|
Slarti
| |
| Thursday, October 25, 2007 - 1:58 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जयमहाराष्ट्र, तुम्ही केलेल्या उपायात तुम्हाला सेनेच्या नगरसेवकाला लालूच दाखवावीच लागली ना ? 'चांगल्या सामाजिक प्रकल्पासाठी जागा द्यायची' हे तुमचे आधीपासून ठरले नव्हते असा माझा ग्रह झाला, चू.भू.द्या.घ्या.... म्हणजे शत्रूला सांगायचे "तू तलवार चालवू नको, मी माझ्या 'मित्रा'कडून सुरा खुपसून घेतो"... हा उपाय होऊ शकतो का ? हा निर्भीडपणा म्हणता येईल का ? इथे विरोधी राजकीय पक्षाकडे जाणे असा उपाय सुचवण्यात आला आहे... मुळात इथे आपण आपल्या न्याय्य हक्कांविषयी बोलत आहोत. ते कुठल्याही राजकीय विचारप्रणालीवर अवलंबून नाहीत. आपली बाजू घेऊन कुठलाही राजकीय पक्ष आपल्यावर उपकार करत नाही, आपण मात्र अशा तत्वतः अराजकीय गोष्टींसाठी त्यांच्याकडे जाऊन स्वतःला त्यांच्या उपकारात अडकवून घेतो. "जे माझे आहे ते 'माझे आहे' म्हणून मला मिळायला पाहिजे." ते विरोधी राजकीय पक्षाकडे गेलो म्हणून मला मिळाले तर राजकीय रंग देण्यास मीच कारणीभूत होतो. तसे केले तर त्याला कोठलेही सत्याचे, न्यायाचे परिमाण न लाभता तो केवळ सूडाचा प्रवास होतो. शिवाय त्यातून अतिशय अयोग्य प्रथा सुरू होण्यास मदत होते. या कारणांमुळे 'विरोधी पक्षाकडे जाणे' या उपायावर सखोल विचार व्हावा.
|
Itgirl
| |
| Thursday, October 25, 2007 - 2:15 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खरय स्लार्टी. जर विरोधी पक्षनेते ओळखीचे नसते, आणि घरात राजकीय पार्श्वभूमी नसती तर? मग काय केले किंवा झाले असते? इतक्या शांतपणे (?) प्रश्न सुटला असता का?? मुळात राजकीय वजन वापरूनच तर दादागिरी होत आहे, आणि तीच प्रवृत्ती तर उखडून काढायची आहे, आणि काढायला हवी. एक पुढार्याविरुद्ध दुसर्याकडे गेले तर प्रश्न कसे सुटतील? फ़ार तर तात्पुरते सुटल्यासारखे वाटतील, पुन्हा नवीन रुप घेतीलच ना?
|
चांगल्यात पण वाईटच शोधायचे ही वृत्ती काहि जायची नाहि! हेच खरे! आणि कुलकर्णी मला हिन्दुत्ववाद्यांचे गोडवे गाण्यात अजिबात लाज वाट नाही.कारण मी माझ्या धर्माला मानते.बासनात गुंडाळुन नाही ठेवलेला मी तुमच्यासारखा. स्लार्टि,आयटिगर्ल फ़क्त विरोधा साठी विरोध करण्याची वृत्ती बरी नव्हे. मला ती जागा सेनेच्या नगरसेवकाला विकता देखिल आली असती आणि त्या जागेची किंमत निदान अर्धा करोड तरी असायला हरकत नाही.पण तसे न करता मी एका चांगल्या प्रकल्पासाठी ती जागा देण्याचे आश्वासन दिले त्यात गैर ते काय आहे?आणि हे सगळे घडवुन आणायला मला त्या नगरसेवकाने भाग नाही पाडले अथवा त्याच्यासाठी कुठला मोबदला नाही मागितला हे देखिल लक्षात ठेवुन वाखाणण्यासारखे नाहि का?मी मदत घेताना राष्ट्रवादीची देखिल घेवु शकल असते पण त्यांची मदत घेवुन मला जे साध्य करायचे होते ते झाले असतेच याचि शाश्वती निदान मला तरी नव्हती................ ,याला कारण फ़क्त माझे वडील सेनेशी निगडित होते हे नसुन आमच्या विभागातिल चांगल्या प्रकल्पात राष्ट्रवादिच्या नगरसेवकांनी कसा खोडा घातला होता. हि वस्तुथिति मी नाकारु शकत नव्हते.म्हणुन माझ्या सद्सदविवेकबुद्धीला जे पटले तेच मी केले. आणि प्रकल्पासाठी जरी जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्यावर एका स्वयंसेवीसंस्थेशी बोलुन त्यांना हा प्रकल्प उभारण्यास आपल्या नगरसेवक निधितुन निधि उपलब्ध करुन देण्याचे औदार्य त्या नगरसेवकाने दाखवले हे देखिल स्तुत्यच नव्हे काय? पण हिंदुद्वेषाची काविळ झालेल्यांना हे कुठे समजायला? या बिबिवर अनुभव पोस्ट करताना निदान मी तरि कुठेही आधिच्या पोस्ट्मधे "हिंदु" या शब्दाच उल्लेख केलेला नाहि.पण कुलकर्णी सारख्यांनी या शब्दाचा इतका धसका घेतला आहे कि त्यांची अवस्था मोगलांसारखी झाली आहे मोगलसेनेच्या घोड्यांना पाणी पिताना देखिल संताजी धनाजी हे महाराजांचे मावळे दिसत. कुलकर्णी आपल्या विचारसरणीत कुठलाही बदल होइल अशी आशा आणि अपेक्षा मुळीच नाही.या पुढे माझ्याशी कृपया वाद घालु नये. हि नम्र विनंति. चु भु द्या घ्या! ता क..... ती व्यक्ती नगरसेवक नसुन नगरसेविका आहे हे इथे मुद्दम नमुद करतेय. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
>>इतका धसका घेतला आहे कि त्यांची अवस्था मोगलांसारखी झाली आहे हा हा हा.. आवडल... पण स्लार्ती आणि आयटी तुमच्यावर आरोप करत आहेत अस वाटत नाही. फ़क्त वस्तुस्थिती दर्शवत आहेत. कुठल्याही दुसर्या काट्याचा उपयोग न होता पहील्या काट्याचा काटा काढला गेला पाहीजे. (अर्थात, ते होणे नाही. ते रामराज्य होईल. if Ram really existed )
|
Itgirl
| |
| Thursday, October 25, 2007 - 4:22 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रज्ञाताई, तुमच्यावर मी काहीच आरोप केले नाहियेत, आणि स्लार्टींनीही केलेत असे वाटत नाही. विरोधासाठी विरोध तर नक्कीच नाही. तुमच्या पोस्टमधेच तुम्ही म्हणताय की मी भांबावून गेले. थोडेफ़ार राजकीय संबंध, घरात राजकीय पार्श्वभूमी, तरीही तुम्हाला असे वाटावे, तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांची काय अवस्था होत असेल? याचा विचार कराल का? मुळात एक काट्यासाठी दुसरा काटाच वापरावा लागतो, हे चुकीचे नाही का वाटत? कायदा आणि त्याची भिती ही राहिलेलीच नाही, हे दुखणे आहे. तुम्ही पण कायद्याकडे का नाही गेलात? समजा, जर असे काही झाले नसते तरीही तुम्ही ती जागा अश्या प्रकल्पासाठी देणार होतात का? का आता ही जागा अश्या प्रकल्पासाठी देणे हे अधिक सोयीस्कर आहे म्हणून दिलेली आहे? याचा काही खुलासा होईल तर बरे. अर्थात, आग्रह नाहीच. कारण ते इथे काही महत्वाचे नाही. प्रत्येकालाच राजकीय नेत्याचा पाठिंबा मिळेलच असे नाही. सामान्य माणसाच्या मनात राजकीय नेत्याकडे जायची कल्पना ही फ़ारशी येणार नाही, कारण कुंपणच शेत खाईल ही भिती असते त्यामागे.
|
Slarti
| |
| Thursday, October 25, 2007 - 6:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कुत्रा चावणे, जमीन बळकावणे हे एका गहिर्या issue चे instances आहेत. माझा रोख instances कडे नसून issue कडे आहे.
|
आयटिगर्ल तुझा मुद्दा मान्य! मला राजकिय पार्श्वभुमी होती हे जरी खरे असले तरी त्याचा वापर मी अथवा हयात असताना माझ्या वडीलांनी स्वतच्या स्वार्था साठी कधिही केला नाही. वडीलांच्या अचानक निधनाने मी भांबावुन गेले होते आणि त्यातच जागेच्या बाबतित जे प्रकार घडले त्यानंतर मला मार्ग सापडत नव्ह्ता हे जरी मान्य असले.तरीही वडिलांच्या निधनानंतर त्या जागेचा वापर एखाद्या सामाजिक कार्या साठी करायचा या बद्दलचा माझा विचार पक्का झाला होताच.फ़क्त या घडामोडी इतक्या त्वरित घडतिल अशी अपेक्षा नव्हती.प्रतिकुल परिस्थितित आणि इतक्या कमी कालावधित अश्या प्रकारचे निर्णय घेणे तुझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला खरच शक्य नसते. कायदा माझ्या बाजुनेच होता पण त्यासाठी घरातिल इतर व्यक्तिंचा पाठिंबा देखिल फ़ार महत्वाचा होता. आणि कायद्याचे म्हणशील. तर तो कधि कुणाच्या बाजुने झुकेल याचा भरवसा कोण देणार?त्यातुन मी एकटी बाई नवरा नोकरीनिमित्त देशाबाहेर अश्या विपरित परिस्थितित विधवा आई आणि माझ्या मुलांना घेवुन कुणाकडे जाणार होते? अश्या वेळेला नातेवाइक असुन नसल्यासारखे असतात. आणि जितकी माणसे तितकी भिन्न मते. नातेवाईकांच्या मते मी जागा विकुन टाकुन जास्तीजास्त स्वतःचा आर्थिक फ़ायदा करुन घेणे जास्त सोयिस्कर होते. आणि जे मला व माझ्या आईला मान्य नव्हते. अश्या परिस्थितित मला हा एक पर्याय उपलब्ध आहे असे वाटले आणि म्हणुनच मी हा निर्णय घेतला. आज त्या जागेत जो प्रकल्प उभा राहिल त्याला माझ्या दिवंगत वडिलांचे नाव देण्यात येणार आहे अश्या प्रकारे माझ्या वडीलांचे नाव स्थानिक लोकांच्या कायम स्मरणात राहिल मला ह्यातच आनंद आहे.या साठी कुणि मला स्वार्थि म्हंटले तरी हरकत नाही. तुम्ही कुणीही माझ्या लिखाणामुळे दुखावला गेला असाल तर क्षमस्व. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Zakki
| |
| Thursday, October 25, 2007 - 11:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
राजकीय पार्श्वभूमि करायला सोप्पा उपाय म्हणजे कुणाला तरी बक्कळ देणगी देणे! जगात कुठेहि हाच उपाय असतो नि चालतो. त्यापेक्षा विवेकानंदासारखे ताकतवान बना नि दुसर्या दिवशी पाळत ठेऊन त्याला पकडा, नि त्याला जाब विचारा. नि तो पुन: असे काही करणार नाही याची 'व्यवस्था' करा! भारतातच काय, जगात कुठेहि पोलिस, नि राजकारणी हे भरवंशाचे नाहीत. बळी तो कान पिळी हाच कायदा. कधी कधी शारीरिक बलाच्या जागी सत्तेचे, पैशाचे, किंवा समाजाचे बळ उपयोगी पडते. यातील काही ना काहीतरी तुमच्याकडे नसेल, तर Survival of the fittest हे तुमच्या लवकर लक्षात येईल.
|
>>> विषय कोणताही असो, तुम्ही हिन्दुत्ववादाचे घोडे दामटणारच. हिंदुत्ववादाचा असला तरी तो घोडा आहे. तुमच्यासारखा निधर्मीवादी गाढवपणा तर नाही ना? राज्यकर्त्यांनी कितीही जुलूम केला आणि नागरिकांना कितीही त्रास दिला तरी ते परत परत का निवडून येतात हे कुलकर्ण्यांच्या उदाहरणावरून सहज समजण्यासारखे आहे.
|
Zakki
| |
| Friday, October 26, 2007 - 2:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अर्रेच्च्या! इथे घोडा नि गाढव कुठून आले? विजयना मी उत्तर दिले आहे. बघा जरा वरती, नुकत्याच Archive झालेल्या लिखाणात.
|
माढेकर,तमीळ लोकांबद्दल असे सांगु इच्छितो की त्यांना हिंदु धर्माबद्दल अजिबात अभिमान नाही. करुणानिधीनी मागे एकदा (बर्याच वर्षांपुर्वी) म्हटले होते की हिंदु या शब्दाचा अर्थ चोर असा आहे. माझ्या एका तमीळ मित्राला विचारले तुम्ही अस ऐकुन कसे घेता तर तो म्हणाला ' tamils don't know that they r hindus '. त्यांच्याकडे जातीविरुध्द काहिही बोलले जात नाही. बोलल्यास दंगली होतात आणि ब्राह्मणांविरुध्द मात्र मनसोक्त शिव्या दिल्या जातात. पेरियार वगैरे द्रविडी नेत्यांनी असे सांगितले आहे की द्रविड्स हे हिंदु नाहितच. तमिलनाडुत येत्या काही दशकात ख्रिश्चन धर्मियांची मेजॉरिटी होणार आहे. हे लोक अतिशय विचित्र आहेत. ते नंतर माझ्यामते हिंदु मंदिरेही पाडतिल.
|
Suyog_11
| |
| Saturday, October 27, 2007 - 5:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला वाटते आहे की आपण विषयापासुन दुर जात आहोत. इथे आपण एका राजकीय नेत्याच्या माजोरी पणाबद्दल बोलत आहोत. मी याआधी जे काही म्हणालो "बंड, निवेदन वगैरे ते स्वतच्या अनुभववरुन म्हणालो होतो." २००५ साली बंगलोर मध्धे असताना माझा मोबाइल चोरी ला गेला तो पण दोन महीन्यात दोन मोबाइल माझ्या रूम मधून चोरीला गेले. मी पोलिसांकडे गेल्यावर त्यांनी माझी एफ़. आय. आर. नोंदवन्याचे सोडून मला व माझ्या मित्रांची उलट तपासणी करुन आम्हाला हकलून दिले. तेव्हा मी त्या सर्व त्रासाला कंटाळुन पोलिस कमिशनर, राज्याचे आय. जी. आणि त्या पोलिस ठाण्याचा एस. पी. यांना रजिस्टर पोस्टाने एक पत्र पाठवले. दोन दिवसांनी पोलिस स्वता माझ्या घरी एफ़. आय. आर. नोंदवुन घेण्यासाठी आले. आता तुमीच सांगा या राजकीय नेत्याला आपण धडा नाही का शिकवु शकणार?
|
राजकीय नेते अथवा दुसरं कुणीही असो मुजोरीपणा चालवू देणार का? हा प्रश्न आहे. आणि तो मुजोरीपणा पाडण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता ते ही तितकेच महत्वाचे. थोडक्यात मोठे मासे छोटे मासे हा प्रश्न आहे. पण तुम्ही मोठे मासे होऊन छोट्या माशाना गिळायचं की डोल्फिन व्हायचं हे ही स्वत्:लाच ठरवायला लागतं. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मी अनेक राजकीय नेत्याच्या संपर्कात आहे. राजकारण हे क्षेत्रच असे आहे की जिथे विश्वास नावाची गोष्ट नसतेत. याला वाटल्यास त्याचा occupational hazard म्हणा. आतापर्यंत मी माझ्या नेत्याच्या ओळखीचा एकदाही आतापर्यंत उपयोग केलेला नाही. कारण मग त्याच्या उपकाराचं ओझं नकोसं होतं. बर्याचदा आपण एक बाब विसरतो की कायद्याने पण न्याय मिळू शकतो. मात्र त्याला वेळ लागतो म्हणून शॉर्टकट मारायचा प्रयत्न होतो जो आपल्याच जीवाशी येतो. सध्या मीडीया तेजीत आहे. कुणावरही चिखलफ़ेक करण्याच्या या दिवसात आपली समस्य पटकन लोकासमोर येऊ शकते. अर्थात मीडीया हे दुधारी शस्त्र आहे त्यामुळे ते सांभाळूनच वापरावे लागते. नाहीतर लोकाची भान्गड उघड करता करता आपली भानगड बाहेर यायची. राजकीय नेत्याना माज येतो त्याला काही अंशी आपण जबाबदार आहोत. कुणाच्या जीवावर हे लोक मोठे होतात? कुणाच्या जोरावर याची मुजोरी वाढते? आपण राजकीय व्यवस्थेचा लोकशाहीचा वापर करत नाही म्हणून. कितीजण मत देतात? कितीजणाना माहीत असतं की त्याचा खासदार आमदार कोण आहे? त्याचे शिक्षण काय? त्याचा उपजीविकेचा मार्ग काय? किती जण आपल्या हक्काबाबत जागरूक असतात. कितीजणाना आपली कर्तव्ये माहीत असतात. हल्ली प्रत्येक प्रश्न देश धर्म राज्य भाषा या पातळीवर आणुन ठेवला जातोय. पण यामधे नुकसान कुणाचं आहे? कर्नाटकच्या नेत्याला आपण शिव्या घालायच्या आणि त्याच्या राजधानीत नोकरी करायची. मग तुमची मुलं वाढणार ती कर्नाटकातच ना? घरात मराठी बाणा. बाहेर कानडी बाणा यातून कुणाला identity crisis निर्माण होऊ शकतो. याचा विचार केला गेला आहे का? (हे फ़क्त एक उदाहरण दिलय) आज आंतर जातीय आंतर धर्मीय विवाह सर्रास होतात. त्याच्या मुलाना आपण काय शिकवणार? जयमहाराष्ट्र तुमच्या केसमधे जर तुम्ही वडीलाच्या मृत्युपश्चात जागा ज्याच्या मालकीची होते (तुमची आई तुम्ही अथवा अन्य कुणी.) त्याच्यामार्फ़त न्यायालयाकडून एक नोटीस आणली असतीत (ही जागा खाजगी मालकीची असून अधिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करता येईल) अशी नोटीस लावली असतीत तर कुणीही तिथे येऊ सुद्धा शकले नसते. गटारीच्या संग्दर्भात तुम्हाला जनहित याचिका दाखल करता आली असती. त्या संबंधित नेत्याला भेटून इथे मला "समाजोपयोगी प्रकल्प" उभा करायचा आहे मला मदत करा असे निवेदन देता आले असते. (या निवेदनाची कॉपी त्याच्या वरच्या नेत्याकडे पाठवता आली असती). त्याचा राजकीय फ़ायदा यात असल्यामुळे तिथे नक्कीच मदत मिळाली असती. तुमच्या वडीलानी तिथे झाडे लावलेली असल्यामुळे पर्यवरण वादी एखादी NGO तुमच्या मफ़्दतीला आली असती. किंवा स्थानिक लोकाना देखील तुम्ही यात सामिल करू शकला असतात. पण त्या ऐवजी तुम्ही दुसर्या एका राजक्लीय नेत्याकडे गेलात उद्या जर त्या नगरसेविकेने पक्ष बदलला आणी ती रीपब्लिकन मधे गेली तर...... तुम्ही जागा ऑलरेडी दिली आहे. कुनाच्या नावावर केली याचा उल्लेख तुम्ही केलेला नाही पण तरीही... मग तुम्ही कसा न्याय मागणार? (एक वि सू.. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. पण या आधी मी असे उपद्व्याप बरेच केले आहेत त्यामुळे स्वानुभवाने सांगते. कायदा समजून घ्यायचा आणि मगच कायद्याच्या मार्गाने जायचे. ) माणूस, तुमचा मार्ग मला मनापासून आवडला. (कायcयाच्या चौकटीतलाच आहे. अपमानासारखं दुसरं विSः नसतं.)
|
Itgirl
| |
| Sunday, October 28, 2007 - 4:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आजकालच्या राज्यकर्त्यांना मान अपमान यासारख्या भावना ऐकून तरी माहीत आहेत का? त्यासाठी जनाची नसली तरी मनाची तरी लाज असायला लागते. लाज कोळून प्यालेली ही माणसं, त्यांना काही फ़रक पडेल अपमान झाल्याने? उलट प्रसिद्धीची संधी म्हणून वापरतील, स्वत:वरच अन्याय झाल्याचे नकाश्रू गाळतील अन त्यातूनही भरपूर स्वार्थ साधून घेतील.
|
Uday123
| |
| Sunday, October 28, 2007 - 4:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्यांना काही फ़रक पडेल अपमान झाल्याने? जनते वरील अमाप प्रेमापोटी ते हा अपमानही पचवतील. जनतेची सेवा (पिळवणुक !) अविरत करीत रहाणे हाच त्यांचा धर्म, आणी तो ते मरेपर्यन्त सोडणार नाहीत.
|
Chyayla
| |
| Tuesday, October 30, 2007 - 9:41 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बर्याचदा आपण एक बाब विसरतो की कायद्याने पण न्याय मिळू शकतो न्याय आणि कायदा यांचा सम्बंध पुर्णपणे लावणे धाडसाचे ठरेल. कायदा ज्याला वाकवता येईल त्याला न्याय मिळेल. शिवाय प्रत्येकाला ते जमतच असे नाही त्यामुळे तु म्हणते तसा शोर्टकट मारल्या जातो कारण कायद्यावर तेवढा विश्वास नाही. शिवाय पैसा, वेळ याचा अपव्यय होणारी मानसिक ओढाताण यापेक्षा नको ती कोर्टाची पायरी. असाच सर्वसामान्य लोकांचा अनुभव आहे. शिवाय प्रत्येक वेळी न्याय जरी आपल्या बाजुने असला तरी कायदा आपल्या बाजुने असेल हे सांगता येत नाही, त्यासाठी प्रदिर्घ लढा देउन कायदा बनवायला भाग पाडायला वेळ कुणाजवळ आहे.. असो हे माझे कायदा व न्याय यावरील आजच्या परिस्थितीवरुन दिलेले मत आहे. जयमहाराष्ट्रला हा सगळा त्रास न होता मनाप्रमाणे त्या जागेचा सदुपयोग करता आला यातच सगळ आले. काट्याने काटा काढणे यातही शहाणपणा आहेच.
|
Uday123
| |
| Friday, March 28, 2008 - 1:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
http://esakal.com/esakal/03282008/PuneC4742AB779.htm नियम फ़क्त सामान्य जनांसाठी, रस्ते यांच्याच मालकीचा आहे. सर्व सार्वजनीक व्यावस्था अक्षरश: ओलीस धरली आहे. एका नियम पाळणार्या व्यक्तिस दोन तास वाया घालावावे लागले याची ना लाज, ना शरम आणि म्हणे आम्ही लोकप्रतिनिधी.
|
लालूप्रसादांची शिकवण.बिहार्यांचा प्रगत महाराष्ट्रियांवर वाईट्ट प्रभाव
|
Zakki
| |
| Friday, March 28, 2008 - 2:56 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्या प्राध्यापक बाईची काळजी घ्या! सरकारनामा चित्रपट पाहिलात ना? त्यांचा 'सत्कार' होऊ देऊ नका! जनतेची सेवा (पिळवणुक !) अविरत करीत रहाणे हाच त्यांचा धर्म, आणी तो ते मरेपर्यन्त सोडणार नाहीत. असे वर म्हंटलेच आहे! नगरसेवक निर्लज्ज, पोलीस लाचखाऊ, नि जनता म्हणजे शेळपट मेंढरे! 'अमुचा भारत महान!'
|
अहो झक्की असे कसे बरें!! हा महाराष्ट्र आहे-अत्यन्त कायदेप्रिय "राज"-य असलेला-बिशाद आहे त्या बाईंच्या नखाला बोट लावायची- अर्थात एवढ्यात सवयी बदलल्यात हो-वाईट्ट संगतीने
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|