Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 10, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through May 10, 2007 « Previous Next »

Zakki
Wednesday, April 25, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिण अफ्रिका सर्व बाद १४३! टेटला ४ विकेट्स, मॅग्राथला ३!

आता इथे प्रश्न असा की तुम्हाला ऑस्ट्रेलिया जास्त आवडत नाही की श्री लंका जास्त आवडत नाही?

मागे सिंपसन कार्टूनवर त्याची दोन मुले भांडत असतात. तो विचारतो कसला वाद घालत आहात? मुले सांगतात आम्ही Who loves you more, Dad याबद्दल वाद घालत आहोत. बाप खूष होऊन म्हणतो, वा, वा, चालू द्या. मग मुले पुन: चालू करतात: you love him more ! No, you love him more !!


Robeenhood
Wednesday, April 25, 2007 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आला रे आला घासलेटावाला आला!!

Atul
Wednesday, April 25, 2007 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AUS WC2007 जिन्कता कामा नये, माझा पुर्ण पाठिम्बा लन्केला!
फक्त तो मलिन्गा अम्पायर च्या कानाखाली कधी मारतो हे मला बघायचे आहे. बोलिन्गच्या वेळी त्याचा हात जवळपास तिकडेच असतो:-)


Ganeshbehere
Thursday, April 26, 2007 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारे बाबा नो सगळे आस्ट्रेलिया च्या मागे लागले, का तर ते चांगले खेळतात म्हणुन.....
शेवटी जो जिता वो सिंकदर.... खेळाडु व्रुतीने घ्या.... खरच आजच्या घडिला त्यांच्या टिम ला तोड नाहि.....



Zakki
Thursday, April 26, 2007 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री लंका पण चांगले खेळतात. मला ऑस्ट्रेलिया आवडत नाही कारण ते लोक कसे वागले आपल्या शरद पवारांबरोबर ते माहित आहे ना!
एरवीहि, वरील रॉबिनहूड यांचे लिहीलेले वाचा. १०० टक्के खरे आहे. ऑस्ट्रेलियाला गेला असाल तर जाणवलेच असेल.
मला खरे तर भारत जिंकलेलाच आवडला असता, पण .. .. .. !


Yog
Thursday, April 26, 2007 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Australia is too good....... वर्ल्ड कप मधे अजून एकही सामना न हारून, किम्बहुना सर्व सामने अगदी convincingly जिन्कून कप चे खरे हकदार कोण आहेत हे त्यानी आधीच सिध्ध केल आहे. आता final मधे चुकून लन्केने त्याना हरवलच तर तो चमत्कार असेल.. still, i think Aussi's play have shown who's the best. वयाच्या अडोतीसाव्या वर्शीही यन्त्राप्रमाणे अचूक गोलन्दाजी करणारा McGrath निवृत्त होणार आहे म्हणे. तेव्हा या महान गोलन्दाजाच्या क्रिकेट कारकीर्दीचा शेवटचा सामना final बघायला विसरू नका..
मला वाटत मुरलीने जादू केली तर बहुतेक लन्का जिन्केल अन्यथा the writing is on the wall!
भारतासाठी सध्ध्या Cricket Idol नावाची पोकळ स्पर्धा चालू करून त्यातून निवड करणे एव्हडेच शिल्लक आहे. तेही होईलच.. स्पर्धेत हातात bat च्या जागी विटी दान्डू दिला नाही म्हणजे मिळवल.
:-)

Ganeshbehere
Thursday, April 26, 2007 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑस्ट्रेलियाला गेला असाल तर जाणवलेच असेल.>>>>>>>>>>>>>>>

मी दोन वर्षापासुन इंथ आहे पण अजुण तस काही जाणवले नाही,

तुम्हालाच काय, पण सगळ्यांनाच (भारतीय) भारत जिंकलेला आवडला असता, पण..................!
मान्य आहे की त्यांनी कप जिंकल्याचा आनंदात शरद पवांरान सोबत जे केले ते चांगले नव्हते.... आणि अजुन काहि वाईट गुण हि असतिल, पण आजच्या घडीला त्यांच्या सारखि टिम नाहि हो.....
माझ्या मते फ़ायनल मधे श्रीलंका दबावा खाली खेळेल.... आणि त्याचा पुरेपुर फ़यदा अस्ट्रेलिया घेईल......
चु. भु. दे. घे..........




Satishmadhekar
Thursday, April 26, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> काही का असेना, श्रीलंकेचा संघ मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे शक्यतो दक्षिण आफ्रिका किंवा निदान ऑस्ट्रेलिया तरी जिंकावेत अशीच इच्छा
>> का रे बाबा? त्यांचा खेळ वाईट आहे का?ते दिसायला हॅन्डसम नाहीत मात्र. ते स्लेजिंग करतात का? ते बिचारे नम्र आहेत.त्यांच्यात मेरिट नाही का?
केवळ तुला आवडत नाही म्हणून त्यानी जिंकू नये या विचाराला काय म्हणावे?

रॉबीनहूड,

काय हे! तुम्ही खेळावरून कुठल्याकुठे जाऊन पोचलात! श्रीलंकेचे खेळाडू न आवडण्याचा आणि त्वचेच्या रंगाचा काहिही संबंध नाही. तो जर असता तर लारासारख्या खेळाडूंचा तर आयुष्यभर तिरस्कारच करायला लागला असता. एखाद्याला लारा आवडत असेल आणि पॉंटिंग आवडत नसेल तर तो सर्ववर्णसमभावी किंवा निवर्णी समजायचा का?

श्रीलंकेचे बहुसंख्य खेळाडू आणि त्यांचा खेळ मला आवडत नाही. त्यामुळे ते जिंकू नयेत असं वाटलं तर त्याच्यात चुकीचं काय? एखाद्याला शारापोव्हाचा खेळ आवडत असेल आणि सेरेना विल्यम्सचा आवडत नसेल, तर शारापोव्हा जिंकावी असे तो म्हणाला तर तो लगेच वर्णद्वेषी झाला का? किंवा सेरेना जिंकावी म्हणणारा लगेच सर्ववर्णसमभावी किंवा निवर्णी किंवा न्यायी विचारांचा झाला का? हा तर समाजवाद झाला. तुमचा आयडी वापरून बाबा आढाव किंवा भाई वैद्य तर लिहीत नाहीत ना असेच क्षणभर वाटले! :-(


>> वास्तविक हे गोरे, हडेलहप्पीशिवाय त्यांच्याकडे काय गुण आहेत. खेळाच्या संस्कृतीला त्यानी काय योगदान दिले? कोणी काळा चांगला खेळू लागला की त्यांच्या शैलीवर शंका घेणे आणि त्याला करीअरमधून हुसकावून लावणे हे त्यांचे पहिले काम. कोणत्या गोर्‍या खेलाडूची शैली शंकास्पद आहे असे आरोप झाले?
म्हणजे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा
येरांनी वहावा भार माथा..

शैलीवर फक्त गोरेच शंका घेत नाहीत. गावसकरसारख्या "काळ्या" खेळाडुनेही शोएब अख्तर आणि ब्रेट ली फेकतात असे अनेकवेळा जाहीररीत्या सांगितले आहे. क्रिकेट हे मैदानाप्रमाणेच मैदानाबाहेरही खेळले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे सामन्याच्या एक्-दोन दिवस आधी प्रतिस्पर्ध्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात फारसं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. दुर्दैवाने भारतीय उपखंडातले खेळाडू अशा गोष्टी फारच मनाला लावून घेतात. त्यांचा देशही त्यांच्यामागे उभा रहात नाही. काही वर्षांपूर्वी राजेश चौहानच्या शैलीवर शंका घेतल्यावर त्याच्यामागे उभे राहण्याऐवजी आपल्या मंडळाने त्याला डच्चू देण्याचा मार्ग काढला आणि त्याची कारकीर्द बरबाद झाली. यामागे गोर्‍यांविषयी आपल्या मनात असलेला न्यूनगंडच कारणीभूत आहे. याउलट ऑस्ट्रेलियावर जेव्हा जेव्हा शिवीगाळ करण्याबद्दल टीका होते, तेव्हा प्रत्यक्ष ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आपल्या संघाचे समर्थन करतात. मैदानाबाहेरच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याला सडेतोड उत्तर देणे आवश्यक असते. त्याऐवजी "काळे" खेळाडू ही टीका गंभीरपणे घेतात. भारतात आतापर्यंत गांगुली हा एकमेव खेळाडू जशास तसे उत्तर देण्यात पटाईत होता. अनेक वेळा त्याने स्टीव वॉला परखड उत्तर देऊन गप्प बसवले होते. या उलट मुरलीधरनच्या शैलीवर शंका घेतल्यावर तो त्या भीतीने मागच्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेलाच नाही.

मी एखाद्या खेळाडूचा खेळ आवडून घ्यायचा का नाही हे त्या खेळाडूच्या रंगावरून ठरवत नाही. मला वेस्ट इंडिजच्या अनेक खेळाडूंचा मनापासून आवडतो (ते काळे असून सुद्धा!). अनेक गोरे खेळाडू पण आवडतात. काही गोर्‍या आणि काळ्या खेळाडूंचा खेळ अजिबात आवडत नाही. त्यात त्यांच्या त्वचेच्या रंगाचा काडीमात्र संबंध नाही. प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असू शकते. त्यावरून एखादा संकुचित किंवा विशाल विचारांचा हे ठरवता येणार नाही.


>> वास्तवीक काळा तितुका मेळवावा, गुणदोषांसह स्वीकारावा, गोरा तितुका गाडावा हे आपले धोरण असले पाहिजे.
>> शरद पवारांचे उदाहरण तर ताजेच आहे.

हे तर मला अजिबातच मान्य नाही. शरद पवारांच्या उदाहरणाविषयी मी एवढच म्हणेन की ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपल्या विजयी संघाचे एकत्र छायाचित्र काढायचे होते. चॅंपियन करंडक त्यांनी पहिल्यांदाच जिंकला होता. त्यांच्या छायाचित्रामध्ये पवारांनी घुसण्याची गरज नव्हती. बीसीसीआयचे अध्यक्ष असले म्हणून काय झालं? त्यांच्या संघाच्या छायाचित्रात पवार गेले नसते तरी काही बिघडलं नसतं. अर्थात ते असते तरीसुद्धा काहिही बिघडलं नसतं. पण विजयी संघाच्या छायाचित्रात खेळाडू सोडून इतर कशाला? हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. याविषयी इतरांची मते पूर्णपणे वेगळी असू शकतात. मी फक्त माझे मत मांडले आहे. पवार, राजीव शुक्ला यांच्यासारख्या क्रिकेटशी अजिबात संबंध नसलेल्या व्यक्तीने बीसीसीआयवर जाऊ नये असे माझे व्यक्तीगत मत आहे. त्यांच्या अज्ञानामुळे क्रिकेटचे नुकसानच होण्याचा जास्त संभव आहे कारण त्यांच्यासारखे राजकारणी प्रत्येक व्यासपीठाचा राजकारणासाठीच दुरुपयोग करणार. असो. हा आपल्या चर्चेचा मुद्दा नाही.

>> सतीश ही तुझी भूमिका म्हणजे बसमध्ये आपल्याला नेहमी भेटणारा पण अनोळखी माणूस आपल्याला अकारण आवडत नसतो तशी आहे असे मला वाटते त्याला काही लॉजिक नाही...

माझे लॉजिक म्हणजे मला श्रीलंकेच्या बहुसंख्य खेळाडूंचा खेळ आकर्षक वाटत नाही (कुमार संगकाराचा अपवाद). ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंचा खेळ मला आवडतो. त्यामुळे श्रीलंका हरावे असे वाटण्यात काहिही चुकीचे किंवा वर्णद्वेषी नाही. श्रीलंकेच्याऐवजी वेस्ट इंडिज अंतिम फेरीत आले असते तर मला ऑस्ट्रेलिया हरलेले आवडले असते. या मागचे लॉजिक तुम्हीच शोधा.

एकच नम्र विनंती, या व्यासपीठावर एखाद्याच्या आवडीनिवडीमागे वर्णद्वेषाची कारणमीमांसा लावू नका.


>> तर काय जय श्री लंका!!!

तर काय जय ऑस्ट्रेलिया!!! :-)




Zakki
Thursday, April 26, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, तुमचे खरे आहे. वर्णद्वेशासाठी, संकुचित् मनांसाठी हा BB नाही. खरे तर वर्णद्वेष, संकुचित् मने असूच नयेत.

पण सगळे लोक जोपर्यंत तसे होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासाठी एक वेगळा BB उघडाल का? तिथे सगळे मुद्दे, वर्णद्वेष, धर्मद्वेष, जातिद्वेष, संकुचित् मने, यांच्या आधारावर मांडले जातील!!!

कारण सगळे लोक असे विशाल बुद्धीचे व्हायला बरीच वर्षे लागतील. तसे झाले की अर्थात सगळे BB बंद करावे लागतील. कारण इस्लामी लोकांना समजून घ्या, राखीव जागा ठेवाव्यात की नाही, धूम्रमान करणे चांगले की वाईट असे सर्व प्रश्नच सुटतील. काय वाट्टेल ते घडले तरी विशाल मनाच्या जोरावर सगळ्यांना ते योग्यच वाटेल, मग त्यात चर्चा करण्यासारखे काय?

(आता नुसते विशाल पोटाचे व्हायचे असेल तर ते लवकर जमेल, त्यासाठी BB उघडायची गरज नाही.)


Mansmi18
Thursday, April 26, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला स्वत:ला श्रीलन्का जिन्कावी असे वाटते पण आपल्याला वास्तवाला सामोरे जायलाच हवे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडु उद्धट आहेत वर्णद्वेशी आहेत हे सारे जरी मान्य केले तरी मैदानावर ते तोन्डापेक्षा खेळातुन जास्त बोलतात. आतापर्यन्त त्यानी ज्या माचेस जिन्कल्या आहेत त्या दिमाखात जिन्कल्या आहेत. म्हणुन आपल्याला काहीही वाटले तरी सध्या तरी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड वाटते.
(गर्वाचे घर खाली वगैरे म्हणी ठीक आहेत पण बहुतेक खेळताना हे खेळाडु गर्व डोक्यात जाउ देत नाहीत त्यामुळे ते हरणे जरा कठीणच आहे).


Mbhure
Thursday, April 26, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत मुळ मुद्दा वर्णद्वेश
आपेक्षा " दादागिरी " चा आहे. ते एखाद्या खेळाडूत जसे दोष दाखवतात तसे इतर का करत नाहीत? किंवा का करु शकत नाहित? आपले ७० % पत्रकार कुठच्याही परदेशिय खेळाडूकडून आपल्या खेळाडूंचे कौतुक का करवून घेतात? सचिन किंवा इतर खेळादूचे approval रिचर्डस् किंवा वॉर्नकडून आपण घेतो आणि त्यात अप्रूप मानतो. आपणच गोर्‍यांच्या बरोबरीने न वागता त्यांना डोक्यावर चढवतो.

तसेच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि मॅनेजर दाखवत असलेल्या अभ्यासू वृत्तीचा आणि मैदानावरील शिस्तीचा आपल्याकडे अभावच आहे. आणि श्रीकंकेला वर आणणारा मॅनेजरही गोराच होता.

१९८३ मध्ये भारताची ताकद एका ऑस्ट्रेलियनेच ओळखही होती. त्यावेळेचा कप्तान किम ह्युजने WORLD CUP च्या सुरुवातीलाच भाकित केले होतेः Careful, India is Dark Horse



Gobu
Thursday, April 26, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोबिनहूड,
छान लिहीलेत तुम्ही!
विषेश्त्: गोर्‍या लोकान्च्या मनोवृत्ती बद्दल
पटले बुवा आपल्याला
सतीशचे पण काही मुद्दे जरुर पटण्यासारखे आहेत
असो,
मला तरी अस वाटत की त्या दिवशी सर्वात चान्गला खेळ करणारी टीम जिन्कावी, मग ती कोणतीही असो!!!
शेवटी हा खेळ आहे!


Vikas_chaudhari
Thursday, April 26, 2007 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीहि झालं तरी गेली १० वर्षं ऑस्ट्रेलियाचा संघ सतत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांचे वाइट गुण पहाण्यापेक्षा त्यांच्या यशाचं गुपित शोधायला हवं

Mukund
Sunday, April 29, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे होणार हे सगळ्यांनाच ठाउक होते तेच झाले.... या विश्वकरंडकात फक्त एकच संघ जगज्जेत्या सारखा खेळत होता व जिंकण्याच्या योग्यतेचा होता... आणी तोच संघ जिंकला.

पण ज्या पद्धतीने व कुठलीही दयामाया न दाखवता गिलख्रिस्ट ने जी झंझावाती खेळी केली व ज्या पद्धतीने त्यांनी श्रिलंकेला धुळ चारली त्याने एकच विचार मनात आला... हा ऑस्ट्रेलियाचा संघ एका वेगळ्याच स्तरावर आहे व बाकीचे संघ तळागाळाला दाटीवाटीने गर्दी करुन आहेत.... फारच मोठी तफ़ावत आहे त्यांच्यात व बाकीच्या संघात.... याला स्पर्धा म्हणणे म्हणजे स्पर्धा या शब्दाचा अपमान करण्यासारखे आहे...
This was a completely one sided affair....no contest....

ऑस्ट्रेलियन खेळाडुंचा जिंकल्यानंतरचा जल्लोश बघुन मला तर हसुच आले व दोन उपमा सुचल्या...
शाळेत मोठी डांगरट पोर लहान मुलांवर मारामारीत विजय मिळवुन जल्लोश करत आहेत असे वाटले व दुसरी उपमा अशी की एका वर्गात... की जो सगळ्या ढ मुलांनी भरलेला आहे.. त्या वर्गात एका स्कॉलर मुलाने ५०० पैकी ४९० गुण मिळवुन पहिला नंबर काढला आहे( दुसरा नंबर आलेल्याला २४० म्हणजे त्याच्या निम्म्या इतकेही गुण मिळाले नाहीत!) व तो स्कॉलर मुलगा अशा मुलांमधे पहिला नंबर मिळाला तरीसुद्धा जोरजोरात आनंदाने उड्या मारत आहे.. तसेच आज ऑस्ट्रेलियाच्या नाचणार्‍या विजयी खेळाडुंकडे बघुन वाटले...:-)


Ganeshbehere
Sunday, April 29, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद बरोबर आहे...........
मला वाटते पुढ्च्या वर्ल्ड कप चे पण दावेदार तेच राहतील.........कारण इतर संघ त्यांच्या जवळ पास पण नाहित........


Satishmadhekar
Sunday, April 29, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक तुमच्या लक्षात आलं असेल. ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर त्यांच्या संघाचे फोटो काढले जात होते, तेव्हा एकही क्रिकेटचा पदाधिकारी मध्ये घुसला नाही. आयसीसी चे चिटणीस, अध्यक्ष व अनेक महत्वाची मंडळी तिथे उपस्थित होती, परंत्य त्यांच्यापैकी कोणीही फोटोत घुसायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे कुणाला धक्काबुक्की करायचा प्रश्नच उद्भवला नाही.

Satishmadhekar
Monday, April 30, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://content-ind.cricinfo.com/ci/content/current/story/292875.html

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल की बारामतीची जिल्हा परिषद?

आता म्हणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयसीसीच्या माल्कम स्पीड विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणणार! :-)

शरद पवार आणि त्यांचे राजकारणी चेले आयसीसीत भारतातल्या घाणेरड्या राजकीय खेळ्या सुरू करत आहेत असं दिसतयं.


Farend
Monday, April 30, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता काही दिवस धमाल येईल. हा आरोप म्हणजे राज्य सरकारने केंद्र सरकारवर नोकरशाही बद्दल तक्रार करण्यासारखे आहे. आणि प्रत्यक्ष राजकारणाप्रमाणे वरची तक्रार आणि आतील मूळ agenda वेगळाच असणार. अध्यक्ष आशिया किंवा आफ्रिका मधला असावा (म्हणजे BCCI चा असावा) असा सूर काढलेलाच आहे. अर्थात तसे झाले तर काही अर्थाने चांगलेच होईल, विशेषत: on field behavior बद्दल आशियाई संघांना मिळणारी दुय्यम वागणूक कमी होईल. मैदानावरचे खेळाडूंचे वर्तन हे नेहमी इंग्लंड वगैरेच्या on field manners च्या दृष्टिकोनांतून पाहिले जाते, म्हणजे एकूण त्यांच्या खेळाडूंची जी aggressiveness दाखवायची पद्धत आहे ती "चालेल" आणि इतरांची नाही असा एक अलिखित नियम आहे तो बदलू शकेल.

अर्थात मग ICC मधे भारताचे वजन वाढवायला नेपाळ आणि भूतान ला कसोटी क्रिकेट दर्जा दिला जाईल :-)


Satishmadhekar
Friday, May 04, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचा

http://www.rediff.com/cricket/2007/may/04bcci.htm

भारतीय खेळाडूंनी नवीन करारावर सही करायला नकार दिला म्हणे. कामगिरीनुसार मानधन आणि फक्त ठराविक जाहिरातींमध्येच काम करायचं या दोन अटी त्यांना मान्य नाहीत म्हणे.

वास्तविक पाहता कामगिरीनुसार मानधन ही अट बरोबर आहे. पण फक्त मर्यादित जाहिरातींमध्येच काम करायचं ही अट कशाला?

मुख्य म्हणजे बीसीसीआयच्या ज्या लोकांनी या नवीन अटी टाकल्या आहेत ते एका वेळी किती दगडांवर पाय ठेवून आहेत? कृषिमंत्री, बीसीसीआयचे अध्यक्ष, अन्न मंत्री
. . . यादी करावी तितकी थोडीच आहे. परत हे साहित्य संमेलन, नाट्य संमेलन इथे पण असतात. मग यांच्यावर बंधन नको का की फक्त एक्-दोन क्षेत्रातच काम करायचं?

आणि कामगिरीनुसार मानधन हा नियम जर बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांना लागू केला तर बहुतेकांना फाके पडायची वेळ येईल.

लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण आपले कोरडे पाषाण अशी यांची अवस्था आहे. बरं झालं खेळाडूंनी करार नाकारला ते!


Mansmi18
Thursday, May 10, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुश्श पहिली माच कशीबशी जिन्कलो.

पन बुन्द से गयी सो हौद से नही आती:-(


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators