Abhi_
| |
| Tuesday, September 11, 2007 - 5:10 am: |
| 
|
manasmi , मधुवंती बोरगांवकर ची शास्त्रीय संगीताची बैठक खूप छान आहे. तसेच तिच्या आवाजाला एक वेगळीच जवार आहे. ती versatile singer वाटत नाही कारण तिच्या आवाजात लवचीकपण थोडा कमी आहे, huskiness जास्त आहे. पण तिच्या गाण्यात एक चांगला "स्वरानुभव" देण्याची क्षमता नक्की आहे. कालच पुण्यात टिळक स्मारकला "बोरगांवकर" कुटुंबियांचा एक कार्यक्रम झाला त्यामध्ये ती छान गायली. (कदाचीत कालच्या स्टेजवर स्पर्धेचे दडपण नसल्याने किंवा सोबत सर्व कुटुंबीय असल्याने जी सहजता होती ती "सा रे गा म" च्या स्टेज वर दिसत नाही असं मला वाटलं.) पण एक "स्पर्धा" म्हणून विचार केल्यास तुम्ही म्हणताय ते सुद्धा पटले.. तिने ते गाणे उत्तम सादर केले परंतू त्यादिवशी देखिल तिचा आवाज नीट लागला नव्हता.. पण ती सुरांना कमी पडली नाही आणि त्या गाण्यातला भाव तिने व्यवस्थित पोचवला.. आदल्या दिवशी तिला खूपच कमी मार्क्स होते आणि कदाचीत ती एलीमिनेट होऊ नये म्हणून तिला "नी" दिले असं वाटतं. तिचा तो performance "प" गुण मिळवण्या इतपत होता असं माझं वैयक्तीक मत आहे.
|
Mansmi18
| |
| Tuesday, September 11, 2007 - 1:34 pm: |
| 
|
अभि, तुम्ही अगदी बरोबर म्हटलेय. ती कदाचित चांगली असेलही परंतु त्या दिवशीचे तिचे performance उत्क्रुष्ट नक्कीच नव्हते. हे म्हणजे एखाद्या हुशार विद्यार्थ्याने पेपर नीट न सोडवता गुरुजीनी त्याला तो हुशार आहे म्हणुन १०० पैकि ९० गुण दिल्यासारखे आहे. परीक्षकानी objectivity सोडता कामा नये. गुण हे त्या दिवशीच्या performance based असावेत. जर त्या दिवशी तुम्हाला सर्दी झाली, आवाज बसला! .. tough luck!
|
Aditi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 12:17 pm: |
| 
|
माझेही अगदी हेच मत झाले होते मधुवन्तीच्या गाण्याबद्दल. पण परिक्षक ज्या अर्थी तिची इतकी तारीफ करताहेत त्या अर्थी असेल हि तिच्या आवाजाची मुळ बैठक खूप स्ट्रॉन्ग...पण तरीही तिला झुकते माप मिळाले आणि मिळते आहे असे माझेही मत झाले आहे. लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या परिक्षकांनी हे असे नाही केले तर बरे होईल कारण हा कार्यक्रम हा एक आदर्श स्पर्धेचा नमुना आहे
|
Mansmi18
| |
| Wednesday, September 19, 2007 - 5:36 pm: |
| 
|
कुठली मालिका सम्पणार आहे? एका नवीन मालिकेची जहिरात सुरु आहे सध्या...ती आलि तर कुठल्यातरी एका मालिकेचा पत्ता कट?
|
Psg
| |
| Thursday, September 20, 2007 - 6:58 am: |
| 
|
अधुरी एक कहाणी एकदाची पूर्णत्वास गेली तर काय बरं होईल! पण काही अंदाज येत नाहीये खरं. अभिलाषा तर नुकतीच सुरु झाली आहे. बाकी सगळ्या भक्कमपणे पाय रोवून आहेत. कोणती संपणार आहे काय माहीत!
|
Dhanu66
| |
| Saturday, September 22, 2007 - 1:55 pm: |
| 
|
होय, ती नविन मालिका आता अभिलाषा च्या जागी सुरु करताहेत, अभिलाषा कोणत्या वेळी दाखवणार?
|
Mansmi18
| |
| Monday, September 24, 2007 - 3:41 pm: |
| 
|
शुभ्राच्या चाहत्यांसाठी bad news शुभ्रा बदलली. (
|
Dhanu66
| |
| Tuesday, September 25, 2007 - 5:04 am: |
| 
|
होय, पण ती जुनी शुभ्रा आदी पेक्शा मोठी वाटायची. ही नविन उर्मिला छान आहे. ह्यात काय सग्ल्यान्चे पुर्नजन्म आहेत की काय? तो सुनील बर्वे चा पन आहे... ! अभिलाषा सम्पली वाटते.
|
Amruta
| |
| Tuesday, September 25, 2007 - 2:11 pm: |
| 
|
ए काय चाललय असंभव मधे?? देशात असताना पहात होते. इथे नाही पहात. आता ६ महिने झाले
|
Sandu
| |
| Tuesday, September 25, 2007 - 6:43 pm: |
| 
|
एक काम कर, planetvu.com चं connection घे. त्यावर zee मराठी दिसते. छान आहे.
|
Santu
| |
| Wednesday, September 26, 2007 - 6:43 am: |
| 
|
अरे यार ही नविन शुभ्रा अगदि रया गेलेलि वाटते पहिलि शुभ्रा अगदि ताजी टवटवित फ़ुला सारखि होति. छ्या सगळा मुडच घालवला या निर्मात्याने
|
Mansmi18
| |
| Wednesday, September 26, 2007 - 1:45 pm: |
| 
|
सन्तु, १००% बरोबर. मला आता "असम्भव" पहायची इच्छा होत नाही. एक बातमी अशी आहे कि मानसी साळवी ला आता family सुरु करायची आहे म्हणुन तिने मालिका सोडली. तिला आमच्या शुभेच्छा. आशा आहे कि जेव्हा ती परत यायला तयार होइल तोपर्यन्त असम्भव सुरु राहील आणि ती परत येइल.(जर अभिलाषा सारखी abruptly उडवली नाही तर!)
|
Amruta
| |
| Wednesday, September 26, 2007 - 3:36 pm: |
| 
|
हो ना फ़ार इच्छा होती subscription घ्यायची पण नवरा नकोSSSS म्हणतो. का तर म्हणे नको ते TV च व्यसन आता. मलाही जरा पटल ते. पण शुभ्रा वाचल आणी एकदम आठवल.
|
Santu
| |
| Friday, September 28, 2007 - 6:50 am: |
| 
|
मानस्मी अस आहे होय? मग ठिक आहे. कोण आहे तो भाग्यवान.? या नविन शुभ्रात मानसिचा ताजेपणा नाहि. हे मात्र खर
|
Mansmi18
| |
| Friday, September 28, 2007 - 2:06 pm: |
| 
|
कोण आहे तो भाग्यवान.? ------------------------------- अहो तिच्या नवर्याचे भाग्य आधीच उजळले आहे. family सुरु करणे म्हणजे त्याच्या पुढची स्टेप नवी शुभ्रा प्रभावहीन आहे. मला आता असम्भव बघावेसे वाटत नाही. अवघाची संसार्-बघवत नाही. या सुखानो या तेच तेच उगाळत बसलेत. कळत्-नकळत १००% filmy अधुरी एक कहाणी कधीच बघत नाही. overall zee maraathi subscription बंद करावे असे वाटत आहे. तेवढेच ९ वाचतील. जाता जाता काल असम्भव मधे "नीज माझ्या नंदलाला" हे गाणे कोणी म्हटले? अतिशय अप्रतिम म्हटले..
|
Monakshi
| |
| Monday, October 01, 2007 - 6:27 am: |
| 
|
मला वाटतं तो आवाज उर्मिला कानिटकरचाच (आत्ताची शुभ्रा) आहे. मला वाटतं की तुम्हाला जुन्या शुभ्राची खूप सवय झालीये त्यामुळे हीचा कंटाळा येतो. पण ही सुध्दा एक खूप चांगली अभिनेत्री आहे. काही दिवसांनी हिची सुध्दा सवय होईल आणि तुम्हाला आवडायला लागेल. पूर्वी Zee वर तिची "तुझ्याविना" म्हणून एक serial लागायची त्यात ती वर्षा उसगावकरची मुलगी दाखवलेली तो ही तिचा role चांगला होता. पूर्वी असंभव फक्त मानसीमयच होतं आता निदान बाकीच्या कलाकारांना तरी संधी मिळेल.
|
Ajjuka
| |
| Monday, October 01, 2007 - 11:16 am: |
| 
|
आधी एकदा असंभव चा एक एपिसोड पाह्यला होता आणि आता परवा पाह्यला... मानसी साळवी नावाचा ठोकळा गायब केल्याने फारच बरे झाले. lead role असून जिला साधे आवाजात चढ उतार करणे कळत नाहीत ती मालिकेतून गेली हेच बरं झालं. उर्मिला मुळातच चांगली अभिनेत्री आहे. कथ्थक डान्सर आहे त्यामुळे ग्रेसफुलही आहे. तिला बघून बरं वाटलं. आणि हो तो आवाज तिचाच होता.
|
Dhanu66
| |
| Friday, October 05, 2007 - 4:36 pm: |
| 
|
खरे आहे. मानसी पेक्शा ऊर्मिला चान्गली आहे. आणी आदिनाथ बरोबर चान्गली दिसते.
|
मी ' झी मराठी ' पाहिलं नाही कधी पण उर्मिला कानिटकर छान च आहे , खूप graceful आहे , शुभ मंगल सावधान नावाच्या stupid movie मधे पण ती लक्षात राहिली होती आणि ' आई शपथ्थ ' च्या छोट्याशा role मधेही चांगली वाटली . मायका नावाच्या महाकौटुंबिक मालिकेत पण होती ती , अचानक मारून टाकले त्यात तिला मानसी साळवी ' कोई अपनासा ' पासूनच डोक्यात जाते उगीच ! 
|
Supriyaj
| |
| Friday, October 05, 2007 - 11:30 pm: |
| 
|
oh DJ u mean ti raajee is urmila kanitkar?? wow.. never thought she is marathi actress
|