|
Mukund
| |
| Sunday, January 06, 2008 - 8:23 am: |
| 
|
ऑस्ट्रेलियाचे हार्दिक अभिनंदन! सलग १६ कसोटी सामने जिंकण्याच्या विश्वविक्रमाकरता ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केलेच पाहिजे. ते गेली १५-२० वर्षे जगातल्या कोणत्याही टीमपेक्षा श्रेष्ठ आहेत हे आपण सगळ्यांना ठाउक आहे पण ज्या पद्धतीने पॉंटींग आणी त्याच्या सवंगड्यांनी आज विजय मिळवला ते खरच कौतुकास्पद आहे. त्यांचे खेळाडु जेव्हा पाहीजे तेव्हा नेटाने व जिद्दीने खेळतात. पहिल्या डावात मागे पडुनही ज्या पद्धतीने दुसर्या डावात हेडन,हुसे व सिमंड्स खेळले ते खरच कौतुकास्पद होते. पॉंटींगच्या नेतृत्वाची वाहवा करावी तेवढी थोडीच आहे. ज्या पद्धतीने त्याने भारतिय(कागदी वाघांवर!) दबाव आणुन विजय मिळवला ते कोणत्याही कर्णधाराने अभ्यास करावा असेच आहे. हेडन व सिमंड्स (ज्याची भारतामधल्या प्रेक्षकांनी माकड म्हणुन चेष्टा केली गेली) यांना आउट घेणे हे आपल्या संघाच्या हाताबाहेरची गोष्ट वाटते. या कसोटीत हरभजनने पॉंटींगला आउट केल्यानंतर केलेल्या जल्लोशानंतर हरभजनच माकडासारखे वागत होता असे वाटले. पॉंटींग आज खरच हरभजनकडे बघुन हसत असेल. असो. आता त्याउलट आपला भारतिय संघ! जेव्हा पाहीजे तेव्हा आपल्यातल्या एकाही खेळाडू धमकीने जबाबदारी उचलली नाही. सगळे नेभळटासारखे नांग्या टाकुन तंबुत परतले. पहिल्या डावात जेव्हा कोणताच मानसीक दबाव नव्हता तेव्हा सगळे वाघासारखे खेळले पण दुसर्या डावात जरा मानसीक दबाव आल्यावर पटापट सगळ्यांनी तंबुत जाण्याचा सोप्पा मार्ग पत्करला. मिनींगलेस शतके मारण्यात आपले खेळाडु एकदम पटाइत आहेत. असो. या सामन्यात पंचगीरी अगदीच सुमार दर्जाची झाली पण त्यावर या पराजयाचे खापर फोडणे म्हणजे आपल्या खेळाडुंच्या मानसीक दुर्बळपणावर पांघरुण घालण्यासारखे आहे. आज आपंण हरलो त्याचे कारण एकच होते... मानसीक दबावाखाली आपले खेळाडु टिकाव धरु शकले नाहीत. हे एक आणी एकच कारण आजच्या पराभवामागे होते. काही कारणास्तव ऑस्ट्रेलियन संघाचे भारतिय संघावर प्रचंड मानसीक वर्चस्व आहे.मॅग्राथ निव्रुत्त झाल्यावर थोडा फरक पडेल अस वाटत होत पण पॉंटींग,हेडन,हुसे,ली व सिमंड्स या सध्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडुंच्या हयातीत ते बदलेल असे चिन्ह अजुनतरी नाही. असो. आता तिसर्या कसोटीत परत एकदा आपल्या संघाकडे आशेने पाहु...
|
पण ज्या पद्धतीने पॉंटींग आणी त्याच्या सवगंड्यांनी आज विजय मिळवला ते खरच कौतुकास्पद आहे. <<<< हो , आपण 4 th umpire असल्या सारखा arrogant look देत finger दाखवून मूर्ख umpire कडून विकेट मिळवु शकतो हे नक्कीच शिकलेच पाहिजे इतर players नी . World champion पद फ़क्त टॅलेंट वर जमत नाही !
|
Mukund
| |
| Sunday, January 06, 2008 - 9:15 am: |
| 
|
दिपांजली.. गांगुली व द्रविडबद्दल सहानुभुती वाटते पण आपल्या संघात अजुन ९ जण होते सामना अनिर्णीत ठेवायला. त्यामुळे नुसत्या भिकार पंचगीरीवर खापर फोडणे फारच सोयीस्कर होइल. असे म्हटल्यावर हेही नमुद केले पाहीजे की या बकनरला कोणीतरी रिटायर करा रे... या पंचांबद्दल रिपोर्ट दिले जातात त्यात आपला संघ फारच मिळमिळीत भाषा वापरत असला पाहीजे त्याच्याबद्दल. त्याने आतापर्यंत अगणीत चुकीचे निर्णय आपल्याविरुद्ध दिले आहेत किंवा आपल्याबाजुने दिले नाहीत... अगदी धडधडीत अयोग्य(किंवा योग्य!) असुनसुद्धा.
|
ऑस्ट्रेलियासारख्या जगज्जेत्यांना विजयासाठी पंचांची मदत घ्यावी लागते यापेक्षा दुर्दैव ते काय! पहिल्या डावात सायमंड्सला तीन वेळा व पॉंटिंगला एकदा स्पष्ट बाद असताना नाबाद देण्यात आले. सायमंड्स ३० वर यष्टीमागे झेलबाद होता. त्याच्या बॅटला लागलेला कटचा आवाज सर्व प्रेक्षकांना सुद्धा ऐकू आला, पण २२ यार्डावर उभ्या असलेल्या पंचाला तो ऐकू येऊ नये हे अनाकलनीय आहे. भारताच्या दुसर्या डावात द्रविडची बॅट तर पॅडच्या मागे होती तरीही त्याला झेलबाद देताना पंचाला अजिबात खंत वाटली नाही. गांगुलीच्या बाबतीत तर पंचांनी कहरच केला. संशयास्पद झेलची खात्री करण्यासाठी लेग अंपायर किंवा तृतीय पंचाची मदत घेण्याऐवजी मार्क बेन्सनने पॉंटिंगची साक्ष काढली. जणु काही पॉंटिंग अधिकृत पाचवा अंपायर होता! सर्व तर्हेच्या नैतिक-अनैतिक मार्गाने विजय ढापणार्या ऑस्ट्रेलिया संघाची चीड आली आणि कीव सुद्धा वाटली!
|
मुकुंद , देशी players चे समर्थन - कौतुक अज्जिबात नाही , पण so called World champs नी ज्या प्रकारे game जिंकला , attitude दाखवला तो कुठल्याही प्रकारे कौतुकास्पद तर नाहीच पण shameful होता . श्रीलंके सारख्या लोकांनी walk out केले असते अशा situation मधे . पण कहर्च , अशा प्रकारे सलग सोळाच काय हवे तितके सामने जिंकणे किती सोपे असते हे खरच शिकून घ्यावे इतर देशांनी शेवटी काय जो जीता वोही सिकंदर
|
Farend
| |
| Sunday, January 06, 2008 - 9:30 am: |
| 
|
द्रविड गांगुली सोडले तर बाकीच्यांच्या विकेट्स कशा गेल्या? चांगल्या बोलिंग ने की केवळ प्रेशर ने? लाइव्ह पाहणार्यांनी कृपया सांगा, स्कोरवरून कळत नाही. पुढच्या वेळी कॅच घेतला की पॉन्टिंग कडेच डायरेक्ट अपील करा म्हणावं
|
Mukund
| |
| Sunday, January 06, 2008 - 9:45 am: |
| 
|
इथे एका मुळ मुद्द्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे असे मला वाटते. घटकाभर हे मान्य केले की हा सामना ऑस्ट्रेलियाने अनैतीकरित्या जिंकला.. मग मला सांगा मेलबोर्नमधे आपण काय दिवे लावले? आणी ऑस्ट्रेलियाने भारतात येउन आपल्याला हरवले त्याचे काय? आणी सतिश तुमचा उद्वैग रास्त आहे पॉंटींग व सिमंड्सबद्दलचा.. पण हेही विसरु नका की त्याच पंचांनी पॉंटींगलाही पहिल्या डावात चुकीचे बाद दिले होते. जेवढा द्रविड धडधडीत आउट नव्हता दुसर्या डावात तेवढाच पॉंटींगही पहिल्या डावात धडधडीत आउट नव्हता... आणी दुसर्या डावात हुसे,हेडन,सिमंड्स यांच्या डावाबद्दल कोणाला काय म्हणायचे आहे? ते दबाव आलेला असुनसुद्धा चांगले खेळले नाहीत का? अमोल मी लाइव्ह बघीतला सामना... पराभवाचे कारण मी सांगीतले हेच होते... द्रविड व काही अंशी गांगुली सोडुन दुसर्या डावात दबावाखाली आपल्या संघाचे खच्चीकरण झाले... हे कितीही कटु वाटले तरी सत्य आहे. हो.. आणी एक.. हा सामना अटीतटीचा वगैरे बिलकुल झाला नाही. आपण आपला पराजय शेवटच्या षटकापर्यंत लांबवला इतकेच.. पण आपण या सामन्यात हमखास जिंकु अशा परिस्थीतीत कधीही नव्हतो.शेवटच्या दिवशी दोनच निकाल संभाव्य होते... सामना अनिर्णीत किंवा ऑस्ट्रेलियाचा विजय!
|
>>> पण हेही विसरु नका की त्याच पंचांनी पॉंटींगलाही पहिल्या डावात चुकीचे बाद दिले होते. जेवढा द्रविड धडधडीत आउट नव्हता दुसर्या डावात तेवढाच पॉंटींगही पहिल्या डावात धडधडीत आउट नव्हता... पहिल्या डावात पॉंटिंग १७ वर असताना स्पष्टपणे यष्टीमागे झेलबाद झाला होता. पण पंचांनी त्याला नाबाद दिले. शेवटी तो ५५ वर असताना बाद नसताना बाद दिला गेला. परंतु त्याधी त्याने ३८ धावा वाढवल्या हे कसे विसरता येईल? तसेच ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात ६ बाद १३४ अशा वाईट स्थितीत असताना सायमंड्सला तब्बल ३ वेळा पंचांनी जीवदान दिले. ३० वरून पुढे त्याने नाबाद १६२ धावा केल्या. पंचांनी चुका केल्या नसत्या तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव निश्चित ३०० च्या आत आटोपला असता. तसेच दुसर्या डावात द्रविड व गांगुलीचे निर्णय चुकले नसते तर भारताच डाव संपला नसता. पंचांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात चुका (बहुसुंख्य भारताविरूद्ध) तर हा सामना निश्चितच अनिर्णीत राहिला असता किंवा कदाचित पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवून भारताने जिंकला सुद्धा असता. परंतु कोणत्याही परिस्थितीत भारत हा सामना हरला नसता.
|
Mukund
| |
| Sunday, January 06, 2008 - 10:24 am: |
| 
|
सतिश.. या जर तरच्या मुद्द्यांना काहीच अर्थ नाही. असेही म्हणता येईल की जर पॉंटींगला ५५ वर खोटे बाद दिले नसते तर ऑस्ट्रेलिया ६ बाद १३४ अशा अवस्थेत पोहोचलाच नसता... त्यामुळे पंचांनी जरी चुका केल्या तरी एक निर्वीवाद सत्य लपुन राहात नाही... द्रविड व गांगुली सोडुन अजुन ९ जणांना शेवटच्या दिवशी ७० षटके खेळुन काढता आली असती पण त्यांना ते दबावाखाली जमले नाही. हरण्याबद्दल खंत नाही..... खेळात हार जीत ही व्ह्यायचीच.. पण हरल्यावर सगळे खापर पंचांवर फोडुन आपली जबाबदारी झटकायची ही व्रुत्ती वाइट. पुढच्या वेळी अशा दबावपुर्ण परिस्थीतीत आपण आपला खेळ कसा उंचवता येइल याचा विचार केला तरच आपल्या खेळाडुंना फायदा होइल. नुसते दुसर्यांना दोष दिला तर.... परत येरे माझ्या मागल्या....
|
>>> द्रविड व गांगुली सोडुन अजुन ९ जणांना शेवटच्या दिवशी ७० षटके खेळुन काढता आली असती पण त्यांना ते दबावाखाली जमले नाही. http://cricket.indiatimes.com/Its_blunder_Down_Under/articleshow/2678446.cms मुळात जर द्रविड आणि गांगुलीला खोटे बाद दिले नसते तर सामना १०० टक्के अनिर्णित राहिला असता. तसेच जर पॉंटिंगला आणि सायमंड्सला पहिल्याच वेळी बाद दिले असते तर कदाचित भारत सामना जिंकण्याच्या परिस्थितित पोहोचला असता. पंचांनी ब्रेट लीचे नो बॉल द्यायचे नाही अशी जणू प्रतिज्ञा केली होती. पहिल्या डावात जाफर बाद झाला तो नो बॉल होता हे रीप्लेत स्पष्ट दिसले. आज सकाळी द्रविडचा एक झेल स्लीपमध्ये सायमंड्सने सोडला, तो सुद्धा नो बॉल होता. परंतु दोनही वेळी पंचांनी नो बॉल दिला नाही. अर्थात त्यामुळे किरकोळ फरक पडला असता (जाफर फ़ॉर्ममध्ये नाही व द्रविडच्या वेळच्या नो बॉलमुळे फक्त एक धाव वाढली असती). परंतु पॉंटिंग, सायमंड्स, द्रविड, गांगुली इ. विरूद्धच्या चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण सामन्याचा निकाल बदलला. पंचांच्या प्रत्येक सामन्यात थोड्या चुका होणे अपरिहार्य आहे. पण या सामन्यात चुकांचे प्रमाण खूपच जास्त होते व सर्व चुका फक्त ऑस्ट्रेलियालाच फायदेशीर ठरल्या. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे लेग अंपायर, तृतीय अंपायर आणि रेफ्री उपलब्ध असताना पंचांनी गांगुलीला बाद देताना त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून पॉंटिंगचा सल्ला विचारला. पहिल्या डावात बाद असताना अप्रामाणिकपणे तिथेच उभा राहणारा पॉंटिंग गांगुलीच्या वेळी काय प्रामाणिक राहणार होता का त्याला पाचव्या पंचाचे अधिकार होते? एकंदरीत दोनही पंचांची कामगिरी अतिशय वाईट होती व त्याचा जोरदार फटका भारताला बसला. विशेषतः बकनरला आता कायमस्वरूपी नारळ द्यायची वेळ आलेली आहे. भारताच्या हरण्याचे किंवा वाईट खेळाचे समर्थन अजिबात नाही. परंतु पंचांच्या सुमार (आणि पूर्वग्रहदूषित) कामगिरीमुळे सामन्याचा निकाल पूर्णपणे उलटा लागला हे निर्विवाद सत्य आहे. असो. पुढच्या सामन्याकरता जाफर, युवराज आणि इशांत शर्माऐवजी सेहवाग, कार्तिक आणि पठाणला खेळवून बघावे.
|
Zakki
| |
| Sunday, January 06, 2008 - 2:53 pm: |
| 
|
श्रीलंके सारख्या लोकांनी walk out केले असते अशा situation मधे . भारतीय खेळाडू तसे करू शकत नाहीत. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत नाही. हरले काय नि जिंकले काय, खेळाडूंना पैसे बक्कळ मिळतात. रहाता राहिला मानापमानाचा प्रश्न. अहो, एरवी लोक इतर नोकर्या जगभर करत असतात, त्यांना काय कमी अपमान, अवहेलना, खोटेपणा सहन करावा लागतो? जेंव्हा पैसे मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे बाहेर जाऊन, उन्हा तान्हात, क्वचित् थंडीतपण 'खेळायचे', असे असेल तर त्यासाठी काय वाट्टेल ते सहन करणे भाग आहे. लोक काही का म्हणेनात?
|
Asami
| |
| Sunday, January 06, 2008 - 3:56 pm: |
| 
|
हरण्याबद्दल खंत नाही..... खेळात हार जीत ही व्ह्यायचीच.. पण हरल्यावर सगळे खापर पंचांवर फोडुन आपली जबाबदारी झटकायची ही व्रुत्ती वाइट.>>मला नाहि वाटत कुंबळेने कुठे जबाबदारी झटकून टाकली आहे. पण जेव्हढे decisions India च्या विरुद्ध गेले तेव्हढे Aus च्या गेले नाही हि बाब नजरेआड करता येत नाही. IMHO it definately impacts morale आणी हा प्रश्न फ़क्त India बद्दल नसून Down Under जाणार्या प्रत्येक team चा आहे. Sangkarra ला कसे out दिले ते विसरू नका. There are way too many coincidences about off-field activities. Again I do not want to justify last day's performances by our batsmen, it's just that it is not the sole cause. सगळाच जर - तर चा खेळ आहे हे मान्य करूनही Aus tactics कुठेही खिलाडू असतात असे वाटत नाही. It bothers me much more because they have taken self-appointed position for preaching about ethics and morality on cricket ground. Al-bait they are worthy, tough and master opponents with attitude only for winning, but lets please just stop the buck over there. They have no rights to be morale police for cricketing world.
|
Yog
| |
| Sunday, January 06, 2008 - 7:49 pm: |
| 
|
Mukund, AUS चे अभिनन्दन आणि भारतीयान्चे वैगुण्य दाखवायची जरा जास्तीच घाई केलीस? मनोबळ कमी असते तर इतक्या pressure situation मधे द्रविड व सौरव ने इतक्या धावही केल्या नसत्या. look at Kumble.. he was our "wall" on last day! तेव्हा तुझे सरसकट विधान मूळातच वास्तवाशी फ़ारकत घेते. एकच मुद्दा आहे की केवळ 1.5 overs शिल्लक असताना तीन गडी बाद होणे आणि तेही अशा crucial situation मधे does show that.. we are still very vulenarble team under "pressure and high stakes" situation! अगदी सचिन सुध्धा याला अपवाद नाही..पण याचा अर्थ पन्चानी कुठलेही निर्णय दिले तरी सामना हरणारे नेभळटच आहेत असे होत नाही. तसे असेल तर मग आपल्यातील कुणीही पन्च म्हणून उभे राहुया ( we might do better job than ben and buck.. ) हातातील ब्याट गदेसारखी धरून नाचणार्या (आऊट होणार्या) धोणीला पहिले हाकला, युवराज is not ready for test games against quality bowling हे आन्धळाही सान्गू शकेल.. and lets accept it आपल्या गोलन्दाजीत धार सोडाच अन्गावर उडून भाजणारे थेम्बही नाहीत.. या अन्तर्गत बाबीन्वर लक्ष दिले तर कदाचित पुढील सामन्यात थोडीफ़ार लढत देवू शकू. पाट्या विकेट्स्वर overnite zero to hero बनलेल्या आपल्या खेळाडुन्बद्दल आता तरी लोकान्चे डोळे उघडतील अशी आशा करू.. नाहितर पुन्हा येरे माझ्या मागल्या आहेच. over last many yrs... this indifferent treatment to visiting teams,umpiring erros, false allegations (आठवा मुरलिधरन, हरभजन वर याही आधी bowling सन्दर्भात झालेले आरोप).. हे सर्व AUSSIE Criekct ची ओळख झाले आहे. thats the most dangerous thing.. in all this the game is a looser! ps: do read articles by dwarakanath sanjhagiri and UPIRE madhav gothoskar in todyas Saamana
|
Farend
| |
| Sunday, January 06, 2008 - 8:30 pm: |
| 
|
२-३ महिन्यांत काय फरक पडलाय! सप्टेंबर मधे मलाही काही वेळा असे वाटले होते की सगळ्या नवीन गॅंगलाच खेळवावे. जुने लोक प्रेशर मधे लौकर बाद होणे हा जुना विकार आहे आणि ते आता बदलणार नाहीत, पण Twenty-20 चे मुख्य वीर युवराज आणि धोनी ला ही सोन्यासारखी संधी होती वेगळेपणा दाखवायची. पण आत्तापर्यंत तरी या लोकांनी काही विशेष केलेले नाही.
|
Yog
| |
| Sunday, January 06, 2008 - 10:29 pm: |
| 
|
Farend, Twenty-20 चे वीर... आणि टेस्ट क्रिकेट esp against AUS यात जमिन आस्मानाचा फ़र्क आहे हो.. हेच वीर चारी मुन्ड्या वेळोवेळी चीत झाले आहेत.. 20-20 is not even close to 5o overs game.. let alone Test cricket . यालाच मि म्हणतो obernite heros.. द्रविड, सचिन, सौरव हे आजही या सर्व overnite stars पेक्षा कितीतरी पटीने अधिक कुशल, mentally and technically sound आणि लम्बे रेस के घोडे आहेत ते याच फ़रकान्मूळे. धोनि काय युवराज काय, काहिही विशेष करणार नाहीत (निदान या दौर्यावर तरी) हे अगदी स्पष्ट आहे. 20-20 is the fastet and biggest money making format and perhaps most "entertaining" format invented at the best.. खरी परिक्षा ही test cricket मधेच आहे असे माझे मत.
|
Farend
| |
| Sunday, January 06, 2008 - 10:57 pm: |
| 
|
योग अगदी बरोबर, म्हणूनच मी तसे म्हंटले. पण त्यावेळी त्यांनी दाखवलेली एनर्जी एवढी जबरदस्त होती की मलाही काही वेळ तसे वाटले होते
|
घटकाभर हे मान्य केले की हा सामना ऑस्ट्रेलियाने अनैतीकरित्या जिंकला.. मग मला सांगा मेलबोर्नमधे आपण काय दिवे लावले? आणी ऑस्ट्रेलियाने भारतात येउन आपल्याला हरवले त्याचे काय? <<<<मुकुन्द , ऑस्ट्रेलियाच्या इतर विजयां बद्दल किंवा आपल्या कमतरते बद्दल doubt नाहीये पण ज्या प्रकारे कालची कसोटी Aussies नी जिंकली , त्या विजयाला तुम्ही ' कौतुकास्पद ' म्हणलात हे फ़क्त खटकले . बाकी काय कालच्या पुरते बोलायचे झाले तर द्रविड गांगुली सोडून इतर players नेहेमी प्रमाणे under pressure खेळले किंवा खेळलेच नाहीत हे मान्य आहे पण खेळायचं कोणाशी ,Aus team शी कि दोन umpires शी ? शिवाय पुन्हा एकदा ' जर - तर ' च्या भाषेत द्रविड गांगुली unfortunate ठरले नसते तर पुढच्या players ना खेळायची वेळ च आली नसती असेही म्हणता येइल . 
|
Meenu
| |
| Monday, January 07, 2008 - 5:03 am: |
| 
|
ऑस्ट्रेलियाचे हार्दिक अभिनंदन! >>> इतकं cheating करुन जिंकले त्यांचं कौतुक !! ऐ. ते. न. स्लेजिंग आणि चिटींग मात्र त्यांच्याइतकं चांगलं कुणीच करु शकणार नाही.
|
Mukund
| |
| Monday, January 07, 2008 - 5:26 am: |
| 
|
दिपांजली.. मी कालचा विजय मिळवताना त्यांच्या दुसर्या डावात ते कसे खेळले याचे कौतुक करण्यासारखे आहे असे म्हटले होते. व अभिनंदन या साठी की सलग १६ कसोटी सामने जिंकणे हे खरच खुप कठिण काम आहे. एक दोन विजय पंचांच्या चुकीमुळे झालेही असतील.. असामी व योग वर म्हणाला त्याप्रमाणे संगकाराला जसे आउट दिले गेले होते त्यामुळे. पण प्रत्येक कसोटीत ते पंचांमुळेच जिंकतात असे सरधोपट विधान करणे चुकीचे ठरेल. योग मीही इतकाच कालच्या पराभवाने फ़्रस्ट्रेट झालो आहे जितका तु व इतर झाले आहेत. नेभळट हे मी कालच्या पराजयाच्या संदर्भातच नाही तर अशा आधीच्या बर्याच सामन्यामधील आपल्या कामगीरीवरुन बोलत होतो. वर्ल्ड कपमधला बांगला देश व श्रिलंका बरोबरचा पराभव पण याच रांगेत मोडतो. कालच्या सामन्यात अपिल्स करुन, क्लोज इन फ़िल्डर्स लावुन दबाव आणायचा ही ऑस्ट्रेलियाची स्ट्रॅटीजी होती. आता भिकार पंचांनी त्यांची अपिल्स उचलुन धरली व फ़िल्डरला विचारुन आउट द्यायचा महामुर्खपणा केला त्यात ऑस्ट्रेलियन खेळाडुंना दोष देण्यात काय अर्थ आहे? पहिल्या डावात सिमंड्स व पॉंटींगला चुकीच्या निर्णयाने नाबाद दिले पण दुसर्या डावात हुसे,हेडन,सिमंड्स यांनी दबावाखाली चांगला खेळ करुन त्यांच्या संघाला विजयाच्या द्रुष्टिक्षेपात आणले की नाही? त्याउलट दुसर्या डावात आपले ९ खेळाडु दबावाखाली कोलमडले की नाही? या प्रश्नाची हॉनेस्ट उत्तरे सगळ्यांनी आपापल्या मनातच पडताळुन पाहीली पाहीजेत. असामी.. मी वरच्या बर्याच पोस्टातुन जो सुर निघत आहे की ऑस्ट्रेलिया फक्त पंचांच्या चुकीमुळे व चिटींग करुनच जिंकतात त्या व्रुत्तीबद्दल म्हणत होतो. पंचांच्या चुका हे ऑस्ट्रेलियन खेळाडुंचे चिटींग कसे ठरु शकते? ऐकावे ते नवलच!आणी या पराभवाला फक्त पंचांच्या चुकाच कारणीभुत आहेत असे मानणे म्हणजे डोळ्यावर झापड लाउन घेतल्यासारखे आहे. आणी त्या भिकार पंच बकनरला उर्वरीत मालीकेत डच्चु दिला हे उचितच झाले.. It was about time! and lets accept it आपल्या गोलन्दाजीत धार सोडाच अन्गावर उडून भाजणारे थेम्बही नाहीत.. या अन्तर्गत बाबीन्वर लक्ष दिले तर कदाचित पुढील सामन्यात थोडीफ़ार लढत देवू शकू. पाट्या विकेट्स्वर overnite zero to hero बनलेल्या आपल्या खेळाडुन्बद्दल आता तरी लोकान्चे डोळे उघडतील अशी आशा करू.. नाहितर पुन्हा येरे माझ्या मागल्या आहेच. योग हे मात्र योग्य बोललास... मी ऑस्ट्रेलियाच्या स्लेजींगचे समर्थन मुळीच करत नाही. पण असामी म्हणतो त्याप्रमाणे ते जिंकण्याच्या त्वेशाने,तडफ़दार व अग्रेस्सिव्ह क्रिकेट खेळुन प्रतिस्पर्ध्याला दबावाखाली टाकतात. ते स्लेजींग करतात.. आपल्यातलेही काही खेळाडु(श्रिसंथ वगैरे)स्लेजींग करतात. फरक एवढाच आहे की ऑस्ट्रेलियाचे खेळाडु त्या स्लेजींगच्या दबावाखाली येत नाहीत. उलट ते त्यांचा खेळ आणखीनच उंचावतात. उलट आपले खेळाडु त्या मानसीक दबावाला बळी पडुन त्यांचे काम सोप्पे करतात. आपणही ही मानसीक खंबीरता दाखवावी हीच किमान अपेक्षा..
|
Zakasrao
| |
| Monday, January 07, 2008 - 6:21 am: |
| 
|
चीटर ऑसिज जिंकले त्यापेक्षाही जास्त वाइट वाटल ते द्रविड आणि दादा सोडून बाकीच्यानी हिम्मंतच नाही दाखवली ह्याच. अरे कुंबले सुद्धा निग्रहाने खेळात होता तर मग बाकीच्यानी का शेपुट घातली??? युवीच लक्ष खेळात कमी आणि तिच्या बड्डे कडे जास्त होत की काय न कळे. फ़ारच अपेक्षा भंग केलाय त्याने. आता ह्या पराभवातुन चिडुन जावु पुढच्या तेस्ट मध्ये काय दिवे लागणार आहेत ते बघु. माझी व्यक्तिश्: एक इच्छा भारताने पुढच्या कसोटीत ऑसिजची पिस काढुन पहिल्या बॅटिंग मध्ये २ दिवसात १००१ रन करावेत. आणि त्याना दोन वेळा ५०० मधे आउट करावे आणि एक डाव व ५०१ रनानी जिंकावे. म्हणजे सुपर ५०१ धुलाइ केली अस म्हणता येइल आणि मग कालच्या प्रकारामुळे झालेला मनस्ताप राग धुवुन जाइल. मला माहित आहे हे अशक्यप्राय आहे पण स्वप्न बघण्यात काय वाइट आहे??
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|