|
याकुब मेमनच्या सहानूभूतीदारांसाठी . . . http://www.rediff.com/news/2007/aug/07sheela.htm
|
Arch
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:34 pm: |
| 
|
चित्रपटाच्या नफ्याचा बहुतांश भाग फायनान्सरला म्हणजेच underworld लाच जातो. म्हणजे आपल्या तिकीटाच्या पैशातले काही रुपये तरी ही शस्त्रे आणण्यातच कारणी लागतात हे आपण का ध्यानात घेत नाही? म्हणजे आपले वर्तन कुर्हाडीचा दान्डा अन गोतास काळ असे नाही काय? .. RH खरच ह्याबद्दल विचार केला पाहिजे. स्वतःची करमणूक करत असताना हा विचार मनात का येत नाही? Quite thought provoking
|
Mansmi18
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:38 pm: |
| 
|
पार्टनर हा तीन वर्षे रखडलेला चित्रपट त्याने दिवस रात्र काम करून संपवायला लावला. ---------------------------------------------- पार्टनर मधे संजय दत्त होता? मला आठवत नाही.
|
रॉबीनहुडाने ईतके चांगले मुद्दे मांडुनही एका ठीकाणी संघ, हिंदुत्ववादी असे शब्द वापरुन खाजवुन घेतलेली दीसतेय. काही का असेना रॉबीनने न कळत संघाचीच बाजु उचलुन धरली व अप्रत्यक्षपणे संघाचाच प्रचार केल्याची शंका >>>> ती खरे तर गम्मत केली होती.संघाची बाजू उचलण्याचे कारण नाही त्यानी योग्य मुद्द्याची पाठराखण केली म्हणून लिहिले. कारण इथे संजय हिन्दू आहे म्हणून त्याला शिक्शा देऊ नये, कमी द्यावी अशी मांडणी केली जात होती त्या पार्श्वभूमीवर मूळ संघाची काय भूमिका आहे हे मला एका ब्रेकिंग न्यूजमध्ये दिसले ते मी लगेच टाकले. यात गोची झाली सेनेची.मुळात सेनेला स्वत:ची काही भूमिका नसतेच. त्यांचा सगळा प्रकार प्रतिक्रियावादी असतो. त्यामुळे पहिल्यापासूनच त्यांची अशी गोची होत आलेली आहे. आणिबानीच्या काळात आणिबाणीला आणि कॉन्ग्रेसला विरोध आणि इन्दिरा गांधीना वैय्यक्तिक पाठिम्बा असाही विनोद सेनेने केला आहे!(अटक टाळण्यासाठी!)मी कोणाचीच बाजू उचलून धरीत नाही. शक्यतो फॅक्ट्स मांडतो. सगळेच जवळून पाहिले असल्याने विचारसरणी मांडणारे ती सोयीस्कररीत्या गुंडाळून ठेवण्याचे काम वेळोवेळी सगळेच(हो, सगळेच )करतात. त्यामुळी आता कोणाची बाजू घेण्याची, तळी उचलण्याची आणि समर्थन करण्याची स्टेज आता गेली आहे.इथे केदार जोशी ही या स्टेजला आले आहेतसे मला वाटते.वयोमानानुसार बाकीच्यांचेही अभिनिवेश यथावकाश गळून पडतील अशी माझी खात्री आहे. आमचे कामगार चळवळीत काम करणारे एक मित्र आहेत. ते एकदा सांगत होते अहो, आम्ही विद्यार्थी चळवळीत तरुणपणी काम करीत होतो तेव्हा यशवन्तराव चव्हाण,वसन्तदादा पाटील याना शिव्या द्यायचो, त्याना चोर म्हणायचो. आताचे सर्वपक्षीय राजकारण पाहिले तर ती माणसे देवमाणसे होती असे वाटते. इंदीरा गांधींच्या बाबतीतही हा अनुभव हल्ली लोकाना येतो. एनी वे, एवढ्या धामधुमीत सन्तू कोठे दिसत नाही? खरे तर त्याला केवढी पर्वणी होती...
|
आता तरी त्याला जामीन मिळू शकेल कारण तो arms act मधे आत गेला आहे, टाडामधे नव्हे. >>> त्याला जामीन मिळू शकेलही पण तू जे काही लॉजिक दिले आहे त्याला फारसा अर्थ नाही. जामीन हा पूर्णपणे discretionary असतो. त्यामुळी अमक्या कायद्याखाली आहे म्हणू मिळेल अथवा मिळणार नाही असे नसते. काही ३०२ च्या म्हनजे खुनाच्या केसेसमध्ये जामीन झालेले आहेत. पूर्वी होत नसत. परवाच सुप्रीम कोर्टाने ३०२ च्या जामीनाबाबत खालच्या कोर्टाना खडसावले आहे.(देऊ नये म्हणून!) न्या. कृष्णा अय्यर यांनी एका landamaark judgment मध्ये जामीन हा नियम आणि जेल हा अपवाद हे ब्रम्हवाक्य वापरल्यापासून जामीनच जामीन झाले आहेत.. . दिनेश, उज्वल निकम यांचे असे म्हणने आहे की आरोपिंना या खटल्याचा निकाल लांबवायचा होता आणि त्यामुळे त्यांनी सर्व प्रयत्न केले>>> होय, त्यानी तसा प्रयत्न केलाय. पण आपले जजमेन्ट सुप्रीम कोर्टात टिकावे म्हणून न्या. कोदे यानी फार काळजी घेतली आहे.त्यामुळे नॅचरल जस्टीसच्या तत्वाचा कोठेही भंग होणार नाही याची त्यानी पुरेपूर काळजी घेतली आहे.म्हणून त्यानी आरोपीच्या सर्व अर्जांवर निर्णय दिले आहेत. हे जजमेन्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक अत्यन्त चांगले जजमेन्ट आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.कारण जगाच्या पाठीवर असली कृत्ये करणार्या लोकाना,चौकशीचा फार्स करून,थातूर मातूर केसेस चालवून, एकतर्फी निर्णय घेऊन खलास केले आहे, तुरुंगात डाम्बलेले आहे. अगदी मानवी हक्कांचा टाहो फोडणार्या अमेरिकेनेही अशी किती माणसे 'नाहीशी' केली आहेत. या निकालपत्राचा अभ्यास international level वर नक्कीच केला जाईल कारण एका लोकशाही राष्ट्रात देशद्रोह्याना कायद्याची बूज राखूनही कसा न्यायनिवाडा केला जातो त्याचा हा फार फार दुर्मीळ पुरावा आहे....
|
आता माढेकरांनी सुरुवात केलिच आहे तर यकुब मेमनच्या माहितिसाठी हेही वाचा http://www.indianexpress.com/sunday/story/208589._.html
|
Chyayla
| |
| Tuesday, August 07, 2007 - 10:48 pm: |
| 
|
संघाची बाजू उचलण्याचे कारण नाही त्यानी योग्य मुद्द्याची पाठराखण केली म्हणून लिहिले रॉबीन अगदी बरोबर मला पण त्यांचे बहुतेक योग्य मुद्दे व्यक्तिशा: पटतात म्हणुनच लिहितो. हिंदुन्मधे, हिन्दुत्वामधे सुदैवाने एकाच पोथीला, देवाला, विचाराना, धर्म, रीती मार्गाना माना असला अट्टाहास नाही किंवा जिहाद, क्रुसेड केल्याने जजमेंटच्या दीवशी न्याय मिळेल किंवा जन्नत मधे ऐश करता येइल असेही ब्रेन वॉशिंग नसते. म्हणुनच सतिश माढेकर सारखा किंवा ईतरही स्वता:चे मत निसंकोचपणे व्यक्त करतो त्यासाठी तो संघाकडे किंवा ईतर कोणावरही अवलम्बुन नसतो. तुम्ही ज्या Facts , स्टेज च्या गोष्टी करताहात, जेन्व्हा हिंदु समर्थनार्थ बोलताना किंवा मुस्लिम जिहादीन्विरुद्ध facts मांडताना कुठे जातात, व नेमक तुम्हाला काय होत? काही कळत नाही. असो मलापण ह्या Facts जाणवल्या म्हणुन हिन्दु-मुस्लिम याचा उदाहरणासाठी संदर्भ घेउन लिहिले. वैयक्तिक घेउ नका. तुमच्या मुद्यांचा मी पण आदरच करतो. असो विषयांतर झाले खरे. बाकी विषय चालु द्या.
|
त्यामुळी आता कोणाची बाजू घेण्याची, तळी उचलण्याची आणि समर्थन करण्याची स्टेज आता गेली आहे.>>>> सो आने सच रॉबीनहुड. फक्टस महत्वाचा. आपणही जर ईंतरांसारखे एखादी विचारसरनी आंधळेपणाने फॉलो करत राहीलो तर तो पण एक गुन्हाच. थोडे वर जाउन देशाच्या पातळीवर विचार केला की बरेच प्रश्न सुटतात / सुटतील.
|
आम्ही विद्यार्थी चळवळीत तरुणपणी काम करीत होतो तेव्हा यशवन्तराव चव्हाण,वसन्तदादा पाटील याना शिव्या द्यायचो, त्याना चोर म्हणायचो. आताचे सर्वपक्षीय राजकारण पाहिले तर ती माणसे देवमाणसे होती असे वाटते. शम्भर टक्के पटले. यशवन्तरावानी पत्नीला लिहिलेली पत्रे सकाळ मध्ये वाचली आणी त्यन्च्याबद्दल आदर वाटु लागला.
|
>>> न्या. कृष्णा अय्यर यांनी एका landamaark judgment मध्ये जामीन हा नियम आणि जेल हा अपवाद हे ब्रम्हवाक्य वापरल्यापासून जामीनच जामीन झाले आहेत.. कृष्णा अय्यर हे प्रख्यात मानवी हक्कवादी. परंतु त्यांनी स्वतःची वैयक्तिक तत्वे न्यायदानाचे काम करतान बाजूला ठेवायला पाहिजे होती. मला वाटते की १९८० च्या सुमाराला अमीरजादा च्या मुंबईतील टोळीतील गुंडांना खुनाच्या आरोपातून जामीन देताना " Bail and no jail should be the rule " असे उद्गार काढून कृष्णा अय्यर यांनी जामीन दिला होता. त्यानंतर त्यांच्या कृतीचा आधार घेऊन खतरनाक व्यावसायिक मारेकर्यांना सुद्धा जामीन देणे सुरू झाले ते आजतगायत. अमीरजादाने जामीनावर सुटल्यावर साक्षीदारांना धमकावून आपल्याविरुद्ध ते साक्ष देणर नाहीत याची तजवीज करून ठेवली. त्यानंतर मुंबईत जे टोळीयुद्ध पेटले ते आजतगायत चालू आहे. अर्थात जामीनावर सुटल्याचा अमीरजादाला तोटाच झाला कारण काही काळाने दाउदने त्याची हत्या घडवून आणली.
|
याच विषयाशी काहिसा संबंधित लेख . . . http://www.outlookindia.com/full.asp?fodname=20070813&fname=Cover+Story+%28F%29&sid=5
|
जामिना मागची भूमिका अशी की एक तर तोपर्यन्त तो फक्त आरोपी असतो. गुन्हा सिद्ध झालेला नसतो. त्यामुळे त्याच्या सिव्हिल लिबर्टीज गोठवू नयेत अशी संकल्पना. दुसरी प्रॅक्टीकल बाजू अशी की रोज लखो गुन्हे दाखल होतात याना ठेवणीर कुठे अन किती दिवस अन तेही सरकारी खर्चाने.? फक्त त्यांच्याकडून माहिती वस्तू रिकव्हर करण्यासाठी पोलीस कस्टडी अथवा न्यायिक कस्टडी दिली जाते पण तिलाही मर्यादा आहेत. तपासी यंत्रणेला मॅजिस्ट्रेटला ही गरज पटवून द्यावी लागते. दर वेळी मॅजिस्ट्रेट कन्व्हिन्स होतातच असे नाही.आता तुम्ही accident मध्ये माणूस मारला, जबाब तपास पूर्ण झाल्यानन्तर आरोपीकडे पोलीसांचे काही काम नसते. चार्जशीट जाईपर्यन्त आरोपीला डाम्बण्यात अर्थ नसतो म्हणण्यापेक्षा ते बेकायदेशीरच आहे. कारण शिक्षा झाल्याशिवाय कोणालाही जेलमध्ये कसे ठेवणार. क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बेलेबल आणि नॉन बेलेबल गुन्ह्याचे वर्गीकरण असते. शक्यतो अन्डरट्रायल काळ कमीत कमी असावा.पण दुर्दैवाने लखो कच्चे कैदी विना ट्रायल तुरुंगात आहेत, विनाचौकशी! हुकुमशाही राSट्रात तर विचारायचेच नाही. name the dog and kill him . पूर्वी ३०२ मध्ये जामीन मिळत नसे पण हल्ली काही केसेस मध्ये मिळतो. क्रूष्णा अय्यर यांचे म्हणणे चूक नाही, कारण न्यायमूर्तीपुढे असलेले गुन्हेगार मायबोली सदस्याइतकेच निकालाचे दिवसापर्यन्त निर्दोष धरावे लागतात. हा बदमाष आहे असे डोक्यात न्यायमूर्तीला ठेवून चालत नाही. त्यातल्या त्यात वरिष्ठ न्यायालये हे पथ्य,त्यात Human elemenT न आणण्याचे. एक तर त्यानी अंगिकारलेले तत्व इतर सर्व केसेस मध्ये पूर्वोदाहरण म्हणून अन कायदा म्हणूनही वापरले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या माणसांकरता असे discrimination करता येत नाही. मूलत्: भारतीय माणसाची मनोवृत्ती आपल्या हातून कोनावर अन्याय होऊ नये अशी असते. त्याचे प्रतिबिम्ब न्यायव्यवस्थेतही दिसते. पण जामीन हा विषयच सापेक्ष आहे,...
|
Sunilt
| |
| Friday, August 10, 2007 - 12:50 am: |
| 
|
अखेर १४ वर्षांनी का होईना पण बॉम्ब्स्फोटातील गुन्हेगारांना शिक्षा झाल्या हे बरे झाले. त्यातून संजय दत्त सारखा celebrity देखील सुटला नाही हेही बरेच झाले. आता, बाबरी-विध्वंस आणि मुंबई दंगलीतील गुन्हेगारांनादेखील यथायोग्य शिक्षा होतील ही अपेक्षा. सर्वोच्च न्यायालयाने श्रीकृष्ण आयोगासंदर्भात महाराष्ट्र सरकारचे कान धरले आहेतच! चित्रपट celebrity प्रमाणेच राजकीय celebrities ना समान न्याय लावताना भारतीय न्यायसंस्थेचा कस लागणार हे खरे!!!
|
मला तरी अजूनही सगळी लांडीलबाडीच वाटते आहे. हाय कोर्टाने शिक्षा द्यायची आणि सर्वोच्च ने अमूक अमूक गोष्टीचा आधार घेऊन सोडायचे असच आधी ठरल असेल. ही चाल खूप आधी जेंव्हा त्याला टाडामधून मुक्त केले तेंव्हाच ठरली असेल. टाडातून मोकळे करणे हा देखील त्यातलाच एक भाग कारण टाडा असला तर सोडता येणार नाही. निकालाला किती वर्षे लागतील ते कोणालाच माहीत नाही, पण तोपर्यंत नीट वाग मग तुला सोडता येईल हे देखील ठरले असणार.
|
संजय दत्तला शेवटी सर्वोच्च न्यालयाकडून जामीन मिळाला. http://www.rediff.com/news/2007/aug/20verdict.htm आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होईल तेव्हा तो निर्दोष सुटला पाहिजे.
|
हो, म्हणजे उगाच गांधींच्या मार्गावर चललेल्या सत्यवाद्यावर असे अत्याचार नकोत... 
|
Zakki
| |
| Monday, August 20, 2007 - 1:36 pm: |
| 
|
सिनेमा सत्यं, कायदा मिथ्या!
|
अगदी निर्दोष सोडणार नाहीत. पण ते कोणाला पाहीजे आहे. तुरुंगात नको म्हणजे झाले. बेलवर राहून त्याला काहीच त्रास झालेला नाहीये गेले कित्येक वर्ष.
|
Uday123
| |
| Monday, August 20, 2007 - 5:48 pm: |
| 
|
देश एका भावी (होऊ घातलेल्या) महात्म्याला मुकला, मुन्शी-सिब्बल कडे आता दिवाळी.
|
Disha013
| |
| Monday, August 20, 2007 - 7:08 pm: |
| 
|
सोडला संजुबाबाला शेवटी!! एवढी चर्चा फ़ुकटच झाली म्हणाय्ची या बीबीवर. तो बेलवर वावरतोय हे पण विसरतील लोक काही दिवसांनी.
|
Yashwant
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:19 am: |
| 
|
सातारा येथे डीडी सिन्ग कलानी ला चकमकीत उडवले. या अगोदर त्याला दोन वेळा जामीन मीळाला होता. अशा लोकन्ना जामीन मिळाला तर त्यान्च्या पासुन त्यान्ना पकडनार्या पोलिसान्ना आणि त्यान्च्या कुटुम्बाला किती धोका असु शकतो याचा पन विचार व्हायाला हवा.
|
Maanus
| |
| Thursday, May 01, 2008 - 11:52 pm: |
| 
|
संजय दत्त, महाराष्ट्र दीन साजरा करतानाचे फोटो. http://www.filmicafe.com/admin/event-images/images/24-2087504699.JPG http://www.filmicafe.com/admin/event-images/images/44-355670302.JPG http://www.filmicafe.com/admin/event-images/images/30-1548423942.JPG http://www.filmicafe.com/admin/event-images/images/29-108865841.JPG http://www.filmicafe.com/admin/event-images/images/27-414589311.JPG
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|