|
हरकत आहे ती भारतीय कलाकारांना डावलुन आणि पाकिस्तानि नट नट्या घेउन बॉलीवूड चित्रपट बनवण्याला... हा स्वार्थीपणा झाला.
|
आणि सामान्य जनता लाख चांगली असेल पण ती काही निर्णय घेण्यात पार्टीसिपेट करतेय का? पाकिस्तानात हुकुमशाही आहे त्यात त्या जनतेचा काय दोष?>>>>>>> चित भी मेरी ओर पट भी. जनतेचा दोश नाही तर कोनाचा, भारताचा? का भारतानेच हुकुम्शाही लादलीय त्यांचावर.
|
हा स्वार्थीपणा झाला.>मला नाही वाटत यात स्वार्थ काही आहे. (स्वतचा) उलट आपल्या देशातील एकाला समोर यायला वाव मिळेल.
|
विचारांची गल्लत होते आहे... <<<तुमचीच गल्लत होतेय का पहा . आधीच्या पोस्ट मधे तुमचे मत होते कि झी ने मूळात त्यांना इथे बोलावलेच कशाला ... तुम्ही हे पण add केलेत कि Indians settled in other countries (be it Pakistan or any other country) competing against Indians in India for the title is another thing. म्हणजे तुम्हाला मूळात पाकिस्तान शी स्पर्धा च नको आहे , NRI असतील तर गोष्ट वेगळी ! दुसर्या पोस्ट मधे तुम्ही म्हणताय कि ते बॉलीवूड मधे गाणार वगैरे .. ती खूप पुढची स्टेप झाली , तुमच्या आधीच्या पोस्ट वरून तुम्हाला त्यांच्याशी competition करणेच गैर वाटते आहे हेच जास्त highlight होतय . आणि btw, झी ने त्यांन बॉलीवूड contracts देउन बोलावलं नाहीये ,Music Worl Cup साठी बोलावल आहे .
|
आता ह्या सारेगमप मधे कुणि पाकिस्तानि जिंकला तर तो काय परत पाकिस्तानात जाउन तिथल्या सिनेमात गाणी नाही गाणार...तो bollywood साठीच गाणार ना? मग आपल्याच देशात गाणारे लोक हवेत तर आपल्याच देशातले का शोधु नये? <<<<क्रिकेट worldcup चे example तुम्हाला पाकिस्तानी स्पर्धकांना इथे बोलावणे योग्य वाटत नाही म्हणून दिले , त्यांच्या पुढच्या professional career च्या बाबतीत नाही . बाकी स्पर्धा जिंकली म्हणजे बॉलीवूड प्रवेश निश्चित हाच मोठा गैरसमज आहे , गेल्या वर्षी जिंकलेला देबोजीत किती गाताना दिसतो ? आणि समजा , खरच एखाद्या पाकिस्तानी contestant ला तशी संधी मिळालीच तर याचाच अर्थ खरच अपल्या इतर भारतीय स्पर्धकां पेक्षा एखाद्या music director ला त्यांच्यात जास्त टॅलेंट दिसलं असाच होतो .. भारतातले music talent बद्दल कोणालाच शंका नाहीये .. पण तरीही नुसरत फ़तेह अली खान , राहत , अतिफ़ अस्लम , गुलम अली , जुनुन group हे लोकप्रिय आहेत याचाच अर्थ अपल्या लोकांना पण for a change वेगळी style ऐकायला आवडते . त्यामुळे तुमच्या ' भारतात टॅलेंट ची काय कमी ' या statement ला पण काही अर्थ नाहीये ! अत्ताच्य पाकिस्तानी contestants ची level पहाता त्यांना खरच बॉलीवूड मधे ब्रेक मिळाला तर मला तरी काही गैर वाटणार नाही . आणि असेल कोणी भारतीय कलाकार त्यांच्या पेक्षा भारी तर त्याला preference मिळेल . आणि झी टीव्ही international channel. आहे , त्यांना फ़क्त भारता पुरते मर्यादित रहण्याची काय गरज ?? आणि ही साधी संगीताची स्पर्धा आहे , प्रत्येक वेळी काय सीमाप्रश्न आणि पारंपारीक भांडण ला मधे आणायचे !
|
पाकिस्तानात हुकुमशाही आहे त्यात त्या जनतेचा काय दोष?>>>>>>>
आज मला विनोदाच्या बीबीवर जायची गरज नाही. अहो कुलकर्णी, हुकूमशाही काय blue umbrella मधून उगवली का? कुठलीही शाही ही त्या त्या देशाच्या psychology मधूनच तयार होणार ना? असो. या विषयावर इथे वाद घालण्यात प्वाईंट नाही. स्पर्धांमधे पाकिस्तानी लोक बोलावू नयेत हे काही पटत नाही. कलेची कदर करणे - मग तो शत्रूराष्ट्रातला का असेना - हे आपल्याच संस्कृतीने सांगितलेय. आणि आपण काही उपकार करत नाही आहोत त्यांच्यावर. आपल्यालाही चांगल्या कलेचा आस्वाद घ्यायला मिळतोच की. >> हरकत आहे ती भारतीय कलाकारांना डावलुन आणि पाकिस्तानि नट नट्या घेउन बॉलीवूड चित्रपट बनवण्याला... टिऊ असेच काही नाही बर का. चांगले असतील तर घ्यायलाही हरकत नाही. पण उगीच प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आम्ही बघा कसे वेगळे हे दाखवण्यासाठी कुठल्याही सुमार दर्जाच्या कलाकाराला उचलण्यात अर्थ नाही. महेश भट ने आणलेली ती मीरा. हरे कृष्णा! किती सुमार आहे ती एकूणच. पण पाकिस्तानचे stand up comedians मात्र जबरदस्त आहेत. विनोदाचा एक वेगळाच फ्लेवर आहे त्यांचा. गायकीसारखाच.
|
चित भी मेरी ओर पट भी. जनतेचा दोश नाही तर कोनाचा, भारताचा? का भारतानेच हुकुम्शाही लादलीय त्यांचावर. जनतेचा? जनतेने मतदान करून हुकुमशाही निवडली आहे का? आणी चीन, रशिया सारख्या देशात हुकुमशाही आहे म्हणून सम्बन्ध ठेवायचे नाहीत? अडवाणी नी पाकिस्तान भेटीत सान्गितलेले खरेच होते Pakistan is an an unalterable reality.
|
>>> आणी चीन, रशिया सारख्या देशात हुकुमशाही आहे म्हणून सम्बन्ध ठेवायचे नाहीत? जनाब कुलकर्णी मियां, १) पाकिस्तान आणि पाकिस्तानी नागरिक हे भारताचे शत्रू आहेत. दोन्ही देशात आतापर्यंत ४ वेळा युद्ध झालेले आहे आणि भविष्यातही होतील. २) पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसून निष्पाप भारतीय नागरिकांच्या हत्या करतात. पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मुस्लीम अतिरेक्यांना पाठिंबा आहे. ३) भारताला हजारो जखमा करून रक्तबंबाळ करणे हे पाकिस्तानचे धोरण आहे. झुल्खिकार अली भुट्टो आणि झिया उल हकने हे जाहीरपणे सांगितले होते. ४) पाकिस्तानशी संबंध ठेवल्यामुळे भारताचा फक्त तोटाच झालेला आहे आणि भविष्यातही होत राहील. ५) पाकिस्तानात हुकूमशाही असो वा लोकशाही, त्यांचा भारत द्वेष कायम राहतो. आपला द्वेष करणार्या देशाशी कशाला संबंध ठेवायचे? असल्या विकृत देशाला एकतर जोरदार लाफा मारून गप्प करणे किंवा त्याच्याशी पूर्ण संबंध तोडून टाकणे हेच भारताच्या हिताचे आहे. पाकिस्तानशी संबंध ठेवणे हे भारतीय पुढार्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे कारण त्यामुळे त्यांची मुस्लीम मतपेढी शाबूत राहते. परंतु सर्वसामान्य भारतीय नागरिकांना पाकिस्तानशी असलेल्या संबंधांमुळे भयंकर किंमत मोजावी लागलेली आहे. त्यामुळे पुढार्यांना आणि समाजवादी निधर्मान्धांना पाकिस्तानबद्दल कितीही कळवळा वाटला तरी बहुसंख्य भारतीयांच्या हितासाठी पाकिस्तानशी संबंध तोडणे आवश्यक आहे. ज्यांना पाकिस्तानबद्दल उमाळा येतो त्यांनी पाकिस्तानात कायमचे स्थलांतर करावे.
|
असल्या विकृत देशाला एकतर जोरदार लाफा मारून गप्प करणे किंवा त्याच्याशी पूर्ण संबंध तोडून टाकणे हेच भारताच्या हिताचे आहे अशा देशाशी पूर्ण सम्बन्ध तोडणे म्हणजे आगीत तेल ओतणे. त्या ऐवजी सम्बन्ध ठेवणे, चर्चा करणे, अधून मधून गुरकावणे हेच योग्य. म्हणूनच अगदी सन्सदेवर हल्ला झाला तरीही वाजपेयीनी त्यावर हल्ल केला नाही. फक्त सैन्याची भीती दाखविली. पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मुस्लीम अतिरेक्यांना पाठिंबा आहे. आपण ही एल टी टी ई ला पाठिम्बा दिला होताच. आपला तो बाब्या " जोरदार लाफा मारून गप्प करणे " मला तर शिशू शाखेवरील वीरश्रीपुर्ण भाषणान्ची आठवण झाली. असे शब्द टाळ्या मिळविण्यासाठी योग्य आहेत. प्रत्यक्ष आन्तरराष्ट्रीय राजकारण हे प्राग्माटिजम ( याला मराठी शब्द काय?) वरच अधारलेले असते.
|
Tiu
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:30 pm: |
| 
|
पण पाकिस्तानचे stand up comedians मात्र जबरदस्त आहेत. विनोदाचा एक वेगळाच फ्लेवर आहे त्यांचा.>>> कुठला stand-up comedian ? तो great Indian laughter challenge-2 मधे फायनल जिंकला तो? कसला फ़ालतु होता तो...काय नाव होतं त्याचं? आणि किती cheap jokes करायचा! त्यात कुठला आलाय विनोदाचा फ्लेवर? मला तर बिलकुल नाही आवडायचा तो. त्यापेक्षा आपले participants कितीतरी चांगले होते! उगिच आपलं पहिल्या भागात भारतिय जिंकला म्हणुन दुसर्या भागात त्यांच्यापैकी कुणालातरी पहीला नंबर दिला... असलं काही करुन संबंध सुधारत नसतात...झालंच तर शेखर सुमन, सिद्धु आणि तो पहीला आलेला, त्यांचे संबंध सुधारले असतील. आणि सारेगमप मुळे झी टिव्हि आणि पाकिस्तान सरकारचे संबंध सुधारतील... वर कुणितरी म्हणालं तेच खरय... हे प्रकार म्हणजे भारत पाकिस्तान संबंध सुधरवण्याच्या नावाखाली पाकिस्तानि मार्केट मधे आपल जम बसवण्याचा उद्योग आहे ह्या channel वाल्यांचा...बाकी काही नाही!!!
|
Tiu
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:48 pm: |
| 
|
म्हणूनच अगदी सन्सदेवर हल्ला झाला तरीही वाजपेयीनी त्यावर हल्ल केला नाही. फक्त सैन्याची भीती दाखविली. >>> आणि अशी भीती दाखवुन काय उपयोग झाला? हल्ले बंद झाले का भीती दाखवल्यावर? अजुन किती वर्षं नुसती भीती दाखवत राहणार आहोत आपण? आता उद्या एखादा कुत्रा तुमच्या अंगावर धावुन आला आणि तुम्ही त्याला दगड मारायची action केली तर तो एकदा पळेल, दुसर्यांदा पळेल पण तिसर्या वेळेस त्याला कळेल कि कुलकर्णी काही दगड मारत नाहीत, फक्त दगड मारण्याची भीती दाखवतात... चावा त्यांना!
|
>>> मला तर शिशू शाखेवरील वीरश्रीपुर्ण भाषणान्ची आठवण झाली. असे शब्द टाळ्या मिळविण्यासाठी योग्य आहेत. शिशूशाळेच्या पलीकडे ज्यांची समज अजून गेलेली नाही, त्यांच्यासाठीच ही वाक्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला ही वाक्ये बरोबर समजलेली दिसत आहेत. >>> त्या ऐवजी सम्बन्ध ठेवणे, चर्चा करणे, अधून मधून गुरकावणे हेच योग्य. म्हणूनच अगदी सन्सदेवर हल्ला झाला तरीही वाजपेयीनी त्यावर हल्ल केला नाही. फक्त सैन्याची भीती दाखविली. बुश लादेनशी चर्चा करत बसला असता तर वर्ल्ड ट्रेड सेंटरची अनेकवेळा पुनरावृत्ती झाली असती. त्याऐवजी त्याने अफगाणिस्तानवर हल्ला करून तालिबानचं असं कंबरडं मोडलं की आता पुन्हा आयुष्यात कधीही तालिबानी उभे राहू शकणार नाहीत. लादेनला तर आयुष्यभर तोंड लपवून जगावं लागतय. बुशच्या या जोरदार थपडेमुळे २००१ नंतर अमेरिकेवर कधीही अतिरेकी हल्ला झाला नाही. आणि वाजपेयींनी चर्चा करून काय मिळवलं? चर्चेमुळे मुस्लीम अतिरेक्यांनी एक तरी कमी गोळी झाडली का? कुलकर्णी - कळला का फरक लाफा मारण्यातला आणि चर्चा करण्यातला? बहुतेक कळला नसेलच. शिशूशाळेतून वरच्या वर्गात गेल्यानंतरच हा फरक कळेल. >>> आता उद्या एखादा कुत्रा तुमच्या अंगावर धावुन आला आणि तुम्ही त्याला दगड मारायची action केली तर तो एकदा पळेल, दुसर्यांदा पळेल पण तिसर्या वेळेस त्याला कळेल कि कुलकर्णी काही दगड मारत नाहीत, फक्त दगड मारण्याची भीती दाखवतात... चावा त्यांना! नुसता चावून थांबणार नाही. कुलकर्णी नुसते उभे आहेत हे बघून आपली नैसर्गिक क्रिया सुद्धा करेल कारण कुत्र्याला सुद्धा माहिती आहे की कुलकर्ण्यांचा दगड मारण्यापेक्षा चर्चेवर जास्त विश्वास आहे.
|
त्याऐवजी त्याने अफगाणिस्तानवर हल्ला करून तालिबानचं असं कंबरडं मोडलं की आता पुन्हा आयुष्यात कधीही तालिबानी उभे राहू शकणार नाहीत. अफगाणिस्तान वर हल्ला करून पाच वर्षे झाली तरीही तालिबानी अजूनही सक्रिय आहेत, म्हनूनच अमेरिकी सैन्य आणी नाटो सैन्य दोघानाही ते आवरत नाहीत. लादेनला तर आयुष्यभर तोंड लपवून जगावं लागतय. बुशच्या या जोरदार थपडेमुळे २००१ नंतर अमेरिकेवर कधीही अतिरेकी हल्ला झाला नाही. पण इराक मध्ये रोज होणार्या हल्ल्यान्मध्ये तीन हजार अमेरिकी सैनिक मेले. शिवाय आज ना उद्या इराक मधून काढता पाय घ्यावा लागणार हे नक्की. कुलकर्णी नुसते उभे आहेत हे बघून आपली नैसर्गिक क्रिया सुद्धा करेल कारण कुत्र्याला मायबोली सारख्या कुटुम्बवत्सल सन्केतस्थळावर ही भाषा योग्य आहे का? मुद्दे सम्पले म्हणून काहीही लिहायचे? कसला फ़ालतु होता तो...काय नाव होतं त्याचं? आणि किती चीप जोक्स हे मात्र पटले. चर्चा तिसरीकडेच भरकटते आहे. झी वाल्याना भारत पाक मैत्रीशी काहीही देणेघेणे नाही. आता फायनल ला बहुदा एक भारतीय आणी एक पाकडा ठेवणार. मग दोन्ही देशातले येडे लोक एस एम एस कर करून मोबाईल कम्पन्याचे उखळ पान्ढरे करणार.
|
झी वाल्याना भारत पाक मैत्रीशी काहीहे देणेघेणे नाही. आता फायनल ला बहुदा एक भारतिय आणे एक पाकडा ठेवणार. मग दोन्ही देशातले येडे लोक एस एम एस कर करून मोबाईल कम्पन्याचे उखळ पान्ढरे करणार. <<<<<झी टी व्ही किंवा कुठलेही channel हे TRP साठी करणारच कि , एवढे मोठे worl wide market सोडेल का कुठले चॅनल ? ज्यांना हा स्टंट कळतो , ते vote करणार नाहीत फ़ार तर , बाकी लोकां कडून चॅनल पैसे मिळावणारच ,So what's wrong? ज्यांना पाकिस्तानबद्दल उमाळा येतो त्यांनी पाकिस्तानात कायमचे स्थलांतर करावे. <<<<<< too much..
|
So what's wrong>> After some time we think whats wrong, everything seems to be right and I think thats the point. Everything is wrong. Not only wrong it was unethical. With that episode they tried to play with deshprem bhavna, thats wrong. They wanted to encash it, thats wrong. And we believe nothing wrong, I think something is wrong there too. वल्ड मार्केट आहे हे मान्यच. पण मग त्यात देशप्रेम कशाला. देश मध्ये आनला की बॉन्ड्रा येत नाहीत का? जो पर्यंत फक्त गाण्याची स्पर्धा आहे तो पर्यंत एका भारतीय माणसाला एका पाकी स्पर्धकाला वोट करायला काहीच वाटनार नाही नव्हे तसे ते करत आहेत म्हणुन ते टिकत आहेत. पण गाण्याचा स्पर्धा घेऊन आम्ही दोन देशात जवळीक आनु पाहतो आहेत हे सांगने वाईट नाही का? कारण ही तर फक्त पोळी भाजुन घेने आहे, ist that wrong
|
टिऊ तो लाफ्टर चॅलेंज जिंकलेला नाही गं. ईईईईईई तो मलाही नाही आवडत. (तसे चीप जोक्स मारणारे भगवंत मान आणि प्रताप फौजदार पण आहेत ना 'आपले' च.) पण इतर आहेत की बरेच. Comedy circus मधे आलेले शकील आणि काशिफ. आणि आपले कलाकार वाईट आहेत असं कुठे म्हटलं मी? तेही आहेतच की चांगले. पण भारतीय पदार्थ आवडतात म्हणून तू चायनीज, मेक्सिकन, इटालीयन क्विझिन खातच नाहीस की काय? चांगल्या कलाकारांना संधी देण्याचा आणि Talent चे कौतुक करण्याचा एकूणच राजकारणाशी काय संबंध आहे ते मला अजून कळले नाहीये. मला फक्त एवढेच म्हणायचेय की शत्रूच्या गुणांचा केवळ तो शत्रू आहे म्हणून अवमान करणे हे मनाच्या कोतेपणाचे लक्षण आहे. तसेच केवळ स्टंट म्हणून त्यांच्या फालतू लोकांचा उदोउदो करणे हेही. चर्चा मुद्द्याला सोडून परत आवडत्या विषयावर नेण्यात परकीय शक्ती यशस्वी झाल्यात असे दिसतेय.
|
Santu
| |
| Friday, August 24, 2007 - 4:56 am: |
| 
|
विजय कुलकर्णी वर कुत्रा नैसर्गिक क्रिया करतील)))) कुलकर्णी पण तुम्है काय करचाल कुत्र्या बरोबर चर्चा कराल का दांडक्या ने त्याचा नैसर्गिक विधिस जबाबदार अवयव सडकुन काढाल दीपांजली तु का एवढि त्या पाकड्यांची पक्षपाती आहेस.? आज त्यांच्या देशातील फ़िल्म इन्डस्ट्री नामषेश झाली आहे. म्हणुन ते इकडे खेटे घालतायत. तस नसत तर ती कट्टर जमात इकडे फ़िरकली सुध्दा नसती.
|
संतु , तुम्ही का म्हणे इतक्या उच्च कलाकारांचा खुन्नस देताय , फ़क्त ते पाकिस्तानी आहेत म्हणून ?? आणि उगीच त्यांचा ' पाकडे ' किंवा ' पाकड्या ' असा एखाद्या देशाचा cheap उल्लेख करून तुम्ही लोक पण ज्या level जात आहत त्या वरून तुम्ही इतर राष्ट्रां कडून सौजन्य expect च कसे करु शकता ?? वर संघमित्राच्या post वाचा . त्यांचे कलाकार मला आवडतात याचा आणि आपल्या पारंपारीक हाड वैराचा काही एक संबंध नाहीये , पाकिस्तान आपला शत्रु आहे म्हणून प्रत्येक पाकिस्तानी माणसाला भयंकर खुन्नस दिली पाहिजे हे मला तरी पटत नाही . त्यांची फ़िल्म इंडस्ट्री मोडकळीस आली आहे किंवा काय , ते कट्टर मुसलमान आहेत कि नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही , ते गातात उच्च एवढे पुरेसं आहे . वर संघमित्रानी लिहिलय त्या प्रमाणे जर त्यांचे चांगले कलाकार इथे येउन गाणार असतील तर तो बॉलीवूड चाच फ़ायदा आहे ( आणि btw, जे पाकिस्तानी कलाकार आवडत नाही त्यांच्या विषयी कोणालाच प्रेम नाहीये , जसे तिथल्या टीव्ही आणि सिने तारकांनी इथे प्रयत्न केला पण त्यांची level आपल्या actors पुढे अगदीच किरकोळ होती .) सध्याचे सारेगमप world cup तुम्ही पाहिलेत कि नाही माहित नाही पण या स्पर्धेत UK, South Africa, US, Canada आणि भारत सगळ्या देशातून singers आले होते पण इतर देशां मधून आलेले singers आणि पाकिस्तानी singers यांच्या गायकी मधे जमिन आसमानाचा फ़रक आहे ! त्यांचे singers इतर देशातल्या contestants पेक्षा नक्कीच एक level वर आहेत ( असं माझं मत ) अगदी आपल्या देशाच्या स्पर्धकां मधीही एखाद दोन गायक सोडले तर quality wise पाकिस्तानी singers ना टक्कर देण्याची level कोणाचीही नाहीये . पाकिस्तानी contestants इतरांच्या तुलनेत खूपच simple,show off न करता pure singing वर concentrate करून गातात बिचारे , अर्थात public votes अशा लोकांना कमीच मिळणार हे सांगायलाच नको . जर पाकिस्तानी गायक या स्पर्धेत नसते तर ही स्पर्धा उच्च गायकांना मुकली असती हे नक्की . भारतीय music industry ची मी फ़ॅन आहेच आणि त्या बरोबर मला गुलाम अली , रेश्मा , नूर जहा , अबिदा परवीन , नुसरत फ़तेह अली खान , राहत , अतिफ़ , नाझिया हसन हे singers आणि सध्याचे सारेगमप चे मुस्सरत अब्बस अमानत अली , वासी , जुनैद , सिकंदर पण आवडतात .
|
Tiu
| |
| Friday, August 24, 2007 - 2:21 pm: |
| 
|
संघमित्रा...ग नाही, रे दीपांजली, खरय खरय...मग तुम्ही देतच असाल त्यांना votes ... नसाल देत तर चालु करा... नाहितर देश एक महान गायकाला मुकेल! बिचारे पाकिस्तानि!!! आपल्या लोकांना काही अक्कलच नाही. इतक्या उच्च गाणारया गायकांना votes देउन जिंकवणं आपलं कर्तव्य आहे...भलेही ते शत्रुराष्ट्रातले असोत... ह्याच पाकिंमुळे आपल्या देशातल्या किती लोकांना जीव गमवावा लागलाय आणि पुढे किती लोकांना गमवावा लागणार आहे हे विसरुन त्यांच्या कलेचं कौतुक करणं ह्यातच आपल्या मनाचा मोठेपणा आहे. असं न करणे हे तुमच्या मनाच्या कोतेपणाचं लक्षण आहे. तेव्हा लोकांनो, उचला आपापले मोबाइल फोन आणि पाठवा sms तुमच्या आवडत्या पाकिस्तानि गायकाला. उगिच एका vote च्या फ़रकामुळे तो बिचारा महान गायक हरला तर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काही करता येणार नाही...
|
आपल्या लोकांना काही अक्कलच नाही. इतक्या उच्च गाणारया गायकांना votes देउन जिंकवणं आपलं कर्तव्य आहे...भलेही ते शत्रुराष्ट्रातले असोत... ह्याच पाकिंमुळे आपल्या देशातल्या किती लोकांना जीव गमवावा लागलाय आणि पुढे किती लोकांना गमवावा लागणार आहे हे विसरुन त्यांच्या कलेचं कौतुक करणं ह्यातच आपल्या मनाचा मोठेपणा आहे. असं न करणे हे तुमच्या मनाच्या कोतेपणाचं लक्षण आहे. तेव्हा लोकांनो, उचला आपापले मोबाइल फोन आणि पाठवा sms तुमच्या आवडत्या पाकिस्तानि गायकाला. उगिच एका vote च्या फ़रकामुळे तो बिचारा महान गायक हरला तर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काही करता येणार नाही... <<<<बरोब्बर !! मग तू पण दे बरं आधी त्यांना 1000 votes! sms code आहे कि सांगू ?? 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|