|
Gsumit
| |
| Tuesday, October 30, 2007 - 8:25 pm: |
| 
|
आपल्या देशातल्या बहुपक्षीय पद्धतीमुळे आपल्या देशाच्या विकासाला खीळ बसतेय असे सगळ्यांनाच वाटत असणार... माझ्या /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=1018920#POST1018920 ह्या पोस्टवरुन मी हा थ्रेड उघडतोय... तुम्हाला काय वाटते... आपल्याकडेपण जर द्विपक्षिय पद्धत आणणे शक्य झाले तर आताच्या गलिच्छ राजकारणाला थोड्याफार प्रमाणात आळा बसेल की नाही? द्विपक्षिय पद्धतीत काही दोष असतील तर ते पण सांगु शकता... बघु काही उपाय निघतो का...
|
Zakki
| |
| Wednesday, October 31, 2007 - 11:31 am: |
| 
|
नविन पक्ष स्थापन करणे हा मूलभूत हक्क आहे. जोपर्यंत 'शिटांचे राजकारण' आहे, जोपर्यंत सत्ता म्हणजे अनिर्बंध शक्ति नि पैसा हे समीकरण आहे तोपर्यंत हा एक चांगला उपाय आहे. ज्या वेळी पक्ष म्हणजे काही सार्वजनिक कल्याणाचे मार्ग शोधणारे मूलभूत तत्वज्ञान, त्यासाठी करण्याचे ठाम उपाय, असलेली संस्था, असे होत नाही, जोपर्यंत त्या पक्षाचा उपयोग फक्त पैसे नि शक्ति याकरताच आहे, तोपर्यंत हे असेच चालायचे. इथे सुद्धा लोक पक्ष सोडून स्वतंत्र उमेदवार होऊ लागले आहेत. कारण त्यांना कळले की आपल्याला पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निवडून येता येते, तोपर्यंत आपण म्हणू ती जागा सरकारात आपल्याला मिळू शकते.
|
Gsumit
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:26 pm: |
| 
|
नविन पक्ष स्थापन करणे हा मूलभूत हक्क आहे>>> हो पण तो पक्ष उघडुन काही विधायक, कल्याणकारी काम होणार असेल तर चांगलेच आहे... पण आज पक्ष स्वताची राजकीय पॉवर दाखवण्यासाठिच उघडले जात आहेत अस दिसतय, कल्याणकारी तत्त्व जर म्हणली तर ती अशी किति आहेत की आपल्याला एवढे पक्ष लागतिल... आजकाल व्यक्तिगत मतभेद हे नविन पक्ष उघडण्यासाठीचे मुख्य कारण बनले आहे,ज्याचा तत्त्वांशी काहीही संबंध नाही... शरद पवारांचा राष्ट्रवादी अन राजची म. न. से.... सगळा एकच प्रकार... मला व्यक्तिश्: राजचे पटते, पण त्यासाठि नविन पक्ष... हेच जर सगळे बंद करुन मोजकेच पक्ष ठेवले तर, व्यक्तिगत राजकारणात अन निरर्थक चिखलफेकीत लोकांना रस रहाणार नाही, मग पर्यायानी (सर्वांगीण) विकासाला पण थोडी गती मिळेल...
|
Uday123
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:57 pm: |
| 
|
द्विपक्षीय राजकारण भारतात थोडे कठीन वाटते, पण जे भारंभार पक्ष आहे त्यांना काही प्रमाणात जरी आळा घालता आला तरी नसे थोडके. एका काही प्रमाणापेक्षा (जिंकून आलेल्या पेक्षा किवा एकंदर झालेल्या मतदानाच्या ८०%) कमी मतं मिळाले तर त्यांची राजकीय मान्यताच (निवडनुक आयोगाने) दहा वर्षासाठी रद्द करणे. मला अजुन एक गोष्ट खटकते आणी ती म्हणजे उदा: ब आणी अ हे निवडनुकीत ऊभे आहेत, ब हा अ पेक्षा सरस आहे. मग अ हाच (ब चे मते खाण्यासाठी) एक मुस्लीम, एक दलीत असे उभे करतो. त्यासाठी त्यांना पैसे/ मदत करतो, मग ब ला मते देण्यापेक्षा लोक आपल्या उमेदवाराला मते देतात. लायकी नसतांना अ आरामात निवडुन येतो. वयक्तिक 'एर्षे' अहंकार पोटी बहुतेक नवीन पक्ष निर्माण होतात हे चिड आणणारे आहे.
|
माझ्यामते भारतातील विविधतेमुळे अनेक पक्ष असणे बरे आहे. अनेक पक्षांमुळे निर्णय जरा धीम्या गतीनी घेतले जातात पण तरीही अनेक पक्ष असल्याने विविध प्रकारच्या लोकांचे प्रश्न मांडले जाऊ शकतात.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|