त वाईट सार्वजनीक वाहतूक व्यवस्थे मुळे. अर्थात या सर्वामुळे पर्यावरणावर काय परिणाम होणार हे विदित आहे. पण ही development path breaking आहे कारण अखेर एक भारतीय म्हणून आपण सर्वाना अभिमान वाटवा अशी ही बाब आहे. आणखी एक गोष्ट ही कार बक्कळ पैसे वाल्यान्साठी नाही आणि सगळे बक्कळ पैसे वाले नाहीत.
|
Farend
| |
| Friday, January 11, 2008 - 9:23 am: |
| 
|
रवि उपाध्ये, development path breaking ... अजून जरा माहिती सांगाल का? टाटांनी इंडिका आधीच बनवली आहे आणि त्यामुळे ही कार खूप स्वस्त आहे यापेक्षा वेगळे आणखी काही आहे का यात? नक्कीच असणार. किंमत कमी direct material ची केली की efficient processs मुळे खर्च कमी झाला, वाचायला आवडेल. या कारचा break-even point काय आहे टाटा साठी? कारण खर्च ५०० मिलियन डॉलर्स झालाय असे ऐकले. यावेळी अमेरिकेत सुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली. वॉल स्ट्रीट जर्नल तसेच रेडिओ चॅनेल्स नी सुद्धा. बे एरिया मधल्या रेडिओ वर ही माहिती सांगताना मधल्या मधे Ariba ने आपली जाहिराते करून घेतली, की because of their efficient sourcing.... etc etc
|
Mahaguru
| |
| Friday, January 11, 2008 - 2:32 pm: |
| 
|
ह्या मुळे भारतातल्या पेट्रोलियम कंपन्यांची चंगळ होणार आहे.
|
Maitreyee
| |
| Friday, January 11, 2008 - 3:35 pm: |
| 
|
इथे सिएनबीसी वर मोठे कव्हरेज होते नॅनो ला. आधीपासूनच 'डेट्रॉइटकरांना' औत्सुक्य होतेच, कसे काय इतक्या कमी किमतीत मॅनेज केली म्हणून. सिएनबिसी वर लोकांच्या ईमेल्स वाचून दाखवल्या त्या सही होत्या काही काही " i am paying $500/mtnh for this peace of crap from detroit and there in india they have made a brand new car in $2500! tell me more abt it... " MSN वर articles पन होती, comparison: what u get for that money : @2500 : u get DVD player option in Lexus or u can get a brand new TATA Nano.. मला वाटते आता तसेही मध्यम वर्ग गाड्या घेण्यात मागे राहिला नाहिये. लोक याहून मोठ्या गाड्या ऍफ़ोर्ड करू शकतात. पण यंग क्राऊड किंवा lower middle class मधे ही गाडी लोकप्रिय होइल.
|
रवि कदाचित तुमचे बरोबरही असेल. ( आणी जी लावु नका हो, अरे म्हणा). अमोल ने म्हणल्या प्रमाने अजुन माहीती असेल तर वाचायला आवडेल. ( बाय दी वे इंडीका लाईनचे SAP इम्प्लींमेट करानार्या अनेक लोकांपैकी मी ही होतो. तुम्ही टाटा वालेच का?) क्रांती होनार नाही ह्या साठी लिहीले की टारगेट ऑडीयन्स जो आहे तो फक्त लोअर मिडल क्लास आहे. ( तुम्ही पोस्ट मध्ये लिहील्या प्रमाने स्कुटर ते मारुती ८००) पण आजच्या धुमच्या जमान्यात १००००० रु देउन कोणी ६५ किलोमिटर च्या मक्सीमम स्पिड ने जाईल असे वाटत नाही. ते ६५ पण आयडियल कंडीशन मध्येच. म्हणुन मला लोअर मिडल क्लासच ही गाडी घेईल असे वाटले. मैत्रेयी त्या ई मेल पाठवनार्याला हे नक्कीच माहीती नसेल की ती गाडी जास्त्तीत जास्त ४० मैल ह्या वेगाने जाते. सध्या टोयोटा यारिस, होन्डा फिट अशा गाड्या युऐस मध्ये डिमांड मध्ये आहेत. ( सायऑन चे उदा आपण पाहीलेच आहे). या सर्व गाड्या निदान १०० मैलाची स्पिड ठेवुन आहेत. इंजीन ची पॉवर कमी केल्यामुळे मिळनारे ऐवरेज जास्त आहे. जर टाटांनी ह्या गाडीला थोडे पुढे निदान जास्तीत जास्त १०० किलोमीटर ची स्पिड देउ शकनारी गाडी जर १५०००० लाखात केली तर मात्र बरीच लोक त्या गाडी कडे वळतील. १००००० रु त गाडी देने म्हणजे नक्कीच जोक नाही. भारतीयांनी हे केल्याच्या अभिमान मलाही आहे. ही गाडी निर्यात करायाचा विचार आहे. कदचीत निर्यात करतानाचे मॉडेल वेगळे असेल. ( स्पिड व इंजीन) आता थोडी भविष्याची चाहुल (सगळ्यांची मत ऐकायला आवडतील). टाटांनी जग्वार सारखी लॉस मेकींग कंपनी उगीच घेतली नसावी तर त्या पाठीमागे जग्वारचे प्रस्थापीत असलेले विपणन व असलेल्या वितरकांची संख्या. येत्या ३ ते ५ वर्षात कदाचीत मेड इन इंडीया कार डेट्रॉईट च्या कार शो मध्ये पाहायला मिळेल पण. ( जशी चायनिज कार आली तशी). जर तसे झाले तर इंडीका प्लल्ट्फॉर्म वर जास्त पॉवर देनारी गाडी बनवुन टाटा अमेरिकेत विकतील व ऐवढे करुनही त्या गाडीची किंमत ९ ते ११००० डोलर्स ठेवतील. अण दुसरे व्हर्जन म्हणजे nano powerd to run atleast 100 miles p/h मला स्वताला तो दिवस दुर दिसत नाही. फार तर अजुन ५ ते ७ वर्ष कारन आता सर्वीसेस सोबतच उत्पादन पण भारताक्डे जाउ शकते. ( गेल्या ३ वर्षातील उत्पादन करनार्या भारतीय कंपन्यांचा नफा हेच सांगतो)
|
कदाचीत, higher class लोक पण ही दुसरी गाडी म्हणून घेतील. इथे युएस मधे जस प्रत्येक कुटुंबात २ तरी गाड्या असतात. एक छोटी आणि एक SUV . किंवा, फक्त ऑफिसला जायला एक आणि एरवी एक. भारतात देखील दोघे जण काम करतात अशी कुटुंब, कोणत्या का क्लासची असेना, घेतील कदाचीत.
|
Arch
| |
| Friday, January 11, 2008 - 9:04 pm: |
| 
|
ज्या लोकांना scooters किंवा motorbikes घ्यायची ऐपत आहे पण car घेऊ शकत नव्हते ते नक्कीच ह्या गाड्या घेतील. एकतर पूर्ण family एकत्र जाऊ शकेल आणि scooter, motorbike पेक्षा नक्कीच जास्त comfortable आणि protection. In town ला ही गाडी नक्कीच फ़ायदेशीर आहे. विशेषतः parking साठी वगैरे. air pollution आणि अशीही भीति वाटते की घरांच्या किंमती बघता काही स्तरातील लोक ह्या गाड्या घेऊ शकतील पण घर घेणं जमणार नाही मग ह्यातच तर रहाणार नाहीत न?
|
Prajaktad
| |
| Friday, January 11, 2008 - 9:10 pm: |
| 
|
गाडी परवडेबेल असेलही..पण, आधिच वाहतुकिचा प्रश्न आ वासुन उभा असताना ह्या गाड्या अजुन कोंडि वाढ्वणार नाहि का? (बाकि गाडीचा लुक छान आहे)
|
प्राजक्ता ने सांगितल्या प्रमाणे वाहतुकीची कोंडि तर वाढु शकतेच पण प्रदुषन पण वाढेलच, गाड्यांची संख्या वाढल्यामुळे........ बाकि मागचे वर्ष छानच गेले टाटा साठि. सुपर कंप्युटर, जॅग्वार, रेंज रोवर, आणि आता नॅनो.
|
http://www.loksatta.com/daily/20080112/raj05.htm ही लिन्क जरुर वाचा!
|
nano " चे जनक गिरीश वाघ यांची मुलाखत!
|
मित्रहो,मी ज्या फर्म मध्ये काम करतो ते १ लाख कार साठी पार्ट सप्लाय करत.सुरुवातीपासून ओपननेस डिझाईन स्टेज मध्ये मटेरियल ची बचत,तसेच सप्लायर ला life time association ची guarantee व पुढील सर्व project साठी supplier base चे standardization केले आहे.तसेच supplier च्या internal efficiencies वर खूप काम केले गेले आहे quality and functional requirements मध्ये कुठेही compromise न करता. european व american customers मला फार सन्कुचित वाटले + त्यान्ची design re review mechanisms खूप किचकट वाटली. अर्थात how much is too much or too little हा मुद्दा आहेच.
|
आणखी एक गोष्ट मार्जिन फ़ार thin आहेत.पण ही एक srtrategy असावी. MBAs ना हे शास्त्र सान्ग्ण्याची गरज नाहेई.-
|
आणखी एक लिन्क http://www.rediff.com/money/2008/jan/12tata.htm
|
Dakshina
| |
| Monday, January 14, 2008 - 4:26 am: |
| 
|
टाटांचं, परवाच्या पेपरातील एक वाक्य, त्याचा थोडक्यात आशय असा होता की भारतातल्या ग्रामीण रहिवाश्यांसाठीची कार. ही कार लोँच करण्याआधी टाटांनी शेतकर्यांच्या वाढत्या अत्महत्यांविषयी एकदा तरी विचार केला असेल काय? जिथे दोन वेळचे अन्न मिळत नाही तिथे भारतातला ग्रामिण माणून ही नानो कार खरंच घेऊ शकेल का?
|
Giriraj
| |
| Monday, January 14, 2008 - 7:05 am: |
| 
|
केदार, भारतात १०० मैलाच्या वेगाने धावणे जरा अतर्क्य आहे. काही मुख्य राजमार्ग सोडले तर या वेगाने रेंज रोव्हरही नाही धवू शकणार इतर रस्त्यांवरून. शहरांमध्ये ही गाडी घेणारा मुख्यत मध्यमवर्गच असणार आहे. माझ्या वडीलांनी कधी दुचाकी घेण्याचाही विचार केला नाही पण या कारने त्यांन्चिही उत्सुकता वाढली. सध्या तरि त्यंना तीच कार घ्यविशी वाटतेत्य. पुण्यासारख्या शहरात असेही ट्राफ़िकचा सरासरी वेग १० ते २० kmphr असतो. त्यामुळे उच्चवेगाचा थरार हवासा असणारे असेही अश्या मोटारीच्या फ़ंदात पडणार नाहीतच. छोट्या शहरांत राहणारा मध्यवर्ग ऐपतिच्या ३० ते ४० टक्के कमीच किमतिच्या गोष्टी करतो. अश्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुक व्यवस्था खूपच शोचनिय असते. रिक्शावाले खुपच उध्धट असतात आणि सुरक्षितही नसतात. अश्या वेळि ५० हजरांची बाईक घेण्याची ऐपत असणारा कुणीही थॉदे अजून पैसे टाकून कार गेह्णे पसंद करेल. अनेक वित्तिय संस्थाही कर्ज देण्यास उत्सुक असतातच. त्याचबरोबर स्थानिक पतसंस्था आणि बॅंकाही सुलभ कर्ज देतात. त्याचा फ़ार मोठा फ़रक पडणारच. राहता राहिला शेतकर्यांचा प्रश्न. आत्महत्या करणारे शेतकरी अल्पभूधारक आणि निसर्गावर अवलंबून शेती करतात. ते काही टारगेट अस्टमर नसतिल. सधन शेतकरीच मोटारीच विचार करतिल. अश्यांची संख्या काही कमी नाही. ऑटोरिक्शाला पर्याय म्हणूनही या वाहनाचा उपयोग होऊ शकतो. मागे GS शि बोलतांना त्याने उपस्थित केलेला मुद्दा खूपच महत्वाचा वाटला. पुण्यात दुचाकीच्या अपघातात म्रुत्यूमुखी पडणार्यांची संख्या लक्षणीय आहे. अश्या पर्शवभूमीवर कारने जाताना अपघात झाला तरी इजा होण्याची आणि त्यातही मरण्याची शक्यता खूपच कमी उअरते. काही अधिक हजारांच्या मोबदल्यात कुणीही आपला किंवा कुटुंबियांच प्राण अधिक महत्वाचा मानतिल. एक गम्मत म्हणजे हि मोटार rear engine आहे. या क्षेत्रात टाटांचा अनुभव Ace या छोट्या मालवाहू गाडीमुळे आहेच. मला तर असे वाटते की त्यातच फ़ेरफ़ार करून त्या मोटारीची Transmission system तयार केली असेल. या आधिही टाटांनी indica मध्ये बदल करून indigo आणलीच आहे.
|
माझी या बाबतीत समजूत अशी आहे कि ग्रामीण म्हणजे फक्त खेडीच नाहीत.यात नान्देड,सन्गमनेर सारखी गावे ही जमा आहेत.तसेच औद्योगिक रित्या उत्पन्न असलेली गावे,कोल्हापूर,सिन्नर,अशी जेथे सध्या दुचाकी वाहनान्ची विक्री बरीच आहे व एक लाखाच्या आस पास खर्च करणे शक्य आहे अशा वर्गासाठी ही गाडी आहे.ब्यान्केत कारखान्यात,काम करणारे,उत्तरेतील पन्जाबातील साधारण disposable income वाले याना ही गाडी एक कौटुम्बिक वाहतुकीचे साधन होवू शकेल. ही उत्क्रान्ती त्या वर्गाने नान्गर ते ट्राक्टर अथवा मोटार सायकल या प्रवासात अनुभवलेली आहे यामुळे आत्महत्येची समस्या एक ज्वलन्त आणि विदारक सामाजिक कलन्क असून ही या दोन बाबीन्ची गफल्लत करणे योग्य नव्हे असे मला तरी वाटते.
|
Zakki
| |
| Monday, January 14, 2008 - 3:12 pm: |
| 
|
ऑटो रिक्षावाले या बाबत काय म्हणतात? कारण या गाड्या घेऊन, टॅक्सीचा धंदा करणारे लोक असतीलच. जरा स्वस्तात टॅक्सी मिळाली तर ऑटो वाल्यांना धंदा सोडावा लागेल. जसे, आमच्या काळी, (म्हणजे तुम्ही सर्व जन्मण्यापूर्वी) नागपुरात सायकल रिक्षा असत. पण ऑटो आल्यावर त्यांचा धंदा बसला!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|