|
महोदय, तुमच्या कडुन या पेक्षा इतर कुठली अपेक्षा नव्हतीच. तुमची मानसिकता देखिल विरोधासाठी विरोध अशीच आहे हे तुम्ही स्वत समजुन घेतलेलेत तर बरे होईल. bcci शरद पवार यांची खासगी मालमत्ता नाही याचे भान त्यानीं ठेवावे इतकिच किमान अपेक्षा आहे. आणि तुम्ही देखिल शिवसेना या नावाची काविळ झालेल्यांपैकीच आहात असे एकंदरीत दिसतेय. असो तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण म्हणुन योग्य विषयाला बगल देवुन मुद्दा खोडुन काढायची मुभा तुम्हाला कुणी दिली असा समज करुन घेवु नये. क्रिकेट व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी आहेत जिथे निधी अभावी कैक चांगल्या गोष्टी घडु शकत नाहीत. एका खेळात यशस्वी झाले म्हणजे आपण जग जिंकले या भ्रमात क्रिकेटपटुंनी राहु नये.तसेच त्यांनी विश्वकप जिंकला म्हणुन लगेच स्वतच्या पक्षाचे शक्तिप्रदर्शन करुन आपली हलकी मनोवृत्ती पवारांनी उघड करु नये.यालाच म्हणतात "आयजीच्या जिवावर बायजी उदार" किंवा "आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय" चु भु द्या घ्या. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Mandard
| |
| Monday, October 01, 2007 - 6:38 am: |
| 
|
तुम्ही कशाला चिडता. मला शिवसेना आवडत नाही आणि बाळासाहेबांनंतर तिला काही भवितव्य नाही. असो robinhood म्हणतात ते एकदम पटले "इथे व्यक्त होणारी मते हे फक्त भावनांचे विरेचन cathersis आहे." त्यामुळे वितंडवाद घालण्यात काही अर्थ नाही. this issue is closed for me.
|
Mahaguru
| |
| Tuesday, October 02, 2007 - 9:53 pm: |
| 
|
खालील संकेतस्थळावरुन क्रिकेटचे सामने विनामुल्य पहाता येते असे मला कळाले. मझा स्वतःचा अनुभव नाही, पुढच्या सामन्याच्यावेळी ट्राय करुन बघीन http://live.cricketcable.com http://www.cricasia.com
|
Zakki
| |
| Tuesday, October 02, 2007 - 10:32 pm: |
| 
|
ये रे माझ्या मागल्या! २० - २० मधे विजय मिळवल्यावर, द्रविड, सचिन परत आले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाने वाचवले तर दुसर्यात सपशेल पराभव! आता आणखी गांगुली, कुंबळे, आगरकर, लागल्यास गवास्कर, कपिल देव, झालेच तर बोर्डे, पतौडी, विश्वनाथ, शास्त्री यांनासुद्धा घ्यावे!
|
Uday123
| |
| Wednesday, October 03, 2007 - 9:40 pm: |
| 
|
फ़क्त ११ खेळाडूच मैदानात खेळु शकतात हे आपले दुखणे आहे.
|
सचिन,द्रविड आणि गांगुली या त्रिकुटाला आता टीमच्या बाहेरच काढल पाहिजे. फ़ाल्तु जागा अडवुन आहेत. त्यांच्या अनुपस्थितित वर्ल्ड कप जिंकला आता ते आले तर परत हरायला लागलो आहोत आपण
|
भारताने पाकड्यांना हारवुन मालिका जिंकली.
|
अरे यार सचिन असा नर्व्हस नाईंटी मधे किती वेळा बाद होणारे? आत्तापर्यंत त्याची ५० शतके झाली असती.
|
Zakasrao
| |
| Friday, November 16, 2007 - 4:45 am: |
| 
|
काल सचिन तेंडुलकर जिंदाबाद जबरा शॉट सिलेक्शन आणि जबरा टायमिंग होत. नजर लागेल अस देखणे फ़टके मारले त्याने. युवी फ़ॉर्म मध्ये आहे तो एक एडिशनल फ़ायदा आहे.
|
>>> सचिन,द्रविड आणि गांगुली या त्रिकुटाला आता टीमच्या बाहेरच काढल पाहिजे. फ़ाल्तु जागा अडवुन आहेत. त्यांच्या अनुपस्थितित वर्ल्ड कप जिंकला आता ते आले तर परत हरायला लागलो आहोत आपण http://www.rediff.com/cricket/2007/nov/16mvp.htm

|
सचिन महान खेळाडु आहे यात वादच नाही पण जेंव्हा तो चांगला खेळत नाही तेंव्हा त्याला काढायला काय हरकत आहे??आता चांगला खेळतोय तर काढू नका पण जेंव्हा खेळत नसतो तेंव्हा काढा.तुम्ही दिलेल्या स्टॅटीस्टिक्स बघा आणि सांगा द्रविड आणि गांगुली कुठे महत्वाचे आहेत आता??नविन खेळाडू चांगले खेळत आहेतच ना आता??
|
>>> सचिन महान खेळाडु आहे यात वादच नाही पण जेंव्हा तो चांगला खेळत नाही तेंव्हा त्याला काढायला काय हरकत आहे?? तो भूतकाळात नक्की केव्हा वाईट खेळत होता? तो एखादी संपूर्ण मालिका किंवा सलग ५ किंवा अधिक डाव अपयशी ठरलेला आहे का? त्याने प्रत्येक डावात किमान अर्धशतक करावे अशी तुमची इच्छा असेल तर मग मला काही म्हणायचे नाही. >>> तुम्ही दिलेल्या स्टॅटीस्टिक्स बघा आणि सांगा द्रविड आणि गांगुली कुठे महत्वाचे आहेत आता??नविन खेळाडू चांगले खेळत आहेतच ना आता?? गांगुली आणि द्रविड हे दोघे गंभीर, उथप्पा, दिनेश कार्तिक, पठाण आणि हरभजन या नवीन आणि तरूण खेळाडूंच्या पुढे आहेत.
|
अहो ५ मधुन एक वेळा खेळला तर काय उपयोग???ते तर शाहिद आफ़्रिदी पण खेळतो. या सिरिजमधे खेळतोय तसाच तो गेले ३-४ वर्ष खेळतोय का??या सिरिजमधे तो पुर्वीसारखा खेळायला लागला आहे. गंभिर,उत्तपा तर द्रविड,गान्गुली पेक्षा कधीही चांगले आहेत. हे लोक under pressure खेळत नाहित. मॅच विनिंग खेळी करु शकतात यांच्यामुळे २०-२० वर्ल्ड कप जिंकला हे तुम्ही का विसरताय???गांगुली कागदावर बरा असेलही पण जेंव्हापासुन त्याच पुनरागमन झालय तेंव्हापासुन तो स्वत्:च्या स्कोअर साठी खेळतोय टीमसाठी नाही. मला तर पुनरागमनानंतर त्याने जिंकवुन दिलेली एकही मॅच आठवत नाही पठाण,हरभजन शी द्रविड गांगुलीला कस काय कम्पेअर करता येईल???
|
Savyasachi
| |
| Saturday, November 17, 2007 - 11:11 pm: |
| 
|
२० २० आणि ५० ५० यांची तुलना करू नये. त्यात बराच फरक आहे. बाकी गाडी लगेच ३ जणांवरून २ लोकांवर घसरली हे बघून गंमत वाटली सचीनची ५ पैकी कोणती एक खेळी त्याला खेळू द्यायची हे कसे ठरवायचे?
|
>>> अहो ५ मधुन एक वेळा खेळला तर काय उपयोग???ते तर शाहिद आफ़्रिदी पण खेळतो. या सिरिजमधे खेळतोय तसाच तो गेले ३-४ वर्ष खेळतोय का??या सिरिजमधे तो पुर्वीसारखा खेळायला लागला आहे. सचिनपेक्षा जास्त सातत्य असलेला एक जण तरी संघात आहे का? तो त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत किती वेळा सलग ५ पेक्षा अधिक डाव फेल गेलेला आहे? तो ५ डावातून एकच डाव खेळतो आणि उरलेले ४ डाव फेल असतो, तो ३-४ वर्षे वाईट खेळत होता आणि या मालिकेतच पूर्वी सारखा खेळायला लागला आहे हे वाचून गंमत वाटली. बहुतेक त्याचा जबरदस्त वशिला असावा किंवा निवडसमितीला अजिबात अक्कल नसावी. गंभिर,उत्तपा तर द्रविड,गान्गुली पेक्षा कधीही चांगले आहेत. हे लोक under pressure खेळत नाहित. मॅच विनिंग खेळी करु शकतात यांच्यामुळे २०-२० वर्ल्ड कप जिंकला हे तुम्ही का विसरताय??? २०-२० मध्ये पहिली ६ षटके ११ पैकी ९ क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या आत उभे असतात. त्यामुळे पहिल्या ६ षटकात चेंडू उचलून मारता येतो. फक्त २०च षटके खेळायची असल्याने सर्व संघ बाद होण्याची शक्यता खूपच कमी असते. आता तर नो बॉलवर फ्री हिट द्यायला सुरवात केली आहे. २०-२० च्या सामन्यात प्रत्येक षटकामागे सरासरी ८ हून जास्त धावा होतात. हीच सरासरी ५० षटकाच्या सामन्यात ५-५.५ एवाढीच असते. त्यामुळे २०-२० मध्ये वेगाने आणि भरपूर धावा करण्यात काहिही विशेष नाही. गंभीर, उथप्पा इ. खेळाडूंनी २०-२० त जर इतक्या धावा केल्या, तर सचिन त्या सामन्यांत असता तर त्याने किती केल्या असत्या याची कल्पनाच करवत नाही. तुम्ही तो ५ डावातला एखादाच डाव खेळतो आणि त्या एकमेव डावावर तो संघात टिकून आहे हे जे विधान केले आहे ते त्याच्यापेक्षा गंभीर, उथप्पा, दिनेश कार्तिक, हरभजन, मुरली कार्तिक, धोनी इ. नव्या खेळाडूंनाच जास्त लागू पडते. सचिनकडून इतक्या जास्त अपेक्षा ठेवल्या जातात की तो एखादा डाव जरी फेल गेला तरी लगेच त्याला कायमचे घरी बसवा अशी हाकाटी सुरू होते. २-३ आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात सचिनने ७२ चेंडुत ४३ धावा केल्या होत्या. लगेच त्या दिवशी झी न्यूजने जवळपास एक तास सचिनवर एक स्पेशल कार्यक्रम करून सचिन कसा "सुस्त" झाला आहे, त्याच्या हालचाली मंदावल्या आहेत, त्याने लवकरात लवकर निवृत्त व्हावे असा जोरदार प्रचार केला होता. त्याच न्यूज चॅनेलने २ दिवसांपूर्वी सचिन ९७ वर बाद होऊन सामन्याचा सर्वोत्तम खेळाडु झाल्यानंतर पुन्हा एकदा एक खास कार्यक्रम करून सचिन अजूनही कसा महान आहे, तो इतक्या वर्षानंतर सुद्धा कसा फॉर्म टिकवून आहे असा प्रचार केला. केवळ २-३ आठवड्यात भंगारात टाकण्यायोग्य खेळाडू महान असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. सचिनवर टीका करणार्यांना असे साक्षात्कार कायमच होत असतात. तुम्हाला सुद्धा तो परत पूर्वीसारखा खेळत असल्याचा साक्षात्कार झालाच ना?
|
Nandya
| |
| Tuesday, November 20, 2007 - 5:03 pm: |
| 
|
<<<सचिन महान खेळाडु आहे यात वादच नाही पण जेंव्हा तो चांगला खेळत नाही तेंव्हा त्याला काढायला काय हरकत आहे??>>>
आज कोण कसा खेळेल ते तुम्हाला कालच कळते की काय? अन सचिन, द्रवीड हे काय विजेचे फ़्युज आहेत? एकदा उडाला की त्याच्या जागी दुसरा फ़िट करा अन काम चालू Jokes apart, replacing existing players with proven class, credentials and longevity requires a migration policy, which has never existed with the Indian team. सचिन, द्रवीड, गांगुली हे ३०-३२ वर्षांचे असताना, when they were the engine of the team and considered irreplaceable , तेव्हाच त्यांच्या replacements साठी scouting अन grooming सुरु करायला हवे होते. तुमची 'sparkle' अन 'class' मधे गफ़लत होते आहे. आत्ता ५-१० सामान्यांत चमकदारपणे खेळणार्या खेळाडूत पुढे १५ वर्षे संघात राहण्याचा दर्जा आहे का हे परखण्यात आपली चूक होते, किंवा मग असल्या गोष्टींचे आपल्याला महत्व वाटत नाही. एखादा सचिन किंवा द्रवीड मटका लागल्यासारखा मिळतोही पण प्रत्येक सचिनमागे पन्नास disposable खेळाडु एकदोनदा चाखून त्यांची चव तात्पुर्ती आहे समजून लगेच टाकले जातात. तात्पर्य, द्रवीड, सचिन, गांगुली वैगेरेना हाकलून एकदम गंभीर, उथप्पाला " आजपासून हे आमचे नवीन तारणहार " असे लेबल लावून वाघासमोर धरणे हा जुगार आहे. More of wishful thinking than a calculation. We are perhaps a bit late in finding able replacements for the 3 aging batting stalwarts.
|
Farend
| |
| Tuesday, November 20, 2007 - 5:37 pm: |
| 
|
Nandya एकदम लाखो वर्षांनी? मधे बरेच दिवस तुझी काही पोस्ट बघितली नाही. सद्ध्याच्या मॅचेस बघत आहेस का? मला वाटले होते की पाक च्या विरुद्ध गंभीर, उथपा आणि रोहित शर्माला भरपूर संधी देतील, वेळोवेळी सचीन, सौरव वगैरेंना विश्रांती देऊन. गंभीर ला तशी मिळाली पण तो चमकला नाही. उथपा ला फक्त शेवटच्या सामन्यात 'वरती' खेळायला मिळाले तर त्याने अत्यंत मूर्खपणा ची कमाल केली विकेट फेकताना. मला वाटले होते की सेहवाग आता येतो आहे फॉर्मात त्याचे (४थ्या सामन्यातील) कट्स वगैरे बघून (आणि टेस्ट ला धमाल आली असती), पण त्यानेही जवळ जवळ विकेट फेकली. रोहित शर्मानेच फक्त एक मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. पण प्रॉब्लेम असा आहे की या सिरीज मधून आपल्याला नक्की काहीच कळाले नाही या तिघांच्या replacements बद्दल. म्हणजे निवड समितीने फक्त या सिरीज चाच विचार केला.
|
Asami
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:53 pm: |
| 
|
उथपा ला फक्त शेवटच्या सामन्यात 'वरती' खेळायला मिळाले तर त्याने अत्यंत मूर्खपणा ची कमाल केली विकेट फेकताना.>>मूळात त्याला वरती पाठवणे चूकीचे होते. तो मधल्या फळीसाठी establish होतो आहे and he has shown enough attitude to act as finisher. ह्याउलत वरती असा खेळाडू हवा कि जो technically strong असेल जेणेकरून seaming etc conditionms मधे टिकू शकेल किंवा इतर वेळी येउन shots खेळू शकेल. शर्मा seems to be right candidate. yuvi seems very unsettled in first few overs फ़क्त त्या match बद्दल म्हणाल तर प्रवीणकुमार किंवा पठाणला वर आणायला हवे होते. Few agreesive overs would have unsettled pak's unexperienced attack then. Besides, pathan relishes partnering with sachin असो ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी
|
Couldnt' agree more. Pathan was the best choice that day. उथाप्पा वर आल्यावर आम्ही चकित झालो होतो. युवी पण चाचपडत खेळत होता. बहुतेक काही तरी डोळ्याचा प्रॉब्लेम होता. शर्माची विकेट क्रुशल ठरली. तो आउट झाला नसता तर कदाचीत आपण जिंकलो असतो.
|
Prajaktad
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:17 pm: |
| 
|
फिरोजशा कोटलावर भारताचा सलग सातवा कसोटी विजय     
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|