Kshitij_s
| |
| Monday, January 07, 2008 - 8:16 am: |
| 
|
मुकुन्द, प्रत्येक वेळी स्वतहाच्या चुका दाखवयच्या आनी दुसर्यान्च कौतूक करायच ही भारतीय मानसिकता तुही दाखवलीस हे बघून वाइट वाटले. आपण कसे खेळलो यापेक्शा त्यानि खेळ भावनेचा केलेला खून तुला दिसयला हवा होता.
|
भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा तात्पुरता स्थगित केला. http://www.expressindia.com/latest-news/India-suspends-tour-as-Aus-suggest-peace-talks/258644/ अनेक एकतर्फी चुकीचे निर्णय दिले गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने हा सामना void जाहीर करावा आणि बकनर व बेन्सन या दुकलीला खराब कामगिरीबद्दल दंड ठोठावून कायमचे घरी बसवावे.
|
Mrdmahesh
| |
| Monday, January 07, 2008 - 9:40 am: |
| 
|
पहिल्या डावात जेव्हा कोणताच मानसीक दबाव नव्हता तेव्हा सगळे वाघासारखे खेळले पण दुसर्या डावात जरा मानसीक दबाव आल्यावर पटापट सगळ्यांनी तंबुत जाण्याचा सोप्पा मार्ग पत्करला. मिनींगलेस शतके मारण्यात आपले खेळाडु एकदम पटाइत आहेत.>> पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने रडीचा डाव खेळत ४६३ धावांचा डोंगर उभारला.. तरीही खचून न जाता ५०० धावांनी चोख प्रत्युत्तर दिलं.. असं असताना मानसिक दबाव नव्हता असं कसं म्हणू शकता? आणि म्हणूनच यात केलेली शतकं मीनिंगलेस म्हणता येणार नाहीत.. ते कितीही रडीचा डाव खेळो.. आपण मात्र चांगलं खेळूनच जिंकलं पाहिजे.. हे म्हणायला सोपं आहे.. खुद्द सुनील गावसकरांनी म्हटलंय की आपण सर्वस्व ओतून खेळतो अन् तरीही निकाल आपल्या बाजूने लागत नाही तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं.. त्याचा खेळावर परिणाम होतोच.. त्यांनी याचे त्यांच्या कारकीर्दीतले दाखलेही दिले.. या कसोटीत पॉंटिंग आणि कं. चा उद्दामपणा दिसून आला.. जाफर, धोनी आणि युवराज यांनी खरी भारताची गोची केलीये दोन्ही कसोटीत.. यांच्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झालाय.. युवराज ० वर बाद होतो.. गरज असताना.. बाकी भारतीया खेळाडूंची बेभरवशाची कामगिरी आणि त्यांचा कचखाऊपणा क्रिकेटच काय सगळ्याच खेळांतून बघायला मिळतो..
|
अजुन आपण "गोर्या कातडीची गुलामगिरी" या मानसिकतेतुन बाहेर पडलेलो नाहि हे येथिल काहि पोस्ट वरुन दिसुन येते. ऑस्ट्रेलिया केवळ १६ सलग कसोटी सामने जिंकण्याच्या उद्देशाने खेळत होती.पण ते कश्या प्रकारे खेळुन जिंकायचे हे त्यांनी आधिच ठरवले असावे. स्वतला विश्वविजेते म्हणवणारा संघ अश्या हलक्या मनोवृत्तीचे प्रदर्शन सर्व जगाला घडवतो याला काय म्हणावे? अश्या प्रकारे जिंकुन काय साध्य करत आहेत हे तथाकथित जगतजेत्ते कुणास ठावुक? भारतीय संघ हरला याचे दुख नाही पण तो कश्या प्रकारे हरवला गेला याचे शल्य जरुर आहे.भारतीय संघातिल खेळाडुंना कागदी घोडे म्हणणार्यांना, ऑस्ट्रेलियन खेळाडुंचा अनैतिक मार्गाने मिळवलेला विजय जर खरा आणि मोठा वाटत असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली नाही तर नवलच? अख्ख जग ऑस्ट्रेलियाच्या अनैतिकतेच्या विरोधात बोलत असताना ऑस्ट्रेलियाची निर्भत्सना करायचि सोडुन त्यांच्या (अ)खिलाडु प्रव्रुत्तीचे गोडवे गाणार्यांना आणि आपल्याच भारतिय संघावर तोंडसुख घेणार्यांची निंदा करावी तितकी कमीच आहे. भारतीय संघ अश्या खोट्या वृत्तीने जिंकण्यापेक्षा हरतोय हे आम्हा स्वतला भारतीय म्हणवुन घेण्यात गौरव वाटणार्यांसाठी मुळीच कमीपणाचे नाही.कारण शेवटी क्रिकेट हा चारित्र्यवान लोकांचा खेळ आहे हे आमच्या तथाकथित कागदि घोडे असणार्या सुसंस्कारित खेळाडुनी मैदानवर सिद्ध केलय. सचिन द्रविड,कुंबळे,लक्ष्मण यासारख्या चारित्र्यवान खेळाडुंनी जो असामान्य संयम मैदानात आणि मैदानाबाहेर दाखवला तो वाखाणण्याजोगाच आहे. हरभजनची फ़िरकी खेळु न शकणार्यांनी ज्या प्रकारे त्याला मैदानाबहेर ठेवण्याचा घाट घातलाय त्यावरुन आमच्या यकीश्चित कागदी घोड्यांची देखिल किति दहशत या विश्वविजेत्यांना आहे हे दिसुन आलेच. भारतीय संघ शेपुट न घालता या कुपमंडुक व्रुत्ती विरोधात लढा द्यायला सज्ज झालाय आणि त्याला साथ द्यायला प्रत्येक प्रखर राष्ट्रवादी भारतीय शेवटपर्यंत तयार आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Hats off to Sachin for standing with Bhajji. फ़क्त मज्जा अशी वाटली की ' भज्जीला क्लिन चिट द्या नाही तर टिम इंडिया खेळणार नाही ', हे कॅप्टन नसतानाही जाहिर करण्याचे rights सचिन ला आहेत का ? But whatever, right attitude दाखवल्या बद्दल सचिन ला भज्जी बरोबरच भारतीय क्रिकेट प्रेमीही thanks म्हणतील नक्कीच .
|
दीपांजली! icc मधे जरि सचिनच्या शब्दाचे वजन नसले तरी bcci मधे नक्किच आहे. शेवटी एका मराठी माणसाला आपला मराठी बाणा दाखवावा लागला आणि त्याने तो दाखवण्यात जरा देखिल कसुर केली नाही याचे कौतुक जास्त आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
क्रीकेट चा तुम्हा लोकाना कंटाळा कसा नाही येत?
|
अरे एक गंमतच आहे. रिकी पॉंटिंगला आतापर्यंत सर्वात जास्त वेळा भज्जीने आऊट केलय म्हणे. आणि सायमंड्स जो विकेटच्या पाठी स्लेजिंगमधे मास्टर आहे तो शिवीगाळ झाली म्हणून रडतोय. त्या बकनरच्या सर्व बॅंक अकाऊंट्सची चौकशी झाली तर....... च्यायला ग्रेटच आहे. भज्जीच्या चेहर्यावरून वाटत नाही तो शिव्या देत असेल म्हणून. आणि जर दिल्या नसतील तर आता देऊन मोकळा हो.. नाचता येईना अंगण वाकडे खेळता येईना भज्जी शिव्या घाले.
|
जय महाराष्ट्र... प्लीज यामधे मराठी बाणा वगैरे घुसडू नका. जो निर्णय झालाय त्यामधे अख्ख्या टीमचा सहभाग आहे. भज्जी सरदार आहे तो उलट सुलट बोललेलं खपवून घेणार नाही. आणि सर्व टीम त्याच्यासोबत आहे. डीजे, मला वाटतं as a captain कु.बळे बोलु शकत नसेल म्हणून सचिन बोलला असेल... कालच्या प्रेस कॉन्फ़्रन्समधे कुंबळेचा चेहरा बरंच काही बोलत होता... पण तो बोलु शकत नव्हता.. आज त्याची कसर सचिनने काढली आहे.
|
Mukund
| |
| Monday, January 07, 2008 - 10:30 am: |
| 
|
क्षितीज तुला माझ्या पोस्ट मधुन तेवढेच दिसले याचा मलाही खेद वाटला. असो. तुला जो काही निष्कर्ष काढायचा आहे त्याची तुल पुर्ण मुभा आहे.आणी कोणत्याही बाबतीत स्वत:च्या चुकांचे अवलोकन करण्यानेच सुधारणा घडण्याची शक्यता असते. पंचांचे निर्णय आपल्या खेळाडुंच्या हातात नव्हते. पण हे तरी मान्य करशील की नाही की शेवटच्या दिवशी द्रविड व गांगुली हे दोघे सोडुन बाकीचे खंबीर खेळुन सामना वाचवु शकत होते की नाही?का सगळ्या टिमलाच पंचांनी खोटे बाद दिले?माझे म्हणणे अजुनही हेच आहे की बाह्य गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमधे नाही त्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या खेळाडुंच्या हातात होत्या त्यातरी त्यांनी जबाबदारीने व दबावाला बळी न पडता पार पाडायच्या होत्या की नाही? ७० षटके (२ वादग्रस्त निर्णय आपल्याविरुद्ध जाउनसुद्धा!) खेळुन काढणे आपण दबावाला बळी पडलो नसतो तर सहज खेळुन काढण्यासारखी होती. कुंबळे १०० पेक्षा जास्त चेंडु टिकु शकतो हेच सगळे काही सांगुन जाते. त्याच्या मनातला कणखरपणा बाकीच्यांनी सुद्धा दाखवला असता तर आज आपण हा वाद घालत बसलो नसतो. असो. महेश.....आपण ऐकले असेलच की व्हेन गोइंग गेट्स टफ़... टफ़ गेट्स गोइंग... आपली परिस्थीती दुसर्या डावात दबावाखाली होती. चांगल्या खेळाडुंची परिक्षा अशा क्षणीच लागते व जे अशा परिक्षेत उत्तिर्ण होतात तेच संघाला ग्लोरी व विजयश्री प्राप्त करुन देतात. म्हणुन पहिल्या डावातली शतके मिनींगलेस... आणी परत एकदा मला कोणी तरी सांगा की मुर्ख पंचांच्या चुकीमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी क्रिकेटच्या स्पिरीटचा खुन कसा काय केला बुवा?एक तर पॉंटींगला बेन्सनने विचारायला नको होते व विचारल्यावर त्याने क्लार्कला विचारले व क्लार्क म्हणाला की त्याने झेल पकडला. त्याने ते पंचांना सांगीतले. पहिल्या डावात पॉंटींगनेच स्वत: झेल पकडला नसल्याचे अपील झाल्यावर पंचांना सांगीतले होते ना? पंचांच्या चुकांचे खापर ऑस्ट्रेलियन खेळाडुंवर रडीचा डाव खेळले असे म्हणुन फोडणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे असे मला तरी वाटते. आणी झकासराव... अशी स्वप्ने बघत बसण्यापेक्षा वर्ल्ड कपमधे हरल्यावर जसे मजेशीर फोटोग्राफ इथे टाकले होतेस तसे काहीतरी टाक बघु.. व आपल्या सगळ्यांना हा वादग्रस्त पराभव विसरण्यास मदत कर बघु... सतिश हा सामना वादग्रस्त म्हणुन बाद करतील असे मला तरी वाटत नाही. (आपल्याला ते कितीही योग्य वाटले तरी! ) आणी जोपर्यंत शरद पवार,रत्नाकर शेट्टी अशी पैशाला हपापलेली माणसे आपल्या बोर्डाचे पदाधिकारी आहेत तोपर्यंत तरी ही मालीका रद्द होणार नाही हे ध्यानात घे. कारण तसे झाले तर आपल्या बोर्डाला करोडो रुपयांचे नुकसान होइल.
|
Yes, कुंबळेच्या चेहर्यावर नापसंती , राग स्पष्ट दिसत होता . आणि त्या पॉंटिंग च्या चेहर्यावर मात्र अगदी लगान मधल्या कॅप्टन रसेल सारखा ' तुम साला गुलाम लोग हमेशा हमारी पैरोंके नीच रहेगा ' सारखा धमकी वजा माज finger दाखवताना दिसत होता . हाणायला हवे होते देशी पत्रकारांनी त्याला मुकुन्द , सचिन ची breaking news पहाय्ला भल्या पहाटेच उठलात का आज
|
नंदिनी मी प्रतिकात्मक रित्या मराठी बाण्याचा उल्लेख केला. सचिनने पुढाकार घेणे अथवा खेळाडुंनी त्यास पुढाकार घेण्यास सांगणे हे बरेच काहि सुचित करते. "वंशभेदाचा" आरोप करुन भज्जीला बाजुला करु पाहणार्यांच्या हे लक्षात आलेले दिसत नाही कि भारतीय संघ अश्या प्रकारची टिका अथवा टिप्पणी कधिहि करणार नाही कारण भारत हाच एक असा देश आहे जिथे अठरापगड जाती आणि कैक बोलीभाषा आहेत. आणि त्याचेच प्रतिनिधित्व भारतीय संघ करतो. पण म्हणतात ना झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही. शरद पवार काहि करणार नाहित हे सांगायला नकोच म्हणूनच तर आज संघाला पुढाकार घ्यावा लागला.कारण हे अधिकारि फ़क्त खुर्च्या उबवतात पण मैदानावर प्रत्यक्ष खेळाडुंना खेळावे आणि सगळ्या परिस्थितिला तोंड द्यावे लागते. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
ऑस्ट्रेलियन मीडीयाच्या कॉमेंट्स http://www.outlookindia.com/pti_news.asp?id=533182 http://www.outlookindia.com/pti_news.asp?id=533170 >>> ७० षटके (२ वादग्रस्त निर्णय आपल्याविरुद्ध जाउनसुद्धा!) खेळुन काढणे आपण दबावाला बळी पडलो नसतो तर सहज खेळुन काढण्यासारखी होती. तसा विचार केला तर पहिल्या जोडीला सुद्धा सर्व ७२ षटके खेळता आली असती. बाकीच्या ९ खेळाडूंची आवश्यकताच नव्हती. किंवा पहिले ९ खेळाडू पहिल्या ९ चेंडूत बाद झाले असते तरी सुद्धा शेवटच्या जोडीला उरलेली साडेसत्तर षटके खेळून काढता आली असती. क्रिकेटमध्ये काहिही होऊ शकते! तुमच्या तर्काप्रमाणे पहिल्या ९ खेळाडूंना खोटे बाद दिले तरी शेवटच्या जोडीने जर धावा केल्या नाहीत तर तो आपला कमकुवतपणा मानला पाहिजे. दोन महत्वाच्या फलंदाजांना खोटे बाद दिले तरी उरलेल्यांनी खेळायला पाहिजे होते असे म्हणणे म्हणजे, बुद्धिबळ खेळताना वजीर बाजूला काढून ठेवला तरी उरलेल्या १५ सोंगट्या वापरून जिंकायला काय हरकत आहे असे म्हणण्यासारखे आहे! ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पॉंटिंग व सायमंड्सला योग्य वेळी बाद न दिल्यामुळे त्यांनी ४६३ पर्यंत मजल मारली व भारताच्या दुसर्या डावात संघातल्या दोन स्थिरावलेल्या महत्वाच्या खेळाडूंना खोटे बाद दिल्यामुळे आपण हरलो हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. त्यांना बाद दिले नसते तर कदाचित भारत ३३३ धावा करून सामना जिंकला सुद्धा असता. गांगुली ज्या वेगाने खेळत होता ते पाहता हे काही अगदीच अशक्य मानता येणार नाही. अर्थात जाफर, धोनी व युवराज अत्यंत वाईट खेळले याविषयी अजिबात दुमत नाही. विशेषतः युवराजला कसोटी सामना म्हणजे, सगळे क्षेत्ररक्षक जवळ उभे असताना वेडेवाकडे कसेही फटके मारून धावा करता येतील असा ८० मिनिटात संपणारा २०-२० सामना नव्हे, हे आता नक्कीच लक्षात आले असेल. ऑस्ट्रेलियाला जशास तसे उत्तर देण्यासाठी श्रीशांतसारखे खेळाडू संघात असणे आवश्यक आहे.
|
मुकुंद, तुम्ही म्हणताय की दोन चुकीचे आऊट दिले तरी बाकी संघाने "कणखरपणा" दाखवायला हवा होता. ते खेलाडू असले तरी माणूसच आहेत ना... एक तर ते स्वत्:च्या देशात नव्हते. वर असा अपमान... पंचाच्या चुकीच्या निर्णयापेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडूची गुर्मी आणि अति शहाणपणा आपल्या खेळाडुना मानसिकरीत्या हरवत गेला. अर्थात यासाठी कांगारूनी बराच अभ्यास केलेला होता. सायमंड्सला इंडियामधे चिडवण्यात आलं होतं. त्या घटनेचा इथे पूरेपूर वापर केला गेलाय. भज्जी अत्यंत साधा माणूस आहे. कुंबळे किंवा सचिन गांगुलीसारखे शांत राहणे त्याला जमणार नाही हे देखील लक्षात घेण्यात आलय. दोन महत्वाच्या खेळाडूना बाद दिलं गेल्यामुळे बाकीच्या खेळाडूवर याचा परिणाम होणारच ना.. पण मुकुंद म्हणतात की अपमान वगैरे काही नाही.. त्यनी खेळायलाच हवं होतं. माझे मत आए की सरळ खेळाडूनी फ़ील्ड सोडायला हवे होते. धोनीचा कॅच जमिनीला लागला होता हे फोटोमधून साफ़ दिसतय आणि तरीही पॉंटिंग integrity बद्दल बोलतोय. खेळाच्या पलीकडे पण एक भावना असते. जिंकण्यापेक्षाही कसे जिंकलात ते महत्वाचं आहे. ऑस्ट्रेलियाची ही कीड लवकरच ठेcअली पाहिजे. नाहीतर क्रिकेटमधे मान्सिक दबाव कसा करायचा आणि जिंकायचे हेच समीकरण रूढ होत जाईल.
|
Mukund
| |
| Monday, January 07, 2008 - 11:30 am: |
| 
|
सतिश.. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. चुकीचे निर्णय दिले गेले नसते तर या सामन्याचा निकाल आपल्या बाजुनेही लागु शकला असता... पण मी कालच सांगीतले तसे जर तर बोलण्यात आता काहीच फायदा नाही. नंदिनी तु अतिशय बरोबर बोललीस. तुझ्या पोस्टींग्सना मी नेहमीच किंमत देत आलो आहे.तुझे निरीक्षण अचुक आहे. आपल्या खेळाडुंचे मानसीक खच्चीकरण कसे करायचे याचा ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी सखोल अभ्यास केला आहे. ते तसे करणार हे आपल्या संघालाही माहीत आहे. तरीसुद्धा आपण प्रत्येक वेळी तशा दडपणाला बळी पडतो हेच तर शल्य आहे. का नाही आपण अभेद्य होउ शकत अशा टॅक्टीसना? का कचखाउपणा दाखवायचा प्रत्येक वेळी? कुठल्याही खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा मानसीक दडपणाला सामोरे जायलाच लागते हे जगजाहीर आहे. या सामन्यात पंचांनी बोनहेड डिसीजन्स देउन आपले काम जास्तच कठीण केले. पण तरीही दबावाला बळी पडण्याची ही एकमेव व पहिली वेळ नव्हती हेच मला म्हणायचे आहे. तुला मी काय म्हणत आहे हे समजु शकेल एवढी तुझ्या बुद्धीची पातळी जरुर आहे याची मला खात्री आहे म्हणुन तुझ्या पोस्टींगला उत्तर दिले. आणी भज्जूच्या गोष्टीतही तु अचुक निरिक्षण केले आहेस. पॉंटींगला त्याने बकरा बनवला आहे व त्याचा काटा त्यांनी त्याच्यावर आरोप करुन असा काढला आहे. दिपांजली? कुठे आहे ती न्युज?
|
नंदिनि अनुमोदन! या स्वतःला सर्वश्रेष्ठ ठरवण्यासाठी सगळ्या गैर व अनैतिक मार्गांचा वापर करुन विजय मिळवु पाहणार्या संघाची ही मस्ती वेळीच जिरवली पाहिजे. आंतरराष्ट्रिय क्रिकेट मधे नसते पायंडे पाडु पाहणारी ही विषवल्ली वेळीच ठेचली पाहिजे असे न केल्यास क्रिकेटसारख्या एका चांगल्या खेळाचे अधपतन होइल. दक्षिण अशियायी खेळाडुंनाच नेहमी टार्गेट केले गेले आहे हा क्रिकेटचा इतिहास आहे. आणि आता गप्प बसलो तर नेहमीच तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करत रहावा लागेल. या पराजयाच्या निमित्ताने या लढाईला तोंड फुटलेच आहे. आता भारतीय संघाने देखिल आपला हिसका दाखवुन आणि ही लढाई जिंकुनच आपल्या म्यान केलेल्या "तलवारी "म्हणजेच bat बाहेर काढाव्यात. BCCI काही करेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. खेळाडुंच्या हित या गोष्टिचे यांना सोयरसुतक नाही.फ़क्त पैसा आणि पैसा इतकच यांना दिसत. खेळाडुंना देखिल आत्मसन्मान असतो हे त्यांना माहित नसावे कदाचित! आणि खेळाडु जरी एक खेळ खेळत असले तरी ते आंतरराष्ट्रिय क्रिकेट मधे भारताचे प्रतिनिधित्व करतात त्या मुळे त्यांचा अपमान हा पर्यायाने राष्ट्राचा अपमान आहे. तेंव्हा आता खेळाडुंनाच लढावे लागेल. आणि यासाठी प्रत्येक भारतीयाने एकजुटीने आणि एकदिलाने संघाबरोबर उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
मुकुंद, मला राग जास्त तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या केलेल्या कौतुकाचा आलाय. (तुमची पहिलीच पोस्टमधे. ) नरो वा कुंजरो वा वृत्ती धारण केलेले हे लोक आहेत. भारतीय लोक कधीही भावनिक आवाहनाला बळी पडतात हे सर्वानाच ठाऊक आहे. तुम्ही म्हणता तसा मानसिक खच्चीकरणाला आपण हल्ली प्रत्युत्तर द्यायला लागलो आहे आणी म्हणूनच मारा जहाल होत चाललाय... गांगुलीने स्टेडियममधे भिरकावलेला शर्ट असो. २०-२० मधी ऑस्ट्रेलियाची लावलेली वाट असो किंवा श्रीसंतची तिखट नजर असो. हा बदल त्याच्या पचनी पडणं कठीण जाणारच ना? पण BCCI ने या संधीचा फ़ायदा उठवत आपला कणखरपणा आजच सिद्ध करायला हवा. "लोहा गरम है. हथोडा मार लो" एक हॉलीवूड मूव्ही आठवली त्यामधे बास्केट बॉल या खेळाचं थोडंफ़ार रुपांतर केलं जातं आणि समोरच्याला मानसिकरीत्या हरवून गेम जिंकला जातो. अर्थात ती कॉमेडी होती. बेस कॅट बॉल असं काहीसं नाव होतं.. हा सर्व प्रकार त्याच्याशी फ़ारच समांतर वाटतोय मला.
|
Satishbv
| |
| Monday, January 07, 2008 - 12:03 pm: |
| 
|
वाचा आता काय बोलणार http://www.rediff.com/cricket/2008/jan/07bcci1.htm
|
Giriraj
| |
| Monday, January 07, 2008 - 12:03 pm: |
| 
|
परवा हर्षा भोगले की कुणीतरी पॉन्टिन्ग आणि बुशच्या चेहेर्यात साम्य आहे असे नमूद केले होते! चेहेर्याचे नीट पहावे लागेल पण वृत्तिमध्ये नक्कीच आहे!
|
>>> म्हणुन पहिल्या डावातली शतके मिनींगलेस... पहिल्या डावात शतके केली म्हणून तर आपल्याला ६९ धावांचे आधिक्य मिळवता आले. नाही तर फॉलोऑन नशिबी आला असता. केवळ अधिकृतरीत्या जिंकलो नाही (ते सुद्धा पंचांच्या खराब आणि पक्षपाती कामगिरीमुळे) म्हणून केलेली कामगिरी कशी मीनींगलेस ठरू शकते? मुख्य म्हणजे ती शतके मीनींगलेस (तुमचं खरं मानलं तर) ठरतील ती भारतीयांच्या खेळामुळे नाहीत तर ती पंचांमुळे ठरतील! तुमच्या लॉजिकप्रमाणे, कितीही शतके केली आणि पंचांचे निर्णय कितीही विरूद्ध गेले तरीसुद्धा आपण जिंकलो तरच त्यांना किंमत. नाहीतर ती मीनींगलेस! म्हणजे हसी आणि सायमंड्सची लांड्यालबाड्या करून केलेली शतके तेवढी मीनींगफुल कारण पंचांनी त्यांना खोटारडेपणा करून जिंकून दिले व सचिन आणि लक्ष्मणची शतके मीनींगलेस कारण पंचांनी आपल्याला हरायला लावले. आवडलं मला हे लॉजिक! पुढच्या सामन्यापासून पंचांनाच खिशात घालूया. म्हणजे जिंकण्याची खात्री आणि शून्य धावा केल्या तरी त्या मीनींगफुल!
|