|
Manjud
| |
| Friday, November 16, 2007 - 6:01 am: |
| 
|
ह्याच विषयावर रेखाचा (? मला नक्की माहीत नाही), एक पिक्चर आला होता ज्यामध्ये न्यायव्यवस्था असल्या गुन्हेगाराना काहीच करत नही किंवा करू शकत नाही हे पाहिल्यावर बलात्कारीत स्त्रिया आपल्या न्यायाने पुरुषाला शिक्षा, नुसतीच नव्हे, तर जन्माची शिक्षा करताना दाखवल्यात. मी पुन्हा एकदा माझा मुद्दा मांडतेय की मुलीनी आपली काळजी आपणच घेतली पाहीजे. प्रतिकार करायला शिकलं पाहीजे.
|
Princess
| |
| Friday, November 16, 2007 - 6:40 am: |
| 
|
मंजु, तुझ्या मुद्द्याला विरोध मुळीच नाही. मुलींनी काळजी घ्यायलाच हवी. पण काळजी घ्यायची म्हणजे नक्की करायचे काय?अगदी साध्या राहणार्या मुली, स्वत:ला जपणार्या मुली आजच्या जगात सुरक्षित आहेत का? बंगलोरमध्ये ज्या मुलीचा रेप झाला ती अगदी लाजाळु, अबोल होती असे पेपर मध्ये आले होते. तिला ओळखणार्या एक दोन लोकानी पण मला ती खुप अबोल आणि साधी भोळी होती हेच सांगितले. तिच्यावर रेप करणार्या ड्रायव्हरला त्यादिवशी कोणीही चालले असते (बलात्कारासाठी) हे त्याच्या मित्राने मेडियाला सांगितले. कारण त्याची बायको तीन महिन्यापासुन बाळंतपणासाठी माहेरी गेली होती आणि त्याच्या डोक्यावर वासनेचे भुत बसले होते. मला नाही वाटत की मुलीनी काळजी घेउन हा प्रश्न सुटणारा आहे. राहता राहिला प्रश्न प्रतिकाराचा तर मला हेच वाटते की प्रतिकार दिवसाढवळ्या गर्दीत छेडछाड करणार्याचा करता येतो. अंधार्या रात्री, सुनसान रस्त्यावर बलात्कार करणार्याचा नाही.
|
Maanus
| |
| Friday, November 16, 2007 - 9:41 pm: |
| 
|
रेखाचा एक पिक्चर खुन भरी मांग
|
Zakasrao
| |
| Saturday, November 17, 2007 - 4:30 am: |
| 
|
ह्याच विषयावर रेखाचा (? मला नक्की माहीत नाही), एक पिक्चर आला होता ज्यामध्ये न्यायव्यवस्था असल्या गुन्हेगाराना काहीच करत नही किंवा करू शकत नाही हे पाहिल्यावर बलात्कारीत स्त्रिया आपल्या न्यायाने पुरुषाला शिक्षा, नुसतीच नव्हे, तर जन्माची शिक्षा करताना दाखवल्यात>>>>>>>>>... मला वाटत तो डिंपल चा असावा. नाव आठवत नाहिये. पण अशा मुली ग्रुप करुन त्या बलात्कारी माणसाला परत जाळ्यात ओढुन त्याला गुंगीत घालवुन त्याच अस ऑपरेशन करत असतात की परत तो बायकोशी पण संग करणार नाही. मला वाटत की नन्दिनीने सांगितलेले उपाय बरेच फ़ायदेशीर आहेत. ते वाचा.
|
Manjud
| |
| Saturday, November 17, 2007 - 7:06 am: |
| 
|
झ, एक्झॅक्टली तोच पिक्चर. प्रिन्सेस, माझ्या ६ नोव्हेंबरच्या पोस्ट मी काही मुद्दे मांडलेत. तू सांग त्या बॅंगलोरच्या मुलीने ह्या गोष्टिंची काळजी घेतली असती तर हा प्रसंग घडण्याचे चान्सेस किती प्रमाणात कमी झाले असते? काळजी घ्या म्हणजेच सतर्क रहा, स्वत्:बद्दलही आणि आजूबाजूला घडणार्या प्रसंगातून योग्य तो बोध घ्या......
|
त्या चित्रपटाचे नाव "जख्मी औरत".सौ कपाडियाने police inspector ची भुमिका साकारली होती.
|
http://www.cnn.com/2007/WORLD/meast/11/17/saudi.rape.victim/index.html मुस्लिम धर्माचे जन्मस्थान आणि इस्लामचा केंद्रबिंदू असणार्या सौदी अरेबियात एका १९ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाला. आरोपींना १० महिने ते ५ वर्षे इतकी "जबर" शिक्षा झाली (जिथे क्षुल्लक गुन्ह्यालाही सार्वजनिक शिरच्छेद, हातपाय तोडणे अशा शिक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणात होतो तिथे बरं का). पण अहो आश्चर्यम्! त्या थोर शरियताधारी न्यायव्यवस्थेने त्या बलात्कारित कन्येलाही ९० चाबकांच्या फटक्याची शिक्षा सुनावली! का तर म्हणे ती ज्याच्याशी नाते नाही अशा पुरुषाला भेटली. तिच्या वकिलाने त्यावर अपील केले तर उलट न्यायव्यवस्थेवर आक्रमण केले म्हणून २०० चाबकाचे फटके व ६ महिने कैद अशी वाढीव शिक्षा. धन्य धन्य! सौदी अरेबियात म्हणे थेट महंमदाने जसे सांगितले तसे कायदे बनवले आहेत. असला धर्म शिरसावंद्य मानणारे स्त्रियांना कसे वागवत असतील बरे?
|
श्याऽऽऽ, असल्या देशात "स्त्री" म्हणुन जन्माला येण म्हणजे महाकर्मकठीण हे! होपलेस पिपल! त्या लिन्कवरच्या प्रतिक्रिया पण "वाचनीय" आहेत!
|
नमस्कार सर्वांना, मी नविनच आहे इथे. मी मागच्या तीन महिन्यांपासून GERMANY असल्यामुळे मायबोलीची साथ खुप मोलाची वाटली. हे सर्व वाचून मला इथे लिहिल्याशिवाय राहवले नाही तुम्ही कोणी 'द ब्रेडविनर' हे पुस्तक वाचले आहे का? (सत्यकथा आहे) काबुल मध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर पडता येत नसे.तर ती १४ वर्षांची मुलगी मुलगा बनून घर चालवते. रोज कोणी ओळखेल य भितीने जीव मुठीत घेवून. मी अगदी हादरुन गेले हे सगळे वाचून.
|
Anilbhai
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:19 pm: |
| 
|
ह्यावर एक मुव्ही सुधा आहे. 'The Osama' म्हणुन. अतिशय सुंदर अहे. खरच हादरुन जायला होत. खरच बघा.
|
Ldhule
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:44 pm: |
| 
|
भाई, मी बघितलाय 'The Osama' खरच एकदम stunning.
|
Akhi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:34 am: |
| 
|
'द ब्रेडविनर' चे ३ भाग आहे. 'शौझिया' आणि 'परवाना' खरच वाटत नाही, कि सध्याच्या जगात अस जगणारे लोक आहेत. आणि आपण आपल्याच दु:खाची टिमकी वाजवतो.
|
http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article§id=15&contentid=200711212007112102260643745ee46a1 आता बोला.. ... ...
|
Badbadi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 8:49 am: |
| 
|
इथे मूळ चर्चेचा विषय बाजूला राहून इतरच चालू झालंय असं नाही वाटत का?
|
मूळ चर्चेचा विषय जरी त्या मुलीची केस असला तरी बीपीओ कंपनीज घेत असलेल्या सुरक्षा प्रश्नाची देखील चर्चा इथे चालू आहे. म्हणूनच मी ती लिंक टाकली आहे.
|
Badbadi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 10:50 am: |
| 
|
अग नन्दिनी, तुला नव्हता ग तो मेसेज. तुझ्या आधी इथे जी चर्चा चालू आहे त्याबद्दल मी लिहिले ग! sorry for the confusion created!
|
Vachaa, http://www.msnbc.msn.com/id/22226173/ This is opposite. A women poured acid on her husband and killed him in US. Got life sentence. For the money. Moral of the story is bad elements are everywhere ... in women and in men ... equally.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|