Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 12, 2007

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through October 12, 2007 « Previous Next »

Manjud
Saturday, October 06, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसी साळवीला आपण मराठी आहोत आणि मराठित काहितरी काम केले पाहिजे ह्याची अचानक आठवण होते. तिचे ते हिंदाळलेले मरठि ऐकायचा अगदि कंटाळा येतो. तिची एक 'नूपूर' म्हणून मालिका यायची. त्यात तर ती (बहुतेक) समीर धर्माधिकारीसारखा हिरो असूनही अगदिच ठोकळा होती. आता बारीक झालीये आणि मराठि पण सुधारलंय पण तरिही ती बोअर करते. मी असंभव बघत नाही त्यामुळे ती गेली काय आणि राहिली काय.....

Santu
Saturday, October 06, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली
अरे देवा तु इथे पण
मेलो आता.

तशी उर्मिला आता बरी वाटतेय
पण आमच्या मानसीला काय म्हणु नको बर का?


Mansmi18
Sunday, October 07, 2007 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही नवी शुभ्रा ग्रेसफ़ुल? you are kidding me?

ती कथक डान्सर आहे.. असेल!! who cares??

दिसायला अगदी सुमार आणि अभिनयाच्या बाबतीत आपल्याला काही खास दिसले नाही. उगाच कोणावर टीका करायची म्हणुन ठोकळा वगैरे म्हणणे आपल्याला पटत नाही.

मानसीला परत आणा रे!:-)


Ajjuka
Sunday, October 07, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

| उगाच कोणावर टीका करायची म्हणुन ठोकळा वगैरे म्हणणे आपल्याला पटत नाही. |
नसेल पटत who cares!
आम्हाला वाटते मानसी साळवी ठोकळा... आम्ही तसंच म्हणणार!!


Mansmi18
Sunday, October 07, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सगळ्या महिला मंडळाला शुभ्रा बदलल्याचा आनंद झालेला दिसतो. पुरुष मंडळीत दु:ख झालेला मी एकटाच की काय?:-)

Maanus
Sunday, October 07, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३. "तु कोण?" किवा "का म्हणुन?"
माजाबाबत जे अनेक गैरसमज आहेत त्यात - "माज हा नेहमी स्वतःबद्दलच्या काहीतरी समजातुनच असतो" - असाही एक प्रसिद्ध गैरसमज आहे. त्याला या प्रकारात मोडणारी माणसे खोटं ठरवतात.
या लोकांची ओळख म्हणजे त्याना "अमुक अमुक कर" असं सांगितलं तर "तु कोण मला सांगणारा?" किंवा "का म्हणुन मी असं करु?" असं उत्तर मिळतं. त्यांचं वर्तन "मी म्हणजे कोण!" किंवा "मला असं वाटतं" याऐवजी "तो मला सांगणारा कोण? मी का असं करायचं" या विचारांनी प्रेरित असतं. अशा वागण्याला अनेकदा तुसडेपणा किंवा खडुसपणा म्हटलं जातं.


तर इथे कुणाचीच काही चुकी नाहीय :-)

संदर्भ्:
तेथे पाहिजे जातीचे

Itgirl
Sunday, October 07, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडत्या मालिकांच्या बी बी वर हे रे काय मधेच माणसा? :-)

Savyasachi
Monday, October 08, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसाला हा बाफ़ बंद पाडायचा असेल :-)

Mansmi18
Monday, October 08, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाफ़ म्हणज़े काय हो?

Savyasachi
Monday, October 08, 2007 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बातमी फ़लक असा अर्थ

Badbadi
Tuesday, October 09, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया फ हे अक्षर pha असे लिहावे... f नाही!!

Dhanu66
Wednesday, October 10, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसेच कळत नकळत मध्येही रुतुजा देशमुख शोभत नाही. एकतर तिचा आवाज खरखरीत आहे, आणी ती मोठी दिसते.

Cutepraju
Wednesday, October 10, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम बरोबर....कळत नकळत मधे त्याच शिर्षकगीत सोडल तर बाकि एकदम पकाउ वाटते मालिका..............
असंभव मधे मानसी साळवी पेक्षा उर्मिला कानेटकर जास्ती शोभुन दीसते...
ps : How 2 write Rutuja in Devnagari?


Arun
Wednesday, October 10, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसेच कळत नकळत मध्येही रुतुजा देशमुख शोभत नाही. एकतर तिचा आवाज खरखरीत आहे, आणी ती मोठी दिसते. >>>>> आणि मूर्तीमंत माठ सुद्धा ....... :-)

ऋतुजा असं लिहायचं : Rutuja ..... :-)



Ajjuka
Wednesday, October 10, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती ऋतुजा नसून ऋजुता आहे.

Psg
Thursday, October 11, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋजुता शोभत नाही? किती लहान दिसते. मला आवडते ती.

सुनील बर्वेला 'लग्नाळू' मुलाचं character देणं यासारखा जोक नाही! सुबोध भावे मस्त अभिनय करतो. आणि तो 'गौरव' पण :-)


Cutepraju
Thursday, October 11, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याच्या मराठी कलाकारा मधे अनिकेत विश्वासराव (कळत नकळत मधला गौरव) एकदम चान्गला वाटतो अभिनेता म्हणुन... आणि उमेश कामत सुद्धा...मस्त अभिनय आहे दोघान्चा.

Giriraj
Thursday, October 11, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कुणी Etv वरच्या मालिका नाही का पहात. आमच्या घरात ७.३० पासून ते ९ पर्यन्त रिमोटला हात लावायची बंदी आहे. 'या गोजिरवाण्या घरात' मी पूर्वी पहात असे. आता पुन्हा कधी मधी बघतो. त्यात शेखरचे एका अनिवासी भारतिय मुलीबरोबर सूत जुळत होते. पण सध्या त्याची बायको म्हणून जी आहे ती खूपच सोज्वळ वगैरे आहे. तिचेही नाव मधुरा असेच आहे तामुळे जुनी मधुरा अभिनेत्री बदलल्याने अचानक मवाळ कशी झाली ते कळले नाही. तसेच पारसची बायको (बहुतेक) गोड अशि कादांबरी कदम होती आणि सध्या वेगळीच कुणी आहे. हा घोळ कुणाला उलगडून सांगता येईल का?

Dhanu66
Thursday, October 11, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी ती हर्षदा खानविलकर हॉरीबल. सगळ्या खलनायीका अशाच असाव्यात का?

Manjud
Friday, October 12, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनील बर्वेला 'लग्नाळू' मुलाचं character देणं यासारखा जोक नाही!

खरंय पूनम, पण तो तरी अश्या भूमिका का स्विकारतो? तो चांगला दिसत असला तरी आता पंचविशीतला नक्कीच दिसत नाही. त्याची एक शिल्पा तुळस्करबरोबर एक सिरीयल होती. नाव विसरले मी पण मला फार आवडायची. त्यात खूप सुंदर अभिनय केला होता दोघानीही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators