आणि कोच असून उपयोग काय? जॉन राईट ५ वर्षं भारतीय संघाला प्रशिक्षण देत होता. ५ वर्षात गांगुलीची ऑफ स्टंपाच्या बाहेरच्या चेंडूला बॅट लावून स्लीप मध्ये किंवा यष्टीरक्षकाकडे झेल द्यायची सवय गेली नाही. बाऊन्सर तर गांगुलीला अजूनही नीट खेळता येत नाही. गेली ६-७ वर्ष हरभजन एकाच पद्धतीने गोलंदाजी करतो. त्याचे सर्व चेंडू एकसारखेच प्रभावहीन असतात. त्याला कधी यष्टीच्या दुसर्या बाजूने किंवा कमीजास्त वेगाने गोलंदाजी करताना पाहिलेच नाही. सेहवाग आणि लक्ष्मण अजूनही जागच्याजागी उभे राहून अजिबात पाय न हलविता खेळतात. इतकी वर्षे खेळून सुद्धा कुंबळेची फलंदाजी सुधारायच्या ऐवजी दिवसेंदिवस जास्तच बिघडत चालली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये वेळ पडली तर सर्व ११ जणांनी फलंदाजी करणे आवश्यक असते. आपल्याकडे शेवटचे ४-५ जण तर फलंदाजीत नुसती हजेरी लावतात. गेली ६-७ वर्षे परदेशी प्रशिक्षक असून बहुतेक खेळाडूंचा क्षेत्ररक्षणामध्ये आनंदच आहे. जर इतक्या वर्षात या खेळाडूंमध्ये काडीचाही फरक पडला नसेल, तर उपयोग काय त्या कोचचा?
|
आजच्या सामन्यात श्रीलंका हरायला पाहिजे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड मध्ये अंतिम सामना व्हावा हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!
|
भारतीय टीमला कोचिंग करणे म्हणजे दगडाला तूप चोळण्याचा प्रकार आहे...
|
आजच्या सामन्यात श्रीलंका हरायला पाहिजे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड मध्ये अंतिम सामना व्हावा हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना! >>>>> म्हणजे बघा! माळयाची मका अन कोल्ह्यांची भांडणे अशातला प्रकार!!
|
Farend
| |
| Tuesday, April 24, 2007 - 6:14 pm: |
| 
|
जयवर्धने काय मस्त खेळलाय आज! NZ ची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अगदी फालतू, 90s मधे भारत पाकिस्तान विरुद्ध करायचा तसे, पण तरी जयवर्धने ची आजची खेळी ते जर जिंकले तर वर्ल्ड कप मधील सर्वोत्तम खेळींपैकी एक समजली जाईल.
|
Maitreyee
| |
| Wednesday, April 25, 2007 - 2:31 am: |
| 
|
कसली सही जिंकली श्रीलंका!! खल्लास एकदम!!
|
Mandard
| |
| Wednesday, April 25, 2007 - 4:54 am: |
| 
|
आजच्या सामन्यात श्रीलंका हरायला पाहिजे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड मध्ये अंतिम सामना व्हावा हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना! ------- सतिश तुमची प्रार्थना आकाशातल्या देवाने एकली नाही. लंकेने न्युझिलंडला झोपवले की. आता अंतिन सामना लंका आणि कांगारु मधे होउन लंका विजयी होइल असे वाटते.
|
न्यूझीलंड हरल्यामुळे माझी घोर निराशा झाली. शेवटच्या १४ षटकांमध्ये श्रीलंकेने १३३ धावा झोडपल्या. शेवटच्या १४ षटकात न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अतिशय वाईट झाली. पंचांचीही श्रीलंकेलाच साथ होती. न्यूझीलंडच्या फलंदाजीत एकून ३ पायचीतचे निर्णय (टेलर, फ्लेमिंग आणि मॅकलम) संपूर्ण चुकीचे होते. मुरलीने स्वत:च्या गोलंदाजीवर घेतलेल्या झेलाचा (ओरामचा) आधी जमिनीवर टप्पा पडलेला होता. श्रीलंका जिंकल्याचे ख़ूपच वाईट वाटले.
|
फ्लेमिंगने एकदिवसीय सामन्यांसाठी न्यूझीलंडचे कर्णधारपद सोडले. या विश्वचषकात आजपर्यंत एकही सामन्याचा मनासारखा निकाल लागलेला नाही. निदान आता अंतिम सामना तरी दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया जिंकू देत!
|
Farend
| |
| Wednesday, April 25, 2007 - 6:19 am: |
| 
|
सतिश भारत वि बर्मुडा सामन्याचा लागला की तो मुरली चा कॅच इथे Dish वर एक दोन angle मधूनच दाखवला आणि नीट कळले नाही की मधे जमिनीवर पडला का ते. बाकी त्या चमारा सिल्वा चा तो एक कॅचही मस्त होता.
|
निदान आता अंतिम सामना तरी दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया जिंकू देत!>> ते सर्वस्वी टॉस कोण जिंकेल यावर अवलंबुन आहे.. मुरली असताना श्रीलंकेला १ली फलंदाजी घेउन जिंकणे सहज आहे.. मग ऑस्ट्रेलिया असो वा आफ्रीका.. तेव्हा सतिश.. अंतिम सामन्यात श्रीलंकेची दुसरी बॅटींग येईल अशी प्राथ्रना कर रे.. 
|
Bee
| |
| Wednesday, April 25, 2007 - 8:44 am: |
| 
|
माढेकर, welcome back! इतके दिवस कुठे गहाळ झाला होतात
|
>>> निदान आता अंतिम सामना तरी दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया जिंकू देत! >> ते सर्वस्वी टॉस कोण जिंकेल यावर अवलंबुन आहे.. मुरली असताना श्रीलंकेला १ली फलंदाजी घेउन जिंकणे सहज आहे.. मग ऑस्ट्रेलिया असो वा आफ्रीका.. तेव्हा सतिश.. अंतिम सामन्यात श्रीलंकेची दुसरी बॅटींग येईल अशी प्राथ्रना कर रे.. जर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचले तर, पहिली फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण, तेच जिंकणार हे नक्की. जर दक्षिण आफ्रिका आले तर, त्यांनी प्रथम फलंदाजी करावी. श्रीलंकेने बहुतेक सामन्यात प्रथम फलंदाजी करून २५० च्या आसपास धावा केल्या आणि नंतर प्रतिपक्षाची भंबेरी उडविली. श्रीलंकेची प्रथम फलंदाजी करून जिंकण्याचा इतिहास माहिती असून सुद्धा भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज इ. संघांनी नाणेफेक जिंकून सुद्धा श्रीलंकेला प्रथम फलंदाजी दिली आणि स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेतली. काही का असेना, श्रीलंकेचा संघ मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे शक्यतो दक्षिण आफ्रिका किंवा निदान ऑस्ट्रेलिया तरी जिंकावेत अशीच इच्छा आणि अपेक्षा आहे आणि हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना!
|
काही का असेना, श्रीलंकेचा संघ मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे शक्यतो दक्षिण आफ्रिका किंवा निदान ऑस्ट्रेलिया तरी जिंकावेत अशीच इच्छा >>>> का रे बाबा? त्यांचा खेळ वाईट आहे का?ते दिसायला हॅन्डसम नाहीत मात्र. ते स्लेजिंग करतात का? ते बिचारे नम्र आहेत.त्यांच्यात मेरिट नाही का? आता तू कालच्या सामन्यात चुका काढल्या आहेत त्या बरोबरही असतील कदाचित... मग श्री लंका आता पर्यन्त जिंकली ते कशाच्या बळावर? केवळ तुला आवडत नाही म्हणून त्यानी जिंकू नये या विचाराला काय म्हणावे? वास्तविक हे गोरे, हडेलहप्पीशिवाय त्यांच्याकडे काय गुण आहेत. खेळाच्या संस्कृतीला त्यानी काय योगदान दिले? कोणी काळा चांगला खेळू लागला की त्यांच्या शैलीवर शंका घेणे आणि त्याला करीअरमधून हुसकावून लावणे हे त्यांचे पहिले काम. कोणत्या गोर्या खेलाडूची शैली शंकास्पद आहे असे आरोप झाले? म्हणजे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी वहावा भार माथा.. असेच ना. अशा लोकांबद्दल का सहानुभूती वाटावी कळत नाही.गावसकरने ब्रॅडमनचे रेकॉर्ड मोडल्यावर बॉर्डरने म्हणावे ब्रॅडमनचे रेकॉर्ड तोडण्याचा विचारही मनात आणणे पाप आहे.. ही यांची दानत. न्यू झी लंडला ठळक वर्चस्व नसल्याने अशी गुरगुर कधी करता आली नाही पण वृत्ती तीच. तसेच द. आफ्रिकेचे. वास्तवीक काळा तितुका मेळवावा, गुणदोषांसह स्वीकारावा, गोरा तितुका गाडावा हे आपले धोरण असले पाहिजे. कोणाला ही चर्चा म्हणजे खेळबाह्य वर्णवाद वाटेल पण हे गोरे जिथे तिथे तुम्हाला तुच्छ लेखून वंशवाद नाही तर काय दाखवतात?अशांना वंशवादाच्या जोड्यानेच मारले पाहिजे. शरद पवारांचे उदाहरण तर ताजेच आहे. सतीश ही तुझी भूमिका म्हणजे बसमध्ये आपल्याला नेहमी भेटणारा पण अनोळखी माणूस आपल्याला अकारण आवडत नसतो तशी आहे असे मला वाटते त्याला काही लॉजिक नाही... तर काय जय श्री लंका!!!
|
श्रीलंकेचे दोन खेळाडू पंचानी कारण नसताना आऊट दिलेच होते... तेव्हा पंच श्रीलंकेच्या बाजूचे होते हे पटत नाही.. पंचांकडून आणि तेही या दर्ज्याच्या पंचांकडून अशा चुका अपेक्षित नसतात हे खरं... मला श्रीलंकेचा संघ आवडतो (एक तो मलिंगा सोडला तर... तो चेन्डू भिरकावतो त्यामुळे त्याला कुणीतरी बदडायलाच हवं असं मला वाटत रहातं ). बाकीचे खेळाडू खरंच चांगले आहेत की. नीट खेळतात, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतात, उगाच बडबड करत नाहीत.. मोजकंच बोलतात..
|
Zakki
| |
| Wednesday, April 25, 2007 - 1:41 pm: |
| 
|
रॉबिनहूड यांना १०० टक्के पाठिंबा. त्यांची सर्व विधाने माझ्या अनुभवांशी नि इतरांच्या अनुभवांशी जुळतात! (अगदी अमेरिकन काळ्यांना सुद्धा ते याहि काळात जाणवते) जगातील एक अंतिम सत्य त्यांना समजले.
|
Dinesh77
| |
| Wednesday, April 25, 2007 - 1:50 pm: |
| 
|
मला तरी Australia सोडुन कोणिही जिंकले तरी चालेल. Sri Lanka जिंकली तर उत्तमच. त्यांची जिगर खरच वाखाणण्यासारखी आहे. मला आठवते एकदा मुरलीला Australia त पंचानी action वरुन No Ball दिला होता ICC ने action approve करुनही, तर रणतुंगा सरळ टीम घेवुन बाहेर गेला.
|
Maitreyee
| |
| Wednesday, April 25, 2007 - 2:00 pm: |
| 
|
आपण तर बाबा श्रीलंकेला फ़ुल्ल सपोर्ट करणार! मस्त खेळताय्त ते पूर्ण स्पर्धेत!! ऑस्ट्रेलियाची कुणीतरी जिरवावी असे वाटत असेल तर मला तरी श्रीलंकेकडूनच जरा आशा आहे! जय हो श्रीलंका ता.क. तिकडे अफ़्रिकेची हालत खराब दिसत आहे already ! 26/3 !!
|
ताजा ताजा कलम. साऊथ आफ्रिका ५ बाद २७
|
Farend
| |
| Wednesday, April 25, 2007 - 2:55 pm: |
| 
|
६६ for ५, फक्त गिब्ज मारतोय. पण आता गोलंदाजी थोडी ढिली पडलिय असं दिसतं मला इतके दिवस जयवर्धने आवडायचा नाही, पण काल त्याला 'मानला'. मुरली चा तर भारत हरल्यावर सुद्धा राग आला नाही मुलाखत ऐकताना, त्यात तो भारताचा जावई. बरे झाले हनुमानाने थोडे शिल्लक ठेवले पण मॅग्राथ विकेट्स नक्की काढणार फायनल ला ही आणि त्याचे आश्चर्य वाटते... दोन तीन वेळा बायकोच्या कॅन्सर मुळे आणि स्वत:च्या दुखापती मुळे बाहेर जाऊन परत आला आणि आता निवृत्त होणार आहे तरी काय जबरदस्त उत्साह आहे! परत बाकीचे चांगले खेळतायत आणि याला नुसता 'ठेवलाय' आता चाल्लाच आहे म्हणून असे नाही, तर नवीन लोकांपेक्षा चांगली बोलिंग करतोय. एकूणच अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांत खेळ कसा उंचावतात त्याचे नेहमी आश्चर्य वाटते. पण एरव्ही एखाद्या मुख्य फलंदाजाला टार्गेट करतोय म्हणून बहुतेक वेळा बरोबर 'काढणारा' मॅग्राथ लंकेविरुद्धच फक्त (लीग मॅच ला) म्हंटला होता की 'They will test us '!
|