|
Arc
| |
| Monday, December 24, 2007 - 10:19 am: |
| 
|
आतापर्यन्त congress ने नेहमीच मुस्लिम लोकान्चा अनुनय करुन मतान्चे राजकारण करायचा प्रयत्न केला.त्यात ना मुस्लिम लोकान्चा फ़ायदा झाला ना देशाचा.गुजरात निवडणुकिने congress ची खोड मोदली असे नाहि का वाटत?
|
Zakki
| |
| Monday, December 24, 2007 - 5:10 pm: |
| 
|
सोमवारचा लोकसत्तेतील अग्रलेख जरूर वाचा! असहिष्णू हिंदुत्ववादी!! खरे सहिष्णू हिंदू अतिरेकी मुसलमानांना देवळे फोडायला, त्यांची शिक्षा माफ करायला मदत करतात. हिंदू देवतांची विटंबना करणार्याला डोक्यावर घेऊन नाचतात. पण मुस्लिमांविरुद्धा जरा काही बोलले की एकदम जाळपोळ नि दंगल करणार्यांची बाजू घेतात. असे ज्ञान मला प्राप्त करून देणार्या लोकसत्तेच्या अग्रलेख लिहिणार्यांना माझे अभिवादन.
|
मोदींनी कॉंग्रेसचेच नाही तर तमाम हिंदुविरोध्यांचे आणि सेक्युलर मिडियाचे थोबाड फ़ोडले आहे. हिंदुत्व आणि विकासाचा नवा फ़ॉर्म्युलाच आणलाय हे फ़ार छान आहे कारण विकास हा हिंदुत्वाचा एक भाग आहे. अहो झक्की,तो अग्रलेख म्हणजे मुर्खांनीच टाळ्या द्याव्यात असा आहे. वाट्टेल ते लिहुन गुजरातची फ़ाळणी झालीच आहे,हिंदु दहशदवादी,वाजपेयी मुखवटाधारी वगैरे तद्दम फ़ाल्तु गोष्टी लिहिल्यात.
|
Zakkas
| |
| Tuesday, December 25, 2007 - 1:32 am: |
| 
|
गुजराथच्या निकलांनी सर्वात गोची कोणाची केली असेल तर ती मिडीयाची. मणीनगर विधानसभा क्षेत्रात मोदी विरुद्ध दिनशा पटेल अशी लढत होती. म.टा. च्या प्रकाश आकोलकर नामक विद्वानाने दिनशा पटेल 'जायंट किलर' ठरु शकतील असे भाष्य केले होते. एकही सभा न घेता मोदी ८७,००० मतांनी जींकले. पुन्: भाष्य करायला हा आकोलकर तयार. म्हणजे तुम्हाला म.टा. च्या खर्चाने रिपोर्टिंगला पाठवले. तुम्ही खर्या बातम्या लिहायच्या सोडून स्वत्:च्या विचारसरणीचा चुना लावत बसलात अन प्राय:श्चीत्त काय? शुन्य. ऊद्या मी जर प्रोजेक्ट डीलीव्हर केला नाही तर माझा जॉब जाइल, पत्रकाराने पूर्ण चुकीचे रिपोर्टींग केले तर त्याची शिक्षा काय? -झक्कास.
|
Yog
| |
| Tuesday, December 25, 2007 - 6:19 am: |
| 
|
आता महाराष्ट्रानेही गुजरातकडून धडा घ्यावा. पण दुर्दैव! पवार ठाकरे सारख्या अत्त्यन्त लायक अन मुत्सद्दी राजकारण्यान्नी उभी हयात एकमेकान्शी झगडण्यात घालवली.. मला वाटत आपला मराठी लोकान्चा आजवरचा हजारो वर्षान्चा इतीहास बघता, स्वताच्याच लोकान्शी जन्ग करण्यात आयुष्य वाया घालवणारी दुसरी जमात कुठेही नसावी. असो. मोदी पन्तप्रधान होतील तो दिवस उगवावा एव्हडीच इच्छा!
|
ठाकरे मोदींना समांतर म्हणता येईल, पवार कसले? त्यांना काही हिंदुत्व वगैरे आहे अस वाटत नाही. कॉंग्रेसचीच मानसिकता. सोडून गेले असले तरी.
|
Arc
| |
| Wednesday, December 26, 2007 - 4:07 am: |
| 
|
मुळात ही post मी ह्याकरता ताकलि होती कि लोकाना कुथल्याच धर्माचे राजकारण नको आहे हे गुजरातने सिध्ह केले आहे.मोदिनि गुजरातमधे industrial gowth ला support केले म्हनुन लोकानि मते दिली.फ़क्त हिन्दुत्व उपयोगाचे नाही. rather हिन्दुत्वाने पोटहि भरत नाही.एवढेच नाही तर त्यानी NRI गुजराथी लोकान्च्या मदतीने सुध्दा गुजरातचा विकास साध्य केला आहे. even मुम्बईमधे सुध्दा ठाकरेनी मराठी मुलाना कामे मिळवुन दिली म्हणुनच तिथे मराठी माणुस ठाकरेना मानतो. financial strenth आलि कि कुथल्याही धर्माला आपोआप प्रतिश्ठा मिळते, मागवी लागत नाही.
|
Zakki
| |
| Wednesday, December 26, 2007 - 1:57 pm: |
| 
|
याचे उत्तम उदाहरण म्हणजे यहुदी धर्म. अनेक शतके या लोकांना स्वत:चा देश नव्हता. पण केवळ बुद्धीचा योग्य वापर करून त्यांनी विज्ञानाच्या सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्राविण्य मिळवले. त्या बळावर ते आता अमेरिकेत अगदी मोठमोठ्या जागांवर आहेत. त्यांच्यातहि "सेक्युलर" मतवादी लोक आहेत. पण त्यांची सेक्युलरपणाची व्याख्या वेगळी आहे. ते यहुदी धर्माला प्राधान्य देतात नि इतर धर्म 'चालवून' घेतात, कारण त्यांना खात्री आहे की सर्व क्षेत्रात ते इतके पुढारलेले आहेत की त्यांचे वर्चस्व कुणि हिरावून घेणार नाहीत (भारतीय किंवा चिनी सोडल्यास). त्यांना कधीहि अतिरेकी हल्ले करावे लागले नाहीत. एकेकाळी माझा धर्महि असाच अति बलवान होता, त्यातूनच त्यांना निधर्मवाद सुचला. पण दुर्दैवाने त्यांनी सर्व क्षेत्रात असलेले वर्चस्व टिकवले नाही. म्हणून ही अवस्था.
|
Tonaga
| |
| Wednesday, December 26, 2007 - 3:47 pm: |
| 
|
mr zakki, beg to differ with you... Jews have done many terrorist attacks on neighbouring countries. It was warranted in earlier days for self protection but what about in last 20 years ? They are just invading and aggressing in palestine. So it is not correct to say that thay didnot have terrorist ataacks.. I also appreciate their virtues but today they are not what they were in past. afterall they are following american mentality!!
|
Zakki
| |
| Wednesday, December 26, 2007 - 4:24 pm: |
| 
|
खरे आहे. भारतीय लोकांच्या मानाने ते जरा जास्त भांडखोर आहेत. दररोज पॅलेस्टाईन मधल्या लोकांचे हल्ले होत असताना, नि आजूबाजूचे लोक त्यांना मदत करतात हे स्पष्ट दिसत असूनहि, त्यांनी भारतीयांसारखी शांतता पाळायला पाहिजे. फार तर काय, अरब लोक यहुदींना मारून टाकतील, नि इस्राएल वर स्वत:चे राज्य तयार करतील इतकेच ना? मग त्यात काय? भारतात नाही का, हजार वर्षापूर्वी मुसलमान आले नि त्यांनी राज्य स्थापले, हिंदूंवर अन्याय केले, नंतर इंग्रज आले नि त्यांनीहि तेच केले. पण भारताने आपली शांततावृत्ति सोडली नाही. तसेच यहुदींनी पण करावे असे तुमचे मत आहे का?
|
Tonaga
| |
| Thursday, December 27, 2007 - 4:48 pm: |
| 
|
sorry Zakkeejee, you just go through a Marathi book written by Mr. Nilu Damale, who has written it by experiencing in bombings in palestine and talking with all with all type of people.And history also tells that the Jews are crossing their limits. they are inavading in land alotted to Palestine.They are killing innocent palestinis.the jews should protect themselves. But now they have decided to abolish Palestine from world map as the arabs had once decided to vanish israel... your mind is seems to be conditioned by american media...
|
मोदिनि गुजरातमधे industrial gowth ला support केले म्हनुन लोकानि मते दिली. उद्योजकतेपेक्षा बेसिक सुविधा पुरवल्या हे महत्वाचे,विज,पाणी,रस्ते यांचे प्रश्न सोडवले हे महत्वाचे. शिवाय गुजरातची गेल्या ५ वर्षातील कृषी क्षेत्रातील वाढ १०%च्या आसपास होती,म्हणजे देशाच्या वाढीपेक्षा ३ पटीनी जास्त. विकास घडवला यात वादच नाही पण विकास हा हिंदुत्वाचाच एक भाग असल्याने बिना विकासच हिंदुत्व करणारे चुकिचे आहेत. It was warranted in earlier days for self protection but what about in last 20 years ? इस्राईल गेली २०००हजार वर्षे गुलामगीरीत होता,त्यांच्यावर अत्याचार प्रचंड झालेत त्यामुळे त्यांना थांबवणे अवघड आहे. झक्कींना अनुमोदन.
|
Zakki
| |
| Thursday, December 27, 2007 - 10:07 pm: |
| 
|
गरज पडली तेंव्हा भारताने पण पूर्व पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून पुसून टाकले. अर्थात् तेंव्हा इंदिरा गांधींसारखी निदान आंतरराष्ट्रीय संबंधापुरती तरी, हुषार, तडफदार बाई होती. आजकाल कुठे कुणाला काही अक्कल, तडफदारपणा आहे? जे काय आहे ते स्वत:ची तुंबडी भरण्यात खर्च होत आहे. पॅलेस्ताईनमधे लोकशाही आहे, नि तिथे निवडून दिलेले सरकार आहे. पण ते पॅलेस्ताईनचे भले म्हणजे इस्राईलचा नाश हे एकच समीकरण धरून बसले आहेत, नि त्यात गेली कित्येक वर्षे सुधारणा नाही. निदान त्यांनी इस्राईलला त्रास द्यायचे थंबवले तरी इस्राइल गप बसेल. कारण अमेरिकेतसुद्धा लोकांना असे वाटू लागले आहे की इस्राईल जरा अतिच करताहेत. नि अमेरिकनांविरुद्ध जाण्याची इस्राइलची टाप नाही. इस्राईल म्हणजे अमेरिकेचे ( pseudo ) एक्कावन्नावे राज्य आहे.
|
Arc
| |
| Friday, December 28, 2007 - 3:55 am: |
| 
|
विकास घडवला यात वादच नाही पण विकास हा हिंदुत्वाचाच एक भाग असल्याने..... हिन्दुत्व ही एक life style आहे.विकास म्हणजे financial position improve करणे असते.त्यात वीज पाणी शाळा ह्या गोश्टी येउ शकतात, पण विकासाचा आणि हिन्दुत्वाचा काहिही सम्बध नाही. हिन्दुत्व हा emotional मुद्दा आहे.फ़क्त हिन्दु आहात म्हणुन तुम्हाला कोणीही किम्मत देत नाही.त्यासाथी पैसा,पद,शिक्शण(उपयोगी येणारे),सत्ता ह्या पैकी एक काहीतरी हवे.
|
हिमाचल पण भाजपाने जिंकला! भाजपाने गुजरात पाठोपाठ आता हिमाचल पण जिंकुन कॉंग्रेसची झोप पार उडवली सोनिया का जादु फ़िका पड गया! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
पण विकासाचा आणि हिन्दुत्वाचा काहिही सम्बध नाही. महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील हिंदुत्ववाद्यांचा हिंदुत्वाचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्याबद्दल सुराज्यही दिले होते(दिनेश कुठे आहात?? लिहा जरा याबद्दल). त्यामुळे माझ्यामते विकास हाही हिंदुत्वाचाच भाग आहे (इतरही मुद्दे आहेत). हिंदुत्व ही विचारधारा नक्कीच आहे पण त्या विचारधारेत विकास घडवणे हाही मुद्दा येतो(थोडक्यात म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा विकासाच्या आड येत नाही.)
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 02, 2008 - 3:05 am: |
| 
|
चिन्या, मी फार लिहित नाही. पण शहाजी आणि जिजाई, यानी एक ध्यास घेतला होता, तो शिवाजीने पुर्ण केला. ( एकेरी उल्लेख केवळ आपुलकीमूळे ) शिवाजीला आणखी आयुष्य लाभते, तर फार पुढचा पल्ला गाठता आला असता. मला वाटते त्यांचा वारसा कोल्हापुरात शाहु महाराज आणि बडोद्यात सयाजीरावानी चालवला. पण शिवाजीने कधीही धर्माची ढाल पुढे केली नाही. केवळ दुसर्या धर्माचा म्हणुन कुणाचा द्वेषही केला नाही. फक्त प्रजेचे हितच पाहिले. अन्याय सहन केला नाही, होवु दिला नाही. शिवाजीच्या विलासाच्या कथा ऐकिवात नाहीत. राज्यही नेहमी एक विश्वस्त या नात्यानेच केले. हे सगळे मुळातून अंगात भिनायला हवे. केवळ शिवाजीचे नाव घेतल्याने, होत नाही हे.
|
Mandard
| |
| Wednesday, January 02, 2008 - 4:06 am: |
| 
|
महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील हिंदुत्ववाद्यांचा हिंदुत्वाचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ====== हे तितकेसे खरे नाही. महाराष्ट्रापुरते ठीक आहे. महाराष्ट्राबाहेर हिन्दुत्ववादी मुख्यत्वे राम साधु, महंत इ. चा आदर्श ठेवतात. तसेच महाराष्ट्राबाहेर शिवाजी महाराजांबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. चुकीची माहिती जास्त आहे.
|
महाराष्ट्राबाहेर हिन्दुत्ववादी मुख्यत्वे राम साधु, महंत इ. चा आदर्श ठेवतात. तसेच महाराष्ट्राबाहेर शिवाजी महाराजांबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. चुकीची माहिती जास्त आहे. ठीक आहे फ़ारशी माहीती नसेल पण त्यांना एव्हढतरी माहीत असत की शिवाजी महाराजांनी मुस्लिमांविरुध्द लढून स्वराज्य निर्माण केले. त्याचप्रमाणे हिंदुत्ववाद्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधे तर शिवाजी महाराजांबद्दल चांगलेच लिहिलेले असते. अर्थात सामान्य जनतेला फ़ारशी माहीती नसते कारण आपल्या सेक्युलर इतिहासाच्या पुस्तकांमधे गुलामगिरीच जास्त ग्लोरीफ़ाय केलेली असते. राम,साधु,महंत जर लोकांना हिंदुत्वासाठी प्रेरीत करत असतील तरी त्यात मला काही वावग वाटत नाही.
|
मोदी विजयाचा अन्वयार्थ - डॉ. पद्माकर दुभाषी बहुतेक मुख्यमंत्री केंदीय सरकारच्या कार्यक्रमासाठी केंदातून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न करतात. विकासाच्या योजना स्वतंत्रपणे आखून त्यांची कार्यवाही करावी, असे त्यांना वाटत नाही. अशा तऱ्हेचा नेटाने प्रयत्न करणारे मोदी हे एक मुख्यमंत्री होते. गुजराती जनतेने याला दाद दिली. ........ गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाने मतदार चाचण्यांचे अंदाज आणि प्रसारमाध्यमांच्या अटकळी साफ खोट्या ठरविल्या. त्या सर्वांनी भाजपला काठावर बहुमत मिळेल, कदाचित सत्ताही त्या पक्षाच्या हातून निसटेल अशीच भविष्यवाणी केली होती. प्रत्यक्षात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला जवळजवळ दोन तृतीयांश जागा मिळाल्या. कदाचित या चुकीच्या अंदाजात काँग्रेस पक्षाच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब पडले होते. भाजपची पकड ढिली करून सत्ता हिसकावून घ्यायचीच, अशा निर्धाराने काँग्रेस पक्ष गुजरात निवडणुकीत उतरला होता. कधी नव्हे इतकी तेथील परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे, असे काँग्रेसला वाटत होते. एक तर १७ वषेर् भाजप अधिकारावर होता. सर्वसाधारणपणे मतदारांचा कौल प्रस्थापितांविरुद्ध जातो. त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यातच भाजपमध्ये अंतर्गत दुफळी माजली होती. सौराष्ट्रचे केशुभाई पटेल, कच्छचे सुरेश मेहता व सुरतचे काशीराम राणा यासारखे मातब्बर नेते मोदींच्या विरोधात गेले होते. आरएसएस व विश्व हिंदू परिषद मोदींबद्दल नाखूष होते. पटेल व कोळी यांच्यात असंतोष खदखदत होता. त्यामुळे मोदींचे आसन डळमळीत झाले आहे. आता त्यावर जोरदार हल्ला चढविला, तर ते कोसळून पडेल, असे काँग्रेसचे आडाखे होते. त्याला अनुसरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांचे सुपुत्र राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, दिग्विजय सिंग, चिदंबरम अशा अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात हिरीरीने भाग घेतला. मोदींवर वैयक्तिक आरोप केले. 'मौत के सौदागर' अशी सोनियांनी त्यांची संभावना केली. भाकप महासचिव बर्धन यांनी मोदींना निवडणुकीसाठी उभे राहण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली, तर मोदींना फासावर चढविले पाहिजे, असे लालू प्रसाद यादव यांनी जाहीर वक्तव्य केले. परंतु या प्रयत्नांचा उलटाच परिणाम झाला. गुजरातेत त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली! प्रारंभीच्या प्रचारात विकासकाम व स्वच्छ, कुशल प्रशासन या दोन प्रमुख मुद्यांवर मोदींनी मते मागितली. अनेकांनी अशा मुद्यांवरून निवडणुका जिंकता येत नाहीत, असे मत व्यक्त केले. मागे बिहारच्या निवडणुका झाल्या, तेव्हा लालू प्रसाद यादव म्हणाले होते की, निवडणुकांचा व विकासाचा परस्पर संबंध नाही. आंध्र प्रदेशचे चंदाबाबू नायडू यांनी या मुद्यावर निवडणूक लढविली; परंतु त्यांचा दारुण पराभव झाला. मोदींचीही तशीच अवस्था होईल; परंतु टीकाकार हे विसरले की, नायडूंचा विकास कार्यक्रम व मोदींचा विकास कार्यक्रम यात बरीच तफावत होती. नायडूंनी केवळ आयटीवर भर दिला. ग्रामीण प्रदेश अवर्षणाच्या आगीत होरपळून निघत आहे याचा त्यांना विसर पडला. मोदींचा विकास कार्यक्रम अधिक व्यापक होता. उद्योजकांना उत्तेजन दिल्यामुळे शहरात समृद्धीचा झगमगाट तर झालाच, परंतु 'ज्योतिग्राम', 'सुजलाम् सुफलाम्'सारख्या योजनांमुळे ग्रामीण जनतेला पाणी, चोवीस तास वीज, रस्ते, चेक डॅम इत्यादींचा लाभ झाला. काँग्रेस नेत्यांनी त्यातील त्रुटींवर बोट ठेवले. परंतु ग्रामीण जनतेला वाटले की, आपल्या आवश्यक गरजा पुरविण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांना पुन्हा संधी द्यावी. विजेची चोरी केली म्हणून हजारो शेतकऱ्यांना मोदी प्रशासनाने दंडाची शिक्षा दिली. काहींना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली. त्याचा फायदा उठवायचा काँग्रेस टीकाकारांनी प्रयत्न केला. खरे तर वीजचोरी थांबविण्यासाठी अशा तऱ्हेची कारवाई सर्वच राज्य सरकारांनी करणे आवश्यक होते. कुशल प्रशासनाचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांनी अशा कृतीबद्दल राज्य सरकारचे समर्थन करायला हवे होते. परंतु निवडणुकीत लाभ उठविण्याच्या भरात पंतप्रधानांनी मोदींवर टीकाच केली. परंतु जनतेने अधिक वस्तुनिष्ठपणे विचार केला. मोदींना शिक्षा करण्याऐवजी शहरी मतदारांबरोबर ग्रामीण मतदारांनी मोदींना भरपूर पाठिंबा दिला. आपल्या लोकांना स्वच्छ व कुशल प्रशासन हवे असेल आणि लोकहितासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे, तर निवडणुकीतील तो एक महत्त्वाचा मुद्दा असायला हवा. आपल्या बहुतेक राजकारण्यांना तसे वाटत नाही. त्यांना वाटते की, खोटी आश्वासने देऊन जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकता येईल. बहुतेक मुख्यमंत्री केंदीय सरकारच्या कार्यक्रमासाठी केंदातून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न करतात. विकासाच्या योजना स्वतंत्रपणे आखून त्यांची कार्यवाही करावी, असे त्यांना वाटत नाही. अशा तऱ्हेचा नेटाने प्रयत्न करणारे मोदी हे एक मुख्यमंत्री होते. गुजराती जनतेने याला दाद दिली. विकास कार्यक्रम व स्वच्छ प्रशासन देताना जातीपातीला स्थान नव्हते. कुशल प्रशासनाचा एक पैलू म्हणजे सामाजिक सुरक्षा. अहमदाबादेत व अन्य शहरांत दंगे झाले नाहीत, र्कफ्यू पुकारावा लागला नाही, सामाजिक सुरक्षा लाभली व दैनंदिन जीवन सुरळीतपणे चालले. काही दंगलपीडित मुसलमानांनीही त्यामुळे आपले बस्तान बसविले असल्याचे सांगितले. २००२च्या कटू आठवणी विसरून नव्याने पुढे जाण्याची गुजराती मानसिकता झाल्याचे दिसते. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून मोदींना आरोपी करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मोदींविरुद्ध 'सेक्युलर' शक्ती एकवटल्या होत्या. परंतु त्या प्रभावी ठरल्या नाहीत. सेक्युलॅरिझमच्या नावाने धामिर्क आधारावर विकास योजनांची व निधीची 'फाळणी' करणे किंवा 'आरक्षण' देणे योग्य नव्हे. याविरुद्ध राष्ट्रीय विकास परिषदेच्या सभेत मोदींनी आवाज उठविला होता. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा आवाज अधिक बुलंद होईल. सेक्युलर मंडळींनी यावर विचार करणे आवश्यक आहे. काही काँग्रेस व अन्य पक्षांच्या राजकारण्यांनी मोदींचा नेत्रदीपक विजय भाजपश्रेष्ठींना धोकादायक ठरेल, ते वरचढ होतील, अशी चिंता व्यक्त केली आहे. खरे तर भाजपच्या भविष्याची चिंता करण्याऐवजी काँग्रेस पक्षाने स्वत:चे आत्मपरीक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशमध्ये आणि आता गुजरातमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी व त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही पक्षाला नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला याचे कारण काय? काँग्रेस पक्ष म्हणजे नेहरू-गांधी घराणे. केंदाच्या निवडणुका असोत किंवा राज्याच्या, त्याची सर्व धुरा त्यांनी सांभाळायची, जंगी सार्वजनिक सभांना उद्देशून भाषणे करायची, मुख्यमंत्री कोण हे त्यांनी ठरवायचे, राज्यातील नेतृत्व कायमचे खुजे ठेवायचे, हे इंदिरा गांधींनी तयार केलेले पक्षाचे स्वरूप व कार्यपद्धती आता काँग्रेस पक्षाला अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. असेच चालू राहिले, तर मायावती, मोदींसारखे नेते काँग्रेसच्या यशाची वाट अडवून ठेवतील. त्यामुळे प्रत्येक राज्यात निकोप स्थानिक संघटना व जनतेच्या मनात आदरणीय स्थान असलेले नेते उभे राहणे आता काँग्रेसला आवश्यक झाले आहे. परंतु काँग्रेसच्या दरबारी वातावरणात हे कितपत साध्य होईल? गुजरात निवडणुकीचा केंद सरकारवरही परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. गुजरातेत यश मिळाले असते, तर डाव्यांच्या अडवणुकीला कंटाळलेल्या काँग्रेसने मुदतपूर्व निवडणुकीचा विचार केला असता. परंतु आता तसे होईल असे वाटत नाही. काँग्रेस पक्ष, घटक पक्ष व डावे पक्ष एकमेकांना अधिक चिकटून सरकार टिकवून ठेवतील; परंतु काँग्रेस पक्षाचे स्थान अधिक कमकुवत होईल. सरकार धड चालविताही येत नाही किंवा निकालातही काढता येत नाही अशी चमत्कारिक अवस्था होईल. अशा सरकारला भारत-अमेरिका अणुकरार तडीस नेणेही कठीण जाईल.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|