|
>>> सतीश, आज घरी फार बोलणी पडलीत त्याचं frustration इथे काढताय का? तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते काही कळलं नाही. जरा नीट स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल.
|
Lukkhi
| |
| Tuesday, June 12, 2007 - 2:12 pm: |
| 
|
सतीश, शुद्ध मराठीतील वाक्य आहे, त्यात फ़क्त frustration हा एक आंग्ल शब्द आहे. त्याचा अर्थ समजला नसेल तर सांगा, भाषांतर करून देईन, बाकीचे वाक्य समजण्याइतपत साधे सरळ तर नक्कीच आहे... न समजण्याचे बाकी काही कारण असेल तर मग नाईलाज आहे...
|
Imtushar
| |
| Tuesday, June 12, 2007 - 3:31 pm: |
| 
|
सेहवाग, हरभजन आणि पटेल संघातून बाहेर!!! http://content-uk.cricinfo.com/ci/content/current/story/297784.html India's one-day squad (Ireland games) Gautam Gambhir, Robin Uthappa, Sourav Ganguly, Sachin Tendulkar, Rahul Dravid (capt), Yuvraj Singh, Dinesh Karthik, Mahendra Singh Dhoni (vice-capt, wk), Rohit Sharma, Ramesh Powar, Ajit Agarkar, Piyush Chawla, Zaheer Khan, RP Singh, Sreesanth. India's Test squad Wasim Jaffer, Dinesh Karthik, Gautam Gambhir, Rahul Dravid (capt), Sachin Tendulkar (vice-capt), Sourav Ganguly, VVS Laxman, Yuvraj Singh, Mahendra Singh Dhoni (wk), Ramesh Powar, Anil Kumble, Zaheer Khan, Sreesanth, RP Singh, Ishant Sharma, Ranadeb Bose.
|
Zakki
| |
| Tuesday, June 12, 2007 - 4:55 pm: |
| 
|
पण कोच नाही ना मिळाला (मिळाली) अजून! मग कसे खेळणार? शिवाय रैना नाही टीम मधे तरी त्याची जर्सी घ्या, गांगुलीला आवडते म्हणे ती जर्सी घालायला. मी एक दोनदा पाहिले आहे. असो, जागतिक विश्वचषकाच्या वेळेपेक्षा बरे खेळोत म्हणजे झाले.
|
आँ? तेंडुलकर, कुम्बळे,गन्गू, आगरकर अजून आहेत संघात?
|
Zakki
| |
| Tuesday, June 12, 2007 - 6:08 pm: |
| 
|
नि टेस्ट साठी लक्ष्मण पण! गरज पडली तर गावास्कर, वाडेकर, नबाब ऑफ पतौडी, कपिलदेव वेंकटरामन हेहि तयार आहेत. काय आहे, नविन खेळाडु धोकादायक असतात. कदाचित् खूप उत्साहाने खेळले तर नको असलेल्या मॅचेस (म्हणजे, ज्यात भारत हरेल असे ठरवले असेल) जिंकून जातील!! जुन्या खेळाडूंना कसे खेळाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय परिणाम काय असतात याची कल्पना असते.
|
Mandard
| |
| Wednesday, June 13, 2007 - 4:34 am: |
| 
|
भारतीय संघाची नविन कोच म्हणुन मंदिरा बेदी ला घ्या. मग बघा आपल्या टिमला किती मोटिव्हेशन मिळते ते. ७२ वर्षाच्या बोर्डेना उगाच दगदग.
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 13, 2007 - 4:42 am: |
| 
|
चंदु बोर्डे म्हणतात कि मी आश्चर्यचकित आहे कि मला ही जबाबदारी दिली पण मी तयार आहे. आता हे सगळे लोक त्यांच्या अंडर नीट वागणार का. ते आहेत जुण्या जमान्यातले कष्ट करणारे खेळाडु आणि आताचे......... जावु दे. ह्यानी कपिल देव ला पळवला,गुरुजीना पळवले. आता काय होइल काय माहित. BTW आपल बोर्ड लय भारी दिसतय. डाअय्रेक्ट नाव जाहीर करायच आणि समोरच्या माणसाला विचारायच पण नाहि. कसे कय वर्ल्ड कप जिंकणार बुवा!
|
Giriraj
| |
| Wednesday, June 13, 2007 - 11:37 am: |
| 
|
बोर्डे कोच नाहि रे.. व्यवस्थापक आहेत
|
सचिन, आगरकर आणि गांगुलीला बांगलादेशच्या दौर्यामध्ये एकदिवसीय सामन्यांसाठी वगळण्यामागे काहीही लॉजिक नव्हतं आणि आता परत घेण्यामागे सुद्धा काहीही लॉजिक नाही. या तिघांनी, काढल्यानंतर, गेल्या दोन महिन्यात एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही, मग कशाच्या जोरावर ते परत आले? परत घ्यायचं होतं तर आधी काढलं कशाला? तीच गोष्ट सेहवागची. वासिम जाफर बांगलादेशासारख्या लिंबूटिंबूविरूद्ध दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. तो कसा काय अजून आत आहे? शरद पवारांनी विश्वचषकातल्या पराभवानंतर मोठ्या गर्जना केल्या की आता कामगिरीनुसार मानधन देणार, जाहिरातींवर बंदी आणणार इ. पण प्रत्यक्षात एकही अमलात आणली नाही. ते राजकारणात जशी पोकळ आश्वासनं देतात आणि नंतर प्रत्यक्षात काहीही करत नाहीत, तसंच इथे पण केलं.
|
Farend
| |
| Wednesday, June 13, 2007 - 5:56 pm: |
| 
|
त्यांना परत घेतल्याने त्यांना (निदान सचिन आणि गांगुलीला) विश्रांती दिली होती, हे खरे दिसते. आगरकरचे माहीत नाही. पण जर विश्रांती ही पॉलिसी होती तर आता कोणालाही विश्रांती दिली नाही, यात गडबड वाटते. Zakasrao फोर्ड आणि एम्बुरी दोघांची मुलाखत झाली होती बोर्डाच्या कमिटीबरोबर, म्हणजे चर्चा चालू होती, एकदम नाव जाहीर केले नव्हते. मला माहीत आहे, BCCI काय सगळे पद्धतशीर करते असे नाही, पण निदान एवढे केले होते. आता माहीत नाही त्या मुलाखतीत असे काय झाले की ज्यामुळे त्याने नंतर नाकारले. असेही शक्य आहे की कोणीतरी त्याला यातील धोके दाखवून दिले असतील (राजकारण, प्रत्येक पराभवावर लोकांची प्रतिक्रिया वगैरे).
|
Farend
| |
| Tuesday, June 26, 2007 - 4:04 am: |
| 
|
०-४ नंतर आता बदला का ०-३? उद्या पहिले कळेल. आपले लोक आजकाल फार सौम्य मनाने सामने खेळतात त्यामुळे बदला वगैरे चान्स कमीच. सचिन सौरव पुन्हा एकत्र आलेत ओपनिंग ला, बघूया काय करतात ते. दादा ने मागच्या वेळी (२००१) याच गोलंदाजांना त्यांच्याच घरी धुवून काढले होते. पण आता त्याला जवळजवळ ६ वर्षे होत आली. सर्वच म्हातारे झालेत त्यामुळे बघू काय होते.
|
Farend
| |
| Tuesday, June 26, 2007 - 4:40 am: |
| 
|
सिरीज च्या आधी कप्तानाचा आविर्भाव कसा असावा याचे हे आणखी एक उदाहरण्: २००१ च्या सिरीज मधे द आफ्रिकेविरुद्ध ४ सामन्यांपैकी (ती triangular होते, तिसरी केनिया) पहिल्या सामन्यात १२७ व तिसर्यात ८५ मारले गांगुली ने. यात पहिल्या सामन्यातील १२७ चे महत्त्व असे की वन डे मधे डोनाल्ड खेळणार नाही हे कळल्यावर 'बाकी गोलंदाजांना आम्ही घाबरत नाही' अशा अर्थाचे वक्तव्य त्याने केले. त्यामुळे तो बॅटिंग ला आल्यावर chin music अपरिहार्य होते. तरी पोलॉक च्या पहिल्याच बॉल वर फोर आणि जोरदार शतक! त्यावेळी दुसरा ओपनर सचिन पेक्षा वेगवान शतक मारतो हे क्वचितच होते. गांगुली च्या या टॅक्टिक ची लिन्क येथे मिळेल, आणि येथे ही. पहिल्या मॅचचे स्कोरकार्ड येथे आहे. एरव्ही गांगुली अशी गोलंदाजी चांगली खेळू शकत नाही, पण यावेळी असे खेळण्याचे कारण कदाचित 'खुन्नस' असेल. जसे इतरांपुढे ढेपाळणारे काही फालतू पाकी सुद्धा आपल्या विरुद्ध धडाक्यात खेळून जायचे.
|
४४ षटकात भारत १९८ / ३. फारशी चांगली धावसंख्या नाही. शेवटच्या ६ षटकात ६० धावा तरी पाहिजेत. सचिन १४० चेंडूत नाबाद ९६. हळू हळू खेळतोय. ४२वे शतक करणार बहुतेक.
|
cricinfo.com सचिनने ९९ धावा काढल्या तरी त्याच्यावर टीका आहेच ! कमाल आहे !! ४ धावा काढल्या तरी टीका, ९९ धावा काढल्या तरी टीका. खरे म्हणजे सचिनने स्वत:चाच दर्जा इतका उंचावून ठेवला आहे, की त्याने १०० चेंडू मध्ये १०० धावा नाही केल्या, तर तो ’चांगला खेळत नाही’ असे बहुमान्य मत होतेय.
|
सचिनला शम्भर करू द्यायचे नाहीत असा निश्चय केलेला दिसतो सगळ्या अंपायर लोकांनी.. आज पुन्हा ढापली विकेट... आणि आपले शास्त्री राव.. A little Unforunate Decision एवढंच बोलू शकले... Michel Holding असता तर You got it wrong again असं स्पष्ट बोलला असता, पण आपण 'बापू' वाले ना... उगाच भावना नको दुखवायला अंपायरच्या...
|
पण आपण 'बापू' वाले ना 
|
Panna
| |
| Saturday, August 25, 2007 - 6:36 pm: |
| 
|
सचिनला शम्भर करू द्यायचे नाहीत असा निश्चय केलेला दिसतो सगळ्या अंपायर लोकांनी.. सचिन सुध्दा याची कल्पना आलेली दिसतेय. आज पण हसत हसत गेला आऊट झाल्यावर 
|
Zakki
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:30 pm: |
| 
|
आगरकर पेटलाय्. पण त्याची ९ षटके होऊन गेली. आता आर पी सिंग नि चावला यांनी काही तरी करावे!
|
आगरकर पेटला पण काही उपयोग नाही. ८व्ह्या विकेट साठी ९९ ची भागिदारी आणि इंग्लंड विजयी.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|